Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 18, 2006

Hitguj » Views and Comments » Closed BBs » I want to Die » Archive through October 18, 2006 « Previous Next »

Sidhya
Wednesday, October 18, 2006 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनात खुप काहि आहे कुठुन नि कस सुरु करु सुचत नहि.
I m very very SAD UNHAPPY UPSET काय कराव कळत नाहि.मनात खुप प्रश्न ,राग, द्वेष, सुडाचि भावना आहे.लग्ना पुर्विच जिवन नि लग्ना नंतरचहि यातना, तणाव, अशांति यांनिच भरभरलेल.
आई असुन सुध्धा तिने कधिच प्रेमाने जवळ घेतल नाहि, नेहमिच दुर लोटल. बाबा जवळचे वाटायचे पण त्यांनी हि मुलगा-मुलगी फरक प्रत्येक बाबतित केला.मोठ्या भावाला तो मुलगा म्हणुन इंग्रजी शाळा, मला मराठि असे अगणित भेद भाव लहानपणा पासुन आजहि. रोज रात्रि झोपेतुन उठुन मुलाच पांघरुण निट आहेना बघणारि त्याला प्रेमाने कुरवाळ्णारि आई बाजुलाच झोपलेल्या माझ्याकडे बघायचिहि नाहि.
शिव्या, मार, कडक शिस्त, घर काम, द्वेष, राग, तुच्छता या शिवाय मला तिने काहिच दिल नाहि. मुलावर नेहमि खुश असणारि आई नेहमि माझ्या कडे पाठ फिरवुन असायचि. माझ्या पालकांनि मला अस का वागवल का??? आपल्या एकाच मुलिला अस का वागवल??? घरात उग्र रागिट आई नि शाळेत बाई शिकवाय्च्या अन्याय सहन करायचा नाहि. आई बाप भाउ यांच्या कडुन मिळालेल्या खुप खुप वाईट वागणुकिने मनात खुप राग व त्यांच्या बद्ल्याचि भावना आहे.

लग्ना नंतर शांत जीवन मिळेल वाट्लेल पण नाहि.अमेरिकेत असुनहि मि दु:खिच आहे. नवर्‍याच Frequently Project जाण, एका State मधुन दुसर्‍या State मधे जाण, घरात झोपायला गादि नाहि कुणाचि तरि (लहान मुलिने शु केल्याने) खराब झालेलि गादि आणलि काहि महिन्यांन पुर्वि
त्या आधि सतरंजिवर झोपायचो.नवरा is ok but अजिबात जोलि नाहि, त्याला कसलिच हौस नाहि.मी खूप कंटाळलेय आता.I want to die I want to die; but before that I want to punish all specially my Parents n Brother for all wrong they have done to me Unnecessarily n without my fault.

Is it fault to born as a Girl-Female???

Bhagya
Wednesday, October 18, 2006 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीध्या, काय सुरु आहे? तुला मरून काय मिळणार?
जर तुझ्या आईवडिलांनी तुला वाईट वागवलं असेल, तर त्यांना काय फ़रक पडणार?
तू मुलगी आहेस म्हणुन तुला वाईट वागवणारे महामुर्ख आहेत. मुलीत काय शक्ती असते ते त्यांना माहित नाही. आयुश्य हे एकदाच मिळतं बरं!
आयुष्य हे तुझे एकटीचे आहे, त्यावर फ़क्त तुझा एकटीचा हक्क आहे, आणि या लोकांचा विचार करून तू ते फ़क्त वाया घालवशील. तुला आवडणार्‍या काहीच गोष्टी नाहीत का? त्या गोष्टी कर ना. तुझं आयुष्य सुंदर, अर्थपूर्ण बनवणं हे तुझ्याच हातात आहे ग! आणि तुझं आयुश्य छान होणं, हाच त्या सगळ्या लोकांवर सूड राहील.
आणि तुझा नवरा खुप कंजुष दिसतोय, मी अमेरिकेत असताना काही अशा गोश्टी ऐकल्या होत्या. पण तो तुझ्याशी वाईट वागतोय का? तू प्रेमाने समजवलस तर ऐकेल का? काही लोकं नक्कीच बदलतात.
तू काय शिकलेली आहेस? ईथे मायबोलिवर तुला खूप छान मित्रमैत्रिणि मिळतील, कधीही त्यांच्याशी बोल, तुला खूप धीर येइल. विश्वास ठेव, आयुष्य जगण्यासाठी आहे, लोकांचा विचार करुन वाया घालवण्यासाठी नाही.

अरे मित्रमैत्रिणिंनो, इकडे या आणी हिला समजवा रे!
सिध्या तूझा फ़ोन न. दे बरं, तूझ्याशी बोलते.


Rupali_county
Wednesday, October 18, 2006 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाइ सिध्या, काय झाल काय? अग असा विचार करून चालेल का? एवढ सुन्दर आयुश्य आहे हे, सारखा सारखा जन्म नाही येत हा...

मला सुध्दा तुझ्या सारखा च अनुभव आला आहे माझ्या आइ वडिला कडुन, पण आता इथे आल्या पासून त्याना माझी नेहमी आठवन येत असते. आता डोळे उघडलेत त्यान्चे....

नवर्‍या बद्दल... त्यान्च्याशी नीट एकदा बोलुन पहा, तुझ्या भावना त्याना समजवुन सान्ग. तुझे हे सर्व विचार त्याना सान्ग.

बाकी भाग्या म्हनते ते एकदम खर आहे.

असा चूकिचा निर्णय घेउन हे सुन्दर आयुश्य सम्पवू नकोस.


Bee
Wednesday, October 18, 2006 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मरणे हा काही जगण्यावरचा उपाय नाही त्यावर जगवून दाखवणे हाच एक उपाय आहे.

भुतकाळात जे काही घडले त्याचा आता विचार करु नकोस कारण त्यावेळी तु असमर्थ होतीस, लहान होतीस. आता मात्र चित्र पालटले आहे. तू मोठी झाली आहेस, तुला हक्काचा आधार मिळाला आहे, तुझा संसार काही वर्षात फ़ुलेल, तुला मुलबाळं होतील, तू अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहते आहेस. सर्व संधी तुझ्या आजूबाजूला आहे. तुझा नवरा OK आहे. असा OK नवरा असणार्‍या अगणिक बायका असतात आणि OK बायका असणारे नवरेही कैक मिळतील. संसारात रममान हो.. आपल्या पुर्वजांनी आखून दिलेला हा धोपटमार्ग चाकोरीबाहेर पडलेल्यांनाही स्विकाराच लागतो. बदला सुडाची भावना राग ह्या गोष्टींना जर तू कवटाळून बसलीस तर दिवसेंदिवस तुझ आयुष्य ते व्यापून नरक बनवून टाकतील. तेंव्हा शांत हो आणि आयुष्याला कलाटनी देण्याचा प्रयास कर. भंगलेला भुतकाळ मागे पडला.. भविष्याकाळ फ़क्त तुझ्या हातात आहे. तो मरुन घडणार नाही.. एकदा मनाला शांत करणे वश झाले की बर्‍याच कटकटीतून आपली मुक्तता होते. तेंव्हा मनःशांतीचा विचार कर.


Shyamli
Wednesday, October 18, 2006 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए मुली अग असं काय????

मरण काही सोल्युशन नसत ग अश्या गोष्टिवर
काही वेळा वैतागतो जीव

त्यातुन बाहेर काढायच असतं स्वत:ला
आई वडील तुला जन्म देण्यापुरते होते तेवढेच तुझ्यावर उपकार आहेत हे तरी ध्यानी ठेव, आणि आता तुझं लाईफ तुला लीड करायचं आहे

तुझ्या आवडी नीवडी जोपास,नवरा जॉली नाही तर काय झालं
असलाच पाहीजे असा काही कायदा नाहीये

तुझ्या प्रेमळ स्वभावानी जिंकुन घे ना त्याला
तो ही तुझ्यासारखाच एखाद्या गोष्टीला वैतागला असेल कदाचीत बघ बोलुन त्याच्याशी जरा....

तुला प्रेम नाही मिळालं ठिक आहे पण तु देऊन बघ ना तुझ्याकडे असलेल प्रेम...............
आणि बघ काय होतय ते?
नक्किच मजा आहे ग प्रेम देण्यात सुधा हे कळेल तुला.......

तुला नाहि आधार दीला कुणि
तु होउन बघ ना कुणचा तरी आधार
मग बघ आयुश्य कस छान वाटायला लगेल


सो मरणा बीरणाचा नाद सोड...
ईथे येतीच आहेस तशि रोज ये आणि गप्पा मार
आणि छान सुखि आयुश्य जग





Prajaktad
Wednesday, October 18, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या! भाग्या,बी,रुपाली ने दिलेला सल्ला एक.. दिवाळिच्या पुर्वसंध्येवर हे काय मनात घेवुन बसलिय?कबुल आहे भुतकाळ वाईट होता, नकोसा होता पण,भविश्य तुझ्याच हातात आहे.
तु लिहल आहे कि तुझा नवरा हौशी नाही.तो नुकताच usa मधे आलाय का?मग $to rs conversion मधे बरेच जण अस वागतात.त्याच family background कस आहे यावरहि त्याचा स्वभाव तसा असेल.
आवड असेल तर आणि मिळत असेल तर कुठे job वैगेरे कर..


Mrinmayee
Wednesday, October 18, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या, ज्यांनी प्रेमानी जवळ घ्यायचं, धीर द्यायचा, पाठीशी उभं रहायचं त्याच आई-वडीलांनी दुर्दैवानी तुला अशी वागणुक दिली. जे भुतकाळात घडून गेलं तो काळ तर तुला परत मिळणार नाही. संताप, उद्वेग होणं हा तर मनुष्यस्वभाव आहे. पण त्यामुळे सगळ्यात जास्त कोण भोगतय? तुच स्वत: !!
दुसर्‍याचं दु:ख बघून स्वता:च्या परिस्थितीत सुख मानावं असं म्हणून नाही, पण तुझ्या आजुबाजुला बघ. इथे मायबोलिवर पण बघ. खूप जीव दु:खी आहेत काही ना काही कारणांनी. कोवळ्या वयात कुणाच्या वासनेला बळी पडणारी, आईबापानी टाकून दिलेली मुलं, बाळं गमावलेली आई, संसारात सुख नसलेली माणसं, आपलं प्रेमाचं माणुस गमावलेले लोक कितीतरी भयंकर. पण ही सगळी माणसं उभी आहेत. खंबीरपणे!!! आयुष्याकडे पाठ फिरवून नाहीत तर येणार्‍या दिवसाला तोंड द्यायला तयार!!
कबूल, शब्दांचे बुडबुडे उडवणं सोपं असतं! पण कळकळीचं सांगणं.. आपलं आयुष्य आपल्या हातानी संपवायचा हा विचार काढून टाक डोक्यातून. घराबाहेर पड. तुझ्या विसा मुळे तुला काम करता येत नसेल तर लायब्ररीत जात जा. मैत्रीणी जमव. इथे मायबोलिवर येत जा.
खरंच इथे सांगीतलंय रुपालीनी तसं एकदा नवर्‍याशी बोलून बघ.
जगात अपार दु:ख आहे, पण त्यावर आत्महत्या हा मार्ग नाही.


Zakki
Wednesday, October 18, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला १५ वर्षापूर्वी चक्क clinical depression मुळे आत्महत्या करायची सुरसुरी आली होती. त्यावर मी काही गोळ्या घेतल्या, नोकरीतले काम बदलले, गीता वाचली, बराच विचार केला, जीवनाविषयीच्या अपेक्षा नीट तपासून बघितल्या, नि मुख्य म्हणजे माझ्या नशिबाने, कंपनीतून Stress relief साठी जो कोर्स होता त्याला गेलो. त्या शिक्षकाने अत्यंत परिणामकारक रीतीने माझ्या मनावर बिंबवले की आपण आपल्या भावना इतरांच्या वागण्यावर अवलंबून ठेवू नयेत. त्याची काही उत्तम उदाहरणेहि त्याने दिली.
तेंव्हा मी बराच सावरलो.

पण नंतर पुन:, मुले मोठी झाली, स्वतंत्र झाली, माझ्या मते घरातल्या कुणाचेहि माझ्यावर प्रेम नाही, नोकरी संपली, अश्या अवस्थेत पुन: मला आत्महत्येबद्दल ओढा वाटू लागला.

मग मी पुन: गीता वाचली, इतर धार्मिक पुस्तके वाचली, नि मला कळले की अनेक धर्मात आत्महत्या निषिद्ध समजली जाते. आपण आपल्या धर्मावर विश्वास ठेवावा की आयुष्याचे कारण कर्मफळे भोगणे, सत्कृत्ये करून पुण्यसंचय करणे हा आहे.

मरण्याने काही प्रश्न सुटत नाहीत, पुनर्जन्म होतो, नि पुन: कर्मफळे भोगावी लागतात. या जन्मी निदान मनुष्यजन्म असल्याने विचार, शिक्षण यांचा उपयोग करून कर्मफळ भोगणे कमी कष्टाचे होऊ शकते, किंवा आपणच ते करू शकतो.

तेंव्हा, लक्षात ठेवा, तुमचा आनंद तुमच्याच हृदयात आहे, नामस्मरण, गीता वाचन, इतरांच्यात फक्त चांगलेच काय ते पहाणे, या मार्गाने पुन: मरणाचे विचार नाहीसे होतील, नि मी ज्याप्रमाणे अत्यंत उत्साहाने मायबोलीवर येऊन धमाल गंमत अनुभवतो, तसे तुम्हालाहि करता येईल, फक्त प्रयत्न करा.



Adtvtk
Wednesday, October 18, 2006 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

empty mind is devil's workshop आपले मन कशामध्ये तरी गुंतव कदाचित H4 वर असशिल job मिळनार नाही पण volunteer work करु शकशिल.माझी एक मैत्रीण बरेच असे काम करायची. library म्ध्ये ह्या विषयी चौकशी कर.
काही जणांना घरच्या परिस्थीतीमुळे हौस मौज करता येत नाही व नंतर चांगली परिस्थीती असली तरी हौस मौज करावी ह्याची जाणीवच होत नाही. तु पुढाकार घे.
खुप states फ़िरत आहात तर कंटाळा करु नको तिच संधी मानुन सर्व निसर्गसौंदर्य वैविध्य बघुन घे. नंतर संसाराच्या जबाबदार्‍या आल्यावर हे सहजासहजी जमत नाही.
भूतकाळाचा विचार करुन काही उपयोग नाही कारण काहीच बदलु शकत नाही. पण अजुन भविष्य तुझ्या हातात आहे. ते तु आणि तुच घडवु शकतेस.
तु स्वत काहीतरी करुन स्वतःचे आयुष्य आनंदी करणे काही achieve करणे हाच तुझ्याकडे दुर्लक्ष करणार्‍या व्यक्तींवर सुड उगवण्यासारखे आहे.
बघ विचार कर. negative thinking नकोस ग करु.


Adtvtk
Wednesday, October 18, 2006 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण आपल्या धर्मावर विश्वास ठेवावा की आयुष्याचे कारण कर्मफळे भोगणे, सत्कृत्ये करून पुण्यसंचय करणे हा आहे.

मरण्याने काही प्रश्न सुटत नाहीत, पुनर्जन्म होतो, नि पुन: कर्मफळे भोगावी लागतात.


झक्की लाखात एक बोललात


Kedarjoshi
Wednesday, October 18, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिद्द्या,

तुम्ही मरायचे हा अवघड निर्नय सहज घेउ शकता तर जगायचे हा अत्यंत सोपा निर्नय का नाही घेउ शकत?

सुख दुःख प्रत्येकालाच असतात, त्यातुनच तर पुढे जायचे.
तुमच्या लहानपणी तुम्हाला चांगली वागनुक मिळाली नाही तर काय झाले, अहो काही माय बापांना कळत नाही की आपल्या जवळ कस्तुरी आहे ते त्यात तुमचा काय दोष. त्यांचाच दोष. त्याची शिक्षा स्व्:तला का?

तुमच्या नवर्याला सांगुन पहा सामान घ्यायचे. अहो सर्व नविन समान घ्यायला ३००० पेक्षा जास्त डॉलर्स लागनार नाहीत. तो कदाचीत वांरवार बदल्यामुळे सामान घेत नसेल. त्यालाही समजुन घ्या व समजुन सांगा.

वर झक्कींनी उपाय सांगीतलाच आहे. आणी बिलिव्ह मी आत्महत्येचा विचार खुप जनांना येतो पण ते सर्व करतात असे नाही.
भारतात बघाल तर तुम्हा पेक्षा जास्त व्यक्ती दुखी दिसतील. माणसिक सुख नाही भोतीक सुख नाही तर पण मस्त जगतात. आपल्या पेक्षा जास्त दुखी माणसाकडे पाहीले तर आपले दुख कमी भासेल.

मी फार अध्यात्मीक माणुस नाही पण तुझे आहे तुझ पाशी ह्या वर विश्वास ठेवतो.

आनंद व दु:ख हे असनारच. कशाला किति म्हत्व द्यायचे ते व्यक्तीच ठरवु शकते. तुम्ही स्वत्:अच्या दुखाला महत्व देताय असे वाटते. पण तुमच्या आत्महत्ये मुळे आज कोणालाही फरक पडनार नाही. पण तेच जर तुम्ही त्यांना सर्व विसरुन प्रेम कराल व त्यांचे प्रेम प्राप्त कराल तर कदाचित तुमच्या जवळ नसन्याचा देखील त्यांना फरक पडेल.

गालीब चा एक शेर आठवत होतो पण आठवत नाहीय त्याचा अर्थ असा आहे.
जगन्याने फरक पडला नाही तरी चालेल. पण एवढे तरी जगावे की जनाज्याला हजार माणसे हळहळ्ली पाहीजेत की हा उगीच मेला म्हणुन.



Yogy
Wednesday, October 18, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तुमच्यावर प्रेम करणार्‍या माणसांना असे दु:खात सोडुन जाण्याचा तुम्हाला काहीही हक्क नाही
अगदीच आवश्यक असेल तर तुम्ही मानसोपचार, counselling वगैरे करण्याचा विचार करा... पण एका धुंदीत हे आयुष्य संपवून टाकण्याचा निर्णय घेउ नका...

अहो कित्येक लोकांना आहे ते आयुष्य पुरत नाही आणि तुम्ही असा भलतासलता निर्णय घेउ नका.
http://www.greatday.com वर तुम्हाला अनेक positive विचार सापडतील.



Manuswini
Wednesday, October 18, 2006 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काही फर सांगुशकत नाही पण एवढेच म्हणेन,
आज कालच्या आयुष्यात काही ना काही कारणामुळे मन दुखीः होते, रस वाटत नाही पण आत्महत्येचा विचार येणे वाईट आहे.

नवरा कंजुष आहे ह्याचे कारण बहुधा(?) त्याची बदलती नोकरी, किंवा US मधील अनिश्चीता in jobs .

तरी पण जर समजा त्याला चांगली रहायची आवड असेल तर तो थोड्या फार गरजेच्या गोष्टी घेवु शकतो. atleast चांगली गादी. जरा त्याला समजावून घे. स्वःता छान रहात जा.
माझा अनुभव, मी खुप कंटळले की उशीरा उठून मनासारखे करते, छन तयार होने, गाणी मोठ्या आवाजात लावून घर साफ़ करणे, नाहीतर बाहेर जाणे.

तु नवरा नोकरीवर गेल्यावर कंटाळा आला असेल तर हे करून बघ,

आरामात उठ ९, १० ला, छान breakfast कर, कुठलीशी आवडती गाणी लाव नी तयार हो किंवा घर आवर, जेवण कर. मग अशीच walk ला बाहेर जा. during daytime complex मध्ये काही लहान मुलांना घेवून फिरत असतात ओळखी होतील. लायब्ररीत जा, पुस्तक वाच. नाहीतर जवळपासच्या mall मध्ये फिर.
shopping करायलाच पाहिजे असे नाही.

मी एकदा अशीच सुट्टी घेतली आणी हेच केले.

नाहीतर एखादा 'संस्कार class ला register कर. तिथे लहान मुलांचे वर्ग घे, गाणी म्हणून दाखवणे, गोष्टी सांगणे.

नोकरी मिळत असेल तर ती पकड. थोडा self-confidence वाढेल. नवर्‍याला विश्वासात घे.

काहीच इcछा नसेल कधी करायची तर आवडती dish बनव, छान picture आण नी एकटीच खात movie बघ दुपारच्या वेळेला.

बघ काय आवडते ते.



Supermom
Wednesday, October 18, 2006 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या,

इथे आल्यावर सारखे घर व जागा बदलावे लागते म्हणून सामान न घेणारे बरेच लोक मी बघितलेत. अगदी तू सांगतेस तसेच. पण थोडेफ़ार जरुरीचे सामान घ्यायला तू नवर्‍याला समजावून बघ. अन खरे सांगू का,नाही घेतले त्याने तरी त्यावर दुःखी होण्यासारखे काहीच नाही ग. माझ्या बघण्यात असे खूप खूप लोक आहेत एवढेच काय तर भारतातून कोणी आले तरच बायकोसाठी कपडे मागवणारा नवरा मी बघितलाय.कारण काय तर इथे कपडे भारतातल्या पेक्षा महाग मिळतात.
पण मी खरेच सांगते,अशी दोन तीन कुटुंबे माझ्याच अपार्टमेंट मधे होती.त्यातल्या बायका अगदी आनन्दी होत्या. त्या माझ्या चांगल्या मैत्रीणी असल्याने मला हे माहीत होते.
हे भलतेसलते विचार काढ ग बाई डोक्यातून. किती सुरेख गोष्टी आहेत जगात आनन्द देणार्‍या. अन आपला आनन्द दुसर्‍यावर अवलम्बून ठेवू नये हे तर खरेच.
अन खरं सांगू का,माझ्या वाक्याचा तुला खूप राग येईल तरी सांगतेय,
तुझ्यापेक्षाही भयंकर दुःख भोगणार्‍या व्यक्ती खूप आहेत ग जगात. अगदी जीवघेणी दुःखं असतात लोकांना. त्यातूनही फ़िनिक्ससारखे उभे राहतात लोक.
उगाचच जे घडून गेले ते कुरवाळत बसून काय मिळणार? अन जीव देणे वगैरे याचा तर विचारच करू नकोस. प्लीज. माझी लहान बहीण असती तरी हेच सांगितले असते मी.
म्हणतात ना, past you cannot change.
but you can ruin a perfectly good present by worrying about the future.
त्या धर्तीवर म्हणावेसे वाटते की भूतकाळाचा विचार करून सध्याचे सुरेख आयुष्य वाया नकोस ग घालवू.
शेवटी काय,
घनतमी शुक्र बघ राज करी,
रे खिन्न मना बघ जरा तरी.
हेच खरे.


Zakki
Wednesday, October 18, 2006 - 9:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उदासीनता येणे, दु:खी रहाणे याचे दुसरे एक कारण आहे. ज्याप्रमाणे आपल्याला स्मरणशक्तिचा उपयोग हव्या असलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी होतो, त्याचप्रमाणे अपमान, टीका, मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी हे सर्व लक्षात रहाणे या साठीहि होऊ शकतो. त्यात क्रोधी वृत्ति (जी माझी होती) मिसळली की मनात दु:खाखेरीज दुसरा विचारच येऊ शकत नाही. मग अश्या वेळी काय करावे? तर प्रथम क्रोध आणण्याचे कमी करावे. अगदी फक्त महायोग्यालाच संपूर्ण क्रोध घालवता येईल, पण साधारण माणसाला कदाचित् माझा उपाय जमेल. मी स्वत:शी ठरवले की दिवसातून पन्नासदा राग आला तरी त्यातले पंचवीस विसरून जायचे. मग हे विसरून जाण्याचे प्रमाण हळू हळू वाढवत जायचे.

तर अश्या रीतिने क्रोधाचा catalyst काढून टाकला की शांत मनाने विचार करावा की आपल्याला दु:ख का झाले, नवर्‍याने अपमान केला? जाऊ दे, तो तसलाच आहे, मी त्याकडे लक्षच देणार नाही! हवी ती गोष्ट घडली नाही, ठीक आहे. अजून पुष्कळ आयुष्य जगायचे आहे. काहीतरी याहून चांगले घडेल. कश्याला लक्षात ठेवायचे ते? त्यापेक्षा शाळेत पाढे शिकलो होतो ते आठवतात का? म्हणा बघू १९, २३ २९ यांचे पाढे मनातल्या मनात! मग आयुष्यात आनंददायक काही घडले असेल, अगदी अचानकपणे लहानपणी फुगा, गोळी मिळाली हे सुद्धा, त्याचा विचार करावा. अशा रीतिने फक्त चांगल्या गोष्टीच लक्षात ठेवायच्या नि वाईट विसरायच्या असे ठरवले की दु:ख कमी होते, आनंद हळू हळू मनात प्रवेश करू लागतो. स्वानुभव हो. इतरांना तसेच होईल याची काऽहीहि गॅरंटी नाही!


Sidhya
Wednesday, October 18, 2006 - 10:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सग्ळ्यांनी जी आपुलकि दिली त्याने मला खुप बर वाटल. Thanks to all very much. माझा नवरा जोलि नाहि पण खुप चांगला आहे, शांत आहे पण त्याला कश्यात काहि आवड रस नाहि. नवरा कंजुष नाहि म्हणुनच सारे प्रोब्लेम झालेत.
माझा नवरा इथे ४-५ वर्षां पुर्वि आला पण त्याला सेविंग हा प्रकार माहित नाहि त्याचि जवळ जवळ २ वर्षे बेन्च वर गेलित ; त्याला काहि व्यसन नाहि पण पैश्याचा हिशोब नाहि, नतेवाईकां साठि त्याने $१०००.०० चे गिफ़्त्स नेले भारतात 1st time गेला तेव्हा. मी एथे आले तेव्हा त्याचि Credit Card चि मोठि बिल,कारच कर्ज, त्याने उगाच विकत घेतलेल्या कहि गोष्टि $१५०० चा cam cord त्याच देण नि मग पुन्हा बेन्च, moving for his projects.
Apartment Lease Break केल्याने आमचे जवळ जवळ $४००० वाया गेले वेगवेगळ्या ठिकाणि as a fine. मी इथे आल्यानंतर तो ५-६ बेन्च वर होता परत.
He is hard working पण Employer चांगला नसल्या मुळे चांगले Project हातुन गेले नेहमिच. त्यात माझ्या नवर्‍याने Employer change करण्याच डेरिंग नाहि केल.
लग्नाच १ वर्ष अस गेल. आई नेहमी म्हणायचि काय करयच ते लग्ना नंतर इथे नाहि पिक्चर ला जाण बाहे र खाण मजा, जिन्स घालण सार लग्ना नंतर. मैत्रिणिहि दुरावल्यात आई-बाबांच्या कड्क पणा मुळे. असो.
माझि सारि स्वप्न लग्नावर होति पण इथे तर आणखिनच त्रास नवर्‍याने केलेल्या खर्चां मुळे,
त्याच्या Job मुळे and mainly as he is not intrested in any thing and has no plans for me (for us) ; thats why I am sad but thanks for support.


Chaffa
Wednesday, October 18, 2006 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या,
बंरं केलस आत्महत्येचा विचार मनातुन काढून टाकलास ते अग आयुष्य आपलं आहे ते जगायलाच हवं ना.!! आत्महत्या हा पळपुटे पणा झाला उपाय नव्हे. कधी वाटलच पुन्हा असं तर ये मायबोलीवर ईथे मन छान रमत आणी मोकळंही होतं.


Kedarjoshi
Thursday, October 19, 2006 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिध्या,
हं. तुझा नवरा म्हणजे खर्चाचा बाबतीत माझी प्रतिकृती आहे वाटत. मी पण खुप उधळपट्या आहे असे माझ्या घरचे म्हणत असतात. पण एक मंत्र पैसा काय आजही आहे नी उद्याही. पण आज फक्त आजच आहे वापस येनार नाही. सो खुशी मे रहो.

नवर्याला थोड सांग की १५०० च्या cam नको ७०० चा घे मग तो १००० पर्यंत यील. दर महिन्याचा २० टक्के पगार तुला दे म्हनाव व बाकीच्या ८० टक्याच तु विचारु नकोस. त्या २० टक्याची बचत कर. बचतीच महत्व त्याला समजावुन सांग. हेच २० टक्के नंतर बेंच च्या काळात उपयोगी पडतील हे पटवुन दे. तो नक्की ऐकेल.

पैशांवरुन भांडने होने ही नक्कीच दुर्देवी बाब. पण प्रत्येक घरात तोच प्रकार त्यामूळे आत्महत्या का?

माझे लग्न झाले तेव्हा मी पण कर्जबाजारी होतो. (आई वडिलांना मी लग्नात खर्च करु दिला नाही). मग बायकोला जेव्हा कळले की मझ्यावर कर्ज आहे तेव्हा ती चिडली पण लगेच काही महिन्यातच मी कर्ज फेडले.
अरे मै जब बदल सकता हु. तो तेरा नवरा क्युं नही. ( BTW मी सध्या बायकोला मला Tissot चे घ्ड्याळ घ्यायचे आहे म्हणुन मागे लागलो आहे. घड्याळ्याची किंमत फक्त ५५० डॉलर आहे त्यामुळे बायको परत चिडली व नाही हे उत्तर आले आहे थ्डी वाट पहावी लागेल तिच्या होकारासाठी पर मै लुंगा हि क्यों की शेअर बाजार मे बहुत फायदा हुआ है. )



Sidhya
Thursday, October 19, 2006 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पुन्हा सगळ्यां नि मला कळकळुन सांगितलेल्या सार्‍या गोष्टि वाचल्यात माझ्या Hopes खरच वाढल्यात.

झक्कि तुमच बरोबर आहे मनातला क्रोध घालवायला हवा. माझ्या मनात खुप क्रोध आहे. सकळि उठ्ताच माझा भुतकाळ कसा कुणास ठाऊक माझ्या मनात येतो व मन खुप नाराज दु:खि होत व अचानक सुड बदला ह्या भावना मनात येतात. गेल्या काहि दिव्सांपासुन मी घरी फोन करण बंद केलय कारण फोन वर मी नेहमि पालकांना तुम्हि माझ्या सोबत खुप वाईट केल अस केल तस केल सांगुन राग राग कराय्चे त्यांना खुप बोलायचे, दोष द्यायचे मग रात्र रात्र दिवस भर राग वाढ्तच जायचा. आता फोन करतच नाहि मी. पुर्वि मी आईला पत्र लिहायचे आता बंद केलय कारण पत्र जरि मी चांगल सुरु करायचे नंतर त्यात फक्त राग असायचा.

खरतर लग्ना नंतर मला पालक, भाऊ etc all त्यांनी दिलेलि वागणुक बालपण भुतकाळ सार विसरुन एक नवि सुरुवात करायचि होति आनंदि सुखाचि पण लग्ना नंतर नवरोबाच्या बिलां मुळे, ज़ोब मुळे ते काहि झाल नाहि.

नवर्‍यावर मी खुप चिड्चिड करते, खुप राग करते जणु
मनातला सारा राग त्याच्या वर काढ्ते पण नवरा खरच खुप चांगला वागतो पण तरिहि हे कळत असुनहि माझा राग राग होतो निरशा होते कारण नवरा चांगला असण्याबरोबर त्याने थोड हौशि नको का असायला अस वाट्त, घर निट असाव अस वाट्त, घरात सार गरजेच सामान असाव अस वाटत जे सध्या तरि जरा कठिण आहे म्हणुन निराश होत मन

मला खरच भुतकाळ विसरायचाय. पण पालकांनि त्यांनि जे माझ्या सोबत केल ते चुक होत हे स्विकाराव हे मला वाटत .

Sidhya
Thursday, October 19, 2006 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bhagyaa

I would love to talk with you but I do not have phone in my house .
We hv cell phone which my husband takes with him. I m sorry n Thanks a lot.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators