Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 23, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Reservation in Private Sector » Archive through June 23, 2006 « Previous Next »

Mrdmahesh
Thursday, June 22, 2006 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, सवर्णांनी दिलेल्या आश्रीताच्या जागी स्वतःला एकदा उभे करून बघा आणि मग सांगा स्वाभिमान आणि आत्मविश्वास किती आणि कसा असतो ते.

व्यक्तिगत उल्लेख टाळलात तर बरे होईल लालभाई!!!
अन् ह्या गोष्टी तुम्ही मला सांगू नयेत... अनेक वेळा आश्रित म्हणून मझ्यावर वेळ आली आहे पण प्रत्येक वेळी स्वाभीमानान अन् आत्मविश्वास अधिकच उफालून आला... स्वत:च्या हिमती वर पुढे येऊन आश्रिताचे जिणे झुगारलेले आहे... हे तुमच्या सारख्या लोकांच्या रक्तातच नहिये महाशय...
परत जर वैयक्तिक रित्या बोटे दाखवलीत तर माझ्याशी गाठ आहे... लक्षात ठेवा...


Laalbhai
Thursday, June 22, 2006 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक नवीन रोग जडलेला दिसतोय.

राजे, याला उदाहरण देणे असे म्हणतात. इंग्रजीत याला putting in ones shoe असे म्हणतात. तेच करण्याचा उद्देश होता. म्हणजे, असे आंधळ्याच्या जागी स्वतःला उभे करून पहा आंधळ्याचे जगणे किती कठिण असते ते! अशा अर्थाचे ते म्हणणे होते.

तुमच्या धमकीचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही!


दुसर्‍याच्या पोळीवरचे तूपच काय इतरही काही चांगले चुंगले असेल ते ओढून खाणे हा आमचा हक्कच आहे मुळी असेच ना?

हे तुमच्या सारख्या लोकांच्या रक्तातच नहिये महाशय

याबद्दल मी तुम्हाला काही म्हणत नाही. चर्चेत असे होतेच हे समजण्याइतके शहाणपण माझ्यात आहे!

Laalbhai
Thursday, June 22, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वत:च्या हिमती वर पुढे येऊन आश्रिताचे जिणे झुगारलेले आहे

very good! तुम्ही आयुषात खुप काही मिळवलेत.

पण तुमच्यातले गुण, तुमच्यातली तडफ समाजातल्या यच्चयावत लोकांत असावी आणि ती नसल्यास केवळ हालाखीचेच जीवन जगावे असे तुमचे म्हणणे आहे का? तसे असेल तर आमचा त्याला सख्त विरोध आहे. लक्षात घ्या, समाजात तकी गरीबी आणि लाचारी साचलेली आहे, की तुम्ही जी तडफ दाखवली ती दिसणेच फार कठिण आहे.

सर्वांना समान संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. सगळे एकाच पातळीवर आले पाहिजेत. मग तिथुन पुढे जो कोणी स्वतःची तुमच्यासारखी प्रगती करून घेईल, तो स्वतःच्या कर्त्रुत्वचे खईल.

पण संधीच नाकारली जाते आहे. एका समान पातळीवर येण्याचा कोणताही मार्ग नाहीये. त्यासाठी आरक्षण हवेत!


Laalbhai
Thursday, June 22, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अविनाशी... धन्यवाद. आता तुम्ही कुणाचे duplicate ID या प्रश्नास तयार रहा. :-)

Gs1
Thursday, June 22, 2006 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश >>>>>परदेशातून होणारी गुंतवणूक (येणारे काम) जेव्हा या reservation मुळे यायचे थांबेल तेव्हा या तथाकथित "comreds" ना कळेल...


महेश, कॉम्रेड्सना तेच हवे आहे. भारताला विपन्नावस्थेला नेणे, सवर्ण विरुद्ध इतर अशी दुही माजवणे, अराजक माजवणे आणि त्यातून तुकडे हे या देशद्रोह्यांचे मुख्य ध्येय आहे.




Mrdmahesh
Thursday, June 22, 2006 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजे, याला उदाहरण देणे असे म्हणतात. इंग्रजीत याला putting in ones shoe असे म्हणतात. तेच करण्याचा उद्देश होता. म्हणजे, असे आंधळ्याच्या जागी स्वतःला उभे करून पहा आंधळ्याचे जगणे किती कठिण असते ते! अशा अर्थाचे ते म्हणणे होते. >>

हे तुम्ही वेगळ्या शब्दात मांडू शकला असता... "एखाद्या सवर्णाने आश्रिताच्या जागी स्वत:ला..." असे शब्द असले असते तर मी समजू शकतो पण direct वक्तिगत पातळीवर येणे म्हणजे अतीच झाले...
अशी पुचाट भाषा तुमच्याच तोंडी शोभते... मीच नाही, अनेक सवर्ण असे जिणे जगले आहेत पण स्वाभीमान अन् आत्मविश्वास वाढवून ते पुढे आलेले आहेत...
उदाहरणाच्या नावाखाली वैयक्तिक चिखलफेक करणे हे तुमच्या सारख्या लोकांनाच जमते... हीच तुमची लायकी आहे... असेच लोक आरक्षण मागतात...

परदेशातून येणारी गुंतवणूक ही काळाची गरज आहे. कोणत्याही आरक्षणांमुळे ती थांबणार नाही. परदेशी कंपन्यांना त्यांचे काम कमी किमतीत आणि योग्य वेळेत होण्याशी मतलब असतो.>>

यातुन तुमचे खाजगी क्षेत्रातले ज्ञान किती अगाध आहे ते कळले... अहो नुसती कमी किंमत असून चालत नाही.... चीन, व्हिएतनाम सारखे देश तर भारतापेक्षा कमी किमतीत काम करून देतात. तरीही अशा कामांचा ओघ फक्त भारताकडे आहे... याचे कारण म्हणजे कामाचा उच्च दर्जा... आरक्षणामुळे नेमका हाच दर्जा खालावणार आहे...
असो...
ईथे बोलण्यात आता स्वारस्य उरले नाही... हीन प्रवृत्तिच्या लोकांना टाळलेलेच बरे...


Laalbhai
Thursday, June 22, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हीच तुमची लायकी आहे
>>>>
महेश.. मला वाटले होते तुम्ही माझ्याशी प्रामाणिकपणे चर्चा करत आहात. मी चुकलोच.

इथे कुणालाच मुद्द्यांना धरून चर्चा करायचे नसते का?

देशद्रोही म्हणणे, लायकी काढणे, विरोध झाल्यास duplicate ID च्या नावाने बोंब मारणे... इतकेच इथे होत आहे.

ही केवळ घाबरल्याची आणि मुद्देसूद प्रतिवादास काहीच भांडवल नसल्याची खूण आहे. हजारो वर्षे ज्यांना "पायाखालची वहाण" म्हणून वागवले त्यांची अशी बरोबरीची भाषा या तथाकथित सवर्णांना सहन होत नाही हेच खरे.

अर्थात, हे इथे बडबड करण्याशिवाय करू काय शकतात? कितीही सामंजस्याने सांगितले तरी हे महाभाग दुसर्‍याची "लायकी" काढण्यास टपलेले असतातच. इतकीच यांची लायकी. पिढ्या न पिढ्या शिक्षण घेऊन कोणतीही आत्मिक उन्नती होत नाही हे खरेच पण पोटासाठी शिक्षण हवेच.

त्यामुळे हे आरक्षण आम्ही मिळवणारच. तुम्ही वाट्टेल तितकी बोंब मारा!


Laalbhai
Thursday, June 22, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, कॉम्रेड्सना तेच हवे आहे. भारताला विपन्नावस्थेला नेणे, सवर्ण विरुद्ध इतर अशी दुही माजवणे, अराजक माजवणे आणि त्यातून तुकडे हे या देशद्रोह्यांचे मुख्य ध्येय आहे.


पूर्वग्रहदुषित वक्तव्याचा आणखी एक नमुना..
ह्या व्यक्तीचे अनेक काळापासून मुसलमान, कम्युनिस्ट, ख्रिश्चन मिशनर्‍या यांविरुद्ध अपप्रचार करण्याचे प्रयत्न चालले आहेत. त्याचाच हा भाग आहे.

या मनुष्याकडे यासाठी कोनतेही पुरावे नाही. अजुन तरी या माणसाने अशी कोणतीही उदाहरणे दिलेली नाहीत. यावरून काय ते समजा!

इतरांना देशद्रोही म्हणून स्वतःची राष्ट्रनिष्ठा सिद्ध करणे हा या जमातीचा कायमचा आवडता छंद आहे.


Saranga
Thursday, June 22, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कुणीही कुणाला देशद्रोही म्हणु नये ही विनन्ती.

लालभाई, समाज सुधारन्या बद्द्लच्या तुमच्या जानीवेशी आम्ही सहमत आहोत. पण communist च्या विचार सरनीच्या बर्याच गोष्टी आम्हाला मान्य नाहित.

१. कम्युनिस्ट असे समजतात की फ़क्त त्यान्चा द्रुष्टीकोण योग्य आहे आणि बाकी सगळे अयोग्य आहे. ह्याचे पुरावे अगदि Stalin, krushchev to Mao आहेत. ह्याच द्रुष्टीकोणातुन तुम्ही समाजातल्या गोष्टीवर control ठेउ पाहता. म्हणून privitisation ला विरोध, education वर सरकारी control ह्या मागण्या.

२. marx च्या classless society च्या आदर्श सान्गायाचा आणि वर समान नागरी कायद्याला विरोध, जाती आधारीत आरकष्ण मागायाचे हा दुट्प्पीपणा होत.

३. मागासल्यान्ना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यान्च्या उन्नती साठी सरकारने सतत प्रयत्न करावा हे मान्य, पण त्यासाठी फ़क्त जातीचा विचार कितपत योग्य आहे? we are not opposed to reservations, but the basis of determination of backward classes. We must have reservations in education but introduce disqualification based on creamy layer concept as given by Supreme Court .

४. Private Service मध्ये reservation मागणे हे हासस्यापद आहे कारण मुळात चा private sector लाच विरोध असताना, त्याच private sector मध्ये राखीव नोकरी मागण्याला काही अर्थ आहे का?


Santu
Thursday, June 22, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हे एरंडाच गुर्र्हाळ अजुन चाललय होय

Surya
Thursday, June 22, 2006 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काळ उलटतो व केलेल्या चुकान्ची शिक्षा भोगायला लावतो हेच खरे. एखाद्या समाजाने दुसर्या समाजावर अन्याय केला तर त्याचे परिणाम भोगावेच लागतात.
मी जेन्व्हा आठवीला प्रवेश घेतला त्यावेळी मला तो लगेच मिळाला. पण माझाच जवळचा मित्राला शिक्षन नाकारण्यात आले कारण का तर तो ओबीसी होता म्हनुन मी पुर्ण प्रयत्न केला पण शिक्षकानी सरळ सान्गितले तु त्यच्या बारोबर जास्त रहात जाऊ नकोस. ही आहे एका खेड्यातली गोष्ट जत तालुक्यातील.
खरेतर त्याची बुधिमत्ता चान्गली होती. आम्ही बर्याच वेळा त्याच्याकडुन धडे घेतले होते.
आता माझ्या मुलाला तेच भोगावे लागत आहे.
कुठल्याही शाळा,कोलेजचे प्राचार्य पहा जनरली उच्चवर्णीयच असतात बाकीच्यान्ची लायकी नाही असे नाही पण सन्धी मिळाली नाही.
लालभाईन्चे सर्वाना बरोबर घेऊन जाणे मलाही पटतेय. जगात उच्चवर्नीयान्च्या किती पर्सेन्टेज लोक उच्च पदावर आहेत साधारणपणे तेव्हढेच इतर जातीचे देखिल असले पाहिजेत.


Soultrip
Thursday, June 22, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lalbhai, did you ever think why communism has failed everywhere, right from Eastern Europe to Russia to China? ..& why all the commies are silently/openly adapting capitalism? ..Because capitalism works! Capitalism rocks!!
..In 1991 we were forced (Thank God!)to deviate from the Nehruvian socialistic model (which had made us bankrupt then with EMPTY coffers, i.e. zero foreign exchange reserves. We were forced to pledge gold), were asked to liberalise & open up our economy & the fruits of that good & tough decision (implemented by Dr. Manmohan Singh) are there to see, to enjoy!

Because of the irreversible liberalization process, the reformed labor laws, we are seeing a GDP growth rate of 8.5%! That's the reason why we are being called as 'tomorrow's super-power' & why India has become the hub of IT/BPO outsourcing, has become the back-office of world! ..& that's why, you and me (& most of the maayboli junta) from middle-class background could achieve something we never dreamt also!


P.S. Communism believes in 'let's ALL live in poverty (for the sake of under-privileged)' The sick logic is in fact, 'If I'm not rich, I should at least drag the rich fellow to get him in my line')

Capitalism belives in 'Nothing wrong in being rich, as long as we earn the money rightfully & ethically'







Kedarjoshi
Thursday, June 22, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Very well said Soultrip.

Furthermore regarding reservation.

AS long as I know and may be more years then my birth, we have some thing called EBC form ( called as Ecanomic backword class form) you fill this form give it to school head master and all your fees will be paid by govt and not by you. There are other form like PTC too. Now these will enable economically backwork class ( nit laxat ghyaa I am not saying SC/ST or OBC) to take education and even higher education like engineering.
Why they have not taken advatage of these forms in so many years? what went wrong here?

I belive their leader didn't educate janta about this. why? Now this question I would like to ask Lalbahi and others who are leaders of masses ( as they are talking about reservation in private sector).
As far as my openion goes the leaders wanted to RULE the junta through vote banks.
Dalitachi vote bank manje Ramdas kade ja. Tyla kaai mahiti ahe ha gaun mudda kaaran tyna fakt mate pahijet.

Lalbhai prakash taku shaktil yaavar. (EBC from and Dalit leaders yaa muddyavar).

parat ekda Lalbhai / avinash etc, please mudda sodun bhataku naka jase tumhi GS1 chya babtit lihile. (mishanri kaai karata he me tumhla nakkich saagen, purave hi dain)

Laalbhai
Friday, June 23, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथमतः अनेकांनी मुद्देसूद चर्चेची तयारी दाखवत चर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न केला याबद्दल आभार. आशा करतो की इथुन पुढचे माझे मुद्दे पटले नाहीत तर "लायकी" "देशद्रोह" "गरळ ओकणे" अशी अनावश्यक टिका होणार नाही!


केदारदा, जसे आमचे कान धरलेत तसे "इतर" लोकांचेही धरले असते तर बरे झाले असते.

काही गोष्टी स्पष्ट करतो. इथे चर्चा आरक्षणांची चाललेली आहे. कम्युनिझम चांगला की वाईट, त्यात काय दोष आहेत, याची चर्चा आपण इतर ठिकाणी करुयात.

एक गोळाबेरिज म्हणून उत्तर देऊ शकतो की कोणताही इझम हा कालसापेक्ष असतो. काळ बदलतो तसा कोणत्याही इझमच्या बेसिक मूल्यांमढे बदल करावाच लागतो. प्रत्येक काळाची आव्हाने वेगळी असतात. जगातले सगळेच इझम काही काळ यशस्वी झाले आणि नंतर पराभूत झाले. याला कारणे "काळाबरोबर न बदलणे" हे होईल. हे जसे इतर इझम ना लागू होते तसेच कम्य्निझमलाही लागू होते.

परंतू, कम्युनिझम सगळ्यांना गरीबीत ठेवा असे कधीही म्हणत नाही. (हा विरोधकांचा अपप्रचार आहे.) कम्युनिझमचे सर्वसाधारण म्हणणे एवढेच की समाजातील एका वर्गाची भरमसाठ प्रगती आणि उरलेला वर्ग उपेक्षित असेल तर अशा विकासाचे, प्रगतीचे परिणाम अखख्या समाजाला कधी ना कधी भोगावेच लागतील.

आणि विकासाचे हे असंतुलन दूर करण्यासाठी आम्ही आरक्षणांचे समर्थन करतो.

खासगी क्षेत्रातल्या reservation ची मागणी का, याचे स्पष्टीकरण आधीच दिलेले आहे. शिक्षणाची संस्कृती तळागाळापर्यंत पोचली पाहिजे. त्यासाठी शिक्षणाचे incentives काय असतात हे समजले पाहिजे.

याबाबत नुकतीच एक चांगली सुरवात infosys ने केल्याचे कळले. अधिकृत माहिती समजलेली नाही. Times of India ने सांगितले की infosys ने काही मागसवर्गीयांनी त्रेनिंग देण्याची तयारी दाखवली आहे.

ही खरोखरच आशादायी सुरवात आहे.

बाकी, या मुद्द्यांचे राजकारण होते, मतांसाठी हा मुद्दा पुढे रेटला जातो, हे सगळे अतिशय खरे आहे. पण मग कोणत्या मुद्द्याबाबत असे होत नाही? साधे नर्मदा धरण प्रकल्प असो नाहीतर मंदीर प्रकरण असो, राजकारण सल्याच मुद्द्यांचे केले जाते. म्हणून तो मुद्धाच बिनबुडाचा असतो, असे म्हणणे चूक आहे.



Laalbhai
Friday, June 23, 2006 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

marx च्या classless society च्या आदर्श सान्गायाचा आणि वर समान नागरी कायद्याला विरोध, जाती आधारीत आरकष्ण मागायाचे हा दुट्प्पीपणा होत.


सारंग, माझ्यामते आत्तापर्‍यंत मी जे काही मत व्यक्त केले त्यात हा दुटप्पीपणा नाही, हे स्पष्ट होतेच आहे. जातीवर आधारीत समाजरचना बदलण्यासाठी आधे सगळे एका पातळीवर आले पाहिजेत. त्यानंतरच मार्क्सचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.


सूर्य तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण इथे कोणत्याही वर्गाला पुन्हा एकदा गुलागिरीच्या किंवा उपेक्षेच्या गर्तेत ढकलण्याचा प्रश्नच नाहीये. दुर्दैवाने तसे झालेच तर आम्हा कॉम्रेड्सना पुन्हा एकदा नव्-उपेक्षित वर्गासाठी नवा लढा सुरु करावा लागेल. :-)


Laalbhai
Friday, June 23, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समान नागरी कायद्याबद्दल दोन तीनदा उल्लेख वाचला. मी जाणून घेऊ इच्छितो की हे समान नागरी कायद्याचे समर्थन करत आहेत, त्यापैकी किती जणांना या कायद्याचे संपूर्ण स्वरूप माहिती आहे? समान नागरी कायदा आला की सगळे काही व्यवस्थित होईल, हा समज त्या कायद्यातल्या कोणत्या कलमांवर आधारीत आहे?

ह्यावर अधिक माहिती मिळाल्यास धन्यवाद.

माझ्यामते सगळ्याच, अगदी सगळ्याच पक्षाचा आणि विचारवंताचा असा मुद्दा आहे की समान नागरी कायदा हा भारतीय समाजाला suit होणारा नाही. त्यामुळे तो implement करायला कोणताही पक्ष फारसा उत्सुक नाहीये. यात पुन्हा राजकारण आलेच, हा भाग वेगळा.. पण मुळात या कायद्याची उपयुक्तता किती आहे? हे त्याचे समर्थन करणार्‍यांपैकी कुणी स्पष्ट करू शकतील का?


Soultrip
Friday, June 23, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जातीवर आधारीत समाजरचना बदलण्यासाठी आधे सगळे एका पातळीवर आले पाहिजेत.>>>>
हा अट्टाहासच पुर्णत्: चुकीचा आहे. जेथे हाताची पाच बोटे सारखी नसतात (किंवा, जुळ्या भावांमधे पण बौध्धीक, मानसिक इतके फरक असतात), तेंव्हा भारतातील १०० कोटी जनता एका पातळीवर आणणे (१००० वर्षातही) केवळ अशक्य आहे, तसा विचार किंवा स्वप्न पाहणेही वेडेपणा आहे. There is bound to be some ineqality you need to live with. If you quote Marx, I can quote Darwin 'Survival of the fittest'! .. & that's the bitter truth! You might get the crutches of reservations for admission to edu.institutes, again for getting jobs but then what? You need to PERFORM! (Of course, the irnoy is in Indian govt. where without performing at all, these SC/ST/OBCs creeps become rude, arrogant CLASS-I officers, roaming in red/amber light cars & amassing millions thru' curruption!)

We humans are the only animals on this planet who nurture their progeny till they are 21 years old! & some INSIST that their government should nurture them beyond 21! (Thru' reservations) Ridiculous!!!

Saranga
Friday, June 23, 2006 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जातीवर आधारीत समाजरचना बदलण्यासाठी आधे सगळे एका पातळीवर आले पाहिजेत. त्यानंतरच मार्क्सचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

pan lalbahi, sagle eka patlivar aale aahet he kon va kase tharavnar? china madhye sagle saman patalivar aale aahet ka?

शिक्षणाची संस्कृती तळागाळापर्यंत पोचली पाहिजे. त्यासाठी शिक्षणाचे incentives काय असतात हे समजले पाहिजे.

100% manya, pan tya sathi IIT/IIM/Medical kinva private sector madhye reservation pahije ka. Khari garaj aahe prathamik shikshan compulsory ani uccha dargyache karane. Tya sathi comrades ne ka prayatna keli aahet? Mid day meals hi uttam kalpana aadhi TN ani Maharashtrat suru zali, WB madhye nahi. Jenvha bahusankhya mula primary shikshan sodun det aahet, tenvha reservation magnyat kahi arth nahi. syatantranantar chi kahi varshe govt. schools atishya uccha darjyachi hoti, karan aadhichya pidhitle barech guni samajik, rajkiya, beuracratic karyakarte ani kalavant he govt. school madhun ale aahet. saglyat aadhi reservation implement zale te education dept madhye ani aaj govt. school chi kay avastha aahe hey tumhala sangne ne lago.
tar sarva comredesna ekch vinanti aahe ki aadhi primary education pakke karnya sathi ladha dya.

Saranga
Friday, June 23, 2006 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मुळात या कायद्याची उपयुक्तता किती आहे? हे त्याचे समर्थन करणार्‍यांपैकी कुणी स्पष्ट करू शकतील का?

lalbhai, saman nagari kaydyane sarvat jast soshit varg jo aahe, stri ani tyat hi muslim stri, hyanna amulagra adhikar miltil jenekarun mulanchya shikshanat stri adhik vidhayak bhumika gheu shaktil. shahabano prakarna nantar hi congress ani comrades kahi dhada gheu icchit nahit hich dukhad gost aahe.
dusri gost, saman nagari kaydya shivay tumhi saglya dharma chay bandhvana eka patalivar kase annu shakal?

Laalbhai
Friday, June 23, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा अट्टाहासच पुर्णत्: चुकीचा आहे.

It is your point of view. Not necessary that it should be true. It might be rediculous for you but that does not change the truth. Some classes need nurturing for more time. Then we must provide them.

And we will keep on fighting till our dream comes true. Let it take 1000 years.. Existance of inequality does not, by any means, derive any cause for not protecting helpless class of socity. Nurturing poor class will infact secure your future! believe it or not.. You, being a capitalist, have all liberty to deny my claims/opinions :-)!

SaaraMga

प्राथमिक शिक्षण हाही फारच महत्वाचा मुद्दा आहे आणि ते सगळ्यांना कंपल्सरि केलेच पाहिजे. पण अशा अनेक योजना असूनही तामिळनाडू किंवा महाराष्ट्र १००% साक्षर नाहीये. आहे तो केरळ, हे लक्षात घेतले पाहिजे. जेवण देणे ही काहीशी आकर्षक योजना असू शकते. ती का आमलात आणावी लागली याचा विस्ताराने विचार करूयात...

दुपारचे जेवण हे मुख्यतः मुलांसाथी आणि त्यांच्या घरच्यांसाठी एक आकर्षण आहे. किमान एकवेळचे एका मुलाचे जेवण तरी सुटेल. म्हणून शाळेत पाठवतात. पण पुढे प्राथमिक शिक्षण संपल्यावर काय? दुपारचे जेवण देऊन या वर्गाला आयुष्याच्या लढाईसाठी सक्षम करता येते का? नाही.. बिलकुल नाही. का वर्ग तसाच opressed रहातो. त्याचा फार मोठा फायदा नाहीये.

प्राथमिक शिक्षण ही अत्यवश्यक बाब आहेच. पण दोन्ही मुद्दे पुर्णतः भिन्न आहेत. त्यांची आवश्यकता वेगवेगळ्या कारणांसाठी आहे. दोन्ही मुद्दे अत्यावश्यक आहेत.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators