|
Bee
| |
| Wednesday, October 11, 2006 - 10:18 am: |
| 
|
ज्या व्यक्तीला तुम्ही proposed करु बघता त्या व्यक्तीची आणि तुमची मैत्री ही नेहमीच खूप जवळकीची असते असे नाही. बर्याचदा एखादी व्यक्ती आपण फ़क्त बघूण असतो, तिला जर आपण proposed केले तर तिची प्रतिक्रिया काय होईल हे आपल्याला माहिती नसते. काही व्यक्ती खूप हळव्या असतात, काही असमंजस असतात, काही जुन्या विचारांच्या असतात, काही अर्थाचा अनर्थ करतात, काही धिंडोरा पिटणार्या असतात. प्रश्न इभ्रतीचा असतो. तेंव्हा proposed करणे ही नक्कीच खूप सावधगिरी बाळगूण करावी अशी गोष्ट आहे. बर्याचदा करु कि नको असा विचार करता करता आपले मार्ग, त्या व्यक्तीचे मार्ग बदलून जातात. आपल्याकडे परत अशी संधी चालून येत नाही. नंतर पस्तावा देखील होतो. तुमचे ह्या विषयावरचे प्रामाणिक वा अनुभविक मत अवश्य मांडा. इथे कुणालाही त्याचा फ़ायदा होऊ शकतो. धन्यवाद!
|
Bee
| |
| Wednesday, October 11, 2006 - 10:19 am: |
| 
|
अरे एक गोष्ट राहीलीच की लिहायची. हे मी marriage proposal बद्दल लिहित आहे :-)
|
Zpratibha
| |
| Wednesday, October 11, 2006 - 11:30 am: |
| 
|
बी हे तुझ्यासाठी नाहिये ना... बघ मला वाटते कि जर जास्त ओळख नसेल किंवा ओळखच नसेल तर Direct Praposed करु नये. कारण बर्याचदा त्याचा Feedback Negative असण्याचि शक्यता असते. हेच बघ ना, समजा एखाद्या व्यक्तिला तुमची संपुर्ण माहिति (ओळख नसताना) असण्याची शक्यता जरा कमीच वाटते. अशावेळि अर्थात स्वभावहि माहित नसतो, मग ती व्यक्ति आयुष्याचा निर्णय कसा घेणार? हे मी specifically Love Marriage साठि बोलत आहे. तेव्हा हळुहळु थोडिशी ओळख झाल्यानंतर विचारलेले बरे. पण विचारलेले केव्हाहि चांगले. उगाच आयुष्यभर खंत वाटायला नको. फक्त विचारण्याची वेळ योग्य असावी.
|
Swa_26
| |
| Friday, October 13, 2006 - 7:58 am: |
| 
|
बी, समोरची व्यक्ती जर चांगल्या ओळखीची असेल, आणि आपण खरोखरच त्या व्यक्तीबद्द्ल serious असाल तर हे धाडस करावेच असे माझे मत आहे कारण नंतर कदाचित "अब पछताए है तो क्या जब चिडीया चुग गयी खेत" अशी पस्तावण्याची वेळ येऊ शकते.
|
बी, काय विचार काय आहे नक्की? >>इथे कुणालाही त्याचा फ़ायदा होऊ शकतो.<< म्हणजे नक्की कुणाला बी? [दिवाळी अंकासाठी काही पाठवले की नाही बी?]
|
बी, हा नाजुक विषय हे! पण काही अलिखित नियम पाळावेत असे माझे मत हे, ते नियम म्हणजे असे की १. तुम्ही जेव्हा प्रपोझ करता तेव्हा तुम्हाला तत्काळ फेव्हरेबल रिप्लायची अपेक्षा असते, अशी अपेक्षा न ठेवता विचारणा व्हावी २. समोरच्या व्यक्तिस विचार करण्याचा अवधी तर द्यावाच पण त्या व्यक्तिने तुमच्या प्रपोजल चा विचार काय म्हणुन करावा याची आवश्यकता पटवुन देणे अत्यावश्यक! थोडक्यात तुम्हीच कसे भारी हात अन तुम्हाला विचारात घेतले नाही तर कसे (आयुष्याचे वगैरे) नुकसान होईल हे चित्र बोलता बोलता तुम्हाला निर्माण करता यायला हव. ३. कोण कितीही बोम्ब मारुदे, हे सर्व जग जिव्हाळ्यावर चाललेल असत अन जिव्हाळा सहानुभुतीतुनच निर्माण होतो तेव्हा आपल्याबद्दल समोरच्याच्या मनात सहानुभुती कशी निर्माण होइल याचा विचार जरुर करणे, एक लक्षात ठेव की सहानुभुती आणि दया, अनुकम्पा, कीव या पुर्ण भिन्न बाबी हेत. अस चुकुनही वागल गेल नाही पाहिजे की प्रपोज करणार्याबद्दल सहानुभुती वाटण्या ऐवजी कीव किन्वा अनुकम्पा वाटेल माझ्या मते समोरच्याच्या मनात जेव्हा सहानुभुती आपोआप सहजगत्या निर्माण करता आली नाही, तिची मागणि केली तर सहानुभुती ऐवजी दया, कीव, अनुकम्पा वगैरे गोष्टी उद्भवतात. किन्वा दुसर्या शब्दात जेव्हा भीकेसारखी सहानुभुती वाटली जाते तेव्हा तिचे स्वरुप बदलुन ती कीव किन्वा दया किन्वा अनुकम्पा बनलेली असते. चु. भु. द्या घ्या. ४. समोरच्या व्यक्ति बद्दल रास्त आदरभावना बाळगुनच बोलणे केले पाहिजे ५. नकार आल्यास माझ अस होइल किन्वा मी यान्व करीन की ढ्यान्व करीत असल्या बयादि सान्गु नयेत, होकार किन्वा नकार दोन्हीही पचवायची क्षमता असेल तरच प्रपोज करायच्या फन्दात पडाव नाही तर आईबापान्नी ठरवलेला जोडिदार मुकाट स्विकारावा! छ्याऽऽऽ, हा विषय भलताच किचकट हे अन नाजुकपण म्हणुन आत्तापुरते येवढेच पुरे! या पोस्ट मधे तू किन्वा तुम्ही असे सम्बोधन हे ते तमाम प्रपोजकान्साठी हे व एकट्यादुकट्या आयडी साठी नाही. ही पोस्ट पटली तर घ्या नाही तर सोडुन द्या!
|
Daku
| |
| Friday, October 13, 2006 - 11:47 am: |
| 
|
mala koni tari sangitale aahe ki mulgi khedyatli aso ki hi fi... tila sagalyat mahatwache asate 'Safety' tichi, tichya future chi ....he convey karata aale tar paha... ha far mahatwacha salla aahe,ase malahi watate , yane khup wajan yeil bolanyala. 100%
|
Zakki
| |
| Friday, October 13, 2006 - 2:40 pm: |
| 
|
लिंब्या, धन्यवाद. आता एक दहा बारा मुलींना प्रपोज करून टाकतो. हो म्हंटले तरी लगेच लग्न करावे लागत नाही ना?! नाही म्हणजे, तुम्ही सांगता तेव्हढे सगळे जमले तर इथे उगीच लग्नाबिग्नाच्या फंद्यात पडायला नको!

|
झक्की काय हे. की तुमचा पासवर्ड कोणी दुसराच व्यक्ती वापरतोय.
|
Zakki
| |
| Friday, October 13, 2006 - 9:49 pm: |
| 
|
नाही, नाही. मीच केवळ कुतुहलाने विचारले. नारदमुनी नाही का, स्वत: एव्हढे विद्वान, तरीही आपले भगवंताला नाना प्रश्न विचारत असतात. हेतू हा की त्यालोके अज्ञ लोकांना समजावे! तशी आपली ही जमेल तशी लोकसेवा हो!
|
Manuswini
| |
| Friday, October 13, 2006 - 10:32 pm: |
| 
|
झक्की, तुम्ही मुलिंना काय म्हणून प्रपोजल ठेवणार आहात? पेपर वाचून द्यायला की कवळी शोधून द्यायला? दिवे घ्या हा
|
Daku
| |
| Saturday, October 14, 2006 - 4:48 am: |
| 
|
zakki nehami topic change ka karata tumhi...aani mod pan ka karu detat?... aani bakiche pan tyala ka protsahan detat? BB cha vishay kay...tumhi bolta kay ....kay challay kay....
|
Zakki
| |
| Saturday, October 14, 2006 - 1:03 pm: |
| 
|
धमाल चालली आहे अन काय? सगळेच काही गंभीर प्रकृतीचे नसतात, अधून मधून थोडी मौज मजा चालते. प्रत्येक प्रश्नाचा सर्वांगिण अभ्यास करावा लागतो. औषधाने जंतू मरतात, पण काही " side effects" आहेत का हेहि तपासून पाहिले पाहिजे. अगदीच वाईट असेल तर मॉड उडवतात, सांगून बघा त्यांना. उडवले तर उडवले, एक मिनिटापुरती गंमत. तुम्ही आपले अत्यंत गंभीरपणे, या विषयावर सखोल अभ्यास करून, बरेचदा स्वत: अनुभव घेऊन, मग लिहा. मग ते आपण दगडावर कोरून ठेऊ. म्हणजे हा प्रश्न कायमचा सुटेल!

|
>>>> लिंब्या, धन्यवाद. आता एक दहा बारा मुलींना प्रपोज करून टाकतो. हो म्हंटले तरी लगेच लग्न करावे लागत नाही ना?! होकारान्ची येवढी खात्री? DDD अमेरिकेतला हजारी रेशो भलताच बिघडलेला दिस्तोय! DDD
|
Zakki
| |
| Saturday, October 14, 2006 - 3:42 pm: |
| 
|
अरे, तुम्ही सगळे नियम एव्हढ्या व्यवस्थितपणे लिहीले आहेत, तर ते पाळले की होकार येणारच!

|
Swa_26
| |
| Monday, October 16, 2006 - 6:35 am: |
| 
|
बी, तु म्हणतोस की समोरील व्यक्ति कशी आहे आणि त्यामुळे प्रपोज केल्यानंतर ती व्यक्ति कशी react करेल हे माहीत नसल्यामुळे त्या व्यक्तिला आपल्या भावना आपण सांगत नाही. पण जर आपण त्या व्यक्तिला एवढेही ओळखत नसु तर मग it is always better to play safe.जमल्यास प्रथम त्या व्यक्तिची अभिरुचि, स्वभाव, इतर घटनांकडे पाहण्याचा द्रुष्टिकोन याची माहिती करून घ्यावी. आणि तु जर लग्नाच्या प्रपोजल बद्दल बोलत असशील तर आपल्या जोडीदराबद्दल एवढी माहिति जर आपण करून घेतली तर त्यात गैर काहीच नाही असे मला वाटते. त्यानंतर मग आपण त्या व्यक्तिला विचारले तर मग कदाचित प्रतिक्रिया तेवढी harsh नसेल असे मला वाटते.
|
Ajay
| |
| Tuesday, October 17, 2006 - 5:03 pm: |
| 
|
मी अगदी वेगळा विचार मांडतो आहे. असं समजा, जर समोरच्या व्यक्तिने होकार दिला. पुढे काय? त्या व्यक्तीला साथीदार करायला खरोखरच विचारणार्या व्यक्तिची तयारी आहे का? वर लिहिले त्यावरून असे वाटते आहे की विचारणार्या व्यक्तिलाही दुसरी व्यक्ती नुसती लांबून माहिती आहे. खरोखरच त्यांचे पटेल का नाही हे माहिती नाही. तर फक्त दुसया व्यक्तीलाच आपली ओळख व्हावी म्हणुन नव्हे तर स्वतलाही आपण जे समजतो तेच आहे यासाठीही हळूहळू आधी ओळख करून घेणे चांगले असे माझे मत आहे.
|
Bee
| |
| Wednesday, October 18, 2006 - 2:16 am: |
| 
|
इतके वेगवेगळे मत वाचून माझे मन प्रफ़ुल्लीत झाले.. :-)
|
Zakki
| |
| Wednesday, October 18, 2006 - 2:43 pm: |
| 
|
बी, सावधान. ज्या व्यक्तीशी तुला लग्न करायचे तू अगदी विचार करून (तुझ्या तारुण्यसुलभ भावनेत जसा जमेल तसा) ठरवले असशील, त्याच व्यक्तिला प्रपोज कर. म्हणजे 'हो' म्हंटले तर लग्न करण्याची तयारी पाहिजे. माझे पण मन सदा प्रफुल्लितच असते, पण त्या लग्नाच्या भानगडी पायी मी कुणाला काऽहीहि प्रपोज करत नाही!
|
Manuswini
| |
| Wednesday, October 18, 2006 - 6:58 pm: |
| 
|
बी तुझे मन का प्रफ़ुल्लीत झाले? तुझ्या मित्राचे व्हायला हवे....... बरे तु सांगितलेस का तुझ्या मित्राला हे वरील सर्व मार्ग? कारन दुसरी कडे कुठे तु हाच prob तुझ्या मित्रासाठी लिहिला होतास ;)
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|