|
Mahaguru
| |
| Wednesday, June 21, 2006 - 6:03 am: |
| 
|
रैना, कोण म्हणालय ते कशाला बघत बसता , काय म्हणालय ते बघा.
|
अगदी बरोबर महागुरू! मी नाव घेतल नाही तरी सगळ्यान्च्या पोस्ट्स वाचत असतो! दर वेळेस प्रतिक्रिया देता येतेच असे नाही! उलट मत नाही पटल तरच प्रतिक्रियेची खात्री...
|
Laalbhai
| |
| Wednesday, June 21, 2006 - 6:44 am: |
| 
|
बरीच तंतरलेली दिसते एकंदरीत. मुर्त्या तोडण्याचा आणि आरक्षणाचा काय संबंध आहे, हे माझ्या समजण्याच्या पलिकडचे आहे. मुद्दा तो नाही.. आर्थिक परिस्थितीवर आरक्षण करा, असे म्हणणारे काही बाबी ध्यानात घेताना दिसत नाही. शिक्षण आणि शिक्षणापासून मिळणारी फायदे याची संस्कृती घराघरात रुजायला पाहिजे. ज्यांच्या घरात पिढीजात शिक्षणाची परंपराच आहे, त्यांना कळायचे नाही, पण ज्यांची hardly एखादी पिढी शिकली आहे, त्यांच्यात आर्थिक सुधारणा झाली असेल पण अजुनही शिक्षणाचे संस्कृती रुजलेली दिसत नाही. एका कॉम्रेडचे उदाहरण देतो.. त्याचा आजोबा अशिक्षित. बांधकाम मजूर म्हणून काम केलेला.. त्याचा बाप काहीतरी तिसरी नापास वगैरे. स्वतःची सही करण्यापेक्षा जास्त काहीही लिहिता वाचता येत नाही. हा आमचा कॉम्रेड थोडेफार शिकला आणि आता सरकारी नोकरीत आहे. याला २ मुली १ मुलगा. मुलींना शिकवण्याची मानसिकता अजुनही पचत नाही त्यामुळे त्यांना चौथी पाचवी नंतर घरी बसवले आणि मुलगा तसा फारसा हुशार नाही. कसाबसा पास होतो. मुलाचा आजा म्हणतो नाही शिकत तर कशाला पैसा बरबाद करतो? लाव त्याला कामधंद्याला... कॉम्रेड आमच्याकडे (संघटनेकडे) आला होता काय करू विचारायला.. आम्ही सांगितले, अलबत्.. त्याने शिकलेच पाहिजे.. शिक्षणावर पैसा खर्च करणे म्हणजे बरबाद करणे कसे होईल??? अर्थात हा कॉम्रेड आमच्याकडे आला म्हणून त्याचा प्रश्न कळला. असे अनेक कॉम्रेड केवळ मार्गदर्शन आणि संधी या अभावी शिक्षणा आणि संधी यापासून वंचित राहतात. आरक्षण अशा संधी उपलब्ध करून देण्याचे काम करते. म्हणून आरक्षण हवेच आहे. अर्थात, ही तुमच्या पाशी केलेली याचना नव्हे! जो हक्क आहे तो आम्ही मिळवणारच. तुमचा वैयक्तीक स्वार्थ पायदळी तुडवला गेला तरी हरकत नाही!!! दुसरा मुद्दा असा की काही काळापूर्वी एक businessman म्हणाला होता की सध्या jobs खुप आहेत पण engineers ची कमतरता आहे! शिक्षणचा प्रसार तळागाळापर्यंत करण्याचे महत्कार्य पहिल्यापासून झाले असते तर हा प्रश्न उद्भवलाच नसता.. १ अब्जाहून अधिक लोकसंख्या असणार्या देशात असा प्रश्न यावा, ह्यातच सामाजिक समतेची काय बोंब करून ठेवली आहे, ते दिसते आहेच. विचार करणार्याच्या हे लक्षात येईलच की अशा आरक्षणांनी सर्व समाजात शिक्षण संस्कृती रुजत असेल, तर समाजाचाच फायदा होणार आहे. पर्यायाने तुमचाच फायदा होणार आहे. एक दोन पिढ्या शिकल्या म्हणजे शिक्षण संस्कृती रुजत नाही. हजारो वर्षे शिक्षण हाच उपजीवीकेचा मार्ग बनवलेल्यांना हे कळणे कठिण आहे. पण त्यांच्या वाचून काही अडत नाहे. विरोध केलात तर परिणाम भोगायची मानसिक तयारी ठेवा म्हणजे झाले.
|
Laalbhai
| |
| Wednesday, June 21, 2006 - 6:53 am: |
| 
|
कॉम्रेड माणूस.. तुझे म्हणण्यात तसा अर्थ आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या कोणत्याही पोस्टमधे मी कोणत्याही जात अथवा धर्म यांचा कोणताही उल्लेख केलेला नाही. तरी ज्या प्रतिक्रिया आल्या त्यावरून यांचे पूर्वग्रह किती कमालीचे दुषित आहेत, हे दिसते आहेच. आक्रस्ताळे कोण आहे हे दिसते आहेच. सर्व समाजालाबरोबर घेऊन जाण्याची मानसिकताच नाहीरे यांच्यात. हा इतर जाती बद्दलचा द्वेष नाही. ही भीती आहे. कमालीची भीती. त्यांचा तथाकथित स्वार्थ पायदळी तुडवला जाईल, याची निखशिखांत भीती आहे. गांजलेले लोक कोणताही आवाज न करता शांतपणे पडून राहिले तर पूण्यकर्मासाठी हेच लोक मोठ्या आनंदाने त्यांना घरातला शिळा भाकरीचा तुकडा देतील. पण उठून हक्कांसाठी लढायला सुरवात केली की त्याच्या विषयी राग, भीती सगळे दाटून येईल. ही हजारो वर्षांची मानसिकता आहे, बदलायलावेळ लागेलच. पण आपण बदलूयाच. काळजी करू नकोस. हे सगळे सुरवात करणार्या आंबेडकर आणि फुल्यांना ह्यांनी शिव्याच दिल्या सुरवातीला. आता त्यांचेच दाखले देऊन आम्हाला गप्प करायला बघताहे. असो.
|
Maudee
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:29 am: |
| 
|
लालभाई, स्वातन्त्र्य मिळाल्यानंतर जेव्हा आरक्षण दिलं होतं तेव्हा हाच मुद्दा होता. की त्यांच्याकडे अजून शिक्षणाची मानसिकता नाहिये म्हणुन त्याना आरक्षण पण आता झाले की हो ५० वर्षे rather जास्तच..... आणि हा मुद्दा SC/ST बद्दल पटू शकतो.....पण OBC कशासाठी? neways तुम्ही या दोन posts छान लिहिल्या आहेत.....यात तुम्ही तुमचा मुद्दा मांडलाय....वाचणार्याला पटेल न पटेल. पण आधीच्या तुमच्या posts ख़रच चांगल्या नव्हत्या म्हणुन इतकी ही मते आणि posts आल्यात. त्यात तुम्ही कुठेच तुमचा मुद्दा मांडलेला नाहीये. याचने बद्दल म्हणाल तर कुणीच कुणापाशी याचना करण्याची गरज नाही. समान नागरी कायदा आणायला हवा. म्हणजे तुम्हाला याचना करायला नको आणि आम्हाला ओरडायला नको आरक्षण नको म्हणुन. बघा पटतय का??
|
Laalbhai
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:37 am: |
| 
|
अरे वा.. आमचे कवतिक.. कमालच आहे म्हणायची की.. ताईसाहेब.. पन्नास वर्षात साधारण २ पिढ्या जातात. पिढ्या नि पिढ्यांचा शाप जाण्यासाठी २ पिढ्यांवर उपकार करून उपेगाचे नाही. किती वर्षे आरक्षणे असावीत याबाबत कोणताही अंदाज बांधणे शक्य नाही. आतासारखीच प्रगती राहिली तर अजुन किमान ५० वर्षे तरी अशीच आरक्षणे हवीत, हे निश्चित!! समान नागरी कायद्याने काय होणार आहे मला माहिती नाही. कृपया स्पष्ट करा. नवीन आणि समाजाच्या फायद्याच्या विचारांसाठी आमची कवाडे नेहमीच उघडी असतात.
|
>>>>> शिक्षण आणि शिक्षणापासून मिळणारी फायदे याची संस्कृती घराघरात रुजायला पाहिजे. ज्यांच्या घरात पिढीजात शिक्षणाची परंपराच आहे, त्यांना कळायचे नाही, पण ज्यांची hardly एखादी पिढी शिकली आहे, त्यांच्यात आर्थिक सुधारणा झाली असेल पण अजुनही शिक्षणाचे संस्कृती रुजलेली दिसत नाही. माऊडी, या युक्तीवादातील पुढील विरोधाभास लक्षात घे! १. पिढ्यान्पिढ्यान्ची शिक्षणाची परम्परा केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियात होती.... त्यान्cया जातीचा ऊल्लेख नकरता हे लिहिणार आणि वर म्हणणार की आम्ही कोणाचीच जात काढली नाही! २. हे जे काही शिकत होते पिढ्यान्पिढ्या, ते वेद आणि सन्स्कृत श्लोक वगैरे भानगडी मनुवाद नाकारण्याकरता त्याज्य ठरविणार!... ठरवा बापडे, अरे पण जे तुम्हाला त्याज्य हे ते पिढ्यान पिढ्या शिकुन या उच्चवर्णियान्ना कोणता नि कसला फायदा झाला? एकिकडे ते शिक्षणच कुचकामी म्हणायचे अन दुसरी कडे तेच शिक्षण घेणार्यान्चे उदाहरण देवुन शिक्षण विषयक सन्स्कारान्च्या गप्पा मारायच्या! ३. एखादी पिढी? ह्यान्च्या कोणत्या तरी पोस्ट मधे पन्नास वर्षात दोन पिढ्या असा हिशेब दिला हे! वास्तवात दर दहा ते पन्धरा वर्षान्नी एकेक पिलावळ वयात येती म्हणुन पिढी बदलली असे म्हणले जाते हे ज्ञान यान्ना असण्याचे कारण नाही कारण त्याचा अभ्यास केवळ उच्चवर्णियान्नी केला हे! तर मुद्दा असा की फुलेन पासुन अत्रेन्पर्यन्त त्या काळच्या उण्यापुर्या पन्नास पाऊणशे वर्षात यान्च्या करता शिक्षणाच्या ज्या ज्या सोई त्यान्नी निर्माण केल्या त्या सोईतुन आणि स्वातन्त्योत्तर नव्हेच तर ऐन इन्ग्रजी आमदानीतल्या मिशनरी पासुन भेदाकरता इन्ग्रजान्नी पुरविलेल्या सोइ सुविधा व नन्तरच्या कॉन्ग्रेसनी पुरविलेल्या सोइसुविधा मिळुनही आजमितिला यान्च्यातल्याच लोकान्च्या एकेकच पिढ्या कशा काय शिकल्या हेत? याचा विचार केला तर एकच लक्षात येते की कोण कुनाचे अनौरस अवलादी हेत याचा विचार करण्या पेक्षा यान्च्यात उच्च राहुदेच प्राथमिक शिक्षण घेण्याकरता लागणारे बौद्धिक कष्ट करण्याची तरी धमक कधि होती का नि आहे का याचा विचार त्यान्चा त्यान्नीच केला पाहीजे ४. तथाकथित उच्चवर्णियान्ना शिक्षणाची परम्परा(???) हे अस म्हणताना हे एक जाणुन बुजुन दुर्लक्ष करतात की इतर प्रत्येक जातीला त्यान्च्या चालत आलेल्या पिढिजात व्यवसायात अधिकाधिक प्रगती करण्यास वाव होता आहे व राहील, पण ते न करता जे आपल्या रक्तातच नाही ते उपद्व्याप करु पाहिल्यास जे व्हायचे तेच होणार! सरकारी कारकुन्डेच बनायची लायकी असल्यास तिथे तसलेच आरक्ष्ण शिक्षणात अन नोकर्यात मागणार... अन आता खाजगी सन्स्थान्कडे वळलेत... वाट बघा म्हणाव! ५. बर तर बर स्वातन्त्रोत्तर काळात आणि खास करुन गोडसेच्या १९४८ च्या कृत्त्या नन्तर बामणान्ची जी ससेहोलपट महाराष्ट्रात उडाली त्याची तोड नाही, तरी हा समाज एकमेकान्च्या साथीने एकमेकान्ना जगवित शिकवित पुढे पुढेच जात राहीला! कोनत्याही प्रकारचा व्यवसाय त्यान्नी अयोग्य मानला नाही! रहाण्या जेवण्याखाण्याचे त्यान्चे नियम जमेल तेवढे पाळत, स्वच्छतेचे धडे गिरवित राहीले, त्यान्च्या चान्गल्याचे अनुकरण करण्यास यान्च्या पिढ्यान्पिढ्याना काय बन्दी होती का? मुळात चान्गल्याच्या अनुकरणशीलतेची भावनाच जर मुळात नसेल तर ही लोक तरी काय करणार हो? पुढची पन्नास काय, पाचशे वर्षे जरी आरक्षण मिळाले तरी यान्च्या ढोन्गी नेत्यान्च्या द्वेषमुलक गचाळ मार्गदर्शनामुळे ही लोक सुधारणार नाहीत! या उलट तथाकथित साडेतीन टक्के उच्चवर्णिय नष्टच झाले ज्याची भिती बाळगायला ही आयडी सान्गत आहे, कुणाचे अनुकरण करावे असे शिल्लकच न राहिल्याने ह्यान्चीच लोक रसातळाला जातील त्याची खर तर फिकीर करायच सोडुन आमच्या भितीची काळजी करताहेत या सारखा दुसरा विनोद नाही! आणि वर्गविद्रोहा मागिल कम्युनिस्टान्चे हेच द्येय हे की असे नाही तसे बहुसन्ख्येने माथेफिरु तयार करवुन त्यान्ना अल्पसन्ख्यान्क पण समाजातील महत्वाचा बौद्धिक घटक असलेल्या उच्चवर्णियान्वर सोडुन त्यान्नाच नष्ट करायचे.. कोणत्याही परिस्थिती चालू व्यवस्थेला हादरे देण्यासाठी प्रस्थापित उडवायचे... याच प्रयत्नान्चा भाग म्हणुन कम्युनिस्ट यान्चे भारतातील दुसरे छुपे नाव नक्षलवादी हे ही आहे! याचीच उपशाखा "ये तो बस एक झान्की है शनिवारवाडा बाकी है" या रुपात व्यक्त होते आहे! खरे तर मला या लालभाईचे आभारच मानले पाहीजेत का ते मी गुलदस्त्यात ठेविन!
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, June 21, 2006 - 9:05 am: |
| 
|
आरक्षण अशा संधी उपलब्ध करून देण्याचे काम करते. म्हणून आरक्षण हवेच आहे. >> लालभाई, अशी संधी गेली ५० वर्षापासून मिळते आहे? किती फरक पडला हो? मुळात शिक्षणाचे महत्व तुमच्या "शिकलेल्या कॉम्रेड"ला कळू नये यातच सर्व काही आले... सवर्णात "मी शिकून मोठा झालो, तुलाही शिकलेच पाहिजे" ही भावना असते. तशी भावना आरक्षणामुळे येत नाही. त्यासाठी शिक्षणाचे महत्व कळण्याची परिपक्वता असावी लागते.... ५० वर्षात ही परिपक्वता येऊ नये म्हणजे अतिच झालं... अशा ५० पिढ्या परिपक्व न होता राहिल्या तरी तुम्ही आरक्षण मागतच रहाणार? तरी पण शिक्षणात आरक्षण एकवेळ मान्य केले तरी खाजगी क्षेत्रात कशाला हवे तुम्हाला आरक्षण? तुमच्या कॉम्रेडला आरक्षणाने शिक्षण मिळाले.. मुलींना शिक्षण नाकारून त्याने या संधीचे किती "सोनं" केलं ते तुम्हीच सांगितले आहे... हा इतर जाती बद्दलचा द्वेष नाही. ही भीती आहे. कमालीची भीती. त्यांचा तथाकथित स्वार्थ पायदळी तुडवला जाईल, याची निखशिखांत भीती आहे. गांजलेले लोक कोणताही आवाज न करता शांतपणे पडून राहिले तर पूण्यकर्मासाठी हेच लोक मोठ्या आनंदाने त्यांना घरातला शिळा भाकरीचा तुकडा देतील. पण उठून हक्कांसाठी लढायला सुरवात केली की त्याच्या विषयी राग, भीती सगळे दाटून येईल.>> आम्हाला कसलीही भीती नाही. गोड गैरसमजात राहू नका. केवळ गुणवत्तेच्या आधारावर ज्या खाजगी क्षेत्रात नोकर्या मिळतात तिथे आरक्षण न मागता नोकर्या मिळवून दाखवाव्यात. कित्येक सवर्णांच्या घरी काम करणार्या नोकरांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च हेच सवर्ण करीत आहेत. त्यांना नोकर्या मिळवून देत आहेत. जो पर्यंत आमच्यात गुणवत्ता आहे तो पर्यंत आम्हाला कुणाला भ्यायची गरज नाही. आम्हाला कसली आलिये हो भीती? उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला... पुण्यकर्माच्या गोष्टी आम्हाला कोणी सांगू नयेत.. ज्यांची मानसिकताच गांजलेपणात रहायची आहे त्याला कोण काय करणार?
|
Maudee
| |
| Wednesday, June 21, 2006 - 9:13 am: |
| 
|
अनुमोदन लिंबू. ख़र तर इथे सर्वच जण म्हणजे मी, तुम्ही, मूडी, संतू, केदार, दिमडू सगळेच जण प्रति उत्तर द्यायला नकोय..... आपण याना post लिहिण्याचं आरक्षण देऊ. म्हणजे post लिहून गप्प बसतील. आणि आपल्याला अपशब्द ऐकायला लागणार नाहीत. कुठल्या तरी एका bb वर मी वाचले होते..... अनुल्लेख़ाने काहीतरी.... तसही इथे याना उत्तर द्या अथवा न द्या actual matter of facts बदलणार नाहिये. त्यासाठी तिथे जाऊन काहीतरी करायची गरज आहे......पण काय आहे साडे तीन टक्के जनतेवर काय मते मिळणार...... हे साडे तीन तक्के वाले समाज शास्त्र जाणतात ना म्हणुन हे साडे तीनच रहीले आणि बाकीचे फ़ोफ़ावत आहेत.
|
Soultrip
| |
| Wednesday, June 21, 2006 - 9:20 am: |
| 
|
Who knows, साडे-तीन टक्के आता दिड टक्के झाले असतील.
|
महेश, अगदी बरोबर! माऊडी... हो हो ग! इथेही लिहायला आरक्षण दिले पाहीजेच की! सोलट्रीप, तेही बरोबरच हे! म्हणुन तर मी मागे कुठेतरी केव्हातरी क्रिकेटटीमचे म्हणले होते अन माह्यावर दे दणादण टीका झाली होती! मी आता थोडावेळ गम्मत बघत बसणार!
|
Samit
| |
| Wednesday, June 21, 2006 - 9:43 am: |
| 
|
महेश, छान पोस्ट.(टाळ्या) लिंबुटिंबू, विचार पटले. माऊडी, उपाय अंमलात आणालगेच.
|
Avinashi
| |
| Wednesday, June 21, 2006 - 9:43 am: |
| 
|
gud thinking linbutinbu... i like it. ajun 500 varsh aaraxan dile taree vaichaareek pragatee honaar naahii, mhanun.. kaay upaay karaayachaa yaachaa kaahii vichaar hoto kaa? ase malaa mhaanaayche aahe, jar tyaavar tumhii vichaar kelaa asel tar... tumache vichaar vaachaayalaa aavadateel, chaan lihilay.
|
अविनाशी, माझा विचार ऐकुन काय होणार? पुन्हा तो "बामणी" विचार म्हणजे त्याज्यच अशी शिकवण गेल्या काही पिढ्या (पाच पन्नास वर्षे) ज्यान्ना जाणिवपुर्वक दिली आहे त्यान्ना माझे विचार काय पटणार हेत? आणि खर तर माझ्या पोस्ट मधेच "चान्गल्याच्या अनुकरणशीलतेचा" उल्लेख आला हे त्याचा विचार आणि उल्लेख मी करुन काय उपयोग? माझी पोस्ट वाचणारे काही चार सुज्ञ अधिक सुज्ञ बनतील येवढेच! अन चान्गल्याच्या (केवळ बामणान्चा नाही) अनुकरणशीलतेचा विचार आजवरच्या सन्तान्नी कधीच मान्डला नही हे का? गम्मत म्हणुन एक उदाहरण सान्गतो! गावाकड आमच्या पण शेती हेत! घर दार ४८ मधे उठली, थोड्याफार जमिनी हेत शिल्लक! कधी आजही गावाकड जाव तर "या बामणान्ना काय बोडक्याच शेतीतल कळत हे?" हा विचार सर्वदूर दिसून येतो! अन तेच बामण, खास करुन कोब्रा, जेव्हा या मावळात उघडे बोडके डोन्गर घेवुन तिथे हिरवी सृष्टी फुलवू लागले, पॉलिहाऊसच्या टीचभर जागेत एक्स्पोर्ट क्वालिटीचे उत्पन्न घेवु लागले तेव्हा बाकी समाजाचे उघडलेले डोळ्यान्ची नजर योग्य ठिकाणी वळविण्या ऐवजी "यान्च्याकडचा पैका नाही हे हा, दाऊदच्या हेत या जमिनी" असल्या अफवान्कडे वळविणारे महाभाग असल्यावर कोणत्या समाजाचे पुनरुत्थान होणार हे की कोणत्या अल्पसन्ख्यान्क जातीला उच्चाटून फेकुन देण्याचे कारस्थान हे? फार दूर जायला नको, पुण्यातले चितळे दुधवाले, त्यान्च्याच जातीची लोक हसायची सुरवातीला त्यान्ना की हा काय धन्दा काढला...! नेकीने आणि सचोटीने क्वालीटी राखीत वाढविलेल्या त्यान्च्या धन्द्याचे उदाहरण सान्गली सातारा कोल्हापुरला नव्हते का? होते ना! पण मग सहकारी सन्स्थान्मार्फत निर्माण केलेला महाराष्ट्रातील दुध धन्दा कुरियनच्या गुजराथेतील धन्द्याने धोक्यात आला ही बोम्ब २००६ साली कशा साठी? काय चुकले? कुणाचे? काहीच विचार नको करायला? आणि या सगळ्याचे खापर फोडायला पुन्हा बामण हेतच! 
|
लिम्बुजी, माउडी तुम्हाला माझे अनुमोदन १००
|
आणि हो लिम्बुजी माउडी म्हनाली तो उपाय सगळ्यात चांगला. शेवटी " दुर्लक्श करण्याचे कोशल्य वाढ्वणे म्हणजेच सुख"
|
मन्गेश, गचाळ अन मस्तकात तिडिक उठविणार्या शब्द वाक्य आशय तपशील यास तो नियम वापरा मात्र एकतर्फी जातीभेदात्मक विषारी असत्य प्रचारावर मुद्देसुद उताराही द्या! अन्यथा असत्य पुन्हा पुन्हा मान्डत राहील्याने जनसामान्न्यान्च्या नजरेत सत्य बनते! शिवाय शन्काकुशन्का तर्क कुतर्क यान्चे उधाण आणुन अजुनच बुद्धिभेद करण्याचे राजकारण खेळले जाते त्याचा प्रतिवाद बुद्धिबळाच्या खेळण्याने व्हावा! त्या दृष्टीने सन्तु चा एक दुर्लक्षित राहिलेला मुद्दा म्हणजे "त्यामुळे मुळचे आरक्षण अजुनच दायल्युट बनते आहे" हा आहे! असे अनेक कन्गोरे हेत! गुन्ते हेत! ते मान्डा! आणि हा प्रश्ण मायबोलीवर सामोर्या येणार्या एखाददुसर्या आयडीचा नाही! त्यामागे खुप मोठी परम्परा आणि ताकद हे ते विसरु नका! प्रत्यक्ष जीवनातही असे प्रसन्ग उद्भवतील तेव्हा वरील सुत्राच मनाशी असुद्या! अन सगळ्यात शेवटी लक्षात ठेवा.... इफ यू कान्ट कन्व्हिन्स देम, जस्ट कन्फुज देम! ब्राह्मण समाजापुरते बोलायचे तर श्रद्धा / अन्धश्रद्धा, धार्मिक रुढी यान्चे आचार विचार, देव आहे कि नाही इथपासुन पर्यावरण आणि त्याचे रक्षण इत्यादी असन्ख्य ठीकाणी कन्फ्युजन झालेले दिसुन येते जे त्यान्नाच गेल्या पन्नास वर्षात घातक ठरते आहे! अनुभवातुन होतिल शहाणे ते पण तोवर बरच नुकसान होवुन गेल हे, होणार हे! हे कन्फ्युजन घडविण्यात कोणाकोणाचा कितीक वाटा होता व आहे याचा ही अभ्यास व्हायला हवा!
|
Laalbhai
| |
| Wednesday, June 21, 2006 - 11:52 am: |
| 
|
आणि आपल्याला अपशब्द ऐकायला लागणार नाहीत. >>> माउडी ताई... बरीच selective नजर दिसते आपली??? आम्ही काय अपशब्द वापरले? "तुमचे" सन्तु, मन्गेश यांनी स्तोत्र लिहिली आहेत ती दिसली नसावीत तुम्हाला.
|
Laalbhai
| |
| Wednesday, June 21, 2006 - 12:04 pm: |
| 
|
५० वर्षात ही परिपक्वता येऊ नये म्हणजे अतिच झालं... अशा ५० पिढ्या परिपक्व न होता राहिल्या तरी तुम्ही आरक्षण मागतच रहाणार? exactly हाच मुद्दा मला सांगायचा आहे. यात तुम्ही कितीही तिरस्कारमिश्रीत उपरोध आणलात तरीही हे सत्यच आहे. तुम्हाला सगळे परिवर्तन चुटकीसरशी व्हायला हवे. ते कसे होणारे? समाजपुरुषाची स्वतःची अशी गती असते. तो त्याच गतीने बदलणार. लिंबुटिंबु आणि महेश, तुम्हाला ५० वर्षे हे "खूप" वाटतात आणि आनखी ५० वर्षे म्हणजे तुम्हाला संकट वाटते. मला एक सांगा.. मागची ५० वर्षे जास्तीत जास्त effective and efficient व्हावेत म्हणून समाजातल्या सर्व थरातून काय प्रयत्न झाले?? आहे याचे उत्तर तुमच्याकडे? खरे म्हणजे असे कोणतेच प्रयत्न कुणाकडूनच झाले नाहीत. आंधळ्याला अचानक दिसायला लागते तेंव्हा तो अचानक आलेल्या प्रकाशाच्या झोताने गांगरून जातो आणि पुन्हा डोळे मिटून घेतो. हळू हळू प्रयत्न करून तो या प्रकाशाशी adjust व्हायला लागतो. त्यासाठी त्याला doctor ची, नातलगांची, मित्रांची मदत होत असते. गांजलेल्या समाजाबाबत असे काय झाले आहे? हे अंधत्व, पंगुत्व हजारो वर्षांचे आहे. यातून सावरायला वेळ लागणारच आणि हे तुम्ही जितके लवकरात लवकर समजून घ्याल तितके तुमच्याच फायद्याचे आहे. कारण आता तुम्ही कितीही आदळाअपट केलीत तरी गांजलेल्या समाजाचा हक्क त्यांना मिळवून देणारच!
|
Laalbhai
| |
| Wednesday, June 21, 2006 - 12:14 pm: |
| 
|
माझा एक महत्त्वाचा मुद्दा गदारोळ करण्याच्या नादात तुम्ही लोकांनी दुर्लक्षिलातच.. त्याचे उत्तर तुमच्याक्डे नाही असे समजू का? ------------------------ दुसरा मुद्दा असा की काही काळापूर्वी एक बिझनेसमन म्हणाला होता की सध्या जॉब्ज खुप आहेत पण लायक व्यक्तींची ची कमतरता आहे! शिक्षणचा प्रसार तळागाळापर्यंत करण्याचे महत्कार्य पहिल्यापासून झाले असते तर हा प्रश्न उद्भवलाच नसता.. १ अब्जाहून अधिक लोकसंख्या असणार्या देशात असा प्रश्न यावा, ह्यातच सामाजिक समतेची काय बोंब करून ठेवली आहे, ते दिसते आहेच. विचार करणार्याच्या हे लक्षात येईलच की अशा आरक्षणांनी सर्व समाजात शिक्षण संस्कृती रुजत असेल, तर समाजाचाच फायदा होणार आहे. पर्यायाने तुमचाच फायदा होणार आहे. --------- संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जाण्यातच देशाचे भले असते, हे तुम्हाला कळत नाही. उद्या गरीब आणि लाचार वर्गाने सशस्त्र क्रांती केली तर देश शेकडो वर्षे मागे जाईल. त्यापेक्षा गरीब आणि लाचार वर्गाचे हीत पहाण्यातच तुमचेही भले आहे, ही अक्कल तुम्हा लोकांना येईल, तेंव्हा तुमचेच देव स्वर्गातून पुष्पवृष्टी करतील कदाचित!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|