|
Moodi
| |
| Tuesday, August 01, 2006 - 1:55 pm: |
| 
|
सुनील गावस्कर की कुणीतरी दुसरा क्रिकेटर बोलला होता की भारतीय निवड समितीत सगळे जोकर्स भरले आहेत. आता राजकारण म्हणजे पण एक सर्कसच झालीय. आता या बाबाला काही नडले होते का लोकांची मदत करायचे सोडून नदीची ओटी भरायचे? आता शुक्रवारची सवाष्ण म्हणून पण जा म्हणावे. सध्या दुसरी डोकेदुखी झालीय ती म्हणजे Israel- लेबनॉन संघर्ष. काश्मीर मध्ये आता नवीन वाद घडतोय तो म्हणजे तिथले अतीरेकी भारत, अमेरीका अन Israel इस्लामचे शत्रू आहेत म्हणून जिहाद पुकारतायत. सध्या इराण, सिरीया गप्प आहेत, जर का हे देश अन उरलेले अल कायदावाले जर या संघर्षात उतरले तर जगाचे कल्याणच आहे. आता भीती आहे ती तिसर्या महायुद्धाची. सारखे बातम्यात ती माणसे, लहान मुले अन बायका मरतांना बघून डोकेच फिरायचे वेळ आलीय. काय होईल देव जाणे. 
|
केदार, तू म्हणतोस ते १०१ टक्के सत्य! पण याच जसवन्तसिन्गाच्या खुर्चित जावुन बसल्याची कल्पना केल्यावर काही गोष्टी भारतासाठी किती अवघड हेत हे कळते, अरे जिथे कारगिल चे युद्ध ही मुद्दमहुन घडवुन आणले असा अपप्रचार विविध बुद्धीभेदक लेख, चर्चा, मुलाखती याद्वारे तमाम मिडिया करु शकते याच देशात, तर इस्रायेल ने ओलिसान्ना सोडविण्यासाठी केले तसे हल्ले भारतातील कोणते सरकार करु शकेल? आणि त्यात जिवित हानी झाली असती तर गळा काढुन रडायला तेव्हा देखिल मिडिया अन तेव्हाचे विरोधक समर्थ होतेच की! पण मग उडदामाजी काहीच काळे गोरे असा भेद करायचा नाही का? म्हणुनच केवळ वरील जसवन्त सिन्गाच्या चर्चेच्या वेळेस मला त्या मुफ्तीची आठवण करुन द्याविशी वाटली. ओलिसान्बदल्यात पकडलेले आरोपी, अतिरेकी सोडु नये हे तत्वतः मान्य पण अम्मलात कुणी आणायचे? त्यावेळेस उणी पुरी पाच वर्षे देखिल सत्ता न उपभोगलेल्या बीजेपी आणी अलायन्सेस ने की जेव्हा सोइस्कर प्रशासकीय बदल घडवुन आणणे देखिल सहज साध्य झाले नव्हते! की मिलिटरीच्या हातात प्रश्ण सोपवायचा होता? असा सोपवला तर भारतातील किती जनता ते सहन करु शकेल? त्यात होणारी सम्भाव्य जिवित हानी, अफगाणिस्तानपर्यन्त सुटकेसाठी काही करायचे तर मधे आणी पाठीमागे उभ्या असलेल्या शत्रुन्च्या फळ्या, त्याशिवाय घरभेदे ते वेगळेच, आणि हे करताना कितीक इच्छाशक्ती, सामर्थ्य आणि जनतेचे एकमत अल्पावधित एकवटायला पाहीजे तसे तेवढे भारतात शक्य हे का? तुलनेत मुफ्तीच्या पोरीचे अपहरणाचा बनाव विसरण्यास सद्ध्याचे सत्ताधारी जसवन्तसिन्गान्च्या पुस्तकातील मोजकी सोइस्कर वाक्ये उचलुन त्याच राजकारण करताहेत असे आम्ही समजले तर बिघडले कुठे? माझी पोस्ट जरा जास्त पाल्हाळीक झाली नाही हे ना?
|
Zakki
| |
| Tuesday, August 01, 2006 - 3:58 pm: |
| 
|
जाणून बुज़ून असो किंवा चुकीने असो. अमेरिकेची फौज इराकमधे आहे, म्हणून इराण ला पटकन सिरिया लेबॅननमधे घुसता येत नाही. शिवाय अफगाणीस्तानात पण अमेरिकन फौज आहे, म्हणजे त्या मार्गाने त्यांना पाकीस्तान्यांना सुद्धा मदत देता येणार नाही, सहजासहजी! शिवाय पाकीस्तानमधे ते घुसले तर अमेरिका आहेच त्यांच्या 'मित्राचे' रक्षण करायला! आता त्याने जर बुशला पटवले की भारतात कश्मिरी लोकांवर अत्याचार होताहेत अतिरेक्यांचे तर त्याला काश्मीरमधे सैन्य घुसवायला अमेरिका मदतच करेल. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका भारत यांचा अणूकरार महत्वाचा आहे!
|
माझी पोस्ट जरा जास्त पाल्हाळीक झाली नाही हे ना? >> नाही रे भो. एका अर्थाने बरोबरच आहे तुझी पोस्ट. पण एक व्यक्ती म्हनुन मला असे वाटते की काही तालिबान कडे जान्या आधी हे विमान भारतात थांबले तेव्हा काहीतरी केले असते तर? ऐनीवे. झक्की, अगदी योग्य लिहिले आहे तुम्ही. पण जर ईस्रायल ने हल्ले थांबविले नाहीत तर आणखी जास्त मुस्लीम आतंकवादी तयार होतील. अमेरिका आताही गप्पच आहे. २००८ मधे अमेरिकेत लाल लोक आले तर मात्र नक्की ईराण टारगेट होईल. सब ऑईल का खेल है.
|
Zee
| |
| Tuesday, August 01, 2006 - 5:17 pm: |
| 
|
कृपया ही लिंक वाचा. ज़सवंत सिंगाबद्दल http://www.tarunbharat.net/3072006/sampadakiya_1.htm
|
Zakki
| |
| Tuesday, August 01, 2006 - 6:52 pm: |
| 
|
भारतात कुठलेहि सरकार आले तरी भारत कधीहि मोठे युद्ध करणार नाही, फक्त अपवाद चीनचा. मग मात्र लढावेच लागेल. कारण जगात आपल्या बाजूचे कुणि नाही. एके काळी रशिया असत. आता माहित नाही. त्यातून अणू करार झाला तर निदान energy साठी आपल्याला 'तेलकट' राष्ट्रांवर अवलंबून रहावे लागणार नाही. शिवाय आपण हळू हळू अन्नधान्याच्या बाबतीत self-supporting झालोच आहोत. बर्यापैकी पैसे पण आहेत. आता फक्त हे जे लालभाई नि मुसंडॅ आहेत, त्यांचा काटा काढला पाहिजे. त्यासाठी, उपाय म्हणजे मुसलमानांत फूट पाडणे. उगीच शिवाजी धर्म नि असले काहीतरी करण्यापेक्षा, शिया नि सुन्नि नि बहै का कोण ते त्यांना फोडले की मतांसाठी सुद्धा त्यांच्याकडे बघणार नाहीत. दर वेळी हाती शस्त्रच घ्यायला पाहिजे असे नाही. डोके वापरून पण कामे होतात!
|
झी, बर केल ती लिन्क दिलीस!
|
Samuvai
| |
| Wednesday, August 02, 2006 - 6:11 am: |
| 
|
झक्की, अप्रतिम लेख आहे. पण का नये सांगू हेराचे नाव हे कळले नाही. जाहीर नाही पण CBI ला सांगायला काहीच हरकत नाही. "आता सरकारची जबाबदारी" ह्याला काय अर्थ आहे म्हणजे "हा, मला माहेत्ये पन मी शांगनार नाही. शोधा शोधा" असा बालिशपणा करण्यासारख आहे. शिवाय मनमोहन सिंगांनी उपस्थित केलेला प्रश्न "तुमच्या सरकारनी काही का नाही केले" अतिशय योग्य आहे.
|
Laalbhai
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:25 am: |
| 
|
कमाल आहे, कशा कशाचे समर्थन करायचे?? हे म्हणजे "ट्रकभर पुरावे आहेत" असे म्हणायचे आणि शेवटपर्यंत एकही पुरावा द्यायचा नाही! जस्सूभाऊ तर फिरलेच.. ते स्वतःच म्हणतात की अशा कोणत्याही हेराचे नाव मला माहिती नाही! तरीही मुखपत्र त्यांनी "फिरवलेल्या" वक्तव्याचे समर्थन करून, स्वतंची अक्कल दाखवत आहेत! उद्या मी म्हणतो की जस्सूच्या पाच सहा रखेल्या आहेत. असा माझा अंदाज आहे! पण मी त्यांची नावे सांगणार नाही! आरोप, चारित्र्यहनन करतानाही जरा तारतम्य बाळगावे की. पंतप्रधानांचे चिडणे साहजिकच आहे. तरुण भारतने जसवंतसिंगाचे समर्थन करणेही हेही साहजिक नसले, तरी त्यांना क्रमप्राप्त आहे.
|
Samuvai
| |
| Thursday, August 03, 2006 - 6:55 am: |
| 
|
लालभाई, एक छोटीशी विनंती: उदाहरणे देताना तारतम्य बाळगा. एखादा तुम्हाला गलिच्छ प्रतिप्रश्न करु शकेल. असो; पंतप्रधान वा अर्थमंत्री (आणि in general काॅग्रेसवाले) अमेरिकेबाबत काही धुतल्या तांदुळासारखे नाहीयेत. माझ म्हणण इतकच आहे की भा.ज.पा. च्या नेत्यांनी धोरणीपणे वागले पाहीजे. प्रमोदजी, तुमची उणीव जाणवत्ये
|
Laalbhai
| |
| Thursday, August 03, 2006 - 11:10 am: |
| 
|
माफ करा समुवै, राष्ट्राच्या सुरक्षेशी खेळ करणारे तमाशे कुणी केलेच तर आम्हालाही (एक सामान्य माणूस म्हणून) संताप येतो. तुमच्या दृष्टीने आमच्यासाठी " country above all " नसेल कदाचित, पण ज्यांच्यासाठी आहे, त्यांनी तरी असले तमाशे का करावेत, असा प्रश्न आम्हाला पडतो.
|
Laalbhai
| |
| Thursday, August 03, 2006 - 11:24 am: |
| 
|
अय्यो रामा पापं!!! राष्ट्रवाद्यांची राष्ट्रद्रोह्यांशी युती????????????????????? http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1847199.cms http://in.rediff.com/news/2006/aug/03rs.htm
|
Soultrip
| |
| Thursday, August 03, 2006 - 1:42 pm: |
| 
|
आता या बाबाला काही नडले होते का लोकांची मदत करायचे सोडून नदीची ओटी भरायचे? आता शुक्रवारची सवाष्ण म्हणून पण जा म्हणावे. >>>>>>>>
राष्ट्रवाद्यांची राष्ट्रद्रोह्यांशी युती????????????????????? >>>>> Everything is fair in love, war & politics
|
Samuvai
| |
| Friday, August 04, 2006 - 7:48 am: |
| 
|
नाही नाही लालभाई, तुमच्या आमच्या सारख्या सामन्य माणसासाठी "country above all" च असते. देशाच्या सुरक्शेशी खेळल्यावर तुम्हाला संताप आला ह्यातच सगळे आले. म्हणूनच म्हणतो चिडू नका तुम्हीही राष्ट्रवादीच आहात. अहो रक्तातच आहे ते आपल्या. उगाच निरपराधांच्या रक्तान "लाल" झालेल्या झेंड्यामाग धावूच नये. हा आता तुमच्यासारख्या sensible (हा खोचकपणा नाही बर) माणसांचा राष्ट्रहितासाठी उपयोग करुन घेण्यासाठी समान तत्वांवर एकत्र आल तर बिघडतय कुठे. अहो "लाल" चा "भगवा" कधी होइल कळणारही नाही. :-)
|
Laalbhai
| |
| Friday, August 04, 2006 - 9:25 am: |
| 
|
माफ करा... मला तर भगव्याचा लाल होताना दिसतोय त्याचे काय? तुम्हीही राष्ट्रवादीच आहात. अरे वा.. हा तर सन्मानच म्हणायचा की आमचा. प्रामाणिकपणे सांगायचे तर मी माझी विचारसरणी कधी कुणावर लादली नाही आणि लादणार नाही. कम्युनिस्टांचा झेंडा मिरवत जे राजकारण करतात, त्या सगळ्यांचेच समर्थन मी करेन, असेही नाही. पण काय आहे, आज कम्युनिस्ट राजकारण्यांना कशाही बाबतीत शिव्या द्यायला कोणालाच नैतिक अधिकार उरलेला आहे, असे मला वाटत नाही. अगदी स्पष्टच, तू मी च्या पातळीवर येऊन, बोलायचे तर BJP चा कारभार कॉंग्रेस च्या कारभारापेक्षा काय वेगळा होता? भ्रष्टाचाराच्या नवीन काही भानगडी आल्या इतकेच. वैयक्तीक स्वार्थ, असंवेदना, मुजोरी.. अशा अवगुणांनी सगळेच राजकारणी भरलेले असताना, तुमच्यासारखी राष्ट्रवादी (हेही अगदीच प्रामाणिक, खोचक नाही!) माणसे, कसे काय कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थन करू शकतात, याचे आश्चर्य मलाही वाटते. "निरपराधांच्या रक्ताने माखलेला लाल" अशी हेटाळणी तुम्ही जेंव्हा करता, तेंव्हा तुम्हाला इतिहासाचा का विसर पडतो? सगळे हुकुमशहा कम्युनिस्टच होते का? वर्तमानातही नक्षलवादाचे समर्थन कम्युनिझमच्या theory मधे आहे, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? ते असो, वारंवार होणार्या दंगली, निष्पाप जीवांना जिवंत जाळणे, हे "फक्त एका गटाकडून" होते का? असो. या सगळ्याची उत्तरे तुम्हाला ठाऊक आहेतच. त्यामुळे तुम्ही नाही दिली तरी चालती. पण सगळेच सारखे असताना, एका राजकीय पक्षाची बाजू घेऊन दुसर्यावर दुगाण्या झाडण्याचा प्रकार, समंजस आणि सुशिक्षित माणसे करतात, तेंव्हा खरच वाईट वाटते आणि नैराश्य येते. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे राष्ट्रवादी आहात, त्यामुळे माझे नैराश्य तुम्हाला चांगलेच समजू शकेल, असे वाटते.
|
Laalbhai
| |
| Friday, August 04, 2006 - 9:29 am: |
| 
|
BTW, तुमची राष्ट्रवादाची व्याख्या मला जाणून घ्यायची आहे. तुम्हाला जे वाटते ते इथे मांडू शकाल का?
|
Samuvai
| |
| Friday, August 04, 2006 - 10:14 am: |
| 
|
मी कोण बापडा राष्ट्रवादाची व्याख्या करणार? हा, पण सावरकरांसारख्या द्रष्ट्याने राष्ट्रवादी (राष्ट्रीय वा हिंदू) कोणास म्हणावे ते सुस्पष्ट मांडले आहे: असिंधु सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका पित्रुभू पुण्यभूश्चैव स वै हिंदुरितीस्म्रुत्: ज्याची सर्व श्रद्धास्थाने ह्याच भूमीत आहेत, ज्याला मुक्तिसाठी दुसर्या कुठे जायची गरज भासत नाही तो हिंदू.सावरकर हिंदू, भारतीय, राष्ट्रीय एकाच अर्थाने वापरायचे आणि त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. एक सुधारणा: मी कुठल्याही राजकिय पक्शाच समर्थन करत नाही. साम्यवादाला जोडे मात्र जरुर हाणतो कारण तो त्याच लायकिचा आहे.
|
Laalbhai
| |
| Friday, August 04, 2006 - 12:35 pm: |
| 
|
hmmm.. so everything atlast boils down to word "hindu" !!!! म्हणजे की एखादा मनुष्य प्रामाणिक आहे, बरीचशी समाजसेवा करतो, सगळे नियम पाळतो, भ्रष्टाचार करत नाही... पण तो म्हणतो की तो हिंदू नाही... तर तो राष्ट्रवादी नाही, तर तो राष्ट्रद्रोही आहे -- कारण तो "तुमच्या" राष्ट्रवादाच्या व्याख्येला छेद देतो, असेच ना? anyway.. no point at all in discussing further on this issue. Thanks. मी कुठल्याही राजकिय पक्शाच समर्थन करत नाही. >>>

|
Samuvai
| |
| Friday, August 04, 2006 - 1:46 pm: |
| 
|
प्रिय लालभाई, मुद्दे संपल्यावर स्मित करण्याचे अदा आम्हाला बेहद्द आवडली. झोपलेल्याला उठवता येत झोपेच सोंग घेतलेल्याला नाही. पण तरीही परत एकदा सांगतो ह्या देशाशी ज्याची नाळ जोडलेली आहे तो राष्ट्रीय. जर तो स्वच्छ, समाजसेवक, पापभीरु असेल तर त्याने स्वतहास अहिंदू म्हटले तरी "आमच्या" द्रुष्टिने तो हिंदू म्हणजे राष्ट्रीयच. britain मधला british , france मधला french तसा भारतातला हिंदू. तो स्वच्छ असलाच पाहीजे हे ओघाने आलेच. मलाही ही चर्चा वाढवायची नाही. पण वर तुम्हीच विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देइन म्हणतो: १. अलबत, नक्षलवादाच मूळ साम्यवादी ( maoist विचासारणीतच आहे. खात्री नसेल तर विचारा जाऊन त्यांना. २. दंगल इथली अराष्ट्रीय तत्व (हो आमच्या भाषेतलीच अराष्ट्रीय) सुरु करतात आणि मग त्यावर कोणाचे नियंत्रण रहात नाही. त्यामुळे प्रमाद दोन्हीकडुन होत असला तरी करणीभूत कोण आहे हे सरकारी गॅझेट मध्ये बघण्याचे कष्ट घेतलेत तर लगेच कळेल. anyway.. no point at all in discussing further on this issue. Thanks आपने मेरे मुह की बात छीन ली :-) आपण परत स्फोटांवरील चर्चेकडे वळुया. हे स्फोट परत न होण्याला साम्यवादात काही उतारा आहे काय?
|
ऑफ द टॉपीक. बाकी लालभाई मागे ही मी हेच लिहिले होते की माझी विचारसरणी सावरकरांची देन आहे. तुम्ही सावरकर निट वाचलात का? हे ह्या साठी विचारले की तुम्ही वर लिहिले आही की everything boils down to hindu हिंदु ह्या शब्दाचा अर्थ सावरकरांना वेगळा अभिप्रेत आहे. welcome to the savarkar club samuvai.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|