|
Mrunmayi
| |
| Thursday, November 10, 2005 - 7:46 am: |
| 
|
Aarakshanbabat khandapithane ek uttam nikal dilay ki atleast muslimanatari alpasankyank mhanun aarakshan milnar nahi.
|
Maetrin
| |
| Thursday, January 12, 2006 - 3:16 pm: |
| 
|
reservation मुळे माझे स्वतहाचे नूक्सान झाले आहे,कमी टक्के घेउन कसे काय लोकाना एडमीशन मिळ्ते राओ??/!!! थोड्या दिव्सानी,ब्रहमणानना oppressed classम्हणायची वेळ येइल.:-((
|
Bee
| |
| Friday, January 13, 2006 - 3:08 pm: |
| 
|
मैत्रीण, तुला जोडाक्षर फ़ारच प्रिय दिसतात असे वाटते एक एक जोडाक्षर वाचून खूप हसायला आले. देवनाग्री तर ultimate आहे अगदि
|
Maetrin
| |
| Friday, January 13, 2006 - 4:59 pm: |
| 
|
  फक्त तुलाच नाही बी,मला पण खूप हसायला येते. आणी फक्त जोडाक्षरे नव्हे तर इतर पण भयाण चुका होत आहेत. ही पोस्ट वाचून आत्ताच कळले आहे कि क्ष कसा लिहिला पाहिजे.
|
Moodi
| |
| Friday, May 26, 2006 - 9:50 am: |
| 
|
आरक्षणावरुन आता जो काही गोंधळ सुरु झालाय, तो मिटण्याची चिन्हे कमी दिसतायत. पण कधीतरी मिटेल. आता जे आरक्षणाच्या अटीत बसत नाहीत त्यांना एकच पर्याय, व्यावसायीक शिक्षण घेणे. अन इतर गुर्जर अन मारवाडी, पंजाबी अन सिंधी बंधुप्रमाणे तेवढेच कष्ट करुन स्वतचा व्यवसाय करणे. मराठी व्यक्तीला हे जड जाईल प्रारंभी पण प्रयत्न करावाच लागेल. ज्यांना नोकर्या आधीच आहेत अन टिकणार आहेत त्यांचा प्रश्न नाही पण पुढच्या पिढीचे भवितव्य काय? एकदा श्री रामकृष्ण परमहंसांकडे एक मोठा उच्च पदावर असलेला सरकारी अधिकारी दर्शनासाठी आला, त्यांच्या पाया पडला तेव्हा त्यांनी माहीत असुनही विचारले की बाळा तू काय करतो, तो म्हणाला नोकरी करतो, बाकी काही नाही मग ते ऐकुन स्वामीजी एकदम ढसाढसा रडु लागले. तो घाबरला म्हणाला काय झाले माझ्या हातुन काही चुकले का? ते म्हणाले तू म्हणालास ना नोकरी करतो बाकी काही नाही हे ऐकुन मला रडु आले. तो तत्काळ समजला, अन त्याने जाऊन नोकरीचा राजीनामा दिला. व्यवसाय सुरु केला अन मेहनत व बुद्धीच्या तसेच मनमिळाऊ स्वभावाच्या जोरावर मोठा ख्यातनाम उद्योजक बनला. प्रत्येकाची आवड अन इच्छा तशी असेलच असे नाही पण आता पुढचा काळ फार कठिण आहे.
|
Gurudasb
| |
| Sunday, May 28, 2006 - 6:08 am: |
| 
|
दहावी , बारावी , पदवी परीक्षा , पी . जी . इ . परीक्षांच्या निकालामध्येही जर प्रवेशपद्धतीप्रमाणे आरक्षण आणायचे आमच्या सुज्ञ सरकारने व शिक्षणतज्ञानी ठरवले तर ? [ ए . भा . प्र . ]
|
Pinaz
| |
| Monday, May 29, 2006 - 11:48 am: |
| 
|
अहो गरुड, आता हवेतला oxygen चे, पाण्याचे पण आरक्षण करणार आहेत.
|
Moodi
| |
| Monday, May 29, 2006 - 12:03 pm: |
| 
|
अग पिनाझ ते गुरुदास आहेत ग, गरुड नाही.
|
Meggi
| |
| Monday, May 29, 2006 - 12:05 pm: |
| 
|
pinaz , गरुड नाही, गुरुदास आहे ते.
|
सगळा मतांचा बाजार आहे... काय करणार आहेत हे लोक या देशाचं ते देवच जाणे... private sector मध्ये reservation आणल्यानंतर एक एक करून मोठ्या कंपन्या देश सोडून जाऊ लागतील तेव्हा तरी या राज्यकर्त्यांचे डोळे उघडतील ही (वेडी) आशा...
|
Pinaz
| |
| Monday, May 29, 2006 - 2:55 pm: |
| 
|
अय्या सॉरी हं. नीट वाचलेच नाही. मला वाटले गरुड अडनाव असते ना ते आहे. Gurudasb sorry again.
|
Garud
| |
| Monday, June 19, 2006 - 6:22 am: |
| 
|
मला कोणी बोलावले इथे
|
Laalbhai
| |
| Tuesday, June 20, 2006 - 8:16 am: |
| 
|
सामाजिक न्यायासाठी आरक्षण हवेच आहेत. गाईड वाचून आणि भरमसाठ फियांचे classes लावून जास्त मार्क मिळवणार्यांनी चहाच्या टपरीवर कामे करून तेवढेच मार्क मिळवून दाखवावेत आणि मग गुणवत्तेच्या बाता कराव्यात. शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकांनी आत्तापर्यंत हजार वेळा सांगितले आहे की "गुण" म्हणजे "गुणवत्ता" नाही. गुणवत्ता शोधावी लागते. ती कोणत्याही वर्गाची जन्मजात मालमत्ता नाही. त्यासाठी समान सामाजिक न्यायाची आवश्यकता आहेच. आणि समाजातल्या बिनताकदीच्या उच्चभ्रू वर्गाने कितीही बोंब मारली तरी सामाजिक न्याय आम्ही मिळवून देणारच. नवीन आव्हानांना खुल्या दिलाने सामोरे जाण्यातच सगळ्यांचे भले आहे.
|
Deemdu
| |
| Tuesday, June 20, 2006 - 8:56 am: |
| 
|
सामाजिक न्यायासाठी आरक्षण हवेच आहेत. >>>>>>>>> बरोबर आहे अगदी मान्य गाईड वाचून आणि भरमसाठ फियांचे cलस्सेस १०० % अनुमोदन अरे पण मग जे आरक्षण करायचे ते जातीवर कश्याला ?????????? सांपत्तीक तत्वावर करा ना "गुण" म्हणजे "गुणवत्ता" नाही तशीच जात म्हणजेही गुणवत्ता नाहीच मग त्या तत्वावर आरक्षण कश्याला ?????? समाजातल्या बिनताकदीच्या उच्चभ्रू वर्गाने कितीही बोंब मारली त्याच ताकदीपुढे तुम्हाला आज नाही तर उद्या झुकावे लागणार आहे हे विसरुन चालणार नाही. कितीही काहीही झालं तरी अगदी जन्म ते मरण कुठल्याही कार्यासाठी ह्यांना हाच उच्चभ्रू वर्ग लागतो आणि बर झाल लालभाई तुम्ही स्वतःच ते लोक उच्चभ्रू आहेत हे मान्य करत आहात. बिनताकदीच्या उच्चभ्रू वर्गाने ह्याच बिनताकदीच्या उच्चभ्रू वर्गाने ईतिहास लिहीले आहेत, टिळक, आगरकर, चाफेकर, सावरकरांना विसरलात का हो तुम्ही सहाजिक आहे म्हणा admin sorry मला अशी भाषा वापरायची नव्हती, आणि ती वापरली गेली याचही दुखः आहे पण वरील लाल्भाईंच post मला मात्र अतिशय आक्षेपार्ह वाटला आणि मी उत्तर देण्यापासून स्वतःअला रोखु शकले नाही
|
दिमडू, कूऽऽल डाऊन! वाचणारा यान्च्या विरोधी मताचा असेल तर तो जळफळावा, चिडावा अन त्यामुळे चुकीचे बोलुन जावा ह्या उद्देशाला ओळखुन बळी पडू नये अशा मताचा मी हे! म्हणुन तर दोन दीस झाल म्या गम्मत बघतो हे! आत्ता लालभाई आला हे मग निळाभाई यील! मन्ग हराभाई यील मी आपली गम्मत बघत बसणार! DDD लक्षात ठेव, गरळ ही केवळ गरळच असते, गरळीचा आणी तार्कीक मुद्देसुदपणाचा सम्बन्ध नसतो, तत्वान्शी तर दुरान्वयानेही नाही! त्यान्ना गरळ ओकूदे! रस्त्यावरच्या "आव्वाऽऽज कुणाऽऽऽचाऽऽ.... कोरस मधे अमख्या ढमक्याचा" या घोषणा जेवढ्या तीव्रतेने निघतात तेवढ्याच तीव्रतेने हवेत विरघळुन जातात तद्वतच ही गरळही सुज्ञान्च्या मनास स्पर्ष न करीता विरुन जाईल! मॉड्स, मी खर तर बर्याच पोस्ट्स करणार होतो! पण स्वतःला आवरत घेतो हे! क्षमस्व!
|
Laalbhai
| |
| Tuesday, June 20, 2006 - 9:51 am: |
| 
|
समाजातल्या बिनताकदीच्या उच्चभ्रू वर्गाने कितीही बोंब मारली त्याच ताकदीपुढे तुम्हाला आज नाही तर उद्या झुकावे लागणार आहे हे विसरुन चालणार नाही. कितीही काहीही झालं तरी अगदी जन्म ते मरण कुठल्याही कार्यासाठी ह्यांना हाच उच्चभ्रू वर्ग लागतो >>>> आम्हाला हा वर्गविग्रहच लवकरात लवकर करायचा आहे. जे कोणी याचे समर्थन करत राहतील त्यांना अंती माती खावीच लागेल. गांजलेल्या लोकांकमधे आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. आत्मकेंद्रित समाज केवळ धर्म आणि जातीच्या आधारे अजुनही दमनाचे शस्त्र वापरून समाजातल्या फार मोठ्या वर्गाला दाबून ठेवू पहात आहे. हे चालणार नाही. तुम्हाला माझे प्रत्येक पोस्टच आक्षेपार्ह वाटेल कारण माझा प्रत्येक मुद्दा हा तुमच्या वैयक्तिक स्वार्थाचा घात करणारा आहे. परंतू, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. सर्वांगिण समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कठोर होण्याची आवश्यकता आहे. त्यात तुम्ही दुखावला गेलात, तुमच्या वैयक्तीक स्वार्थाची हानी झाली तरी पर्वा नाही! झारविरुद्ध क्रांती करताना झार दुखावला जाईल अशी पर्वा कुणीही केली नव्हती. दीमडू, वैयक्तीक तुम्हाला उद्देशून नाही. आरक्षणांचे समर्थन करताना होणारा विरोध गटाला उद्देशून असतो, व्यक्तीला नाही. माझ्या कोणत्याही पोस्टमधी काहीही आक्षेपार्ह वाटल्यास शासनयंत्रणेला शिक्षा करण्याचे पूर्ण अधिकार आहेत.
|
Deemdu
| |
| Tuesday, June 20, 2006 - 9:55 am: |
| 
|
आता बोल लिंब्या अजुनही गप्प बसु ?????
|
प्रश्ण गप्प बसणे की काय याचा नाही दिमडु! आक्रस्ताळेपणे, बिनडोकपणे, बैल किन्वा घोड्याच्या डोळ्याला झापडे लावल्यावर तो जसा वागिल त्याप्रमाणे कोणी युक्तिवाद किन्वा भाष्य करीत असेल तर अशास उत्तर देण्यात काय हशील? अशा जहराला शाब्दिक प्रत्युत्तर देणे टाळावे! व तुमची बाजु योग्य जागी योग्य सन्यमाने मान्डावी! मी पुर्वीही जेव्हा जेव्हा अत्यन्त सौम्य भाषेत लिहिले तेव्हा माझ्यावर हितगुजवर "ब्राह्मणीवाद" आणत असल्याचे आरोप झाले पण बराच काळ पुलाखालुन पाणी वहावल्यावर प्रत्यक्षात बाह्य जगात देखिल कोण कसले वाद आणुन कोणत्या जातीला धोपटु पहात हे हे उघड होत हे, ते उघड होवु दे, त्या आक्रस्ताळेपणाला थोपवू नकोस! उलट या विषाची पात्रता आणि जातकुळी आणि उद्देश सर्वान्ना कळुदेतच! मग बघु कोण हे वीष प्राशन करुन कन्ठात सामावुन घेते!
|
Laalbhai
| |
| Tuesday, June 20, 2006 - 11:04 am: |
| 
|
कोणत्याही वादात स्वतःला बांधले की असेच व्हायचे.. गांजलेल्या लोकांची क्रांती महत्त्वाची आहे. लढा केवळ ब्राह्मण वर्गाविरुद्धच नाही तर सत्ता आणि पैशाचा वापर करू, जे जे लोक गांजलेल्या समाजाचा गैरफायदा घेऊ इच्छित आहेत, त्या सगळ्यांविरुद्ध हा लढा आहे. तुमची भीती तुम्ही जे शब्द वापरताय त्यावरून सरळ सरळ दिसते आहे.
|
Maudee
| |
| Tuesday, June 20, 2006 - 11:23 am: |
| 
|
लालभाई स्वतः आम्बेडकरानी सांगितले होते की ५० वर्षानंतर आरक्षण बंद करा म्हणुन. मग हे नेते कोण होतात त्याना डावलण्याचं काम करणारे. secondly , गांजेल्या लोकांची क्रान्ती म्हत्वाची आहे. मग त्यासाठी या लोकाना आरक्षण कशाला लागते अभ्यास करा mark मिळवा आणि पुढे जा कोणीही आडवले नाहिये. कष्ट करायची तयारई ठेवा आणि कष्ट करा. ब्रह्मण किंवा ९६ कुळी किंवा तथाकथित सवर्ण कष्ट केल्याशिवाय नाही वर येत. आणि हे classes , guides वगैरेच बोलताय तुम्ही तर असे कितीतरी सवर्ण आहेत की जे claas लावत नाहीत त्यांच्याकडे पाठ्यपुस्तकांशिवाय काहीही नसतं. मी स्वतः त्यातलीच आहे. मी कधीही class लावला नव्हता की guides वापरली नव्हती. आमच्या पालकांची परिस्थितिच नव्हती तशी. जे आर्थिक हलाख़ित आहेत त्याना जरूर आरक्षण मिळावं पण जातीवर नाही. एख़ादा माणूस ब्रह्मण होणे, open मध्ये येणे किंवा OBC मध्ये येणे हे काही त्याच्या हातात नसतं. जन्म कुणाचाच आपल्या हातात नसतो. पण तुम्ही एका विशिष्ट जातीत जन्माला आला असाल तर त्याचा त्रास इतराना कशाला. देवानी जेव्हा जन्माला घातल तेव्हा त्याने नाही हा फ़रक केला की हा ब्रह्मण आहे म्हणुन याला ४ हात जास्त द्या आणि हा OBC आहे म्हणुन याला ४ पाय जास्त द्या. जिथे त्यानिच काही फ़रक दाख़वलेला नाही तिथे तुम्ही कोण असं करणारे. कित्येक मुलं मी अशी बघितली आहेत की जी सवर्ण आहेत पण काही कारणाने घरची परिस्थिती नाही म्हणुन hotel मध्ये waiter चं काम करून शिकत आहेत. आणि कित्येक obc पैकी सुध्ह आहेत जे हे करत आहेत. जर गुण मिळाले तर नक्की पुढे जायची संधी मिळाली पाहीजे आणि नसतील तर नाही. मग तो कुठल्याही जातीचा का असेना.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|