|  
Bee
 
 |  |  
 |  | Monday, May 22, 2006 - 3:42 am:    |  
 
 
 |   
  |   
 एखाद्या उत्तम सामान्य ज्ञान असलेल्या व्यक्तीने परदेशात नोकरी करता करता तिथल्या देशाचे नागरीकत्व घेऊन स्वदेशाचे नागरीकत्व नाकारुन देणे आणि वरुन आपण किती भारतीय आहोत असे मत व्यक्त करणे तुम्हाला कितपत पटते. आपल्या देशातील बरेच जण असेही आहेत यांनी स्वदेशाचे नागरीकत्व काढुन परदेशाचे नागरीकत्व स्विकारतात. त्यांना नेहरूजींबद्दल खूप काही माहिती आहे. आपण जन्मलेल्या देशाचा इतिहास चांगला माहिती आहे. तरीही तुम्ही त्याला देशप्रेमच म्हणाला का? हे अगदी विषयांतर होत आहे पण इथे वाचलेल्या मुद्द्यांवरुन हा मुद्दा उपस्थित करावासा वाटला.     अजुन एक, आदीवासी जमातीला कुठे काय कुणाच्यात वावरायचे असते. ती आपली सगळ्यांपासून अलिप्त होऊन रानावनात जीन जगत असतात. आपणच तिथे जाऊन त्यांना माणसात आणण्याचा प्रयास करतो की नाही? बिहार आणि बंगालमधले  IAS officers  ची संख्या खरच जास्त आहे हे मला नक्की माहित नाही पण असेल असे गृहीत धरले तरी त्यांनी काही खास क्रांती आपल्या राज्यात घडवून आणलेली आहे का? ह्या २ राज्याची प्रजा इतर राज्यांपेक्षा अधिक सुखी, सधन, सुशिक्षित, सुसंस्कृत आहे असा दावा करता येतो का? 
 
  |  
Bee
 
 |  |  
 |  | Monday, May 22, 2006 - 4:00 am:    |  
 
 
 |   
  |   
 बी ला काही येत नाही तसच लिम्बोटल्याला पण काही येत नाही, अन तस असेल तर ती त्यान्ची चूक नसुन आमची पिढी बदलत्या परिस्थितीत आमच्या पोरान्वर सन्स्कार करायला कमि पडली, किम्बहुना हरली असेच मला तरी म्हणाअवेसे वाटते! ही हार मानणे अपमानकारक असले तरी ती मानण्यावाचुन मला तरी तरणोपाय नाही!   >> लिंबुटिंबु, हे वाक्य जरा जास्तच झालय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझे आईवडील दोघेही निरक्षर आहेत. तरीही त्यांनी आम्हाला शिक्षित केले आहे आणि खूपसे चांगले संस्कार दिले आहेत. मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. मला जर काही माहिती नसेल तर त्यात माझ्या प्रयत्नांचा परिणाम असेल. त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी जे केले ते उदंड होते. 
 
  |  
 >>>>> >> लिंबुटिंबु, हे वाक्य जरा जास्तच झालय.  वत्सा बी, मी उदाहरणादाखल जरी व्यक्तीगत नामोच्चार केला असला तरी त्या व्याक्यातला आशय "आमची पिढी" या शब्दरचनेमुळे सर्वव्यापी बनला हे! तुला न झेपल्याने कळला नसावा बहुतेक!  (मी चान्गली तुझी बाजू घेत होतो तर.....    DDD
 
  |  
Bee
 
 |  |  
 |  | Monday, May 22, 2006 - 4:56 am:    |  
 
 
 |   
  |   
 जर नविन पिढीने शुद्ध आमचेच अनुकरण केले तर नविन असे काय निर्माण होणार आहे? आमची मुल आमचेच दुसरे रुप असतील. प्रत्येक नविन पिढीचे नविन रुप हे आपसूक निर्माण झालेले असते. जुन्या विचारांच्या जळमटातून मुक्त होणार्या आजच्या पिढीचा मला तरी अभिमान वाटतो.    जाऊ द्या विषय सतत भरकटत चालला आहे..  
 
  |  
 बी तू अवघड हेस! तुला बेसिक फन्डे समजावुन सान्गावे लागणार अस दिसतय!  तर बी, बाळ आईच्या पोटात असत येत तेव्हा पासुनच ते नवनविन शिकत रहात, अनुभवत रहात अन या शिकण्या मधला मुख्य दुवा म्हणजे आईबापच असतात... पौगन्डावस्थेपर्यन्त बाळ जे जे शिकत ज्यात मानवास जगण्याकरता अत्यावश्यक असलेल्या बाबीन्सहीत, समुहाने रहाण्याची, इतरान्प्रती विशिष्ट दृष्टीकोनाची, अस्मितेची वगैरे असन्ख्य शिकवण्या असतात! अर्थात दरवेळेस बाळाचा हात धरुन "बाळा ओळख पाहू हा कोणता रन्ग? याला लाल म्हणतात" अशा बाळबोधतेने शिकविल्या जाणार्या गोष्टी वेगळ्या व आईबाप स्वतःच्या वर्तनातुन मुलान्वर ठसवित असलेल्या गोष्टी वेगळ्या, जस जसे बाळाचे वावराचे विश्व मोठे होऊ लागते तस तसे तो बघितलेल्या अन्य व्यक्तीच्या बर्यावाईट गोष्टीन्चेही अनुकरण करु लागतो नी मग एखाददिवशी बाळ हातातल पेन किन्वा पेन्सिल तोन्डात घेवुन सिगारेटीचे झुरके मारीत असल्याची स्टाइल मारतो तेव्हा सजग आईबाप त्याला त्यान्च्या पद्धतीने टोकतात! अशा बाबी शेकड्यानी सान्गता येतिल!  बाळाच्या शिकण्या शिकविण्याच्या नि खास करुन अनुकरणप्रियता असण्या नसण्याच्या अशा उल्लेखात तुला कसली रे "जुन्या विचारान्ची जळमट" दिसताहेत?  मला तर अस वाटत की या बीबी वरच्या पोस्ट तू छापुन तुझ्याजवळ सन्ग्रही ठेव! अन जेव्हा तू बाप बनशील त्याच्या नन्तर तुझी पोरेबाळे जेव्हा पौगण्डावस्थेत येतिल तेव्हा हेच लेख पुन्हा काढुन वाच! मला वाटते की तुला त्यावेळेसच म्हणजे "बाप" बनल्यावर कदाचित कळु शकेल की आपला पोरगा शब्दशः "मुर्खानाम शिरोमणी" बनत चालला हे अन बाप त्याच्या वर कसलेही सन्स्कार करु शकत नाही किन्वा पोरगा अनुकरणप्रियदेखिल नाही याचे होणारे दुःख किती असते!   (मी "कदाचित" हा शब्द वापरला हे कारण तुझी पोरेबाळे आमच्या लिम्बोटल्यासारखीच निपजतील अशी खात्री कोणच देऊ शकत नाही, तेव्हा त्यावरुन तुझ्या भावना दुखायला नकोत, अन तुला अशाप्रकारचे "दुःख" समजले जावे अशी इच्छाही नाही, पण वरल्या "अनुकरणाच्या" चर्चेचा अर्थ जरी तेव्हा लागला तरी खुप झाले!)   खर तर मला येवढ समजावुन सान्गत बसायला आवडत नाही कारण वर शोनूच्या एका छोट्याश्या पोस्ट मधे मी सान्गत असलेल्या बाबीन्चे सार आले आहे! 
 
  |  
Bee
 
 |  |  
 |  | Monday, May 22, 2006 - 6:01 am:    |  
 
 
 |   
  |   
 लिंबुटिंबू माझा मुद्दा असा आहे की आपले मुल जर कशात कमी पडले तर त्यासाठी तुम्ही आईवडीलांना आणि शाळेतील शिक्षकांना जवाबदार धरणार का दरवेळी. लहान वयातील मुलांसाठी ठिक आहे पण आत्ताचेच जर उदाहरण कुणी घेतले तर मला कुणी हे असे म्हणू शकत नाही मी बीच्या आईवडीलांनी बीला इतकेही सामान्य द्यान दिले नाही. तुम्ही जे लिहिता ते सगळेच पचनी पडावे अशी अपेक्षा काढून टाका.  
 
  |  
 >>>>>> मला कुणी हे असे म्हणू शकत नाही मी बीच्या आईवडीलांनी बीला इतकेही सामान्य द्यान दिले नाही.  बी, मला वाटलच होत तू असाच अर्थ लावणार! अन बरोबरे... तू झ्या भुमिकेतुन विचार करीत हा अर्थ लावतो हेस! पण माझी प्रत्येक पोस्ट जर तुझ्या आईवडिलान्नी वाचली तर वरच्या तुझ्या माहीत नसण्याच्या उदाहरणाला अनुसरुन ते मात्र नक्कीच असच म्हणतील की बीला शिकविण्यात आम्ही कमी पडलो! कारण ते आईबाप या भुमिकेतुन बोलत असतील!   एनीवे, ही चर्चा तात्विक न रहाता व्यक्तिगत पातळीवरच्या उदाहरणान्वर उतरली हे अन कुणाकुणाला व्यक्तिगत पातळीवरची उदाहरणे आधी समजत नाहीत, अन मग समजली नाही म्हणुन सहनही होत नाहीत, तसे व्हायला नको म्हणुन मी हा "अनुकरणाचा" अध्याय येथेच आटपता घेतो!  अन बी, माझ्या वरल्या कोणत्याही पोस्ट्स मधे तुझ्या भावना बिवना दुखावल्या गेल्या असतील तर तू तसे जरुर मॉड्स्ना कळव!    मी माझ्या पोस्ट्स मधिल मजकुर सहसा मागे घेत नाही! 
 
  |  
Bee
 
 |  |  
 |  | Monday, May 22, 2006 - 7:24 am:    |  
 
 
 |   
  |   
 अहो लिंबुटिंबु सगळीकडे आजकाल अशीच स्थिती आहे. घरोघरी मातिच्या चुली ही म्हण लक्षात आहे ना.. आमच्याघरीदेखील आम्ही पोरांना हे  TV  च वेड काय लावून ठेववय, हा धांगडधिंगा काय चाललाय.. अरे चांगली पुस्तके वाचा असे कित्येकदा बजावून सांगतो पण आमचं कोण लक्षात घेत. तेंव्हा तुम्ही तुमच्या लिंबोणी आणि लिंबोटल्याची काळजी करू नका. इथल्या काका, मामा, मावशी, आत्यांच्या, आजी आणि आजोबांच्या आशिर्वादाने सगळे बरे होईल बघा. तथास्तु   
 
  |  
 >>>>> अहो लिंबुटिंबु सगळीकडे आजकाल अशीच स्थिती आहे.   बी, तस खरोखरच असत तर माझ दुःख थोड तरी कमी झाल असत! पण तस नाहीहेना!    माझी तमाम पुतणे, पुतण्या, भाचे भाच्या, नात्यागोत्यातील पोर अन आजुबाजुच्या शेजार्यान्ची पोर तशी नाहीहेत ना!   माझा पण विश्वास बसत नाही, तुझा काय बसेल, पण वस्तुस्थिती अशी हे की माझी एक पुतणी नुकतीच डॉक्टर झाली हे, दुसरी पत्रकार हे, अजुन एक पुतण्या पीएच डी करतो हे, एक बुद्धिबळात प्रविण हे, अजुन एक सीए करत्ये... अन असे अनेक!   शेवटी मी एकच म्हणतो... "देवाऽऽऽ, वाचन न करुन ते काय गमावताहेत, ते त्यान्च त्यान्नाच कळत नाही हे, त्यान्ना क्षमा कर"!  जावुदे, सोडुन देतो मी हा विषय अन काळजी करण! 
 
  |  
Moodi
 
 |  |  
 |  | Monday, May 22, 2006 - 8:27 am:    |  
 
 
 |   
  |   
 लिंब्या मी तुला लिंबोटल्याबद्दल विचारले रे, बाकी कुणाच्या ज्ञानाविषयी नाही विचारले. तुझी ती शंका पण रास्त आहे, पण आता त्यावर नंतर बोलु.. 
 
  |  
Bee
 
 |  |  
 |  | Monday, May 22, 2006 - 8:29 am:    |  
 
 
 |   
  |   
 पण पत्रकार लोकांना तर नेमीच वाचन करावे लागतेहो लिंबुभाऊ. आणि न वाचून काय इतक्या मोठ्या पदव्या मिळाल्यात त्यांना. वाचन करुन तुम्ही काय प्राप्त केलय   तुमच्या अट्टाहासाचे काही खास कारण कळले नाही. वाचालं तर वाचाल ह्या म्हणीचा तुम्ही जप करताहेत का   नाही वाचन तर अजून काही पर्यायी छंद असतीलच की त्यांना.. 
 
  |  
 लिम्बू  अरे, खरचं काही अपवाद वगळता सर्रास सगळीकडे हीच परिस्थिती आहे. स्पेशलिस्ट की जर्नलिस्ट हाच वाद चालु आहे. सर्व विषयांची किमान माहिती असावी ही अपेक्षाच अवास्तव वाटु लागली आहे. मला आठवतय २-३ वर्षापूर्वी सकाळच्या दिवाळी अंकामधे 'मजेत मश्गुल आम्ही' असा सुंदर लेख होता बदलत्या जीवनशैलीवर.    -चिंगी 
 
  |  
 ओके मुडी, नन्तर बोलू!  बी, आता तुला पक्का कोकणस्थी बाणा सान्गतो, वाचाल तर वाचाल का? तर वाचन हा बहुतान्श बिनभान्डवली धन्दा असतो!   सगळ कस? फुक्कट! जावुदे, आता फुकटच कस वाचुन घ्याव यावर कुठल्यातरी वेगळ्या बीबीवर लिहिन कधितरी!   पण माझा एक विश्वास हे की ज्याला मनोरन्जनात्मक देखिल वाचवत नाही तो बुद्धिला ताण आणणारे चिकित्सक सखोल अभ्यासाचे क्लिष्ट विषयान्चे धडे कसे काय वाचु शकेल अन पास होऊ शकेल?    
 
  |  
Moodi
 
 |  |  
 |  | Monday, May 22, 2006 - 10:10 am:    |  
 
 
 |   
  |   
 ते बाकी सारे जाऊ दे लिंब्या पण तू जी वरची पोस्ट लिहीलीस ना बापाच्या खंताबद्दल, ती मला पटली हे. आपले काही बाबतीत मतभेद आहेत किंवा असतीलही पण तू जे काही लिहीतोस ते डोक्याने म्हणजे बुद्धी वापरुन लिहीतोस हे मात्र सत्य आहे.    
 
  |  
 चिन्गी, तू म्हणतेस ते ही खर हे की अतिशय वेगात बदलण्यार्या बाह्य परिस्थितीच्या रेट्यामुळे काही जीवनमुल्ये उद्ध्वस्त होताहेत, तर काही नव्याने रचली जाताहेत तर काहीन्ची तोडमोड होऊन नविनच सन्करीत मुल्ये तयार होताहेत! या बीबीचा तो विषय नाही पण यावर बरच काही लिहिण्यासारख हे!   बदलत्या परिस्थितीचे भान आम्ही ठेवले पाहीजे अन ते सत्य स्विकारले पाहीजे!  मुडी, अभिप्रायाबद्दल तुला थॅन्क्यू!   
 
  |  
Mumbhai
 
 |  |  
 |  | Monday, May 22, 2006 - 10:55 pm:    |  
 
 
 |   
  |   
 दोस्तहो ... विषय हळुहळु भरकटत आहे.  एखाद्या-दुस-याला सोडुन सगळ्यांना मुद्दा लक्षात आलेलाच आहे. ज्याला माझीच लाल म्हणुन निरर्थक वाद घालयचा आहे त्याला समजावुन सांगण्यात कशाला शक्ती वाया घालवताय? त्या पेक्षा कहीतरि कथा, कविता, ललित लिहा.    मॉड, ह्या बीबी वरुन अजुन काही निष्पत्ती होणार नाही. बाचाबाची चालु होण्या अगोदर ह्याला कुलुप लावुन टाका
 
  |  
Santu
 
 |  |  
 |  | Tuesday, May 23, 2006 - 4:22 am:    |  
 
 
 |   
  |   
 मुम्बई  तुमच म्हणणे बरोबर आहे. पण बीबी बंद  करणे हा उपाय नाही.  तुम्हि तुमच म्हणने मांडा ना.  त्याला कुणाचा आक्षेप नाहि 
 
  |  
 सामान्या ज्ञानाची व्याख्या करणे अवघड हे! पण सामान्य ज्ञान हा शब्द जरी उच्चारला तर काय रचना मनात उभी रहाते ते बघू!  सामान्य हा शब्द वापरला तर पक्षी असामान्य हा विरुद्धार्थी शब्दही वापरावा लागेल! असामान्य ज्ञान म्हणजे काय याचा विचार करता सामान्य ज्ञानाची व्याप्ती लक्षात येइल! ढोबळमानाने असामान्य ज्ञानात, मानवाने केलेल्या, करत असणार्या पगतीस अनुलक्षुन जे जे विषय, तन्त्र, कौशल्य तो शिकला गेला ते ते असामान्य ज्ञान असे म्हणावे लागेल! आणि हे बहुदा भौतिकतेच्या सन्दर्भातील असेल!  तर सामान्य ज्ञान म्हणजे नैसर्गिकरित्या माणुस जगत असताना जगण्याकरता ज्या ज्या परिस्थितीन्चे भान त्यास बाळगावयास लागते ते भान म्हणजे सामान्य ज्ञान! हे भोवतालच्या परिस्थितीप्रमाणे आणि जगण्याच्या गरजेप्रमाणे विभिन्न असु शकते  जसे की शेतकर्याच्या पोराला डुरक्या देत असलेला मारकुटा बैल त्याच्या देहबोलीवरुन ओळखता यायलाच हवा अन्यथा त्या बैलापासुन बेसावध राहील्याने त्यास इजाही होऊ शकते... तर शहरातील मुलास रस्ता क्रॉस करताना येणार्या वाहनाचा वेग, दिशा, आकार यावरुन त्यापासुन किती सावध रहात केव्हा रस्ता क्रॉस करायचा हेही कळलेच पाहीजे अन्यथा अनवस्था प्रसन्गाला त्याला तोन्ड द्यावे लागेल.   याचाच अर्थ असा होत नाही का की अनुभव, अनुभुती अन अनुकरणातुन जगण्याकरता आवश्यक बारीक सारीक तसेच महत्वाची कौशल्ये आत्मसात करणे म्हणजेच सामान्य ज्ञान मिळविणे?  तर बैलाची देहबोली ओळखता येणे ही जशी एक अत्यावश्यक बाब त्या त्या परिस्थितित आहे तर त्याचा नजिकच्या इतिहासात कोण काय कधि होते, त्याने काय काय केले या माहीतीस माहीत असण्याशी सामान्य ज्ञानाचा काय बरे सम्बन्ध?  तर अस हे बघा की खेडेगावातल्या पोट्ट्याला माहीत असावेच लागते की गेल्या साली वाघराने पलीकडल्या गावच्या शिवारातुन दोन जनावर ओढुन नेली, पल्ल्याडच्या गावचा पाटील लै चाबरा हे, शिवारातल्या वोढ्याला पूर येतो अन पाणी चिन्चच्या खोडाला वेढल की शेताडीत घुसत, अमक्या साली पूर आलेला, तमक्या साली गावचा तलाठी बदलुन नवा आलेला वगैरे वगैरे अफाट... जे कुठेही शाळेत शिकवले जाणार नाही!   अर्थात ज्याच्या त्याच्या आकलनाची अन जगण्याची जशी कुवत असेल त्याप्रमाणे तो भोवतालच्या परिस्थितीतुन सामान्य ज्ञान मिळवित जाणार!   अन काही पेठी पुणेरीन्ची कुवत फारचि दान्डगी असल्याने चाळीतल्या एक खोलीच्या सन्सारात बसुन बायकोसमोर चहाचे भुरके मारत मारत त्यान्च्या सामान्यज्ञानाच्या वैखरीची सीमारेषा देश काळ प्रान्त असले भे ओलान्डुन पार सातासमुद्रापलीकडे अमेरिका कशी चुकते यावर घसरणार!    तर आजचे आख्यान इथेच पुरे, मला थोड काम करुदे! 
 
  |  
 चल सण्टू, घे, ही पोस्ट टाकली, म्हन्जे आता हा बीबी पुढेचे दोन चार दिवस तरी बन्द पडणार नाही!   पुरेसा माल मसाला कोम्बलाय!   
 
  |  
Maudee
 
 |  |  
 |  | Tuesday, May 23, 2006 - 5:32 am:    |  
 
 
 |   
  |   
 ख़ूपच छान लिहिले आहे लिम्बूभाऊ  
 
  |  
 
 | 
| मायबोली | 
  |  
 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
  | 
 | 
 
 
 
 
 |