|
Zakki
| |
| Saturday, July 01, 2006 - 12:38 pm: |
| 
|
आर्थिक आरक्षण हा मुद्दा म्हणून मान्य आहे, पण आपली सगळीच सरकारे भणंग भिकारी! ते मदत करणार म्हणजे वीज फुकट देऊन आणखी अडचणी निर्माण करणार. हे काम सरकारचे नसून खाजगी संस्थांनी करायचे आहे. माझी खात्री आहे की इथे येणारे लोक (कम्युनिस्ट असो, OBC असो, किंवा इतर असोत), कळकळीचे नि प्रामाणिक कार्यकर्ते असावेत, पैसे न खाता ते हे काम करू शकतील. खाजगी कं या कामावर देखरेख करून कामे करणार्यांची पण काळजी घेऊ शकतील. मला स्वत:ला असे वाटते, की आमची पिढी अगदी फुकट गेली! लोकसंख्या वाढवण्यापलिकडे त्यांनी काही केले नाही. सुदैवाने नवे तरूण या भ्रष्टाचाराला नि नकर्तेपणाला कंटाळले असावेत, जागतिक पातळीवर स्पर्धा करायची असेल, तर भ्रष्टाचार, नि भ्रष्टाचारापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे कामे न करणे, कुठलेहि काम होणे दुरापस्त होऊन बसले आहे, उगीचच, Attitude . ते आधी सुधारले पाहिजे.
|
कारन शेतकरि सवर्न नाहित...म्हनुन अविनाशी, गैरसमज होतोय किंवा करुन घेताय. ईथे आपन सवर्ण दलीत अशी चर्चा करत नाहीयेत तर आरक्षण असावे का ह्या बद्दल हा BB आहे. शिवाय शेतकरी हे फक्त OBC/ SC-ST असतात का? असे तुम्हाला का वाटते. traditionally मराठा समाज हा शेतकरी असतो व आतातर बहुतेक सर्व जाती शेती करतात. मी स्वत्: अनेकदा लिहिले आहे की जातीयवादातुन आपण बाहेर आलो पाहीजेत तर परत तोच मुद्दा आपण का मांडताय.
|
Saranga
| |
| Sunday, July 02, 2006 - 9:47 am: |
| 
|
जो पर्यन्त प्राथमीक शिकष्ण universal & high quality चे होत नाही, तो पर्यन्त reservation in higher education and jobs will benefit only the creamy layer amongst backward classes. जर पाया पक्का नसेल तर कुठलीही इमारत टिकणार नाही, तरी आरकषणाच्या कितीही कुबड्या लावल्या तरी लालभाई ज्या मागसलेल्या वर्गा बद्दल एवढ्या कळवळीने बोलतायत त्याला ह्याचा काडीचाही फ़ायदा नाही. these reservations will only benefit those in BC who can afford good primary education and after few years there will be cry to bifurcate OBCs into MBC & rest. But removing castes from OBC list will never happen due to political reasons. Only if like politicians some guys want to corner all the benefits in the name of backwards, there will never be any end to reservations and in turn this debate will go on for ever. http://in.rediff.com/money/2006/jul/01quota.htm
|
Soultrip
| |
| Monday, July 03, 2006 - 7:26 am: |
| 
|
Friends, sorry for interrupting this debate. In yesterday's Times of India there was a news about how CII (Confederation of Indian Industries) has finally given in to the Govt. pressure & is finalizing a policy to implement reservations in private sector! I guess, they will come up with some guidelines like 20% quota at the entry level (to begin with), which anyway will snowball to bigger percentage (at ALL levels) in the near future. (The tiger has tasted the blood 60 years ago & his hunger has only quadrupled over the years!) ...SO, no point in debating it here or unnecessarily mud-slinging on each other. We need to accept it (along with so many other bitter pills we had/have to swallow)& just move on (to steadfast survival on our own)!
|
Laalbhai
| |
| Wednesday, July 05, 2006 - 6:53 am: |
| 
|
Soultrip, Thanks for sharing this news.. unnecessarily mud-slinging on each other. >>> Thanks again for accepting that you were doing this thing..
|
Deemdu
| |
| Wednesday, July 05, 2006 - 8:46 am: |
| 
|
>>>>>>on each other. लालभाई हे पण लक्षात घ्या
|
Laalbhai
| |
| Wednesday, July 05, 2006 - 10:32 am: |
| 
|
You had already accused me of this! I prefer not to comment on your accusations, again. I have underlined that your side, too, is not as clean as you claim! (Or is it dirtier than mine???) 
|
Zakki
| |
| Wednesday, July 05, 2006 - 10:43 pm: |
| 
|
लालभाई, आता वाद करण्यापेक्षा, खालील प्रश्नांची फक्त उत्तरे द्या. जर तुमची उत्तरे लोकांना आवडली नाहीत, तर उगीच पुढे बोलण्यात काय अर्थ आहे? Private sector म्हणजे खाजगी व्यवसाय ना? मग तिथे पण सरकार सांगणार कुणाला घ्यायचे नि कुणाला नाही? लायकी नसेल तरी नोकरी द्यायची? नि मग काही चुका होऊन प्राणहानि, वित्तहानि झाली, धंदा बुडाला, तर? मग सरकार करोडो रुपयांची नुकसान भरपाई देईल का मला? आधी लायकी नसताना कॉलेजमधे प्रवेश द्यायचा, लायकी नसताना पास करायचे, लायकी नसताना त्याला मास्तर नेमायचे, नि मग सगळ्या शिक्षणाचे वाट्टोळे करायचे! लायकी असो वा नसो, वीस टक्के पायलट आरक्षित! मग वीस टक्के विमाने पडली, हजरो लोक मेले तर? तुम्हाला स्वत:ला पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही आरक्षित जागेवर नेमलेल्या माणसाकडे जाल का? तुम्ही आरक्षित म्हणून नेमलेल्या डॉक्टरकडे जाल का? आरक्षित म्हणून वकील झालेल्या माणसाकडे आपला खटला द्याल का? की तुम्ही लायकी पहाल? नि आरक्षित जागी नेमलेल्याच्या लायकीची काय खात्री वाटेल तुम्हाला?
|
Yog
| |
| Thursday, July 06, 2006 - 4:42 am: |
| 
|
झक्की बुवा, प्रश्ण रास्त आहेत पण मला वाटत मुद्दा वेगळा आहे, तो म्हणजे आरक्षण कुठल्या तत्वावर दिले जावे. मला वाटत मागासलेल्या (मागासलेले कुठल्या अर्थाने हेच नेमक इथे स्पष्ट होत नाही तो भाग वेगळा)समाजाला काहितरी प्रमाणात आरक्षण असावे असेच सर्वसामान्य मत आहे. The Q raised by you and some obvious Answers to them would look like a vicious circle . खर तर आरक्षण कुठल्या तत्वावर, कुठल्या क्षेत्रात कसे राबवावे ही चर्चा केली तर काहितरी त्यातून निष्पन्न होवू शकेल. अर्थात इथे काहीना फ़क्त जर "लालक्रान्ती" च अपेक्षित असेल तर फ़क्त तू तू मै मै होणार (होत आहेच)
|
Zakki
| |
| Thursday, July 06, 2006 - 10:41 am: |
| 
|
क्षमा करा, मुळात नोकरीत आरक्षण हेच मला मान्य नाही. फक्त गरीब लोकांना आर्थिक मदत द्यावी, हेच पुरे आहे. फार तर प्राथमिक नि माध्यमिक शाळात प्रवेश द्यावेत, पण खरे तर कॉलेजमधे प्रवेश देताना हि लायकीच महत्वाची, विशेषत: इन्जिनियरिंग व मेडिकल सारख्या उच्च शिक्षणासाठी. आपल्या एव्हढ्या मोठ्या देशात एकदम सर्वांना सारखेच लेखणे कठिणच. बोलून चालून मुंबईत राहिलेला अगदी गरीब नि 'मागासलेला' सुद्धा खेड्यातल्या न मागासलेल्या नि बर्यापैकी शिकलेल्या माणसापेक्षा थोडा जास्तच smart, and worldly wise असतो, पण त्याची किंमत म्हणजे 'मुश्किल है जीना यहाँ' म्हणून. तिथे ऐरागैरा टिकून रहात नाही.
|
Meggi
| |
| Thursday, July 06, 2006 - 12:28 pm: |
| 
|
झक्की, अगदि पटल. लायकी शिवाय नोकरी आणि उच्च शिक्षणास प्रवेश पटत नाहि.. आणि कारण काय तर पुरेसे मार्गदर्शनाच अभाव आणि परिस्थीती. मराठी माध्यमाची मुला पण १२ वी ला CBSC , ICSC आनि इतर इंग्रजी माध्यमच्य मुलांशी स्पर्ध करतात आणि यशश्वी पण होतात.. त्यांना नाही लागत आरक्षणाची गरज? लायकि असलि कि सगळं करता येत... नसलि कि कारणं सुचतात सवलति मागायचि
|
Laalbhai
| |
| Friday, July 07, 2006 - 4:50 am: |
| 
|
मुळात नोकरीत आरक्षण हेच मला मान्य नाही. फक्त गरीब लोकांना आर्थिक मदत द्यावी, हेच पुरे आहे. तुमचे विचार आहेत हे, मला त्यबद्दल काही बोलायचे नाही. आधी सांगितल्याप्रमाणे हे वस्तुस्थितीशी सुसंगत नाहीयेत. तुमचा एक महिना पूर्ण वेळ मला द्या आणि मी नेतो तिथे या. प्रत्यक्ष बघा काय परिस्थिती आहे ते आणि मग मते बनवा. (फक्त या एक महिन्यात प्रचंड शारिरिक आबाळ आणि मानसिक तणाव यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा!) लायकी नसताना कॉलेजमधे प्रवेश द्यायचा, लायकी नसताना पास करायचे, लायकी नसताना त्याला मास्तर नेमायचे, पुन्हा सांगतो, हा मुद्दा आक्षेपार्ह आहे. का आहे, ते अनेकवेळा स्पष्ट केले आहे. कळत नसेल तर तसे विचारा. की तुमची हे समजावून घेण्याची लायकी नाहीये? बाकी private sector विषयी अशा मतांची तुमच्याकडून अपेक्षा नव्हती! limited कंपनीमधे अनेकांचा पैसा शेअररुपाने लागलेला असतो. आणि कंपनी चालवायची म्हणजे देशातले कोणतेही resources न घेता चालवणे शक्य नसते. जी कंपनी देशाचे सगळ्या प्रकारचे resources वापरते, तिला देशाच्या सामाजिक उन्नतीसाठीही काम करण्यास आग्रह केला तर त्यात चूक काय आहे?
|
Pha
| |
| Friday, July 07, 2006 - 5:05 am: |
| 
|
>>जी कंपनी देशाचे सगळ्या प्रकारचे resources वापरते, तिला देशाच्या सामाजिक उन्नतीसाठीही काम करण्यास आग्रह केला तर त्यात चूक काय आहे? जी कंपनी देशातली साधनसंपत्ती वापरते, ती कंपनी वेगवेगळ्या पातळ्यांवर सरकारने लागू केलेले कर भरून शासनाच्या कल्याणकारी कामांकरता पैसा पुरवण्यात वाटा उचलतच असते; आणि त्याच पैशातून आपल्या सरकारला लोककल्याणाचा वसा चालवता येतो. त्यामुळे सामाजिक उन्नतीचा (एक्स्ट्रॉ) आग्रह धरण्याचा मुद्दा पटत नाही.
|
औरन्गजेबाच्या राज्यात जिझिया कर होता, तुम्हाला हिन्दु म्हणुन राज्यात रहायचे असेल तर हा कर भरावा लागत असे... त्याच चालीवर... तुम्ही सवर्ण, तर तुम्हाला सवर्ण म्हणुन जगत रहायचे असेल तर सवर्णेतर "मागास" लोकान्च्या उन्नत्तीसाठी( ? )तुम्हाला इथुन पुढे काही एक जिझिया कर द्यावा लागला तर मला नवल वाटणार नाही! रिझर्वेशनची ही थेर अशिच चालत राहिली तर ती वेळही फार दुर नाही!
|
Soultrip
| |
| Friday, July 07, 2006 - 5:36 am: |
| 
|
आजच्या सकाळच्या 'वाचकांच्या पत्रव्यवहारामधे' ही या वादाला प्रारंभ झाला आहे.
|
Laalbhai
| |
| Friday, July 07, 2006 - 5:54 am: |
| 
|
कर भरणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीने किंवा कंपनीने कर भरण्यात काही महान काम केले आहे, असा ग्रह करून घेण्यात अर्थ नाही. मला कोणत्याही विशिष्ठ कंपनीबद्दल काहीच म्हणायचे नाही. पण १. बर्याच कंपन्यांना त्या सुरु करण्यासाठी सरकारने जमिनी फुकट दिलेल्या असतात. यात अतिशय चांगल्या सुपिक जमिनी येतात. अनेक्दा वीज फुकट दिली जाते, करमाफी दिली जाते, पाणी फुकट दिले जाते. २. अनेक कंपन्या पर्यावरणाचे अतोनात नुकसान करतात. सरकारने काहीही करू नये म्हणून लाच देतात. या प्रदूषणापाई अनेक लोकं कायमची विकलांग झाली आहेत किंवा जीवास मुकली आहेत. अनेक गावंच्या गावं वसती करण्यास निरुपयोगी ठरली आहेत. हा सगळा खाजगी कंपन्यांचा स्वार्थी आणि समाजाच्या भल्याविषयी अनास्था दाखवणारा काराभार आहे. यात प्रथमदर्शनी या कंपन्या देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात असे दिसत असले, तरी नकळत ह्या कंपन्या सामाजिक सुव्यवस्थेला भले मोठ्ठे खिंडार पाडत असतात. अशा कंपन्यांमधे अनेक रासायनिक, automobile कंपन्या येतात. ३. अनेक मोठे मोठे उद्योग समुह गैरकारभार करून मोठे झालेले आहे. यात दृष्टीस पडणारे काहीच नसल्याने, सगळे आलबेल आहे, असे समजायचे का? ह्या भ्रष्ट व्यवहारात किती लोकांचे बळी गेले, याची माहिती मिळणेही अशक्य आहे. पण या उद्योगसमुहांची "दैदिप्यमान" प्रगतीच फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. ४. अनेक खासगी कंपन्या कामगारांना वाट्टेलतसे राबवून घेतात आणि पुरेसा पगार देत नाहीत. कामगारांच्या भविष्याचीही खात्री नसते. भारतात उठसुठ कोणी न्यायालयात जात नाही, त्यामुळे अशा लोकांना न्यायालयातही दाद मागता येत नाही. तात्पर्य असे की खासगी कंपन्या कर भरून फार काही मोठे उपकार करत नाहीयेत. त्यामुळे "हा" आग्रह " extra " होत नाही.
|
Laalbhai
| |
| Friday, July 07, 2006 - 5:58 am: |
| 
|
लिंबूटिंबू, तुमची तशीच धारणा असेल तर सक्तीने तुमचा सुंता करवून तुम्हालाच "मागास" करण्यात आम्हाला काहीच वाटणार नाही. 
|
Pha
| |
| Friday, July 07, 2006 - 5:58 am: |
| 
|
अगदीच कम्युनिस्ट उत्तर!!!
|
Laalbhai
| |
| Friday, July 07, 2006 - 6:03 am: |
| 
|
फ, माझे उत्तर अक्षरशः २ मिनिटात वाचून त्यावर मत बनवू नका. मी लिहिलेल्या कोणत्या मुद्द्यात काय चूक आहे, किंवा वस्तुस्थितीला सोडून आहे, हे दाखवा. मग वाटलेच तर हसा... हसण्याला विरोध नाहीये. इतरांसारखा तुमचाही फक्त "कम्युनिझमला" विरोध करण्याचा हेतू तर नाही? असल्यास मलाही माझी भाषा बदलावी लागेल, तुमच्याशी बोलताना.
|
Pha
| |
| Friday, July 07, 2006 - 6:09 am: |
| 
|
अर्थातच! कम्युनिझम ही गोष्टच मला वरकरणी हेतुतः मानव्य भासली तरी बिनबुडाची आणि अव्यवहार्य वाटते. अर्थात हे माझं मत आहे. तरीही तुम्हाला माझ्याशी बोलताना भाषा बदलायची असेल तर खुशाल बदला. मला कर्तव्य नाही. BTW, तुमच्याविषयी हे मत बनवलं नाहीये. तुमच्या उत्तराबद्दल माझं मत नोंदवलं. पुन्हा तेच सांगतो.. तुमच्या उत्तरातल्या काही बाबी काही प्रमाणात लॉजिकल वाटल्या, हेतु बरे वाटले तरी अतिरंजित वाटतात. कम्युनिझम फसण्याचं हे प्रमुख कारण आहे. सगळ्या गोष्टी भडक - ब्लॅक ऍंड व्हाईट करण्याची या 'वादा'ला सवय आहे; जणू काही यांना 'ग्रेस्केल्स' मान्यच नाहीत. त्यामुळेच काही हेतु बरे असले तरीही त्यांची अंमलबजावणी करताना टोकाची भूमिका, अतिरंजितपणाच्या मार्गाने गोष्टी हाताळल्या जातात. ही पद्धत मलातरी पटत नाही. असो.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|