|
Bhagya
| |
| Tuesday, October 24, 2006 - 1:02 am: |
| 
|
सिध्या तुझा विश्वास बसणार नाही पण माझा स्वभाव पण असाच होता, मी पण अगदी लहान सहान गोष्टींवरून स्वत्:ला त्रास करुन घ्यायची आणि मनात कुढत रहायची जुन्या, ज्या गोष्टींचा आत्ताच्या आयुष्याशी काहीही संबंध नाही त्या गोष्टींच्या विचारात, ह्याने मला का असे म्हट्ले? ती का माझ्याशी अशी वागली? असे अनेक विचार करत दिवस घालवायची. पण उपयोग काय? माझे दिवस कडवट, irrlevant आठवणी जपण्यात वाया गेले. असे दिवस, जे मी खूप चांगल्या गोष्टी करायला वापरू शकली असती. त्या वाया घालवलेल्या दिवसांची मला अजुनही खंत आहे, पण ते दिवस परत येतील? नाही. म्हणून मी आता शिकले आहे, की मला आवडणार्या गोष्टी करतच दिवस घालवायचे. आणि माझा तुला सल्ला आहे, have it upfront with your parents and brother. सरळ त्यांना सांग की तुम्ही माझ्याशी, आपल्या सख्ख्या मुलिशी वागु नये असे वागलात. तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात read out a list of the things आणि तुला त्यांच्याबद्दक काय वाटते ते पण सांग. that will make you feel better, cool down your anger. and they will know what is in your mind. आणि त्यांच्याशी बोलून तुला त्रास होत असेल, तर काही दिवस त्यांच्याशी मुळिच बोलू पण नकोस, फ़ोन घेउ पण नकोस आणि करु पण नकोस. काही दिवस संबंध तोड. आणि दुसरा माझा कळकळीचा सल्ला असा आहे, की त्याचा विपरीत परिणाम आपल्या संसारावर होऊ देऊ नकोस. तुझ्या नवर्याचा यात काय दोष? पुर्वी जे घडलं ते खरच वाईट, पण तु त्यासाठी आत्ताचं आयुश्य का खराब करतेस? तू लिहिले आहेस कि मी नवर्यावर खूप राग करते; every day I shout at him , I get angry very soon even for small things n mistakes n then I shout at him , I keep on talking BAD. I know I m wrong but I m helpless; त्यात नवरोबा आति संथ हळुहळु काम करण, हळू हळु चालण, बोलण, खाण plus he has no intrest, enthu in any thing. पण तो तुझ्याबद्दल काय विचार करत असेल? तुला जसा त्याच्या काही सवयींचा त्रास होतो, तसा त्याला तुझ्या सतत च्या चिडचीडिचा होत नसेल का? प्रत्येक माणुस हळुहळु सुधरतो ग.
|
सिध्या, खर सान्गु भूतकळातल्या गोष्टी चा विचार केलास तर फार त्रास होइल तुला सतत दोखी होशील तु, तेव्हा भूतकाळात न राहता वर्तमान्काळात राहन्याचा प्रयत्न कर, बघ ह्या मुळे तुझे भविश्य उज्वल होइल. तुझ्या बरोबर जे घडल ते फारच वाइट झाल. तु खरच त्या विषयी आपल्या पालकां सोबत नीट समोरसमोर बोलुन घे, जर त्यानि तुला पाठीम्बा नाही दिला तर तु सरळ आई बाबा शी बोलनच सोडुन दे काही दिवस, आपसुकच त्याना कळेल. नवर्या शी नीट वागन्याचा प्रयत्न कर, मला माहित आहे रागाच्या भरात उचलेलि जीभ टाळ्याला लागायला वेळ लागत नाही पण ति जीभ नंतर तुलाच त्रास देइल तु ध्यान धारना करायचा प्रयत्न कर... तुला पुढे काही मदत हवी असेल तर मला कळव. मी तुला ह्या ध्यान धारणे च्या क्लास चा पत्ता देइन. माझा स्वत्: चा चान्गला अनुभव आहे ह्या ध्यान पद्धतिचा.... खूप फ़ायदा होइल... तुझ आयुष्य खरोख़रिच सुखी होइल.... बघ पटतय का ते?
|
Manuswini
| |
| Tuesday, October 24, 2006 - 6:07 am: |
| 
|
सिध्या, sorry to read your this post, but I am very surprised that why would parents behave this way in todays time also? if at all this is happening jsut because you are female child then I am surprised. or if your parents are not educated or from small village then it is understood. anyways, not expecting a answer or making you think over but it is strnage that in todays times also 'being a girl is looke down'. isnt your mom a woman? a female? anyways, I am amazed if mom herself being a woman treats other woman who is her own child. sidhyaa 'past is past', things happen in life for purpose. i am not trying to be a philosophical but you dont be a puppet on someones else reaction. it means you dont let others control you and your emotions. some or other thing happens in peopls life. but nobody stops there. you may feel that i havent realized the pain youwent, agreed but I can tell you only on thing BE HAPPY now. थोडा वेळ नक्कीच लागेल पण सगळे ठिक होईल. देवाची पूजा कर जर तुझा विश्वास असेल तर. कुठलाही मंत्र म्हण. life एवढे धकाधकीचे आहे न, कधी कधी मी सुद्धा एकटी कंटळते, for no reason अस्वस्थ, depresesd होते पण सरळ उठते नी ठरवते ह्या मी अशी रहणार नाही. गाणी एकणे, माय्बोलिवर surf करते, बाहेर फिरणे तुज्या नवर्याच्या बाबतीत काही सांगु शकत नाही. पण All the Best for married life
|
Lajo
| |
| Tuesday, October 24, 2006 - 7:38 am: |
| 
|
सिध्या, तुझे वरचे पोस्ट वाचले, त्यात तु लिहीले आहेस की तुझ्या पालकांचा फोन आला होता, अग इतक्या लांब अमेरिकेत मुलीला फोन करतात तर त्याना तुझ्याबद्दल नकीच कुठेतरी प्रेम असेल गं. पुर्वी काही कारणामुळे, परीस्थितीमुळे त्यानी तुला त्रास दिलाही असेल पण शेवटी ते तुझे जन्मदातेच आहेत ना? असा विचार कर ना की आज ते नसतेच तर तु या जगात आलीच नसतीस आणि हे सुंदर जग बघीतलसच नसतस. तुला सर्वांनीच छान दिलासा दिला आहे, सल्ले दिले आहेत. मी फक्त एकच सांगीन, मी जेव्हा कधी उदास होते, काही गोष्टींचा त्रास होतो तेव्हा नेहमीच असा विचार करते की जगात इतकी दु:ख आहेत, माझ्या पेक्षा जास्त त्रासलेली लोक आहेत, कुणी अपंग आहे, कुणी खूप आजारी आहे, कुणाचे जवळचे कुणी गेले आहे, त्यांच्या मानाने मला होणारा त्रास काहीच नाही आणि मला मझ्या त्रासवर दु:खावर मात करण्याची शक्ती देवाने दिली आहे. देवाच्या दयेने मी धडधाकट आहे, मी शिकलेली आहे, मी या दु:खावर मात करु शकते. त्रास हा सर्वांनाच होत आसतो, पण त्याचा किती बाऊ करायचा ते प्रत्येकावर अवलंबुन असते. एक पते की बात लक्षात ठेवते, WHAT IS BAD TODAY CAN BE IMPROVED TOMORROW! आम्ही सर्व इथे आहोतच पण शेवटी तुच तुझी समर्थ व्हायला हवीस. ITS ENTIRELY UPTO YOU Think positive be positive live life enjoy life
|
Supermom
| |
| Tuesday, October 24, 2006 - 12:04 pm: |
| 
|
सिध्या, तुझे वरचे पोस्ट वाचून खरेच वाईट वाटले. अग,नवर्यावर चिड चिड करणे खरेच चूक आहे.त्यातून तो इतका शांत,साधा आहे हे तूच सांगतेस. इतका चांगला नवरा असताना त्याच्याशी छान वागून आनन्दात रहायचे सोडून उगाच त्रागा करू नकोस ग. आई,बाप भावंडे हे अगदी आपल्यावर कितीही प्रेम जरी करत असले तरी आपल्या जीवन साथीचीच खरे सोबत असते आपल्याला आयुष्यभर. अगदी आपली मुले सुद्धा मोठी होऊन पंख फ़ुटले की उडूनच जाणार असतात.त्यांची क्षितिजे,त्यांचे सुख ह्याच्या शोधात जाणार असतात. पती वा पत्नी यांची सोबत मात्र आयुष्यभर असते. हे सुरुवातीचे मंतरलेले दिवस असे वाया घालवशील तर नंतर खंत करत राहशील. अन त्यालाही त्याची काही दुःखे असतील याचाही विचार कर.पुरुष बाहेरच्या जगात बर्याच ताणतणावांना तोंड देत असतो.जे घडून गेलय त्यासाठी तू इतकी कष्टी आहेस, मग कर्जाचे त्यालाही कुठेतरी टेन्शन असणारच.त्याच्याशी मोकळेपणानी बोल,समजून घे.स्त्री ची योग्य साथ जर पुरुषाला मिळाली तर तो काय नाही करू शकत? प्लीज रागावू नकोस माझ्यावर. पूर्वीच सारं झटकून टाक अन देवानं जे सुखाचं दान आता पदरात टाकलय ते भरभरून घे. माझं लग्न झालं तेव्हा माझ्या नवर्याने,जो अतिशय छान कविता करतो,मला एक कविता भेट दिली होती.त्यात स्त्रीच्या अनेक रूपांचं वर्णन होतं. पूर्ण कविता नाही देत इथे, पण दोन ओळी टाकतेय. गगनासी जिंकी,त्या गरूडाचे पंख तू, हतबल करी जर्जर वा शापणारा डंख तू. या दोन रूपांमधलं कुठलं रूप व्हायचं हे आपणच ठरवायचं असतं. हो ना?
|
Arch
| |
| Tuesday, October 24, 2006 - 3:02 pm: |
| 
|
काय चालल आहे काय? आईवडिलांनी नीट वागवल नाही म्हणून त्यांच्यावर राग. नवरा चांगला वागतो तरी त्याच्यातले दोष शोधून त्याच्यावर राग. तुझ्यात काही दोषच नाहीत का? का त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष करून तुला मात्र इतरांनी खुषीत ठेवाव पण तू मात्र मनमाने वागणार? घर प्रसन्न ठेवायचा मोठ वाटा बाईचा असतो. तू अशी वागत राहिलीस तर तुझ्या नवर्यानेही कटकट करायला सुरुवात केली तर त्या सगळ्याला तूच जबाबदार राहशील. लवकर जागी हो आणि आनंदी राहून घराला आनंदी कर.
|
ये दुख नाम की बीमारी का इलाज किसी डाक्टर के पास भी नही. इसका इलाज खुद को ढुन्डना पडता है, दुख को भुलना पडता है. - परिन्दा सिनेमा बघ जरा.
|
Sidhya
| |
| Tuesday, October 24, 2006 - 6:14 pm: |
| 
|
मला सगळ्यांच पटतय; खरतर या आधि हि मला काहि जणांनि जे हे सार जाणतात माझ्या बद्द्ल हेच सांगितल भुतकाळा बद्द्ल विचार करण सोडुन मि वर्तमानात जगायला हव पण मला जमल नाहि . इथे तुम्हि सर्वांनी जे वेग वेगळे सल्ले दिले, तुमचे अनुभव share केले ते वाचुन मला भुतकाळ विसरण्याचे मार्ग मिळालेत. मि थोड फार मेडिटेशन सुरु केलय काहि दिवसांपुर्वि पण त्या सोबतच इतर गोष्टि ज्या तुम्हि सर्वांनी सुचविल्यात त्या मी करणार आहे. पालकांना मी पत्रातुन अनेक वेळा लिहल त्यांनि माझ्या सोबत काय काय चुकिच केल, ते पण ते म्हणतात "जे झाल ते झाल ते विसरुन जा"; अस कस विसरु?? मला एकच हवय त्यांनि स्विकाराव त्यांनि जे चुक चुक केलय. फोनवर हि अनेकदा मी त्यांना हेच सांगितल "तुम्हि हे केल ते केल" मला खरच जाणुन घ्यायचय त्यांनि अस का केल???? भेदभाव मी मुलगि म्हणुन केला पण मझ्या वर विश्वास का नाहि दाखवला का नाहि?? त्यांच्या कडे उत्तर नाही. मला खुप त्रास होतो तो भयाण प्रसंग आठवुन व त्या बाबित माझ्या वर पालकांनि अविश्वास दाखविला हे आठवुन. असो. पालकांच माझ्या वर प्रेम आहे कदाचित पण ते हिशोबी आहे. फोन केला तर बिल येवु नए म्हणुन घाई घाईत बोलायच , फोन लवकर लवकर संपवायचा. तस मीच फोन करायचे बर्याचदा, मी फोन केला की बोलतात बराच वेळ. माझ्या जागि त्यांचा मुलगा असता तर दर आठ्वड्याला फोन केला असता त्याला. मुला साठि मोकळे पणाने पैसे खर्च करतात; मुलि साठि पैसाच नाहि. असो. मला खरच त्यांच्याशि संबध तोडायला हवेत भुतकाळ विसरण्यासाठि आज जरि त्यांनि मला खुप प्रेम दिल पण माझ बालपण मला मिळ्णार नाहि, its too late now.I dont want their love. Now I m not going to get my childhood, young age rights from them but I do need my present right/s from them. My father is not rich person but I need my "वारसा हक्क" in whatever he has. As girl my school education was free father paid for my Graduation n Masters but he did not pay any Donation for me like his son as I had good % . He paid too much for son's education as he was is English Medium. I got job n from age 23 I did all my expenses by my own (I was staying away from them). His Son is elder to me but at the age of 23 he was not earnign that much to pay for all his expenses so he was financially dependent on Father,now from 2-3 years he is doing exellent. Even for my marriage he has not done any big expense. so considering all these points I think I should get 80-90% share n his son should NOT get anything.(Though he was service man in very small firm n has very few things but I have right on those n I need my right ) Am I right??? Should I ask for my वारसा हक्क???
|
Sidhya
| |
| Tuesday, October 24, 2006 - 6:17 pm: |
| 
|
Arch, Supermon n All U r right though I nave less negative points as compare to my husband but I do have negative points n my husband is dealing with them ; I should remeber this alway. Thank you for showing me my mistake. Infact he is not angry like me its the biggest positive point he has. Thanks.
|
Deshi
| |
| Tuesday, October 24, 2006 - 6:42 pm: |
| 
|
By reading all your posts thus far it seems you have problems with your Brother. Thats why वारसा हक्क is playing role here. are your too much mad about money???????? Ask yourself??? Common even my perents does not call me for 10 mins. they will call me and tell me to call back. I think its fair. I think you are too much jealous of your brother thats why all this rage. and yes for your porblem of Mavshicha navara, i would say get a treatment from a pro.
|
Chum
| |
| Tuesday, October 24, 2006 - 7:21 pm: |
| 
|
Hi siddhya, If you are saying that you need to break contacts with your parents to forget your past then really do it. I had bitter experiences with my parents too ( some very intense )& now when am married those experiences have shadow over my married life & overall personal life. But I know that nothing can be done now. Keeping grudges against them is not in my nature but yes, I do try to get my peace by keeping in touch only when they expect me to. As a duty am always there for them because I have some good memories too about them as parents. Am sure you have some too. I ensure that I will always be there when they want me to but am not keeping any expectations from them. They ruined your childhood, teenage but its gone now. Dont expect anything, not even to make them accept their mistakes. Probably they never will & even if they do what are you going to achieve? As you say now your husband is also not upto your expectations in some ways. You know what, so is the case with most of the people. Having a dream-partner is very idealistic & does not always happen. Your problems with him, in whatever area (Emotional, financial, sexual) need to be resolved by talking with him. Let it take some time. He might turn out to be willing to work on them & may expect you to work out on some of your issues too. Am too young to advise you anything but please listen to rest of the people here. About "varasa hakka",I think you are being ridiculous. Please dont be mad at me but you seem to be well educated, cultured lady. Let this be the time that you make yourself proud by working on self (marriage, career, personality) & rest will realize your value & their mistakes. Stop fighting with your husband over nothing. Still if it happens & you say somethings in anger, atleast apologize later for the harsh words. Let him know why you are so disturbed emotionally,what makes you do that. talk it out. if you can not just cut off parents from your life, keep minimal touch with them. I dont know what role your brother played in it all so can not comment anything about him.About incident with your mother's relative, I guess you have already left it behind but the problem is more of your parents not believing you at that time.They are still in touch with that relative, let them be.You can not change your parents.Dont think of these minor, meaningless things. Are your parents forcing you to be in touch with those reltives? No. Dont trouble self over such things. Think about your life ahead & work on it. All the best. If my post offends you am really sorry.
|
Chyayla
| |
| Tuesday, October 24, 2006 - 10:24 pm: |
| 
|
तु तुझा वारसाचा हक्क सोडु नकोस, पण त्यापाई बदल्याच्या भावनेने पागल पण होउ नकोस असे मी सुचवेल. तु तुझी हिमत आणी परमेश्वर क्रुपा तुला कवडीमोल ८०% वारसा सम्पत्तीपेक्षा किती तरी पटीनी जास्त द्यायला बसला आहे. आणी असले धन पचतही नाही हे लक्षात ठेव... हातच सोडुन पळत्याच्या मागे धावण्यात शहाणपण नाही सिध्या.
|
वारसा हक्क => ती सम्पत्ती वडिलोपार्जित असेल तर च वारसा हक्क मागता येतो. वडिलानी कमावलेली सम्पत्ती ते म्रुत्युपत्र करुन पाहिजे त्याला (even for charity) देऊ शकतात. So you cannot be arrogant or naive and claim वारसा हक्क as a matter of right.
|
सिध्या बाई आता तर तुझी कमाल च झाली. किती जन तुला समजवन्याचा प्रयत्न करत आहेत, पण तु मात्र कहर च केलास माफ़ कर.... पण एवढा सूद्ध राग बरा नव्हे ग... माहित आहे तुला त्रास होतो आहे पण त्याचा ईफ़ेक्ट तुझ्या आताच्या जिवनात होउ न देन्याचा प्रयत्न कर ना. तु सरळ प्रोफ़ेशनल डॉक्टराना भेटुन घे...
|
Sidhya
| |
| Wednesday, October 25, 2006 - 12:07 am: |
| 
|
रुपालि n All मला कळ्ताय ग माझा काहितरि कहरच होतोय; म्हणुन तर मी तुमच्या सगळ्यांच मत विचारतेय.हे असच काहि तरि माझ्या मनात डोक्यात येत असत आणि आता मला माझ्या मनात डोक्यात काय काय येत ते बाहेर काढण्याचि खूप गरज वाटतेय म्हणुन मी सार सरळ सरळ लिहल मनातल. माझ एकणार, मला समजावणार तुमच्या सार्यांशिवाय कोणि नाहि n at this time I really need to speak out what comes in my mind. मला तुमच्या सर्वांच पट्तय म्हणुन मी सारे प्रश्न, विचार जे मनात आहेत ते तुम्हाला सांगतेय तुमच्या मतांसाठि . Due to Anger in my mind I do not understand what I m thinking is right or wrong so to avoid doing some thing wrong I need help of all you. I m very sorry if I have mentioned any thig wrong n thanks to all.
|
Sidhya
| |
| Wednesday, October 25, 2006 - 12:29 am: |
| 
|
About my brother I m not jealous about him but I don't feel he is my Brother.I think as 7 year elder brother I always wanted his support but he never gave me support. He was in oppose of my masters for his personal reason. आई जेव्हा मला शिव्या द्यायचि तेव्हा भाउ म्हणुन आईला "माझ्या बहिणिला शिव्या नको देत जाउ" अस त्याने सांगायला हव होत हे मला वाटायच.भाऊ म्हणुन त्याने मला कधिच motivate केल नाहि, उलट तो नेहमी माझा insult करायचा नातेवायकात, शेजार्यांमधे. मी आजारि असतांना भाउ म्हणुन नाहि पण as a Doctor त्याने मला पहायला यायला नको होत का? मी दुसर्या शहरात होते म्हणुन काय झाल he even did not call me. I m not jealous but I HATE from deep of heart as I think he is the reason of all my problems n he would hv made my life some what smooth as my mother always listen to him but he never did it never. Though my parents gave him every thing but I m more educated than him, in India my salary was more than that of his n all this I achive with anybodys support. I dont want MONEY but I do need my Rights
|
Bhagya
| |
| Wednesday, October 25, 2006 - 1:05 am: |
| 
|
sidhya, rights wil come later. You will get what is rightfully yours. And getting rights will have lot of legal angles, like suggested above. just ask yourself, do you need money so badly that you want it right away? And what will happen when you get the money? will you forgive your brother and parents and will all their thoughts be gone from your mind? I think right now what you need to do is shake off all thier thoughts from your mind and start doing something positively on your own. You need to keep yourself busy. If yoy say you are better educated than your brother, start using your education for making your own life better. you know that your lost childhood is not going to come back. Do you think the days which you are wasting like this will come back? And somehow, i have a feeling that this thinking of yours, this anger, hatred and pain has been going on since atleast a couple of years. I think thats what you have been doing since last 2-3 years- thinking about the pain, suffering and those thoughts are later replaced by thoughts of revenge, anger against your husband and fights with him. is that the pattern you want to continue for the rest of your life? BEWARE, SUCH PROBLEMS, IF NOT TAKEN CARE OF ON TIME FESTER FOR YEARS AND YEARS.....IT IS ONLY IN YOUR HANDS TO COME OUT OF IT. You seem like a talented girl, you write well. You must be having some good hobbies.start visiting other BBs on maayboli and start getting involved in other things, making yourself busy from the time you get up till the time you sleep is the key....
|
Mrinmayee
| |
| Wednesday, October 25, 2006 - 1:09 am: |
| 
|
सिध्या, तुझ्या सगळ्या पोस्ट्स वाचल्या. मला वाटतं हे वारसा हक्क प्रकरण देखील तुला तुझे हक्क हवेत म्हणून नव्हेत तर आई-वडलांवरच्या रागाचं आणखी एक रुप आहे. तुझे विचार.. 'जीवन संपवावसं वाटणं, त्यानंतर बदल्याची भाषा, भावावरचा उद्वेग, नवर्याचा राग आणि हे सगळं सुरु असताना इथले सल्ले पटवून काहीतरी पॉजिटिव बदल आयुष्यात घडवून आणण्याची धडपड" हे सगळे भावनिक चढ-उतार तुझ्या विचारात सुसुत्रता नाही हे दाखवतात. (तु ते कबुलही करतेस). इथे सगळे आपलेपणानी तुला सल्ले देताहेत पण आमच्या पैकी कुणीही व्यावसाइक थेरपिस्ट नाही. (तसं कुणी असल्यास सांगावं). तुझ्या पोस्ट्स वरून तुला anger management ची खूप आवश्यकता आहे हे जाणवतंय. तुझा भुतकाळ तुला विसरायला लावणारा नाही पण त्याचा तुझ्या आताच्या आयुष्यावर विपरित परिणाम होणार नाही अशी सोय करणारा कुणीतरी प्रोफेशनल तु बघायला हवास. तुझा नवरा तुझ्या सुदैवानी गरीब प्राणी आहे म्हणतेस. तुझ्या स्वभावाला वैतागुन आणखी भलता निर्णय घेण्याच्या आत त्याच्या मदतीनी तु असा काउन्सेलर शोधायला हवा. त्याच्या गरीब स्वभावामुळेही कदाचित तुला आणखी चिडचिड करायला वाव मिळत असावा. एखादे दिवशी त्याने "एव्हडा प्रॉब्लेम आहे तुला तर वाट मोकळी करून देतो संसारातुन बाहेर पडण्याची' असं म्हंटलं तर काय करशील? तेव्हा त्याच्या सहनशक्तीचा अंत पहाण्यापेक्षा खरंच प्रोफेशनलची मदत घेऊन आयुष्यात चांगला बदल घडवून आणणं हे फक्त तुझ्या हातात आहे. आमच्या शुभेच्छा!
|
Lajo
| |
| Wednesday, October 25, 2006 - 4:46 am: |
| 
|
बाई गं सिध्या, तु कहरच केलास. तुला वारसा हक्क हवा आहे. अगं तु म्हणतेस तुला तुझ्या आई-वडीलांनी खूप त्रास दिला मग तुला त्यांचा पैसा or whatever , तरी कशाला हवा? की त्याच्यासाठी तुझी भांडायची तयारी आहे... माझ्या मते सिध्या तुला दोन alternatives आहेत, १. एकतर तु तुझ्या आई वडीलांशी समजुतदार पणे वाग. त्यांनी ज्या चुका केल्या त्या तु शहाणी होऊन विसरुन जा आणि त्यांच्यावर इतके प्रेम कर की त्याना त्यांच्या केलेल्या चुकांची लाज वाटायला लागेल. तु कर्तबगार आहेस तु स्वत: कमव आणि त्याना म्हातारपणासाठी पैसे पाठव. तुला त्यानी शिकवले, तुझे लग्न लावले, तुला कशी ही का होईना लहानाचे मोठे केले, आता तुझी जबबदारी आहे त्यांची काळजी घेण्याची. किंवा २. तुला जर त्यांच्या बद्दल इतका राग असेल की तुला जगणे अशक्य झाले आहे तर तोडुन टाक संबंध. कशाला हवीत अशी नाती जी राग आणि द्वेषाने भरली आहेत. विसरुन जा की तुला भाऊ आहे. वारसा हक्कावर लाथ मार. तुला तुझा हक्क मिळेल अशी अपेक्षा तरी कशाला करतेस? अगं आयुष्य एकदाच मिळत आणि त्याचा पुरेपुर आनंद घेणे आपल्या हातात असते. तुझा नवरा ठीक आहे म्हणतेस ना मग राहा की त्याच्या बरोबर गुण्यागोविंदाने. पुढच planning करा. घरात बाळ आलं की सगळ बदलुन जाईल. तुला जे तुझ्या आई वडिलांनी दिले नाही ते सर्व तु तुझ्या बाळासाठी कर. बघ तुला किती आनंद होईल. बघ विचार करुन, पटत असेल तर लगेच अंमलबजावणी करा All the Best!
|
Manuswini
| |
| Wednesday, October 25, 2006 - 5:58 am: |
| 
|
मला मृणमयी सांगितलेले पटले आहे. सिध्या जर तुझा नवरा वैतागला आणि म्हणाला जा बाबा आपले काही जमणार नाही तर मग काय करशील? sorry to be so blunt पण हद्द असते एखाद्या गोष्टीची. तु परत आई वडीलांकडे जावु शकत नाहीस ना मग तुझे हक्काचे घर आहे, हक्काचा माणुस आहे तर प्रयत्न कर. आज काल शांत माणसे मिळणे कठिण आहे बाई. जो ज्यास्त Demanding पण नाही म्हणतेस ना तु तुझ नवरा मग बरे आहे ना शांत राहून स्वःतात आधी बदल घडव. तु देवाला मानते का? पुजा वगैरे कर त्यात ही मनशांती मिळेल. gym ला जा. मनातील clutter नाहीसे होते. एकदा का treadmill पळायला सुरुवात केली की सगळा राग का जोश पळन्यात घालव. मग छान fresh होवून संध्याकाळी तयार होवून नवर्याची वाट बघ. आता ह्याह्cयापेक्षा ज्यास्त लिहिणे म्हणजे मुर्खपणा ठरेल आमचा. रागवु नकोस, पन खुप जवळकीने लिहिलेय.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|