|
ही चर्चा या बीबीवरुन चालू झाली आहे अनुदिनी अनुतापे...
Milindaa
| |
| Tuesday, July 04, 2006 - 11:34 am: |
| 
|
चाफा, तुला एक सूचना करतो, तेवढं करता आलं तर बघ.. माझं या आधीचं पोस्ट आहे ते नीट वाच, त्यात दिलेल्या लिंक्सवर जा आणि मग ठरव की त्या उल्लेखलेल्या पोस्ट्स चा किती संबंध आहे त्या विषयाशी ते. तुझं पोस्ट मी एवढ्यासाठीच उल्लेखलं आहे की त्यात तू जपानी संस्कृती बद्दल उल्लेख केला होतास. म्हणून ती लिंक मी वेगळी दिली आहे. ज्या कोणी माझ्या मताला विरोध दर्शविला (ज्यात तू पण आलास) त्या कोणीही माझ्या पोस्ट्मध्ये दिलेल्या लिंक्सबद्दल बोलायचं (सोयीस्करपणे??) टाळलं याचा काय अर्थ निघतो? की ते पोस्ट फक्त Mod_5 यांना दिसलं आणि बाकीच्यांना नाही? मी विरोधासाठी विरोध करत नाहीये हे दाखविण्यासाठी ती उदाहरणे दिली होती. Raina, एखाद्याने गाय मारली म्हणून आपल्या वासरू मारण्याचे समर्थन करता येत नाही. बाकीच्या बीबींवर काय चाललंय ते सर्वांना माहितीच आहे आणि योग्य वेळी मॉडरेटर्स त्याकडे बघतीलच पण म्हणून या बीबी विषयी ही बोलायचे नाही अस म्हणायचे आहे का आपल्याला?
|
Chafa
| |
| Tuesday, July 11, 2006 - 2:05 pm: |
| 
|
मिलिंदा, मागचा आठवडा सुट्टीवर असल्यामुळे थोडा उशीर होतोय उत्तर द्यायला. तुझे पोस्ट मी आधीच नीट वाचले होते आणि ते वाचले म्हणूनच मी माझा आक्षेप मांडला होता आणि म्हणूनच हा BB उघडला गेला. तेव्हा तुझे पोस्ट मी नीट न वाचताच हे सगळे सुरु झाले नाही. महत्वाचे म्हणजे तू दिलेल्या सगळ्या लिंक्स मी पाहीलेल्या आहेत. आधी चर्चा सुरु असताना त्या वाचल्या होत्याच पण पुन्हा तू मुद्दाम दिल्यावर त्या परत वाचल्या. त्या सहाही लिंक्समधील प्रत्येक पोस्ट कुठल्याही निखळ मैत्रीपूर्वक चाललेल्या चर्चेमधल्या संभाषणासारखेच आहे. त्यात कुठेही भांडणाचा वादविवादाचा सूर नाही. इथे मायबोलीवर चर्चा करताना काही साचेबद्ध नियम आहेत का? असतील तर मला ते कुठे समजावून दिलेले दिसले नाहीत आणि तसे ते पाळले जात असलेलेही मी पाहीलेले नाहीत. जसे की 'चित्रपट कसा वाटला' यावर चर्चा करताना केवळ चित्रपट कसा वाटला एवढीच चर्चा होत नसून कोणाला त्या अनुषंगाने थोडी आणखी माहीती सांगावीशी वाटली तर ती लिहीली जातेच आणि ती वाचायलाही छान वाटतेच. नुसत्याच BB च्या शीर्षकावरुन त्यावरच्या चर्चेचं सर्वस्व ठरवता येणार नाही. माहीती ही अफाट असते. आणि चालू विषयाच्या अनुषंगाने ती रोचकही वाटते. मी स्वतः 'बनगरवाडी' हे पुस्तक वा चित्रपट पाहीलेला नाही. इथे ते एकच पोस्ट पूर्णपणे विषयबाह्य म्हटले तरी मला खटकले नाही. सोहाने तर त्याच पोस्टमधे विषयांतराबद्दल माफीदेखील मागितली आहे. मला वाटत नाही की हितगुजवरच्या गप्पा अशा काटेकोर नियमावलीत बसवून कोणी मारेल असं. मॉडरेशनची गरज केव्हा आहे याबद्दल काही नियम आहेत का? का उगाच आहे शिट्टी दिलेली म्हणून लिंबू म्हणतो तशी ती वाजवत बसायची? या नियमांचा धबडगा एखादा वाद सुरु झाला, भांडणांपर्यंत मजल पोचली की जरुर दाखवा. पण मजेत चाललेल्या चर्चेत, खुद्द BB सुरु करणारी लेखिका जेव्हा म्हणते की विषयांतर झालेले नाही तिथे उगाचच एखाद दोन (हो, सहा नाही) पोस्ट जरा वेगळ्या आल्या तर चालू असलेल्या संभाषणात मिठाचा खडा का घाला? असो, माझे मत मी पुरेसे आधीच मांडले होते, आता थांबतोच. तुझे मत केवळ मॉडरेटर ५ यांनाच का दिसले याचे उत्तर माझ्याकडे आहे पण मी ते देणार नाही. पण तुमचे दोघांचे मत इतर ४ जणांना पटलेले नाही हे मात्र दुर्लक्षित होऊ नये. आणि हो, हा केवळ आपला मतांचा विरोध आहे. मला कोणाबरोबरही व्यक्तिगत भांडण करायचे नाही. शेवटी मायबोली 'आपली' वाटते आणि झाला प्रकार आवडला नाही म्हणून एवढे सगळे बोलायचे कष्ट घेतले. तू समजून घेशीलच.
|
Milindaa
| |
| Tuesday, July 11, 2006 - 3:42 pm: |
| 
|
चाफा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे, १. जर एखाद्या बीबीवर भांडणे, वाद्-विवाद होत नसतील तर जी काही चर्चा चालली आहे ती तशीच चालू द्यावी का? मजेत चर्चा चालू आहे म्हणून विषय भरकटला तरी ती चालू रहावी का? २. जर बीबी चालू करणार्याचे असे मत पडले की चर्चा रुळावर आहे तर ती चर्चा चालू द्यावी का? ३. मायबोलीवर चर्चा करताना साचेबध्द नियम नाहीत आणि म्हणूनच कोणाच्याही १ किंवा २ पोस्टनंतर येथे साफसफाई केली जात नाही (अर्थात त्याचा संदर्भ घेऊन परत मॉडरेटर्स ना बोलले जाते हा भाग निराळा) ४. आणि ज्या ४ जणांना मत पटलेले नाही त्या चौघांची येथे पोस्ट्स आहेत हे पण दुर्लक्षित करता येणार नाही. आणि अर्थातच, हा मतांचा विरोध आहे म्हणून मी लिहायचे कष्ट घेतो आहे. भांडणच करायचे असते तर मला पुरावे द्यायची गरजच नव्हती असो. जाता जाता शेवटचे, चर्चेच्या विरोधी मत देणे म्हणजे जर मिठाचा खडा असेल तर मुळात त्या वेगळ्या पोस्टमुळे इतर कोणाच्या वाचनात मिठाचा खडा येऊ शकतो याचा विचार कोणाला करावासा वाटत नाही का?
|
Chafa
| |
| Tuesday, July 11, 2006 - 3:54 pm: |
| 
|
१. याचे उत्तर ऍडमिन ठरवतील. पण जिथे तू बोललास तिथे विषय अजिबात 'भरकटलेला' नव्ह्ता. २. होय, जर ते मत योग्य आणि न्याय्य असेल तर नक्कीच त्याचा आदर केला जावा. ३. साफसफाई केली जात नाही तर मग उगाच पुरावे देण्याचे तरी काय कारण होते? सगळे सांगतायत ना की विषय भरकटलेला नव्ह्ता म्हणून? मग केवळ 'तुला' तसे वाटले म्हणून इतरांनी बोलायचे नाही? बाकी सर्वांना ती चर्चा छान चालल्ये असेच वाटत होते. आणि मुळात तू तुझे मत मांडलेस त्याबद्दल अजिबात आक्षेप नाही. तुला वाटले ते तू लिहीलेस, त्यावर आम्ही आम्हाला जे वाटले ते लिहीले. परंतु त्यानंतर मॉडरेटर ५ यांचे पोस्ट आल्यामुळे मला पुढचे लिहावे लागले. ४. हे अगदी खरेच. आणि त्याबद्दल तर मी अतिशय आनंदी आहे. ती पोस्टस उडवली गेली असती तर मी इथे आटापिटा न करता सरळ Feedback to Admin इथेच लिहीले असते!
|
>>>>> भावनिक दृष्ट्या जरी चाफा व इतरान्चे म्हणणे पटल्या सारखे वाटत असले तरी मला मिलिन्दा किन्वा मॉड्स यान्ची भुमिका बरोबर वाटते! अगदी याच कारणाने मला देखिल पुर्वीकधि तरी कानपिचक्या मिळाल्या असल्या तरीही मी मिलिन्दा किन्वा मॉद्स यान्चे म्हणणे उचलुन धरु इच्छितो! किम्बहुना मिलिन्दाच्या "त्या" सुचनेत गैर काहीच नव्हते! आता रस्त्यावरचा ट्रॅफिक हवालदार शिट्ट्या फुकत असतो! ज्याला लागु असते त्याला बरोबर समजते, पण ज्याला लागु नाही तो काही लगेच त्या हवालदाराशी जाऊन हुज्जत घालत नाही की का बरे तु शिट्टी वाजवलीस माझी चुक नसताना! (मिलिन्दा आणि हवालदार.... चित्र काही नीट जमत नाही हे) DDD चाफा, मिलिन्द आणि इतर, मी माझी आधिची पोस्ट पुन्हा वर पेस्ट केली हे! चाफा, तू या पोस्ट मधिल शिट्टी वाजविण्याचा उल्लेख केला हेस, हरकत नाही, "शिट्या वाजवित फिरणे" असा एक आडुनचा खट्याळ अर्थ मिलिन्दा बाबत तीर मारण्यासाठी मलाही अपेक्षित होता, पण त्यापुढिल वाक्याने पुर्ण आशय बदलला हे! मिलिन्द किन्वा तत्सम मायबोलीकर किन्वा अधिकृत मॉड्स जेव्हा काही सुचना देतात, ज्यान्ना लागु पडतात त्यान्नी समजुन घ्याव्यात अशी अपेक्षा असते, शक्यतो नाव न घेता या सुचना दिल्या जातात कारण नाव घेवुन त्या त्या आयडीचा मनोभन्ग नि तेजोभन्ग करण्याची इच्छा मायबोली प्रशासनास नाही... नसावी, आजवर मला तरी जाणवली नाही! सबब याच मुद्द्यावर मी स्वतः पुर्वी मिलिन्दाशी (मुद्दामहून) हुज्जत घातली असली तरिही मी मिलिन्दाचा किन्वा अन्यान्चा सुचना देण्याच्या अधिकाराला चॅलेन्ज देवु इच्छित नाही तसेच त्यान्नी केलेल्या सुचनान्ची दखल "दुधात पडलेला मीठाचा खडा" या अर्थाने न घेता "मैत्रीपुर्ण सहज भावनेने" "मार्गदर्शक" म्हणुन स्विकारु इच्छितो! (हां गम्मत म्हणुन एरवी मिलिन्दाला टोकणे वेगळे, तो ही खेळिमेळितच घेतो) समहाऊ, चाफा आणि इतर, माझी मते तुमच्या मतान्शी जुळत नाहीत, पण तरीही गैरसमज नसावा! (माझ्या पोस्टचा रेफ़रन्स घेतल्याबद्दल चाफा तुला थॅन्क्यू!
|
Chafa
| |
| Monday, July 17, 2006 - 6:08 pm: |
| 
|
लिंबू, याच्या अनुषंगाने, इथली चर्चासुद्धा इच्छुकांनी जरुर वाचावी. मुख्य म्हणजे निनावीच्या पोस्टनंतरची मिलिंदा, एकनाथ, हवाहवाई आणि लिंबू यांची पोस्टस.
|
>>>>> आणि लिंबू यांची पोस्टस. अरे चाफा, याबाबत एल्ट्याच नाव फार पुर्वीच कानफाट्या पडल हे रे भो!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|