Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 26, 2006

Hitguj » Views and Comments » मायबोली-हितगुज » मायबोलीवर ठरलेल्या लग्नांबद्दल, काय बोलणे योग्य काय नाही » Archive through May 26, 2006 « Previous Next »

P_kanekar
Thursday, May 25, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

What discussion is expected on this topic. I mean, this is crazy.

It is as simple as that.. if you know someone, if you are close to someone, your relations gives you right to make fun of your friends.. if you do not know someone, you must not comment on any personal matter of that person. You must not make fun of that person.

is it so dffficult to understand? What discussion is expected on this topic?

Those who can not respect other's privacy and personal matters, should be taken seriuosly. That is what guys had requested you. The line was crossed.

Am I missing something here? Not able to understand what discussion is expected on this subject?

P_kanekar
Thursday, May 25, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin

thanks a ton!

If you are really serious about it, then nothing like it.

But I did not understand the purpose of this discussion. The rule is rule. You can not go naked in public means you can not go. No arguments on this. If you still want to go, you must be ready to face a music.

That is what I think.

Admin
Thursday, May 25, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरा मुद्दा
२) व.वि. ला वधूवरसूचक मेळावा म्हणणे योग्य आहे का?

मला असे वाटते आहे "वधूवरसूचक मेळावा" या शब्दामुळे व. वि. चे स्वरूप बदलते आहे असा आक्षेप आहे. मी काढलेला हा आक्षेपाचा अर्थ बरोबर नसेल तर सांगा.

जर कुणी उद्या व. वि. ला "साहित्यिक गप्पा" असे म्हटले तर एवढे वावगे वाटेल का? तिथे साहित्यिक गप्पांबरोबर खाणे पिणे हि होते की. इतर गप्पाही होतात. खरे तर अशा कार्यक्रमांचा उद्देश एकत्र येणे आणि ज्याला जो आनंद हवा आहे तो घेणे असा असतो. त्यामुळे त्याबद्दल कुणाला काय वाटले ते त्याने लिहिले.

किंवा उद्या एकाने व.वि= फक्त पुण्याचे लोक असे लिहिले कारण एखाद्या व.वि. ला सगळ्यांना आमंत्रण असूनही काही कारणामुळे पुण्याचे लोकच जास्त प्रमाणात हजर राहू शकले तर लगेच प्रत्येक व.वि फक्त पुण्यासाठी मर्यादित होत नाही. ते त्याचे वैयक्तिक मत असते.

जर कार्यक्रमाचे संयोजन करणार्‍यांनीच हा "वधूवरसूचक मेळावा" आहे असे लिहिले तर तुमचा आक्षेप पूर्ण बरोबर आहे. कारण त्यातून फक्त लग्नाला इच्छूक व्यक्ती येणे अपेक्षीत होते. पण जो संयोजक नाही अशाने त्याचे मत मांडले आणि तुम्हाला ते पटले नाही तर तुम्ही ते खोडून काढणारे दुसरे मत मांडा. नेमस्तकांनी मधे पडणे आवश्यक आहे का?

पहिला मुद्धा (जो मी वर लिहिला आहे) तो मी आधीच मान्य केला आहे. ज्या व्यक्तिने शेरेबाजी केली असा आरोप आहे त्याच व्यक्तिच्या संदर्भात दोन्ही मुद्दे असल्याने त्यात गल्लत होते आहे म्हणून मी दोन वेगवेगळे लिहिले आहेत.


Admin
Thursday, May 25, 2006 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

P_kanekar,
please give me some time to reply before you post. :-)
1. I agree completely there is no discussion on first topic. That is a rule, end of matter.

2. However there is a side debate on what to call (or what not to call) GTG. and I was just answering that.

P_kanekar
Thursday, May 25, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin,
Accepted. Sorry for that. :-)

The reason I am getting like panic on this issue is as follows. I have a grilfriend who also happens to be a maayboli member. Where and how we met is completely different scenario. We may or may not get married down the line. But I was worried that if we get married, will there be same kind of nonsense happen again? Will there be an embarrassing situation for us on Maayboli?

I hope Maayboli members will take serious note of it and will help Admin-team to maintain good atmosphere on maayboli. If not, admin will punish the respective member.

I am out of this with full satisfaction in my mind. Thanks Admin.


Limbutimbu
Thursday, May 25, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माननीय ऍडमीन, दुर्दैवाने मी ज्या कॉम वर बसलो हे तिथे बर्‍याच अक्षरान्चे (कोपि पेस्ट) चौकोन दिसताहेत!
त्यामुळे मैत्रेयी यान्नी कशाचा सन्दर्भ दिला हे मला कळत नाही, सबब त्यान्ना नन्तर उत्तर द्यायचा प्रयत्न करीन
तरीही....
माझ्या पोस्ट मधे मी लिहिले आहेच की, मी विषय गिरीराज या आयडीच्या निमित्ताने काढला होत! तिथे फ या आयडीच्या किन्वा त्याच्या विवाह जुळण्याशी काहीही उल्लेख नसताना फ तो स्वतःवर कशाच्या जोरावर आणि काय "कारणाने" ओढवुन घेत हे?
कणेकर यानी त्यान्च्या गर्ल फ्रेन्ड बद्दल उपस्थित केलेल्या सम्भाव्य प्रश्णान्बद्दल मी काहीच बोलू इच्छित नाही!
ऍडमिन, या करता आपण वेगळा बीबी निर्माण करुन दिलात हे फार चान्गले केलेत, फक्त आत्ता मला गडबिडीत इथे अधिक काही प्रतिक्रिया देणे शक्य नाही, तसेच मी प्रवासात असल्यानेच केवळ या वेळेस येवु शकलो हे!
मायबोलीवरील वातावरण गढुळ होउ नये म्हणुन मीही सन्यम बाळगित हे!
शिवाय, "हिन्त, समजा, सावधगिरीचे इशारे", वगैरे सातत्याने एका कम्पूकडुन दिल्या जाणार्‍या बाबी या केवळ "शाब्दिक" हेत असे समजुन चालतोय!
ऍडमिन, कुणी खात्री देऊ शकाल का की ही मन्डळी शब्दान्चे खेळ शब्दान्नीच खेळणारेत?
आय अ.एम वरीड ऍण्ड डाउटफुल!
मैत्रेयी, तुमच्या पोस्टवरुन अर्थ बोध येवढाच झाला की मी वाळित टाकण्याच्या मुद्द्यावर तुम्ही काही एक प्रश्ण विचारला हे! तुम्ही पुनरुध्रुत केलेले मला चौकोन दिसत असल्याने मी भाष्य करणे टाळतोय! फक्त, एक नक्की सान्गेन, एखाद्याला टारगेट करणे हे मायबोली राहुदेच, प्रत्यक्ष जीवनात देखिल नविन नसते, फन्क्त टारगेट बनल्या नन्तरच्या किया प्रतिक्रीयान्मधे व्यक्तीव्यक्तीनुरुप बदल घडत असतो! यावेळी मी इतकेच सान्गेन की "लिम्बुटिम्बु" या आयडीच्या "गेल्या जवळपास वर्षभरातील" प्रतिक्रिया वेगळ्या होत्या, आहेत, असणार!


Maitreyee
Thursday, May 25, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू, मी संदर्भ तुझ्या पोस्ट मधल्य ' एखाद्या आयडीला वाळीत टाकण्याबद्दल' जे लिहिले होतेस त्याचा दिला होता. तिथे तू 'एखादा आयडी' असे म्हटलेस त्यामुळे मीही जे लिहिलय ते त्रयस्थ भाष्य आहे! व्यक्तिश तुला कुणी वाळीत टाकले की तू कुणाला टाकले ते मला काहीही माहित नाहिये. माझे general statement होते, की जर असा एखादा त्रासदायक आयडी असला किन्वा संबन्धितांना तसा वाटला तर त्या आयडी ला 'वाळीत टाकणे' यात मला तरी नवल किन्वा निषेधार्ह असे वाटले नाही.
उलट त्या आयडीकडून होत असलेल्या त्रासाचा प्रतिकार करण्याचा तो अहिंसात्मक मार्ग नाही का!


Deepstambh
Thursday, May 25, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वप्रथम नमुद करु इच्छितो की माझे कोणाही मायबोलीकरासोबत वैर नाही. मी शक्यतो सर्वांशी खेळीमेळीने वागतो पण मला त्यांची एखादी भूमिका पटेलच असे नाही.

लिम्बुचा फक्त विनोदनिर्मीती करण्याचा प्रयत्न होता असे जरी गृहीत धरले तरी एखादी व्यक्ती त्यामुळे दुखावली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. निरनिराळ्या व्यक्तींची sensitivity वेगवेगळी असु शकते. आपण शुद्ध हेतुने विनोदनिर्मिती केली, पण एखादी व्यक्ती जर दुखावली तर निदान आपला तसा उद्देश नव्हता असे सांगुन त्याची क्षमा मागावी. क्षमा मागीतल्याने कमीपणा येत नाही. माझ्या हातुनही अशी चूक झालेली असल्याने मी हे लिहित आहे. मला जरी अजुनही असे वाटते की त्यावेळी मी बरोबर होतो.. कारण त्या व्यक्तीला दुखावण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता तरी ती व्यक्ती दुखावली गेली असल्यास सरळ माफी मागावी.

दुसरा मुद्दा वर्षा विहार (ववि) ला वधुवर विवाह मेळावा म्हणण्याचा. वर्षा विहार (ववि) ला वधुवर विवाह मेळावा म्हणणे मलाही पटलेले नाही. इथेही केवळ creativity दाखवुन शब्दांचा वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला गेला असेल. अनेकजण तसे करतात. जसे की मागे दिनेशने EDP चा वेगळा अर्थ सांगीतला. पण त्यामुळे ववि ला वेगळाच रंग मिळाला आहे हे मलाही वाटते.

मी जेव्हा इथे नविन होतो तेव्हा मला ववि बद्दल कहीही कल्पना नव्हती. नंतर जुन्या मायबोलीकरांच्या बोलण्यातुन त्याचा उल्लेख येत गेला. काही जुनी वर्णने वाचनात आली. त्यावरुन माझे असे मत पडले की दरवर्षी पर्ज्यन ऋतूचे निमित्त साधुन मायबोलीकरांचा एक भव्य मेळावा होतो. त्यात मुख्यतः नविन रंग ल्यालेला सृष्टीचा आनंद घेणे हा मुख्य उद्देश असतो. कारण सिमेंटच्या जंगलात राहणार्‍या आपल्याला क्वचित अशी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची संधी मिळते. आणि आपण मायबोलीवर ज्या व्यक्तींशी बोलतो, ज्यांच्या कवितेला, लेखाला, कलेला आपण दाद देतो, ज्यांची आपल्याला दाद मिळते, त्या सर्वांशी अशा वातावरणात प्रत्यक्ष भेट झाली तर क्या कहने?? अगदी सोने पे सुहागा.

पण आता ज्या प्रकारे ववि ची चर्चा चाली आहे त्यावरुन नविन लोक काय अर्थ काढतील? मला तर वाटते की असा रंग दिला तर तरूण मायबोलीकर ववि ला येणे टाळतील. कारण त्यांना comfortable feel होणार नाही. इतर लोक आपल्याला त्या नजरेने पहात आहेत असेच वाटत राहीळ. ते स्वच्छंदपणे ववि चा आस्वाद घेऊ शकतील असे मला तरी वाटत नाही.

केवळ ववि ला आले आणि लग्न ठरले असे म्हणणे निव्वळ मुर्खपणा आहे. अणि अशा उपक्रमात एखाद्यांची मने जुळली तर ती निश्चीतच चांगली गोष्ट आहे. पण इथे अजुन एक गोष्ट लक्षात घेतली पहिजे की आधीच त्या व्यक्तीचे हितगुजवरील वागणे / गुलमोहरमधील त्याची कला इत्यादी पाहुन कळत नकळत मने जुळलेली असु शकतात. आणि common interest असलेल्या मराठी मुलामुलींची आपआपसात लग्न होणे हे ही स्वागतार्हच आहे. पण म्हणुन श्रद्धाने म्हटल्याप्रमाणे मायबोलीला matrimonial site म्हणता येणार नाही. तसे म्हणणे म्हणजे तमाम मायबोलीकरांचा, त्यावर आपली कला share करणार्‍यांचा अपमान ठरेल.

अजुन एक गोष्ट नमुद करावीशी वाटते की मागच्या ववि ला ६० च्या आसपास लोक होती. काही तरूण मंडळी वगळता त्यात बरेचसे वयोवृद्ध, मध्यवयीन, लग्न झालेले आणि लहान मुले होती. हे सर्व स्वःताचे लग्न जमवायला आले होते असाच अर्थ निघतो.

हि गोष्ट या थरापर्यंत आली हि नक्कीच अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.


Limbutimbu
Thursday, May 25, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एकाही पोस्ट मधे, "केवळ फ याचे अभिनन्दन करण्या व्यतिरिक्त", मी कुठेही, कधिही त्यान्च्या लग्नाच्याबद्दल किन्वा इव्हन त्यान्च्या भावी वधुच्या आयडीचे नाव घेवुन देखिल काहीही लिहिले नसताना केवळ ववि म्हणजे अमुक तमुक म्हणल्यामुळे (ववि म्हणले होते, वर्षाविहार नाही) तो विषय स्वतःवर ओढवुन घेवुन किन्वा निमित्त करुन "लिम्बुटिम्बु" या आयडीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न हे असे मी समजलो तर त्यात चूक काय असेल? ते म्हणतात की मी "ड्युप्लिकेट" हे, तर "ओरिजन्ल" काय हे? आणि मग "ओरिजनल" शी त्यान्ची "दुष्मनी" कधीपासुन नी का झाली जेणेकरुन "लिम्बुटिम्बु" ही आयडी त्यान्ना त्याज्ज्य वाटायला लागली?
माझे निखळ तटस्थ त्रयस्थ मत असे हे की फ या आयडीने भावनेच्या भरात जाऊन काही एक बेसावध पोस्ट्स केल्या हेत! जर तो आणि त्याच्या सहकार्‍यान्ना "लिम्बुटिम्बु" ला नालायक ठरवायचेच असेल तर "ठोस" स्टेटमेण्ट्स सहित पोस्ट करुदे, केवळ भावलेल्या आशय युक्त, जर तर युक्त पोस्ट्स नी काहीही साध्य होणार नाही! फार फार तर अन्य अनेक जसे कन्टाळुन मायबोली सोडुन गेले, तसेच मीही एक दिवशी जाईन!
आणि तेच जर साध्य असेल, तर मी अन्य काही बोलायलाच नको!
ऍडमिन आणि मॉड्स, आपण घेतलेल्या आणि घेत असलेल्या सन्यमित भुमिकेबद्दल आपला आभारी हे, त्याचबरोबर, "लिम्बुटिम्बु" या माझ्या "अवतारामुळे" जर आपणास मनस्ताप होत असेल तर मनःपुर्वक क्षमस्व!
आणि तरीही, गेल्या वर्षी जुलै मधे, एकदम अचानक, मला "विकृत" ठरवुन जवळपास पुरे वर्षभर जो "तमाशा" sg road bb वर चालला होता तो मी या जन्मी तरी विसरणे अशक्य! मैत्रेयी, तुमच्या प्रश्णाचे उत्तर कदाचित या वाक्यात दडलेले असु शकते...! सडनली LT ला "विकृत" ठरवुन त्याची जाहीर निर्भत्सना करणार्‍यास काय कारण पडले ते मात्र त्यान्नी कधीच जाहीरपणे सान्गितले नाही हे ही विसरु नका!
ववि ला काय म्हणावे की नाही हे फक्त निमित्त हे, खर कारण "त्यान्नाच" माहित!
येवुन जावुन त्याचसुमारास "विषकन्या" या आयडी मार्फत एक "मानापनामाचा" प्रयोग खेळला गेला होता एवढे मला आठवते आहे!
खर तर या विषयावर अधिक बोलणे सद्ध्या तरी मि उचित समजत नाही! अगदीच रहावले नाही म्हणुन ही पोस्ट केली असे! कारण सेव्ह करुन ठेवलेल्या "समजा" "हिन्ट्स" यान्ची भाषा मला अधिक गम्भिरपुर्ण वाटते जरी कुणा अन्य वाचकास वाटली नसेल! आणि मी ते गम्भिरतेने घेतो हे!
ऍडमिन, जगात परिपुर्ण कोणच नसतो, मीही नाही, मला जाणिव हे! पण मी या फोरम वर जे जे लिहिले ते ते सर्व प्रतिक्रियात्मक लिहिले, मी एकही नविन बीबी उघडला नाही, एकही नविन विषय ओपन केला नाही, जे जे चालु विषय होते त्यात माझा हातभार लावला, हे सान्गण्याचे कारण येवढेच की ज्यान्ना माझे जे जे लिहिणे, कुणाला खुपणार किन्वा कुणाच्या कौतुकास पात्र होणार, ते ते ते सर्व प्रतिक्रियात्मक हे!
मी साध्या चारोळ्या केल्या त्या देखिल कुणापासुन स्फुर्ती घेवुन!
मी व्यन्गचित्रे काढली ती देखिल कुणाची तरी चित्रकारिता भघुन त्यापासुन मिळविलेल्या इर्ष्येमुळे!
मी वाद घातले ते देखिल कुणाचे तरी एकान्गी मत न पटल्यामुळे!
मी आख्ख्या बीबीचे विषय सोडुन विषय भलतीकडेच वळवले किन्वा मूळ मुद्द्यावर आनले ते देखिल कुठे तरी मूळ विषयाची गाडी रुळावरुन घसरत होती ते बघुन! पुन्हा प्रतिक्रियात्मकच!
मी "काड्या" टाकल्या, पण ते देखिल ज्या वादाच्या विषयात वळण मिळुन मायबोलीच्या "पट्टीच्या वाचकान्ना" काही खुराक मिळावा म्हणुन!
आणि एक SG Road BB सोडला तर बाकी सर्व ठीकाणच्या माझ्या लेखनात इतकी वैविध्यता असताना नेमके ओढुन ताणुन आणलेले सोइस्कर तेवढेचे आक्षेप "वैयक्तीक बाबीन्वरचा हल्ला" म्हणुन कुणाला बोम्ब ठोकायची असेल तर मी ती थाम्बवु शकत नाही!
थाम्बवु शकलो, तर ते केवळ एकच, ते म्हणजे माझी प्रतिक्रिया देणे!


Limbutimbu
Thursday, May 25, 2006 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> हि गोष्ट या थरापर्यंत आली हि नक्कीच अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.
दीपस्थम्भ, मी आपली पोस्ट नन्तर वाचली!
ववि बद्दलचे विनोदनिर्मितीकरताचे माझे केवळ एक वाक्य होते! ते देखिल वाहुन जाणार्‍या बीबीवर, आणि त्या वाक्याच्या दसपटीने मालमसाला लावलेले!
मात्र त्यातले एकच ववि बद्दलचे वाक्य उचलुन, स्वतःवर ओढवुन कुणी काय साध्ध्य केले ते तुझ्या या वाक्यावरुन अन वेगळ्या उघडल्या गेलेल्या बीबीवरुन दिसतेच आहे!
माझ्यावर अनेकदा आरोप झाला की मी लिखाण करतो ते सहानुभुती मिळविण्याकरता, लक्ष वेधुन घेण्याकरता, श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकरता वगैरे वगैरे...!
एक मान्य करावेच लागेल आक्षेप घेणार्‍यास देखिल, मी जे लिहितो, परिणामकारकच लिहितो! परिणामकारक तेव्हा बनते जेव्हा ते स्वार्थरहित असते! तटस्थ त्रयस्थ भुमिकेतुन लिहिलेले असते, किम्बहुना "लिम्बुटिम्बु" ही आयडी देखिल माझ्या प्रत्यक्ष जीवनाकडे बघणारे "त्रयस्थ" व्यक्तिमत्व हे! (असे व्यक्तिमत्व प्रत्येकात दडलेले असते, आणि म्हणुनच मी नेहेमी म्हणतो की प्रत्येकात एकेक लिम्बु दडलेले असते! ते किती उघड करावे, की ते असणे योग्य की अयोग्य हे वएगळे विषय हेत!)
प्रश्ण असा हे की वरील केवळ अन केवळ वविच्या माझ्या एका वाक्याचा सन्दर्भ देवुन सहानुभुती किन्वा अनुकम्पा किन्वा LT बद्दलचा द्वेष जोपासणे असे उद्देश होते असे मी किन्वा अजुन कुणी चुकुन जर म्हणले तर त्यात देखिल गैर काय असणार हे?
आजच्या रात्रीचा माझा नेटचा कोटा सम्पलेला हे! सबब आता दोन तीन दिवसान्नी भेटु
:-)

Limbutimbu
Thursday, May 25, 2006 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> Thursday, May 25, 2006 - 10:31 am:
माननीय ऍडमिन, खर तर माझी वेळ सम्पत आली हे, पण दोन मिनिटे काढुन... आपल्या वरील पोस्ट मधिल उल्लेखास अनुसरुन सान्गु इच्छितो की फ या आयडीच्या लग्न जमण्याच्या सन्दर्भात एक तरी वाक्य जावुदेच, शब्द तरी "टिन्गल किन्वा टवाळी युक्त" असा माझ्या कडुन कुठे कधि लिहिला गेला होता?
येवुन जावुन मी बिनधास्त गिर्‍याला (हो मी त्याला गिर्‍या असेही म्हणतो, त्याने आक्षेप घेवुदे, मी थाम्बविन) अरे इतके दिवस कसे लपवुन ठेवलेस असे विचारले! या प्रश्णा व्यतिरिक्त अत्यन्त मोजक्या ठिकाणी जसे की गन्धार या आयडीच्या मुलीचा वर्षाचा वाढदिवस झाला त्या ठिकाणच्या पोस्ट मधे मी अभिनन्दन अन शुभेच्छा देवुन दरवाजाला अडसर लावायला सान्गितला होता! फ यान्च्या "व्याख्ये" नुसार माझे असे सान्गणे म्हणजे देखिल गुन्हा ठरणार का?
आय बेट, कुणीही माझ्या कोणत्याही पोस्ट मधे कुणाची विशेषतः लग्न जमणे या विषयावरची एक तरी टिन्गल टवाळी युक्त पोस्ट, शब्द, वाक्य दाखवुन द्यावेत, मी हा फोरम स्वतःहून सोडुन जाईन, कुणालाही दोष न देता! :-)
मी आधीच्या पोस्ट मधे मला भासत असलेली सम्भाव्य किन्वा भुतकाळातल्या कारणमिमान्सेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला हे! कुणाला समजल्यास उत्तम, न समजल्यासही उत्तमच!
खर तर मला गम्मत वाटतीये! आम्ही सातार्‍यात होतो तेव्हा म्हणायचो की वरल्या रस्त्याच्या फेर्‍या चालु झाल्या की नाही, अशा अनेक फेर्‍यान्च्या चर्चा जाहीरपणे होतात, ज्यान्नी केल्या ते "आपले" म्हणुन चालुन जाते, LT ने त्यावर चुकुन माकुन भाष्य केले तर मात्र तो गुन्हा ठरतो, मैत्रेयी असला न्याय तुम्हाला मायबोलीवर जोपासायचा हे का? मी अनुल्लेखाच वाळीत टाकण्याच उदाहरण तेवढ्याकरता दिल हे! एकास एक अन दुसर्‍यास दुसर अस करायच असेल तर याहू मेसेन्जर मोकाट पडला हेच की? हा पब्लिक फोरम हे हे जर मान्य असेल अन कुणी येवढे नाजुक मनःस्थितीचे असेल तर त्यान्नी आपल्या कोणत्याच खाजगी बाबी या फोरम वर आणु नयेत हेच उत्तम नाही का? जरी मी कुणाच्याही खाजगी बाबीत (एक्सेप्ट गिर्‍या) कसलीही पोस्ट केलेली नसताना कुणाला ओढवुन घ्यायची हौस असेल आणि ती हौस मला धोकादायक शाबित होत असेल तर माझ्याकडुन वरल्या पोस्ट्सच होणार, नाही का?
ऑल ऑफ यु, गुड डे!
ऍडमिन, पुनःश्च एकदा क्षमस्व!


Deepstambh
Thursday, May 25, 2006 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी मी तो उल्लेख काढुन टाकला आहे. माझा खरंच तसा अर्थ अभिप्रेत नव्हता कारण त्यांचा व्यवसाय ही परिस्थीतीने त्यांच्यासोबत केलेली क्रुर चेष्टा असते असे माझे मत आहे. त्यांच्याबद्दल मला अजिबात तिरस्कार नाही आहे. मला फक्त एव्हढेच सांगायचे होते की त्या घटनेचा तिच्यावर होणारा आघात हा कमी असेल कारण आधीच तिचे मन एव्हढे कणखर झालेले असते की अशा घटनेचा सामना करण्यास ती अधिक समर्थ असते.

Maitreyee
Thursday, May 25, 2006 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Okkie,दीप मी ते पोस्ट उडवलेय रे

Ninavi
Thursday, May 25, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेळ नसताना हा आयडी एवढं लिहीतो? वेळ मिळाला तर काय करेल?

Limbutimbu
Friday, May 26, 2006 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> वेळ नसताना हा आयडी एवढं लिहीतो? वेळ मिळाला तर काय करेल?
अन्गी पडे अन दुन बळ चढे, अस असत बरका निनावी! :-)

एनीवे, आत्ताच मला एका सिनियर मायबोलीकराकडुन आलेली मेल वाचली! त्यातिल मजकुर व सल्ला पटला, म्हणुन त्या अनुसार मी पुढील निवेदन देत आहे!
"गिरी सन्दर्भात केलेल्या माझ्या ववी किन्वा अन्य उल्लेखान्मुळे जर श्रीयुत फ आणि मिस श्र यान्ची मने दुखावली असतील तर मी त्यान्ची माफी मागतो! माझा तो उद्देश नव्हता पण तरीही अजाणता देखिल कुणी दुखावले जाऊ नये या मताचा मी देखिल हे! मला खात्री हे, ते दोघेही तेवढ्याच खेळकर पणाने हे निवेदन घेतिल" :-)
(स्पोर्ट्स्मन स्पिरिटला खेळकरपणा हा शब्द योग्य हे ना?)
गिरी, तुझे सल्ले देखिल मी अम्मलात आणणार हे, अर्थात या बीबीवरील विषय सम्पल्यावर! :-)


Kandapohe
Friday, May 26, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"अनुल्लेख" नावाचा जाहीरपणे एखाद्या आयडीला शब्दश "वाळित" टाकण्याचा प्रकार अधिकृतपणे सुरु आहे तो या पब्लिक फोरम वर मला तरी योग्य वाटत नाही >>>>>>
लिंब्या (माननीय लिंबूटींबू महोदय वगैरे लिहीत नाही कारण तुला आक्षेप नसावा) तुझे हे वाक्य मला अजीबात पटले नाही. माझ्या माहीती प्रमाणे तू साधारण २ वर्ष (उगाच २ वर्ष नाही १८ महीने वगैरे खोड काढू नये) गडावर नियमीत येतो आहेस. त्यापैकी मला माहीत आहे ते असे की सर्व गडकरी तुझ्याशी व्यवस्थीत संभाषण ठेवत होते. तू जशी चेष्टा करायचास, टर उडवायचास तशीच हे सर्व लोक पण तुझी थट्टा करत, टर उडवीत, प्रसंगी चेष्टा करत होते. वातावरण खेळीमेळीचे होते. अनेक वेळा फारच वैयक्तीक पातळीवर जर कुणी जाते आणी समोरच्या माणसाला ते पटले नाही तर तशी जाणीव सगळ्यांनाच अनेकदा केली जाते. तूला देखील अनेक जणांनी या पूर्वी तशी जाणीव, सुचना, वाद नको म्हणून आडून आडून, कोट्या करून वेळोवेळी दिली गेली आहे. मी स्वतः मेलद्वारे, YM वर तुला हे सुचवलेले आहे. आजही तू एखादे चांगले पोष्ट केलेस तर तुझी तारीफ करणारे लोक आहेत. आजही गडावर तू आलास तर २ शब्द बोलले जातात. कदाचीत मी मनावर घेत नाही म्हणून असेल. पण सगळ्यांनाच ते चालेल असे नाही. त्यामुळे ज्याला चालत नाही त्याच्या वाटेला न जाणेच इष्ट.

थोडक्यात सांगायचे झाले तर अचानक कुणी तुझ्याशी बोलणे बंद केले नाही तर ती अनेक दिवसांची साठलेली प्रतिक्रिया होती.

दुसरी महत्वाची गोष्ट जीथे आपले कुणीच ऐकत नाही, फार क्वचित आपल्याशी कुणी बोलते हे लक्षात आल्यावर सुद्धा त्यांनी आपल्याशी बोलावे हा अट्टाहास कशासाठी? मी सुद्धा इतर अनेक बीबीवर एखादे पोष्ट करतो तेव्हा मला कुणीतरी साधा नमस्कार, हाय करावे अशी अपेक्षा असते पण कुणी केलाच नाही तर तो त्यांचा प्रश्न आहे.

हळुहळु एकएकाने तुझ्याशी बोलणे बंद केले. त्यामुळे तू स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. १० पैकी ८ जणांना तसे वाटत असेल तर असे का? असो. मला जे वाटले ते मी लिहीले. बघ विचार करून. नसेल पटत तर सोडून दे.


Manish2703
Friday, May 26, 2006 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thats the spirit LT

Bee
Friday, May 26, 2006 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मला एक कळले नाही मायबोलिबाहेर जी मंडळी मित्र म्हणून एकमेकांना भेटतात आणि फ़क्त pal friend न राहता एकमेकांचे चांगले जिवलग मित्र होतात किंवा त्याची परिणीती जर लग्नात होत असेल तर त्याला मायबोलिची देखरेख करणारे कुणीही कसे काय जवाबदार असतील मग भले एखादी घटना चांगली असेल किंवा वाईट वाटावी अशी असेल? माझ्यामते इथे देखरेखीला असणारे अशा भेटीगाठींना मुळीच जवाबदार नाहीत. तेंव्हा हा मुद्दा इतका ओढायची इथे तरी तशी गरज वाटत नाही. पण इथे एकमेकांवर वार करण्याची काहींची खोड आहे आणि जेंव्हा स्वतवर वार होतात तेंव्हा कितीही शांत मनुष्य असला तरी तो निदान एकदा तरी आपला राग व्यक्त करीन. मला देखील असे खूपदा वाटते की मला इथले मायबोलिवर वाळीत टाकत आहेत पण नविन मायबोलिकर येतात आणि परत कुणीतरी बोलायला मिळते. तर हे चालणाराच. इथे आपण एकमेकांना बघू शकत नाही, भेटू शकत नाही. तेंव्हा हे पांढर्‍यावरचे काळेच काय आपली एक दृढ ओळख आहे.

मला मायबोलिवर लग्न ठरतात हे आजपर्यंत माहिती नव्हत. एकही जोडप आठवत नाही. इथे बरेचदा आज ह्याचा, उद्या तिचा वाढदिवस आहे, त्याला तिला मुलगा मुलगी झाली असे घोषीत करण्यात येते मग मला प्रश्न पडतो की ह्यांना कसे काय माहिती ह्यांच्या जन्मतारखांबद्दल. तर काहीजण इथे एकमेकात खूप गुंततात कारण त्यांची wavelength जुळली असते. माझी wavelength अजून कुणाशी तशी जुळलीच नाही आणि to be frank मला अनुल्लेखाने आजवर कुणी मारले नाही. अशा घोषीत खबरा वाचून मला तरी आनंदच झाला आहे आणि ढीगभर शुभेच्छा वाचून इतरांदेखील तसेच वाटत असेल असा तर्क काढायला हरकत नाही. एकूण काय तर admin म्हणतात ते मला योग्यच वाटते आहे आणि उरला प्रश्न शेरेबाजींचा तर त्याकडे सुज्ञ व्यक्तीने होता होईस्तोवर दुर्लक्ष करावे नाहीतर कधीतरी प्रसंग साधून उणेपुरे सगळे काही काढून टाकावे ज्याला मी मनशुद्धी म्हणतो.


Giriraj
Friday, May 26, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील सर्व चर्चेत किंवा वादात माझे नाव आहे म्हणून लिहितोय(अन्यथा माझा वाद या प्रकाराशी काही संबंध नाही! )

१)वाद सुरू झाला त्या दिवशी 'संदीप खरे मुलाखतिची'जाहिरात या एकाच उद्देयेश्याने मी SG वर गेलो होतो.
२) माझी चेष्टा केल्यावर मी सहसा मनावर घेत नाही.मायबोलिशी भावनिक गुंतवणूक असूनही एका virtual community च्या काही मर्यादा लक्षात घेऊनच मी इथे वागतो.
पण याचा अर्थ असा होत नाही की मी sensitive नाही. अशी कोणतिही वैयक्तिक चेष्टा जी माझ्यावरून सुरू झाली पण जिचा संदर्भ इतर कुणाशी असेल्;मला नको आहे.शेवटी मायबोलीवर ID म्हणून ववरत असलो तरी मला माझे अस्तित्व आहे.

लिम्बूटिम्बू,
१)तुला वाटते त्याप्रमाणे तुला एखाद्या BB वर वाळीत टकले जात असेल तर तिकडे तुला accept केलेच पाहिजे हा हट्ट का म्हणून?
२)मी आधीच म्हतल्याप्रमाणे तू नको तिथे उगाच धडपड करण्यात अर्थ नाही.त्यापेक्षा तुझ्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे अधिक लक्ष देऊन स्वतःची लोकप्रियता वाढवावी,हे योग्य नाही का?
३)तू Admin च्या म्हणण्याप्रमाणे तुझ्या वाक्यांबद्दल दिलगिरी व्यक्त केलीच आहेस तर आता हा विषय न वाढवणे अधिक चांगले नाही का?

बाकी तू माझे सल्ले अमलात आणणार आहेस हे उत्तमच आहे.


आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे,माझे लग्न कोणत्याही प्रकारे आणि कुठल्याही ठिकाणि,कुणाशीही अजून तरी( हे सर्व लिहून होईपर्यन्त तरी) जुळलेले नाही... त्यामुळे अफ़वांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांत रहावे ही विनंति!:-)

लग्न ठरताच योग्य वेळी सर्वांना आमंत्रण दिले जाईल..
:-)






Champak
Friday, May 26, 2006 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

....... आणी, माझे लग्न जर मायबोली च्या माध्यमातुण जमले, तर admin अन mods-team चा माझ्या गावातील पिंपळाच्या पारावर जाहीर सत्कार करील! :-)

ढुम ढुम ढुमाक :-)


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators