Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 06, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through August 06, 2006 « Previous Next »

Laalbhai
Friday, August 04, 2006 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे स्फोट परत न होण्याला साम्यवादात काही उतारा आहे काय?

>>

whoooaaa.. उद्या अमिताभच्या दाढीतला फोड बरा करायला साम्यावदात काही उतारा आहे का हे विचाराल! :-)

हे स्फोट हे धार्मिक कट्टरतेचा परिपाक आहेत. आणि शेजारी राष्ट्राची भारताला कायम विवंचनेत ठेवण्याची चाल आहे. "सगळ्याच" सरकारांनी धार्मिक कट्टरतावाद अतिशय चुकीच्या मार्गाने हाताळलेला आहे. मदरसे बंद करून सर्व धर्मियांना शालेय शिक्षणच compulsoary केले पाहिजे. भारतात बेकायदेशीर मार्गाने रहातात त्यांना आधी बाहेर काढले पाहिजे. हे साधे उपायही मतांसाठी कुणी केले नाहीत. अगदी स्वतःला राष्ट्रवादी म्हणवणार्‍या पक्षानेही काहीही केले नाही!


केदार,
मी सावरकरांचे सगळे विचार वाचलेले नाहीत. पण त्यांनी देशासाठी जे काही भोगले आहे, जातीनिर्मुलनासाठी जे काही केले आहे, त्याचा मला आदरच आहे. पण जिथे पटत नाही, तिथे त्यांना वैचारिक विरोध करण्याचे माझे स्वातंत्र्य मी अबाधित ठेवतो. पण मी उगाच सावरकरांआडून कुणावर गोळ्या झाडणार नाही. सावरकरांना जे अभिप्रेत होते, तेच आत्ताच्या हिंदूत्त्ववादी संघटना आणि राजकीय पक्ष करीत आहेत का, हा तुमच्या (आणि समुवैंच्या) संशोधनाचा विशय आहे. तुमच्या संशोधनाचे प्रामाणिक निष्कर्ष मायबोलीकरांना सांगाल अशी अपेक्षा आहे. :-)


On lighter side
कम्युनिझम कायमच म्हणाला आहे की "धर्म ही अफूची गोळी आहे". हा अफूचा डोस बंद करा, धार्मिक कट्टरतावाद कमी होईल. :-)




Laalbhai
Friday, August 04, 2006 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

britain मधला british , france मधला french तसा भारतातला हिंदू.

Why not भारतातला भारतीय?

Samuvai
Saturday, August 05, 2006 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो म्हणजेच हिंदू. भारत हे नाव ह्या देशाला पडले तेव्हा इथे सगळे वैदिक वा आर्य वा हिंदुच होते.
अफ़ू परवडते कधी कधी पण साम्यवादाचे विष नको झटकनच मरतात लोक (अहो लोक काय राष्ट्र सुद्धा रशियाचच घ्या ना हे ही अगदी on lighter side बर का लालभाई).

धन्यवाद केदार.


Limbutimbu
Saturday, August 05, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> britain मधला british , france मधला french तसा भारतातला हिंदू.
>>>>Why not भारतातला भारतीय?
आमी विचारतो Why noT हिन्दुस्थानातील तो हिन्दू? का म्हणुन भारत? हा शब्द आलाच कुठुन? काही आगा पीछा? मुळात "भारत" हा शब्दही अपभ्रन्शित आणि लादलेला हे अस माझे मत! (केवळ तोच नव्हे तर कॉन्ग्रेसचा चरखाधारी तिरन्गादेखिल लादला गेला हे फक्त अशोकचक्राचा बदल करुन, का नाही आॅनी बेझण्टनी फडकविलेला ध्वज वापरला?)
तरीही भारत हा शब्द लहानपणापासुनच्या सवईने ओळखीचा वाटू लागलाहे, पण हृदयात नाही घुसला!
धर्माधारीत आधारावर फाळणी झाल्यावर या देशाचे नाव हिन्दुस्थान असेच असायला हवे होते, तीच खरी ओळख हजारो वर्षान्पासुनची हे!
खर तर गान्धार च कन्दाहार नि अफगाणीस्तान झाल, पन्जाबच पाकीस्तान झाल तरी त्यापासुन बोध न घेता उरल्यासुरल्या हिन्दुभूमीच बळेबळेच किमान "भारत" अस नाव तरी राखल हेच विशेष.


Laalbhai
Saturday, August 05, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmmmm... म्हणजे एकंदरित स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची बोधचिन्हे, घटना ठरवताना "तुमच्या" विचारसरणीला स्थान देण्यात आले नाही, ही तुमची मुख्य ओरड आहे तर. त्यामुळे "भारतीय" शब्द काळजात वगैरे घुसत नाही तुमच्या.

इथे तर ९९ % लोकांच्या भारत आणि भारतीय म्हटले उचंबळून येते असेच दिसते आहे. :-)

समुवै.. भारतीय म्हणजेच हिंदू हा दावा लोकांना अजुनही पटत नाहीये. वेगळे समर्थन द्या.



Limbutimbu
Saturday, August 05, 2006 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओरड नाही लालभाई, जन्तेच्या न्यायालयात तसा आरोप करतोत!
बोधचिन्हे, घटना वगैरे हे फाऽऽऽर वरच "उच्च" झाल, अजुन अन्धश्रद्धा निर्मुलनाच्या खालच्या पातळीवरील कायद्यावर आपण घसरलोच नाहीहोत! थित घसरायला तर कॉन्गीज देखिल घाबरतात!


Laalbhai
Saturday, August 05, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो म्हणजेच हिंदू.

>>

इतिहास जरा बाजूला ठेवू.
पण जर राष्ट्रपती अब्दुल कलामांनी स्वतःला हिंदू म्हणवण्यास नकार दिला, पंत्रधान मनमोहन सिंगांनी स्वतःला हिंदू म्हणवण्यास नकार दिला, मॉंटेक सिंग अहलुवालिया यांनी स्वतःला हिंदू म्हणवण्यास नकार दिला... तर तुमची भुमिका काय असेल? मला सावरकर कशाला आणि कुणाला हिंदू म्हणतात हे माहिती नाही. पण याच भुमीत रहाणार्‍या कुणी स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास नकार दिला तर तुमची भुमिका काय असेल?

(वरची काही नावे केवळ उदाहरणे आहेत. यादी बरीच वाढवता येईल. गोळाबेरीज असे की, या भूमीसाठी, या देशाच्या विकासासाठी मोठे योगदान देणार्‍या कुणी जर स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास नकार दिला तर तुमची भुमिका काय असेल?)


Laalbhai
Saturday, August 05, 2006 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोधचिन्हे, घटना वगैरे हे फाऽऽऽर वरच "उच्च" झाल, अजुन अन्धश्रद्धा निर्मुलनाच्या खालच्या पातळीवरील कायद्यावर आपण घसरलोच नाहीहोत! थित घसरायला तर कॉन्गीज देखिल घाबरतात!

>>>

Complete bouncer! म्हणजे काय?

बाकी जनतेच्या न्यायालयाचा कौल काय मी तुम्हाला सांगायला हवा का? :-)


Limbutimbu
Saturday, August 05, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> इतिहास जरा बाजूला ठेवू.
>>>>>पण जर राष्ट्रपती अब्दुल कलामांनी स्वतःला हिंदू म्हणवण्यास नकार दिला, पंत्रधान मनमोहन सिंगांनी स्वतःला हिंदू म्हणवण्यास नकार दिला, मॉंटेक सिंग अहलुवालिया यांनी स्वतःला हिंदू म्हणवण्यास नकार दिला... तर तुमची भुमिका काय असेल?

लालभाई, या जर तर च्या गाजराच्या पुन्ग्या थोडावेळ बाजुला ठेवा!
मुलायमसिन्ग यादव आणि प्रभुती भर सन्सदेत राष्ट्रगीत म्हणत तर नाहीतच पण ते चालु असताना शुम्भासारखे निर्लज्यपणे बसुन असल्याचे दृष्य जन्तेने टीव्हीवर पाहील हे! आधी त्यान्च काय करायच ते बोला!
आता भर रस्त्यात फतकल मारुन बसलेल्या गुरान्कडे दुर्लक्ष करुन बाजुनी वाट काढतोच ना? तशीच बगल त्यान्च्या ड्रामेबाजीला दिली जाते! :-)
हां, आता रस्त्यावरची ही मोकाट गुरे जर शिन्ग रोखुन अन्गावर आली तर "ये ग बये, खुपस माह्या पोटात शिन्ग" किन्वा "ये ग बये, घे मला शिन्गावर" असली अहिन्सावादी आत्मघाती वृत्ती रस्त्यावरचा सामान्य माणुस देखिल दाखवणार नाही व जवळपास पडलेला दगड काठी घेवुन ते गुर हाकलुन काढील, अगदी तस्सच या मुलायमसिन्गादी प्रभुतीन्च होणार बघा!
त्यातुनही तुमचा जरतर विचारात घेतलाच, अन ती पुन्गी वाजुन त्या त्या लोकान्नी स्वतःला हिन्दु म्हणायचे नाकारलेच तर सद्ध्या जे सोनिया बाबत होत हे तेच होइल. अजुन वेगळे दाखले हवेत का?
आता "सोनिया बद्दल काय होत हे" असा बालीश प्रश्ण विचारणार नाही याची खात्री बाळगू ना? DDD
ही माझी ७९९८ व्वी पोस्ट हे! तर पुढल्या दोन पोस्ट म्या राखुन ठेवतो हे सोमवारकरता, तेव्हा सोमवारी भेटू, कसे? :-)


Laalbhai
Saturday, August 05, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

samuvai

मी Saturday, August 05, 2006 - 6:15 am: ला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे.

Zakki
Sunday, August 06, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे सर्वांना एक सांगणे आहे. माझ्या माहितीप्रमाणे वेदात, महाभारतात कुठेहि 'हिंदू' असे म्हंटलेले नाही. धर्म याचा अर्थ केवळ दैनंदिन आचरणात कोणत्या नियमांचे पालन करायचे हा होता. त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या चालीरिती होत्या. सर्वांचे अंतिम उद्दिष्ट एकच. मोक्ष, Self realization . त्यासाठी बरेच मार्ग उपलब्ध केलेले आहेत. तेंव्हा अमुक एक धर्म श्रेष्ठ नि अमुक एक कनिष्ठ असा भेदभावच नाही. म्हणूनच बुद्ध, जैन 'धर्म' झाले तरी इतरांनी त्यांच्याशी मारामारी केली नाही! वादविवाद केले.

पुढे ग्रीक नि इतर लोक आले, सिन्धू नदीला हिंदू, नि सिंध नदीकडील प्रदेशाला हिंदुस्तान, नि तिथल्या एकच अंतिम उद्दिष्ट असणार्या लोकांना 'हिंदू' 'धर्माचे' लोक असे नाव पडले. तेंव्हा मुसलमान नव्हते. पण शक, हूण, द्रविड असे वेगळे वेगळे लोक होते, पण ते सर्व 'हिंदू' ठरले.

पुढे जेंव्हा बुद्ध, जैन 'हिंदू' लोकांच्या पेक्षा वेगळेच तत्वज्ञान असणारे मुस्लिम नि ख्रिश्चन भारतात आले तेंव्हापासून ते व इतर असा भेदभाव सुरु झाला, नि इतरांना 'हिन्दू' असे नाव पडले!

तर खरे तर मी सुद्धा स्वत:ला 'हिंदू' म्हणवून घेण्यापेक्षा भारतीय म्हणवून घेणे पसंत करीन. (इतर लोक मात्र मला आणखीनहि काहि काही म्हणतात, तो भाग वेगळा!)


Robeenhood
Sunday, August 06, 2006 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर, अति सुंदर! लहानपणी मला भारताचा सोपपत्तिक इतिहास असे पुस्तक होते. लेखक काहीतरी इतिहासाचार्य झक्की नागपुरी की कायसे होते...

Robeenhood
Sunday, August 06, 2006 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारत हा शब्द लिम्ब्याला उपरा वाटतो हे पाहून धन्य झालो. माझ्या अल्पमतीप्रमाणे भरत नावाच्या राजामुळे या देशाला पूर्वी भरतखण्ड,आर्यावर्त अथवा भारतवर्ष म्हणत असत...(हा रामायणातला भरत नव्हे!)हा भरत राजा म्हणजे दुष्यन्त आणि शकुन्तलेचा मुलगा होय.या भरत राजामुळे या प्रदेशाला भारत म्हणतात असेही माझी अल्पमती सांगते. खरे तर भारत हे नावच आपल्या प्राचीन वारशाचे पुनरुज्जीवन आहे असे माझ्या बालबुद्धीला वाटते.खरे तर हिन्दुत्व प्रचारकानी हिन्दुस्तान सोडून भारत या नावाचा आग्रह धरला पाहिजे. ते त्यांच्या philosophy ला सुसंगत आहे.पण त्यांचा असा समज आहे भारत हे नाव congress ने हिन्दुस्तान शब्द टाळून मुद्दाम मुस्लिमाना खूष करण्यासाठी ठेवले आहे...
हिन्दुस्तान हे नाव परकियानी विशेषत: इराण्यानी आपल्या देशाला दिले आहे. आपल्या ग्रंथात हिन्दुस्तान शब्द कुठे आहे. भारत मात्र आहे. मुळात आता सिन्धू तरी भारतात कुठे राहिलिय...
इन्डोनेशियन भाषेत पश्चिम दिशेला बारत असे नाव आहे. पूर्वि विजय राजाचे हिन्दू साम्राज्य तिथे असल्यामुळे बरेच भारतीय शब्द अजूनही बहसा इन्डोनेशिया या त्यांच्या भाषेत अद्याप आहेत. त्यात पश्चिम दिशेला बारत (म्हणजेच भारत..)शब्द आहे.इन्डोनेश्याच्या दृष्टीने पस्चिम बाजू म्हणजे भारताकडील बाजू..

हे माझ्या बालबुद्धीप्रमाणे लिहीले आहे. चुकीचे असेल तर सोडून द्यावे.त्याला हसू नये....


Robeenhood
Sunday, August 06, 2006 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे मोठे मनोरंजक आहे. भारत नाव निवडण्याचे वेळी जी घटना समितीत जी चर्चा झाली ती प्रत्यक्ष आहे. मोठमोठ्या दिग्गजांची ही चर्चा दर्जेदार तर आहेच पण त्यांनी एकमेकांचा आब राखून केलेली 'लठ्ठालठ्ठी' ही मनोरंजक आणि लव्हेबल आहे

येथे टिचकी मारा...

घटना समिती दि.१८ सप्टे.१९४९

Moodi
Sunday, August 06, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीनहूड तुमचे बरोबर आहे, त्यात हसण्यासारखे काहीच नाही. पूर्वी भारताला भरतखंड पण म्हणत.
लिंब्या अरे तुला या पौराणिक गोष्टींची केवढी माहिती आहे तरी तू विसरलास आश्चर्यच आहे.


Pinaz
Sunday, August 06, 2006 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहूड, तुम्ही दिलेली लिंक चालत नाहीये.

Kedarjoshi
Sunday, August 06, 2006 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चार दिवसांपुर्वी माझी येथील एतदेशीय माणसा बरोबर चर्चा झाली त्याने विचारले की मुबंई हे नाव का ठेवले त्याला मी सांगत होतो की bombay हे नाव खरे नाही म्हनुन, मग नंतर बोलता बोलता india हे नाव कसे बरोबर नाही ते पण सांगतले. त्याने विचारले काय नाव आहे तर उत्तर भारत आहे असे दिले. ( हिंदुस्थान असे नाही). सांगन्याचा उद्देश की भारतच हे नाव अपेक्षित आहे.
हिंदु हे नाव का नसावे ह्याचे कारण झक्कींनी दिलेच आहे व ते सर्वमान्य आहे.
मान्य आहे की आधी (महाभारत - रामायणाचा काळात भारताला भारतवर्ष असे म्हणत पण ह्या भारतवर्षात आजचे दक्षिनेकडील राज्य नसावेत. ( दंडकारण्य व त्या खालील भागात रावणाचे राज्य ( खर निकुंभ) होते.
त्यामुळे आज जसे आपण india accept केले तसे हिंदु केले मग आता अनेक शतकांपासुन जर आपल्या लिव्हिग ला हिंदुधर्म म्हणले गेले तर असेल व ते मान्य केले तर काय बिघडेल?
जाता जाता मी देखील भारतीय म्हनून घेनेच पसंत करेल. पण जस्ट एक विचार मांडतो
तिन्ही कडुन समुद्र व उत्तरेला हिमालय असा जो भारत पसरला आहे त्या राहानार मी, एक भारतीय असे संध ज्या भारतमातेच्या चित्राला पुजते त्यावर संस्कृत मध्ये लिहीलेले असते.
सावरकरांनी त्या वेळेच्या स्तिथीला लक्षात घेउन परत एकदा भारतीयांना हिदुं म्हनुन घ्या असा प्रचार केला कारण दंगलीत हिंदुना मारले गेले तरी गांधी कॉंग्रेस हे त्यांची दखल घेत नसत. त्यांना संघटीत करन्यासाठी सावरकरांनी भारतात जो राहातो तो हिंदु अशी परिभाषा केली. तो काळ पाहाते ते काही चुकीचे न्हवते. (आजही फार बदल झाला आहे असे नाही).


Robeenhood
Sunday, August 06, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pinaz and others , plz try
http://164.100.24.208/ls/condeb/vol9p38.htm

ls means loksabha and vol stands for volume .plz dont misunderstand it as 1(one)

Laalbhai
Sunday, August 06, 2006 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर आपल्या लिव्हिग ला हिंदुधर्म म्हणले गेले तर असेल व ते मान्य केले तर काय बिघडेल?
>>

केदार,

हिंदू धर्म मान्य नाहीये असे नाही. खरे म्हणजे कोणत्याच धर्माला अमान्यता नाही. मागच्या एका चर्चेत म्हटले तसे धर्म, जात यांचा tag पुसण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे आणखी एका अराजकाला आमंत्रण देणे आहे.

माझा प्रश्न असा आहे की भारत या देशात राहणार्‍या सर्व लोकांना आपण हिंदू म्हणू शकतो का? आणि एखाद्याने तसे म्हणवून घेणे नाकारले तर तर "भारत देशात रहाणारा हिंदू" असे जे म्हणतात, त्यांची भुमिका (इथे कदाचित तुमची आणि समुवै यांची) काय असेल?


Laalbhai
Sunday, August 06, 2006 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

robinhood
लिंब्याचे "विचारधन" आहे ते! :-)

(विचारधन की विचार"घण" हा भाग वेगळा. :-))
~D

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators