|
Disha013
| |
| Thursday, November 09, 2006 - 5:41 pm: |
| 
|
अहो झक्कीकाका,सगळे मान्य!आणि मक्कु==मेक्सिकनच. कामे खालच्या दर्जाची नसतात हेही मान्य! पण आपल्या देशात मानाने रहाय्चे सोडुन देवुन अमेरिकेत येवुन यांची सार्वजनिक बाथरूम धुण्यापेक्षा नेते बनलेले काय वाइट? आणि माझे personal मत विचाराल तर, अशा लोकांचे कौतुक वाटते बस! (मला अभिमान नाहिये त्यांचा.......बातमीत तसा सूर व्यक्त होतोय!) जिन्दालविशयी मला हे आताच कळाले..तोच काय,इथली अर्ध्यापेक्षा जास्त मंडळी असेच म्हणतात! 'हम india तो घुमने के लिये जाते है..सिर्फ़ एक महिने के लिये! उससे जादा रह नही सकते!' असे एका गुज्जु आजीबाईने मला ऐकव्लेले.... बाकी असल्या हायफ़ाय लोकांशी माझे नाही जमत......
|
Disha013
| |
| Thursday, November 09, 2006 - 6:23 pm: |
| 
|
आणि एक,राजकारणातले मला ओ की ठो कळत नाही! या बाबतीत मी अल्पमती! पण सगळा गोंधळ अस्तो आणी ते लोक्स सोयीप्रमाणे पार्ट्या बदलत असतात एवढेच कळते!
|
Zakki
| |
| Thursday, November 09, 2006 - 11:50 pm: |
| 
|
पण आपल्या देशात मानाने रहाय्चे सोडुन देवुन अमेरिकेत येवुन यांची सार्वजनिक बाथरूम धुण्यापेक्षा नेते बनलेले काय वाइट? अजून मी तरी कुणा भारतीयांना सार्वजनिक बाथरूम्स धुताना पाहिले नाही. मक्कु करतात, कारण त्यांना देशात मानाने रहाणे, नेते होणे इतकेच काय दोन वेळचे खाणे सुद्धा मिळत नाही, म्हणून ते इथे येतात. मला दोन वेळेलाच काय, चारी ठाव खायला मिळत होते, नि भरपूर पैसेपण मिळत होते. पण त्याकाळी फक्त अमेरिकेतच काँप्युटरचा प्रसार भरपूर झाला होता. म्हणून ते शिकायला मी इथे आलो. इंजिनियरची नोकरी मिळेना, मग काय अगदीच काही नाही तर प्रोग्रॅमिंग नक्कीच जमते, म्हणून तशी नोकरी सुरु केली. पुढे १९८० मधे अनेकदा यूरोपच्या वार्या घडल्या, तेंव्हा आमच्याच कंपनीतल्या लोकांकडून कळले की अमेरिकेपेक्षा ते लोक काँप्युटर वापरण्यात बरेच मागे आहेत, फार महाग पडते म्हणे! पुढे पी. सी. आल्यावर सर्व बदलले. तुम्ही सर्वजण After PC जनरेशनचे अस्ल्याने तुम्हाला या गोष्टी कळायच्या नाहीत. पूर्वी लोक चांगले करियर, ज्ञान मिळवणे या हेतूने इथे येत असत, आतासारखे केवळ पैसे मिळवायला नाही. आजकाल इथे येणारे लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन स्वत:ला 'वरच्या दर्जाची कामे करतो, आम्हालाच सर्व कळते, अमेरिकेत काय शिकायचे, पैसा मिळवून भारतात परत जायचे!' अश्या वृत्तिने वागताना दिसतात. त्यात काही हरकत नाही म्हणा. फक्त जेंव्हा तेच लोक भारतात गेल्यावर न्हणतात, कुणितरी अमेरिकेतून येऊन आमचा देश सुधारून द्या, तेंव्हा वैताग येतो! स्वत: काम करण्यात तुमच्या dignity ला बाध येतो का!! धन्य ते भारतीय! हटकेश्वर, हटकेश्वर!!
|
Giriraj
| |
| Saturday, November 25, 2006 - 7:29 am: |
| 
|
कुणा कुणाला काय काय वाटते याबद्दल? भारत आणि अमेरिका यंच्यात थोडीफ़ार analogy घेऊन लिहिलेला हा लेख आहे. Fractured Democracy
|
Laalbhai
| |
| Monday, November 27, 2006 - 3:29 am: |
| 
|
ह्याच विषायावरचा हरिष खरे यांचा लेख मी "दहशतवादावरचा उतारा" या BB वर नुकताच दिला होता. The BJP's ideological commitment and disruptive tactics pose a threat to the survival of the Constitution. हे जरा अतिशयोक्त वाक्य असले तरी त्यात तथ्य आहे. RSS धार्मिक भावना भडकावून सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच वेळेस त्याचे दुष्परिणाम पहाण्याची त्यांची तयारी नाही. पण threat to the survival of the Constitution असे काही वाटत नाही. एकतर १९९२ मधे हिंदू लोकं ज्या अतिरेकी धार्मिक प्रचाराने प्रभावित झाले होते, तसे काही होताना आता दिसत नाहीये. त्या विचारातला फोलपणा समजला जातोय. Fractured Democracy ही भूमिका माझ्यामते टोकाची आहे. Noorani must be a rightist among leftists. म्हणजे अमेरिकेविषयी अमेरिकनांनी ठरवावे, भारताची लोकशाही fractured आहे, असे मला तरी वाटत नाही. उलट दिवसेंदिवस आपली लोकशाही अधिकच बळकट होत चालली आहे. सुजण आणि सुशिक्षित जनतेने थोडी संवेदनशिलता आणि कृतीशिलता दाखवली तर चित्र अजुनच चांगले दिसेल. कदचित आताच्या ९० % भारतेयांनी पारतंत्र्याची आच सहन केलेली नाही, त्यामुळे लोकशाहीचे महत्व समजायला जरा वेळ लागेल, पण आपल्याच बरोबर जन्मलेल्या अनेक देशांपेक्षा आपली स्थिती आज खुपच चांगली आहे, तीही लोकशाही व्यवस्था टिकवून. जातीभेद, धर्मभेद, वंशभेद कुठे नाहीयेत? तसेच ते भारतात आहेत. एका समाजाचे प्रतिनिधित्व करत मतं मागणारे लोकं सगळीकडेच आहेत. भारतीय मतदार योग्य वेळेस त्यांना त्यांची जागा दाखवतात. पण मुळातच भारताचे (हिंदू) लोक fear-mongering ला आणि कडव्या अतिरेकी प्रचाराला फारसे बळी पडत नाहीयेत, हे दिसतेच आहे. काही लाटा असतात, त्या येतच रहाणार. त्यातून आपण अजुन ठाम उभे आहोत, हे खरेतर आपल्या सशक्त लोकशाहीचे वैशिष्ठ्य आहे. पण उजवे जसे सगळ्यांची भीती घालत राष्ट्रभक्ती चेतवायचा प्रयत्न करत असतात, तसाच काहीसा प्रकार डाव्यांमधेही असतो. काही डाव्यांना उजव्यांची विनाकारणच फार भीती वाटत असते, नूराणी हे त्यातलेच एक असावेत! पण उद्या RSS च्या प्रचाराला पूर्ण बहुमत मिळाले आणि त्यांनी घटना बदलायचा प्रयत्न केला तरी ती fractured लोकशाही असेल असे मला वाटत नाही. कडव्या धार्मिकतेचा विजय होईल इतकेच, पण तीही एक लोकशाही प्रक्रिया असेल. (अर्थात, असे होणे नाही, पण जर तर ची गोष्ट करायचीच झाली तर.) Coalition governments ही लोकशाही दुबळी असल्याची खूण होऊ शकत नाही. तसेच गेले २ वर्षे संसदेचा कारभार ठिकसा होत नसला तरी त्याने भीतीदायक असे काहीही नुकसान होत नाहीये. I certainly do not agree with what Mr. Noorani is claiming. This is another kind of fear mongering I guess. Mr. Khare's artical is more balanced and atleast it is not trying to pose any "threat". We must believe in ourselves and no fool - from RSS, CPM, Congress or any other political party - can halt our growth path, if we stand united. It is not political parties who are keeping India united. It is we - the people of India - are keeping India united and on its growth path. I condemn all kinds of fear mongerings either by RSS or by leftists like Noorani's. The Parivar has no economic agenda worth the name. >> हे एक वाक्य मात्र शत प्रतिशत खरे आहे!
|
Santu
| |
| Monday, November 27, 2006 - 1:04 pm: |
| 
|
बिजेपी threat to constutution )))))या नूरानिला फ़क्त बीजेपी च दिसतो काय? अर्थात एक मुसल्मान bjp बद्दल दुसरे काय लिहणार. फ़रर तर त्याने जमात नाहितर समाजवादि पार्टी बद्दल लिहावे. त्याच इस्लाम आणि जिहाद हे वाचा म्हनजे कळेल. की हा डाव्यातला उजवा नसुन कडवा मुसल्मान आहे. त्याच्या सारख्या सरकारी मुसल्मानाकडुन दुसरे काय अपेक्षित हि नाहि म्हणा
|
Peshawa
| |
| Monday, November 27, 2006 - 6:49 pm: |
| 
|
The great progressive Lot! http://www.outlookindia.com/full.asp?fodname=20061124&fname=kolkata&sid=1 for Quota sympathizers http://www.outlookindia.com/full.asp?fodname=20061204&fname=Sacher+%28F%29&sid=2
|
Chyayla
| |
| Monday, December 11, 2006 - 3:22 am: |
| 
|
अजुन एक बातमी आता वाल्-मार्ट भारतातही येत आहे म्हने.... त्याचे फ़ायदे तोटे नन्तर पाहु पण एक नक्की नौटन्कीचा कार्यक्रम मात्र तयार असेलच. १) डाव्यानी विरोध करायला सुरुवात करायची. २) नेहमी प्रमाणे मोर्चे, बन्द, धरणे, धमक्या आदी प्रकारे भुन्कण्याला सुरुवात करायची. ३) सोनियाने न बोलता थोडे घाबरल्या सारखे करायचे. ( मी मारल्या सारखे करतो तु रडल्यासारखे कर) ४) जनतेला दोघ मिळुन मस्त उल्लु बनवुया ५) शेवटी वालमार्ट ला परवानगी, थोडी बिस्किटे डाव्याना दीलीत की ते शेपुट घालुन गुमान बसणार. ६) आणी मग कॉन्ग्रेसने म्हणायचे आम्ही परकिय गुन्तवणुक करवुन आर्थिक प्रगती करतोय. काय कसा काय मसाला... आता बघाच तुम्ही शो सुरु व्हायला जास्त वेळ नाही.
|
Chyayla
| |
| Monday, December 11, 2006 - 3:51 am: |
| 
|
इस्लामी दहशतवादाच्या BB वरच त्या हरिश खरेचा फ़ोलपणा लक्षात आला होता... तरी एक चान्गली प्रगती दिसत आहे की डावे काही करु शकत नाही, किन्वा कम्युनिस्ट तत्व कस कुचकामी आहे ते तुमच्या लक्षात आल आहे म्हणजे... थोडे वैफ़ल्य, निराशा येणारच हे ही नसे थोडके... माणुस असाच हळु हळु सत्याकडे सरकत जातो. ह्याच वैफ़ल्यग्रस्त आणी आजारी मानसिकतेमुळे आलेली निराशा ज्याप्रमाणे एका रोग्याला सगळ जगच रोगी दिसत मग त्याच्याकडुन कुणाचे निष्पक्ष निरोगी असे Analysis ची अपेक्षा कशी करावी. त्यापेक्षा हा प्रयत्न सोडुन दीला तर निदान कुणाची दीशाभुल करण्यापासुन तरी वाचेल. अध्यात्मामधे असे म्हणतात की जोपर्यन्त स्वता: अनुभव घेत नाही तोपर्यन्त त्याच्यात अशाच प्रकारचा गोन्धळ सुरु असतो. कदाचित सन्घ समजण्याबाबतीत असाच प्रकार असावा. ईतक्या वैफ़ल्यातुन बाहेर पडल्यावर सन्घ समजण्याची योग्यता यायला वेळ लागेल.कदाचित ही पण पुढे जायची पायरी आहे असे समजावे. The Parivar has no economic agenda worth the name ... असेच गैरसमज पसरवायचे असतात बर का? चालु द्या... चान्गला प्रयत्न केलात. ज्याचे ध्येयच देशाला परम वैभवावर न्यायचे आहे त्यान्च्या बाबतीत हा खोडसाळपणा... कोण स्वदेशी, स्वावलम्बन म्हणतोय ते सोयिस्कर विसरायचे असते. तरी बर BJP च्या राज्यात मनमोहनसिन्गना अपेक्षीत मार्गावरच आर्थिक घौडदौड चालु होती.
|
Laalbhai
| |
| Monday, December 11, 2006 - 10:43 am: |
| 
|
विश्रांतीनंतर सामन्यास पुन्हा सुरवात!
|
च्यायला खर सांगायचे झाले तर वॉलमार्ट भारतात येऊ नये. अरे ही जी मार्ट संस्कृती आहे त्यामुळे अनेक दुकानदार व त्यांची कुंटुबीय उघड्यावर येतील. त्यांनी काय करावे मग? वॉलमार्ट ही अमेरिकीतली स्वस्त वस्तु विकायची चेन आहे पण भारतात ते स्वस्त विकतील असे नाही. कारण त्यांचा टारगेट audiance हा सर्वसामान्य भारतीय नसेल तर ज्यांचा कडे थोडे एक्स्टा पैसे आहेत व जे अशा दुकानातुन फिरन्यात मोठेपणा समजातात ती लोक आहेत. पुण्यात गेल्या वर्षी मी true mart , food mart ozone ई चेन मधुन फिरलो वस्तु ही विकत घेतल्या. त्यांचे साधारण भाव काय होते ते लिहीतो. काजु - ६०० रु किलो, टमाटे - १० रु पाव, दाळ - ४४ रु किलो. हेच भाव अनुक्रमे गल्लीतल्या दुकानात ४०० रु ३२ रु व ७ रु होते. हे झाले काही भाव. आता लगेच कोणी म्हणेल की क्वॉलीटी चे काय? त्यांचा साठी उत्तर हेच की स्वत्: ozone मध्ये जा व त्या शेजारच्या किराणा दुकानात जा व तपासनी करा. ओझोन मध्य फक्त मार्ट टाईप दुकान असल्यामुळे वस्तु महाग मिळतात. वस्तु गरज नसताना महाग घेनारे लोक आहेत म्हणुन ते दुकान टिकुन आहेत. शिवाय नविन आय टी वाले ह्यांचा कडे भरपुर पैसे असतात ते कसे ही खर्च करतात व अशा दुकानात जाने त्यांना प्रतिश्टेचे वाटते. वॉलमार्ट पण त्यापैकी एक होनार. ७० टक्के जनता गरिब आहे. वॉलमार्ट हे काही त्यांचे खरेदी करन्याचे ठिकाण नसनार.
|
Chyayla
| |
| Monday, December 11, 2006 - 9:23 pm: |
| 
|
केदार, माझेही अगदी असेच मत आहे वर जे लिहिली ते वेगळ्या अर्थातुन, म्हणुनच मी लिहिले होते की फ़ायदे तोटे नन्तर पाहु तर आता विषय पुढे सरकलाच आहे तर मी पण लिहितो थोडे. वालमार्ट ही एक राक्षसी कम्पनी आहे जर त्याला एक देश म्हटले तर जगातल्या पहिल्या २५ श्रीमन्त देशात त्याची गणना व्हायची, कम्पनीचे अर्थकारणच काही श्रीमन्त देशाच्या अर्थकारणाएवढे आहे. एक दुकान सुरु करायला सुमारे १,२७,००० स्क्वे. फ़ु. जागा लागते. अमेरिकेत सुमारे १५,००० दुकाने आहेत वालमार्ट मधे १५ लाख कर्मचारी आहेत जेवढे आपल्या भारतिय रेल्वेत आहेत. बरेच देशात त्यान्नी आपली श्रुन्खला वाढवली काही देशात ते साफ़ अपयशी ठरले. भारताचा विचार केला तर त्यातल्या वस्तु खरच सामान्य जनतेला परवडण्यासारखे नाहीत, शिवाय तुम्ही जी दुकानदार व त्यान्चे कुटुम्बीय उघड्यावर येण्याचे म्हटले अगदी बरोबर आहे. वालमार्ट पासुन आपल्याला शिकण्यासारखे आहे, एक उदाहरण देतो. मी नागपुर मधे असताना नितीन गडकरी... हो तेच ते रस्तेकरी, पुर्ण महाराष्ट्रभर रस्ते बान्धुन विकासाचा सपाटा लावला होता शिवाय नागपुरचा विकास व कायापालट ज्यान्च्या मुळे झाला त्यान्चा पुर्ती प्रकल्प पाहिला. सुपर शॉपी पण पाहिली. आजुबाजुच्या शेतकर्यान्कडुन माल घेउन त्यावर प्रक्रिया करुन ग्राहकाकडे स्वछ, सुन्दर वेष्टनासहीत व माफ़क भावात उपलब्ध करुन दील्या जातो. त्यामुळे शेतकर्याना, प्रक्रिया कारखान्याना, वाहतुकदाराना चान्गला फ़ायदा होतो शिवाय कित्येक गरजुना, गरीबान्ना एक चान्गला रोजगार मिळतो. त्याच उपक्रमात पुर्ती साखर कारखाना सुरु केला होता आता सध्या काय परिस्थिती आहे माहिती नाही. पण एक छान उदाहरण घालुन दिले आहे व एक नव्या जगाची नवी आशा. सध्या शहरात ही सन्स्क्रुती थोडीफ़ार वाढीस लागली आहे, लोकान्चे राहणीमान व क्रयशक्तीपण वाढत आहे त्याना केन्द्रीत करुन जर असा प्रकल्प यशस्वी होत असेल तर भारताला चान्गला फ़ायदा होउ शकतो. असे वाटते.
|
Chyayla
| |
| Monday, December 11, 2006 - 9:41 pm: |
| 
|
हा तरुण भारताचा लेख जरुर वाचा, ही लिन्क काही दिवसच राहील. कुणाला हा लेख कायम कसा करायचा माहित असेल तर क्रुपया सान्गावे. http://www.tarunbharat.net/ajachaanka/sampadakiya_1.htm
|
Manmouji
| |
| Tuesday, December 12, 2006 - 4:36 am: |
| 
|
लोकहो कुणी महितगार mall आणि त्याचे शेतकर्यांवर होणारे चांगले, वाईट परिणाम ह्यावर प्रकाश टाकु शकेल काय? काही कंपन्या शेतकर्याना सामुहिक शेती करायला सांगत आहेत. हे बरे का वाईट?
|
मनमोजी, सामुहीक शेती ही अल्पभुधारकांना वरदान ठरेल. १ एकर ते १० एकर शेती असनार्यांकडे फारशी साधन नसतात. शिवाय सद्या शेतीत नविन प्रयोग होत आहेत ते देखील त्यांना माहीती असन्याची शक्यता कमीच. एखादी चांग्ली कंपनी किंवा सहकारी सोसायही असेल तर असा सामुहीक शेतीचा प्रयोग करायला हरकत नाही. १५ वर्शांपुर्वी महाराष्ट्रात दुध महापुर ही योजना राबविली गेली. त्यामुळे निदान महाराश्ट्र दुध व दुधावर अवलंबीत गोष्टी यात स्वंयपुर्ण झाला. ' विना सहकारा नही उध्दार ' हे त्या योजनेचे घोषवाक्य होते.
|
Satishm27
| |
| Tuesday, December 12, 2006 - 3:22 pm: |
| 
|
केदार, mall संस्क्रुती भारतात वाढतेय, नव्हे फोफावतेय!!!!!!!!!!! अगदी वारेमाप पीक आल आहे अस म्हटल तरी चालेल!!!!!! मागील आठवड्यात CNBCIndia वर Kishore Biyani, Group CEO, Future Group यांनी मुलाखतीत त्यानी सांगितले की " retailing Business is one of the most lowest margin--3-4% " आता मला प्रश्न पडला की, mall मध्ये आम्हाला वस्तू महाग का मिळतात?????? chyayla , तुम्ही download cutepdf printer n make pdf file http://www.cutepdf.com/ by this u can save anything on screen
|
सतिश, किशोर बियानी आजची गोष्ट करत आहे. उद्याची नाही. सध्या मॉल हे नविन आहेत. त्यांचावर होनारा खर्च, जाहीराती, पॉश प्लोअर, जागा ह्या सगळ्याचा खर्च हा त्याचा P& L मध्ये आहे. काही वर्षानी captilisation संपले असेल व मॉल की कल्पना भारतीयांचा मनात रुजेल तेव्हा D&I व A&P नसेल. ( advertise and promot, discount and incentives) शिवाय ३ ते ४ टक्के म्हणतोय ते धांदात खोटे असेल. पुण्यातल्या True Mart ह्या कंपनीचा GM हा माझा भारतातील शेजारी आहे. या बद्दल आम्ही अनेकदा बोललो, त्यांचा प्रमाने साधारण ७ ते ९ टक्के मार्जीन वर true mart चालते. काल रात्री मी CNBC Money ईथे US मध्ये पाहात होतो. कुणीतरी एक लिंडा नावाची बाई जी मार्केट अँनलिस्ट होती ती मेसीज सारखी चेन ८ टक्यांवर चालते असे सांगत होती. आता हे ८ टक्के नोहें व डिंसेबंर मध्ये ईथे बर्याच वस्तु फुकट किंवा मुळ किमतीच्या २५ ते ५० टक्के ऑफ वर विकल्या जाउन असनारे आहेत. त्यावरुन अंदाज येऊ शकेल. कपडे, चपला, धड्याळे, सेल फोन अशा वस्तुं साठी मॉल असावेतच कारण कॉम्पीटिशन होऊन D&I ग्राहकाला मिळतील. ( जसे US मध्ये मेल ईन रिबेट असतो) पण किराणा माला साठी अशी दुकान काहीही फायद्याची नाहीत. बर्याचदा तेथे दाळी, तांदुळ, भाज्या हे महागच असतं.
|
Peshawa
| |
| Tuesday, December 12, 2006 - 7:25 pm: |
| 
|
केदार जर mall मधे माल स्वस्त मिळत नाही व ७०% जनतेला परवडत नाही तर माल स्वस्त विकणारे दुकान्दार उघड्यवर कसे येतील हे समजले नाही... जरा ह्या प्रशणावर सर्वबाजुनी प्रकाश टाकाल का? केवळ wal mart भरतात येतय ह्याने इतकी धडकि भरायची खरच गरज आहे का? wal mart ने US मधे किंवा अन्य प्रगत देशात मिळवलेले स्थान मुख्यत्वे हे low किमतिच्या जोरावर आहे. त्यातील बराच माल हा भारत चिन, होंडुरास सारख्य देशातुन येतो.. असे असताना ह्या moDel चा भरतात कितपत टिकाव लागेल? नाक्यावरचा वाणी wal mart पेक्शा जस्त services देतो अगदि home delivery पसुन phone वर यदी घेण्याइतक्या... त्यातुन तो पैसे पुढे मागे दिले तरी कच्कच करत नाही पुन्हा already एक गल्लित कमित कमि दोन तीन वाणि असतातच अशा वेळेस already competative pricing असते मग wal mart कुठे score करेल? हे मला समजले नाही... US मधे wal mart चा भर rural भागात जाण्यावर जास्त असतो त्यातुन US मधील low population density हा सुधा एक factor आहे इथे कुथेही अगदि वाण्याकडे जायचे तरी drive करावे लागते अशा वेळेस 'एकाच थिकणी सर्व' व 'स्वस्त' हा wal mart खाक्या low income groups परवडणारा थरतो... पण भरतात हेच model ग्रामिण भागात वापरता येइल का त्याना? Mac अणि Wal mart ह्या इथे दर्जाहीन व तळगाळातल्यांसाठिच समज्तात असे असताना up markeT store म्हणुन wal mart ची entry कशि धोकादायक ठरते? जरा सविस्तर खुलासा द्याल का?
|
पेशवा तुम्ही पुण्यात जे एम रोड वर असलेल्या मॅक डी मध्ये जाउन पहा कशी रश असते ते. अगदी बाहेरच्या बस स्टॉप पर्यंत गर्दी असते. ऑफकोर्स गरीब जनता तिथे जात नाहीच. पण ज्यांना ७५ रु चा बर्गर परडवतो ते जातात. आणी तेच पब्लीक वॉलमार्ट चे टारगेट आहे. ज्यांचा कडे जास्त पैसे आहेत ते. मी असे म्हणत नाही की वॉलमार्ट आज आले की लगेच उद्या वाणी बंद होतील. मी पुढच्या काही वर्षांनतर चे बोलतोय. आज कोणीही तिथे जानार नाही पण येत्या काही वर्षात परिस्थीती बदलेल. वॉलमार्ट काय वा मक डी काय येथे जरी ड दर्जा चे असले तरी तिथे नाहीत. हे वरील मक च्या उदा वरुन वाटते. ईथे US मध्ये ही ४० - ५० वर्षांपुर्वी आपल्या कडे जसे गल्लीत दुकाने होते तसे ईथे ही होते. आज नाहीत. मी जरा आधी जास्त तिखट प्रतिक्रीया नोंदवीली हे मात्र मान्य.
|
Peshawa
| |
| Tuesday, December 12, 2006 - 9:27 pm: |
| 
|
केदार अहो अशी गर्दी मी जोशी वडेवालेंच्या इथे सुधा बघीतली आहे. चितळे समोर रांगा लाउन बसायचे दिवस आठवतात मला. त्यातून हे म्हणजे elton jhon च्या show ला stadium भर गर्दी जमते म्हणुउन सारखे त्याचे कार्यक्रम नकोतच नाहीतर आपल्या गायकानि काय करायच अस म्हटल्या सारखे वाटले! wal mart घातक का? मी layman आहे पण इतकी भिति इतक्या knee jerk reactions देणे बरोबर वाटत नाही म्हणुन जाणुन घ्यायचि इच्छा आहे. लांड्गा आला रे type response. SEZ म्हणा, ईन्शुरन्स म्हणा कीन्वा हे retail म्हणा सगळिकडे तोच response. इथे wal mart ला प्रखर विरोध आहे. अगदि त्याच कारणांसाठी ज्याचा ओझरता उल्लेख तुम्ही केलात पण मधे वाचनात आले की wal mart चा community वरचा effect ह्यावर अनेक वर्श संशोधन चलु आहे. पण निश्कर्श हे सफ़ेद हे झुट असे नाहीत.. (मला पुर्ण reference सापडला तर टाकेनच) मुद्धे हे आहेत १. mall संस्क्रुती नको आहे का? २. बाहेरचे प्लयेर hyaa क्षेत्रात नको आहेत (का?) ३. <wal mart> सारखा राक्षशि खेळाडू पार वाट लावेल (कशी?) ------------------ मोड्स हे discussion वेगळ्या BB वर हलवाल का please?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|