|
Raina
| |
| Thursday, June 29, 2006 - 2:06 am: |
| 
|
मिलिंदा, माफ करा पण परदेशातील एका समस्येचा आपण विचार करतोय, तर त्या अनुषंगाने त्या संस्कृती बद्दल ची चर्चा करताना त्या मातीतले चित्रपट पुस्तकं याबद्दल चर्चा केली तर विषयांतर कसे झाले आणि पहायला गेलं तर तुम्ही सुद्धा विषयावर मत न नोंदवता इतर सगळे कसे विषयांतर करतायेत हेच लिहीलय.
|
Milindaa
| |
| Thursday, June 29, 2006 - 12:24 pm: |
| 
|
Raina, माफ केलं माझा आक्षेप संस्कृतीची चर्चा करायला नाहीये. माझं पोस्ट नीट वाचा, किती कादंबर्या, कोणते चित्रपट आणि त्या चित्रपटांची मूळ कादंबरीशी तुलना हे या बीबी च्या विषयाशी संबंधित आहे ? आणि माझ्याकडे या विषयावर लिहायला काही नाही म्हणून मी लिहीलं नाही पण म्हणून मी हा बीबी वाचताना त्यात अनावश्यक गोष्टी आढळल्या (ज्यामुळे विषयाची आणि मांडलेल्या विचारांची साखळी तुटते) तर त्या सांगायच्या नाहीत ? कमाल आहे..
|
Zakki
| |
| Thursday, June 29, 2006 - 2:15 pm: |
| 
|
soultrip , इथे मॉडरेटर किंवा anchor वगैरे असणे कठीण आहे. कोणाचे विचार कोणत्या दिशेला जातील, नि त्यातून त्यांना काय सांगायचे आहे ह्यावर भरपूर विचार केल्याशिवाय समजत नाही, तेंव्हा ते विषयाला धरून असेल किंवा नसेल हे कुणि ठरवायचे? कुणि रूपककथा इथे लिहिली नि त्याचा अर्थ आपल्याला कळला नाही तर, ते चूक का? इथले मॉडरेटर फक्त server वरच्या जागेचा, वैयक्तिक भांडणे होऊ नयेत याचा विचार करून BB बंद करतात, त्या वादातून कुणाला काय कळले, किंवा कुणाची मते बदलली तर तो मॉडरेटरच्या कामाचा विषय नाही.
|
मिलिन्दा, मी देखिल रैनांशी सहमत आहे. विषय भरकटला असं नाहि वाटलं मला. चित्रपट, साहित्य शेवटी समाज आणी संस्कृतीचे प्रतिबिंबच म्हणुन त्यावर बोलणे आले. अर्थातच प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा म्हणुनच cbdg ... पण वेगळ्या विषयावरील चर्चा वाचायला बरं वाटतंय, नाहितर आहेच चालु दळण कित्येक BB ज वर.
|
Sayonara
| |
| Friday, June 30, 2006 - 4:32 am: |
| 
|
मिलिंदा, सॉरी, तुझ्या पोस्ट्शी मीही सहमत नाही.मागे जाऊन सगळी पोस्ट नीट वाचशील तर तुझ्या लक्षात येईल की चाफ्याने 'ओशीन' सिरीयलमधल्या अतिविनयशीलतेबद्दल लिहिलं आणि त्यापासून बाकीच्या जॅपनीज पिक्चरची चर्चा सुरु झाली. आणि अतिविनयशीलता हे ही जपान्यांच्या आत्महत्येमागचं कारण आहे असं एकमतही झालं. आता रैनाने जपानच्या प्रॉब्लेम्सबद्दल लिहायला सुरु केलं तर तिकडच्या related गोष्टीही चर्चेत येणं स्वाभाविक नाही कां?
|
Soultrip
| |
| Wednesday, June 28, 2006 - 2:07 pm: |
| 
|
मला वाटतं moderator ने posting करताना name-mod1 etc. असं काही तरी posting करावं. म्हणजे सर्वांना लगेच कळेल. I also don't see any active participation by any moderator in any discussion, except the rhetoric threat of 'This BB is/will be closed' . जसं एखाद्या panel discussion मधे anchor काम करतो, तसं moderator चं काम हवं, नुसताच खाकी दम नको! असो!
|
soultrip , तुमचा गैरसमज झाला आहे असे वाटते. कोणत्याही चर्चेत anchoring करणे हे Moderators चे काम नाहिये! एखाद्या bb वर सक्रीय भाग घ्यायचा असेल तर तो / ती moderator त्यांच्या इच्छेनुसार वैयक्तिक ID ने घेऊ शकतात, घेतातच.
|
Milindaa
| |
| Friday, June 30, 2006 - 9:54 am: |
| 
|
/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=823765#POST823765 हे ते चाफ्याचं पोस्ट. या पोस्टनंतर खाली दिलेल्या लिंक्स बघा आणि ठरवा की त्या विषयाशी किती निगडीत आहेत. असो. मी माझे मत मांडले. शेवटी प्रत्येक जण लिहायला मोकळा आहे. अर्थात, त्या न्यायाने मझ्या या पोस्ट आधीची २ पोस्ट्स तर अगदीच लागू पडतात मग या बीबीला... तेव्हा चालू द्या /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=823767#POST823767 /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=823876#POST823876 /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=823983#POST823983 /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=824361#POST824361 /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=824628#POST824628 /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=824802#POST824802
|
जाऊदेरे मिलिन्दा, तू तरी नको बनुस हळवा! हे बघ, कुठलही नेतेपद, सन्योजक पद, मॉड्स चे पद, मॉनिटर वगैरे कन्ट्रोल करणारी पदे म्हणजे सुळावरची पोळी असते! अन त्या दृष्टीने तुझे मॉडपण बहुतेक जण विसरु शकत नाहीत अन तुझी सहज सन्वादातील सुचनाही गम्भिरपणे घेतली जाते! आता तूच टेक इट इझी अस म्हणतो! (बोम्बलायला आमी येवढ्या ढीगभर चान्गल्या चान्गल्या सुचना करुनही कोण पण पत्रास पात ठेवत नाही, किमान तुझ्या सुचनान्ची दखल घेतली जाते हे महत्वाचे नाही का?)
|
Chafa
| |
| Friday, June 30, 2006 - 2:29 pm: |
| 
|
कालच लिहीणार होतो पण म्हटलं उगाच कशाला वाद वाढवा. पण आता लिहीतोच, मिलिंदा मलाही आवडलं नाही तुझं इथलं पोस्ट. विषय एवढा भरकटलेला नव्ह्ता की त्याचा कोणाला काही त्रास व्हावा. 
|
लोकहो, आता मात्र बस करा. BB चे शीर्षक काय आहे ते पहा. 'जपानी संस्कृती ची चर्चा' असे नाहिये! 'जपान मधील आत्महत्येचे प्रमाण' असे आहे ना? कुणाला त्रास होण्याचा प्रश्न नाही पण BB च्या विषयाला धरून पोस्ट नसेल तर थांबवावेच लागते. नाहीतर प्रत्येक BB चा मासळीबाजार होईल! जो नियम आहे तो पाळला पाहिजे! सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा अहे..
|
Chafa
| |
| Friday, June 30, 2006 - 3:55 pm: |
| 
|
आता अचानक बास करा का बरं? अजिबात पटलेलं नाही. मासळीबाजार होणं आणि एकदोन वाक्य विषयाला प्रत्यक्ष धरुन चर्चेच्या ओघात न लिहीणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे असं वाटत नाही का? तरी बरं, रैनाने हे Views and Comments मधेच टाकलेलं आहे. शिवाय, BB चे शीर्षक पाहीलेले आहेच. जपानी संस्कृतीची चर्चा असे शीर्षक नसले तरी आत्महत्यांचा आणि संस्कृतीचा सरळसरळ संबंध आहे अशीच चर्चा चालल्ये ना? उगाच प्रत्येक पोस्ट तुम्ही तुमच्या वैयक्तिक मतानुसार एखाद्या ठराविक साच्यात मोजून मग ती विषयाला धरुन आहे की सोडून असे ठरवणार असाल तर आमचा सर्वांचा त्याला स्पष्ट विरोध आहे. वरती रैन, सायली आणि सायोनारा यांनी नीट समजावून सांगितले आहे की झालेली चर्चा विषयाला धरुनच आहे. कृपया संयुक्तिक कारण नसताना नुसते 'बास करा' असे गुळमुळीत म्हणून पडदा पाडू नये ही विनंती. आणि पाडायचाच असेल तर आधी 'घडीच्या पोळ्या' हा BB , त्याचे शीर्षक आणि त्यावरची अनेक पोस्टस एकदा बघून या. मिलिंदाच्या पोस्टपेक्षाही मॉडरेटर ५ तुमचे पोस्ट भयंकर खटकणारे आहे.
|
उगाच प्रत्येक पोस्ट तुम्ही तुमच्या वैयक्तिक मतानुसार एखाद्या ठराविक साच्यात मोजून मग ती विषयाला धरुन आहे की सोडून असे ठरवणार असाल >>>चाफ़्या, हे जरा जास्त होतंय असं वाटत नाही का! मॉड मनमानी करत आहेत किन्वा वैयक्तिक आकस धरुन कारवाई करत आहेत असा तू मिलिन्दा /MOD5 वर आरोप करत आहेस का? 
|
Chafa
| |
| Friday, June 30, 2006 - 4:25 pm: |
| 
|
मैत्रेयी, आरोप नाही, विरोध. मिलिंदाने त्याचे मत मांडले. त्यावर तीघा चौघांनी हेच सांगितले की त्यांना ही चर्चा विषयाला सुसंगतच वाटते आहे. आता आली असतील एखाद दोन वाक्य जी विषयाला प्रत्यक्ष धरुन नाहीत अशी पण त्याचा एवढा बाऊ कशाला? हे म्हणजे 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' चा प्रकार झाला. त्यानंतर मॉडरेटर ५ यांनी येऊन मासळीबाजार वगैरे होण्याची कारणं दिली आणि मला उगाच कोणाचीतरी अन्याय्य बाजू घेण्याचा प्रयत्न दिसला. आणि म्हणून मी तसा विरोध नोंदवला. मॉडरेटर ५ आपले पोस्ट मागे घेण्यास राजी असतील तर मी स्वखुषीने इथली माझी पोस्टस उडवेन. नाहीतर ही चर्चा इथेच राहू देत.
|
चाफ़ा, वरच्या पोस्ट मधे हेच सुचवायचे होते की वाद सोडून(=बस करा) विषयाला धरून(च) चर्चा करावी. त्यात भयंकर खटकण्यासारखे काय आहे? अनावश्यक वादावर पडदा पाडाअयचा नाही तर काय करणे अपेक्षित आहे? आत्महत्यांचा आणि संस्कृतीचा सरळसरळ संबंध आहे>>>>हो ठीक आहे तोवर कोणी काही बोललेले नव्हते. ओशीन सिरियल चा संबन्ध आला तेव्हाही काही आक्षेप नव्हता. पण मग तिथून गाडी घसरून पार सायुरी चित्रपट, कादंबरीवरून निघालेले एकूण चित्रपट, बनगरवाडी, कुरोसावा इथवर आली तरी आक्षेप घ्याचा नाही? मग टोयोटा, होंडा गाड्या, जपानी रेसिपी, किमोनोवरचे डिझाईन हेही आले तर तेही जपानी संस्कृतीशी संबंधित आणि संस्कृती आत्महत्येशी संबंधित म्हणून चालवून घ्यायचे का? रहाता राहिला प्रश्न 'एक दोन वाक्ये विषयाला सोडून चालतील' तर असे प्रत्येक युजरने अशी एक दोन वाक्ये विषयाला सोडून लिहिली तर किती वाक्ये होतील? वर मिलिन्दाने लिन्क्स दिल्या आहेत, विषयाला सोडून एक दोन वाक्ये नाही तर तब्बल सहा पोस्ट्स आहेत! moderators चा यात काही वैयक्तिक फ़ायदा नाहिये, ते इथे फ़क्त नियमांची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यावर वैयक्तिक आकस वगैरे आरोप करणे कितपत योग्य आहे? बकी दुसर्या एखाद्या BB वर नजर्चुकीने अथवा तशाच काही कारणाने नियमाची अंमलबजावणी झाली नसेल तर तिथे ती कशी होईल हे पहा की जरूर! feedback मधे तसे सुचवले तर आम्हालाही कळेल ना काय काम राहून गेलय! पण तिथे नाही तर नियम इथेही करू नका असा आग्रह धरणे हे कसे बरोबर ठरते? असो मला वाटते इथेच थांबावे ही पोस्ट्स योग्य bb वर हलवली जातील. इथे आता विषयाला धरून च लिहावे ही विनन्ती
|
Chafa
| |
| Friday, June 30, 2006 - 5:19 pm: |
| 
|
१. टोयोटा, होंडा गाड्या, जपानी रेसिपी, किमोनोवरचे डिझाईन हा तुमचा कल्पनाविस्तार झाला. तसे विषय इथे आलेले नव्हते. २. ओशीन आणि सायुरी चित्रपटांमधे जपानमधल्या मनाची घुसमट होऊन जगणार्या व्यक्तींचे चित्रण झालेले आहे. हे चित्रण चित्रपटापेक्षा पुसतकामधे जास्त प्रभावीपणे मांडले गेले आहे. आणि हे सगळे विषयाला धरुनच आहे. ३. कोणताही वैयक्तिक आरोप मी केलेला नाहीये. वैयक्तिक आकस वगैरे शब्दही मी काढलेले नाहीत. वरती लिहीले आहे की केवळ तुमच्या एकतर्फी मताला विरोध केलेला आहे (मीच नव्हे तर इतरांनी देखील). जे चूक वाटले ते बोलून दाखवले. ४. इतर बीबींबद्दलही मला काही बोलायचे नव्हते. सांगायचा मुद्दा एवढाच होता की कोणत्याही चर्चेत थोडेफार विषयांतर होणारच. चर्चेच्या ओघात ते स्वाभाविक आहे. प्रत्येक शब्द न शब्द कोणी मोजून मापून लिहीत बसलं तर मायबोलीवर येण्याचा सर्वात मोठा आनंदच हिरावून घेतल्यासारखं होईल. या पोस्टसना काही दिवस इथेच राहू द्यावे. रैना, ऍडमिन आणि इतरांनी ती वाचल्यावर मग कुठे हलवायची ती हलवा.
|
Sayonara
| |
| Friday, June 30, 2006 - 5:46 pm: |
| 
|
चाफ्याशी १०० % सहमत. चर्चा म्हटली की थोडेफार विषयांतर हे होणारच. हाच बीबी नाही तर इतर बीबीवरही ते दिसून येतच असतं. आणि इथे चर्चा लगेच आक्षेप घेण्याएवढी नक्कीच भरकटली नव्हती.
|
घ्या उघडला बीबी..
|
Raina
| |
| Tuesday, July 04, 2006 - 2:02 am: |
| 
|
चाफ़ा, मी सगळे posts वाचले आत्ता. आपल्या ४ हि मुद्दयांना ११०% अनुमोदन. ४-५ दिवस जरा कामात होते म्हणून आधी लिहायला वेळ झाला नाही. Moderator BB उघडल्याबद्दल धन्यवाद ! आपली ही भुमिका कळली पण पटली नाही. ह्याला मासळीबाजार म्हणणार तर मग काही ज्वालाग्रही BB वर जे च-हाट चाललय- त्याला काय "तिसरे महायुद्ध"म्हणणार का? 
|
भावनिक दृष्ट्या जरी चाफा व इतरान्चे म्हणणे पटल्या सारखे वाटत असले तरी मला मिलिन्दा किन्वा मॉड्स यान्ची भुमिका बरोबर वाटते! अगदी याच कारणाने मला देखिल पुर्वीकधि तरी कानपिचक्या मिळाल्या असल्या तरीही मी मिलिन्दा किन्वा मॉद्स यान्चे म्हणणे उचलुन धरु इच्छितो! किम्बहुना मिलिन्दाच्या "त्या" सुचनेत गैर काहीच नव्हते! आता रस्त्यावरचा ट्रॅफिक हवालदार शिट्ट्या फुकत असतो! ज्याला लागु असते त्याला बरोबर समजते, पण ज्याला लागु नाही तो काही लगेच त्या हवालदाराशी जाऊन हुज्जत घालत नाही की का बरे तु शिट्टी वाजवलीस माझी चुक नसताना! (मिलिन्दा आणि हवालदार.... चित्र काही नीट जमत नाही हे) DDD 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|