|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 5:46 pm: |
| 
|
Administrators & Moderators reservation BB वर मी तुम्हाला उद्देशून काही लिहिले आहे. त्याबद्दल तुमचे उत्तर मिळाल्यास बरे होईल. इथल्या जुन्या लोकांना जबाबदारीने वागायला कसे शिकवायचे, हा प्रश्न तुमच्यापुढेही असेल, तर संपलेच मग सगळे.
|
Yog
| |
| Monday, July 17, 2006 - 6:57 pm: |
| 
|
>>इथल्या जुन्या लोकांना जबाबदारीने वागायला कसे शिकवायचे, हा प्रश्न तुमच्यापुढेही असेल, तर संपलेच मग सगळे. हे तुम्हालाही लागू होते...? in any case, Admin आपल्या व्यस्त दैनन्दिनीतून आपणास वेळ झाला तर पेशव्याने उपस्थित केलेल्या प्रश्णाचे उत्तर मिळाले तर बरे होईल. am sure you agree that "biased moderation" of any sorts is harmful! धन्यवाद! तुम्हाला हा प्रश्ण मुद्दामून विचारत आहे कारण शेवटी सर्व policy ना तुमची मान्यता असेल असे गृहीत धरतो. (Peshwa To moderators: I don't understand your selective deleting of posts on the V&C BBS if you are following any policy please let us know. ) ps: if people feel thats the case (I personally feel and have experienced "that is the case") and if they communicate the same to you are you going to make any changes to the "Mod Team"? May be having different team every 6 months or so and NOT having the same mods for next 1 calendar yr. could be a solution, provided you make such an appeal and get volunteers to do that. At least "try it out".. The real question/problem is even if there is such objective and uniform policy, what could be done when some mods "abuse" the same owing to their "personal interests?" As always, I would be glad to help.
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 7:34 pm: |
| 
|
हे तुम्हालाही लागू होते...? मी तुमच्या, पेशवा इतका जुना नाही. पण तुम्हा लोकांपेक्षा मी जास्त जबाबदारीने वागलोय हे लक्षात घ्या. तुम्ही लोकांनी मला वारंवार डिवचण्याचा प्रयत्न केला आहेत. मी आल्यापासून.. का तर मी communism follow करतो म्हणून? मी reservation support करतो म्हणून? नाही, तुम्हाला या दोन्ही मुद्द्यांशी काहीही घेणे देणे नाहीये. तुमची "दुखती नस" वेगळीच आहे. anyway.. moderators and admins have seen what's going on since beginning...
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 7:37 pm: |
| 
|
As always, I would be glad to help.
म्हणजे ही संधी वापरून moderator मंडळात शिरकाव करून घ्यायचा आहे वाटते???? अरे मग स्वतःची credibility वाढवा ना... वाईट अर्थाने opportunist कशाला होता? आं?
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 11:50 pm: |
| 
|
Administrator, अरेरे.. कम्युनिझमला शिव्या घालण्याचा एक मोठा मार्ग तुम्ही बंद केलात.. तुम्हीही केलेली कारवाई पक्षपाती आहे. आता लोकांना कम्युनिझमला शिव्या घालण्याचे नवीन मार्ग शोधावे लागतील! ~D
|
Peshawa
| |
| Tuesday, July 18, 2006 - 12:55 am: |
| 
|
लालभाई तुम्हि communist आहात तेंव्हा प्रशासनच मला "वळण" लावेल हे तुमचे विचार आपेक्षितच आहेत... पण त्याची गरज नाही... माझि इथलि जाबदरि मला ज्ञात आहे... माय्बोलि हा forum कोणत्याही एका ism साठि नाही... त्यात सगळेच आले... वैयक्तिक तुमच्यावर मझा कुठलाहि आकस नाहि नव्हता, तुम्हि अंगिकारलेल्या जिवनसरणिचा मला आदरच आहे. आणि तो आदर राखत त्या ism चा समाचर घेण्याची माझि कुवत आहे आणि हक्क देखिल अनि मी तो ह्या पुढेहि बजावेनच... ह्याचा अर्थ मी तुमचा अनादर करतो अस क्रुपया घेत जाउ नका... असे असुनही reservation वरील वादात माझ्यक्डुन तुमच्या "धार्मिक" भावना दुखावल्या गेल्या असतिल तर मी दिलगिर आहे... ह्या वादावर इथेच पडता पडावा अशि अपेक्षा बाळगतो... आपले माय्बोलिवर स्वागतच आहे... वाद घाला, ललित लिहा कविता करा प्रसंगि हमरितुम्हरि वर भांडा... you are welcome here with your ideology... don't expect ppl to be coy about it :-) have fun!
|
Laalbhai
| |
| Tuesday, July 18, 2006 - 1:38 am: |
| 
|
माय्बोलि हा forum कोणत्याही एका ism साठि नाही... त्यात सगळेच आले... मी कोणालाही विरोध केलेला नाही. तुम्हि अंगिकारलेल्या जिवनसरणिचा मला आदरच आहे. आणि तो आदर राखत त्या ism चा समाचर घेण्याची माझि कुवत आहे माफ करा, तुमच्या कोणत्याही पोस्टमधे मला कम्युनिझमच्या टवाळीव्यतिरिक्त काहीही दिसले नाही! ती करु नये असा आग्रह मुळीच नाही. कम्युनिझम दोषरहित आहे, असा दावा मी कुठेही केलेला नाही. उलट काळानुसार कम्युनिझमही modify व्हायला हवा, हे मीच वारंवार बोलून दाखवले आहे. तुम्ही आदर राखून टिका केलीत, हे पूर्णतः चूक आहे. तुमची सर्व पोस्ट्स परत एकदा जाऊन वाचा. हक्क देखिल अनि मी तो ह्या पुढेहि बजावेनच निश्चितच! योग्य मार्गाने कम्युनिझमच्या दोषांची चर्चा केलीत तर मी स्वतः तुमच्याबरोबर दोष दाखवून देईन. तुमचे reservation BB वरचे सगळे लिखाण पुन्हा एकदा वाचा. त्यात कुठेही आदर राखून टिका केल्याचे मला जाणवत नाही. माफ करा! तुमच्या "धार्मिक" भावना दुखावल्या गेल्या असतिल You are back to normal.. Anyway.. मला ललित, कथा, कवित काही कळत नाही (Typical communist huh??) त्यात माझा सहभाग असण्याची शक्यता कमीच. चर्चेत मात्र वारंवार भेटूच. 
|
Admin
| |
| Tuesday, July 18, 2006 - 1:59 am: |
| 
|
There is NO policy about biased moderation. In fact admin team tries best to avoid such bias as much as possible.कुठला message उडवायचा आणि कुठला ठेवायचा याचा निर्णय नेमस्तक घेतात. पुष्कळदा त्याबद्दल नेमस्तकांमधे चर्चा होते, कधी होत नाही. नेमस्तकांमधेही message उडवावा की नाही यात मतभेद होतात. पण शेवटी कुठलातरी निर्णय घेण्याची गरज असते. ही प्रक्रीया १००% बरोबर नाही याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे पण सध्यातरी एवढेच शक्य आहे. प्रत्येक message बाबत मतदान घेतले किंवा माझे मत काय आहे हे नेमस्तक विचारत बसले तर काहीही काम होणे अवघड होईल. कुठलाही message उडवला गेल्यास ते योग्य झाले का नाही याची शहानिशा करणे एकतर शक्य नाही आणि झाली तरी त्यातून काय साधणार? मायबोली हे व्यासपीठ आहे, मुखपत्र नाही आणि आमच्याकडून ते मुखपत्र होणार नाही त्याची शक्य तेवढी काळजी घेत असतो. पण त्या व्यासपीठाकडे आकर्षित होणारा समाजाचा घटक संपूर्ण मराठी समाजाचे प्रतिनिधित्व करेलच असे नाही. तो घटक फक्त एका विशिष्ट विचारसरणीचा असू शकतो. त्यामुळे होते काय कि काही विचाराना खूप पाठिंबा मिळतो तर काहीना नाही. मूळातच कुठल्याही माध्यमाला किती महत्व द्यायचे हे त्या माध्यमाचा वाचकवर्ग ठरवतो. पण बर्याचदा त्या माध्यमापेक्षाही ज्या व्यक्ती त्या विचारांमागे आहेत त्यांच्याकडे तो वाचकवर्ग जास्त लक्ष देतो. उदा. द्यायचे असेल तर मागे डॉ. लागू यांनी म. टा. मधे काही फाशीच्या शिक्षेबद्दल (किंवा अशा काहीश्या महत्वाच्या विषयाबद्दल) लिहिले होते जे तत्कालीन समाजाच्या सर्वसाधारण मताच्या विरुद्ध होते. त्याबद्दल मराठी समाजात बरीच चर्चा झाली. पण तेच जर कुणी सोमाजी गोमाजी यांनी लिहिले असते तर ते फक्त म. टा. मधे आले म्हणून महत्वाचे ठरले नसते. म्हणूनच कुणिही मायबोलीवर कितीही हिरिरीने लिहिले म्हणून लोक वाचतीलच असे नाही. उलट बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात म्हणून सोडून देणारेच जास्त आढळतील. त्यामुळे इथल्या वादांना किती महत्व द्यायचे ते ज्याचे त्याने ठरवावे. पण तुम्हाला एखाद्या विषयावर खरेच काही व्हावे असे मनापासून वाटत असेल तर हितगुजवर कंठशोष करून ते होणार नाही. प्रत्यक्षात तुम्ही त्या विषयात काम करून होईल. पुष्कळदा अशी मते मांडताना (मग ती कुठल्याही बाजूची वा विषयांची असोत) मांडणार्या व्यक्तीचे आपण त्या विषयावर "जागरुकता" तयार करतो आहोत असे मत असते आणि त्यांच्यापुरते ते प्रामाणिकही असते. जेंव्हा एखादा विषय फारसा माहित नसतो तेंव्हा ही जागरूकता होतेही. पण जेंव्हा एखादा विषय पुष्कळ वेळा माहिती असलेला असतो तेंव्हा त्या जागरूकतेपेक्षा त्या विषयांच्या विरोधकाना उत्तर द्यायला आकर्षित करणे किंवा जे अगोदरच सहमत आहेत त्यानाच हो बरोबर आहे असे म्हणायला लावणे या पलीकडे त्याचा प्रभाव पडत नाही. या उलट तुम्ही त्या त्या क्षेत्रात खरोखरच काम केले असेल तर, अगोदर तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि नंतर तुमच्या विचारसरणीला पाठींबा मिळू शकेल.
|
Yog
| |
| Tuesday, July 18, 2006 - 3:41 am: |
| 
|
Admin, इतक्या तत्परतेने (घाईने?) उत्तर दिले त्याबद्दल आभार! पण एकन्दरीत उत्तराचा सूर थोडा it works or it does not work, accept it or leave it अशाप्रकारचा वाटला. प्रत्त्येक गोष्टीला तुमची सम्मती हवी हे शक्य नाही आणि ते practical नाहि हे कळते अन किम्बहुना तसे असेल तर mod team ची गरजच नाही हेही आलेच. पण मुख्ख्य मुद्दा तुम्ही वगळलात तो हा की mods व्यक्तीगत आकस वा हेतू बाजूला ठेवून काम करणार असतील तरच it will work, irrespective of "which posts and how many" get deleted or not.. biased moderation होत असेल(तेही नेहेमी ठराविक एक दोन मॉड्स कडून) तर त्यावर काय उपाय करता येवू शकेल वा नाही असा positive विचार तुमच्या पोस्ट मधून दिसत नाही याचा खेद आहे. (माझ्या पोस्ट मधिल दुसरा प्रश्ण याच अनुशन्गाने होता...) (मायबोली अर्थातच कुणाचेच अन कसलेच मुखपत्र नाही हे सर्वज्ञात आहेच, त्यामूळे इथली चर्चा वा वाद ही फ़क्त मते मतान्तरे आहेत. अपेक्षा एव्हडीच आहे की mods च्या अधिकारान्चा गैरवापर केला जावू नये. केवळ म्हणूनच हा मुद्दा इथे उपस्थित केला होता नाहितर how much moderation.. या BB वरही लिहीता आले असते. शेवटी mod team अन त्यान्च्या judgement वर विश्वास ठेवण्या खेरीज तुम्हालाही पर्याय नाही हे लक्षात आले तरी जेव्हा एक दोन mods पुन्हा पुन्हा biased moderation करतात तेव्हा त्यान्च्या हेतू अन judgement बद्दल शन्का येते. ती तुमच्या निदर्शनास आणून देणे इतकेच आम्ही फ़ार तर करू शकतो. तुमच्या mods ना तसे प्रत्त्यक्ष पोस्ट करुन विचारल्यावर उत्तरावेजी सोयिस्कर पोस्ट डिलिट करणे असे प्रकार घडतात तेव्हा "प्रत्त्येक पोस्ट ची शहानिशा करता येत नाही" हा तुमचा mods वरील विश्वास अन युक्तीवाद दुर्दैवाने फ़ोल ठरतो. असो पुढील वेळी जमल्यास सर्व मूळ मुद्दा अन पुराव्यासकट तक्रार नोन्दवून पहावे लागेल. चू. भू. दे. घे.)
|
ऍडमिन, अचुक मुल्यमापन! प्रत्यक्षात काम करणे हेच केव्हाही बरोबर पण प्रत्यक्ष कामाला उद्द्युक्त करणे, किमान काम करणारान्प्रती सहानुभुतीची भावना निर्माण करणे, किन्वा अशा योग्य किन्वा अयोग्य घटना,कामे चालु हेत याची जाणिव निर्माण करणे, थोडक्यात समविचारी व्यक्तिन्ची सन्ख्या वाढविणे या करिता मायबोलीसारख्या व्यासपीठान्ची नितान्त आवश्यकता असते व जो तो आपापल्या मगदुराप्रमाणे त्यात सहभागी होतो! आपण खुपच छान विश्लेषण केल हे! लक्षात घ्या, तलवारीला नियमीत धार काढावी लागते, तिचा गन्ज काढावा लागतो घासुन पुसुन, अगदी तसेच बुद्धीला चढलेला गन्ज काढण्यासाठीही असा व्यासपीठान्चा उपयोग काहीजण करुन घेत असणार, नाही का? कदाचित इथे चर्चेत असलेले कित्येक विषय प्रॅक्टिकल वैयक्तीक आयुष्यात एका शब्दानेही चर्चिले जात नसणार, विचारात घेतले जात नसणार, पण तरीही, इथे मात्र ते ते विषय आत्यन्तिक परिणामकारक पद्धतीने चर्चिले जातात, त्याचा काहीच उपयोग होत नसेल असे मी तरी मानित नाही! या फोरमच्याच काय, कोणत्याही मिडियाला मर्यादा असणारच, पण त्या त्या मर्यादेत राहुन उपलब्ध कार्यक्षेत्राचा पुरेपुर वापर करणे आपल्या हातात हे ना? माझ स्वप्न हे, येथिल विचारान्ची पॉझिटिव्ह दखल बाह्य जगाने घेतलेली असली पाहीजे येवढी ही मायबोली साईट प्रसिद्ध होवो! 
|
Admin
| |
| Tuesday, July 18, 2006 - 4:26 am: |
| 
|
योग, तुमचा मुद्दा मान्य आहे. गैरवापर होणे ही शक्य आहे, पण माझ्याकडे त्याचा उपाय नाही. त्यात "जमले तर घ्या नाही तर सोडून द्या" असा भाव नसून "आहे हे असे आहे आणि सध्यातरी दुसरे चांगले माहिती नाही" असा आहे. शेवटी नेमस्तकही माणसेच आहेत. एवढेच कशाला मी ही माणूस आहे आणि नेमस्तकांकडून होणार्या चुका माझ्याकडुन झाल्या तर? म्हणजे नेमस्तकानी कसेही वागावे असे नाही, पण केवळ तुम्हाला (किंवा कुणालाही) त्यांचे पटले नाही म्हणून त्यांनी पक्षपात केला असे म्ह्टले तर ते खरे का खोटे कसे ठरवणार? याची दुसरी बाजू पण आहे. काही काही लोक मुद्दाम नवीन ID वापरून वाईट लिहितात त्यांच्याकडेही दुर्लक्ष करायचे? किंवा अशा लोकानि MOD बद्दल तक्रार केलि तर काय करायचे? यावरती एक सोपा उपाय आहे. तुमच्या रंगीबेरंगी BB वर तुम्ही हवे ते लिहू शकता (अश्लील सोडून) आणि तिथे काय ठेवायचे ते तुम्ही ठरवू शकता. थोडक्यात आपोआप नेमस्तकांच्या गैरवापराचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. अर्थातच तुम्ही फक्त तुम्हाला हवे ते ठेवता आणि इतर काढून टाकता असा आरोप तुमच्या वाचकानी केला तर काय उत्तर द्यायचे / द्यायचे नाही, हेही तुम्हालाच ठरवावे लागेल
|
Admin
| |
| Tuesday, July 18, 2006 - 4:43 am: |
| 
|
लिंबूटींबू, तुम्ही म्हणता तसा उपयोग होत असेलही. पण होते काय की आपण बुद्धीचा गंज काढतो आहोत हे विसरून जाऊन, काय वाटेल ते झाले तरी जिंकायचेच आणि बुद्धिबळाचा डाव असला तरी तलवारीचा वार करायचा हे सुरू होते तेंव्हा इतक्या ईर्षेला पेटण्याइतके हे महत्वाचे आहे का असे मला म्हणायचे होते. तीच शक्ती जर ज्या विषयाची बाजू मांडली जात आहे त्यात प्रत्यक्षात वापरली तर काहीतरी उपयुक्त निघेल असे म्हणायचे होते. जेंव्हा एखादा वाद वैयक्तीक पातळीवर पोहोचतो, तेंव्हा तुम्ही म्हणता तसे काहीही न होता इतरांना फक्त मजा बघायला मिळते. आणि तो वाद वैयक्तीक पातळीवए पोहोचला आहे हे वाद घालणार्याना लक्षात येत नाही.
|
ऍडमिन, सहमत! ... .. ..
|
Giriraj
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:44 am: |
| 
|
इतक्या ईर्षेला पेटण्याइतके हे महत्वाचे आहे का असे मला म्हणायचे होते. >>>> ऍडमिन,अगदी बरोब्बर.. ज्यांचे त्यांचे विचार एक व्यासपीठ म्हणून मांडावेच.. पण कुणी जर अमक्याच्या विचारसरणीचा होऊ शकत नसेल तर व्यासपीठाला नावे ठवण्यात काही अर्थ नाही... एक तर ति विचारसरणी चुकीची (किंवा अपरीणामकारक)असेल अथवा ती व्यक्ति ती विचारसरणी दुसर्याला पटवून देण्यात असमर्थ ठरत असेल किंवा त्या दुसर्याने आधीच ति विचारसरणी त्याज्या मानून ठेवली असेल तर यात त्या व्यासपीठाचा दोष नाहीच नाही.. (तुम्हाला माझा पाठींबा आहे असे म्हणणे म्हणजे दिव्याने सूर्याला.... )
|
Peshawa
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:47 am: |
| 
|
thanks admin... points noted
|
Yog
| |
| Tuesday, July 18, 2006 - 6:22 am: |
| 
|
Admin, धन्यवाद! तुम्ही दखल घेतली आहे याचे समाधान आहे. निदान यातून तरी "सम्बन्धीत" मॉड्स काहितरी शिकतील अशी आशा करुया. नाहितर सबकुछ अलबेल आहेच.. 
|
Milindaa
| |
| Tuesday, July 18, 2006 - 12:40 pm: |
| 
|
योग, मला बाकीच्या (पेशवा आणि उडवलेली पोस्ट्स) या वादात पडायचे नाही, पण एवढेच सांगावेसे वाटते की इथला कोणताही मॉड जेव्हा साफसफाई करतो तेव्हा तो बीबी आणि त्याच्या संबंधित असणारी पोस्ट्स सोडून बाकी सर्व उडवले जाते. कधी कधी अनवधानाने काही उपयुक्त पोस्ट्स ही उडवली जाऊ शकतात पण म्हणून सरसकट सर्व मॉड मंडळींवर "baised" असण्याचा आरोप करणे जरा जास्त होते आहे. आणि असे आडून आडून आरोप करण्यापेक्षा माझ्या मते पुरावे देऊ शकलास तर योग्य होईल. बघुया तरी, तुझ्या बोलण्यात किती तथ्य आहे ते. अर्थात, त्या आधी तू Admin च्या पोस्ट मधल्या मुद्द्यांना (कोणत पोस्ट उडवलं की आकस आहे असं समजायचं, एखाद्या duplicate id ने ही तक्रार केली तर काय करायचे इ.) उत्तर देऊ शकलास तर उत्तम. जमेल? हे पोस्ट वादासाठी नाही. तुझ्या म्हणण्याप्रमाणे खरोखर असं होतं का हे पहाणे आणि (तुला) शक्य असेल तर तुझ्याकडून नि : पक्षपातीपणा शिकणे हे करुन पाहू असा विचार आहे.
|
Yog
| |
| Tuesday, July 18, 2006 - 4:36 pm: |
| 
|
Milindaa, माझी पोस्ट नीट वाचलीस तर लक्षात येईल की मी सरसकट सर्व नाही तर एक दोन ठराविक मॉड्स बद्दल बोलत होतो. जसा माझा अनुभव असेल तसा कदाचित इतरान्चा "इतर" मॉड्स बद्दल असेलही वा नसेलही. तेव्हा गैरसमज नको. पुढील खेपेस आधी म्हटल्याप्रमाणे शक्य झाल्यास पुराव्यासहित उदाहरण देण्याचा प्रयत्न करीन. यातून केवळ मायबोलीचे काम सुकर व अधिक विश्वासक पध्धतीने व्हावे इतकीच इच्छा आहे, त्यात वैयक्तिक हेतू कुठलाही नाही. खर तर admin च्या दुसर्या पोस्ट नन्तर (which is much better and "positive" response) हा विषय तूर्तास इथेच थाम्बवुया.
|
Laalbhai
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:40 pm: |
| 
|
पुष्कळदा अशी मते मांडताना (मग ती कुठल्याही बाजूची वा विषयांची असोत) मांडणार्या व्यक्तीचे आपण त्या विषयावर "जागरुकता" तयार करतो आहोत असे मत असते आणि त्यांच्यापुरते ते प्रामाणिकही असते. जेंव्हा एखादा विषय फारसा माहित नसतो तेंव्हा ही जागरूकता होतेही. पण जेंव्हा एखादा विषय पुष्कळ वेळा माहिती असलेला असतो तेंव्हा त्या जागरूकतेपेक्षा त्या विषयांच्या विरोधकाना उत्तर द्यायला आकर्षित करणे किंवा जे अगोदरच सहमत आहेत त्यानाच हो बरोबर आहे असे म्हणायला लावणे या पलीकडे त्याचा प्रभाव पडत नाही. या उलट तुम्ही त्या त्या क्षेत्रात खरोखरच काम केले असेल तर, अगोदर तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि नंतर तुमच्या विचारसरणीला पाठींबा मिळू शकेल. अगदी खरे आहे! मायबोलीचे administrator इतके संतुलित विचारसरणीचे आहेत, हे पाहून आनंद वाटला. दुसरे असे, की मायबोली समस्त मराठी समाजाचे प्रतिनिधित्त्व करत नाही, ही योग्य जाणीव administrator यांना आहे, हेही फारच सुखद आहे. कोणत्याही विचारसरणीचे "मुखपत्र" होण्याचा कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्नही स्तुत्य आहे! मुख्यतः जेंव्हा, तांत्रिक कारणांमुळे, संपूर्ण समाजापर्यंत पोचणे मायबोलीला (सध्यातरी) शक्य नाही, तेंव्हा कोणत्याही विचारसरणीचे मुखपत्र होण्याचे टाळणे, हे फारच शहाणपणाचे आणि logical आहे. मायबोलीचे administrator "जमिनीवर" आहेत, हे पाहून खरोखरच आनंद वाटला. पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!
|
Ajjuka
| |
| Thursday, July 27, 2006 - 7:00 am: |
| 
|
अरे बापरे इथे ही एवढी वादळी चर्चा चालू आहे हे लक्षात नाही आले आधी. सगळे BBs मि नीट पाह्यलेले नसल्याने वरच्या वादात काहीही म्हणायचे नाही. तसेच कितीही तटस्थ रहायचे ठरवले तरी माणूस म्हणून तुम्हाला मर्यादा असणारच. वरची पोस्टस् आणि आधीचे १-२ archives मधे काही जणांनी मॉडस् पैकी काही जणांच्या biased असण्याबद्दल म्हणाले आहे त्याला मात्र अनुमोदन द्यावेसे वाटते. मध्यंतरी कारण नसताना उडवलेली माझी काही निरूपद्रवी पोस्टस्, नाटकांच्या BB वर मुद्दामून शीर्षकासकट ठेवून देण्यात आलेली वैयक्तिक पातळीवरची टीका (ज्यामधे मॉडस् ना वैयक्तिक आणि आकसापोटीचे लिखाण दिसत नाही हाही विनोदच. त्याला ते विरोधी बाजू असे गोंडस नाव देतायत.) बर ठीक आहे ठेवा ना टिका पण येणार्या प्रत्येकाला माझा प्रयोग हा 'एक उबग आणणारा अनुभव' आहे हे कळलेच पाहीजे ही मॉडस् ची गरज दिसतेय. जर तुम्हाला एक बाजू घ्यायची नाहीये तर मग विरोधी बाजू पण घेऊ नका ना. आणि वर तो BB आता बंद आहे जेणेकरून मी जाणकारांनी लिहिलेले लेख टाकू शकणार नाही इथे. हे सगळे बघता माझी शंका गैर आहे असे नाही. हो माझ्यापुरते उदाहरण घेतेय कारण माझा अनुभव मी सांगतेय.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|