Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 07, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through August 07, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Monday, August 07, 2006 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकी, रॉबिन, तुमच बरोबर हे! रॉबिन, छान लिन्क दिलिस, तुला थॅन्क्यू!
मुडी, मला ते सन्दर्भ माहीत नाहीत असे नाही! :-)
लालभाई, विचार "घण" की काय ते जावुदे, काडी कशी होती?
आणि तरीही, जर इन्ग्रजीमधे India हे नाव घेतले जाते कारण ते त्या नावाने आम्हाला ओळखतात, तर हिन्दुस्थान हे नाव का नको कारण तमाम जग त्याच नावाने ओळखते, व हिन्दु बहुसन्ख्य असलेल्या देशाला हिन्दुस्तान म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?
भारत या शब्दाला हरकत नसुन, हिन्दुस्थान हा शब्द न वापरण्यामागच्या भुमिकेला विरोध हे! :-)
कामथ यान्नी " India that is bhaarat " या वाक्यरचनेला केलेला विरोध सार्थच हे!


Samuvai
Monday, August 07, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,
लिंबू ने वरती लिहिलच आहे सगळ. पण तरीही:
१. मनमोहन्सिंग आणि अहलुवालिया का नाही म्हणे हिंदू म्हणवणार? शीख हिंदूच आहेत.
२. अब्दुल कलामांसारखे ज्वलंत राष्ट्रप्रेमी "आमच्या" हिंदुत्वाच्या व्याख्येत अगदी " FIT "बसातात. त्यांनी अनेक व्याख्यांनांमधून त्यांची "पित्रु आणि पुण्यभू" ही हीच आहे हे जाहीर मांडल आहे. किंबहुना त्यांच्या भाषणात गीतेचेच दाखले ईतर कशाहीपेक्शा अनेक असतात.
त्यातून उद्या जर समस्त सेक्युलरांनी पूर्वाश्रमीचा बांगलादेशी घुसखोर जरी आमच्या उरावर पंतप्रधान म्हणून बसवला तरी काय करणार?लोकांच प्रबोधन करुन मतपेटीद्वारे त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करणार. आम्ही साम्यवाद्यांच्या level ला येवून नक्षलवादी तर बनू शकत नाही, विरोधी मताच्या लोकांच्या अंगावर रणगाडे तर घालू शकत नाह नाही का.
बाकी तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे देणे सोयीस्कररित्या टळले आहे:
१. चीन युद्धात साम्यवाद्यांनी लष्कराच्या गाड्या बंगाल सीमेवर अडवल्या होत्या खर आहे काय?
२. महाराष्ट्र सरकारने गठड्या बांधून हाकलायला काढलेले बांअगलादेशी कलकत्त्यात साम्यवादी सरकारच्या आशीर्वादाने उतरवण्यात आले ख्र आहे काय?
३. साम्यवाद्यांच्या आशीर्वादाने घुसखोरांना ब.गालमध्ये रेशनकार्ड मिळतात खर आहे काय?
४. वरील प्रश्नांची उत्तरे "होय" असतील तर साम्यवादी देशद्रोही आहेत नाही का?
आणि तुमच जर तर पुराण सुरु होण्या आधीच सांगतो अशा देशद्रोह्यांना ह्या देशातून हाकलून देण्याचा यथाशक्ती प्रयत्न प्रत्येक राष्ट्रवाद्याने करायलाच हवा.

आणि लिंबू,
मी मुद्दमच "भारतातले" हिंदू लिहील. नाहीतर "हिंदुस्थान" ह्या नावावर काथ्याकूट झाला असता.




Laalbhai
Monday, August 07, 2006 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL samuvai

तुमच्याकडे ठीकसे उत्तर नाही, असे सांगा ना. :-)

तुमच्या व्याख्येत कोण कसे बसते हा माझा प्रश्न नव्हता. कुणी स्वतःला "हिंदू" म्हणवणे नाकारले, तर तुमची भुमिका काय असेल, असे विचारले होते. जाउ द्या. :-)

तुमची साम्यवादाबद्दलचे प्रश्न आणि उत्तरे इथे चालू द्या. हा BB त्यासाठीच आहे.
खास तुमच्यासारख्यांसाठी!

"हिंदुस्थान" ह्या नावावर काथ्याकूट झाला असता.

म्हणजे वरती एकदोघांनी दाखले देऊन "भारत" हेच नाव कसे संस्कृती जपते, हे सांगितले तरी तुम्हाला मान्य नाही तर!

बाकी लिंबूमहाराजांनी काय लिहिलेय हे तुम्हाला कळले तर मलाही सांगा.


Laalbhai
Monday, August 07, 2006 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विरोधी मताच्या लोकांच्या अंगावर रणगाडे तर घालू शकत नाह नाही का.

>>>

पण मायबोलीवरच्या "विरोधी मतांचे" तुम्ही काय करता याचे पुरावे जागोजागी विखुरलेले आहेत हो.

Samuvai
Monday, August 07, 2006 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,
माझे उत्तर जर समजले नसेल तर एका ओळित्:
आम्ही अशा माणसाला मतपेटीद्वारे खाली खेचण्याचा आणि त्याजागी देव, देश आणि धर्म ह्यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावणार्या सुयोग्य व्यक्तीच्या निवडीचा प्रयत्न करु.
"भारता"विषयी चे post तुम्हाला नीट कळले नाही. उलट मी भारतीय म्हणजेच हिंदू ह्यावर जोर दिला होता. प्रश्नच नाही भारत हेच नाव हिंदूआर्यवैदिक संस्क्रुती जपते.

भले शाब्बास उत्तर द्यायची वेळ आली की link द्यायची हे तंत्र आवडल हव तर आपणच दिलेल्या link वर जाऊन तिथे उत्तर द्या. अहो ३ प्रश्नातच संपलात? अजून अनेक आहेत उदा. मुंबईत संप करुन कामगारांचे तीन तेरा कोणी वाजवले, आर्थिक प्रगतीच्या आड येत आपणच पाठिंबा दिलेल्या सरकारला अडचणीत कोण आणतय वगैरे. पण वरील ३ प्रश्न ताज्या बाॅबस्फोटाच्या "बातमी" शी संलग्न आहेत म्हणुन आपले उत्तर ईथे अपेक्षित आहे.


Laalbhai
Monday, August 07, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही अशा माणसाला मतपेटीद्वारे खाली खेचण्याचा

अरे? खाली खेचण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी सत्ताधार्‍यांची उदाहरणे दिली केवळ. मला फक्त सत्ताधार्यांविषयीच म्हणायचे नव्हते. फक्त राजकीय नेतेच नाही तर सामान्य, कलाकार, समाजसेवक यांनीही तुमचे म्हणणे नाकारले तर तुम्ही काय करणार? गेल्या ६० वर्षात तर एकालाही तुम्ही खाली खेचू शकला नाहीत. एकदा तुम्हीच सत्तेवर आलात तेंव्हाही तुमच्या तत्वांसाठी काही केल्याचे माझ्या पहाण्यात नाही.

मग तुमची इथली बडबड ही पोकळ आहे का? तुमच्या विचारसरणीचा प्रभाव अतिशय अल्प आहे, ही माहिती असूनही तुम्ही वल्गना करत आहात का? की भविष्यात, दोन - पाचशे वर्षांनी तुमचे म्हणणे सत्यात उतरेल या आशेवर तुम्ही आत्ता बोलत आहात?


भारतीय म्हणजेच हिंदू

माझा प्रश्नही तुम्हाला नीट कळला नाही राव. मी नेमके याच्या उलटे म्हणू शकतो. सगळे हिंदू अल्बत् भारतीय असू शकतात. पण सगळ्या भारतीयांना हिंदू धर्माचे लेबल चिकटवणे, हा धार्मिक कट्टरतेचाच एक भाग आहे!

Laalbhai
Monday, August 07, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मी इथे तुमच्या साम्यवादाविषयीच्या प्रश्नांना उत्तरे का देत नाही, याचे स्पष्टीकरण.

१. मी साम्यवादी आहे, हे जाहीर केल्यापासून कधीही मी भारतीय साम्यवादी राज्यकर्त्यांचे समर्थन केले नाही. पण बारकाईने पाहिले तर पश्चिम बंगालात त्यांनी निश्चित एक वेगळ्या प्रकारची ( चांगली म्हणावे की नाही, हा वेगळा विषय)सत्ता दिली, जी भ्रष्टाचारापासून बरीचशी मुक्त आहे.

तरीही मी साम्यवादी धरून कोणत्याच राजकीय पक्षाचे समर्थन करणे टाळतो.

२. साम्यवाद्यांविषयी तुमचे ३ नाही तीन हज्जार आक्षेप असू द्या, मला फरक पडत नाही. फक्त एक लक्षात घ्या तुम्ही जे आक्षेप कम्युनिस्ट पक्षावर घेताय, तेच आक्षेप जसे च्या तसे, हिंदूत्त्ववादी आणि राष्ट्रवादी म्हणवणार्‍या पक्षावरही लागू होतात.

३. पण मी त्या पक्षांची उदाहरणे देत बसत नाही. कारण स्वतःची राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी मला इतर लोकांना शिव्या देत बसण्याची बिलकुल गरज वाटत नाही. तो तुमचा प्रांत आहे. दोन तीन दिवसांपूर्वी म्हटले तसे तुमच्या पक्षाला / संघटनेला आपण फार मोठे राष्ट्रभक्त असल्याचा गंड निर्माण झालेला आहे. पण ते सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काहीही नाही. त्यामुळे अमुक एक राष्ट्रद्रोही, तमुक एक फुटीर अशा आरोळ्या मारत सुटायची तुम्हाला सवय लागली आहे. तुम्हाला असे वाटते की अशी बोंब मारल्याने आपली राष्ट्रभक्ती सिद्ध होईल.

तर असो, तुम्हाला तसे वाटत असेल तर असो. तुम्हाला कम्युनिझम आणि कम्युनिस्टांना शिव्या देऊन मनःशांती मिळत असेल तर माझा काही आक्षेप नाही.

पण तुमच्या प्रश्नांना उत्तरे देऊन माझा वेळ वाया न घालवण्याचे स्वातंत्र्य मला आहे. आणि मे ती घेणार!


Samuvai
Monday, August 07, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,
तुम्ही मला भा. ज. पा. चा प्रवक्ता बनवला आहे बहुतेक. भा. ज. पा. सरकारने "आम्हाला" अपेक्षित "काहीही" केल नाही हे त्रिवार मान्य. पण म्हणूनच ते पुढच्या वेळेस आपटले गाढवही गेल आणि असो;
अत्यल्प प्रभाव? तुमच्या माहीतीसाठी सांगतो ह्या देशातील सर्व क्षेत्रात (हो अगदी कामगार चळवळीत सुद्धा) हिंदुत्ववादी संघटना क्र. १ वा २ च्या आहेत. असो;
तुम्ही उत्तर द्या



Laalbhai
Monday, August 07, 2006 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या माहीतीसाठी सांगतो ह्या देशातील सर्व क्षेत्रात (हो अगदी कामगार चळवळीत सुद्धा) हिंदुत्ववादी संघटना क्र. १ वा २ च्या आहेत.

अरे? म्हणजे सगळ्या नाड्या तुमच्याच हातात आहेत की. मग असे असूनही मनासारखे होत नाही म्हणून का बोंब मारता? की सत्ता असूनही मनासारखे घडवून आणता येत नाही तुम्हाला?

Laalbhai
Monday, August 07, 2006 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही मला भा. ज. पा. चा प्रवक्ता बनवला आहे बहुतेक.

नाही, RSS त्याची विचारसरणी BJP द्वारे देशावर लादू पहात आहे, हे उघड सत्य आहे. यात लपवा छपवी करण्याचे काहीही कारण नाही.

RSS आणि BJP मधल्या बेबनावाचे कारण हेच की BJP ने सर्वांना सामावून घेता येईल अशी भुमिका घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून RSS च्या कट्टरतावादाचा डोस कमी झाला. म्हणून भांडणे!

मी RSS चा आहे पण BJP चा नाही, हा आणखी एक भोंदूपणा!


Samuvai
Monday, August 07, 2006 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हीच सगळ सांगताय की. बरोबर सत्ता असूनही नाही घडवून आणता येत आहे मनासारख. नाहीतर हे बाॅबस्फोट झाले नसते. भिवंडीत २ निरपराध पोलिस ठेचून मारले गेले नसते. अजूनही quantitive प्रयत्न लक्षणीय असले तरी कदाचित quality (त्याला कटारतावाद म्हणा वा राष्ट्रवाद) कमी पडत्ये.

Samuvai
Monday, August 07, 2006 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हे अपेक्षित होत. उत्तर येणार नाहीत कारण लालभाईंना फक्त प्रश्न "निर्माण" करता येतात ते सोडवण्यात त्यांना रस नसतो ही proven fact आहे. :-)

Laalbhai
Monday, August 07, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हे अपेक्षित होत.

चला कुठेतरी तुम्हाला अपेक्षित असलेलं होतंय ना.. आनंद आहे.

Kedarjoshi
Monday, August 07, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा प्रश्न असा आहे की भारत या देशात राहणार्‍या सर्व लोकांना आपण हिंदू म्हणू शकतो का? आणि एखाद्याने तसे म्हणवून घेणे नाकारले तर तर "भारत देशात रहाणारा हिंदू" असे जे म्हणतात, त्यांची भुमिका (इथे कदाचित तुमची आणि समुवै यांची) काय असेल?


मी काही उदा. देतो.

हे हिंदु शक्ती संभुत दिप्तीतम तेजा असे ज्याला म्हनले गेले तो शिवाजी राजा. त्याचा सैन्यात मुसलमान सरदार होते उदा. दोलताखाण दर्यांसारग, त्याला ही मोगल सरदार मराठा समजायचे. ( कारण येथे जात नाही तर तो कोणासाठी लढतोय ते महत्वाचे).

पहिला बाजीराव ते १८१७ ह्या काळात जातीने ब्राम्हण लोक राज्य करायचे पण ईतीहासकार त्याला मराठा ऐम्पायर समजायचे.
मी असे अनेक उदा. देउ शकतो. खुद्द त्या काळचा भारताचा राजा बहादुरशहाजफर म्हणतो की हिंदुस्थां की सरजमी परसे अग्रेंजोका राज्य हटादो.

वरिल सर्व उदा मराठा असने किंवा हिदुंस्थान म्हणने म्हनजे प्रत्येक जन घर्माने हिंदु नसतो. हे त्या जमिनी ला म्हनले गेले आहे.

कोणी जर नाकारले तर नाकारो. अहो खुद्द संभाजी महाराजाना पक्डुन देन्यात गणोजी नाईक ( त्यांचे बहीनोई) यांचा हात होता त्यांना कोणी काही केले का? ( हे उदा. यासाठी तो जातीने मराठा, घर्माने हिंदु असुन सुध्दा त्याने हे कार्य केले).
माझी वयक्तीक भुमीक
१५c०
अ काय असेल हे महत्वाचे नाही. माझ्या मते भारतात राहानार भारतीय. पण तो जर पाकघार्जीने काम करत असेल तर तो देशद्रोहीच.

वरिल प्रश्न atleast तुमच्या कडुन अपेक्षित न्हवता.


Laalbhai
Monday, August 07, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, तुम्ही म्हणता ते इतिहासातले दाखले नक्कीच सत्य आहेत.

पण पुन्हा एकदा इतिहास आणि वर्तमान यांची तुलना आपल्याला करता येईल का, अशी शंका मला वाटते.

एखाद्याने स्वतःला हिंदू म्हणवून न घेता, भारतीय म्हणवले, तर त्याचा आपण आनंदाने स्वीकार करायला हवा असे वाटते. नाईलाजाने नव्हे. नव्हे तर स्वतःला हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन म्हणवण्याआधी, "भारतीय" म्हणवून घेणे, हे घटनेनुसार आपले कर्तव्य आहे, असे वाटते.

आणि शेवटी जिथे राष्ट्रद्रोहाचा प्रश्न येतो तिथे सगळ्या देशद्रोह्यांना, भ्रष्टाचार्‍यांना, दंगली माजवणार्‍यांना गोळ्या घालून विनाचौकशी ठार केले पाहिजे. (ही घटनेत तरतूद नाही, पण तरीही...)

माझ्याकडून हा प्रश्न का अपेक्षित नव्हता कळले नाही?


Kedarjoshi
Monday, August 07, 2006 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,

आपली चर्चा अनेकदा झाली आहे. यात ज्या सोबत आपण चर्चा करतो त्याचा विचांराची जाणीव चर्चेतुन होते. ( यालाच प्रतिपक्षाला जोखणे म्हनुया). तर या अनेक चर्चेत आपल्याला माझे विचार लिहिले त्यात कुठेही मी धर्मा समोर देश आणा असे लिहीले नाही.

भारतीय" म्हणवून घेणे, हे घटनेनुसार आपले कर्तव्य आहे, असे वाटते---

अहो मुळातच आपण भारतीय आहो व राहानार ह्या बद्दल माझे कधीच दुमत नाही किंवा कधीही मी तसे लिहीले नाही.

हिदुंराष्ट्र या शब्दाचा लोक शाब्दीक अर्थ का काढतात हे खरच मला अजुन कळाले नाही.

कर्तव्य हा शब्द मोठा गमतीशीर आहे. मी चुकुन हिंदु भारतीय आहे म्हनुन भारत भारत करनार, स्वत:ला हिंदु म्हनुन घेतले की उजवा ठरनार.
पण मी जर मुसलमान भारतीय असेल खास करुन मालेगाव, बेहराम्पाडा येथे राहानार तर भारतीय ह्या शब्दाबरोबर माझे कर्तव्य बदलले असते जसे की दंगली करणे, शस्त्रे जमा करणे, पाकची मदत घेने ई.
आता ह्यात मी सगळ्या मुस्लीमांना काउंट नाही करत आहे. बघा म्हनजे कर्तव्याची व्याखा बदलली की नाही.
आता लगेच लोक म्हनतील की हिंदु दहशतवादी नाहीत का? एक तरी दाखला द्या. लोक जर तुम्हाला मारत असतील व रिटैलीयेशन म्हनुन शस्त्र हाती घेतले तर लगेच आम्ही हिंदु दहशतवादी.
नान्याची दुसरी बाजु का कोणी समजुन घेत नाही. आपल्या देशात ही फैशनच झाली की उजवी विचारसरणी म्हणजे संघ नी भाजपा.
पेपर मधे एक त्यांचा विरुध्द लेख लिहीला की झाले. he will get a birth in other political parties .


Laalbhai
Monday, August 07, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यात कुठेही मी धर्मा समोर देश आणा असे लिहीले नाही.

बरोबर आहे, हे नक्कीच मान्य आहे. केदार जोशी, तुम्ही असे कधीच म्हणालेला नाही आहात.

मी जी कर्तव्ये म्हणतोय ती फक्त "हिंदू" जमातीलाच नाही तर अखिल भारतीय समाजाला लागू आहेत. तो कोणत्याही जाती धर्मचा असो.

जाती धर्मानुसार किमान माझी तरी राष्ट्रनिष्ठेची व्याख्या बदलत नाही.

जो मनुष्य देशाला दुबळे करण्याचे दुष्कृत्य करतो, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तो हलकटच. मग यात मुसलमान असला तरी तो हलकट आणि आणखी कुणी असला तरी तो हलकट. या सगळ्यांना कठोर शासन केलेच पाहिजे.


Moodi
Monday, August 07, 2006 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई प्रत्येक वेळा कट्टरता म्हणून संघावर अन भाजपावर आरोप होतो. आरक्षणाला विरोध केला म्हणून आम्ही लोक जातियवादी ठरतो. पण संघाची आतापर्यंतची मानवतावादी भूमिका का नजरे आड केली जाते? पूर, भुकंप अन अशा कित्येक अडचणीत संघाची माणसे जात, धर्म न पहाता मदतीला धावुन आलीत हे का विसरले जाते? की संघावर ब्राम्हणवादाचे लेबल चिकटवले की झाले? द्वेष मग नक्की कोण कुणाचा करतय?

आतापर्यंतची राजकीय पक्षांची भाषणे बघीतली अन वाचली की केवळ फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असेच वारंवार उच्चारले जाते. का? महाराष्ट्र केवळ या दोघांपुरताच मर्यादीत आहे? समाजसुधारक म्हणून स्वा. सावरकर, गो कृ गोखले, आगरकर यांची नावे का तुमचे नेते घेत नाहीत? स्वातंत्र काय फक्त गांधी घराण्याने अन म. गांधीनी मिळवुन दिले? चाफेकर, राजगुरु, कान्हेरे हे कुठे आहेत?

सुभाषचंद्र बोसांना इतकी वर्ष का वाळीत टाकले होते तुमच्या साम्यवाद्यांनी? जसे हिटलरचे नाव उच्चारायला बंदी आहे काही ठिकाणी तसे सुभाषबाबुंचे. आमच्या सावरकरांची पराक्रमे वचने पुसायची हिंमत केली त्या मणी शंकर अय्यरने. कुणी विरोध केला त्याला शिवसेनेशिवाय? का स्वातंत्र्यवीरांचे बलीदान कवडीमोलाचे समजतात तुमचे नेते? साधे जात्यावर बसुन दळुन दाखवा म्हणावे, कोल्हू फिरवायचे काय बळ असणार या टिनपाटांमध्ये?

मागे प्रसिद्ध साहित्यीक प्रा. यु.म. पठाण म्हणाले होते की आपल्या संतांना जातियवादात अडकवु नका. चोखोबा, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, सावता यांना जातीची लेबले चिकटवु नका. जिथे विठोबाने भेद नाही केला तिथे तुम्ही का त्यांना विशीष्ट समाजाचे म्हणून त्यांचे गुणगान करता? चोखोबा पण आपले अन ज्ञानेश्वर पण आपलेच.

लालभाई तुम्ही शिकलेले अन चौफेर वाचन असलेले आहात म्हणून सावकरांचे थोडे तरी ऋण मान्य करु शकलात, पण तुमच्या नेत्यांचे काय? ते कधी मान्य करणार आमच्या नेत्यांना? असे म्हणू नका की अय्यर कॉंग्रेसचा आहे, आम्ही नाही त्याला जबाबदार. पण तुमच्या नेत्यांनी का नाही त्यावेळी विरोध केला या माणसाला?

तुम्ही म्हणता की बंगाल सरकारने सिमीवर बंदी घातली, स्वागत आहे त्याचे पण मग दीड कोटीच्या वर बांगलादेशी का येऊ दिले सीमेपलीकडुन? समुद्रामार्गे आले असतीलही, पण बांगला सीमेवरचा अहवाल मी वाचलाय, दुर्दैवाने लिंक नाही माझ्याकडे. मिळाली की जरुर देईन.

मी हे मान्य करते की भाजपा, कॉंगेस अन साम्यवादी सगळे एकाच माळेचे मणी कारण पक्ष बदलले तरी मानवी प्रवृत्ती अन सत्तेची हाव थोडीच बदलणार? पण युती सरकारने थोडा तरी प्रयत्न केला होता, अन विलासराव देशमुखांनी सुद्धा, पण सोनिया आडवी आली.

सगळे पक्ष एकमेकांना पायात पाय घालुन पाडतायत असे वाटायला लागलेय.

चला बाकी उद्या.


Laalbhai
Tuesday, August 08, 2006 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण तुमच्या नेत्यांचे काय?

कोणताही राजकीय माणूस माझा नेता नाही. :-) आणि हे मी अनेकवेळा सांगितले आहे.

चांगला कामात लोकं मतांच्या लोभानी आडवे येतात, ही गोष्ट अतिशय सत्य आहे. पण लोकं काम करू देत नाही ही ओरड कितीवेळ करणार? राजकीय इच्छाशक्ती कुठे असते?

मला सांगा.. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या बॉसचे आणि तुमचे सगळी मते जुळतात का? एखाद्या च्यांगल्या गोष्टीला विरोध झाला तर अशावेळेस बॉस नको म्हणतो म्हणून तुम्ही ती सोडून देता का?

दुसरे असे की, तुमच्या घरात काही मतभेद झाले. तुम्हाला एखादी गोष्ट पटते पण घरच्यांना पटत नाही. तुम्ही ती गोष्ट करणे थांबवता का? तुमचा तुमच्या निरिक्षणांवर, विचारांवर विश्वास असेल तर तुम्ही थांबत नाही.

राजकारणाचे आणि समाजकारणाचेही तसेच असते. कित्येक समाजसेवकांनी किती प्रचंड विरोध सहन केलाय तुम्हाला कल्पना असेलच. जे प्रसिद्ध नाहीत ते राहू द्या, पण फुल्यांचे उदाहरण तर समोर आहे! सावरकरांचेच घ्या. स्वातंत्र्यानंतरही त्यांची उपेक्षा थांबली नाही. तरी त्यांनी त्यांच्या भुमिकेत काही बदल केला का? खुद्द तुमच्या हेडगेवारांचेच घ्या की. RSS ची कल्पना रुजवणे, वाढवणे सोपे होते का? किती विरोध झाला असेल?

प्रश्न विरोधाचा नाहीये. राजकीय इच्छा शक्तीचा आहे. त्याचा अभाव आहे, त्यामुळे काहीतरी क्षुल्लक करणे देत बसण्याची राजकारण्यांना सवय आहे. देशासाठी जे भले आहे, असे तुम्हाला वाटते, ते जातीयवादाचा शिक्का बसला तरी केले पाहिजे. (त्यासाठी महाराष्ट्रात ५ आणि देशात ५, अशी १० वर्षे सत्ता तुमच्याकडे होती.) तुम्ही ते केलेत की आणि त्याचा चांगला परिणाम दिसला की तुमच्यावर टिका करणार्‍यांचे मत बदलेल.

पण अशी कोणतीहे एच्छा कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. त्यांना पाठिंबा देणार्‍या संघटनेकडे नाही. गोची तिथे आहे! विरोध पावलो पावली होणार. तो सोसून तुमच्या विचारांवर ठाम रहाण्याची तुमच्यात किती ताकद आहे, यावर तुमचे यश अवलंबून असते. असो!


Laalbhai
Tuesday, August 08, 2006 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://loksatta.com/daily/20060808/edt.htm

चांगल्या कामात काड्या घालण्याचे काम सर्व स्तरावर चालू असते. आता असेल अग्रलेख वाचून सुनिता नारायणने निराश होऊन त्यांचे काम थांबवले, तर या विषयावर काही बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना उरणार नाही! (सगळ्याच भेसळ प्रकरणाचे गांभ्हिर्य समजले पाहिजे. पण किमान एक तरी प्रकरण निस्तरते आहे ना?)

तुम्हाला जर तुमचे विचार योग्य वाटत असतील, तर तुम्ही त्याप्रमाणेच वागले पाहिजे. (किंवा त्याप्रमाणे वागलेच पाहिजे.) "मला असे वाटते पण मला तसे कुणीच करू देत नाही" ही रडगाणी दुबळ्यांची आहेत किंवा स्वार्थी लोकांनी घेतलेला तो पवित्रा आहे. आणि दुबळ्यांनी उगाच गमजा करू नयेत. (स्वार्ती लोकं याचाही फायदा घेण्याचा प्रयत्न करणार हा भाब वेगळा!) पटते का?:-)


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators