|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 12:40 pm: |
| 
|
जाऊ दे आपण काही रुढार्थाने लेखक मंडळी वगैरे नाही आहोत. माझी १ तरी किडूकमिडूक कविता अंकात आली हेच खूप झाले असे म्हणून मी समाधानपुर्वक हा विषय मिटवितो. प्रामाणिकपणे मला हा विषय उभा करावयाचा नव्हता. अरे पण इथे इतके ६ / ७ जण संपादक म्हणून नेमले आहेत आणि सर्वजण गप्प. मी वाट बघत आहे आता ते उत्तरलील मग ते उत्तरतील. पण कुणीही माझ्या पोष्टची वा मेलची दखल घेतली नाही. इतके टाकावू feelings येते ना मग की लगेच कडवटपणा निर्माण होतो कोपापायी.. कविता पसंत पडली नाही हे एक कारण समजून मी इथेच थांबतो.
|
Maitreyee
| |
| Friday, October 27, 2006 - 1:00 pm: |
| 
|
बी तुला अजूनही समजलेले दिसत नाही! नीट वाच. तुझ्या कवितेत अनुचित शब्द आहेत किन्वा तू ती उशीरा पाठवली असे विधान मी केलेले नाहीय! तुला साध्याश्या वाक्याचा अर्थ समजला नाही हा तुझा problem आहे! मला कसले म्हणतोस 'काहीही कारणे देते'!! enough already !
|
बी, तुला माझं उत्तर कळेल अशी मला थोडी जरी शंका असती तर मी ते जरूर दिलं असतं. माझ्याकडून मी हा विषय संपवत आहे. तुझी एकच कविता अंकात घेतल्याच्या आणि तू कुणाचाच आवडता कवी नसल्याच्या पोटदुखीवर तुला लवकर औषध सापडो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
|
Zakki
| |
| Friday, October 27, 2006 - 3:45 pm: |
| 
|
अरे बाबा बी, तू रंगीबेरंगीवर एक पान घे नि काय वाट्टेल त्या कविता लिही. कुणाचा काही आक्षेप नाही. तुझेच पान म्हंटल्यावर तुला जे काय वाटेल ते लिही. त्यावर प्रतिक्रिया येतीलच. त्यांना उत्तरे दे. इथे नको. तिथे जर बर्याच लोकांना तुझ्या कविता आवडल्या, तर त्या जरूर दिवाळी अंकाला पाठव. नाहीतर नको. त्यात काय?
|
Mumbhai
| |
| Friday, October 27, 2006 - 4:44 pm: |
| 
|
कविता पसंत पडली नाही हे एक कारण समजून मी इथेच थांबतो. >> ट्युबलाईट खुप उशिरा पेटली रे . हाच समजुतदार पणा अगोदर दाखवला असतास तर रामयण घडले नसते. मोठा आहेस, जरा समजुतदार पणा दाखव. ४थी-५वीच्या मुलांसारखे प्रत्येक गोष्टींमधे वादावादी (आणि रडारडी) करयची नसते. hope you understand and take it positively.
|
Yog
| |
| Friday, October 27, 2006 - 7:52 pm: |
| 
|
तात्पर्य : दिवाळि अन्क निघाला, सम्पादनही झाले(अर्थातच!), आणि शिल्लक उरले "बरेच काही"... तरिही जमल्यास हेही वाचावे, post on OCT 27, 2006: /hitguj/messages/58489/80113.html धन्यवाद!
|
Ajjuka
| |
| Saturday, October 28, 2006 - 5:04 am: |
| 
|
आमची महान करमणूक होतेय.. बी तू अजून काहीतरी बोल बरं.. अस सोडू नकोस इतक्यात य संपादक मंडळाला.. तुझी कविता घेत नाहीत म्हणजे काय..
|
Himscool
| |
| Saturday, October 28, 2006 - 6:40 am: |
| 
|
मला काही प्रश्न आहेत.. १. ही जी काही चर्चा चालू आहे तशी चर्चा एखाद्या पुस्तकरुपात (कागदावर छापुन) प्रकाशित झालेल्या अंकाबद्दल घडते का? २. इथे प्रतिक्रिया देण्याची सोय आहे आणि प्रत्येकाला आपापली मते मांडता येतात. ह्या सोयीचा असा वापर करणे योग्य आहे का? ३. आणि एकदा संपादक मंडळ नेमले आहे म्हणल्यावर त्यांनी केलेल्या निवडीवर शंका घ्यायची गरज आहे का? आणि एक सूचनाही द्यावीशी वाटते आहे.. बर्याच ठिकाणी स्पर्धेत निवड किंवा अशा प्रकारे लेखांची निवड वगैरे असते तेव्हा त्यात एक निवेदन दिलेले असते.. परिक्षकांचे मत अंतिम राहिल व काही शंका असल्यास त्यावर उत्तर देणे परिक्षकांवर बंधनकारक नाही... (ह्या वाक्याचा योग्य प्रकारे समावेश करणे शक्य आहे)
|
Zakki
| |
| Saturday, October 28, 2006 - 12:41 pm: |
| 
|
अरेरे, भिकार्यांचे हाल पाहून, अपंगांचे हाल पाहून जर श्रीमंत नि अपंगता नसलेले लोक 'आमची करमणूक होते आहे' असे म्हणू लागले तर कुणाला राग येणार नाही? मग बुद्धीने कमी आहोत म्हणून आमच्या प्रयत्नांचे हाल बघून या हुष्षार नि बुद्धिमान लोकांनी 'आमची महान करमणूक होतेय' असे म्हणणे बरोबर आहे काय? कुणाला यात तत्वाचा प्रश्न आहे हे जाणवत नाही काय? 'तरी तुम्ही स्वस्थ कसें' हे एका जुन्या सिनेमातले वाक्य आता किती वेगवेगळ्या प्रकारे म्हणावे? निदान सिनेमाचे ज्ञान असणार्या लोकांनी तरी याचा विचार करावा. शिवाय त्यांच्यापैकी कुणाचा पुण्याशी येऊन जाऊन संबंध असेल तर माझ्या ऐवजी त्यांनीच याबाबतीत पुढाकार घ्यायला नको का? आता कसें! याला कुणी वैयक्तिक टीका, कुचेष्टा म्हणू शकणार नाही, काय? नाव नाही लिहिले कुणाचे!
|
Mumbhai
| |
| Saturday, October 28, 2006 - 5:04 pm: |
| 
|
अरे कैच्या कै काय ... भि्कारी असाल तर आपली कुवत ओळखुन रहावे. उगाच मला इतकीच भिक द्या असे म्हणुन चालणार नाही. आणि मुळ चीड येते ते ह्यांचा चिथावुन काडी लावणाऱ्या 'धनिकां'ची. उगाच आपण फ़ार समाजवादी तत्ववेत्ते आहे अश्यारितीने मुळ वादामधे काडी टाकायची आणि विषय भरकटवत न्यायचा (आपण पण कुणाचे नाव नाय घेतले रे भो .. :D ) उद्या उठुन कोणी साहित्य अकदमी अथवा ऑस्कर का नाही दिली म्हणुन भांडण काढेल. मुद्दा असेल तर वाद घालण्यात अर्थ आहे.
|
Bee
| |
| Saturday, October 28, 2006 - 6:03 pm: |
| 
|
अज्जुका, लेखक आणि संपादक ह्यांच्यामधे संवाद असायला हवा. इथे त्याची उणिव भासते आहे. माझी नाराजी कविता न घेण्यावर नसून ती का नाही घेतली इतके कारण मला ते सांगू शकले नाही ह्यावर आहे. त्यांनी माझी जी प्रकाशित झाली आहे ती कविताही नसती घेतली तरी मला काही वाटले नसते. पण लिहिणारा आणि अंकाचे संपादन करणारा ह्यांच्यामधे आवश्यक प्रसंगी संवाद घडायलाच हवा. इथे संपादक मंडळानी एकदा अंक बोर्डावर आणला आणि नंतर सर्वजण गप्प गप्प झाले. किती सुचना आणि मेल करायच्यात? जे काही किरकोळ प्रश्न होते त्याचे उत्तर द्यायला इतके कांगावे करायला लागावेत? तुझ्यासहीत इथे अनेकांना ही करमणुक वाटली पण मला मात्र ह्यातून कसलाही आनंद वा करमणुक लाभली नाही. उलट माझी इथे निंदा, नालस्ती, नाचक्की, हसा असे खूप काही झाले. म्हणजे मी माझ्या हातानी माझ्याच पायावर धोंडा पाडून घेतला. मला फ़क्त इतकेच समाधान आहे की मी जाब विचारू शकलो इतके तरी माझ्यात साहस आहे. असो. मुंभाई बनावटी आयडी घेऊन तुम्ही नक्की इथे काय contribute करण्याचा प्रयास करत आहात? जेंव्हा तुम्ही चार ओळी खरडाल आणि दिवाळी अंकात लिहाल तेंव्हा या बोलायला. असे तोंडसुख घ्यायला कुणाही येर्यागबाळ्याला जमते. मिलिंदा एक मुद्दा राहिला सांगायचा. ग्रेसच्या कविता किती जणांना कळतात. पण तरीही त्यांचे वाचक सर्वदुर पसरले आहेत. कविता हा साहित्याचा खूप वेगळा प्रांत आहे. कविता न समजूनही कवितांवर प्रेम करणारे कैक जीव ह्या धरतीवर आहेत.
|
Mumbhai
| |
| Saturday, October 28, 2006 - 7:29 pm: |
| 
|
असे तोंडसुख घ्यायला कुणाही येर्यागबाळ्याला जमते. >> म्हणजे तुलापण जमते असेच ना? कारण तु पण लोकांवर असेच तोंडसुख घेत आहेस. आणि माझ्या ID बद्दल- तुझा फ़क्त ID शी संबंध आहे , मी कोण कुठला याचा काहीहि संबंध नाही, उगीच फ़ालतु गोष्टींमधे लक्ष घालुन शहाणपणा शिकवु नकोस. राहिले माझ्या लिखाणाबद्दल. तु आज पर्यंत जितके शब्दांचे तारे तोडले आहे तितके तर मी नक्कीच लिहले आहे. मायबोलीवर ही लिहले आहे आणि काही प्रतिथयश वृत्तपत्रातुन लिखाण केले आहे. माझे मुल्यमापन करायची तुझी लायकी मुळीच नाही. पण मी काय तु आजकाल ग्रेस च्या कवितेचाच पंचनामा करत आहेस तर मी कोण.
|
Ajjuka
| |
| Saturday, October 28, 2006 - 9:40 pm: |
| 
|
कोणाला कशावर हसू यावं हे पण तूच ठरवणार का रे? भले... ते तिकडे खोट्या भाबडेपणाचा आव आणून जिथे तिथे प्रश्न विचारतोस आणि मग आम्ही वैतागलो की हसत बसतोस त्यावर घेऊ का आक्षेप? (संदर्भ्: शब्दार्थ बीबी) तू एक काम कर ना सरळ ऍडमिन ला तक्रार कर की संपादक मंडळ निवडताना त्याने चूक केली आणि तुलच मंडळात घेऊन त्यांनी अंक काढायला हवा होता. तेव्हा आता परत अंक काढा.. काय पण संपादक मंडळ तुम्ही... ग्रेस बद्दल अधिकाराने बोलणार्या या महान कवीची कविता तुम्हाला कळली नाही तर नाही पण सांगायला लाजताय का? एकदाचं करून टाका ना कबूल... ऍडमिन च्या कृपेने इथे फुकट लिहायला मिळतंय तर घ्या लिहून... ऍडमिन बाबारे, मानसिक वयाचा काहितरी criteria लाव बर मायबोलीकर होण्यासाठी..
|
Zakki
| |
| Sunday, October 29, 2006 - 1:20 am: |
| 
|
मानसिक वयाचा काहितरी criteria अहो असले काही केले तर मायबोली एकदम बंद पडेल. तुम्ही तरी इथे कितीदा येता लिहायला? नि मग थोडे तुमच्यापेक्षा कमी हुषार लोक इथे येऊन, तुमचे लिहिलेले वाचून, वा, वा, मस्तच, "अशक्य, उच्च" असले काहीतरी लिहीणार कसे? तर आपले गंमत वाटत असेल तर बघा, पण निदान हिणवू तरी नका, भांडू दे बापड्यांना! तो साईडचा बार असतो तो खाली सरकवला माऊस ने, की मग न वाचता पुढे जाता येते!
|
हे वर काय चाल्लय?????? मी दिलेले चित्र अन्कात प्रदर्शित झाल नाही! चान्गल नसेल म्हणुन किन्वा सम्पादकान्ना पसन्द पडल नसेल म्हणुन किन्वा अन्कात अगदीच अशोभनीय ठरत असेल म्हणुन किन्वा जोडिला अजुन चित्र आली नसतील म्हणुन..... कशानही का होईना ते चित्र अन्कात आल नाही! पण मला त्याच जराही वाईट वाटत नाही! उलट मी खरडलेला लेख सम्पादकान्नी छापलाच कसा यावर त्यान्ना जाब विचारायला अजुन कोणिच कस उठल नाही याचच आश्चर्य मला वाटत हे! एनीवे.... तर ते मी काढलेले महान चित्र सगळ्यान्च्या सोईसाठी इथे देतो! येवुन जावुन काय, चार लोक थोडी हसली म्हणजे झाल! आपला उद्देश तेवढाच असतो!
कस काय जमल हे का चित्र? ओळखाल का कुणाच हे? DDD
|
Bee
| |
| Sunday, October 29, 2006 - 2:33 pm: |
| 
|
Ajjuke, mee aaw aanato hyasathi kahi purawe aahet kee hawetach tir sodaache? ithe mi kunachya hasanyawar bandi ghalat nahi aahe. mee fakt mazya karamnukeebaddal mhanat aahe. mala jar sampadak whayache asel tar mee tyasathi naaw dile asate. pan mala mazi layaki an kuwat mahiti aahe. ithe sampdak whayala far kahi lagate asehee nahi. jyannee hya ankache sampadan kele tyanchyat kahi khas skills aahet asehee nahi. mee Grace'che udaharan ka dile tyasathi tula Milindache post samajawoon ghyawe lagateel tarach tula te udaharan kalel an patel. nahitar kay uchalali jeeb an lawalee talyala ase hoil. anyway.. ithe lihinyat kahich arth nahi. sarwajan kuthun kuthun sandarbh gola karun aanat aahet. parat mi ithe lihinar nahi. kay gondhal ghalayacha to ghala.
|
comeon guys, leave bee alone!
|
Zakki
| |
| Sunday, October 29, 2006 - 4:46 pm: |
| 
|
अरे बी, असे करू नकोस. जोपर्यंत मी लिहितो आहे, तोपर्यंत इथे कुणालाहि लिहायला हरकत नाही. कुणि कुणि पूर्वी पण मायबोलीवर येणार्यांच्या बौद्धिक पातळीवर काही निर.बंध असावेत असे म्हंटले होते, पण ते कधी झाले नाही. तसेच कुणाला येऊ द्यावे नि कुणाला नाही या बाबतीत मॉडरेटर अतिशय उदार मनाचे आहेत. फक्त कधी कधी कुणाचे लिखाण 'उथळ, पांचट, घृणास्पद' नि अपमानकारक, वैयक्तिक पातळीवर अपमानकारक असे झाले की ते उडवून देतात. पण माझ्यासारखी निर्लज्ज माणसे तेव्हड्यापुरते थांबून पुनश्च यायला लागतात, लोक त्यांच्याशी हसत खेळत बोलतात! एव्हढेच की इथे काय नि इतर आयुष्यात काय, सगळ्याच गोष्टी मनावर (फार वेळ) घ्यायच्या नसतात, विशेषत: क्लेशकारक गोष्टी. मग निर्भेळ आनंद मिळू शकतो.
|
Mumbhai
| |
| Sunday, October 29, 2006 - 7:36 pm: |
| 
|
अरे , एकदम टोकाचीच भुमिका? ऐसा नही करनेका ..लिहित जा ..लोकांच्या सुचनेनुसार परत चिंतन आणि अधिक अभ्यास करुन लिही. तुला प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळतच जाईल पण मी लिहले त्याचा उदो उदो करवा या प्रकारचा हट्त नको करु. लोक टिका करत जातील. अरे आपल्या संतांनीच सांगितले आहे 'निंदकाचे घर असावे शेजारी ...' . लोक टिका करत जातीलच. तु त्याच्या नुसार तुझ्यातल्या उणीवा समजावुन घे आणि सुधारणा करुन तुझे लिखाण समृध्द कर नाही तर त्या टिकेला तुझ्या साहित्याने उत्तर दे. take it positively. Good Luck !
|
Lalu
| |
| Sunday, October 29, 2006 - 7:46 pm: |
| 
|
लोकहो, दिवाळी अंक आणि संपादन याबद्दल लोकांना मत प्रदर्शन, सूचना करता याव्यात म्हणून हा बीबी उघडला आहे. हा बीबी फक्त या वर्षीच्या अंकापुरता मर्यादित नाही. इथे येणार्या सूचनांचा, मतांचा इथून पुढे येणार्या संपादक मंडळानाही उपयोग होऊ शकेल. अर्थात त्या सूचनांची अंमलबजावणी करायची की नाही हा त्या वेळच्या मंडळाचा निर्णय रहाणार आहे. तेव्हा सूचना इथे लिहिल्या तर बरे होईल. पुढच्या संपादक मंडळाला प्रतिक्रियांमधून माहिती शोधत बसण्यापेक्षा इथे येऊन वाचणे सोयीचे होईल. मॉडरेटर, इथून पुढे इथे या बीबी वर अंक, संपादन यावरील सूचनां शिवाय इतर काही पोस्ट्स आल्यास उडवून टाकावी ही विनंती. तसंच प्रतिक्रिया बीबी वर काही लोकांनी सूचना लिहिल्या आहेत त्या शक्य होईल तेंव्हा इकडे हलवल्या तर बरं होईल. सगळ्या सूचना एकत्र करण्यासाठी मदत हवी असल्यास सांगा. आजी, माजी संपादक मंडळातल्या लोकांना कामाचा अनुभव म्हणून काही लिहायचे असेल तर लिहिता येईल. हा अंक आपल्या सर्वांचा आहे, तेव्हा हे काम साधारण कसे केले जाते हे सगळ्यांसाठी लिहायला काहीच हरकत नाही असे मला वाटते. ही माहिती सर्वाना मिळाल्यास काम सोपे करण्याच्या दृष्टीने मायबोलीकरांचा हातभार लागू शकेल. शेवटी - बी, तुझी इथली पोस्ट्स वाचून तुला काही गोष्टींचे विस्मरण झाले आहे असे वाटते आहे. आठवण करुन देण्यासाठी मी (संपादक मंडळ नव्हे!) एक मेल पाठवत आहे. त्या गोष्टी इथेही लिहिता आल्या असत्या पण लिहायच्या नाहीत. धन्यवाद.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|