|
माझा एक प्रश्ण आहे Bhaba Atomic reserch Center मधे reservation का नसते हो ? त्यांचे म्हणणे आहे की त्याना quality detoriate करायची नसती reservation increases quality goes downwords असे तर नाही ना ? उत्तर कुणीही द्यावे.
|
>>>>>लिंबूटिंबू, तुमची तशीच धारणा असेल तर सक्तीने तुमचा सुंता करवून तुम्हालाच "मागास" करण्यात आम्हाला काहीच वाटणार नाही. लालभाई, तुझी पोस्ट सन्दर्भ हीन असल्याने "अनुल्लेखाने" मारावी की काय याचा मी विचार करतो हे! तरीही, जागतिक माहितीप्रमाणे सुन्ता मुसलमानात केली जाते, आमची सक्तीने तशी करवुन आम्हाला "मागास" करणे याचा अर्थ याक्षणी तुम्हास तमाम सुन्ता केलेले मुसलमान "मागास" हेत असे म्हणायाचे आहे का? तस असेल तर जगातले तमाम लालभाई बरेच "सुधारले" असे म्हणावे लागेल! लालभाई, तुम्ही खरच धाडसी आहात! आभाळातला लाल देव तुम्हाला सुयश देवो! आणि तरीही, लालभाई, तुमचा बहुतेक सर्व लाल्यान्चा होतो तसा घोळ झाला हे असे वाटते. लाल्यान्च्या राजकीय तत्वज्ञाना नुसार तुम्हाला सक्तीची "सुन्ता" नव्हे तर "नसबन्दी" अपेक्षित असणार....! आणि यात नवलही नाही! लाल भाई, मी सान्गतो ऐका, आधी नेमके शब्द योजायला शिका! मग सक्तीच्या वगैरे उठाठेवी करायचा विचार करा! (च्यामारी, नेमक काय करायच ते डोचक्यात फिक्स नाही आणि चालले सक्तिच्या लाल वान्त्या क्रान्त्या करायला!) DDD
|
Laalbhai
| |
| Friday, July 07, 2006 - 6:26 am: |
| 
|
कम्युनिझम ही गोष्टच मला वरकरणी हेतुतः मानव्य भासली तरी बिनबुडाची आणि अव्यवहार्य वाटते. अर्थात हे माझं मत आहे. पूर्ण चर्चा वाचली असती तर कम्युनिझम विषयी ज्यांना चर्चा करायची आहे, त्यांनी नवीन BB उघडावा, असे मी सांगितले होते. इथे फक्त reservation आणि अनुषंगिक गोष्टींची चर्चा करू. तुमच्या पहिल्या प्रश्नाला मी प्रामाणिकपणे उत्तर दिले होते. तुमचा दुसरा प्रश्न गांभिर्याची टवाळी करणारा आहे. तो तुमच्या कम्युनिझमद्वेशातून आलेला आहे. वास्तविक माझ्या उत्तरात मी फक्त वस्तुस्थिती विषद केली होती. त्यात माझ्या विचारसरणीचा कोठेही संबंध नाही. पण कम्युनिझमला विरोध म्हणजे "माझ्या प्रत्येक गोष्टीला विरोध" अशी तुमची व्याख्या असेल तर कोण काय करणार? भले भले ही या पूर्वग्रहातून सुटले नाहीयेत. अर्थात, तुमच्या ह्या वरच्या मतामधे कम्युनिझमचा तुमचा अभ्यास किती आणि तुमचा नक्की सामाजाविषयीचा अनुभव काय, हे विचारायला मी जात नाही. कुठेतरे वाचलेली वाक्ये संदर्भ सोडून वापरणे हे आजकालच्या तथाकथित बुद्धीवंतांचे व्यवच्छेदक लक्षण झालेले आहे, (किंवा असे करणे म्हणजेच बुद्धीवंत म्हणवून घेणे, असे झाले आहे.) त्यात तुमची तरी काय चूक?
|
Laalbhai
| |
| Friday, July 07, 2006 - 6:32 am: |
| 
|
जणू काही यांना 'ग्रेस्केल्स' मान्यच नाहीत. त्यामुळेच काही हेतु बरे असले तरीही त्यांची अंमलबजावणी करताना टोकाची भूमिका, अतिरंजितपणाच्या मार्गाने गोष्टी हाताळल्या जातात. Thanks for editing your post. This is good approach for discussion.. I appreciate this. Thing is that,we always confuse ourselves with theory and it's execution in practice. If the execution is wrong, we tend to blame theory. Which is totally injustice to the theory. Further, we will stop discussing communism here. And restrict our discussion to reservations only. Thanks.
|
Laalbhai
| |
| Friday, July 07, 2006 - 6:44 am: |
| 
|
"अनुल्लेखाने" मारावी की काय याचा मी विचार करतो हे! तुला हे ज्या दिवशी जमेल तो दिवस मायबोलीने सुदिन म्हणून साजरा करावा, अशी मी सर्व सभासदांस ("लाल" रंग न वापरता) विनंती करेन! BTW मला सुंताच म्हणायचे होते. मी असे म्हटले की अजुन चर्हाट सुरु करशील याची मला कल्पना होतीच. गप्प बसणे तुमच्या स्वभावात नाही रे. आपला जिथे संबंध नाही, किंवा जे आपल्याला पटत नाही, तिथे गप्प बसले, तर जगबुडी होत नाही, हे जेंव्हा तुला आणि तुझ्या मायबोलीवरच्या "विचार - भाईंना" कळेल, तेंव्हा खरोखरच सुदिन म्हणावा लागेल. जागतिक माहितीप्रमाणे सुन्ता मुसलमानात केली जाते, ही तुझी वैयक्तीक माहितीही अर्धवट आहे. तुझे ज्ञानवर्धन केले असते, पण तो BB चा विषय नाही. विषयाला धरून बोलायचे नसेल तर गप्प बैस आता.
|
>>>>> तुला हे ज्या दिवशी जमेल अगदी अगदी लालभाइ, आणि सगळे नाहीत पण किमान काहीजणान्ना तरी तुझ्या सुचनेचीही गरज पडणार नाही याची खात्री बाळग DDD बाकी तमाम लालभाईन्ना कोणी कोणी काय काय न केल्यास ते ते सुदीन भासतील याच्याशी अर्था अर्थी मला कर्तव्य नाही! त्या त्या सुदीनाच्या मनोराज्यात रमण्यापासुन मी कोणत्याही लालभाइला परावृत्त करु शकत नाही.... सुन्ते बाबत मी जे लिहिले तेच परफेक्ट हे! तरीही, वैद्यक शास्त्रात क्वचित काही पुरुषान्च्या लिन्गाच्या टोकाकडील आवरणास काही एक छेद द्यावा लागतो त्यासही सर्रास "सुन्ता" असे अज्ञानाने सम्बोधले जाते ते चूक हे! तू म्हणतोस तसे हा या बीबी चा विषय नाही पण "सुन्ता" हा शब वापरुन पहिल्यान्दा तूच हे विषयान्तर केल हेस, वाटल्यास सुन्ता या विषयावर दुसरा बीबी उघड मी तुला अद्ययावत माहिती देतो! "तर गप्प बैस आता"..... अगदी अगदी याच प्रकारे दुसर्याना गप्प बसायला लावणारी सक्ती शाब्दिक रुपात का होइना सामोरी येते तेव्हा कुणाला कम्युनिझम आठवला तर त्यात काय चुकले? तरीही, तू म्हणतोस तसे, आणि हा बीबी बन्द पडु नये, माझ्या तुझ्या पोस्ट्स उडविल्या जावु नयेत या सदिच्छेने मी काही काळ आवरते घेतो... तोवर तुझे लाल चर्हाट चालू दे! तुझी स्वप्नरन्जने वाचण्यात तशी माझी करमणुक होते आहे हेही मला मान्य करावेश लागेल!
|
कृपया परस्परांवर वैयक्तिक शेरे मारण्यापासून दूर रहा. विषय वादग्रस्त, आणि मते विरुद्ध टोकाची असतील तर पोस्ट करताना जास्त काळजी घेणे जरुरी असते! सूज्ञास अधिक सांगायची गरज नाही असे वाटते..
|
Pinaz
| |
| Friday, July 07, 2006 - 2:23 pm: |
| 
|
moderator इथे तुम्हाला कोण सूज्ञ दिसले बाई? दिवा घा रे सगळ्यांनी..
|
Pinaz
| |
| Friday, July 07, 2006 - 2:25 pm: |
| 
|
मी तर आता एक नाटकच लिहिणारे.. "या विचारवंतांचं करायचं काय?" pro आणि anti reservation वाल्यांनी पहायला या बरं का.
|
Yog
| |
| Friday, July 07, 2006 - 4:48 pm: |
| 
|
अरे जरा सबूरीने बाळानो.. नाहितर विनय भाऊ ने हे वाचले तर "सुंता है मेरा खुदा.." असे काहितरी तो मि ऐकलेली चूकिची गाणी मधे लिहील आणि मग त्यातील sensitive शब्दामूळे इथे प्रत्त्येक BB चा भिवन्डी होईल.. 
|
Peshawa
| |
| Friday, July 07, 2006 - 5:10 pm: |
| 
|
लालभाइ मी उपस्थित केलेल्या अनेक मुद्यांना आपण सोयिस्कर बगल दिलि आहे असो... मी मला ह्या चर्चेत समजलेले आरक्षण सम्र्थनार्थ तुम्ही मांडलेले मुद्दे परत लिहितो... १. विशिश्ठ caste असलेल्या लोकांcयात अनेक वर्श सवर्णानी प्रगतिचे मार्ग बंद केल्याने सामाजिक व वैचारिक मागासलेपण आले आहे... २. समाजात त्यामुळे imbalance झाला आहे... आणि ह्या मुळे लोकशाहित घेतले जाणरे निर्णय एककल्लि असु शक्तात समाज जास्त चांगल्या तर्हेने विकसित करण्यासाठि imbalance कमि असणे मह्त्वाचे आहे किंवा imbalance कमि करणे हाच समाज उत्तम विकसित असल्याचे लक्शण आहे... २अ. ह्या ऐतिहासिक अन्यायाचा न्याय झाला पाहिजे ( sic ) ३. शिक्शण आणि त्यावर अवलंबित योग्य संधी मागास वर्गियाना देणे हाच imbalance कमि करण्याचा उपाय आहे. ४. हा समाज ज्या परिस्थित रहातो त्या परिस्थितित व सवर्णाच्या परिस्थित जमिन अस्मानाचा फ़रक आहे त्यामुळे पात्रता जोखताना ह्याचा विचार हो णे गरजेचे आहे... cultural context is important to evaluate one's IQ/EQ ५. आणि हे सगळे reservation मुळे साध्य होउ शकते.... किंबहुना झाले आहे... आणि म्हणुनच reservations चि व्याप्ति वाढवलि पाहिजे... लालभाइ अजुन काही add करायचे elaborate करायचे असल्यास करावे हि विनन्ति... मग त्या अनुशंगाने मला माझे मुद्दे परत मांडता येतील
|
सुंता है मेरा खुदा.." >>>>> LOL. लालभाई, मुसलमानांना अजुन आरक्षण नाही ते ओपन मधेच आहेत अस माझा समज आहे. तो चुकीचा आहे का? असे असल्यास ते देखील सवर्ण झाले का? माझ्या समजावर पुढील मुद्दा लिहितो, जर मुसलमानांना पण आरक्षण असेल तर तो दुर्लक्ष करा वा उत्तर द्या. त्यांची लोकसंख्या भारताच्या १६ १७ टक्के आहे व ते देखील अशिक्षीत आहेत, गरीब आहेत. ( सायकलची दुकाने, गैरेज, रद्दीवाला अशी फुटकळ कामे करतात) मग त्यांना का नको आरक्षण? विचार करन्यासारखा मुद्दा आहे. मग परत एकदा सरकार एवढ्या मोठ्या लोकसंख्येला दुर्लक्ष करत आहे असे वाटते म्हणून आर्थेक आरक्षण ( त्यांचा आर्थीक स्तिथी वर आधारलेले) योग्य आहे व जातीय नाही. मग लाल क्रांतीत (झालीच तर) तुम्ही मुसलमानांना उपेक्षनार आहात का? थोडावेळ सवर्ण दलीत ओबीसी मुसलमान हे सर्व बाजुला ठेवुन विचार करा की मदतीची गरज कोणाला आहे, उत्तर सापडेल.
|
पेशवा, हां, हे ठीक हे! आणि अजुन मुद्दे येवुदेत! मग एकेक मुद्याची "चिरफाड" करीन! तोवर मॉड्स च्या सुचनेची गम्भिर दखल घेवुन गुपचुप बसतो! केदार, तुझाही मुद्दा विचारात घेण्यासारखा हे! स्पेसिफिकली मुसलमानान्च्या आरक्षणाचा! पेशवाने लालभाइचे म्हणुन जे मुद्दे मान्डले आहेत त्याला उत्तर देताना किन्वा त्या विरुद्ध मुद्दे उपस्थित करताना तुझ्या मुद्यान्चा आधार घेता येणार हे! पिनाझ, अग नाही दिसले म्हणुन तर "सुज्ञपणाला" आवाहन केल हे ना! (अर्थात आता विकेण्ड आलेला असल्याने माझ्याकडुन सहसा या दोन चार दिवसात पोस्ट होणे कठीण हे!)
|
Mahesh
| |
| Saturday, July 08, 2006 - 5:15 am: |
| 
|
लालभाई आणी सर्वजण, सर्व लिखाण एकसलग वाचले. सर्व चर्चा चांगली चालू असताना, नुकतेच त्याला वैयक्तिक वादाचे स्वरुप आलेले दिसते. तसे करु नये ही विनंती. लालभाई या व्यक्तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. (उपरोधाने म्हणत नाही.) पण आपल्या विचारांशी ठाम राहून, एकट्याने एवढ्या विरोधी विचारांशी लढणे आणी ते सुद्धा अतिशय सौम्य आणी मुद्देसुद भाषा वापरून हे फार फार कठिण आहे. मायबोलीवरच्या खुप जुन्या जाणत्या आणी सर्वच लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की या चर्चेला जर कोणी वैयक्तिक वादाचे स्वरुप देत असेल तर त्याला तत्काळ आवर घाला.
|
महेश, तुमच्या पोस्ट मधिल कळकळीच्या विनन्तीस व अन्य मजकुरास अनुलक्षुन आणि अर्थात त्याचा आदर ठेवुन "नुकत्याच त्याला आलेल्या वैयक्तीक वादाच्या" स्वरुपाच्या उत्पत्तीबद्दल माझ्यापुरते पुढील सन्दर्भ देवु इच्छितो! (कारण तुम्ही नाव घेण्याचे टाळुन "कोणी" असा उल्लेख केला हे! व लालभाइन्च्या भाषेला सौम्य असे सम्बोधले हे! या इथे आधीच्या कर विषयक पोस्ट्स चा धागा पकडुन, मी काही एक पोस्ट केली हे, त्यात कोणताही वैयक्तीक रोख आपणास दिसणार नाही! मात्र या बदल्यात उत्तरादाखल लालभाइ याची ही पोस्ट मला केवळ स्लिप ऑफ टन्ग वाटत नाही आणि तरीही, मी ते मनावर न घेता त्यास यथोचित व समयोचित उत्तरच द्यायचा प्रयत्न केला हे! काय हे ना की या बीबीचा विषय नाही हे पण एकदा का "लिम्बुटिम्बु" या आयडीचे नाव कानफाट्या पडल्यागत झालेले असल्यामुळे तुमच्या "कोणी" या उल्लेखामुळे मला हे पोस्ट टाकावे लागले! अर्थात, आपली सुचना मान्यच हे! शक्यतो माझ्या पोस्ट्स मधे मी वैयक्तीक आरोप टाळतो व वैयक्तीक पातळीवर माझ्याकडुन कधिच चर्चा उतरु देत नाही.. मी या ठिकाणी केलेल्या उत्तरात देखिल मी बगल म्हणुन समस्त "लालभाई" अर्थात "कम्युनिस्ट" आणलेत जेव्हा आधी कुठेतरी लालभाइ या आयडीने कुणावर तरी कम्युनिझमला मधे आणण्यास विरोध केला होता! अता माझ्या त्या पोस्ट मधे तुम्हाला खटकणारे जाणवत असेल तर लालभाइच्या आधीच्या पोस्ट मधिल सरासर बेमुर्वतपणे "आमच्या" सुन्ता करण्याच्या उल्लेखालाच ते धरुन हे, आणि उचकविण्याचा येवढा प्रयत्न जाणता किन्वा अजाणता झाल्यानन्तरही, तशा अर्थाने माझी ती पोस्ट फार म्हणजे फारच सौम्य हे! आणि खाजगी क्षेत्रातील रिझर्वेशन्स या बीबी वर, ती असणे योग्य की अयोग्य याची चर्चा होतानाच त्याला पाठिम्बा देणारे किन्वा विरोधक अशा दोघान्च्याही भुमिकेची तसेच खाजगी क्षेत्रातील कम्पनी व्यवस्थापनाच्या भुमिकेची चर्चा व त्या त्या भुमिकान्चा समाचार घेणे होणारच नाही का? होऊ नये का? तशी होत नसेल तर ही चर्चाच अपुरी राहील, आणी सुरवातीपासुन हाच सूर आळवला जात असल्यानेच केवळ मी या बीबी कडे फारसा फिरकलो नाही हे! कृपया आपला किन्वा अन्य कुणाचा गैरसमज नसावा म्हणुन ही पोस्ट मी टाकली हे!
|
Laalbhai
| |
| Saturday, July 08, 2006 - 7:00 am: |
| 
|
सुंता है मेरा खुदा.." >>> ha ha ha अरे त्या लिंब्याच्या आचरटपणावर मी अधिक आचरटपणा केला, ते कसले मनावर घेता?? पुढे चलूयात.. महेश, धन्यवाद.. मुख्यतः विचारांवर निष्ठा हवी. विचारांवर निष्ठा नसली की "भय" निर्माण होते. त्यातून कट्टरतावाद आणि दहशतवाद वाढीस लागतो. असो. केदार, मुस्लिमांबाबत तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. शिक्षण नसल्यामुळे आर्थिक प्रश्न उभे रहातात त्यांना योग्य मार्गाने तोंड देणे या लोकांना शक्य होत नाही. मग चुकीच्या मार्गाला लागतात. पण अजुन त्या दृष्टीने फारसा विचार झालेला नाही हे मान्य करावेच लागेल.
|
Laalbhai
| |
| Saturday, July 08, 2006 - 7:18 am: |
| 
|
१. विशिश्ठ caste असलेल्या लोकांcयात अनेक वर्श सवर्णानी प्रगतिचे मार्ग बंद केल्याने सामाजिक व वैचारिक मागासलेपण आले आहे... इतिहासाला लटकणे सोडून देऊयात. कुणी कुणावर अन्याय केला हे उगाळण्यात अर्थ नाही. वस्तुस्थिती ही आहे की समाजतला एक मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित आहे. दारिद्र्यात खितपत पडला आहे. त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. अमुक एकांनी आधी अन्याय केला म्हणून आता त्यांच्यावर अन्याय करा, अशी आमची धारणा नाही. फक्त जे सुस्थितीत आहेत, त्यांनी आपल्याला या "सुस्थितीचे" आपल्याला किती फायदे झाले, आणि आपणही या मागास समाजासारखे दरिद्री असतो, तर आपण इतकी प्रगती केली असती का? याचा प्रामाणिक विचार करावा. २. समाजात त्यामुळे imbalance झाला आहे... आणि ह्या मुळे लोकशाहित घेतले जाणरे निर्णय एककल्लि असु शक्तात समाज जास्त चांगल्या तर्हेने विकसित करण्यासाठि imbalance कमि असणे मह्त्वाचे आहे किंवा imbalance कमि करणे हाच समाज उत्तम विकसित असल्याचे लक्शण आहे... ३. शिक्शण आणि त्यावर अवलंबित योग्य संधी मागास वर्गियाना देणे हाच imbalance कमि करण्याचा उपाय आहे. वैचारिक मागासले पण शिक्षणाने जाते किंवा वैचारिक imbalance घालवण्यास शिक्षण उपयोगी पडते, हे मला फारसे पटत नाही. (ते तसे पडत असते तर बुश परत एकदा अमेरिकेचा अध्यक्श झाला नसता.) पण किमान एक बरे आयुष्य जगण्याची संधी जन्माला आलेल्या प्रत्येकाला मिळायलाच हवी. ती प्रत्येकाला उपलब्ध करून देणे हे समाजातल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. imbalance वैचारिक नाही, तर रहाणीमानातला बदलायचा आहे. शिक्षणाने नोकरी मिळते, नोकरी असेल की पैसा मिळतो. दरिद्रीपण संपते. ४. हा समाज ज्या परिस्थित रहातो त्या परिस्थितित व सवर्णाच्या परिस्थित जमिन अस्मानाचा फ़रक आहे त्यामुळे पात्रता जोखताना ह्याचा विचार हो णे गरजेचे आहे... cultural context is important to evaluate one's IQ/EQ बरोबर आहे. जिथे जगण्याची भ्रांत आहे, तिथल्या मुलाला आर्थिक मदत करून ९५ % मिळवायचा आग्रह धरणे हा अन्याय आहे. ५. आणि हे सगळे reservation मुळे साध्य होउ शकते.... किंबहुना झाले आहे... आणि म्हणुनच reservations चि व्याप्ति वाढवलि पाहिजे... मी वारंवार म्हटले आहे की reservation हा एक अत्यावश्यक उपाय आहे. only उपाय नाही. त्याच्या जोडीनी reservation चे फायदे घेण्यासाठी तळागाळ्यातल्या लोकांपर्यंत पोचून जागृती केली पाहिजे. reservations हे खुप यशस्वी झाल्याचा दावाही मी केला नाही. पण योग्य प्रमाणात राबवले तर त्याचा फायदा अधिकाधिक होईल.
|
Laalbhai
| |
| Saturday, July 08, 2006 - 7:24 am: |
| 
|
पेशवा.. तुमचे प्रश्न प्रामाणिक आहेत, असे समजून उत्तर दिले आहेत. पुढे आपला प्रतिसादही प्रामाणिकपणे चर्चा पुढे नेणाराच असेल, याची कृपया काळजी घ्यावी. तुमची आमच्या विचारसरणीबद्दलचे दुषित मतं तुमच्याजवळ असू द्या. त्याचा परिणाम या चर्चेत होऊ देऊ नका, असा आग्रह आहे. या चर्चेत सुरवातीपासूनचे तुमचे बोलणे पहाता, तुम्हाला अशी सूचना करणे भाग पडले. सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.
|
>>>>> अरे त्या लिंब्याच्या आचरटपणावर 1st half मी अधिक आचरटपणा केला, 2nd half 2nd half एकदम मान्य 1st half पुर्ण अमान्य! DDD
|
जातीय आरक्षण हे सार्वजनिक क्षेत्रात पुरेपुर पणे उपभोगले जात आहे, आणी त्याचे परिणामही आपण सरकारी कचेर्यात आपण पहात असतो. हे कमी पडले की काय म्हणून खाजगी क्षेत्रातही हे आरक्षण लागु करत आहेत. आरक्षन हे शहरी ग्रामीण आणी आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणी सबल घटक अशी वर्गवारी होयला पाहिजे. आणि हा अरक्षणाचा कायदा लागु केला तरी त्याचा काही उपयोग होइलच असे वाटत नाही. खाजगी व्यवस्थापणात उगिच खोगीर भरती केली जाईल का भरती करताना जे गुणवत्तेचे निकश लावले जातात ते बदलण्यास खाजगी क्षेत्रातील कंपन्या तयार होतील का
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|