Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 09, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through November 09, 2006 « Previous Next »

Laalbhai
Friday, August 25, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sahilshah
शेतीचा व्यवसार वाढू शकत नाही हे myth आहे.

शास्त्रशुद्ध आणि भोवतालच्या नैअर्गिक परिस्थितीला अनुसरून शेती केली तर शेतीमधे खुप उत्पन्न येते. शेती हे शास्त्र आहे. केवळ पिढीजात येणार्‍या अनुभवावर ती केली जाते त्यामुळे त्यातून फारसे उत्पन्न मिळत नाही. योग्य अभ्यास केला तर ३,४ एकरातही लाखोंचे उत्पन्न मिळू शकते.

growth-based salary for MPs and MLAs हाही एक फारच चांगला मार्ग आहे. म्हणजे ८ % प्रगती झाली तर बजेट च्या ०.०८ % पगार सगळ्या MP-MLAs ना मिळून द्यावा. असे काहीतरी!

आजच्याच कोणत्यातरे पेपरात आहे की पुढचे २० वर्षे भारताची आर्थिक प्रगती होईल, पण जीवनमान सुधारणार नाही! काय चाटायची ती आर्थिक सुधारणा?? माझ्यामती कोणत्यातरी स्वीस बॅंकेने काहीतरी अहवाल सादर केलाय.

यात अतिशयोक्ती नाही, असे नाही. पण सध्याची परिस्थिती पहाता, फारशी अतिशयोक्ती आहे, असेही म्हणवत नाही.


Yedaa
Friday, August 25, 2006 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा एकदा......

लोकसभेत खासदारांची गुद्दा-गुद्दी
(रा.ज.द. चे) खासदार हौद्यात धावले
माईक चे क्षेपणास्त्र करुन फेकले
एकमेकांच्या अंगावर धावत जाऊन अर्वाच्च शिवीगाळ केला


वगैरे वगैरे..........


http://www.esakal.com/esakal/08252006/NT00CC763A.htm
http://www.esakal.com/esakal/08252006/NT00CC7646.htm

Moodi
Friday, September 01, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहा या लोकांची उलटी विचारसरणी. कधी सुधरतील देव जाणे. आधीच मर्कट अन त्यात मद्य प्यायला असे लोक आहेत यांचे. पाकीस्तान मिळुनही यांचे समाधान झालेले दिसत नाही.

http://www.esakal.com/esakal/09012006/2B86EFBF9D.htm

Chyayla
Thursday, September 07, 2006 - 11:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही अजुन एक बातमी खुल्लम खुल्ला अतिरेक्यान्साठी राजकिय पार्टी ची स्थापना. याला लोकशाही म्हणायचे काय.सगळी सेक्युलर पिल्लावळ त्याना मदत करण्याची स्पर्धा सुरु होइल हे सान्गण्याची गरज नाहीच.

http://www.tarunbharat.net/692006/sampadakiya_5.htm

Samai
Monday, September 11, 2006 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेलगी म्हणतो मी शरद पवारांच आणि भुजबळांच नावच घेतलं नव्हतं :-(


Soultrip
Wednesday, September 13, 2006 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच्या लोकमत ( Print copy )च्या पहिल्या पानावरचा मथळा आहे,
'मेमन कुटुम्बातील चार जणावर ठपका'!..
.. ठपका? इतकी वर्षे, हजारो साक्षी होऊन निकाल जाहीर झाला आणि दर्डाचा लोकमत 'ठपका' म्हणतो! अशा नीचांबद्दल दर्डाला असा कळवळा का यावा? कि, कॉंग्रेसचं secular card खेळुन त्याना औ.बाद,मालेगाव,भिवंडी इ..मधील मुस्लिम वाचकांची (मतदारांची) काळजी (पुळका) आहे?


Soultrip
Wednesday, September 13, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेलगी म्हणतो मी शरद पवारांच आणि भुजबळांच नावच घेतलं नव्हतं >>>>

आर. आर. ने दम भरला असेल, त्यामुळे त्याने statement लगेच retract केलं!
लोकशाही न म्हणता सरंजामशाही असंच म्हटलं पाहिजे! मागे जसे इंदोरचे होळकर, नागपुरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड इ.इ. सरदार,सरंजामदार होते नां, तसे आज या 'लोकशाही' (?) मधे बारामतीचे राजे शरदचंद्रजी, अकलुजचे विजयसिंहराजे, लातुरचे विलासचंद्र, मुंबैचे ठाकरे, सोलापुरचे सुशिलकुमारजी, निलंग्याचे निलंगेकर्-पाटिल, इ.इ. जहागिरदार आहेत. वैभव भोगुन म्हातारे झाले की, आपपल्या मुलांना,मुलींना,पुतण्याला जहागिरीची गादी हाती देतात! आम्ही आपलं भाबडेपणानं 'भारत्-माता की जय', 'वंदे मातरम' गात, दरवर्षी tax returns properly भरुन, त्यातल्या त्यात lesser thief ला मत देऊन 'आमच्यावर राज्य करा' म्हणुन आवतान (आमंत्रण)देत असतो!


Samuvai
Wednesday, September 13, 2006 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है soultrip :-)

Soultrip
Saturday, September 16, 2006 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Samuvai!

Sent e-patra to eSakal. Hope they publish it..

----
पुणे विद्यापिठाच्या कुलगुरुंचे गुरुकुल पद्धतीविषयीचे विधान वाचण्यात आले. त्या विधानाच्या सत्य-असत्यता वादात न पडता, वर्तमानकाळात काय करता येईल की जेणेकरुन पुणे विद्यापिठात शिकणार्‍या समस्त विद्यार्थ्यांचा (व पर्यायाने भारताचा) भविष्यकाळ उज्ज्वल होईल यावर परिश्रम घेतले जावेत, हीच कुलगुरुंना नम्र विनंती आहे.

गुरुकुलाबद्दल एवढा राग असेल तर कुलगुरुनी ‘गुरुकुल’ शब्दातुनच उत्पन्न झालेले ‘कुलगुरु’ या पदाचे नाव तरी बदलुन घ्यावे!
----

Limbutimbu
Saturday, September 16, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> गुरुकुलाबद्दल एवढा राग असेल तर कुलगुरुनी ‘गुरुकुल’ शब्दातुनच उत्पन्न झालेले ‘कुलगुरु’ या पदाचे नाव तरी बदलुन घ्यावे!
अरे मी या टॉपिकचा सन्दर्भ घेवुन कुठ तरी काय तरी खरडल होत अस आठवत हे! :-( सापडत नाही

Soultrip
Monday, September 18, 2006 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवतय मला पण ते.
I do have some respect for this man (VC of UoP). He really has come up from rags, he could be the ideal Indian Idol! But once you make BIG, you should have a BROADER vision, you should RISE ABOVE caste, creed, politics etc & strive only for EXCELLENCE!
On one hand, he says 'don't call me an OBC Kulguru' & on the other hand, he lashes out (unnecessarilly & wrongly) at Brahmins in a OBC-hosted function!

This is height of hypocrisy! & That's why he fails miserably short of becoming an Idol!

Disha013
Wednesday, November 08, 2006 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद...... हे वाचा....



http://www.esakal.com/esakal/11092006/ACB020595F.htm

Kedarjoshi
Thursday, November 09, 2006 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय वंशाचे लोक नि भारतीयांना अभिमान. सकाळ किंवा ईतर पेपर च्या संपादकाना अशा बातम्या का छापाव्या वाटतात?
ही लोक भारतीय वंशाची आहेत पण पत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान का वाटावा? केव्ळ त्यांचे पुर्वज भारतिय होते म्हणुन?
आदर किंवा कुतुहल ओके पण अभिमान??
ते सर्व ह्या देशाचे रहीवाशी आहेत. भारताशी त्यांचा काही संबध नाही.

अमेरिकीत ईतर युरोप वंशीय पण निवडुन येतात पण त्याचा उदो उदो केला जात नाही.

अजुनही माणसिक गुलामी संपली नाही आपली. ईकडे कोणी साध्या स्पेलींग स्पधेत पहीले आले की लगेच त्याचा उदो उदो भारतीय पेपर मध्ये.

दिशा हे तुमच्या विरुध्द पोस्ट नाही. फार तर एक लावुड स्वगत म्हणुन सोडुन द्या.


Zakki
Thursday, November 09, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. भारतातील लोकांना त्याचा अभिमान वाटतो कारण हे सर्व गेल्या २५ वर्षात झालेले आहे. अजूनहि सौ. स्वाती दांडेकर थोडे फार मराठी बोलू शकतात, त्यांना बरेच माहित आहे आपल्या (उच्च) संस्कृतिबद्दल. (आणि हेहि माहित आहे की ती संस्कृति केवळ जुन्या, क्षीण, पिवळ्या पडलेल्या कागदांवरच आहे, प्रत्यक्ष व्यवहारात नाही!). निदान आमच्या सारख्या भारतातून आलेल्या अमेरिकनांना तरी त्यांचा व इतर निवडून आलेल्या भारतीयांबद्दल अभिमान वाटतो.

इथे स्थानिक स्तरावर पारसिप्पनी नि दक्षिण न्यू जर्सित शाळा ' superintendent , एक लोकांनी निवडून दिलेली जागा, भारतीयांनी भूषवलेली आहे. न्यू जर्सीमधे राज्य स्तरावर सुद्धा भारतीय व्यक्ति आहे.

या उलट युरोपियन्स आता इथे पार मिसळून गेले आहेत. त्यांच्या एक दोन पिढ्या इथेच जन्मल्या. ते अस्सल अमेरिकनांप्रमाणे फ्रेंच, इटालियन इ. लोकांविषयी सहज कुत्सिततेने बोलतात, त्या देशांबद्दल त्यांना जराहि आत्मीयता वाटत नाही.

तसे इथे एक 'बर्वे' नावाचे गृहस्थ अनेक वर्षे मेरिलँडमधे निवडून येतात, पण त्यांची हि तिसरी पिढी. ते नाही फारसे भारतीयंत मिसळत!


Vinaydesai
Thursday, November 09, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॉबी जिंदाल शिरा ताणून सांगत असतो, मी भारतीय नाही म्हणून.. कुणीतरी सकाळच्या संपादकाना ह्याची जाणीव द्यायलाच हवी...

त्याला वाटत नाही, तर जबरदस्तीचे कौतूक कशाला...?

ज्याला मनापासून वाटते 'मी भारतीय' तोच खरा भारतीय.. नाही का?


Dinesh77
Thursday, November 09, 2006 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,
तुमचा मुद्दा मला पटला.
ह्या अमेरिकेत निवडून आलेल्या लोकांनी जर आपल्या अनुभवाचा उपयोग करुन भारतीय राजकारण सुधारण्याचा प्रयत्न केला तर ती अभिमानाची बातमी होईल.


Disha013
Thursday, November 09, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचेच मुद्दे आपापल्या जागी बरोबर आहेत!
मी एक जनरल न्यूज म्हणुन post केली इथे.
पण इथे येवुन त्या मक्कु लोकांसारखी खालच्या दर्जाची कामे करण्यापेक्षा हे बरे!
तसे जगातल्या पहिल्या ५ श्रीमंतात गणना होनारे भारतीय पण यांची सेवा करतातच ना?
कोउतुक(कसे लिहाय्चे?) करुन सोडुन द्यायचे


Zakki
Thursday, November 09, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या अमेरिकेत निवडून आलेल्या लोकांनी जर आपल्या अनुभवाचा उपयोग करुन भारतीय राजकारण सुधारण्याचा प्रयत्न केला तर ती अभिमानाची बातमी होईल.

हे साफ विसरा!! असे होणार नाही. जर त्यांनी म्हंटले की आमच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा करून देतो, तर भारतीय म्हणतील, 'तुम्हाला काय वाटते, तुम्ही अमेरिकेहून आलात म्हणून जास्त शहाणे झालात का? आम्हाला काय अक्कल कमी आहे का? तुम्ही आज इथे येणार नि उद्या परत जाणार, मग आम्हालाच ते सगळे निस्तरावे लागणार! तुम्हाला इथले काही कळत नाही! तुमच्या अमेरिकेतल्यासारखे इथे चालत नाही हो! भारतात सगळे वेगळेच असते!' इ. इ.

स्वानुभव हो. म्हणजे माझा बायो डेटा न वाचताच, माझ्याशी न बोलताच, त्यांनी हे ठरवले. असा हुषारीने धंदा करणारे हे लोक.

खरे तर बर्‍याच बाबतीत त्यांचे म्हणणे खरे आहे.

शिवाय भारताचे कल्याण करायला मुळातच तुम्हाला इतर देशातले लोक काय करायचे, हा प्रश्न मला सतावतो. तुमची संस्कृति उच्च, तुम्ही हुषार, इ. इ.

इतके दिवस भारत गरीब होता, आता तर अब्जावधि डॉलर्स आहेत. म्हणजे पैशाचा प्रश्न नाही.

शिवाय लोकसंख्याहि खूप वाढली आहे. मुसलमानांना नि इतरांना आरक्षित जागा देऊन तर सर्वांचेच कल्याण होणार आहे ना? मग बाहेरचे लोक कशाला पाहिजेत?


Vinaydesai
Thursday, November 09, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा, कौतूक = kautuuk

विषय आला म्हणून माहीती दिली, Nothing against you
(या जिंदालने मागच्या निवडणूकीत 'मी भारतीय नाही' म्हणून जाहीर केलं होतं.. आणि त्याला जर तसं वाटत असेल तरी हरकत नाही... पण अशा लोकांना मुद्दाम आपल्यात ओढायचा प्रयत्न बरोबर नाही, असं म्हणायचं होतं)



Zakki
Thursday, November 09, 2006 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण इथे येवुन त्या 'मक्कु' लोकांसारखी खालच्या दर्जाची कामे करण्यापेक्षा हे बरे!
तसे जगातल्या पहिल्या ५ श्रीमंतात गणना होनारे भारतीय पण 'यांची' सेवा करतातच ना?


काही कळले नाही. मक्कु म्हणजे मेक्सिकन का?

कामे खालच्या दर्जाची नसतात, करणारे कुठल्या दर्जाचे आहेत ते मह्त्वाचे. इथे अगदी उच्चवर्णीय, श्रीमंत ब्राम्हणसुद्धा स्वत:च्या बाथरूम्स स्वत: साफ करतात, भांडी घासतात. तर ती खालच्या दर्जाची कामे कशी असतील? फार तर त्या कामांना फार थोड्या शिक्षणाची किंवा कौशल्याची गरज पडते, असे म्हणा. त्या दृष्टिने, भारतात जरी अगदी काँप. साय. च्या दोन डिग्र्या घेतलेले, उच्च वर्णीय, श्रीमंत लोक कोडिंग नि customer service करत असले तरी त्या क्षेत्रात ती कामे कमी कौशल्याचीच समजली जातात. इथे हाय स्कूल पास झालेली मुले ती कामे करतात. इथले शिकलेले लोक वेगळीच कामे करतात!

नि 'त्यांची' म्हणजे कुणाची सेवा करतात? मुळात सेवा करण्यात काही पाप आहे का? फुडारी लोक सुद्धा जण्तेची शेवाच करतात ना, अगदी पंतप्रधान नि मंत्री सुद्धा? मग प्रश्न फक्त 'कुणाची' सेवा हा आहे, की सेवा करण्याबाबत? सेवेला आजकाल 'मदत' म्हणतात, Service industry म्हणतात, नि त्यालाहि मोठमोठ्या विद्यापीठातून उत्कृष्ट रीत्या पास झालेले (पास आऊट झालेले नव्हे, तो बुश) तिथे काम करतात. नि भारतीय संस्था त्यांची सेवा न करता, त्यांना मनुष्यबळाची मदत करतात. एकदा काम खालच्या किंवा वरच्या दर्जाचे नसते, हे कळले की मग बाकी सगळे प्रश्न आपो आप निकालात निघतात.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators