|
Ninavi
| |
| Thursday, May 18, 2006 - 2:23 pm: |
| 
|
मैत्रेयी, तुझ्या ८ : ५४ च्या पोस्टला माझं २०० % अनुमोदन. अमेय, नाही रे कविता सुचत. जामच राग आलाय.
|
Santu
| |
| Thursday, May 18, 2006 - 2:41 pm: |
| 
|
बी लिन्का नकोत नेट वरच वाचुन बुकणा पाड्लाय "पाटिल साहेब" म्हट्ल्यावर उगिचच नाकाखालि मिश्या आल्यागत वाटतय राव. लई झ्याक
|
Asami
| |
| Thursday, May 18, 2006 - 3:46 pm: |
| 
|
मग बाकीचे म्हणाले १ले आठवायला पाहिजेत त्यावर माझे म्हणने पडले फ़क्त १लेच का आठवावे? RE: मग राजा, आथव ना सगळे, पण सुरूवात तर कर पहिल्यापासून. MT च्या 8:54 च्या post नंतर BB बंद करून टाकायला हारकत नाही.
|
स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी उपयुक्त असलेलं कोणतही ज्ञान आवश्यक आहे असं म्हणता येइल का?
|
छे छे, मला नाही वाटत की बी च काहि चुकल हे! अहो ज्या देशात भर सन्सदेत राष्ट्रगीत चालू असताना बसुन रहायची परवानगी हे तिथ कसली डोम्बलाची गरज आली हे पहिल कोण नि दुसर कोण ते ठावुक करुन घ्यायची? आणि, होय, माझा जन्म जसा कोणत्या घरात कोणत्या जातीत काय लिन्गाने व्हावा हे जसे माझ्या हाती नव्हते तसेच याच देशात जन्म मिळावा हेही माझ्या हाती नव्हते! (या देशात जन्माला आलो ते पुर्वपुण्याइमुळ की पापान्मुळ तो वेगळा वादाचा मुद्दा हे) आता हा बी निदान आत्तातरी अठराशे सत्तावन्न वाचतो हे, ते ही इन्टरनेटवर... माह्या घरात सावरकरान्चे १८५७, मराठी अन इन्ग्रजी दोन्हीत उपलब्ध हे! तीनचार लायब्रर्यात मेम्बरशीप हे, घरात रोजच्या रोज वर्तमानपत्र येत! पण आमचा लिम्बोटल्या हे ना? एक अक्षर वाचित नाही! आता वाचनाची का सक्ती करता येते? आणि का म्हणुन त्यान वाचाव? ते वाचाव की परीक्षेच्या धेडगुजरी मार्कान्च्या शर्यतीकरता स्वतःला तयार कराव? आणि उद्या आमच्या लिम्बोटल्याला असाच प्रश्ण पडला अन त्याला या देशाचे पन्तप्रधान कोण ते नाही सान्गता आल तर त्यात त्याचा काय बरे दोष? दोष असेल तर तो व्यवस्थेचा हे! पुर्वी कस, शिनेमा सम्पल्यावर राष्ट्रगीत वाजवीत असत! नव नव स्वातन्त्र्य होत ना, तेवढच कौतुक, पण पुढे पुढे लोक थाम्बुन उभे न रहाता बाहेर जाण्याची गडबड करतात म्हणुन राष्ट्रगीताचा अपमान नको म्हणुन ते वाजवणच बन्द केल गेल. तोच प्रकार पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा! मला आठवतय, तेव्हा शाळाशाळान्च्या बाहेरुन त्या भरण्याच्या वेळेस गेल की एक सूर एक घोषात जन गण मन अन प्रतिज्ञा म्हणलेल रस्त्यावर देखिल ऐकू यायच! पण शिन्च्या कुणी त्या प्रतिज्ञेचा अर्थ अन उद्देश सान्गितल्याच आठवत नाही! येवुन जावुन पहिलीतल्या करमरकर नावाच्या नऊवारीतील बाईन्नी सान्गितल्याच पुसटस आठवत हे! पण ते तेव्हडच! पुढे काय? सुसन्स्कारान्च्या दृष्टीने सगळीकडे सगळा नन्नाचाच पाढा! अन मी तर म्हणतो की गरज काय ते माहीत असायची? शाळेत तीन चार वर्षे घालवुन शिकलेल्या बीजगणिताचा आज काय उपयोग होतो हे जगण्यात? की जगण्याच्या लढाईत भुगोल वापरता येतो हे? जेव्हा सगळे पुस्तकी शिक्षण हे केवळ अन केवळ कारकुन्डे तयार करुन अर्थार्जनासाठीच बनविले गेले तर मग कुणाला काही माहीत नसणे हा त्याचा अक्षम्य अपराध कसा काय होऊ शकतो? पुढे महाविद्यालयात जाणे म्हणजे शाळान्मधुन शिल्लक असलेली किमान शिस्त देखिल खुन्टीवर टान्गुन ठेवायची असाच ग्रह सर्वदूर पसरला हे तर मिसरुड सुद्धा न फुटलेल्या टीनएजर्सना मुद्दमहून सन्स्कार कोण अन कोणत्या कालीजात शिकवतात हे मला कोणी नाव पत्ते देऊन सान्गू शकेल काय? आज माझ्या हाताखाली यूपीच्या वाराणसीतली एम बी ए करणारी मुलगी होती... तिला साधी साधी बेरजेची गणित तोन्डी र्हाऊदेच, कॅलक्युलेटरनेही करता येत नव्हती! नसतील येत! पण म्हणुन मी तिची खिल्ली उडवावी का? की तिला तोन्डी हिशेब कसा करावा हे नीटपणे समजावुन सान्गावे? हे समजावुन सान्गायला कोणीच तयार नसेल, कोणीच उपलब्ध नसेल तर सन्स्कारहीन पिढीकरता ढाळले जाणारे अश्रू हे नक्राश्रूच नव्हेत का? मी उलट म्हणेन, की जर बी ला हे माहीत नसेल तर "माहित नसणे" हे सत्य स्विकारा! ते सत्य तसेच का हे हा कोळसा उगाळण्यापेक्षा त्या सत्याचे स्वरुप ज्ञानगन्गेच्या पाण्याने सुधरवा.... बी अन बी सारख्यान्ना शहाण करायच व्रत धरा! DDD
|
Moodi
| |
| Friday, May 19, 2006 - 10:22 am: |
| 
|
लिंब्या.. आनंदाचे डोही आनंद तरंग... 
|
Giriraj
| |
| Friday, May 19, 2006 - 10:31 am: |
| 
|
Well said लिम्बू! मी सुरवात करायला तयार आहे... मी त्या MBA पोरीला गणित शिकवायला तयार आहे! तू बी ला शिकवायचं मनावर घे.. मग आम्ही तुला पुन्हा इतिहास शिकवायलाही तयार आहोत!
|
>>>>>> मग आम्ही तुला पुन्हा इतिहास शिकवायलाही तयार आहोत!  >>>>>> मी त्या MBA पोरीला गणित शिकवायला तयार आहे! होक्काऽऽ? जा मग लायनीतून ये! DDD बायदीवे तो यस्जीरोडवरचा कोण रे तो... नाव आठवत नाही, तो काय शिकवित होता? DDd
|
Shonoo
| |
| Friday, May 19, 2006 - 12:41 pm: |
| 
|
लिम्बुटिम्बु तुमची पोस्ट आवडली, बरेच मुद्दे पटले, पण लिम्बोटल्या वाचत नाही अन त्याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही हे वाचून जरा वाइट वाटले. मी आता पर्यंत तुमचे जे काही लिखाण वाचले आहे त्या पार्श्वभूमीवर जरा जास्तच. असो. लिम्बोटल्याला जर खरोखर वाचनाची आवड नसेल तर त्या गोष्टीचा तुम्हालाही खेद असेलच, त्यात आणखीन सल्ले देउन मी भर घालत नाही
|
Dineshvs
| |
| Friday, May 19, 2006 - 4:42 pm: |
| 
|
लिंबु, पटलं सगळं. मी आधीहि लिहिले होते, कि माहीतीचा ईतका भडीमार होतोय कि काय लक्षात ठेवायचे तेच कळत नाही. ज्या गोष्टी आम्हाला महत्वाच्या वाटल्या, त्या आजकालच्या मुलाना वाटत नाहीत. पण आम्हाला माहित असल्यामुळे नेमका काय फायदा झाला, आणि त्याना नसल्यामुळे त्यांचे काय नुकसान झाले ते कळत नाही. हे वाक्य ऊलट सुलटहि करता येईल.
|
काय फ़रक पडतो नेहरु पंतप्रधान झाले काय किंवा नाही, काय फ़रक पडतो त्या १९४२ च्या चळवळीत किती लोकांनी बलिदान दिले काय फ़रक पडतो देश स्वतंत्र झाला काय आणि नाही काय, काय फ़रक पडतो त्यावेळी स्वत : च्या संसाराची राख रांगोळी करून लोकांनी आपल्या देशासाठी जीवन वेचले. आता आपल्याला काय फ़रक पडतो? मिळाले आहे ना स्वातंत्र्य? काय फ़रक पडतो मग आता ते सावरकर असोत नाहीतर सुभाशचंद्र बोस? पुढची पिढी सावरकर म्हंटल्यावरती कोण होते सावरकर? गायक की लेखक अशी उत्तर द्यायला लागल्यावर पण असेच वाटेल का काय फ़रक पडतो? तसा तर कशानेच फ़रक नाही पडत. कशाला वैदीक पद्धतीने लग्न होतात कशाला अजुनही एखाद्या घरात कुळाचार टिकवून ठेवण्याचा अट्टहास कशाला संस्कऊती भ्र्ष्ट होते आहे म्हणून निरर्थक वाद. ? करेनात का कोणीपण काहीपण काय फ़रक पडतो? उद्या विदेशी कोणीतरी सावरकरांवर movie काढेल आणि मग पुढच्या पिढीला समजेल सावरकर कोण ते. परवा एका movie मध्ये मी जनगण मन ऐकले मुठभर लोक ताडकन उठून उभे राहिले बाकीचे चुळबुळत होते नक्की काय करायचे आहे. atleast ते चुळबुळत तरी होते. आता तर सगळ्याच भावना मेल्या आहेत. माझ्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले, माझ्या स्वतंत्र देशाचे पहिले पंतप्रधान कोण? राज्यघटना कोणी लिहिली? खर तर हे प्रश्ण पडायलाच नको, मला ते माहितीच असायला हवे पण खरच काय फ़रक पडतो माहिती नसले तर? शिकूच की आपण कोणत्यातरी विदेशी Documentry मध्ये. काय फ़रक पडतो कसलाही? कशाला साजरे करायचे ते १५ aug २६ जान वगैरे सोडून द्या सगळे कोणाचे काय भले झाले आहे ते करून? असो, मला अगदी रहावले नाही. चालुद्यात तुमचे btw LT लिम्बोटल्या ला अभ्यासक्रमात नाही का हे सगळे, वेगळी लायब्ररीची काय गरज, मला आठवते त्याप्रमाणे, १८५७ पासून पहिले, दुसरे महायुद्ध, १९४२, १९४७ सगळे अभ्यासक्रमातच होते. त्यासाठी लायब्ररीची काय गरज?
|
मी हा BB वाचलेला नाहीये पण विषय पाहून माझं मत मांडतोय की प्रत्येकाला आपल्या आजूबाजूला घडणाय्रा गोष्टींचं,घटनांचं ज्ञान असणं आवश्यक आहे आजूबाजूच्या घटना म्हणजे त्या शेजारच्या जोश्यांची संगीता त्या कांबळ्याच्या दिप्याबरोबर पळून गेली हे नव्हे तर बाजारभाव काय चालू आहे कुठे काय घटना घडत आहेत राजकारण,खेळ,व्यवसाय जगत इत्यादी. त्यासाठी रोज वर्तमानपत्र वाचणे पुरेसे आणि आवश्यक आहे असे मला वटते. पण आजकाल कॉलेजमधले बहुतेक तरूण-तरूणी मिड-डे,मुंबई मिरर यांसारखे भरपूर गॉसिपिंग असलेले पेपर वाचण्यात धन्यता मानतात त्यामुळे त्यांना चित्रपट,स्पोर्ट्स या गोष्टींची माहिती जास्त असते बाकी नॉलेजच्याबाबतीत नुसता ठणठणाट.
|
Polis
| |
| Friday, May 19, 2006 - 7:39 pm: |
| 
|
लिम्ब्याभाऊ येकदम बरोबर लिवलत. आज्काल्च्या टाईमाला कुठला गान्धी अन कुठला नेहेरू कुठल्या पक्षात हाये त्ये माहित असन जास्त महत्वाच! तरी आपन हितल्या येकदम मॉडर्न अन उच्चशिक्षीत बयाना येक अतीसामान्य प्रश्न घालू : टाटू मधे वापरनारी शाई कशापासून बनवतात? 
|
Zakki
| |
| Friday, May 19, 2006 - 10:13 pm: |
| 
|
जोपर्यंत ज्ञान फक्त पैसे मिळवण्याचे साधन अशी व्याख्या असेल तर कुठले ज्ञान हवे नि कुठले नाही आले तरी चालेल, असा विचार केला जातो. पण शालेय शिक्षण म्हणजे ज्ञानाची आवड उत्पन्न करणे, त्याचा व्यवहारात कसा उपयोग करायचा याचे ज्ञान देणे असे असले तर आपसूकच आपणहून मुले म्हणतील, मला अमुक अमुक शिकायचे आहे. याबाबतीत एक तुलना. धार्मिक गोष्टी का करायच्या? देवाचे नाव का घ्यायचे? फसवा फसवी का करायची नाही, खोटे का बोलायचे नाही, याची समर्पक उत्तरे नाहीत. पण बरेच लोक म्हणतात आम्ही देवाचे नाव घेतले, सत्याने वागलो, तर आम्हाला शांति मिळते, आमचे काही वाईट होत नाही, आम्हाला नेहेमीच पुरेसे पैसे मिळतात, नि आमचे मन नेहेमी आनंदित रहाते. हे जर मनापासून अनुभवाने पटले, तर मग कारण मिमांसा करायची गरज रहात नाही. माझ्या माहितीत असे अनेक लोक आहेत, (माझ्यासकट), ज्यांना निरनिराळी माहिती मिळवण्याचा छंद आहे. निरनिराळ्या विषयावरील पुस्तके वाचतात, कधी atomic Energy कधी स्पेस, कधी business journal , कधी अर्थशास्त्र, इ. कधीतरी एकदम इच्छा होते, जरा उपनिषदाबद्दल वाचावे, मग ते पुस्तक मिळवून वाचल्या शिवाय चैन पडत नाही. अर्थात् बाकीचे लोक वेड्यात काढतात. तुला काय गरज आहे? तुला त्यातले काय समजणार आहे, इ. पण तो प्रश्नच मला पडत नाही, मनाचे समाधान होइस्तवर मी मिळेल ते वाचून काढतो. त्यातून मला काय आनंद मिळतो, ते मला एकट्यालाच कळते! मी पुण्यनगरीतल्या शाळेत शिकल्यामुळे माझे हे 'असे' झाले! तसे जर सगळ्यांचे झाले, तर सगळ्या विषयातले सगळे नाही आले तरी ज्याची गरज पडेल, जे महत्वाचे वाटेल त्याचे ज्ञान मिळवतील लोक!
|
शोनू, लिम्बोटला काय की लिम्बोण्या काय, कुणीच काहीच वाचायला मागत नाही आणि याचे मला अतिव दुःख होते! आम्ही आमच्या बापाचे अनुकरण केले! तो वर्तमान पत्र वाचायचा म्हणुन ते बघुन आम्ही पण वाचू लागलो, शाळकरी वयात राजकारणावर बापाशी बोलु लागलो, वाद घालु शकलो! बापाने लायब्ररीतून आणलेल यच्च्यावत प्रत्येक पुस्तक वाचल! वेळेला कोणी केव्हा वाचायच यावरुन भाण्डण केली! पण जे काही आम्ही केल ते अनुकरण होत! आणि आमचा बाप, त्याच अनुकरण करावस वाटाव असा होता... कारण त्यावेळेस टीव्ही सिनेमा अशा माध्यामातील हिरो आमच्या पुढे नव्हते! जसा काही होता, आमचा बापच आमचा हिरो होता! तो जे जे बरवाईट वागला, त्या प्रत्येक गोष्टीच आम्ही अनुकरण केल! शोणू खेद होतो हे तो या गोष्टीचा की आमच्या पोट्ट्यान्ना आम्ही अनुकरणालायक वाटतच नाही! या उप्पर काय बोलु? सगळ्या नविन पिढीची या ना त्या रुपाने हीच गत हे की काय कोण जाणे! तस असेल तर या देशाचे रक्षण देवच करु जाणे! रचना, शालेय इतिहासात, सर्वधर्मसमभाव किन्वा टोकाची धर्मनिरपेक्षता बाळगत जो काही तोडका मोडका इतिहास शिकवला जातो त्यातुन आक्कलेत काही भरीव सुधारणा होते यावर माझा विश्वास नाही! माझे कोणतेही मत शालेय अभ्यासक्रमात शिकविलेल्या गोष्टीन्मुळे बनलेले नाही, अपवाद जुन्या मराठी पुस्तकातील एक धडा! लिम्बोटल्याला पानिपत शिकायच असेल तर विश्वास पाटलान्चे पानिपत वाचलेच पाहीजे! शिवाजी समजुन घ्यायचा तर श्रीमान योगी आणि अन्य पुस्तके वाचलीत पाहीजे! पेशवे आणि पेशवाई समजायची तर त्यावरची पुस्तके वाचलीच पाहीजेत! नशिबाने साठ सत्तरच्या दशकात अनेक थोर लेखकान्नी मराठी माणसावर उपकार करुन असन्ख्य पुस्तके लिहून ठेवली हेत! त्यात काय नाही हे? परदेशी कादम्बर्यान्चे अनुवाद हेत, युद्ध कथा हेत, रहस्य कथा हेत, हेरगिरी हे, तुरुन्गवासाच्या गोष्ती हेत, सत्यकथा हेत, काय काय नाही ते विचारा फक्त! पण यातल एक अक्षरही लिम्बोटल्या वाचणार नसेल तर भाई आयुष्यात त्याचे जगणे हराऽऽम झालेले असेल असे माझे मत! जावुदे, या बीबी चा हा विषय नाही! बी ला काही येत नाही तसच लिम्बोटल्याला पण काही येत नाही, अन तस असेल तर ती त्यान्ची चूक नसुन आमची पिढी बदलत्या परिस्थितीत आमच्या पोरान्वर सन्स्कार करायला कमि पडली, किम्बहुना हरली असेच मला तरी म्हणाअवेसे वाटते! ही हार मानणे अपमानकारक असले तरी ती मानण्यावाचुन मला तरी तरणोपाय नाही! मी सिस्टिमचा उल्लेख केला हे! पण सर्व शैक्षणीक व्यवस्था सर्वधर्मसमभाव किन्वा धर्मनिरपेक्षता यान्च्या घोळात गेली पन्नास वर्षे अडकलेली असल्यावर याहून काही वेगळे निष्पन्न होइल असे वाटत नाही! ही पोस्ट या बीबीचा विषय होऊ शकते असे वाटत नाही, पण अगदीच रहावले नही म्हणुन लिहिले, अनुकरणाचा आणि व्यवस्थेचा मुद्दा महत्वाचे आहेत!
|
रचना, शालेय इतिहासात, सर्वधर्मसमभाव किन्वा टोकाची धर्मनिरपेक्षता बाळगत जो काही तोडका मोडका इतिहास शिकवला जातो त्यातुन आक्कलेत काही भरीव सुधारणा होते यावर माझा विश्वास नाही! >> LT atleast basic माहिती तर मिळते. हेही नसे थोडके
|
Santu
| |
| Sunday, May 21, 2006 - 12:13 pm: |
| 
|
रचना बाई तुमी इतक्या का कावलाय अवो काइ मानस अडानी असत्यात तवा संमबळुन घ्या या नगु व्हय
|
Santu
| |
| Sunday, May 21, 2006 - 12:20 pm: |
| 
|
आवो काय काय मानस अडानी असत्यात पन बगा वागाया संबर नमरी सोन पघा. आवो आपले अन्ना हजारे,सिधुताई सपकाळ परत जुन्या काळातले बाबु गेनु हे काय लई शिकलेले नव्ह्ते पन देशभक्ति ला काय कमी नव्हते
|
Moodi
| |
| Sunday, May 21, 2006 - 2:26 pm: |
| 
|
लिंबु तुझा लिंबोटल्या कधी केबीसी( कौन बनेगा करोडपती) पहात होता का रे? म्हणजे तुझ्याबरोबर तो ही उत्सुकतेने कधी बसला टिव्हीसमोर या कार्यक्रमाकरता? बाकी आजकाल मुले, मुली, आईवडील एकताबाईंची बाराखडी चवीने बघतात म्हणुन असे वाटते की ह्या केबिसीला पण आईवडिलांनी स्वता दाद दिली तर मुले पण आवडीने बघतील. सिद्धार्थ बसूसारख्या प्रभावशाली सुत्रधाराला नेमका अमिताभच का आठवावा या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनासाठी? जर जनसामान्यात लोकप्रियच असा माणुस निवडावा तर मग सिद्धार्थच्या डोळ्यासमोर शाहरुख सारखा नट किंवा अर्जुन रामपाल का नाही आला? अमिताभची घरची साहित्यीक पार्श्वभूमी, आत्मविश्वास, ६० च्या वयातही नवीन जाणुन घेण्याची उत्सुकता अन आणखीन बरेच गुण यामुळे अमिताभ हा कार्यक्रम हीट करु शकला. त्यानेही भरपुर माहिती मिळवली होतीच. अन केवळ त्याच्यामुळे Gk शी संबंध न ठेवु शकणारे सुद्धा पैसे, प्रसिद्धी या लोभाने का होईना पण हा कार्यक्रम बघु लागले. आज अशा कार्यक्रमाची अन अशा सुत्रधाराची नितांत गरज आहे. गरज ही शोधाची जननी आहे पण मला माझ्या विषयाशिवाय बाकीच्या गोष्टींची जरुरीच काय असे म्हटल्यावर जननी काय अन जन्मभूमी काय सगळेच मातीमोल. काय गरज होती मग राईट बंधुंना विमानाचा शोध लावण्याची? जेम्स वॅटला वाफेच्या इंजिनाचा शोध लावण्याची? असे अनेक प्रश्न आहेत रे. मला गरज नाही असे जेव्हा म्हटले जाते तेव्हाच माणुस समाजापासुन अलीप्त होतो. बंगाल अन बिहारमधुन बरेचसे लोक आज अन पूर्वीपासुन IAS परीक्षेत आघाडीवर आहेत, तेच मग मोठे आधिकारी बनुन सरकारमध्ये येतात. अन मग हेच लोक आपल्या राज्याचे कसे भले होईल अन आपल्या लोकांचे कसे भले होईल याचा विचार आधी करतात, अन आपला मराठी माणुस मग बसतो तु तु मै मै करीत.
|
>>>> मला गरज नाही असे जेव्हा म्हटले जाते तेव्हाच माणुस समाजापासुन अलीप्त होतो. अगो ते जीकेच राहुदे, दर विलेक्शनला अशी अलिप्त झालेली किमान ४० ते ६० टक्के लोक असतात... मतदान न करणारी... बी च्या जीके पेक्षा तो प्रश्ण अधिक महत्वाचा नाही का?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|