|
Zakki
| |
| Sunday, July 16, 2006 - 2:18 pm: |
| 
|
माझी खात्री आहे, की तुम्हाला बरेच काही काही कळते. असे बघा, की जगात जे स्वत:ची उन्नति स्वत: करू शकत नाहीत, त्यांची जबरदस्तीने उन्नति करायला जायचे, तेसुद्धा एकदम, नोकर्या, पैसे द्या की झाली उन्नति, असे जे तुम्हाला वाटते, ते खरे नाही. म्हणजे अमेरिकेनी जबरदस्ती इराक ला लोकशाही करायचे ठरवले तसे! फक्त अमेरिकेकडे भरपूर पैसा, सामर्थ्य आहे, इथला समाज गेली दोनशे वर्षे जागृत आहे, भ्रष्टाचार कमी, न्यायव्यवस्था बलवान आहे. खर्याखुर्या अर्थाने This is the land of opportunity आहे. आणि हे करण्यासाठी त्यांना कसल्याहि आरक्षणाची गरज भासली नाही! भारतात त्याच्या उलट. एकाला नोकरी म्हणजे दुसर्याच्या पोटावर पाय अशी परिस्थिती आहे. म्हणून विरोध. समाज जागृत नसल्याने वाईट लोकांचे फावते. पूर्वी एका समाजाकडून तर आता दुसर्याचे जनतेवर अन्याय होणार. मुसलमान नि इंग्रज यांच्याकडून शेकडो वर्षे सगळ्याच भारतावर अन्याय झाला. कारण कुणिच त्याला परिणामी प्रतिकार करू शकले नाहीत. मग भोगा अन्याय. एकी नाही, नक्की विचार, सामाजिक, राजकीय जागृति नाही, भ्रष्टाचार इ. जेंव्हा अनेक वर्षांनी जेंव्हा सामाजिक नि राजकीय जागृति झाली तेंव्हा सगळे मिळून इंग्रजांना हाकलून दिले नि मुसलमानांना थोडे फार तरी काबूत आणले. तर असे आरक्षण करून एकदम हा प्रश्न सुटणार नाही. आधी सामाजिक उन्नति करा, कायद्याची अंमलबजावणी लाच न घेता करा. कारण माझ्या माहीती प्रमाणे भारतात पण कायदा आहे की नोकरी देताना जातपात, धर्म इ. वरून नोकरी नाकारण्यात येणार नाही. आधी जे मिळाले त्याचा उपयोग करून तुमचे तुम्हाला जमत नसेल, तर आणखी देऊन काऽही फरक पडणार नाही. शिवाय आहे कुठे भारताकडे एव्हढी संपत्ति, संधि की जी अशी एका गटाला देऊन टाकावी?
|
Laalbhai
| |
| Sunday, July 16, 2006 - 3:13 pm: |
| 
|
आधी सामाजिक उन्नति करा, आणि ती कशी करायची म्हणे? मुळात सामाजिक उन्नतीची "तुमची" व्याख्या काय आहे? अमेरिका आणि भारत यांची direct तुलना (तुम्ही करता आहात असे नाही पण) करणे शक्य नाही. मला अमेरिकनांचे श्रेय कुठेही हिरावून घ्यायचे नाहीये. त्यांनी जी प्रगती केली ती त्यांच्या बुद्धीच्या जोरावर आणि कष्टांवर केली. ह्यात मतभेद असण्याचा प्रश्नच नाही. पण मी वारंवार हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की एकाचे निकष "जस्से च्या तस्से" दुसर्याला लावता येत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ, १. अमेरिकन लोक, जेंव्हा अमेरिका प्रगत नव्हती तेंव्हा, आपली मायभूमी सोडून पैशाच्या लोभाने इतरत्र गेले नाहीत. ते तिथेच ठिय्या मांडून बसले आणि सर्व प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत पुढे गेले. त्यामुळे अमेरिकेला बराच फायदा झाला. शिवाय जगातल्या अनेक देशातून हुशार समजली जाणारी मंडळी, स्वतःची मायभूमी सोडून, land of opportunity च्या पायाशी नतमस्तक झाली. त्याचाही फायदा अमेरिकेच्या प्रगतीलाच झाला. २. अमेरिकेची सामाजिक परिस्थिती आणि भारताची सामाजिक परिस्थिती यात महदांतर आहे. भारतात अढरा पगड जाती, पोटजाती, धर्म.. काय विचारू नका. आणि त्यातून प्रत्येकाच अभिमान वगैरे... काय आहे, कसे काय कुणास ठाऊक भारतात समंजस आणि हुशार लोकं पहिल्यापासूनच कमी! ह्यांचा मुख्य लोभ कातडीवर. गोर्यांची शी सुद्धा इथले तथाकथित सवर्ण आनंदाने धुतील. त्यांच्या लाथाही आनंदाने खातील. ही मानसिकता सुरवातीपासूनच आहे. कुणीसे म्हटले आहे ना की गोर्यांच्या नाटकी अश्रुंची किंमत ही काळ्यांच्या खर्या अश्रुपेक्षाही जास्त असते! आपल्याच लोकांची दुःख आपल्याच लोकांना खोटी, नाटकी वाटतात, त्याला कोण काय करणार? अनेक लोकं उद्बोधन करुन करुन थकली आणि मेली. असो. तो विषय वेगळा. पण सांगायचे काय, की सामाजिक परिस्थितीत फार फरक आहे. ३. महत्त्वाचे असे की अमेरिकेची प्रगती जेवढी चमकदार दिसते, वरुन, तेवढेच काळे त्यात दडलेले आहे. अमेरिकेचे मूळ नागरिक red indians नष्ट झाले! त्यांनी काही स्वतःची प्रगती करून घेतली नाही. तर त्यांना तशी संधीच देण्यात आली नाही. आणि पद्धतशीरपणे त्यांना संपवण्यात आले. आणि काय आहे बरं का झक्की, शिव्या द्यायला का ssss ही म्हणता का ssss ही अक्कल लागत नाही. म्हणजे तेंदुलकर शुन्यावर आउट झाला की त्याला शिव्या द्यायला काय लागते? पण ऐन पीचवर जाऊन एक बॉल खेळायला हिंमत लागते, नाही का? तसेच आहे. मला सांगा, भारतामधे कोणता सुबुद्ध माणूस तुम्ही म्हणता तसा "सामाजिक उन्नती" मधे भाग घेतो हो? संधी मिळाली की सगळे land of opportunity कडे धाव घ्यायला आसुसलेले असतात. मग तुमच्यासारखी "प्रामाणिक" (!) तळमळ असणारे लोकं भारतात असायचेच कुठुन? त्यामुळे असे होते. स्वतःला बुद्धीवादी म्हणवणारी सगळी मंडळी स्वतःची कुटुंबे च्या कुटुंबे land of opportunity ला migrate करतात. त्यांची मुले, नातवंडे, पतवंडेही तिकडचीच होतात. तिकडेच लग्न वगैरे करून settle होतात. आणि तिकडून मग भारतात हे नाही, भारतात ते नाही, भारत अस्साच आणि भारत तस्साच अशा शिव्या देत बसतात. म्हणजे बघा हां की एखादी व्यक्ती जी पुन्हा कधीही परत भारतात येण्याची शक्यता नाहीये, जिने भारताच्या तथाकथित सामाजिक उन्नतीसाठी काहीही योगदान दिलेले नाहीये, तिला वास्तविक भारतातल्या लोकांनी असे करावे आणि तसे करावे, हे सांगण्याचा नैतिक अधिकार काय पोचतो? पण नाही, सल्ले देणे आणि सत्यनारायणाची पोथी वाचणे यात काही फरकच राहिलेला नाहीये हो! दोन्हीकडे जबाबदारी गळ्यात पडण्याची शक्यता शून्य असते ना!असू द्या. अमेरिका कशी चांगली नाही, याची उदाहरणे मी देत नाही. किंवा बुशला परत निवडून देणारी ही अमेरिकन जनता किती बिनडोक आहे, याचे उदाहरणही मी तुम्हाला देत नाही. पण अमेरिका आणि भारत यांची तुलना "जश्शी च्या तश्शी" होत नाही, इतके माझे सांगणे आहे. तुम्हाला पटणार नाही, मी काय म्हणतो ते. पण जाऊ द्या. तुमचे विचार आहेत, तसेच माझेही विचार आहे ना?? जरा जास्तच लांबले, माफ करा, पण समजले नाही तर सोडून द्या.
|
Laalbhai
| |
| Sunday, July 16, 2006 - 3:32 pm: |
| 
|
झक्की, वरती जे मी लिहिले ना.. "करंटे जाहले सर्व" ते मूळ काव्य असे की, करंटे जाहले सर्व जो तो बुधीच सांगती सगळीकडे उपदेशाचे डोस पाजणारी इतकी मंडळी दिसत असताना, समाजात जिकडेतिकडे करंटेपणाच कसा दिसतो आहे? असा त्याचा अर्थ. शब्दांमधेही चूक असू शकते. सहज आठवले म्हणून सांगितले.
|
Zakki
| |
| Sunday, July 16, 2006 - 5:40 pm: |
| 
|
<म्हणजे बघा हां की एखादी व्यक्ती जी पुन्हा कधीही परत भारतात येण्याची शक्यता नाहीये, जिने भारताच्या तथाकथित सामाजिक उन्नतीसाठी काहीही योगदान दिलेले नाहीये, तिला वास्तविक भारतातल्या लोकांनी असे करावे आणि तसे करावे, हे सांगण्याचा नैतिक अधिकार काय पोचतो?> म्हणजे माझी वैयक्तिक ओळख नसताना तुम्ही हे ठरविले. ठीक आहे. शिवाय मी 'असा असा' असल्याचे तुम्ही ठरवले, म्हणून माझे बोलणे चुकीचे आहे! मला तर माझ्या विषयातल्या तीस वर्षाच्या अनुभवाबद्दल सुद्धा तिथल्या लोकांनी गतवर्षी असेच सांगीतले. म्हणून म्हंटले जाऊ दे, कशाला आपण देशप्रेमाच्या नावाखाली कमी पैशावर, आवडत नसलेल्या परिस्थितीत राहून काम करायचे. सुदैवाने इथे आरक्षण नसले तरी, मनात आल्यावर लगेच मला नोकरी मिळाली. तेंव्हा खरे आहे तुमचे म्हणणे! भारत सोडला, त्यामुळे आता खरे तर मी भारताबद्दल काऽहीच बोलायला नको!करून बघा तुमच्या मार्गाने उन्नति. त्रास होणार नाही मला. माझी खात्री आहे, हुषार, नि कष्टाळू लोक कुठल्याहि परिस्थितीतून डोके वर काढतील. तर यातूनहि ते मार्ग काढतील. शिवाय पैसे दिले, पुरेसा आरडा ओरडा केला की कुठलेहि निर्बंध तुम्हाला भारतात रोखू शकत नाहीत. (त्या दृष्टीने भारतहि Land of opportunity आहे. ) आता त्याचा फायदा घेऊन सामाजिक, राजकीय उन्नति करायची की फक्त चांगल्या लोकांना दडपून स्वार्थी हेतू साध्य करायचे हे ज्याचे त्यानी ठरवावे, जसे मी माझ्यासाठी ठरविले. कायदा पास झालाच आहे, तर Best of Luck.
|
Laalbhai
| |
| Sunday, July 16, 2006 - 6:39 pm: |
| 
|
माफ करा. मला तुमच्याबद्दल खरेच काहीही माहिती नाही. तुम्ही(ही) भारत सोडलात का? का? कधी? मी आपला एक general बोललो. तुम्हाला ते का बोचले कळले नाही मला! माझ्याबद्दल काही माहिती नसताना तुम्हीही मला बरेच बोललात की राव. मी कुठे अशी भावनिक बोंब मारली? मी मगाशी म्हटले तसे, जसे तुमचे विचार तसेच माझे विचार. दोघांचेही विचार आपण आजुबाजूला पाहिलेल्या परिस्थितीच्या, आपापल्या analysis मधून आलेत म्हणू आणि सोडून देऊ, काय?
|
Peshawa
| |
| Sunday, July 16, 2006 - 10:25 pm: |
| 
|
मला सांगा, भारतामधे कोणता सुबुद्ध माणूस तुम्ही म्हणता तसा "सामाजिक उन्नती" मधे भाग घेतो हो? तुम्ही इतका उन्नती मधे भाग घेताय ह्याचा अर्थ काय लावयचा? pray explain
|
स्वरुप, सारन्ग, चान्गल्या पोस्ट्स हेत! मी अजुनही या विषयाला हात घालत नाही हे! तुमचे चालु द्या
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 7:13 am: |
| 
|
pray explain मंग, सगळे सुबुद्ध अमेरिकेला पळाल्यावर भारतात फक्त कम्युनिस्टच उरले ना! अमेरिकेच्या सुबुद्धांचे direct मार्गदर्शन आम्हाला लाभत नाही, त्यामुळे सगळे अडते!
|
Soultrip
| |
| Monday, July 17, 2006 - 11:45 am: |
| 
|
>>>मंग, सगळे सुबुद्ध अमेरिकेला पळाल्यावर भारतात फक्त कम्युनिस्टच उरले ना!>>>> तसे होऊ नये म्हणुनच बरेच सुबुद्ध ( read, capitalists! ) भारतात परतले आहेत
|
Saranga
| |
| Monday, July 17, 2006 - 12:46 pm: |
| 
|
समाजात दारीद्र जेवढे जास्त तेवढा समाजात तनाव होउन विशमता वाढते. गेल्या १००० वर्षात परकीयान्च्या लुटी मुळे भारतात ही विशमता वाढत गेली. ही विशमता घालवन्यास wealth creation ची खरी गरज आहे, becoz as the wealth pie increases in size, more people are absorbed in the process to sustain it and this increases overall wealth in all sections. Please check in history whenever there has been wealth in society social mobility has increased in effect reducing the gap. आता ४७ नन्तर आपण काय उपाय केले for economic growth? १. Land Reforms - comrades नी अगदी जोशात चान्गले काम केले बन्गाल आणि केरळात. many landless labourers got lands which was a very good thing. पण सामराज्यवादा चा विरोध आणि militant labour union च्या दबावाखाली किती कारखाने comrades ने उभे राहु दिले? परिणाम काय झाला, ३-४ पिढ्या न्नतर जमिनीचे एवढे लहान तुकडे झाले की धड १ कुट्मुबाला पोट भरणे मुश्कील झाले, पण नोकरी नाही मिळु शकली. २. Labour Union मार्क्स ने class struggle बद्दल जे विचार मान्डले, तो काळ काय होता? due to colonisation there was no free and fair trade in the world. Germany hardly had any colonies although it was industrially forward and so labour suppression was rampant. He had the history of French revolution in front of him and from that he proposed his thoughts. But how much efforts have the comrades put in to reform Marx's ideas to make it relevant to the current world environment. How usefull it is to blindly oppose globalisation inspite of the evidence that it helps to improve national wealth? ३. Labour reforms - the labour unions barely cover 10% of the workforce which is in the organised sector. But comrades are just not sensitive to include the remaining 90% into the mainstream labour markets thorugh reforms which will usher more width & depth in industrial activity and percolate the wealth creation to so many more people. ४. wealth creation requires enterprise & dedication. Please study the Parsi community how against many odds they settled in India, and even here they faced persecution by Muslim overlords but ultimately they overcame all odds to not only create wealth for themselves but also for the whole nation. They never demanded reservation of any sort in any sphere and yet they are successful. This also shows they had self confidence in their efforts and abilities. Will reservation in jobs inculcate such positive values? ५. wealth creation is enhanced by freedom to organise & act on any enterprise. Infact it also stimulates egalitarian ideals thus improving social status of all the society. Government can help by providing infrastructure & equitable laws with proper enforcement. But Govt. cannot be all encompassing authority to enforce economic & social ideals on all citizens, individual as well as corporate, this lesson the comrades are not ready to learn inspite of the recent experiment by Indira Gandhi to nationalise & enforce emergency. गरीबी हटाओ च्या घोशना देउन काही झाले नाही. Reservations in jobs will be another such attempt meddle with the workings of market forces.
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 2:18 pm: |
| 
|
भारतात परतले आहेत हो कळतंय ते.. गोंधळ वाढलेले दिसताहेत ना! बाकी तुम्ही स्मायली वगैरे टाकून गप्पा मारण्याच्या मूड मधे आलात वाटते परत.. चांगले आहे.. चांगले आहे. चालू द्या..
|
Swaroop
| |
| Monday, July 17, 2006 - 2:29 pm: |
| 
|
लालभाइ, तुम्ही म्हणता तस इतिहासाला लटकणं सोडुन देवुयात..... आपापले व्यक्तिगत अनुभवही थोडा वेळ बाजुला ठेवुयात.... मला तुम्ही एका प्रश्नाचे केवळ होय किंवा नाही मध्ये उत्तर द्या.... पण अगदी प्रामणिकपणे... तुमच्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन.... एका अतिशय गरीब पण सवर्ण घरातुन आलेल्या एका हुषार मुलाला डावलुन एका दलित पण सुखवस्तू घरातुन आलेल्या.... कि ज्याच्या आधीच्या पिढीने आरक्षण उपभोगलेले आहे आणि त्या मुलानेसुद्धा त्याच्या शालेय शिक्षणापासुन अगदी उच्चशिक्षणापर्यंत आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे, अशा मुलाला (भलेही तो तितकाच हुषार असला तरी) केवळ जातीच्या आणि जातीच्याच निकषावर नोकरीत प्राधान्य देणे... तुम्हाला पटते का?
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 2:31 pm: |
| 
|
how much efforts have the comrades put in to reform Marx's ideas to make it relevant to the current world environment. माझी तुमच्या शंकेला पूर्ण सहमती आहे. मी चर्चेच्या सुरवातीलाच म्हटले होते की प्रत्येक इझमची मूलभूत तत्त्वे कालपरत्त्वे बदलावी लागतात, त्यात मार्क्सवादही आलाच! माझे वरील चर्चेतील सुरवातीचे काही पोस्ट्स वाचलीत तर मी याच अर्थाचे म्हणतोय, हे लक्षात येईलच. ही विशमता घालवन्यास wealth creation ची खरी गरज आहे हे अर्धसत्य आहे! wealth creation बरोबरच wealth distribution ही योग्य प्रमाणात व्हायला हवे. लक्षात घ्या भारत जेंव्हा अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला तेंव्हाही देशात करोडोनी भुकेकंगाल, दरीद्री लोक होते. असो. हे वाढवता येईल. सध्य इतकेच. Government can help by providing infrastructure & equitable laws with proper enforcement. But Govt. cannot be all encompassing authority to enforce economic & social ideals on all citizens, individual as well as corporate, this lesson the comrades are not ready to learn inspite of the recent experiment by Indira Gandhi to nationalise & enforce emergency. Dear sir, I guess you are confusing yourself with many things. Emergancy has nothing to do with reservations what is being proposed. Both are completely different issues and by no means, can be brought together! Please study the Parsi community how against many odds they settled in India, I request you to study history of Parsi community. Nowhere you will see "oppressed" Parsi in the history. Comparing Parsi's with "opressed" class illogical. How usefull it is to blindly oppose globalisation inspite of the evidence that it helps to improve national wealth? It is again misimpression about communists. Communists are not opposing Globalisation. If you are ready to thing positively, then they are asking for balanced growth.
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 2:36 pm: |
| 
|
एका अतिशय गरीब पण सवर्ण घरातुन आलेल्या एका हुषार मुलाला डावलुन माफ करा. कुणालाच डावलायचा प्रश्न नाहीये. हजार वर्षे अमुकांनी अन्याय केला म्हणून आता त्यांच्यावर अन्याय करा, अशी आमची धारणाच नाहीये. कोणत्याही समाजात उपेक्षित वर्ग असेल तर त्या समाजात शांतता असू शकत नाही. त्यामुळे सवर्ण काय, अवर्ण काय, कुणाचीच संधी डावलली जायला नकोय. हे कसे साधायचे यावर केंद्राने स्थापलेल्या समितीत विचाविनिमय चालू आहेत. They are more capable people. They will define right policies.
|
Saranga
| |
| Monday, July 17, 2006 - 2:51 pm: |
| 
|
Dear Sir, Reference to Indira Gandhi is in respect to 'Garibi Hatoa' slogan and rampant wave of nationalisation that followed. It only increased government interference in free enterprises and led to red-tape and corruption. The policy of Reservations in Pvt sector is also a step in such direction where mindless interference in the market economy will lead to nothing but corruption and possibly erosion of the strategic advantages that indian enterprises have. Reference to emergency came becoz the idea of state control, either by 1 person or by 1 idealogy, is detrimental to the society. And everyone knows who supported Indira Gandhi for emergency.
|
Saranga
| |
| Monday, July 17, 2006 - 2:59 pm: |
| 
|
History of Parsis is relevant becoz when they landed on the shores of Gujrat after ethnic cleansing by the Muslims in Iran, they hardly had any belongings. They did not inherit any wealth. Even later, when muslims invaded Sindh & Gujarat they were persecuted by the Muslim overloards. It was only during the British rule that Parsis established themselves in the trade & manufacturing in the Bombay province and created wealth. And they looked to its distribution also through setting extensive charitable trusts.
|
Peshawa
| |
| Monday, July 17, 2006 - 5:01 pm: |
| 
|
1. They are more capable people. They will define right policies. Surrender is the first marxist trait ... Control is second... and utopia is a classic dream of this idiotic ideology... 2. हे अर्धसत्य आहे! wealth creation बरोबरच wealth distribution ही योग्य प्रमाणात व्हायला हवे. लाल logic = आणि ते कसे करायचे हे सरकारने ठरवायला हवे. आणि सरकार आमचेच असायला हवे. नसेल तर सशस्त्र क्रंती आहेच... 3. किंवा बुशला परत निवडून देणारी ही अमेरिकन जनता किती बिनडोक आहे लालभाई उवाच : स्वतःची चड्डी फाटकी आहे, त्यामुळे झाकायचे ते उघडे पडले आहे. पण तिकडे लक्ष न देता, दुसर्याच्या कपड्यांवरची ठिगळे शोधण्यातच काय धन्यता मानली जाते, या लोकांकडून, काय कळत नाही... 4. communist and balanced growth laalbhai with due respect to your XXXX logic and thinking.. there is nothing that can be termed as "balanced" growth... secondly communism and balance is oxymoron with emphasis on "moron".
|
Peshawa
| |
| Monday, July 17, 2006 - 5:07 pm: |
| 
|
To moderators: I don't understand your selective deleting of posts on the V&C BBS if you are following any policy please let us know.
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 5:16 pm: |
| 
|
Moderators, Administrators, पेशवा यांचे वरील लिखाण हा ही एक personal attack च आहे. "अमेरिकन जनतेबद्दल" मी जे विधान केले ते तोडून फोडून वापरण्यात आलेले आहे. आणि दुसर्या BB वरचे संदर्भ त्याला जोडण्यात आलेले आहेत. मी वारंवार उल्लेख केला की हा BB साम्यवाद कसा चूक आहे, ह्याची चर्चा करण्याचा नाहीये. तरीही पेशवा आणि काही मंडळी पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून चुकीच्या मार्गाने मला गप्प करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी ही तक्रार नाही आणि तुमच्या नजरेतून हे सुटले आहे, असेही नाही. पण मायबोलीवरची जुनी लोकं द्वेशापोटी बेजबाबदार वागून चुकीचा पायंडा पाडीत आहेत, असे मला वाटते. बाकी तुमची मर्जी. योग्य अयोग्य ठरवायला तुम्ही समर्थ आहातच.
|
Laalbhai
| |
| Monday, July 17, 2006 - 5:40 pm: |
| 
|
Reference to emergency came becoz the idea of state control, either by 1 person or by 1 idealogy, is detrimental to the society. And everyone knows who supported Indira Gandhi for emergency. Ganghi.... LOL... some of our elements supported but I stress that "emergency" was not at all a right move. It was wrong and Gandhi paid for that! CPI(M) opposed the emergency! The "garibi hatao" slogan came after that. And I believe, (not quite sure though) that the 5 year plan was modified for that slogan. It was not that government intereferance was increased "after" that slogan. But it was there since the beginning of Independant India. That is what they call as "license raj". I do not understand what do you mean by "government intereferance increased after that". Can you explain? Parsi's This is what exactly I am trying to say! Please note the difference. Parsi's had a good history. So eventhough they got ruined because of invasion or ethnic cleansing, they could re-establish themselves. This "history" is lacking in oppressed class of India. They do not have good history at all! I do not want to blame anyone. But the fact is that, for years and years, this particular class does not have education/prosperity/respect! How do you expect them to stand on their own feet in no time?( Mind well, my point is that "50-60 years is very less time.) Now, if we are on same page, that we have acknowledged the problem, we can move forward to find out feasible solution.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|