Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 23, 2006

Hitguj » Views and Comments » Closed BBs » I want to Die » Archive through October 23, 2006 « Previous Next »

Bee
Thursday, October 19, 2006 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घनतमी शुक्र बघ राज करी,
रे खिन्न मना बघ जरा तरी.

supermom एकदम प्रसंगानुरुप ओळ आठवली तुला..

Bhagya
Thursday, October 19, 2006 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या....... फ़ोनवर बोललो नाही तरी चालेल. तू परत इथे आमच्याशी बोलायला आलीस यातच बरं वाटल.
आणि आपलं मन मित्रमैत्रिणीं जवळ मोकळं करणार नाही तर कोणाजवळ?
तू लिहिलं आहेस की तुझा नवरा चांगला आहे. अगं हीच मोठी गोष्ट आहे ना? आणि तू त्याच्यावर चिडचिड न करता, न रागावता हळू हळू त्याला सगळं सांग. तुझे काही भविष्याचे plans असतील तर ते पण सांग. पण हे सगळं प्रेमाने, धीराने कर.
आणि अमेरीकेत घर, गाडी या सगळ्या गोष्टी कर्जानेच घेतात. शिवाय bench वर बरेच लोक असतात आणि या सुरुवातीच्या काळाला struggling period हेच नाव आहे. एकदा हा काळ संपला ना, की मग बर्‍याच गोष्टी करु शकशील.

अगं, अमेरीका पुष्कळ बरी. इथे ऑस्ट्रेलियात तर struggling period इतका वाईट असतो, की मी काही लोकांना घरी toilet paper चा रोल फ़क्त घरी कोणी येणार असेल तरच विकत घेताना पाहिलय. लोक orange picking ला पण जातात. तीन वर्षे पेटित कपडे ठेवून माझी एक मैत्रीण राहिलि होती.

आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करून वर्तमान आणि भविष्य का खराब करायचं? सकाळि उठल्याबरोबर आइ बाबांचा विचार करून एक पूर्ण दिवस, आणि तो पण तुझ्या आयुष्याचा वाया घालवायचा का? त्यापेक्षा सकाळी उठल्यावर एक लिस्ट करायची, कुठल्या छान गोष्टी तुला आवडतात त्यांची आणि त्या करायच्या. सध्या तुला सतत मूव्हिन्ग मुळे थोडी का होईना अमेरिका पण बघायला मिळते आहे ना? एक वही घे आणी काय काय बघितल ते लिहून काढ.
सन्ध्याकाळी नवरा यायच्या वेळेला छान तयार हो, त्याच्या आवडीचे पदार्थ कर आणि त्याला तू दिवसा काय चांगल्या गोष्टी बघितल्या ते सांग.
दिवस छान गेला की रात्र पण छान जाते.
आणि अजून लिहि बघु, तुझ्या हॉबीज काय आहेत? तुला स्वत्:ला काय आवडतं?

And yes, haapy diwali. Is this your first diwali after marriage?




Maudee
Thursday, October 19, 2006 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या, झक्कीनी सांगितलेला उपाय चांगलाच आहे.

पण सकाळी सकाळि ज्या वाईत गोष्टी आठवतात न त्याबद्दल, रात्री झोपताना वाईट विचार मनात आणूच नकोस. जमल तर नामस्मरण कर....देवावर विश्वास नसेल तर नवर्‍याशी मस्त गप्पा मार... चांगल्या मूड मधली गाणी ऐक... दुःख़ी गाणी ऐकू नकोस, त्याने जास्त त्रास होतो....
रात्री झोपताना जो विचार मनात असतो तोच रात्रभर आपल्या सुप्त मनात घर करून असतो आणि सकाळी उठल्यावर डोक वर काढतो.

secondly नवर्‍यावर विनाकारण चिडचिड करू नकोस... म्हणजे मला असं म्हणायचय की त्याच्या ज्या चुका नाहीत त्यासाठी त्याच्यावर चिडू नकोस. तुमच्या relation वर परिणाम होतील

मागच्या गोष्टी आठवून कधी कधी मन विनाकारण अस्वस्थ होतं आणि त्याचा परिणाम म्हणाजे राग.. अशा वेळी माणूस नीट विचार करू शकत नाही आणि आताचे हातात असलेले क्षण घालवून बसतो.. तस होऊ देऊ नकोस... राग आला की पहिला प्रश्न विचार मी का चिडते आहे... मी आता ह्या गोष्टि बदलू शकते का आता...मग मी का चिडते आहे.... ख़ूप अवघड आहे हे पण भविष्यकाळ सुंदर हवा असेल तर राग घालवावाच लागेल... याच रागामुळे तू उद्या तुझ्या मुलानापण पुर्ण प्रेम नाही देऊ शकणार...
स्वतःच्या दुःख़ातून बाहेर ये... तुझे आई-वडिल तुझ्याशी वाईट वागले त्यात तुझ्या नवर्‍याचा काय दोष आहे?

आनि नवरा हौशी नाही त हा त्याचा स्वभाव आहे तू नाही बदलू शकत... स्वीकार कर या गोष्टीचा... कुठली गोष्ट करायची असेल तर तू त्याची वाट बघूच नकोस तुच सगळ planning कर.. तुझ्या budget मध्ये बसणारं... आणि त्यालाही बोलता बोलता तुझ्या कल्पनेत सहभागी करुन घे... काही काळाने का होईना त्याला कळेल की exactly कय आवडत... तो ही तुला ख़ूश ठेवायला प्रयत्न करेल...

बघ पटतय का माझ?


Saco
Thursday, October 19, 2006 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tuesdays with Morrie
हे पुस्तक वाच. राग, द्वेश कमी करन्यात नक्कि मदत होइल.
http://esnips.com/_t_/tuesdays%20with%20morrie येथे free available आहे.

Pillu
Thursday, October 19, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय सिध्द्या
सगळ्यांनी छानच सल्ले दिले आहेत.मी फ्क्त असे सांगेन की घाई करु नकोस अग तु तर स्त्रि आहेस पण मी पुरुष असून मला आई वडीलांकडुन त्रास सहन केलाय बायका मुलांना रेल्वेच्या रुळावर स्वता:सहित झोपलेला मी एका अद्भुत शक्तीकडुन चेतना मीळाली अन आज खुप समाधानाने जगतोय. त्या मानाने तु काहिच सहन करत नाहिस तुलाहि यातुन नक्की मार्ग निघेल.


Sidhya
Thursday, October 19, 2006 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला खरच खुप बर वाटतय आज कारण
ईतक्या सगळ्यांनी माझ्या साठि वेळ दिला, मला समजल व समजावल.
खरच मी , "आज मला चांगल काय करता येईल" ह्याचा विचार व यादि करायला हवि आणि स्व:ताच Plan करायला हवेत . माझा नवरा नाहि नाहि म्हणत कशाला पण काहि वेळा जरा push up कराव लागत. नवर्‍याने काहि तरि plan कराव हे मला विसरल्च पाहिजे व स्व:ताच plan कराय्ला पाहिजे नेहमि.I understand by repeating past n by worring abt future I m in trouble in present; sure I m going to follow all these suggestions. Thanks to all very much

Sidhya
Friday, October 20, 2006 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bhagya

This is my 2nd Diwali aft marriage but
last whole year was of trouble so we did not enjoy any festive.

In fact none diwali was happy for me before marriage too but now this Diwali I m going to enjoy to mk it FIRST Happy Diwali of my life.


Sidhya
Friday, October 20, 2006 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HAPPY DIWALI to ALL

Mrinmayee
Friday, October 20, 2006 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या, तुला देखील दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!! खूप एन्जॉय कर ही दिवाळी! (आणि यापुढल्या सगळ्या !!) यावेळी दिवाळीची काय भेटवस्तु घेणार तुम्हा दोघांसाठी? काय करणार आहेस दिवाळी स्पेशल? (उगाच भोचकपणा बघ माझा :-) )
एक सुचवायचं होतं. नवरा खर्चिक आहे म्हणतेस. आमच्याकडे आम्ही दोघंही तसे आहोत. ही बाब फारशी अभिमानानी सांगण्यासारखी नाही. पण यावर उपाय म्हणजे अमेरिकन एक्स्प्रेसच्या 'अमेरिप्राईस' सारख्या कंपन्यांच्या फायनॅन्शिअल ऍडवायजरची मदत घेता येईल. तुमच्या उत्पन्नात तुमचा वायफळ खर्च किती हे दाखवण्यापासून रॉथ IRA आणि इतर ठिकाणी पैश्याची गुंतवणुक कशी करावी हे व्यवस्थीत समजतं. अकाउंटमधून पैसा डायरेक्टली काढल्या गेला की पर्यायानी आपल्याला उधळायला पैसा कमी उरतो :-)
इथे आम्हा सगळ्यांनाच तुझ्या पहिल्या पोस्टिंगचा सुर बघून कससं झालं. पण तुझं वरचं पोस्टिंग बघून खूप खूप बरं वाटलं! तर पुन्हा एकदा, ही दिवाळी खूप आनंदाची आणि भरभराटीची जावो!!!
shubha deepaavalii

Rupali_county
Friday, October 20, 2006 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या खरच चान्गला निर्णय घेतलास हो, माझ्या कडे पहा, गेले ६ वर्ष दिवाली चूकली माझी आणि नेमका दिवालि चा चान्स असताना यावर्षी मी उशिरा चाललेय, इतक वाइट वाटत ना, पण घरिच मी लक्ष्मी पूजा करनार आहे शनिवारी (नवरोबा चालेत बाहेर), गोड प्रसाद बनवून. लाडू सूध्दा बनवायचेत बघ.

एकदम मजेत घालव दिवाळी.... अनेक शूभेच्छा दिवाळी च्या तुला!

रूपाली



Manishalimaye
Friday, October 20, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझी दिवाळी छान जावो ही सदिच्छा! सिध्धा,
मी फक्त मला असलेली माहीती देत्ये इथे.[तीही पेपरमधे वाचुन] कधी एकटेपणा वाटला तर महाराष्ट्र फौंडेशनच्या हॉटलाईनचा वापर कर.
"1-877Maytrin"
मी काही सल्ला देण्यासाठी अधिकारी नाही पण " मरणाने कुठलेही प्रश्न सुटत नसतात तर जगुनच ते सोडवायचे प्रयत्न करावे लागतात. अस मला वाटत."
अगदी योग्य निर्णय घेतलास आता ठरवल्याप्रमाणे ही दिवाळी आणि पुढिल आयुष्य मजेत जगा, दु:ख येतातच त्यातुन आपणच ठरवुन बाहेर पडायच.आणि नेहमी मायबोलीवर यायच.
तुझी ही दिवाळी तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येणारी ठरो हीच माझ्याकडुन मनापासुन शुभेच्छा!

मनिषा



Meggi
Friday, October 20, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या, खुप छान निर्णय घेतलायस. सगळ्यांनी चांगले सल्ले दिलेच आहेत. नेहमी आनंदात रहा. तू आणि तुझा नवरा मिळुन दिवाळी आनंदात साजरी करा :-)
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!


Lopamudraa
Friday, October 20, 2006 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्ध्या छान निर्णय घेतलास...!!!
मुख्य म्हणजे तु सगळ्यांच ऐकलस.. तेही फ़ार चटकन यावरुन तु लवकर.. यातुन बाहेर पडशील..,
बर्‍याचदा सगळे समजाउन थकतात पण समोरच्याचे एकच पालुपद सुरु राहते..!!!
wish you very happy diwali ...!!!


Nalini
Friday, October 20, 2006 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या, तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
एक सांगु नवर्‍याच्या हृदयाचा रस्ता हा त्याच्या पोटातुन जात असतो. म्हणून ह्या दिवाळीला छान छान फराळ बनव आणि दोघे मिळुन खा.( आम्हाला पण दे बरं का). बघ कसा खुष होतो तो.
भुतकाळ एवढा सहजासहजी विसरणे शक्य नसतेच पण तो विसरायचाच म्हटल्यावर विसरणे हि अशक्य नसते. ह्यासाठि एक उपाय, तु जेव्हा जेवण बनवतेस ना तेव्हा भुतकाळाचा, भविष्याचा कुठलाच विचार न करता गायत्री मंत्र म्हणत जा किंवा ईतर कुठलाही नामजप करत जा. ह्याने काय होते माहितीये? ह्या मंत्रांचा गुणधर्म आपल्या अन्नात उतरतो आणि तोच आपल्या स्वभावात आणि आचरणात.
जरी तुला कोणी सुख देऊ शकले नसेल तरीही तु हा विचार कर की तुझ्या सानिध्यात येणार्‍या प्रत्येकाला तु कश्या प्रकारे सुख देऊ शकतेस. माहेरच्या माणसांनी तुला चांगली वागणूक दिली नाही म्हणून त्यांच्यावर सूड उगवणे, त्यांना घालून पाडुन बोलणे, सारख्या चुका दाखवणे ह्यापेक्षा त्यांना तुझ्या प्रेमातुन हे दाखवुन दे की आपल्या माणसांवर प्रेम कसे करायचे असते.
सर्वात महत्वाचे म्हणजे उगवता सुर्य होऊन जगायला शिक कारण उगवत्या सुर्याला सगळेच नमस्कार करतात. उगवता सुर्य होण्यासाठी तुझ्याकडे वैभव तर हवेच पण प्रेमाचे भांडार पण हवेय.
तसेच मायबोलीवर दर महिन्यात दर्जेदार साहित्य प्रसिद्ध होत असते ते वाचण्यात मन रमवत जा. ईथे खुप सगळ्या पाककृती आहेत त्याही आजमावुन पहा. म्हणजे वेळ कसा आणि कुठे घालवु हा प्रश्न तुला पडणार नाही.
पुन्हा एकदा तुम्हा दोघांना शुभ दिपावली.


Vin
Friday, October 20, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या,

दिपक चोप्रा च
power, freedom and grace नावचं पुस्तक मिळाल्यास जरुर वाच! to quote from the book: if you have lost touch with your internal source of joy, if the happiness you experience always originates in circumstances outside yoursef, then you are at the mercy of every situation and every stranger you meet. This kind of happiness is always elusive.
Good Luck and be happy!

Dineshvs
Saturday, October 21, 2006 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिद्ध्या, ईथे तुला सगळ्यानी किती प्रेमाने सांगितले आहे.
आईबाबांच्या प्रेमाची उणीव भरुन निघाली कि.
एक दरवाजा बंद असला ना कि लाखो उघडतात. फक्त ते शोधायचे असतात आणि उघडत नसले तर लाथा मारुन उघडायचे असतात.
ईथे सगळ्यानी तुला दरवाजे शोधुन दिलेत. तुला हात पण दिले आहेत. आता फक्त एकच पाऊल तुला टाकायचे आहे.


Rupali_county
Monday, October 23, 2006 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदि बरोबर दिनेश दा

Bhagya
Monday, October 23, 2006 - 11:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या, इथे नेहमी येत जा. कारण जितके मित्रमैत्रिणींशी बोलशील तितके अजूनच छान वाटेल, नवीन नवीन विचार आणि नवीन गोष्टी कळतील.

Sidhya
Monday, October 23, 2006 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear Friends
तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छां मुळे दिवाळिचा शनिवार चांगला गेला.

Friday early morning पालकांचा फोन आलेला ज्याने माझा थोडा डिस मुड झाला पण as usual फोन मुळे भुतकाळ,राग जागे झाले होते तरि थोडक्यात बोलुन फोन ठेवला व " आज आपण काय चांगल करु शकतो" ह्याचा विचार करुन कामाला लागले.

What Nalini n all r saying is right but I really can't forgive my parents n brother n I can't behave kindly with them.

मुल कसहि असल तरि निदान काहि बाबित पालकांनि त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. एक स्त्री, मुलगी सारे गुन्हे माफ करु शकते पण तिच्या सोबत जर काहि विपरित घडल तर ते कधीच विसरु वा माफ करु शकत नाही.

When I was just 1४-१५ माझ्या आईच्या नातलगाने माझ्या शी खुप निच क्रुत्य केल.ज़ेव्हा हि गोष्ट मी माझ्या पालकांना सांगितलि त्यांनी माझ्या वर विशास ठेवायला नको होता का?? "तो माणुस अस करणार नाहि" अस बाबा म्हणाले व "माझ्या बहिणिचा नवरा अस करण शक्यच नाहि" आई.
ईतर बहिणिंन कडुन जेव्हा आईने त्या माण्साचे असले प्रकार एकले तेव्हा तिला पटल तो निच आहे.

"रस्तावर एक माणुस छेड काढतो" अस आईला सांगितल तर तिचा विश्वास नाही; बाजुच्या एका काकुंनि "मी तर समता सोबत जाते तो रस्ता चंगला नाहि, एक माणुस तिथे..." अस सांगितल्यावर तिला माझ म्हणन खर वाटल.

Please tell me how to forget n forgive this ?? My parents has still maitained relationship with that charachterless person n family is it right??

माझा मुलगा, त्याच्या लग्नात हे करेन ,ते करेन ,माझ्या सुनेला हे देईन ते देईन सांगणारि आई, मी हसुन मजेत विचारायचे "आई माझ्या लग्नात कोणता Dance करशिल" तेव्हा म्हणायचि "तुझ्या लग्नात तर मी येणार हि नाहि तुझ तुच बघ "

स्व:ताच्या आईने आपला द्वेष करण याहुन मोथ द:ख कोणत असाव??

मी सार माफ केल असत जर निदान माझ्या चरित्र्या बाबतीत त्यांनि माझ्यावर विश्वास ठेवला असता जो त्यांनि ठेवायलाच हवा होता.

रागात आई नेहमि म्हणायची "तु कधिच सुखि नाहि रहणार" जे खर ठरल व ठरतय.पालकांच्या तुसड्या वागणुकिने मी तापट, रागिट झालेय त्याचा विपरित परिणाम माझ्या संसारावर होतोय. मी नवर्‍यावर खूप राग करते; every day I shout at him , I get angry very soon even for small things n mistakes n then I shout at him , I keep on talking BAD. I know I m wrong but I m helpless; त्यात नवरोबा आति संथ हळुहळु काम करण, हळू हळु चालण, बोलण, खाण plus he has no intrest, enthu in any thing.

After marriage I tried to improve him in all aspects but even after 2 years I hv not achived even 30% Success.

He is Sharp,Cool,Nice but he has many other problems, how should I deal with him????

I m sorry for long post but I have too much in my mind.

Chyayla
Tuesday, October 24, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या, तुझी BB वाचली तेन्व्हा मला अरुण दातेन्च "या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे" ह्या ओळी आठवल्या... खरच ईतक सुन्दर जीवन परमेश्वराने दीले मग आपण का त्याला उणी दुणी, राग द्वेष करण्यात घालवावे.

तुझ्या पहिल्या समस्येबद्दल की नवर्याने आधीच बरेच कर्ज घेतले आहे आणी घरात काही सुख सोयी नाहीत. एकदम कबुल व्यवस्थित प्लानिन्ग च्या अभावी किन्वा ईतर कारणामुळे ह्या सन्घर्षाच्या काळात असे होउ शकत.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुच सगळ्यात योग्य व्यक्ती आहेस, तुम्ही दोघे मिळुन सगळ्या कर्जाचे व आवश्यक वस्तु घेण्याचे प्लानिन्ग करु शकता, कर्ज काही दिवसात यु फ़िटुन जाईल, तु घरातली लक्ष्मी आहेस नवर्याला विश्वासात घेउन त्याच्या समस्या सम्जाउन घेउन त्याच्या खान्द्याला खान्दा लाउन कर्जाचे ओझे उतरवु शकतेस, त्यासाठी तुला नौकरीच करणे आवश्यक नाही ते सध्या H4 वर शक्य पण नाही. हा चमत्कार माझ्या बहिणीच्या बाबतीत प्रत्यक्ष पाहिला आहे, अगदी तुझ्यासारखीच स्थिती होती तीची. तु त्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कर तुझ्या सुधा समस्या आपोआप सुटतील. त्याला तुच साथ नाही देणार तर कोण देणार?.

आई वडिलान्च म्हणशील तर ते खरच दुर्दैव आहे भोग आहेत जीवनाचे गीतेतला कर्मयोग ह्या मागची कारण मिमान्सा सान्गतो, पण तुला एक सान्गु मानवामधे एवढे सामर्थ्य आहे की तो हे सगळे बदलवु शकतो, ही शक्ती केवळ मानवातच आहे फ़क्त ओळखण्याची गरज आहे. तुझ्या आई वडिलान्नी तुझ्या सोबत अन्याय केला असेल तर ते पण भोगतीलच पण तु त्यान्चा राग करुन तुच स्वता: दुखी होत आहेस, त्यान्च्यापायी तु का दुखी व्हावे. तु स्वता:ला सुखी व आनन्दी ठेव हा सगळ्यात मोठा सुड राहील. तसा मी या बाबतीत हमखास उपाय सान्गु शकतो तो म्हणजे "ध्यान" ( Meditation ) पण ते पण योग्य व्यक्तीकडुन मिळायला हवे, तुला हवी असल्यास अधिक माहिती देउ शकेल.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators