Zakki
| |
| Monday, July 24, 2006 - 10:48 am: |
| 
|
शेवटच्या प्रश्नाचे उत्तर: कदाचित् तसे करूनच काम होईल, करण एरवी अमेरिकनांच्या दगडी डोक्यात तर्कशास्त्र घुसत नाही. पण पैसे दिले की सगळे सिनेटर, राजकारणी खोटेसुद्धा बोलायला मागे पुढे पहात नाहीत, तर खरे बोलायला काहीच हरकत नसावी. तुम्ही सांगीतलेले दुसरे उदाहरण मी पुण्यात गतवर्षीच दोनदा अनुभवले. पहिल्या उदाहरणाबद्दल काही बोलायलाच नको. मनुष्यस्वभाव म्हणायचे नि काऽहीहि करायचे. लहानपणी ठीक आहे, पण यांना वयाने मोठे होताना काही चांगली शिकवण मिळालीच नाही का? मुख्य म्हणजे, अशी खाऊन पिऊन सुखी असलेली माणसे अगदी गरीब नि दलित लोकांकडूनहि लाच घेतात, ते पाहून समजत नाही नि राग येतो, पण आता इतरांबद्दल काही बोलण्यात अर्थ नाही, आधी स्वत:चे नाक पुसावे असा मी प्रयत्न करत आहे.
|
Svsameer
| |
| Monday, July 24, 2006 - 5:48 pm: |
| 
|
We were rulers here for 800 years. Inshaallah, we shall return to power here once again इमाम परत बरळु लागला
|
Mahaguru
| |
| Friday, July 28, 2006 - 2:44 pm: |
| 
|
आजच्या इ-सकाळ नुसार: शहाबुद्दीन यांच्या वकिलाने न्यायाधिशांना धमकावले गोळ्या घाला असल्या लोकांना ..
|
Moodi
| |
| Sunday, July 30, 2006 - 1:51 pm: |
| 
|
आपल्याच देशात भारतमातेचा जयजयकार करायला बंदी. फनासारख्या सिनेमातुन अतीरेक्यांचे महत्व वाढवले जाते, मग असेच होणार. http://www.esakal.com/esakal/07302006/NT00BA4D12.htm
|
प्रुथ्वीराज चौहानची आत्मघातकी सहिष्णुता जोपर्यंत आमच्यात आहे तोपर्यंत असेच होणार.
|
गृहमंत्री पुराला घाबरुन नदीची ओटी भरतो. महाराष्ट्राला कुठे नेउन ठेवनार आहेत हे लोक देवच जाने. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1827348.cms
|
Laalbhai
| |
| Monday, July 31, 2006 - 4:58 pm: |
| 
|
जसवंतसिंग सननाटीपणाचे आकर्षण फक्त मीडियालाच आहे असे नाही. पक्षद्वेष आणि प्रसिद्धीची हाव भागवताना आपण देशाचेच नुकसान करत आहोत याचे साधे भान अनेक मोठी पदे भूषवलेल्या व्यक्तीला नसावे, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे!
|
Very well said Laalbhai. एकुनच जसवंतसिंग बद्दलचा उरलासुरला आदरही संपला आहे. तसेही IC 814 च्या वेळेसच जी कामगीरी त्यांनी व पर्यायाने आपल्या देशाने बजाविली त्याची नेहेमीच लाज वाटते. ते आत्मचरित्र लिहुन काय साध्य करत आहेत हे कळत नाही. त्यांची अकार्यक्षमता घालविन्यासाठी असे काहीतरी लिहिले की झाले.
|
एकूणच लालभाई आणि केदारबुवा यांचे मतैक्य पहाता मला तर गंगा आणि व्होल्गा एकत्र मिळल्यासारखे वाटू लागले आहे!!!!
|
रॉबीनहुड LOL नाही हो भो. काही मत सारखी आहेत तर तुम्ही लगेच संगम वैगरे म्हनायला लागलात. मी आपला " भगवाच " बरा.
|
>>>> गंगा आणि व्होल्गा एकत्र हमं, चान्गल कॉकटेल हे! देशी अधिक व्होडका! ddd
|
Laalbhai
| |
| Tuesday, August 01, 2006 - 5:23 am: |
| 
|
LOL robinhood LOL robinhood
|
Samuvai
| |
| Tuesday, August 01, 2006 - 5:52 am: |
| 
|
जसवंतसिंगनी अतिरेक्यांना सोडल्याचा पश्चात्ताप नाही असेही म्हंटले आहे. राजकारणातून निवृत्तीचे वय ६० करावे काय?
|
जसवन्तसिन्हाना आठवताना मला तो एक मन्त्री आठवतो हे ज्याच्या मुलीच अपहरण केल्यावर काही अतिरेक्यान्ना सोडल गेल होत! पब्लिकची कशाला, माझीच स्मृती किती क्षीण हे! हिशेब सरळ हे, एका मुली करता सोडले गेलेले अतिरेकी वर्सेस काही शे उतारुन्बदल्यात सोडलेले अतिरेकी....! या तुलनेवर अधिक भाष्य हवे का?
|
Gs1
| |
| Tuesday, August 01, 2006 - 6:21 am: |
| 
|
बातमीची लिंक नाही सापडली मला. पण काल मुंबई बॉंबस्फोटांबद्दलच्या संसदेतल्या चर्चेला भाजपचे ७, कॉंग्रेसचे १० आणि एकुण जेमतेम ५० सदस्य उपस्थित होते. बॉंबस्फोट झाले तेंव्हा ही चर्चा व्हावी या मागणीसाठी संसदेचे कामकाज ३ दिवस रोखून धरले गेले होते. आता २ आठवड्यात विषयाचे महत्व संपले ?
|
>>>> आता २ आठवड्यात विषयाचे महत्व संपले ? नाही, वेळेच महत्व सम्पले! मुम्बईत बॉम्ब्स्फोट झाल्यावर तत्काळ आणिबाणीसदृष परिस्थिती समजुन त्यावर सन्सदेत चर्चा व भाष्य झाले असते तर त्याला काही अर्थ होता! आता सचिवान्नी लिहुन दिलेले वाचुन दाखवणारी चर्चा बॉम्बस्फोटातील मेलेल्यान्ची तेराव्वी उरकल्यावर हवीत कशाला? आता सन्सदेत चर्चा करुन असे काय धोरणात्मक दिवे पाजळणार हेत? आणि आजवर पाजळले हेत? ज्यान्ना घटनेवर तत्काळ मतप्रदर्शन देखिल करता येत नाही, ते करण्यास त्यान्ना भाग पडावे म्हणुन कामकाज रोखुन धरावे लागते या कर्मास काय म्हणावे? ज्यान्ना घडलेल्या घटनेवर साध मतप्रदर्शनही करता येत नाही ते काय सरकार चालविणार हे जनतेस समजुन देण्यासाठी आणि जमल्यास सत्तधिशान्ना जाग आणण्यासाठी तेव्हा कामकाज रोखणे आवश्यक होते! नन्तरच्या कालखन्डात प्रशासकीय उपाययोजना वगैरे बाबी हा स्वतन्त्र विषय हे! पण आपत्कालीन घटनान्करता उपाययोजना काय हे यावर देखिल किन्वा आपत्कालीन घटना नेमकी काय हे यावर सुद्धा सन्सदेत कोणीच तत्काळ बोलु शकत नसेल तर फुकट हे!
|
Samuvai
| |
| Tuesday, August 01, 2006 - 6:42 am: |
| 
|
लिंबूटिंबू, ती मुलगी माझ्या माहीतीप्रमाणे सध्या आझाद काश्मिर च्या बाजूने आणि भारताविरुद्ध गरळ ओकत आहे काश्मिरात. ते तर केवळ नाट्य होते हो तिच्या "मित्रांना" सोडवायला तिने केलेले. पण ह्याचा अर्थ असा नाही कि राष्ट्रवादी म्हणवणार्या पक्शाच्या माजी मंत्र्याला अतिरेक्यांना सोडल्याचा जराही खेद नसावा. काही शे लोक वाचले आणि नंतर त्या अतिरेक्यांमुळे प्रत्यक्श वा अप्रत्यक्श किती लोक मेले? मला वाटत ह्या हिशोबांपेक्शाही काळ सोकावतो हा धोका सगळ्यात मोठा. एक राष्ट्रीय धोरण म्हणुन जाहीर कराव की ओलिसांच्या बदली ह्या पुढे कुठलाही गुन्हेगार सोडला जाणार नाही.
|
Moodi
| |
| Tuesday, August 01, 2006 - 8:11 am: |
| 
|
लिंब्या तो काश्मीरचा मंत्री होता मुफ्ती मंहमद सैद, त्याची मुलगी सईदा( की रुबीना?) हिला पळवले होते अतीरेक्यांनी(???)( आतल्या गोटातली खबर की तो मंत्रीच सामिल होता ही नाटके करायला).
|
Laalbhai
| |
| Tuesday, August 01, 2006 - 10:53 am: |
| 
|
जसवंतसिंहांचा बार फुसका ""माजी पंतप्रधान (कै.) पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत पंतप्रधान कार्यालयात अमेरिकेचा हस्तक होता. अणुगुपिते फोडली जात होती.'' - १९ जुलै ""अमेरिकेच्या हस्तकाचे नाव सांगण्यास तयार आहे.'' - २३ जुलै ""पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ सनदी अधिकारी हा हस्तक होता. केवळ पंतप्रधानांनाच नाव सांगणार.'' - २४ जुलै ""त्या हस्तकाचे नाव तत्कालीन सरकारला माहीत होते; किंबहुना नरसिंहराव यांचे सरकारच अणुगुपिते फोडत होते.'' - २८ जुलै ""पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रामध्ये हस्तकाचे नाव सांगितले आहे. अन्य माहितीही दिली आहे.'' - ३० जुलै ""त्या हस्तकाचे नाव मला माहीत नाही. माझी माहिती ही "अंदाज' आणि "अंत-प्रेरणा' यांच्यावर आधारलेली आहे.'' - ३१ जुलै आज किंवा उद्या हा मनुष्य म्हणेल की मीडियाने माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला किंवा प्रकाशकाने पुस्तक छापताना माझ्या मूळ हस्तलिखितात फेरफार केला... ही विरोधकांची चाल आहे!!!
|
लिबुंभो, अहो कोणालाही का सोडा? त्या मुफ्ती ने अतिरेक्यांना सोडले तर भाजपा ने ही ते का करावे? शेवटी त्यांचात नी भाजपात काही फरक आहे की नाही. तेव्हा बरेच लोक (आंतरराष्ट्रीय स्तरावरिल) अमेरिकेच्या पाठीमागे लागले की त्यांनी काहीतरी करावे, पण अमेरिकेला जो पर्यंत इजा नाही तो पर्यंत अमेरिका काही करनार नाही असे त्यांचे धोरण असल्यामुळे अमेरिका मजा बघत होती. ( हा भाग अलहिदा कि त्याच तालिबान वर लगेच २ वर्षानी ह्यांनी हल्ला केला.) शेवटी काय प्रत्येकाने आपला लढा आपणच लढावा हे भारत कधी शिकनार कोण जाने.
|