|
Zakki
| |
| Thursday, June 29, 2006 - 1:55 pm: |
| 
|
उगाच तमाशे आणि थयथयाट नकोत! लालभाई, अहो अज्जुक्का ने काय तमाशा नि थयथयाट केला बुवा? एकच वाक्य लिहिले. थयथयाट माझा चालू आहे नि तो तसाच कायम राहिल, कारण OBC मधे ब्राम्हण घातले हे सुद्धा माझ्या मते चूकच! कुणिच OBC नाहीत हो, आणि ते दरिद्री?? म्हणजे काही ब्राम्हणांकडे मात्र 'हज्जारो' रु. नि मी बघितलेल्या so called OBC लोकांकडे 'फार तर फार एखाद्दोन कोटी, बास!' सांगतो काय, कुठलाहि मुद्दा धरून 'क्रांति' करायची! म्हणजे सगळे श्रीमंत गरीब होतील, हुषार लोक मूर्ख बनतील नि मग हे कम्मुनिस्ट त्यांना चक्क गुलाम बनवतील, स्वत:च्या फायद्यासाठी. रशियाचे काय झाले हो?? झाले का सगळे श्रीमंत नि बुद्धिवान? संधि मिळताच रशिया सोडून अमेरिकेकडे धावले लाखा लाखाच्या संख्येने! त्यांना तर १९१७ ते १९८५ पर्यंत भरपूर कम्युनिस्ट शिकवणूक, समान संधि मिळाली होती ना? मग? नि क्युबा चे लोक १९६० पासून कम्युनिस्ट राज्यव्यवस्थेत आहे ते पण हजारोंनी अक्षरश: जीवावर उदार होऊन अमेरिकेत का धावतात? तुमचे कम्युनिस्ट विचार पूर्वीपासून फक्त फार थोड्या लोकांना पटतात असा इतिहास आहे. भारत कायम लोकशाहीच आहे, नि त्यात सर्व लोक समान, नि आपल्या हिमतीवर नि अकलेवर नि कर्तबगारीवर पुढे आले आहेत. फक्त त्यांनी अमेरिकेसारखे एकदम कॅपिटलिस्ट न बनता सोशालिस्ट नि कॅपिटलिस्त मधे काही सुवर्णमध्य काढावा. काढतीलहि भारतीय. जिथे तिथे Marx किंवा अमेरिकन लोकांनी सांगायची गरज नाही. माझ्या सारखेच लहानपणापासून जे वातावरण आणि मार्गदर्शन मिळाले, त्यातले काही दारुडे बनून चाळीसाव्या वर्षी मेले किंवा आधीच भिकारी नि गुन्हेगार झाले. तेंव्हा आता आरक्षण नि वातावरण वगैरे पेक्षा अभ्यास, शिस्त, स्वत:च स्वत:ची उन्नति करायची इच्छा करा, आपोआप मार्ग सापडेल. गुण, कर्तबगारी कधिही लपून रहात नाही! अगदी दडपशाही रशियात सुद्धा!! तेंव्हा उगीच वादा साठी वाद म्हणून शब्दात पकडून काहीतरी भांडण काढत बसू नका, मुद्दा असा आहे की आरक्षणाची गरज नाही!! इथे कुणि तुमची माफी वगैरे मानणार नाही. नि तुम्ही पण कुणाची माफी मागावी असे मला वाटत नाही, काही फरक पडत नाही, हाथी चलता है, कुत्ते भोंकते है!
|
OBC category मधी काही प्रदेशातल्या ब्राह्मण जाती पण येतात>> कसे काय? बहुतेक ते economically backword आहेत म्हनुन का? मग तो जर निकष असेल तर जसे गेल्या १५ दिवसां पासुन येथे बरेच लोक जे लिहीत आहेत की जात base न धरता finance बेस धरा हे बहुतेक त्या राज्यातील govt ला मान्य झाले वाटत. खरेच हि एक क्रांतीच झाली म्हनायची. बहुतेक तेथील CM मायबोली वर येत असावेत. परत एकदा येथील चर्चेत लोक हेच म्हनत आहेत की जात हा निकष ठरवु नये यावर दुमत का हे अजुनही म्या पामराला कळाले नाही. comred व्ह्यायला खुप मोठा स्वार्थ त्याग करावा लागतो. म्हनजे फक्त कॉम्रेड ते देशभक्त, बाकी माझ्या सारखे जे संघा चे विस्तारक प्रचारक होते आहेत त्यांना त्याग करावा लागत नाही. लगे रहो भाई. परत एक छोटे विडंबन लिहीतो, ( ते तुम्हाला personally उद्देशुन नाही तर सहज सुचले म्हनुन आहे. मागच्या वेळे सारखा उध्दार करनार नाहीत अशी आशा.) मी मोर्चा नेला नाही मी कॉम्रेड ही नाही, मी संप ही केला नाही कारण मी लाल ही नाही, मी आहे तो भगवा, ज्याला हिरवा आवडत नाही. मला नक्की माहीती आहे भगवा म्हनजे त्याग.
|
Laalbhai
| |
| Thursday, June 29, 2006 - 2:39 pm: |
| 
|
झक्की, तुम्ही इतर वादात का पडताय? आपण दोघे फक्त आरक्षणावर बोलू. तुमचा कम्युनिस्टांकडे पहाण्याचा उद्देश काय आहे, याच्याशी मला का SSSS हीहीही घेणेदेणे नाही. मी सौरभ यांना नुकत्याच न्यायालयाने दिलेल्या निकालावर काही म्हटले आहे. त्या परिस्थितीत गुणवत्ता आणि कर्तबगारी काय करू शकते? आणि avg लोकांनी "अशा परिस्थितीत" उपाशी मरायचे का?
|
Laalbhai
| |
| Thursday, June 29, 2006 - 2:42 pm: |
| 
|
जात हा निकष ठरवु नये यावर दुमत का हे अजुनही म्या पामराला कळाले नाही. हे मी अनेकवळा सांगितलेय कृपया सगळी चर्चा वाचावी. (मी pointers देणार नाही!)
|
Santu
| |
| Thursday, June 29, 2006 - 2:43 pm: |
| 
|
मूडि ताई पुढच्या पोस्ट ना उत्तर नाहि? का बर? माउडि तु पण फ़ा र दि व सा नी. अरे आजचा पुढारी वाचला का शालिनिताई च भाषण आलय आरक्षण विरोधात
|
Laalbhai
| |
| Thursday, June 29, 2006 - 2:47 pm: |
| 
|
माझ्या मते कितीतरी OBC हे दोनवेळच्या खाण्याची मारामार असल्याने शिक्षण घेत नाहीत. I certainly and sincerely appreciate you keen observation. पण तुम्ही सुचवताय तो उपाय पुरेसा नाहीये. शिक्षणच नसेल तर ते लोक काय काम करणार? खडी फोडण्याचे? आणि पिढ्या नि पिढ्या खडी फोडण्याचे काम केलेल्यांना शिक्षणाविषयी आस्था कशी येणार?
|
मी अनेकवळा सांगितलेय कृपया सगळी चर्चा वाचावी. (मी pointers देणार नाही!)>>> भाई मी सगळी चर्चा रोज नियमीत पणे वाचतोय. Infact मी या चर्चेतला खुप जुन member आहे हे विसर्लात वाटत ईतक्यात. आपल्यात वैचारीक मतभेद आहेत व रहातील कारन मी भांडवलशाही व लोकशाही ला माननारा आहे पण तरीही तुमचे खरच कौतुक करावे लागेल ज्या रितीने तुम्ही तो मुद्दा लावुन धरला आहे त्याबद्द्ल.
|
Zakki
| |
| Thursday, June 29, 2006 - 3:57 pm: |
| 
|
न्यायालयाने दिलेल्या निकालावर काही म्हटले आहे. अहो, पण न्यायालयाने दिलेले निर्णय पुरावा नि घटना यावर आधारित असतात, तर त्याच्यात कर्तबगारी गुणवत्ता ही वकीलाची असते. पन्नास वर्षांपासून शिक्षणात आरक्षण चालू असताना अजून एकपण हरीचा लाल वकील त्या समाजातून निघाला नाही? एकपण? फक्त 'लाल' च निघाले?? काय उपयोग झाला आरक्षणाचा? आता न्यायालयातहि आरक्षण म्हणजे नेहेमी OBC च्या बाजूने निर्णय द्यायचे? आणि कुणी खून केला तर? की OBC म्हणून तेहि माफ? असे का? असल्या मतांवर मी वाद घालणार नाही. माझ्या मते वाद नाहीच आहे, मीच मागे लिहिले होते की आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना फुकट शिक्षणच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांना सुद्धा आर्थिक मदत द्यावी. मग कुणि गुणि असतील, काही शिकतील, कामे करतील तर पुढे येतील. पण तीहि मदत सरकारने नव्हे, कारण आपले सरकार कायम भणंग भिकारीच असते. एव्हढा पुढारलेला महाराष्ट्र नि budget deficit मधेच! पूर्वी ब्राम्हण अधिकारावर असताना असे नव्हते, आता ब्राम्हण हाकलून दिले. मग आत्ता आहेत ते लोक काय नालायक का भ्रष्टाचारी? तेंव्हा सरकार जाऊ दे. खाजगी रीत्या मदत करणारे अनेक मिळतील, ब्राम्हण नसलेले नि OBC असलेले सुद्धा अनेक श्रीमंत लोक आहेत, का नाही ते काही करत? ते फक्त जास्त जास्त अधिकार मागणार, नि तुमच्या सारखे त्यांना भडकवत ठेवणार! चर्चा कसली? त्यांना जरा समजवा, की जरा शिका, कष्ट करा, नि आजकालच्या जीवघेण्या स्पर्धामय जीवनात जरा जास्त कष्ट करा नाहीतर काम होणार नाही. सगळ्यांनाच ते लागू आहे. फक्त काही जण मुकाट्याने काम करतात नि इतरांना सगळे आयते हवे असते! नि तुम्ही त्यांना सांगता की कम्युनिस्ट बना, क्रांति करा नि तुमचे 'कल्याण' होइल, जसे रशिया नि क्युबाचे चालले आहे तसे! एव्हढीच त्यांची कळकळ असेल तर त्यांनाच शिकवा, माझ्याशी कशाला वाद घालता? माझे मत बदलेल असे इथल्या कुणालातरी वाटतय् का?
|
Laalbhai
| |
| Thursday, June 29, 2006 - 4:15 pm: |
| 
|
माझ्याशी कशाला वाद घालता? >>> मी कुठे घालतोय वाद? तुम्हीच घालताय माझ्याशी वाद! केदार, तुमच्या कौतुकात उपरोध नसावा ही अपेक्षा. पण इथे बहुतेक लोक काही गंभिर चर्चा करण्याऐवजी, "संपवा रे याला" या पद्धतीने वाद घालत आहेत. अशांना घाबरून मी माझी मते मांडणे का थांबवावे? नाहीतरी, विरोधी मतांना येनकेनप्रकारेण संपवण्याकडेच काहींचा कल असतो. तेच इथे, या वादातही दिसले आहे. अशांना हार जाणारा मी नाही. किंवा हार जायचे नाही, हेच मी ठरवले आहे. दुर्दैवाने, मतांचे आदानप्रदान करण्याऐवजी अशा दुष्प्रवृत्तींविरुद्धच शड्डू ठोकावा लागतो, हे दुर्दैव आहे! आपले genuine मतभेद असतील तर ते सन्मानाने मी मान्य केलेच आहेत. पण attitude वेगळा असेल, तर मी घेतला तोच पवित्रा घ्यावा लागेल!
|
Laalbhai
| |
| Thursday, June 29, 2006 - 4:18 pm: |
| 
|
पन्नास वर्षांपासून शिक्षणात आरक्षण चालू असताना अजून एकपण हरीचा लाल वकील त्या समाजातून निघाला नाही? हे तुमचे मत की निरिक्षण? कुठे वाचले आणि पाहिले? हे अतिशय चूक आणि दिशाभूल करणारे मत आहे! हे सिद्ध करायला दाखले द्या असे म्हटले असते पण असो..
|
लालभाई, बघा तुम्ही सरळ मनाने जे लिहीले त्याला ही उपरोधाची झालर आहे का हे विचारत आहात? मागे मी कनेकरांना देखील लिहीले होते की मी विचारांचे भांडन वयक्तीक पातळीवर आणत नाही. मी खरेच तसे लिहीले. माझ्या मते तुम्हाला कोनी संपवा का म्हनाले ते तुमच्या उगीच सर्व गोष्टींना सवर्णांना वेठीला धरल्यामुळे. ( तुमचे current affairs व या बिबी वरच्या अनेक पोस्ट्स). खरे तर आज भांडन विसरुन (जाती जमातीतील) एकत्र यायची गरज आहे क्षणभर विचार करा (ही विनंती) आरक्षणामुळे भेदभाव वाढीलाच लागेल तो कमी होनार नाही. गरज नसताना समाजात ही दुफळी निर्मान होनार. मला आरक्षण अस्ले काय किंवा नसले काय काही फरक पडनार नाही पण ज्यांना पडु शकतो ते तरी फायदा करुन घेनार आहेत का? हयाच मुद्द्यमुळे मी ही चर्चा करत आहे. शेवटी काय राजकारणी आपली पोळी भाजुन घेनार, तुम्ही आम्ही विधायक कामे करन्या ऐवजी फक्त चर्चा करनार.
|
मला यात एकदोन तांत्रिक मुद्दे मांडायचे आहेत.या वादचर्चेत मलाही पुष्कळ लिहिता येईल पण इथली चर्चा ज्या पातळीवर चालू आहे त्याला निकोप वाद म्हणता येणार नाही. म्हणून त्यात मी पडत नाही्या बी बी वर मी जाणीवपूर्वक पोस्ट करीत नाही कारण मी अनेक वेळा आवाहन करूनही महिला आरक्षणाबाबत माझ्या मुद्द्याना कोणीही उत्तरे दिली नाहीत. हितगुजवरील महिलानीदेखील त्याची दखल घेतली नाही हे मला जास्त दु : खदायक वाटते. आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर सुद्धा महिला बोलत नाहीत म्हणजे केवळ त्या भारतात नाहीत म्हणून त्याना इथल्या महिलांशी घेणे देणे नाही का? हा त्यांचा इश्यू नसेल तर भारतातल्या समाजव्यवस्थेबद्दल कशाला शिरा ताणाव्यात? म्हणजे मूळ तत्व सोडून कसला तरी संताप व्यक्त होतोय भावना विवश होऊन. शालिनी ताई बोलतात ते चूक की बरोबर हा प्रश्न वेगळा आहे पण तीही एक भूमिका आहे. त्यांची भूमिका कथित सवर्णाना सपोर्ट करणारी असली तरीही शम्भर टक्के मराठा लोक ताईंच्या मागे का जात नाहीत याचा अर्थ कोणी शोधणार आहे की नाही? सरकार म्हणजे कोण? निवडून गेलेली माणसे जनतेला परकी का वाटतात याचा अर्थ का इथे शोधला जात नाही. इथे भाजपला मानणारे बरेच असतील मग त्यांची वैय्यक्तीक मते भाजपच्या अधिकृत मताशी जुळतात काय? का नाही जुळत? संघाचे कट्टर स्वयंसेवक अण्णा डांगे यांची आरक्षणाबद्दलची मते इथल्या स्वयंसेवकाना मान्य आहेत? गोपीनाथ मुंडेंची? नानाजी देशमुखांची? नानाजी देशमुख हे संघातले सगळ्यात हुशार आणि आदरणीय व्यक्ती. बाळासाहेब ठाकरे यानी सत्तेपूर्वी विधान केले होते मी सत्ता आली तर समाजकल्याण खाते ठेवणार नाही. काय झाले हो त्या घोषणेचे? का करू शकले नाही बन्द? याला उत्तर येईल ह्या राजकारण्यांचे असेच असते!. निवडून देताना माहीत नसते का ह्यांचे असेच असते म्हणून?. ह्या सर्वांचे विश्लेषण मी माझ्या परीने केलेले आहे मला ते माझ्या व्यवसायाचा भाग म्हणून करीत रहावे लागते. पण ते मला इथे मांडायचे नाही कारण ज्या शिवराळ पद्धतीने इथे प्रतिक्रियावादी चर्चा चालू आहे त्यातून वर्षभरही काहीच निघणार नाही. तीच तीच माणसे तेच तेच मुद्दे ऊगाळत आहेत. बरे असो... तांत्रिक मुद्दे सांगतो.. लालभाईने जी कोर्ट केस सांगीतली आहे त्या निकालात सरकारी (किंवा पब्लिक एम्प्लाॅयमेन्ट)नोकरीत हंगामी कामगाराना हक्क सांगता येणार नाही असे ते जजमेन्ट आहे. खाजगी नाही. SC hits at backdoor appointments. In the unanimous verdict of far-reaching consequences by a Bench, headed by Chief Justice Y. K. Sabharwal, clearly laid down that unless the appointment for government jobs was made according to relevant recruitment rules after a proper competition among qualified persons, it would not confer any right on a person so appointed to get permanence in service notwithstanding the years of work put in. दुसरा मुद्दा विसरलो...
|
Peshawa
| |
| Thursday, June 29, 2006 - 5:15 pm: |
| 
|
लालभाइ एक्तर तुम्हि डोळे बन्द केलेल्या मांजरासारखे वावरताय किंवा तुमच्या reasoning मधली भगदाडे " डोळ्यातले मुसळ... " अशा पधतिची आहेत... १. reservation implement करून ५० वर्शे झालि. ह्या reservation मुळे समजावर झालेले परिणाम (चांगले वाइट) देखिल किति जाणानी अभ्यासले आहेत? सरकारने नविन आरक्षणे द्यायच्या अधि ही छाननी करणे योग्य नाही का? एक वर्ग मोठ्याने ओरडतो आहे कि त्याना ह्याचा मनस्ताप आणी त्रास होतो आहे तर त्यांचे हे ओरडने कोल्हेकुइ आहे हे म्हणण्याचा मानभावि पणा व उद्दाम पणा ह्या लोकशाहित कोणिच करु धजु नाही. ह्यांच जळत आहे किंवा त्यांचि तशी भावना आहे तर त्यावर सहानुभुतिने विचार करणे गरजेचे आहे असे मला वाटते... आम्हि न्याय करतो हा मुजोर पणा आणी नन्दिबैलपणा commies खेरिच अजुन कोण दखवणार... ? २. ज्या घरामधे दोन पिढ्यानि आरक्शणे घेतलि आहेत अशा घरा मधे शिक्शणाविशयक किति आस्था निर्माण झालि? त्यांची मुले काय प्रमाणात पांगुळगाडे सोदुन समाजात ताठ उभि आहेत? ( हाच आरक्शणाचा मुख्य उद्देश आहे न?) दोन पिध्या भरपूर होतात (न्व्हत्याचे होते आणि होत्याचे न्व्हते व्हायला)ह्याचे परिक्शण करणे महत्वाचे नाहि? मग केले आहे असे कोणी? .. कार्यकर्ता होणे नेहमिच सोपे असते त्याला डोके लगत नाही. त्यातुन एखाद्या विचरसरणिचा जयघोश करायला तर अजिबात डोके लागत नाही... लागतो तो फ़क्त अगाध slavish attitude ३. ईथे बसुन लाल फेस येइ पर्यन्त बोलत आहात. म्हणुन विचरतो आहे ह्या विशयि काही ठोस पुरावे देउ शकाल का? तुमच्या तोंडावर जो paper फेकला त्यातल्या आकडेवारिवर नजर टाकलित का? त्यांच्या experiment ची validity किति? ह्या करता वेगळा paper जरूर काढा... पण त्यांचे निश्कर्श पाहिलेत का? OBC अणी सवर्ण ह्याच्यातिल शैक्शणिक दरी किति अरुंन्द आहे हे जाणवले नाही का? ५. तुमचा मुद्द बरोबर आहे कि प्रोत्साहन देणारे वातावरण आणी साधने सुलभ मिळणे हे शर्यतीत टिकण्या साठि आवश्यक असते! आर्थिक पाठबळ पण मोथ भग असतो... पण त्या पेक्शा महत्वाचि गोष्ट शर्यतीत उतरण्याची जिद्द (झक्किवर्य म्हणतात त्याला अनुमोदन)... मदतिचे हात समाज देतोच... दिले आहेतच ६. प्रत्येक सवर्णाच्या घरि शिक्षणाला पुरक वातावरण होते हे म्हणने मुर्खपणाचे आहे... इथे कितितरि असे लोक असतिल ज्यानच्या अजोबानी नादरिवर शिक्शन पुर्न केले असेल.. ज्यानच्या काका मामानी मैलोन्मैल पायपिट केलि असेल केवळ शिक्शण मिळवण्यासाठि... दारिद्र्य सवर्णानी बघितलेच नाही प्रत्येक सवर्ण हा opressor अस्तो आणि त्यांच्यावर अत्याच्यार होतच नाहित हे मुर्खपणाचे गुर्हाल कितिवेळ ऐकायचे? ७. झेण्डे बाजि व्यतरिक्त संधि दिल्यावर लोक काय करतात हे महत्वाचे. गेलि २७ वर्शे तुम्हि comreds बेन्गाल मधे आहात म्हणजे राजकिय सवर्नच आहत द्याय्च्या का इतर पक्शाना ७०% राखिव जाग? त्यानाहि नाही पोषक वातवरन बेन्गाल मधे.. कय म्हणता? With political reality in mind I know getting rid of reservation is extremely difficult... Its a lost battle: but here is my suggestion 1. In a socially backward family give reservations only for two consicutive generations. (the familiy has to make a formal request for the reservation when it thinks it is ready to take advantage of the process : kind of dynamic allocation) Not only that for two generations provide free primary and secondary education to every one in that family. Moreover, make mandatory that for continuation of benefits (including reservation) females of that family has to go to school and should at least finish secondary education. Provide according to the merit the job opportunity to the members of that family for the duaration of reservation.
|
Saurabh
| |
| Friday, June 30, 2006 - 12:41 am: |
| 
|
लालभाई, न्यायालयाच्या निर्णयावर माझे 'उत्तम' असे मत आहे. कारण नोकरीच्या शाश्वततेचा नक्की कसा दुरुपयोग होतो हे सर्वज्ञात आहेच! ह्या निकालाचा आणि मि ( खरेतर आधि काहींनी ) उपस्थित केलेल्या प्रश्नाचा (कोणता ते मी सांगणार नाही, चर्चा पूर्ण वाचली तर कळेलच) काही संबंध नाही. असल्यास मला समजावून सांगा. त्याआधिच्या माझ्या एका पोस्टला देखील तुम्ही असेच गोळबेरीज उत्तर दिले आहे. संपूर्ण समाज एका पातळीवर येऊन स्वत स्वतची काळजी घेउ शकेल ह्या पातळीवर येणे! उत्तर छान आहे. माझ्या कंपनीमधे जेंव्हा वार्षिक मूल्यमापन होते तेंव्हा पुढिल वर्षाचे उद्दीष्ट आणि ते साधण्याचे निकष असे दोन्ही लिहावे लागते. ते लिहिण्यची गोळाबेरीज मार्गदर्शक तत्वे अशी आहेत : S pecific M easureable A ttainable R elevent T ime-framed ह्यातल्या किती तत्वांवर हे वरील उत्तर उतरते हे जो तो तपासू शकेलच. सातत्याने काही उद्दिष्टे गाठता येत नसतील तर त्या उद्दिष्टांसाठीच्या उपाययोजना रद्द करु नयेत हे जेवढ्या सहजपणे आरक्षण समर्थकांना मान्य होते तेवढ्याच सहजपणे त्य योजना वाढवण्याच्या आधी देखील त्यांच्या अपयशाची कारणमिमांसा करणे आवश्यक आहे हे का पटु नये? आरक्षणाचा उपयोग होतो हे 'डोळादेखले' सत्य आहे अशी घट्ट समजूत का असावी? आरक्षणचा उपयोग होतोच होतो हे पटवण्याकरिता आतापर्यंत तुम्ही काय संदर्भ दिले आहेत? करण थापरने अर्जुनसिंहांच्या मुलाखतीमध्ये त्याच्या विरोधातली आकडेवारी दिली होती.. समर्थनार्थ आकडेवरी आहे काय? नसेल तर का नाही? की एखदे उद्दिष्ट साधले की नाही हे मोजतायेण्याजोग्या निकषांवर तपासण्याची ईच्छाच नाही?
|
लालभाई सोडुन बाकी सगळ्यान्च्या पोस्ट्स झकाऽऽऽस! मला आवडल्या! रॉबिन, पॉइण्ट परफेक्ट पकडलास! आता त्यावरुन हे सुनिश्चित होत हे की वर्तमानपत्र वर वर नजरेखाली घालुन (पुर्णतः वाचुन नव्हे) कोण कसल्या पोस्ट करत हे! अन हेच आमच्या बाबतीत बघा, विचारा तर खर मधे सन्दर्भ देताना जरा थोडी गफलत झाल्या सारखी वाटली तर विचारपुस मधे जाऊन आमचे कान उपटले जातात! याला म्हणतात "ब्राह्मणी शैक्षणीक" वातावरण! असे कान उपटुन घ्यायची नि उपटायची धमक ज्यान्च्यात असेल त्यान्नी शिक्षण वगैरेच्या बाता माराव्यात! अन अशान्ना आरक्षणाच्या पान्गुळगाड्याची गरज लागत नाही! आरक्षण ही शेवटी भीकच हे हे ज्या समाजाला माहीत हे तो मुळचा बारा बलुत्यातला भिक्षुक असलेला समाज असली भीक कधिही घेणार नाही हा फार मोठा विरोधाभास हे! झक्की, छान अन नेमके लिहिलेत! बाकीच्यान्चे पण सुन्दर लिखाण! झक्की, मी परत विचारा तर खर वर जाऊन आलो, मी लिहिल हे ते बरोबर हे! सन्सदेची उभारणी नवनियुक्त प्रतिनिधि अस्तित्वात आल्यावर अर्थात पहिल्या निवडणुका झाल्यावर झाली! घटनेची निर्मिती आणि स्विकारणे या बाबीनन्तर निवडणुका, त्यानन्तर अधिकृत सन्सदेची निर्मिती असा घटनाक्रम सान्गणे मला अपेक्षित हे! अर्थात तुमचा आक्षेपही बरोबर हे कारण ती पोस्ट लिहिताना मेन्दुतील प्रचन्ड वैचारीक गुन्त्यातुन मला २६ जानेवारी आठवत होते पण साल आठवत नव्हते म्हणुन मी तशी तो उल्लेख गुन्डाळणारी पोस्ट केली! (आणि नेमक तेव्हडच तुम्हाला दिसल)
|
Aashu29
| |
| Friday, June 30, 2006 - 3:28 am: |
| 
|
तुमच्या इतक्या तर्कशुध वाद विवादात मि अल्पमति आहे तरि एक प्रसन्ग मला इथे सांगावासा वाटतो माझा एक मित्र शाळेपासुनचा , खुप sincere आनि मेहनती. तो SC वर्गातला आहे तो स्वतहच्या हिमतिवर भरपुर % मिळवुन १२ वी उत्तिर्ण झाला एवढेच नव्हे , एंजिनिअरिंग ला प्रवेश घेताना त्याने चक्क ओपन कास्ट टाकलि म्हणाला मला माझ्या हिमतिवर पुढे जायचय ,सवलतिचि गरज नाहि मला, कोण्या गरजुला मिळु दे हि सिट ,माझी हरकत नाहि!! त्याला VJTI एवजि SP कोलेज मिळाले, पण जाम खुश होता तो. याला म्हणतात जिगर!!
|
कौतुकास्पद, पण एका qualified open ची seat गेली. हा सुद्धा एक दुटप्पीपणाच आहे. Following questions rise in such matters. Why did he not choose to take admission through reservation ? If he is educated and understands what reservation means for open class candidates, he should have let a qualified open person take that seat rather than a dumb 50% who may not do justice with the seat and may even drop out. In short, if you achieve excellence and you are a bc then eat one more position for open class and there by profit an uncouth bc to get admitted instead. If you are bc and do not achieve excellence cast is there to help you. Because of this cast basis for reservation forward class always gets short end of the stick. Can you ever think what will be the plight of forward class person who is not "exceptional" academically ? Mind well, I said "exceptional" not average. Also, the current situation seems to very disproportionately advantage smart bcs. They get choice to determine future of a fc student who is way better than reservation catagory and slightly inferior that this smart bc guy. असो, ये india है. sorry patriots, I had to say this thanks to our visionary politicians who come from us.
|
Avinashi
| |
| Friday, June 30, 2006 - 4:23 am: |
| 
|
आशुची गोष्ट वाचुन एक गोष्ट आठवली... १९९४ पुर्वी जेव्हा जातीचे certificate . मिळवणे फ़ार कष्टाचे नव्हते तेव्हा.. आता चर्चेत ज्या सवर्ण जातींचे उल्लेख होताहेत त्यांच्यापैकी माझे family friend यांनी BC चे certificate काढले स्गळ्या जगाला माहित होते ते कोणत्या जातीचे आहेत त्या दोघांनि bj medical ला post graduation ला त्यांना हवा असलेला विषय निवडला. आणि आज ते दोघे पुन्यात practice करताहेत. रोबिन सारखि चर्चा केली तर आम्च्या सार्ख्याला भाग घ्यायला आनंद वाटेल.आणि हा जो इथे याला धराचा खेळ चाललाय तो बन्द झाला तर ठिक नाहीतर हे भाग पन बंद व्हायला वेळ लागणार नाही.
|
Avinashi
| |
| Friday, June 30, 2006 - 4:26 am: |
| 
|
कौतुकास्पद, पण एका qualified open ची seat गेली. हा सुद्धा एक दुटप्पीपणाच आहे. Following questions rise in such matters. Why did he not choose to >>>> mhaNaje kaahii hii karaa tumhaalaa laathaach ghaalu...hitvaadi???/ laalbhaai, tumach communism aamchyaa pachanii padat naahi,padanaarahi nahi. pan tuze kahi vichaar ekadam manya. are sagal;e savarn ashe naahit.tyaamule tumhi kalaji nakaa karu. aataa shant basaa. ithe fakt rajakaran disatey.
|
Santu
| |
| Friday, June 30, 2006 - 5:33 am: |
| 
|
लोकहितवादि तुमच बरोबरय "त्या" हुशार मागासवर्गिया मुळे एका "साधारण" सवर्ण विद्यार्थ्याचा चान्स जाणार. लिम्बु अहो भिक कसली हे बीसी लोक याना कष्ट करायला नको. हे आरक्षणा ला सोकावलेतं नाहितर कष्ट करुन स्वाभिमानाने पुढे यायला यांना कोणी अडवलेय
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|