|
Ajjuka
| |
| Thursday, July 27, 2006 - 7:20 am: |
| 
|
BTW माझ आक्षेप पोस्टस् राहू देण्यापेक्षा शीर्षक झळकत ठेवण्याला आहे हे परत एकदा स्पष्ट करते.
|
अज्जुका, तुम्हाला ते लेख किन्वा लिन्क्स इथे द्यायच्या असतील तर द्या की! नाटकांचा bb आहेच! तुमच्या दुसर्या अक्षेपाचीही दखल घेण्यात आली आहे. दुसरे म्हणजे (जे सर्वांना लागू होते) Mods चा निर्णय न पटणे हे जरूर शक्य आहे. पण जेव्हा 'काही Mods ' हे Biased आहेत असे म्हणता तेव्हा कृपया त्या म्हणण्याला काहीतरी आधार असेल असे पहा. उदा. १. तो 'न पटलेला' निर्णय एखाद्या mod चा एकट्याचा आहे की अनेक / सर्व mods चा हे तुम्हाला माहित आहे का? कारण बरेचदा निरणय अनेक mods मिळून घेतात आणि तुम्हाला समोर दिसतो तो फ़क्त ती कारवाई प्रत्यक्षात आणणारा mod असू शकतो. २. एक दोन म्हणजे कोणते Mods आकसापोटी फ़क्त तुमचीच posts उडवतायत? ती त्यांनीच उडवली याला काही आधार आहे का? (कारण सध्या Mods ना देखिल मुद्दम विचारल्याखेरीज कळत नाही कुणी कुठली posts उडवली!) नाहीतर नुस्ते 'काही Mods biased आहेत' या मोघम तक्रारीला अर्थ तरी काय तुम्हीच सांगा!
|
Ajjuka
| |
| Thursday, July 27, 2006 - 3:58 pm: |
| 
|
जेव्हा हा सगळ्यांचा निर्णय असतो तेव्हा मी कसे काय सांगू शकणार आहे की कोणते मॉडस् ते? जेव्हा पोस्टस् उडवलेली पाह्यली तेव्हा तिथे कोणी उडवली याचा उल्लेख नव्हता. जर तुमचं तुम्हाला माहित नाही की कोण कुठली पोस्टस उडवतय तर मला कस कळणार? काही या म्हणण्याला आक्षेप असेल तर सगळेच म्हणू का? नाही तुमच्या बोलण्यातून तसेच ध्वनित होतेय म्हणून विचारले. मग ठीक आहे सर्व मॉडस् मंडळ biased आहे असे म्हणेन. आणि हो माझ्या म्हणण्याला पूर्ण आधार नी अर्थही आहे कारण आज मी म्हणेपर्यंत तुम्ही ते शीर्षक तसेच झळकत ठेवले होते. हा निर्णय आणि झालेल्या चिखलफेकीत काहीही वैयक्तिक पातळीवरचे किंवा आकसापोटी न वाटणे याला मी biased समजते. तुम्ही याला निराधार, निरर्थक म्हणा म्हणायचे तर. आणि लेख इतर ठिकाणी टाकता येतात हे मलाही माहितिये पण जिथे अवास्तव चिखलफेक झालीये तिथेच उत्तर म्हणून ते लेख टाकणे संयुक्तिक आहे असे माझे मत आहे. माझ्या पोस्ट वर आलेली तुमची प्रतिक्रिया.. 'म्हणण्याला काही आधार नाही', 'अर्थच काय' इत्यादी.. यात मलातरी Overreaction दिसते. माझ्या एका आक्षेपावर तुम्हाला इतकी strong शब्दात प्रतिक्रिया द्यावीशी वाटावी यालाही मी biased का म्हणू नये?
|
ती प्रतिक्रिया तुम्हाला एकटीला नसून 'काही mods' biased आहेत असे इतक्यात जे आरोप झाले ते करणार्या सर्वांना आहे. तसे वर लिहिलेलेही आहे. strong /over reaction असे काही दर्शवायचा हेतू नाहिये! पण direct आरोप किन्वा तक्रार feedback bb वर केली जाते तेव्हा त्या तक्रारीला काहीतरी आधार असावा या अपेक्षेमधे काही अवास्तव नसावे!
|
Peshawa
| |
| Thursday, July 27, 2006 - 6:17 pm: |
| 
|
mod 5 with due respects to all you mods... My request is this that when any one of you deletes a particular post please keep a "public log" of the following type post link (available for a stipulated amount of time after deletion) <XYZ BB> : <date> : <time> : <maayboliId> : <mod#> : <Decision type> : <brief reason> <decision type> could be Individual or collective.. then people will be able to argue whether it was a biased decision or not... Second ppl don’t take back up of each and every post that they make. And there is indeed no rule (except hand waving) that what can be counted as मुक्त पणे मतं मांडणे आणि मुक्त पणे दुसर्याच्या मतांचातत्वांचा समाचार घेणे. So the post that ajjuka is referring to is considered as (positive) मुक्त पणे मतं मांडणे and a strong worded rebuttal to a particular ideology is considered (negative) as मतांचातत्वांचा समाचार घेणे ? the "public log" will make sure that mods are held accountable for their deeds or misdeeds so to speak ...
|
Arch
| |
| Thursday, July 27, 2006 - 6:25 pm: |
| 
|
मला वाटत हा BB जरी public use साठी असला तरी, Mods should be answerable to Admin only आणि Admin should answerable only to the owners . प्रत्येक गोष्टीत काथ्याकूट कशाला पाहिजे. एखाद्याच्या रंगबेरंगी पानावरचा मजकूर उडवण्यात आला तर तक्रार करणं वेगळ.
|
Yog
| |
| Thursday, July 27, 2006 - 6:31 pm: |
| 
|
>>the "public log" will make sure that mods are held accountable for their deeds or misdeeds so to speak ... पेशव्या, मि आधी जेव्हा Admin ना विचारले होते तेव्हा नेमकी accountability बद्दलच बोलत होतो. दुर्दैवाने त्यान्च्या उत्तरात कुठेही accountability किव्वा त्यासम्बन्धी काही सुधारणा करता येतील का याचा उल्लेखही नव्हता. किम्बहुना mods चा प्रत्त्येक decision मि तपासून पाहू शकत नाही असे त्यानी म्हटल्यावर आपल्या अशा तक्रारीत काही अर्थच उरत नाही. I thought feedback to admin bb was "meant" to look into such issues! i hope he sees the point now.. कितीतरी उपाय सुचवता येतील पण admin यान्चा open mindset असेल तर. अन्यथा या तक्रारी, सूचना, इत्यादी काही इथे नविन नाहीत. ajjuka तुझ्या पोस्ट(स) शी पूर्णपणे सहमत! well said... Admin , या वेळी स्पष्टच विचारतो : मॉड म्हणून (विशेष करून v&c वर) काम करायची इच्छा असेल तर काय निकष आहेत जरा detail मधे लिहाल का? इच्छा आणि वेळ या दोन बाबी सोडल्यास इतर कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत? पुढील नविन मॉड मन्डळ कधी स्थापन होणार आहे? अत्ताच अर्ज देवू का? टीप : उत्तराची अपेक्षा फ़क्त admin कडून...
|
Abedekar
| |
| Thursday, July 27, 2006 - 7:10 pm: |
| 
|
i think folks are making too much of it ... its a public forum, moderators removing posts is perfectly normal on every public forum. having to justify or give an explanation everyr single time seems quite ridiculous. several websites will automatically leave a "trace" of deleted posts. if hitguj does not leave an automatic trace, tough luck! if mods were to "alter" your posts, then i agree that it is cause for outrage. but this argument about accountability is a little far fetched IMO ... cut them some slack and move on. just my two cents.
|
Yog
| |
| Thursday, July 27, 2006 - 7:46 pm: |
| 
|
>>cut them some slack and move on.. With due respect to your "opinion" I guess thats what people were doing. Else you would see new BB every day for "every" such "moderation" in question. It could be argued as to how accountability could be acheived or practiced here BUT On public forum "accountability" can NOT be ridiculed! >>if hitguj does not leave an automatic trace, tough luck! Ironically this is what is causing the problem. To call it a tough luck (which none of us are in "position or authority" to do so, except Admin,) simply would show "reluctance" to recognize the real issue! IMO. nothing seems far fetched here. The user (in question) is asking for "means to show and implement the accountability, thats it!" c.b.d.g. how about this tough luck for all: जसे मायबोलीवर content disclaimer आहे तसेच मग अजून एक disclaimer टाकून या वादावर कायमचा पडदा टाकता येईल : हितगुज वा गुलमोहर ही free for all असल्याने त्यावरील कुठल्याही moderation सन्दर्भात (पोस्ट उडवणे, वाढवणे, बदलणे, किव्वा इतर) खुलासा करण्यास नेमस्तक बान्धील नाहीत. रन्गीबेरन्गी ही paid जागा असल्याने त्या पेज चे मालक तेथील moderation सन्दर्भात कुठल्याही स्वरुपाचे स्पष्टीकरण देण्या घेण्यास लायक आहेत. admin तसे करत नाहीत किव्वा त्यानी हा feedback to admin bb उघडला आहे यातूनच असे म्हणता येईल की at least he sees "beyond" just tough luck! मागेही एकदा yogibear या mod ने baseless विधाने करून वैयक्तीक चिखलफ़ेक केली होती तेव्हा admin ने त्याची गम्भीर दखल घेवून त्याची mod मन्डळावरून हकालपट्टी केली होती. तेव्हा मला खात्री आहे की biased moderation याबद्दल लोकानी वारंवार "पुराव्यासहीत" तक्रारी केल्या तर admin त्याची निश्चीतपणे गम्भीर दखल घेतील. 
|
Yogibear
| |
| Thursday, July 27, 2006 - 8:04 pm: |
| 
|
Yog: didnt want to increase this topic here but just for ur knowledge plz watch ur language rather than using "your" so called "to the point" language which is not much appreciated here by many (rather any) folks. Anyways, Admin you are "BOSS" here so I leave it upto you.
|
Yog
| |
| Thursday, July 27, 2006 - 8:23 pm: |
| 
|
Yogibear, I was only giving my personal experience (and for once I don't have to prove that) as to prove my point that Admin does respond to "Serious" issues afterall. How you perceive (I don't care how others so called folks you claim to speak for do perceive, as I am not in "popularity business") it is your lookout! If admin finds anything wrong in my post he will sure let me know or take proper action.
|
Yogibear
| |
| Thursday, July 27, 2006 - 8:30 pm: |
| 
|
>>> "Polularity Bussiness" Look who is talking! असो...
|
Admin
| |
| Friday, July 28, 2006 - 12:09 am: |
| 
|
1. Maayboli is ultimately a publication/media for communication. Just like a Company's Newsletter is (Maximum moderation to suit company's views/products, only internal contributors), A newspaper is (moderate moderation/editing, both internal and external contributors) and internet newsgroup (no moderation, all external contributors). Maayboli/Hitguj is somewhere between newspaper and newsgroup. 2. Publications are ultimately accountable to who pays the bill whether owner, subscribers or advertisers. Some of the contributors/authors are also subscribers and readers and publications do take their say into account but only upto a point. Even for internet newsgroups admins routinely ban newsgroups not wanted by the organizations paying the bills. NO editor is required to explain to each reader/author/contributor why such editing took place or keep a log of it. Publications do this for their own internal processes but not required to share it. 3. Readers have ultimate say about any publication completely independent of any above stakeholders. Those who like a particular publications stay with the publications others see elsewhere. 4. We hope as a publication, we will continue to keep the trust we have earned. If not, nobody will be here. All of us in admin team are humbly aware of this reality. We can not please each every visitor but we try our best to understand the needs of "maaybolikar" in general and try our best. 5. None of the policies are new and have worked for last 10 years. If some of you became aware of these now, does not mean they are new. If they are biased, they are biased for the ultimate good of maayboli in our humble opinion. I agree we are NOT always consistent and may look ad hoc. You are most welcome to disagree with our views. 6. I never had any problem finding who did what from moderators. Whether they made mistake/deleted purposefully, they always tell me when I ask. We trust each other. But that does not mean we publish everything. For simplicty let us assume I am the one doing all editing/deleting and have all responsibility that goes with it. 7. Admin team grows/changes like any other team in a company. We rely on each other to find the people who will fit in the group. Just like a company if we hire wrong people, we will create wrong culture and will go down. But still companies rely on references from existing team members as that is the best model around. If you don't like the moderator team, chances of getting on the team are slim as we want somebody who will work with us and not against us. We all are giving our free time for maayboli and it is natural we don't want to waste our energy on fighting among ourselves.
|
Gs1
| |
| Thursday, July 20, 2006 - 5:19 pm: |
| 
|
ऍडमिन, मी पुढे एक पोस्ट करत आहे. अयोग्य वाटल्यास उडवून टाकावे
|
Naatyaa
| |
| Thursday, July 20, 2006 - 5:35 pm: |
| 
|
मी जरी v&c त कधी भाग घेत नसलो तरी ईथे माझे मत नोंदवावे असे वाटले.. एखादा विषय एकदा चर्चिला आणी संपला असे कधी होत नाही. तसेच प्रत्येक विषयात घटनेत नविन घडामोडी घडतच असतात.. तसेच नविन users ची भर पडत रहाते.. त्यामुळे काही चर्चा परत घडणे स्वाभाविकच आहे... जर विषय भरकटत असेल तर त्या चर्चा बंद करणे BB उडवणे योग्य वाटते.. पण एखादा विषय इथे चर्चिला गेला असल्या कारणाने परत त्यावर चर्चा होउ न देणे अयोग्य वाटते.. PS: This comment is only about the issue of discussing the topics again not the maintenance piece of it.
|
Gs1
| |
| Thursday, July 20, 2006 - 5:37 pm: |
| 
|
माननीय ऍडमिन, मला वाद घालायचा नाही आहे, पण आपले म्हणणे वस्तुस्थितीला सोडुन आहे हे मात्र नमूद करणे आवश्यक समजतो. (१) आपण जो active नसण्याचा निकष सांगता आहात त्यानुसार ज्या V&C मधुन हे दोन बीबी उडवले गेले त्यामध्ये या दोन बीबींपेक्षा बराच अधिक काळापासून inactive असलेले बीबी होते. General - 38 bb Current - 9 bb Relationships - 17 bb Closed BBs- 13 bb एवढ्या मोठ्या संख्येने असलेले हे अतिशय जुने बीबी सोडुन नेमके हेच बीबी कसे निवडले गेले याचे मला आश्चर्य वाटते. (२) आपला दुसरा मुद्दा मला उद्देशून आहे असे दिसते. यात मी सात गोष्टी सांगू इच्छितो. (अ) कृपया मी सुरू केलेला एखादा बीबी दाखवावा की जिथे मी पुन्हा तोच तोच मी आधी हाताळलेला विषय चघळायला घेतला आहे, वा काहीच नवे contribute न करता तेच तेच उगाळले आहे. सर्वांप्रमाणेच माझ्यकडे वेळेची अत्यंत कमतरता आसते, त्यामुळे माझ्याकडुन असे झाले नसावे असे मला वाटते. (ब) इथे नव नवीन लोक येतात तेंव्हा असल्या 'हमखास' विषयाची नव्या उत्साहाने चर्चा करतात हे खरे आहे, कारण मायबोलिवर पूर्वी झाला असला तरी त्यांच्यासाथी तो विषय नवा असतो. अशा वेळेला जुना बीबी अस्तित्वात असेल तर 'अरे ही सर्व चर्चा झाली आहे' असेही कोणी ना कोणी तरी सांगतेच. (क) तसेच मुंबई बॉंबस्फोटासारख्या एखाद्या विषयावर चर्चा झाली असेल तर पुन्हा एका वर्शाने बॉंबस्फोट झाल्यावर पुन्हा चर्चा होणारच. असे असले तरी मी एकदा पूर्ण केलेया चर्चेवर पुन्हा कधीही बीबी उघडलेला नाही. (ड) प्रचाराचे माध्यम म्हणून वापर करावा एवढे काही मायबोली हे व्यापक वाचकवर्ग असलेले माध्यम नाही याची आपल्याला जाणीव असेल तर 'मायबोलीवर विषय जागते ठेवण्याचा प्रयत्न' वगैरे एकाच वेळेला अत्यंत गंभीर व हास्यास्पद आरोप आपण केले नसते. गंभीर अशासाठी की मी मायबोलीशी आणी मायबोलीकरांशी ऋणानुबंध जुळल्यामुळे इथे नियमित येणारा आणि ज्यात थोडिफार गती आहे त्या v&c , गुलमोहर, दुर्गभ्रमण अशा ठिकाणी जमेल तसे contribute करणारा एक मायबोलीकर आहे आणि आपला आरोप हा थेट वैयक्तिक integrity वर हल्ला आहे आणि हास्यास्पद अशासाठी की आपली मायबोलीच्या प्रभावक्षेत्राबद्दल काहीतरी अवास्तव कल्पना झालेली दिसते, की ज्यामुळे त्याचा वापर करून घेण्यासाठी स्वत्:चा वेळ खर्च करून पोस्ट लिहिल्या जात आहेत असे आपल्याला वातू लागले आहे. (ई) यावर कळस म्हणजे खरच केवळ या विशयांवर धुमाकुळ घालायला एकापाथोपाठ तीन आयडी घेउन येणार्या व्यक्तीबद्दल, त्याच्या गोंधळाबद्दल, अकारण वैयक्तिक चिखलफेकीबद्दल इथे तक्रार नोंदवूनही आपण साफ दुर्लक्ष केले आहे. म्हणजे कोण नियमितपणे मायबोली कुटुंबाचा भाग म्हणून येते आणि कोण मुद्दाम केवळ वातावरण बिघडवायला येते हेही तुम्हाला दिसत नाही असे मला पटत नाही. बॅलन्सड आहोत हे दाखवण्यासाठी एकाच विचारसरणिची मुस्कटदाबी केलीच पाहिजे हेही मला पटत नाही. (प्फ़) त्याचबरोबर मी नुकत्याच उघडलेल्या बीबीवर येउन 'आम्ही तुमच्या बरोबर आहोत अशासारखे किंवा लेखाबद्दल व्यक्तिगत शाबासकी देणारे संदेश टाळावेत' असा आदेश तुम्ही दिला आहे. असे संदेश आजपर्यंत अनेक बीबीवर दिले गेले आहेत. लेखाबद्दल व्यक्तिगत शाबासकी देणारे जवळ जवळ सगळीकडेच असतात. मग मुद्दाम माझ्यावरच एवढी अवकृपा होण्याचे कारण मला कळले नाही. (ग) असो. यातून तुमच्याकडुन काही अन्याय, चूक झाली आहे असा विचार तुम्ही कराल की नाही ते मला माहित नाहीऽर्थातच मी कितीही लोजिकली काहीही सिद्ध केले तरी मायबोली तुमच्या मालकीची आहे, तुम्हाला हवे तेच तुम्ही करणार, काय धोरण असावे ? जे असेल ते लॉजिकल व न्याय्य असावे का ? आहे का ? त्याला धरून कृती झाली का ? हे तुम्हाला सांगण्याची कोणी गरज नाही हेही माहित आहेच. तरीही माझी बाजू न्याय्य आहे असे वाटले म्हणून मांडली. बाकी सत्तेपुढे शाहाणपण चालत नाही हे समजले आहेच. तुम्ही मायबोलीच्या रुपाने एक उत्तम काम करत आहात यात शंका नाही, त्यात पाच मिनिटेही विघ्न आणायची माझी इच्छा नाही.तेंव्हा आता आमचा राम राम घ्यावा. आपल्या पुढील वाटचालीला शुभेच्छा आणि गेली चार वर्षे वेळोवेळी प्रोत्साहन, कौतुक, वाद अशा सर्व पद्ध्तीने ज्यांनी मला आपल्यात सामावून घेतले त्या मायबोलीकरांचे मनापासून आभार.
|
Admin
| |
| Thursday, July 20, 2006 - 7:43 pm: |
| 
|
मी सगळ्या संदेशाना उत्तर देतो आहे पण वेळ लागेल तेंव्हा "माझ्या मुद्याचे उत्तर का दिले नाही" असे म्हणण्यापूर्वी काही तास कळ काढावी ही नम्र विनंती. peshwa, These BBs were inactive for several months (probably years) and none were active for atleast 6 months. Some of them were closed because of personal messages or usual bickering. We had no intention of ever to open those. There were several deleted and I admit I don't have recollection of which one is which. I already made clear that there was no issue with the topic themselves otherwise we would not have kept for more last several months. They would have gone muc earlier. You have made good suggestion about the policy clarification. On one level we want to encourage (and we have always encouraged to the extent possible) as much liberal views as possible but at the same time maintain civility. Unfortunately what I have seen when certain subjects are discussed, sometimes people loose temper and that creates lot of workload on admin team. We can make it completely easy for admin team and say certain topics are off the topic. On the other hand maaybolikar have said now and again that they enjoy the liberal nature of maayboli. So we are trying to balance both things. We have only closed/removed those topic after people have talked on those sometime ago and nobody is talking about it now.
|
Admin
| |
| Thursday, July 20, 2006 - 7:53 pm: |
| 
|
naatyaa तुमचे म्हणणे बरोबर आहे नवीन घडामोडी होत असतातच. आणि त्याबद्दल काही काळाने लिहावे हे ही योग्य आहे. पण म्हणून अनिर्बंध काळ ते चालू ठेवावे का? जर त्या विषयाबद्दल घडामोडी असतील तर नवीन घडामोडीच्या अनुषंगाने नवीन BB उघडून लिहिता येईल.
|
Peshawa
| |
| Thursday, July 20, 2006 - 9:01 pm: |
| 
|
admin I am not questioning why you removed so and so BBs? I merely pointed out the contradiction between your two consecutive posts. I do feel that there is some uneasiness in the administration about the action that should be taken on the volatile issues. The balancing act leaves every one dissatisfied and thus creates an impression that the administration is biased. Maayboli I feel should not have ANY views (including liberal). It was neutral, it is neutral and it should be neutral and to maintain that I think administration should publicly announce its policy on such matters (the don'ts should be loud and clear. I don’t think it is wrong to make things easier for you and your team to manage.) Personal acrimony is not new to maayboli and ppl have witnessed lot of it over the years. But as a public domain site I think administration has to address "hate content" issues. and it has to give more structure to V & C s (especially political).
|
Admin
| |
| Thursday, July 20, 2006 - 9:09 pm: |
| 
|
> एवढ्या मोठ्या संख्येने असलेले हे अतिशय जुने बीबी सोडुन नेमके हेच बीबी कसे निवडले गेले याचे मला आश्चर्य वाटते. कुठलाही निकष लावला की आम्हाला हाच प्रश्न विचारला जातो असा गेल्या १० वर्षांचा अनुभव आहे. निकष असेल तर एवढाच (तुम्हाला कदाचित पटणार नाही) १ जे bb ६ महिन्यांपासून काहीही हालचाल नसणारे आहेत किंवा बंद आहेत. २. जे v&C मधे आहेत जेणेकरून कालबाह्य होण्याचा संबंध जास्त आहे. ३. ज्या bb वर जास्त प्रतिसाद आहे जेणे करून एकच bb उडवला तर जास्तीत जागा परत मिळवता येतील, मात्र शेवटचा प्रतिसाद हा ६ महिन्यांपेक्षा जुना आहे. ४. जिथे मराठी संस्कृती, साहित्य, मराठी माणसाला पडणारे नेहमीचे प्रश्न यासारखे काही नाही ५. इतर काही उपयुक्त माहीती नसून वेगवेगळी मते किंवा इतरत्र असलेली माहिती पुन्हा दिली आहे. >आपला दुसरा मुद्दा मला उद्देशून आहे असे दिसते. यात मी सात गोष्टी सांगू इच्छितो. दुसरा मुद्दा तुमच्या उत्तराला प्रतिसाद देणारा होता खरे पण त्याचबरोबर तुमच्याविषयी मर्यादित न ठेवता एक धोरण स्पष्ट करणारा होता. (अ)अगदी बरोबर हे तुमच्याकडुन झालेले नाही. जुन्या bb ला पुन्हा जिवंत करण्याबद्दल मी बोलत होतो. क्रमश:
|
पेशवा as you rightfully said, मायबोली should not have any views. And I can safely say that the Admin team does not have any views per se. We may at certain junctures express our views, in which case we do so with our personal id's not with our moderator id's. I think it's safe to say that we do not delete posts based on views, but more so based on the language and tone. We try to moderate the language not the content. I think when Admin said 'liberal' he was not talking about liberal in the political sense of the word but in terms of using मायबोली as a platform so when he said: >>one level we want to encourage (and we have always encouraged to the extent possible) as much liberal views as possible but at the same time maintain civility.> I am quite sure he meant, we keep a liberal attitude in allowing all hues and colors of opinions(pun intended) म्हणजे असं की तुम्हाला मुक्त पणे मायबोली वर तुमची मतं मांडता यावीत हाच आमचा प्रयत्न आहे, पण मुक्त पणे मतं मांडणे आणि मुक्त पणे दुसर्याच्या मतांचातत्वांचा समाचार घेणे ह्या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत, अणि त्यात संतुलन आम्हाला जिकिरीचे जाते. पण म्हणून आंही देखील posts उडवताना किंवा समज देताना सौम्य भाषेतच हे करतो, कारण मायबोली आपल्या सगळ्यान्ची आहे, आणि आपण एकमेकांना दुखावुन काहीही निश्पन्न होणार नाहीये. इतकी वर्ष मायबोली सर्व members च्या स्नेहावर टिकली आहे, ते स्नेह टिकवून ठेवणे देखील तितकेच महत्वाचे आहे. मुळात असभ्य भाषा चालु नं देण्याचं कारण स्नेह टिकवणे हाच नाही का? नाहीतर कोणीही काही बोललं तर काय फ़रक पडतो? कशासाठी एवढे झंझट करायचे? only to maintain an attitude of warmth and openness, so people may feel free to express themselves.
|
Admin
| |
| Thursday, July 20, 2006 - 10:09 pm: |
| 
|
ब. आणि क. : अगदी बरोबर. म्हणूनच खूप वेळ काहीही न लिहिले गेलेले bb बंद करणे योग्य. काही वेळेला पूर्वी ही चर्चा झाली आहे हे ऐकल्यावर काही जण गप्प बसतात तर काही दुप्पट उत्साहाने नवीन दृष्टीकोन देतात. काही जुने सामील होतात तर काही सोडून देतात. हे सगळे मधून मधून BB उडवले गेले तर शक्य होते. ड. मायबोली समाजाचा खूप छोटा भाग आहे हे मी कालपरवाच लिहिले आहे. त्यामुळे मायबोलीचे प्रभावक्षेत्र किती तुटपुंजे आहे हे मला माहिती आहे. यात तुमच्यावर वैयक्तीक हल्ला करण्याचा माझा हेतू नव्ह्ता आणि तसा झाल असेल तर मी तुमची माफी मागतो. ई. हा मुद्दा मान्य नाही. "तुम्हाला" हवे तितके लक्ष त्या व्यक्तीकडे दिले नसेल कदाचित. उलट मी तुमच्याकडे हवे तितके लक्ष देत नाही असे त्या व्यक्तिचे म्हणणे आहे. त्यांना जे सांगितले ते तुम्हालाही सांगतो. कृपया विषयाला धरून बोला व्यक्तीबद्दल नको. फ. असे संदेश या पूर्वी इतर ठिकाणी दिले गेले आहेत हे अगदी बरोबर आहे. पण अशा संदेशामुळे होणारे नुकसान कळल्यावर देखील ते केवळ पूर्वी असेच व्ह्यायचे म्हणून चालू ठेवणे मला योग्य वाटले नाही. मी फक्त ज्यामुळे शक्तीप्रदर्शन दिसेल यासारखे संदेश लिहू नका असे म्हटले आहे. ज्याला खरोखरच तुमचे लिखाण पटले आहे, ते त्याने का आवडले ते लिहिले तर त्याला कुठेही आक्षेप घेतला नाही. ग. तुम्हाला ते BB आता उडवले गेलेले दिसले. पण ते कित्येक आठवड्यांपूर्वी (कदाचित महिन्यांपूर्वी) उडवले आहेत. ते कधी उडवले , मीच उडवले की कुणी उडवले हे मला आठवत नाही. पण ते मी उडवले असे धरून बोलूया कारण जशी सत्ता येते तसेच त्याबरोबर जबाबदारीही येते. ते BB उडवल्यानंतर तुम्ही कित्येक BB उघडले आहेत आणि त्याला आम्ही कुठेही आक्षेप घेतला नाही (जो पर्यंत तिथे वैयक्तिक चिखलफेक होत नव्ह्ती तो पर्यंत.) आणि त्यातले काही आत्ता या क्षणीही चालू आहेत. पण एकदम ६ महिन्यानंतर तुम्हाला आठवण झाल्यावर तुम्हाला हवे ते दिसले नाही तर तुम्हाला अन्याय वाटतो आहे. तुमची रंगीबेरंगीवर स्वत:ची जागा आहे तिथे हे न लिहिता जे bb मधून मधून काढून टाकले जातात त्या ठिकाणी लिहिण्याचा निर्णय तुमचा आहे.(आणि आमचे त्यावर काहिच म्हणणे नाही) म्हणजे हे BB कधीतरी काढून टाकले जातील हे माहिती असूनही (हितगुज सुरु झाल्यापासून मधून मधून साफसफाई चालूच असते किंवा करावीच लागते) तुम्ही तिथे लिहिलेत आणि ते उडवले गेले तर त्यात अन्याय कसा झाला हे मला तरी समजले नाही.
|
Admin
| |
| Thursday, July 20, 2006 - 10:26 pm: |
| 
|
moderator 9, thanks. That is what I meant.
|
Laalbhai
| |
| Friday, July 21, 2006 - 2:37 am: |
| 
|
मुक्त पणे मतं मांडणे आणि मुक्त पणे दुसर्याच्या मतांचातत्वांचा समाचार घेणे ह्या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत, >>>> इथे "काड्या" टाकायच्या नाहीयेत. पण वरील सर्व वादात कुठे ना कुठे मी येतो, त्यामुळे बोलण्याचे स्वातंत्र्य घेतो. अयोग्य वाटल्या, moderators अजुन थोडे कष्ट घेतीलच! moderator_9 यांनी मांडलेला वरील मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण जी विचारसरणी follow करतो तिच्याबद्दल आपण नकळत खुपच "हळवे" होत असतो. आणि राष्ट्रप्रेमाचा, लोकसेवेचा "तोच एक मार्ग" आहे, अशी काहीशी समजुत होऊन बसते. यातून विरोधी मत व्यक्त करणार्याची तिडिक येते. त्यातून कटू वादविवाद होतात आणि वाढत जातात. हा आपला "हळवेपणा" चर्चा करताना बाजुला ठेवला आणि आपले आहे, त्यापेक्षा वेगळे मत असण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, हे प्रत्येकाने (मी धरून!) समजावून घेतले तर वादविवाद या पातळीला पोचणारच नाहीत. मला administrator आणि moderator यांच्याबद्दल आदर आणि प्रेमच आहे. (जरी त्यांनी reservation BB बंद केला तरी! तिथे अजुन काही चर्चा होऊ शकली असती. असो.). त्यांचे कार्य जास्तीत जास्त विघ्नरहित व्हावे ही शुभेच्छा!
|
Gs1
| |
| Tuesday, July 25, 2006 - 10:03 am: |
| 
|
ऍडमिन, आपल्या सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद. पण सलग चार दिवस नेटवरच नसल्याने प्रतिसाद देण्यास उशीर. मला हा वाद लांबवायचा नाही. पण जे मुद्दे अजिबातच पटले नाहीत त्याबद्दल लिहितो. यावर आपण जे काही उत्तर द्याल त्यावर मी अजून प्रतिवाद न करता हा विषय संपवू. २. अ, ब, क, ड : ठीक आहे. विषय संपला. २. ई. पटले नाही, पण मला पुढे वादही घालायचा नाही. १. व २. ग : अन्याय : मी १ मध्ये जी आकडेवारी दिली आहे ती आपण दिलेल्या सर्व ४ - ५ निकषांमध्ये बसणार्या आणि मी उल्लेख केलेल्या बीबींपेक्षा जास्त जुन्या व जास्त काळ inactive अशाच V&C मधल्याच बीबींची आकडेवारी आहे. ते सर्व ठेवून नेमके माझेच उडवले गेले त्यामुळेच अन्याय झाल्याची भावना आहे. अर्थात आता तुम्ही स्पष्टीकरण दिल्यानंतरही हे तुम्ही मुद्दाम केले असे मला अजिबात म्हणायचे नाही. तेंव्हा ते नजरचुकीने झाले असावे असे गृहित धरून हा विषय बंद करू. रंगीबेरंगी : हो इथे लिहिता येईल. पण इथेही इतर सर्व बीबींप्रमाणेच लेखकाला थ्रेड्स उघडायची सोय दिल्यास लिहिता येईल व सुविधेचा खराखरा लाभ घेता येईल. अन्यथा एकाच सलग थ्रेडवर वेगवेगळे विषय हाताळणे फारच जिकिरीचे होते. प्रत्येकाला किती थ्रेड्स यावर काही लिमिट ठेवता येईल. २. फ. 'आम्ही तुमच्या बरोबर आहोत अशासारखे किंवा लेखाबद्दल व्यक्तिगत शाबासकी देणारे संदेश टाळावेत' हे तुमचे माझ्या बीबीवरचे वाक्य आहे. एखाद्याला दुसरे काही लिहायचे नसेल पण वाचून 'मला तुमचे म्हणणे पटले' वा 'छान लिहिले आहे' अशी प्रतिक्रिया द्यायची असेल तर त्याला बंदी का ? आणि मुख्य म्हणजे खरेच 'लेखाबद्दल व्यक्तिगत शाबासकी देणारे संदेश टाळावेत' असे मायबोलीचे धोरण सर्वांसाठी सर्वच बीबीवर असणार आहे का ? त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार आहे का ? नसेल असे मला वाटते. आणि मग नसेल तर माझ्याही लेखनाबद्दल अशी भुमिका घेतली आहे ती मागे घेण्यात यावी एवढेच म्हणणे आहे.
|
Admin
| |
| Thursday, July 27, 2006 - 5:08 pm: |
| 
|
GS1
quote: २. फ. 'आम्ही तुमच्या बरोबर आहोत अशासारखे किंवा लेखाबद्दल व्यक्तिगत शाबासकी देणारे संदेश टाळावेत' हे तुमचे माझ्या बीबीवरचे वाक्य आहे. एखाद्याला दुसरे काही लिहायचे नसेल पण वाचून 'मला तुमचे म्हणणे पटले' वा 'छान लिहिले आहे' अशी प्रतिक्रिया द्यायची असेल तर त्याला बंदी का ? आणि मुख्य म्हणजे खरेच 'लेखाबद्दल व्यक्तिगत शाबासकी देणारे संदेश टाळावेत' असे मायबोलीचे धोरण सर्वांसाठी सर्वच बीबीवर असणार आहे का ? त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार आहे का ? नसेल असे मला वाटते. आणि मग नसेल तर माझ्याही लेखनाबद्दल अशी भुमिका घेतली आहे ती मागे घेण्यात यावी एवढेच म्हणणे आहे.
मला वाटते मी माझे म्हणणे पुरेसे स्पष्ट करू शकलो नाही. "मला तुमचे म्हणणे पटले" किंवा "छान लिहिले आहे" या प्रतिक्रियेला कुठलाही आक्षेप नाही. ते का छान वाटले हे लिहिलेच पाहीजे असे नाही. (पण लिहिले तर मूळ लेखकाला नेहमीच एक चांगला प्रतिसाद मिळतो इतकेच.) पण ज्यातून "चांगले झापलेस त्याला / तिला" , "तू आपली आघाडी संभाळ, आम्ही तुझ्या बाजूने आहोत" असे ध्वनीत होणार्या विधानानी, आपण हितगुजवर एक गट विरुद्ध दुसरा गट, अशा प्रकारच्या वादात त्याचे रुपांतर करत असतो त्याला माझा आक्षेप आहे. इथे प्रत्येक जण स्वत्:चे मत सहज मांडू शकत असताना सामूहिक रित्या मुद्दाम संख्याबळ दाखवायची गरज आहे असे मला वाटत नाही.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|