Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 22, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Reservation in Private Sector » Archive through June 22, 2006 « Previous Next »

Chingutai
Wednesday, June 21, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बू
अरे अस कन्फूज नाही व्हायचं काही........मनसे मधे यायच आमंत्रण दे पाहू निळुभाऊ ला

-चिन्गी


Mrdmahesh
Wednesday, June 21, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागची ५० वर्षे जास्तीत जास्त effective and efficient व्हावेत म्हणून समाजातल्या सर्व थरातून काय प्रयत्न झाले?? >>
कित्येक सवर्णांच्या घरी काम करणार्‍या नोकरांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च हेच सवर्ण करीत आहेत. त्यांना नोकर्‍या मिळवून देत आहेत.

असे प्रयत्न झालेत. अजूनही होत आहेत. सकाळ पेपर च्या आवाहनाला साद देऊन अनेक सवर्णांनी जात पात न पहाता सढळ मदत केली आहे.
म्हणजे थोडक्यात काय "आम्ही ५० वर्षेच काय १०० वर्षे लागली तरी सुधारणार नाही पण जिथे शक्य असेल तिथे आरक्षण मागतच राहू.." असाच तुमचा सूर आहे..
आरक्षण हे काही अशा सुधारणांचे उत्तर नाहीये...
सवर्णातल्या अनेक कुटुंबांनी कष्ट करून आपली परिस्थिति सुधारली तसे तुम्हाला करावेसे वाटत नाही किंवा तसे करायची तुमची इच्छाच नाही.. नुसते आयते खायला पाहिजे... आज भारतात खाजगी क्षेत्रात जास्त पगार मिळतो म्हणून तुम्ही तिथे आरक्षण मागत आहात. इथे जर कमी पगार असता तर तुम्ही नक्कीच आरक्षण मागितले नसते.
सगळे परिवर्तन चुटकीसरशी होत नाहीत हे आम्हालाही माहित आहे पण स्वत:त परिवर्तन घडवण्याची भाषा करण्यापेक्षा तुम्ही आरक्षणाची "आयत्या बिळावर नागोबा" ची भूमिका घेत आहात..
कित्येक सवर्ण कष्ट करून गरीबीतून वर आलेत... त्यांचा कित्ता तुम्हाला का गिरवता येत नाही? किंबहुना असा कित्ता गिरवण्याचे शिक्षण देण्याची तुम्ही भाषा का करत नाही? या बद्दल तुम्ही काही बोलत नाही.. नुसताच आरक्षण एके आरक्षण चा धोशा लावला आहे... हे कितपत बरोबर आहे?
माझा आक्षेप आहे तो प्रवृत्तिवर... तुम्हाला शिक्षणात, सरकारी नोकर्‍यात आरक्षण मिळाले त्यातून तुम्हाला स्वत:ची प्रगती का करत येत नाही? एवढे आरक्षण आमच्यासाठी पुरे आहे अशी तुमची भूमिका का नाही?
एक लक्षात घ्या गरीब सवर्ण कुठल्याही आरक्षणाशिवाय वर आलेला आहे.. उगीचच सवर्ण म्हणजे श्रीमंत असा गोड गैरसमज करून घेऊन आरक्षण मागत फिरणे म्हणजे दुटप्पीपणाच आहे...


Deemdu
Wednesday, June 21, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिक्षणचा प्रसार तळागाळापर्यंत>>>>>>>
ह्यासाठी शिक्षणात आरक्षण देणे बरोबर आहे, त्यासाथी कार्य करणारेही बरेच लोक आहेत. पण त्यानंतर मिळणारी नोकरी मात्र गुणवत्तेवरच मिळावी त्यामध्ये आरक्षणाची गरज काय?

सर्वांना शिक्षण मिळयला हवे हे अगदी मान्य पण open category मध्ये नसलेले गडगंज श्रीमंत लोक ही आहेत की जे पैसे फेकुनही डिगर्‍या घेतात, आणि त्यांनाही आरक्षण हवय ?????
आमच म्हणण तरी काय वेगळ आहे ?? आम्ही ही तेच म्हणतोय सगळ्यंनी आमच्या बरोबर चला. आणि ज्यांच्या अंगात खरोखर गुणवत्ता आहे त्यांनी घेऊ दे की lead आम्ही कुठे नाही म्हणतोय त्यांना.

सगळ्यांनी बरोबर जाण्यामध्ये आज सगळ्यांच हित आहे. उगाच आम्ही कसे तुमच्या पुढे आणि तुम्ही कसे आमच्या मागे करण्यात नाही आणि त्या साठीच गुणवत्ता बघावी, आर्थिक स्तर बघावा आणि त्यानुसार आरक्षण ठरवावे.

आणि दुसर्‍य कुणी प्रयत्न करतील अशी वाट बघत बसण्यापेक्षा स्वबळावर उठण ह्या लोकांना शक्या नाहीये की काय ????
गांधी हत्याकांडानंतर ९९ % ब्राम्हणांना शूण्ण्यापासून सुरुवात करायला लागली होती

आणि जर हाच विचार तुम्ही समजुन घेतलात ( मी तुमच्या सारखी समोरच्याची अक्कल काढणार नाही ) तर कदाचीत ते फक्त आमचेच नाही तर आपले देव तुमच्यावर नुसती पुष्पवृष्टीच नाही करुन थांबणार तर तोंडभरुन आशिर्वादही देतील






Mrdmahesh
Wednesday, June 21, 2006 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही लायक व्यक्तींचा (बिझिनेसमन म्हणाला...लायक व्यक्ति मिळत नाहीत वगैरे वगैरे..) मुद्दा काढलात म्हणून सांगतो... आज कित्येक शाळा, colleges मध्ये मागासवर्गियांसाठी reserved असलेल्या पोस्ट्स रिकाम्या आहेत... तिथे सवर्ण ११ महिन्यांच्या करारावर आपले संसार कसेबसे चालवत आहेत...
आपल्यासाठी पोस्ट्स आरक्षित आहेत हे माहित असून सुद्धा तिथे नोकरी मिळवता येत नाही यातच कोण किती लायक आहे ते कळते.. आधी ही लायकी आणून दाखवा मग private sector मध्ये reservation चे पाहू...(त्यासाठी तुम्हाला पुढची ५० काय १०० वर्षे तुम्हाला हवी असतील तर घ्या...)
लायकीचा मुद्दा तुम्ही काढूच नका...


Maudee
Wednesday, June 21, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माझ्या नवर्‍याचे दोन मित्र आहेत. दोन्ही SC/ST . त्यातला एक आता MBBS doctor आहे internship चालू आहे सध्या. दुसरा anesthacia मध्ये specialisation करतोय.
ज्याला ख़रच शिकायचं आहे तो कसाही शिकतो त्यासाठी आरक्षण कशाला हवे???


Santu
Wednesday, June 21, 2006 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माउडे
एक लाख टक्के अनुमोदन.
माउडे
मराठा ३५%व ब्राह्मण ५ मिळुन ४०% आरक्षण मिळाले पाहिजे
बरोबर का चुक ते सांगा


Divya
Wednesday, June 21, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माउडी छानच पोस्ट.
पोस्ट च आरक्षण दिले की गप्प बसतील.... अगदी अगदी.


ही तुमच्या पाशी केलेली याचना नव्हे! जो हक्क आहे तो आम्ही मिळवणारच. तुमचा वैयक्तीक स्वार्थ पायदळी तुडवला गेला तरी हरकत नाही!!!


ओ साहेब काहीही काय? तुमच्या हक्कांसाठी तुम्ही दुसर्याच्या हक्कांची पायमल्ली करताय अस नाही वाटत का? ९९.१,व ९९.२ अशी जेव्हा पॉईन्टस वरुन रस्सीखेच असते admission घेताना तेव्हा हे ५८ टक्के आणि ६० टक्के वाले जेव्हा सहज admission घेतात आणि ९९.१ असणारा डावलला जातो तेव्हा अन्याय कोणावर होतो हो? आणि म्हणे हे ५० टक्के वाले फ़ार तळागाळातले अस्तीलच असे नाही ना कधी कधी असेच आरक्षणाच्या कृपेवर श्रीमंत झालेल्यांचेच पिढी ज्यांना खरी आरक्षणाची गरज नसावीच मग अन्याय कोणावर हो होणार?

मला वाटत नाही इथे कुणी सवर्ण या वर्गाचा द्वेष करत आहे किंवा दुषित नजर आहे. असेही कुणाला वाटत नसावे की आपल्या
उपकाराखाली कुणीतरी राहावे आजीबात नाही, गरजुंना मदत म्हणजे जर उपकार समजत असाल तर कदाचीत पुर्वग्रह दुषित कोण याचा तुम्हीच विचार करावा.

आपला समाज सुधारण्यासाठी आरक्षणाच्या कुबड्या वापरण्यापेक्षा प्राथमिक शिक्षणापासुन कितीजण वंचित आहेत ते बघा त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्ता करा. शिक्षणात गोडी वाटलेले आपणहुन स्वकष्टाने पुढे येतात कारण त्यांचा स्वताच्या बद्धीमत्तेवर आणि कष्टावर विश्वास असतो आणि अशा गरीबीतुन कितीतरी ब्राम्हण मुले वर आली आहेत. ज्यांची खरच योग्यता आहे पण पैशाअभावी शिक्षण अडले त्यांना जरुर आर्थिक मदत व्हावी, शिष्यवृत्त्यांच्या रुपाने सरकारनेही मदत करावी पण लायकी नसताना एखादी जागा देणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत नाही का?

आणि खरच महेश म्हणाले तसे ब्राम्हण वर्गा बद्दल बोलुच नका त्यांचा काही स्वर्थ पायाखाली तुडवला जात नाहीये हा अन्याय आहे असे वाटते म्हणुन सगळ्याच सवर्णांनी याला विरोध केला आहे आणि हे जर असेच राहीले ना तरी यातुन त्यांचे कष्ट आणि बुद्धीमत्ता तारुन नेइन ती कुणाची वैयक्तीक मक्तेदारी नाही.आणि त्यावर नाही आरक्षण घालता यायचे. दुसरी कवाड उघडतील




Laalbhai
Wednesday, June 21, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"आम्ही इतका वेळ घेऊ" असे नव्हे... तर अजुन कार्य पुरे झालेले नाही.

शाळात seats रिकाम्या असतात याचा अर्थ reservations नकोत असे कसे? त्या रिकाम्या असतात कारण शाळेत जायचे असते, स्वतःच्या उन्नत्तीसाठी शिकायचे असते, हे खालपर्यंत पोचलेच नाहीये.

तुमचे बरेचसे विचार पुस्तकी आणि आदर्श समाजव्यवस्थेत suit होणारे आहेत. आपल्या समाजाला हे suit होणारे नाहीत. (कोणताच समाज आदर्श नसतो, त्यामुळे कोणत्याच समाजाला suit होणारे नाहेत.)

साधारणतः समाजाचा सर्वांगिण विकास साधायचा असेल तर कमीत कमी गती असलेल्याचाही विचार करावा लागतो. प्रगतीमधे त्यालाही सामील करून घ्यावे लागते. कुणाची गती शून्य असेल तर समाजपुरुषाला काहीकाळ शून्यावर येऊन थांबावे लागेल आणि मग पुन्हा सगळ्यांना बरोबर घेऊन चालावे लागेल. सगळे सांधे एकाच गतीने चालणारे नसतील तर खडखडाट होणारच. तोच सध्या होतो आहे.

private sector मधे reservation हे शिक्षणाचे incentive आहे. आत घेतल्यावर त्याच्यावर काम लादू नका, असे कोणाचेही म्हणणे नाही. तिथेच आरक्षण घेऊन गेलेला शिकेल की काम कसे असते. त्यासाठी शिक्षणाचा उपयोग कसा होतो. त्यातून शिक्षणाविषयीची आस्था वाढेल.

शिक्षण आणि नोकरी हे एकमेकाला पुरक आहे. शिकायचे कशाला? असाच या समाजात जो मूळ प्रश्न आहे, त्याचे निराकरण होईल. कारण बहुतांश वर्गाकडे योग्य मार्गदर्शन, साधन, आणि आंतरिक इच्छा नाही म्हणून सुधारणा होत नाही.

ही मानसिकता बदलायची आहे. गांजलेल्या समाजाची आणि तथाकथित सुशिक्षितांचीही. समाजिक जबाबदारीचे भान लवकरात लवकर आले तुम्हाला तर तुमचा संताप आणि पुस्तकी विरोध कमी होईल.


Abhi9
Wednesday, June 21, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या फ़िक्शन सारखी वाटेल पण सत्य घटना.
तो मला ४-५ वर्ष ज्युनियर. अतिशय हुशार ( वर्गात १ल्या ५ त).
माझं शिक्षण पूर्ण होऊन मी नोकरी करायला लागलो त्या सुमारास तो १२ वी पास झाला. त्याची आई
S/C. वडील सवर्ण. त्याच्या जन्मानंतर १ वर्षात त्याच्या वडलांनी आईला टाकलेलं आई धुणी-भांडी करुन चरितार्थ चालवत असे. त्याच्या १२ वीच्या परीक्षेनंतर बरीच वर्षं मला त्याची काहीच खबर नव्हती. नंतर एका मित्राकडून ही माहीती मिळाली. १२ वीत त्याला चांगले मार्कस मिळाले. पण पुढे शिकवणे त्याच्या आईला आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नव्हते.
shortly afterwards they got converted to christianity. The local missionaries helped him to pursue his education. Today he is working, somewhere in gulf, as maintenance chief of an organisation. The reservation policy was not of any help to him.

मॉड ही पोस्ट इथे इरेलेवन्ट वाटत असल्यास कृपया डिलीट करावी.

Santu
Wednesday, June 21, 2006 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभि
मुद्दा चुकला नाहि योग्य आहे.
अरे आरक्षणाची खरी गरज या sc व st लोकांना आहे.
पण सध्या जो ओबीसी चे चे आरक्षण आहे तो नुसता स्टंट आहे.
sc व st लोकां ना आरक्षण आधी आहेच व त्या बद्दल कुणाची तक्करार नाहि.
अर्थात कितिहि आरक्षण दिले तरि वरिल गोष्टि या होणारच.
त्यात सुधारणा होण्या साठि सर्व देशाची आर्थिक परिस्थिति सुधारलि पाहिजे.


Abhi9
Wednesday, June 21, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं आपण आरक्षण धोरण लगेच अमलात आणावं
प. बंगाल पासून सुरुवात करावी. तिथे पुरोगामी विचारांचं प्राबल्य असल्यामुळे तिथे हे धोरण यशस्वी होण्यास काही अडचण येऊ नये. त्यानंतर केरळ.
आणि मग
महाजनो येन गत: स पंथ:

We will follow them.

Laalbhai
Wednesday, June 21, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh yes.. we are working on that and we already have necessary arrangements..

To have reservations in private sector.. Central Govt should make a law.. we are fighting for it.


Kedarjoshi
Wednesday, June 21, 2006 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,
एक प्रश्न, हे we म्हनजे कोण हो.


Avinashi
Wednesday, June 21, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभी, gud one अस लिहिणार कोणीच नाहिये.. इथे हा प्रश्न आता कोणि चर्चा करनार नाही, मात्र शब्दांचे खेल.. खेळायला सांगा आता तयार होतील सगळे!
शिकारी कुत्रे जसे एखाद्याच्या मागे लागतात तसे सगले obc च्या आनि विरोधकांच्या मागे लागतात, पण प्रश्नाचे उत्तर न शोधता विरोधकाला वकिली जाळ्यात कसे पकडायचे एव्हढाच विचार करतात. अभी तुला अनुभव लिहायला काही कोनाच्या जातीला खालचे लेखावे लागले नाही की देवाला,
इथे जिजाउवर joke झाले तेव्हा सगळे हे मर्द मराठा म्हणनारे आनि आनी इतर मुग गिळुन बसले.
आपले खरे शत्रु तर ते मारवाडी आनि गुजराथी.. इटा भैय्या लोक आहेत जे सगळ बळाकौन बसले आहे, आपल्या भांदणात आपण आपली सत्त त्यन्च्याकडे दिलिय.सगळा पैसा त्यन्च्या हातात आहे आज कोणतीही नोकरी न करता आणि एव्हढ्याशा सरकारी नोकरीवरुन आपण भांडत बसलोय.


Laalbhai
Wednesday, June 21, 2006 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार..
we म्हणजे we comreds .. :-) आणखी कोणते स्पष्टीकरण हवे आहे?


Mrdmahesh
Thursday, June 22, 2006 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

private sector मधे reservation हे शिक्षणाचे incentive आहे. आत घेतल्यावर त्याच्यावर काम लादू नका, असे कोणाचेही म्हणणे नाही.

very good कित्ती उदार हो तुम्ही? मला वाटले तिथे ही तुम्ही "आम्हाला फक्त २०% च काम हवे असे म्हणाला नाहीत" :-)

तुमचे बरेचसे विचार पुस्तकी आणि आदर्श समाजव्यवस्थेत suit होणारे आहेत.>>

पण हे सवर्णांनी प्रत्यक्षात उतरवले आहेत त्याचे काय? तुम्हाला ते का जमू नये? दुसर्‍याच्या तुपावरची पोळी ओढण्याचा प्रकार आहे हा.. नव्हे दुसर्‍याच्या पोळीवरचे तूपच काय इतरही काही चांगले चुंगले असेल ते ओढून खाणे हा आमचा हक्कच आहे मुळी असेच ना?
इथे वाद घालण्यात काही अर्थ नाही....
परदेशातून होणारी गुंतवणूक (येणारे काम) जेव्हा या reservation मुळे यायचे थांबेल तेव्हा या तथाकथित "comreds" ना कळेल... पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल...


Laalbhai
Thursday, June 22, 2006 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा सगळाच प्रकार अतिशय दुर्दैवी आहे!

मी कोणावरही कसलेही वैयक्तीक आरोप केले नाहीत. माझी मते मी ठामपणे मांडली. ज्यांनी माझ्या मतांना विरोध केला त्यांना मी अत्यंत सभ्य भाषेत उत्तर दिले आहे. पुरावे याच BB वर आहेत.

पण पुन्हा पुन्हा मी कोण, हा प्रश्न विचारला जातो आणि माझ्या मायबोलीविषयीच्या integrity बद्दलच शंका व्यक्त केली जाते, हे खेदकारक आहे. :-( शिवाय या ज्यांचा दुरान्वयेही संबंध नाही अशा लोकांना फुकट बदनाम केले जात आहे. उदाहरणार्थ सावनी, विनोद कांबळे. मला मी कोण आहे आणि कोण नाही, हे सिद्ध करण्याचा आटापिटा करण्याची काहीही गरज वाटत नाही. पण आरोप करताना तारतम्य बाळगावे ही किमान अपेक्षा असते.

पण कट्टरतावाद्यांनी तारतम्य सोडण्याची उदाहरणे नवीन नाहीत...

तरी कॉम्रेड्स.. निराश होऊ नका. अशा भेकड लोकांच्या हल्ल्याने आपल्या लढ्याला काहीही नुकसान पोचणार नाहीये.

लाल सलाम!!!


Laalbhai
Thursday, June 22, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण हे सवर्णांनी प्रत्यक्षात उतरवले आहेत त्याचे काय? तुम्हाला ते का जमू नये? दुसर्‍याच्या तुपावरची पोळी ओढण्याचा प्रकार आहे हा.. नव्हे दुसर्‍याच्या पोळीवरचे तूपच काय इतरही काही चांगले चुंगले असेल ते ओढून खाणे हा आमचा हक्कच आहे मुळी असेच ना?


>>>>

माफ करा.. कुणाच्याही व्यक्तीगत मालमत्तेवर आम्ही हक्क सांगत नाहीयोत.

समाजातल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी असते. ती पार पाडा, हा आमचा आग्रह आहे.

आमचे तुप रोटी मिळवण्यास अम्ही सिद्ध आहोत. आवश्यकता आहे ती संधींची आणि साधनांची, ती उपलब्ध होत नसतील तर ती लढूनच घ्यावी लागणार.


तथाकथित सवर्णांनी केले ते ठिक आहे. काही लोक उपकार भावनेने गांजलेल्यांना जवळ करतात. त्यांच्याकडून घरातली सगळी कामे करवून घेऊन मग शिक्षनाची वगैरे सोय करतात. हे सगळे ठिक आहे. पण अशा उपकारांची गरजच काय? अशी उदाहारणे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असली तरी त्यातून "उपकाराची" जाणीव निर्माण होते. मग स्वाभिमान आणि आत्मविश्वास कसा निर्माण होणार?

महेश, सवर्णांनी दिलेल्या आश्रीताच्या जागी स्वतःला एकदा उभे करून बघा आणि मग सांगा स्वाभिमान आणि आत्मविश्वास किती आणि कसा असतो ते. :-)


Laalbhai
Thursday, June 22, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परदेशातून होणारी गुंतवणूक (येणारे काम) जेव्हा या reservation मुळे यायचे थांबेल तेव्हा या तथाकथित "comreds" ना कळेल... पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल...

परदेशातून येणारी गुंतवणूक ही काळाची गरज आहे. कोणत्याही आरक्षणांमुळे ती थांबणार नाही. परदेशी कंपन्यांना त्यांचे काम कमी किमतीत आणि योग्य वेळेत होण्याशी मतलब असतो.

आपली समाजव्यवस्था कशी असावी यावर परदेशी कंपन्यांचे नियंत्रण आहे, असे म्हणायचे आहे की काय तुम्हाला? ही तर पुन्हा एकदा गुलमगिरीची सुरवातच म्हणावी लागेल!

आपली समाजव्यवस्था कशी असावी याविषयी सल्ले देणार्‍या कोणत्याही बहुराष्ट्रिय कंपनीला हाकलून लावण्याची जबाबदारी आमची. सुदैवने, या कंपन्या फारच mature आहे, आणि स्वतःच्या धंद्यापलिकडे कुठे ढवळाढवळ करताना सध्यातरी दिसत नाहीयेत.


Avinashi
Thursday, June 22, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

laalbhaai this is absolutely right... .. .. .. .. .. .. ..

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators