|
Bee
| |
| Monday, October 30, 2006 - 5:17 am: |
| 
|
लालु, वाचकांपेक्षा संपादकांचे मत आणि त्यांच्या सुचना पुढील वर्षीच्या संपादकांना अधिक मोलाच्या ठरतील. वाचकांची मते व सुचनांची मदत पुढील वर्षीच्या अंकामधे बदल घडवून आणण्यासाठी होईल. वाचक आपले काम इथे करतच आहेत. प्रतिक्रियाही छान येत आहेत. पण अंकाचे कार्यस्वरुप कसे असते त्याची माहिती ज्यांनी संपादक म्हणून काम केले आहे तेच देऊ शकतील. तुमच्यापैकी कुणाला ह्यावर लिहिता आले तर फ़ार छान काम होईल. सध्या अंक नविन आहे, आठवून लिहायला फ़ार जड जाणार नाही. नेमस्तक, खरच इथला अनावश्यक वादविवाद उडवून योग्य तेच पोष्ट इथे ठेवा म्हणजे ह्या बीबीचा उद्देश सफ़ल होईल.
|
Himscool
| |
| Monday, October 30, 2006 - 11:31 am: |
| 
|
बी, तुला संपादकांकडुन नक्की कशाबद्दलचे मत हवे आहे.. निवड झालेल्या लेखांबद्दल की एकुण आलेल्या सर्व लेखांबद्दल... जे काही साहित्य आलेले आहेत त्यातील कोणते साहित्य चांगले आहे हे त्यांनी ते साहित्य प्रकाशित करुन दर्शविलेले आहेच... त्यांना संपादन करताना कोणते अनुभव आले ते लिहुन सगळ्यांना संगायची काहीच गरज नाही आहे... त्यांचे जे काही अनुभव असतील ते त्यांनी फक्त लिहून ठेवावेत आणि पुढच्या वर्षी दिवाळी अंकाचे संपादक जाहीर झाले की त्यांना सुपूर्त करावेत ज्याचा त्यांना उपयोग होईल... आत्ताच ते अनुभव सांगुन त्याचा जेव्हा पाहिजे तेव्हा उपयोग होणे कठिण आहे.. कारण बराच वेळ झाला की अशा गोष्टींचे विस्मरण होते..
|
लिंब्या, चित्रात कॅमेरा राहिला असं वाटत नाही का तुला? 
|
Bee
| |
| Tuesday, October 31, 2006 - 2:55 am: |
| 
|
हिमांशू, मला अनुभव वा मत नकोत. मला लेखांबद्दलही इथे चर्चा नको. त्यासाठी 'आपली प्रतिक्रिया' हा बीबी आहेच. असे समज पुढल्या वेळी मला किंवा तुला संपादक म्हणून काम करायचे आहे. पण हे काम कसे असते, त्याला किती वेळ द्यावा लागतो, कामाची अंमलबजावणी कशी होते हे जर कळू शकले तर आपण मनाची तयारी आत्तापासूनच करू शकतो. दिवाळी यायला फ़ार काळ लागत नाही. ही जाते अन परत येते की कळत देखील नाही एक वर्ष उलटले. ही माहिती आत्ता इथल्या एकेक संपादकांना आठवावी लागणार नाही इतक्या सहजपणे ते लिहू शकतात. अजून काही महिने गेलेत की बारीकसारीक गोष्टींचा विसर पडतो. म्हणून म्हंटल हे काम लगेच झालं तर इथे एक DATABASE तयार व्हायला मदत होईल. कसे?
|
Zakki
| |
| Tuesday, October 31, 2006 - 2:56 pm: |
| 
|
अच्छा, आता कळले की या आधी एव्हढा त्रागा, एव्हढा आरडा ओरडा, एव्हढे वादविवाद तुम्ही केवळ या सद् हेतूने केले होते! मग आधीच हे लिहीले असते तर लोक भांडले नसते तुमच्याशी. तुम्हाला नावे ठेवली नसती! असो. शिकाल तुम्ही पण हळू हळू!
|
Asami
| |
| Tuesday, October 31, 2006 - 5:06 pm: |
| 
|
चला आता गाडी पुढे सरकू दे. मला विचारशील तर संपादन कसे आणी का करायचे हे शिकण्याचा उत्तम उपाय म्हणजे ते प्रत्यक्ष करणे. इथे त्याची process लिहा etc ठीक आहे पण दर वर्शी तीच ठराविक टाळकी संपादक किंवा सहाय्यक , पुन्रमुद्रक etc म्हणून असतात हे लक्षात घेतलेयस का कधी ? मनाची तयारी etc म्हणायला इथे काही लढाई होत नाहिये की धाकधुक वाटावी. चार लोकांनी येउन voluntary contribution करून काढलेला non-commercial अंक आहे हे डोक्यात असू दे. त्यात थोड्याफ़ार त्रुटी असणारच. मागे गणेशोत्सवाच्या BB वर पण अशीच process लालूने लिहिली होती. त्याचा काही उपयोग झाला का हे श्रीगणेशच जाणे.
|
Limbutimbu
| |
| Wednesday, November 01, 2006 - 3:49 am: |
| 
|
विनयभाव, राहिला किमान छोटा वेबकॅम तरी दाखवायला हवा होता! पण मी ज्याला नजरेसमोर ठेवुन हे चित्र काढल तो फोटोग्राफिच्या बीबीवर क्वचितच कधी दिसला हे! म्हणुन मला वाटल की फोटोग्राफीचा शौक नसेल त्याला!
|
Bee
| |
| Wednesday, November 01, 2006 - 5:42 am: |
| 
|
झक्की गाडी सरकू दे म्हंटल्यावर मला तुमच्या पोष्टचे उत्तर देता येणार नाही. नविन कार्यकर्त्यांना काम करण्याचा उत्साह असतो आणि त्याहीपेक्षा त्यांच्या नविन कल्पना असतात. जर basic आराखडा तयार करण्यातच सर्व मुदत जात असेल तर ह्या नविन कल्पना कधी राबवायच्यात? त्यासाठीच मला वाटत इथे दरवर्षी नव्याने परिश्रम न घेता आहे तो basic आराखडा वापरुन त्यावर नविन कल्पना अमलात आणाव्यात. असे जर केले तर नविन कार्यकर्त्यांना नविन गोष्टी अमलात आणायला वेळ मिळेल आणि जे जुने कार्यकर्ते होते त्यांच्या कामाचे चीज होईल. असे जर नाही केले तर दरवर्षी तिच step नव्यानी करण्याचे श्रम नविन लोकांना घ्यावे लागतील जे एकदम चुकीचे वाटते आहे. सध्याजरी मायबोलि हा दिवाळी अंक अगदी साधा आहे तरी इथले साहित्य इतर साहित्यापेक्षा निराळे आहे ते टाकून देता येईल असे नाही. त्यामुळे कालांतराने इथल्या दिवाळी अंकाची आपली अशी एक theme असेल. एकदा आपल्याला आपली ओळख प्राप्त झाली की मग नक्कीच हा अंक चारचौघांपुढे आणायला वेळ लागणार नाही. सध्या ह्या अंकाला non-commerical म्हणून त्यातच समाधान बाळगू नये. लालूने जी माहिती नोंदवून ठेवली आहे ती व्यर्थ नाही, (worth) आहे. नविन गोष्टींची सुरवात हळुहळुच होत असते. तिला जर वेळ असेल तर तिने ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाबद्दलही तसेच लिहून काढावे. कुणीतरी तिच्या पावलांवर पाऊल टाकून जुन्या लोकांचे अनुभव वेचणारा मिळेलच. मी जर २००७ मधे सहभागी झालो तर नक्कीच ही माहिती मला मोलाची ठरेल. Admin-- माझी एक सुचना आहे ती मी परत योग्यवेळी करीनच. तुम्ही दिवाळी अंकाचे साहित्य पोष्ट करण्यासाठी एकच बीबी उघडून देता त्या ऐवजी जर प्रत्येक प्रकारच्या साहित्याचे आपले असे बीबी तयार केलेत तर त्याची विभगणी करणे हे काम जवळजवळ automatic होऊन जाईल बघा. म्हणजे जर मला 'कविता' लिहायची असेल तर मी कविता नावाच्या विभागात माझी कविता दिवाळी अंकाला देईन. प्रत्येक लेखकाने आपले साहित्य कुठल्या प्रकारचे आहे, तो लेख आहे, की कथा आहे, की व्यक्तीचित्रण आहे हे जर त्या व्यक्तीनेच ठरवले तर संपादकांना त्यावर विचार करायला आणखी वेळ मिळेल. बघा जमते का असे करायला. परत २००७ मधे मी ही सुचना करीनच फ़क्त तुमचा कोड तयार असायला हवा.
|
Giriraj
| |
| Monday, November 06, 2006 - 6:58 am: |
| 
|
व्वा! बी अगदी छान लिहिलेस.. (पण त्यमुळे बी या नावाने एकच लिहितो की दोन तीन जणं लिहितात अशी शंका वाटायला लागलिये )
|
Shonoo
| |
| Friday, December 15, 2006 - 4:38 pm: |
| 
|
माझ्या आवडत्या वर्तमानपत्रातल्या आवडत्या भागाच्या सम्पादकाने दिलेली ही ' वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे' . यातील बरेचसे मुद्दे representative आहेत. मायबोली वर प्रसिध्द होणार्या साहित्यकृतींना आणि त्यावरच्या साद प्रतिसादांना लागू पडणारे आहेत ( असं माझं मत ) म्हणून http://www.nytimes.com/2006/12/11/business/media/11asktheeditors.html?_r=1&8dpc&oref=slogin
|
Chafa
| |
| Friday, December 15, 2006 - 7:02 pm: |
| 
|
Shonoo, thanks for the link! Particularly following lines stand out to me: "Beyond this, once a review is filed we look closely at the reviewer's argument and style of presentation - and also fact-check each piece for accuracy. In the case of nonfiction, reviewers are free to disagree with an author, and to do so emphatically, but not to misrepresent what the book says. In the case of fiction, I have a particular abhorrence of reviewers who tell readers what book the novelist or short-story writer should have written instead of the one under review. If a reviewer can't accept an author's governing premise, or donnee, in Henry James's famous term, then he or she has no business writing about the book. This is one reason that the match-up of reviewer and author is so important to what we do. Of course we err in our match-ups, and when we do we feel it very much as a defeat." अगदी शंभर टक्के पटणारं नसलं तरी मतितार्थ उत्तम आहे. आगामी संपादकांनाही नक्की उपयोगी पडण्यासारखं आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|