Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 16, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Reservation in Private Sector » Archive through July 16, 2006 « Previous Next »

Laalbhai
Friday, July 14, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांचीच काही पोस्ट्स आहेत याच BB वर असे म्हणणारी.

Ninavi
Friday, July 14, 2006 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे आहेत??????? मला तर एकही अशी पोस्ट दिसत नाही.

Laalbhai
Friday, July 14, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोधतो. १०, १२ पानात नक्की कुठे आहे ते शोधावे लागेल. meanwhile झक्की पुढे येऊन उत्तर देतील अशी अपेक्षा आहे.

Laalbhai
Friday, July 14, 2006 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wednesday, June 28, 2006 - 5:16 pm:

>>>> posted by Zakkee

>>>

ज्यांना आज आरक्षण नाकारले जात आहे (कारण ते सवर्ण, ब्राम्हण वगैरे आहेत म्हणून)त्या लोकांनी कुठल्याहि आरक्षणाच्या कुबड्या न वापरता अनेक वर्षे अभ्यास नि अक्कल या जोरावर उच्च स्थान मिळवले. ब्राम्हणांचे राज्य होण्यापूर्वी मराठ्यांचेच राज्य होते की! मग पेशवे का सर्वसत्ताधारी झाले? त्यांना कुणि आरक्षण दिले? ते नुसतेच अक्कलवान नाही तर प्रसंग पडल्यावर लढवय्ये झाले. नि राज्य धरून बसले होते. त्या लोकांनी इतरांवर कसा अन्याय केला? इतर लोक काय उगाच त्यांचे ऐकत होते? त्यात त्यांना काही तरी पटण्यासारखे होते म्हणूनच ना ते ऐकत होते? त्यांच्यापैकी जे तोडीस तोड होते असे इतर जातीचे लोकहि तेव्हढेच सत्ताधारी बनले होतेच की!

त्यांच्यावर अन्याय झाला ही केवळ इंग्रजांनी नि कम्युनिस्टांनी उठवलेली थाप आहे! 'फोडा नि झोडा' ही इंग्रजांची कूटनिती प्रसिद्धच आहे.

कम्युनिस्टांना नाही तरी सगळीकडे उगीचच 'संघर्ष', 'क्रांति' पेटते ठेवायचे असतात. आजपर्यंत कम्युनिस्ट देशातल्या कुणाचेहि कुठल्याहि रितीने भले झालेले नाही. आता इतर विचारप्रणालि सुद्धा काही निर्दोष नाहीत हे नक्कीच, पण हे असले संघर्ष नुसतेच पेटवून पुढे काय?

अहो हे पन्नास वर्षांपूर्वी सुद्धा भारतात आरक्षण आलेच होते. जेंव्हा प्रथम आरक्षण सुरू झाले तेंव्हा एका प्रसिद्ध पुढार्‍याने म्हंटले होते कि 'इतके दिवस आमच्या बायकांनी बामणांच्या घरी भांडी घासली, आता बामण बायकांना आमच्या घरी भांडी घासायला ठेवू!!
हीच का तुमची महत्वाकांक्षा? यालाच तुम्ही उद्धार म्हणणार का? शेवटी फक्त तसेच झाले काही ठिकाणी. पण अजूनहि हे खर्‍या अर्थाने 'नालायक' लोक आपले आरक्षण मागतातच आहेत! अजूनहि त्यांच्यात पात्रता नाही, म्हणून ज्यांच्याजवळ आहे त्यांचे काढून ज्यांच्याजवळ नाही त्यांना जबरदस्तीने द्यायचे? नि पुढे काय?
शेवटी पात्रता, जगातील अडचणींवर मात करण्याची हिंमत असेल तर कुणीहि कुठेहि यशस्वी होऊ शकतो (शकते). ज्यांना आज OBC वगैरे म्हणतात त्यातल्या कित्येकांनी पूर्वी काय कमी प्रमाणात यश मिळविले? आंबेडकर, इ.?

अमेरिकेतले काळे, मागून आलेले इतर देशातले लोक या कुणालाहि आत्ता आत्तापर्यंत काऽहिही आरक्षण मिळत नव्हते. ज्यांच्यात लायकी होती ते सरकारात गेले, निवडून आले, प्रसिद्ध बनले आणि ज्यांच्यात ते नाही, असे अनेक जण आपले उगीचच माफक यश मिळवून रडत बसतात 'भारतात बरय बुवा, नोकर मिळतात, स्वस्ताई आहे' असे.


Ajay
Friday, July 14, 2006 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेणे, ही काल्पनिक घटना आली.
माझी ज्ञानेश्वरांच्या पायधुळीलाही स्पर्श करायची लायकी नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. पण रेड्याच्या तोंडातून वेद म्हणवणे हे काल्पनिक नाही तर कुणालाही शक्य आहे, अगदी तुम्हालाही.

इथे पहा आणि कृपया दिवे घ्या. :-)

Laalbhai
Friday, July 14, 2006 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL Ajay.. याचाच संदर्भ योग मला देत होते काय?

Ajjuka
Friday, July 14, 2006 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>Guess wot ppl... Maharashtra Govt. has passed the bill on 50% reservatn for SC/ST. This was done amidst the confusn of the serial blasts.

Media has hardly covered this news. TOI just gave a small snippet on its front page.

Pass this to everyone... This is just an example of how cruelly opportunistic our politicians are.<<

मला आत्ताच माझ्या ऑर्कुट वर ही मेल मिळाली...
याला म्हणतात मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणे.


Zakki
Friday, July 14, 2006 - 10:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, म्हणजे हा प्रश्न आता संपला! मग आता आपले नाव SC/ST मधे लावायला कुणाला किती पैसे द्यायचे?

माझी खात्री आहे, काही लोक याहि संधीचा (गैर)फायदा उठवतील. आणि खरे SC/ST यांच्यापर्यंत ही बातमी पोचूच देणार नाहीत. विशेषत: कम्युनिस्ट लोकांना हे चांगले जमते. कारण मग त्यांना पुन: 'संघर्ष' चालू ठेवायला कारण मिळते. एकदा ५० टक्के जमले की मग तुमचे पैसे आम्हाला द्या, तुमची घरे आम्हाला द्या वगैरे 'प्रगति' करायला संधि आहे.

एक सूचना: ज्याप्रमाणे इथे सरकारी नोकरीत minority ला जागा देऊन सरकार 'आदर्श' घालून देते त्याप्रमाणे तेथील सर्व मंत्र्यांनी, नि निवडून आलेल्या लोकांनी आपले accountants, chauffers, stock broker, domestic servants, body guards, advisors इ. सर्व नोकर्‍या SC/ST यांना ताबडतोब द्याव्यात. म्हणजे आपोआप ५० टक्क्याहून जास्त लोकांना नोकर्‍या मिळतील नि लगेच कायदापालन होइल.

आता आपल्याला लालभाईशी वाद घालायची गरज नाही. पण लालभाई आता काय करणार? समजा तो 'संघर्ष' चालू ठेवण्याचे काम न करता काही विधायक कार्य, कविता, लेख विनोदी लिखाण करेल तर मायबोलीवर शांतता येईल.


Laalbhai
Friday, July 14, 2006 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, आता या वयात तट्ट फुगलेल्या पोटावर (आणि खिशावर!) हात फिरवत असताना, तुम्हाला संघर्षाचे वावडे असणे, मी चांगलाच समजू शकतो!

मायबोलीवरच्या शांततेची काळजी वहायला moderators & admin समर्थ आहेत हो. तुम्ही फक्त "रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी" सारख्या, वारंवार लोकांच्या कुरापती काढणे बंद करा. मायबोली चालवणार्‍यांना तेवढीच मदत होईल.


Limbutimbu
Saturday, July 15, 2006 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> झक्की, आता या वयात तट्ट फुगलेल्या पोटावर (आणि खिशावर!) हात फिरवत असताना,
काय हो झक्की, हे मी काय वाचतो हे? काल चतुर्थी होती ना? मग? उपास नाही केलात? तस्सेच सकाळी सकाळी प्वाटभर ब्रेडबटर जाम लावुन हाणुन इथे येवुन टायपायला बसलात ना? छी छी छी! काय म्हणावे या कर्माला! अहो दलित तळागाळातले शोषित यान्चे बद्दल बोलताना या लालभाईन्चे कोनते नियम पाळावेत, कोणती ड्रेपरीत यावे हे काहीच कसे हो तुम्हाला ठावुक नाही?
हे बघा झक्की, इथुन पुढे तुम्हाला किन्वा लालभाइ सोडुन कुणालाही या विषयावर बोलायचे असेल तर त्याने आधी किमान दोन दिवस निर्जळी उपाशी राहिले पाहीजे, मगच तुम्ही लिहिलेल्या शब्दाला तळटळाटाचा, जळफळाटाचा सुगन्ध प्राप्त होइल, हां हवे तर तुम्ही आता श्रावण लागलाचे हे तर चतुर्थ्या एकादशी वगैरे मुहुर्त धरुन लिहू शकता, नाही म्हणजे अगदीच उपास निभत नसेल तर या दिवशीच्या उपासाने पुण्यापरी पुण्य पदरात आणि लालभाइचा नियमही पाळल्याचे समाधान, कसे?
आणि हो, इथुन पुढे तुम्हाला जर या विषयावर बोलायच असेल तर तुमचे ते बुशकोट (श्रीमान बुश यान्चेशी या शब्दाचा जवळचा सम्बन्ध हे त्यामुळे तो शब्दही खरे तर वर्ज्य) तर शर्ट पॅन्ट, कमरपट्टा, गळपट्टा (लोक याला कन्ठ लन्गोट असेही म्हणतात), घोटुन रोज केलेली दाढी, पायात पॉलिश केलेले बुट, अन्गावर मारलेला फ़्रेन्च सेन्ट असल्या अवतारात इथुन पुढे तुम्ही फिरायचे नाही! तुम्हाला असले विषय बोलायची येवढी खाज हे ना? मग तुम्ही पान्ढरा कुर्ता पायजमा घातला पाहीजे, कुर्त्यावर नी पायजम्याच्या पार्श्वभाग नि गुढग्याच्या ठिकाणी काळ्या दोर्‍याने केलेला रफु कम्पल्सरी! तुमच्या गळ्यात म्हणजे इकडच्या खान्द्यावरुन पलीकडच्या कुशीकडे लटकणारी शबनम (लाम्ब एकेरी पट्ट्याची पिशवी) हवी नी त्यात लाल लाल शाईने लिहिलेली हस्तलिखिते, पत्रके वगैरे हवे! तुमची दाढी अस्ताव्यस्त वाढलेली हवी अन पायजम्याच्या नाडीचे एक टोक बाहेर डोकवत असले पाहीजे! तुमच्या दाढीत मधे मधे पिकलेले पान्ढरे केस दिसायला हवेत, जर नसतील तर पान्ढरे कलप लावुन ते रन्गवले पाहीजेत! (जशी सोनियाबाई सासुची नक्कल करते तस), तुमच्या मिशान्चे केल ओठ झाकणारे असले पाहीजेत अन तुमच्या कपाळावर कायम उभ्या आडव्या आठान्चे जाळे पाहिजेम, तुम्ही काहीही बोलु लागलात तर तुमच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या पाहीजेत व असे मुठी आवळलेले हात बोलताना मधे मधेच हवेत उडविण्याची लकब तुम्ही आत्मसात केली पाहीजे, तुमचे ओठ पान खावुन लालभडक झालेले असले पाहीजेत आणि लाल लाळेचे ओघळ ओठाच्या कडेतुन दाढीवर ओघळलेले दिसले पाहीजेत, पान खात नसाल तर बायकोच्या लिपस्टिक वापरुन तो परिणाम साधुन घेता येइल! तुमचे डोळे सदाचे वटारलेले अन ताम्बारलेले असले पाहीजेत, डोळे ताम्बारुन घ्यायला आदल्या रात्रीचे बुधवार व्रत कामास येउ शकते, न आल्यास हे झक्की, पावशे अमेरिकन नवटाक अर्थात हातभट्टीची मारुन तुम्ही तुमचे डोळे ताम्बारुन घेवु शकता! तुमच्या घरामागच्या परसात तुम्ही तुमचा हातभट्टीचा कुटिरोद्योग चालु करु शकता! तुमच्या पायात रबरी सपाता किन्वा अन्गठा तुटलेली कोल्हापुरी सोलापुरी वगैरे चामडी चप्पल पाहीजे, अन तिच्या टाचा झिजुन पार चपट्या झालेल्या हव्यात तरच टाचा घासुन मरणे (किन्वा मारणे) वगैरे विषयान्वर बोलायचा अधिकार तुम्हाला प्राप्त होइल!
येवढे सगळे झाल्यावर तुमच्या लटकत्या शबनम मधे निळी, काळी, लाल, पान्धरी अशा रन्गाच्या गान्धिछाप टोप्या हव्यात! लक्षात ठेवा, तुमच्या कडे चुकुनही भगव्या रन्गाची टोपी किन्वा कोणतीच वस्तु असली नाहि पाहिजे! तुमच्या मनगटावर कसले कसले लाल काळे दोरे गच्च बान्धलेले पाहीजेत नि गळ्यात देखिल करगोटा घातला पाहीजे, याचा उपयोग शिरा ताणताणुन भाषण करताना शिरान्ना आधार म्हणुन होतो!
झक्की अजुन एक राहीलेच, तुम्ही आधीच कोकणस्थी घारे गोरे, तर तुमचे तसे रुपडे असल्या विषयान्वर बोलायला चालणार नाही, तेव्हा पहिले झूठ उठायचे अन चेरीची डबी काढुन त्यातले बुटपॉलिश हातावर घेवुन चेहर्‍याला व्यवस्थित फासायचे! तुम्ही पुरेसे काळे बिन्द्रे दिसू लागल्यावरच तुम्हाला शोषित दलित वगैरे विषयान्वर बोलायचा अधिकार प्राप्त होइल! हां, आता बुटपॉलिश चालणार नसेल तर बायकोची काजळाची डबी घ्यावी! अन ती बुटपॉलिशची डबी शबनम मधे ठेवावी, दुसर्‍या कुणा अशाच गोर्‍या XX पान्डे, लेले वगैरेन्च्या तोन्डाला फासायला उपयोगी पडेल!
येवढ सगळ झाल की तुमच्याकडच एखाद मोडक तोडक पेन गळ्याच्या खाली बटणपट्टीवर अदकवल की काम तमाम!
झक्की येवढ तुम्ही कराच, अन मग या इथे शोषित, दलित, रिझर्वेशन वगैरे विषयान्वर बोलायला! कराल ना झक्की येवढ? किमान लालभाइच्या समाधानाकरता तरी येवढ कराच!
हो उद्या कावळाच शिवला नाही तर काय घ्या! DDD
मॉड्स, अत्यन्त उपरोधिक पणे ही पोस्ट लिहिली हे! तिचे काय करायचे ते करा!


Swaroop
Saturday, July 15, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बू..... सही रे.... अगदी अशीच अपेक्षा असते या लोकांची.....
मी ही चर्चा बरेच दिवसांपासुन वाचतोय.....
अजुन बरेच मुद्दे येतील.... तेन्व्हा आरक्षणाच्या पाठीराख्यांनो.... मैदान सोडुन पळु नका....

एक अनुभव सांगतो....
आमच्या engg च्या admission वेळची गोष्ट:
माझा एक मित्र बारावीला चांगल्या मार्क्सनी उत्तीर्ण झाला.... तो OBC होता... त्याला सातार्‍याच्या college मध्येच admission घ्यायची होती... आणि ती त्याला आरामात मिळत होती..... actually तो इतका सरळमार्गी होता कि त्याने reserve category चा फ़ॉर्म घेतला...... पण नंतर काही दिवसांनी कळले की त्याच्या घरच्यांनी त्याला फ़ॉर्म बदलायला लावुन open मधुन admission घ्यायला लावली.... आणि ती seat आपल्या एका जातभाई ला मिळवुन दिली....
असा घेतला जातो... आरक्षणाचा फायदा!

आता सांगा.... कोण करतय शोषण?... आणि कुणावर होतोय अन्याय?
हीच अक्कल जर थोडा अभ्यास करुन, स्वतहाची गुणवत्ता वाढवण्यात वापरलीत तर तुम्हाला आरक्षण मागण्याची गरजच उरणार नाही....


Swaroop
Saturday, July 15, 2006 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिक्षणाकरता आरक्षण मी एकवेळ समजू शकतो.... तुम्हा लोकांना समान पातळीवर येण्यासाठी दिलेली एक संधी असती ती....
मग एकदा समान पातळीवर ( educational qualifiacation wise ) आल्यावर परत नोकर्‍यात कशाला हवय आरक्षण?

बर आता सरकारी नोकर्‍यात मिळालय ना आरक्षण.... काय दिवे लावलेत तिकडे?..... सगळा अनागोंदी कारभार..... आहे ना तुमच्यात गुणवत्ता... मिळालीय ना संधी आणि अधिकार.... त्याचा काय उपयोग केलात?

आणि शोषणाच्या गोष्टी तुम्ही सांगू नकात..... आज कुठल्याही सरकारी कचेरीत जावुन बघा... कशी मिळती सवर्णांना वागणुक?.... मी हवेत नाही बोलतेय.... माझे बाबा गेली ३० वर्षे सरकारी नोकरीत आहेत..... पण आरक्षणाच्या जोरावर वयाने, अनुभवाने आणि गुणवत्तेने कमी असुनही अधिकारपदावर गेलेले तुमचे लोक शासनयंत्रणा कशी राबवतात हे फार जवळुन बघितलय.... जातीवरुन कोण कोणाला टोमणे मारते, ते तिथे जावुन बघा एकदा!

माझ्या एका मित्राचे वडील गेली अनेक वर्षे सातारच्याच एका नामवंत शिक्षणसंस्थेत न्यानदानाचे पवित्र कार्य करत होते.... आदर्श शिक्षक म्हणुन त्यांचा गौरवही झाला होता... खेड्यापाड्यातल्या शाखात जावुनही या गृहस्थाने खुप चांगले काम केले होते.... पण या आरक्षणाने एक ढोर समाजातला शिक्षक, मुख्याध्यापक होवुन त्यांच्या डोक्यावर येवुन बसला.... आणि त्याने त्यांचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.... विद्यार्थ्यांसमोर त्याने यांना भटा-बामणा असे संबोधण्यास सुरुवात केली.. non-teaching कामे देणे, नावडते विषय शिकवण्यास लावणे असा हर प्रकारे छळ... शेवटी या सालस माणसाने VRS घेतली!

असा उठवला "तुमच्या" लोकांनी आरक्षणाचा फायदा.....


Saranga
Saturday, July 15, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई, इतिहासाच्या कुठल्या सन्धर्बा वरुन तुम्ही निष्कर्श काधलात सवर्न आत्याचाराचा?

सन्धर्ब सोडुन इतिहासाच विश्लेषन केले की वैचारीक गोन्धळ होतोच. आन्ग्ल शिकशीत लोकान्त अजुनही अशी समजुत आहे की ईग्रज राज्य भारतासाठी चान्गले होते, आणी हा ईग्रजान्च्या शैक्शणीक धोरणान्चा परीणाम.

regarding caste discrimination, our view is generated from the history we have been tought about India and please mind this history was elucidited by the so called indologists of west. Please go to this site
http://india_resource.tripod.com/social.htm
to understand what i mean and then form your opinion.

Santu
Saturday, July 15, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वरूप
असाच एक "ढोर मुख्यमंत्रि"मागे सोनिया मायनो
ने आमच्या डोक्या वर बसवला होता.
आता त्याला चांगला आम्ही लोकांनी "ओपन मतदार संघा" तुन निवडुन दिला होता.पण शेवटि जातिवर गेलाच.
अनुकंपा तत्वावर सुध्दा नोकरया याने जातिवर भरल्या.

सारंगा
अहो पुर्वि रशियात सुध्दा ज्यु लोकांच्या मुलींना
शाळेत जाताना युनिफ़ोर्म वर पिवळा बिल्ला लावावा लागे.(हा बिल्ला वेश्या ना लावणे तेव्हा रशियात बंधन कारक होते.)तसेच ज्यु लोकांना घोड्यावर बसणे ला मनाई होती युरोपात.
असल काहि आप्ल्या कडे कोणि केले नाहि


Zakki
Saturday, July 15, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबूटिंबू, काय उत्तम शब्दचित्र रंगवले आहेस! एकंदरीत तू पण आता कथा कादंबर्‍या, वगैरे लिहून प्रसिद्ध हो.

काय दिवे लावलेत तिकडे?..... सगळा अनागोंदी कारभार....
स्वरूप, मला वाटते, या बाबतीत, कुणाही एका वर्गाची मक्तेदारी नाही. त्यात आरक्षणहि नाही. भारतात कुणिही कुठल्याहि नोकरीत, धंद्यात असेल तिथे जातपात, वय, भाषा स्त्री पुरूष असा कुठलाहि भेदभाव न करता अनागोंदी कारभार अगदी कौतुकास्पद तडफदारीने सर्व लोक करत असतात!

"रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी" , अहो न्हावी असतो, तर आत्ता भारतात आलो असतो! फुकट नोकरी!
इतके दिवस ते खरे होते. पण २४ जुलै पासून ते बंद होईल. कारण मला एक नोकरी लागली आहे, खास पगार वगैरे नाहीये, (महागुरूला सांगीतले तर फारच अचंबा वाटेल, एव्हढा पगार, नि हुद्दा काहीच नाही!)पण तट्ट फुगलेल्या पोटाचा घेर कमी करायला नि तट्ट न फुगलेल्या खिशाची भर करायला भरपूर कष्ट घेईन म्हणतो.

त्याचे काय आहे, शिक्षण शिकवून मिळते, त्यासाठी आरक्षण ठीक आहे (जर लोक त्याचा फायदा घेत असतील तर) पण काहीना काही कष्ट करायला लागल्यावर आपोआप अक्कलपण येते. याचे एक उत्तम उदाहरण:

गतवर्षी, पुण्याहून बंगलोरला (अगदी सेकंड क्लासनेच गेलो बरे का!) जात असता एक अत्यंत गरीब असा लहान मुलगा डबा झाडून भीक मागत होता. मी विचार केला गरीब आहे, काही तरी उपयोगी काम करतो आहे, म्हणून एक पाच रुपयाचे नाणे दिले. जरा वेळाने बघितले तर तोच मुलगा, तीच घाण डब्याच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकाकडे नेऊन पुन: लोकांची सहानुभूति नि भीक मिळवत होता. आता शिक्षण मिळालेले लोक याला फसवा फसवी म्हणतील, पण बिचार्‍या अशिक्षित, गरीब मुलाला काही ना काही तरी करून धंद्यातला नफा वाढवायचा होता! आता या मुलाला जर कुठलिही साधी नोकरी दिली, नि फसवा फसवी करू नये असे शिकवले, तर त्यातहि तो आपली अक्कल चालवून चांगले काम करेल यात मला शंका नाही.

पण मुद्दा असा की आधी त्या बिचार्‍याने कष्ट केले, अक्कल दाखवली नि मगच त्याला नोकरी मिळावी असे मला वाटू लागले. नि त्याला काय एकदम तुम्ही असिस्टंट कलेक्टर करणार का? नाहीच, पण इतर कामांना तो आपोआप अगदी Open मधे सुद्धा select होईल. लक्षात ठेवा, धंदा करणार्‍यांना जातपातीपेक्षा चांगले काम हवे असते. फक्त सरकारातच कामाचा नि नोकरीचा काही संबंध नसतो. म्हणून म्हंटले आधी मंत्र्यांनी नि निवडून आलेल्या लोकांनी स्वत:च्या कामांसाठी आरक्षण द्या, मग बाकीचे बघा.


Mahaguru
Sunday, July 16, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातच काय पण इतर देशातही हिच समस्या आहे असे दिसतय ..
हि बातमी पहा :
http://www.saamana.com/2006/July/16/Link/antarashtriya2.htm


Swaroop
Sunday, July 16, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती कुणाच्या तरी एका पोस्टमध्ये मी वाचले.... ब्राह्मणांची लॉबी वगैरे.... मला तरी लॉबी वगैरे म्हणण्याइतकी एकजुट या समाजात तरी आढळळेली नाहिये... आणि समजा असेलच तर काय चुकीचे आहे....

तुम्ही लोकांनी आरक्षण केलीत.... यांना सरकारी नोकर्‍या नाकारल्यात.... आता हे लोक ऐकमेकांच्या मदतीने वर आले तर तुम्ही याला लॉबी म्हणता.... वा!

आज जे तुम्हाला चांगल्या पदाला पोचलेले वा उद्योजक बनलेले सवर्ण दिसतायत... ते सगळेच काही गर्भश्रीमंत नव्हते.... तुम्हा दलितांनी भोगले नसेल एव्हढे दारिद्र्य या लोकांनी भोगलेय..... मध्ये सकाळ मध्ये उद्योजकांवर एक लेखमाला येत होती ती वाचली असती तर कळल असते प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करता येते....
घरोघरी पेपर टाकुन.. पार्टटाइम जॉब करुन शिकलेले लोक त्यांच्या कष्टाने आज जेन्व्हा श्रीमंत झालेत... तर ती श्रीमंती का तुमच्या डोळ्यावर येतीय....

या सवर्ण लोकांनी कष्टाने कमावलेल्या पैशातुन उभारलेल्या उद्योगात कुणाला नोकरी द्यावी हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे..... त्यात ढवळा ढवळ करणारे सरकार कोण?
देत असेल काही सवलती सरकार या उद्योगांना... पण म्हणुन सरकार्ने विकत नाही घेतले हे उद्योग! .... कुठपर्यंत हस्तक्षेप करावा याला ही काही मर्यादा आहेत...

हे म्हणजे, सरकार रेशन दुकानातुन सवलतीच्या दरात साखर देते म्हणुन त्या साखरेपासुन कुठला पदार्थ बनवायचा.... हे देखील सरकार ठरवणार की काय?


Laalbhai
Sunday, July 16, 2006 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



करंटे जाहले सर्व,
जो तो "इतिहास" सांगतो||

सारंगदादा, इतिहासाचा माझा अभ्यास तुमच्याइतका सखोल नाहीये, पण शहुमहराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावरकर, आंबेडकर, आगरकर, सगळे च्या सगळे संतपुरुष (आणि स्त्रिया) यांना एकतर इंग्रजांची फूस होती किंवा ते माथेफिरू होते, हे पटायला कठिण जाते.

जाउ द्या, इतिहासाला लटकणे सोडून देऊयात, असे आधीच म्हटले आहे.


Saranga
Sunday, July 16, 2006 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाराज, परकीय लोकानच्या राज्यात जेन्व्हा शेतकी उत्पन्नातुन कर भरणे अशक्य होते, पोट भरण्यासाठी मुलान्ना विकावे लागते, गावच्या गावे प्लेगने ओसाड होतात, तेन्व्हा समाजातला तनाव वाढुन caste discrimination ला चलना मिळती, ही इतीहाची शिकवण which either you are not capable to understand or purposely ignore.
Those who forget history are condemned to repeat it, first time as tragedy and later as comedy. So comrades your quest for Reservation alone will not produce egalitarian society but create a new class of FB (forwards in backwards) who will continue to loot the most backward.


Laalbhai
Sunday, July 16, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Now wait a minute, तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच विषयाकडे जाताय म्हणून परत विचारतो.. तुम्हाला असे म्हणायचे आहे का की

" cast descrimination म्हणजे सवर्णांकडून इतरांवर झालेला अन्याय, अत्याचार हा पारतंत्र्याच्या अगतिकतेतून झाला, आणि तो सर्वस्वी क्षमेस पात्र आहे? "

माझे तर अजुन म्हणणे आहे की इतिहासाला लटकणे सोडून देऊयात, मुद्दा तो नाहीये. पण माझी नक्की काय समजावून घ्यायची पात्रता नाहीये, हे एकदा कळले तर बरे होईल. :-)


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators