|
Moodi
| |
| Thursday, May 18, 2006 - 9:08 am: |
| 
|
बी ज्याच्याशी मैत्री करतात त्याला वारंवार समजावुन देखील सांगत असतात, त्या समजावण्याचे कारण हेच असते की पुढे जाऊन त्या व्यक्तीला चार चौघांसमोर नीट सांगता आले पाहिजे. देशाचा इतिहास असो वा प्रगती, ही माणसाला माहीत असण्यात काय गैर आहे? जर ते माहीत नसेल तर उद्या स्पर्धात्मक जगात तुम्ही काय पाय रोवणार स्वतचे? आज तुम्हाला देशाचा इतिहास आठवण्याची लाज वाटते, मग उद्या तुमच्या सग्यासोयर्यांना देखील विसरलात तर काय नवल त्यात? तुझी एक धारणा होवुन बसली आहे की जे कुणी तुला समजावयाला येते ते तुला खेडवळ समजुन शिकवत आहे, आधी तुझा हा गैरसमज दूर कर. आम्हाला कुणालाच काही जरूर नव्हती तुला पाककृतीपासुन अगदी सर्वत्र उत्तरे देण्याची. पण आम्ही ते करत आलो कारण तू पण एक मायबोलीकर. पण तुला ते कधीच समजले नाही, इथे ज्यानी तुला समजावण्याचा प्रयत्न केला त्यांना तु मुर्ख ठरवलेस, त्या अपमान करतात, शिष्ट आहेत अशी समजुत तुच करुन घेतलीस याला जबाबदार तुच आहेस. मी यापुढे काहीच बोलणार नाही. आता माझ्या नावाने किंवा अन्य कुणाच्या नावाने जे लिहायचे ते लिही. नेमस्तक हा वाद उडवु नका, कारण ज्यांना हा शिष्ट, चिडके म्हणत आहे त्यांना पण त्यांची बाजू मांडायचा अधिकार आहे.
|
अरे बास झाल आता.. शाण्ती, शांती.. मुडी, cool, cool पहावत नाहिये ग तुला इतक चिडलेल.. जाउ दे ना.. लोक बोलतच असतात. तु शांत रहा पाहु. actaully मला पण जे काही सांगायच होत ते तुझ्या, संपदा च्या आणी चारु च्या post मधुन लिहुन झाल आहे. म्हणुन परत काही repeat करत नाही उगिच वाद कशाला
|
>>>>> वर तुमचा ग्रुप. मी असे संधी साधून कुणाला घेरत नाही. डोम्बल तुझ, तू माझी शिकवणी लाव, मी काडीचीही सन्धी दृष्टीपथात नसतानाही, माझा कसलाही ग्रुप नसताना, वेळ मिळेल तसे एकेकाला किन्वा एकेका ग्रुपला घेरत असतो! DDD तेव्हा, लाइटली घे! बायदीवे, घेराव की अशाच नावाचा कोणता तरी समुद्री किल्ला हे ना? हा जीकेचा प्रश्ण बर का! एऽऽऽ लोकान्नो, मी बीच्या बाजुने बोलायला सुरु होऊ का? DDD
|
Giriraj
| |
| Thursday, May 18, 2006 - 9:53 am: |
| 
|
ज्यांनी हा BB वाचला असेल त्यांच्यासाठी एक GK/GI चा प्रश्न्: प्र : जर पेशव्याने 'विद्यान' असे लिहिले तर त्याचा अर्थ काय होऊ शकेल? पेशवे,दिवे! (जरा वातावरण हलके करायचा प्रयत्न!)
|
Moodi
| |
| Thursday, May 18, 2006 - 9:54 am: |
| 
|
झाले झाले शांत झाले ग माधुरी. दुर्दैव हेच आहे की ज्याला आतापर्यंत सगळे आपुलकीने रागवत आले, ज्याच्याबद्दल कुणी मनात द्वेष देखील ठेवला नाही तोच सगळ्यांना indirectly खलनायक, खलनायिका ठरवतोय. जसे सगळे यालाच टोचायला टपुन बसले होते. लिंब्या तुझे पिळुन सरबत करु का? 
|
जर पेशव्याने 'विद्यान' असे लिहिले तर त्याचा अर्थ काय होऊ शकेल? अर्थाऽऽत पेशव्याला पुण्यातल्या पेशवे उद्यानाची फार म्हन्जे फारच आठवण आली असणार! हो की नाही हो पेशवे? मुडी,... वाट बघ! DDD
|
Maudee
| |
| Thursday, May 18, 2006 - 10:34 am: |
| 
|
सरबत मला पण पाहीजे 
|
मूडी, मैत्रेयी नुसार, मी चुकले तरी ऐकत नाही, आपलेच लावतो, मी म्हणेल ती पूर्व दिशा अशी माझी वृत्ती आहे. हे असे मागेही घडल्याचे मूडीच्या स्मरणात आहे. मूडी, मैत्रेयी, ह्यानंतर तुम्ही मला उदाहरणासोबतच असे वाक्य लिहा>>>>>>>>>>>>>>बी, मी इथे तुला जे लिहिलय ते याच बीबी बद्दल आहे.त्यामुळे उदाहरण देण्याचा प्रश्न च नाही. 'नेहमी असे करतो' किन्वा तुझी वृत्ती वगैरे वर मी तरी अजिबात भाष्य केलेले नाहिये! त्यामुळे उगाच generalise न करशील तर बरं
|
Bee
| |
| Thursday, May 18, 2006 - 11:34 am: |
| 
|
बर गं मैत्रेयी.. thanks for your honest clarification!
|
clarification चा प्रश्न नाही बी, जे आहे ते तसेच आहे. आणि इथे You are missing the whole point!! कुणी एखादी माहिती तुला नाही म्हणून 'तोंड्सुख' वगैरे घेत नाहियेत, तर त्याची खन्त तर नाहीच वर त्याची गरज च कशी नाही असे जे भासवत आहेस त्यावर सर्वांनी आक्षेप घेतला आहे. मला माहित नाही, नव्हते (कारणे काहीही असोत)पण माहित करून घेईन अथवा घेतले पाहिजे इतके जरी म्हटले असते तरी प्रश्न नव्हता!
|
है शाब्बास मैत्रयी!! ... 
|
Bee
| |
| Thursday, May 18, 2006 - 12:27 pm: |
| 
|
पण मैत्रेयी, मला लगेच त्या प्रश्नाचे उत्तर माहिती पडले. In fact जेंव्हा मी मिलांदाची comment वाचली त्या क्षणीच माझे उत्तर कुठे चुकले हे मला कळले. मग माहिती करुन घेईन ह्याचा प्रश्न पुढे उद्बवलाच नाही. माझा मुद्दा हाच होता की नेहरूजी पंतप्रधान होते हे मला माहिती आहे फ़क्त क्रम त्यांच्या आठवत नाही. मग बाकीचे म्हणाले १ले आठवायला पाहिजेत त्यावर माझे म्हणने पडले फ़क्त १लेच का आठवावे? का इतर सामान्य ज्ञानात बसत नाहीत? आणि ह्या वादाला आणखी कारण म्हणजे सुरवातीच्या पोष्टमध्ये कुणाची समजूतदारीची भाषा नव्हती ते मला खटकले. वर वर पोष्टची संख्या वाढत गेली. ज्यांच्या माझा कधी काही संबंध नव्हता ते मला नको ते बोलुन गेले. एकीकडे मराठीचे मरण ह्या बीबीवरचा वाद. सांग पाहू एका व्यक्तीने कुणाकुणाला उत्तर द्यावे. त्यापैकी चुकार एक दोन वगळता सगळे डोकी उठवत होते. I hate this kind of attitude when u try to torture one person in big group! निदान जे मला ओळखतात त्यांच्याकडून तरी माझी अशी अपेक्षा नव्हती. चारू तर अतिच. जणू IAS pass होऊन आली आहे. आज चहाच्या वेळी माझ्या आजूबाजूला असलेल्या ५ जणांना मी आपले १ले पंतप्रधान कोण हे विचारले आणि to be honest सगळ्यांनी चुकीचे उत्तर दिले. म्हणजे सबंध भारतभर अशा लोकांची संख्या काही कमी नसेल ज्यांना ह्या प्रश्नाचे उत्तर आठवत नाही वा माहिती नाही. कुणाकुणाचे भारतीय नागरीकत्व तुम्ही काढून घ्याल? आणि जर घेतले तर त्यांना पाठवाल तरी कुठे?
|
'माझे या माहितीवाचून कुठे अडते किन्व ज्यांना ही माहिती आहे त्यांनी काय दिवे लावलेयत' हे मुद्दे लोकप्रिय पण निरर्थक आहेत. हल्ली ही एक अनिष्ट प्रथाच दिसली, नियम न पाळणारे हमखास हे argument करतात, 'गरज काय याची, त्याने काही अडतय का?' उदा. शुद्धलेखन, शुद्ध भाषा लिहायचा आग्रह धरला की हमखास उत्तर येणार, 'भावना पोहोचल्या ना? मग झाले! हे नियम बनवले कुणी, आणि आम्ही का पाळायचे?' तसे तर मग इतिहास भूगोल न शिकून कोणाचे काय अडते? पण मराठी माणसाला शिवरायांचे नावही माहित नसणे याची कल्पना करता येईल आपल्याला? भारतीयाला भगतसिंगसारख्या क्रान्तिकारकाची ओळख नसणे कसे वाटते कल्पना करायला? जगाची माहिती हवी कशाला, आपले घर ते ऑफ़िस बस झाला की एवढा 'भूगोल' तोच तर लागतो बाकीच्याने काय अडते? कशाला हव्या त्या बातम्या? वृत्तपत्रे, TV News वाचून काय अडते? तसे तर साहित्यावाचून काय अडते? का लिहितात आणि वाचतात लोक? कशाला हवे ते पुलं,वपु, कुसुमाग्रज,शान्ता शेळके, गौरी देशपंडे? अडत नाही ना काही त्यावाचून! आता हे 'अडणे' म्हणजे काय त्यावर अवलंबून आहे अडते का नाही हे! पण विचार करावा की भौतिक गरजा सोडून इतर सारे काही 'अडत नाही' या सदरात टाकले तर मग जनावरे आणि आपण यात फ़रक काय राहिला? असो फ़ार विषयान्तर झाले का?
|
मैत्रेयी तुला भरघोस पाठींबा.... निनावी ह्यावर एक काहीच्या काही कविता ही करेल "काय अडते ह्या वाचून आमुचे"
|
Santu
| |
| Thursday, May 18, 2006 - 1:18 pm: |
| 
|
च्या मारी इथ तर महभारत पेटलय बर चालु द्या मंडळी. छान
|
Bee
| |
| Thursday, May 18, 2006 - 1:19 pm: |
| 
|
तू आता खूप generalised statement करते आहेस. एकाच व्यक्तीला ह्यातील काहीच माहिती नसणे असू शकत नाही. कुठेतरी त्याला एखाद्या विषयात तरी गती असेल. म्हणून ज्या विषयातील त्याला माहिती नाही त्याबद्दल माझे त्यावाचून काय अडले असे उद्गार स्वाभिमानापोटी निघाले तर मनुष्य स्वभाव म्हणून त्याला सोडून दिलेले बरे. दुसरे दरवेळी का बिचार्या त्या प्राण्यांना कमी लेखायचे? त्यांच्याकडूनही सामान्य ज्ञान माहिती असण्याची अपेक्षा बाळगते आहेस का ?
|
बी एखाद्या विषयात गती नाही तर ठीक आहे सोडून देऊ पण स्वत ला गती नसेल तर 'त्या विषयाची गरज च नसते' हे statement करणार्याला सोडून दिले जात नाही आणि नाही, जनावरांकडून सामान्यज्ञानाची अपेक्षा मी बाळगत नाही
|
Bee
| |
| Thursday, May 18, 2006 - 1:30 pm: |
| 
|
मैत्रेयी, मी आत्ता सध्या सन १८५७ चा राष्ट्रीय उठाव वाचतो आहे.. तेंव्हा मला सोडून दे आणि हे वाचून झाल्यानंतर १ले, २रे महायुद्ध, स्वतन्त्र भारताची १ली पहाटही वाचणार आहे. बघ आहे की नाही गरज
|
Santu
| |
| Thursday, May 18, 2006 - 2:15 pm: |
| 
|
बी १८५७ च काय वाचताय नाहि माझ्या आवडिचा विषय म्हणुन विचारतोय. पारसनिस,सावरकर का इन्ग्लिश मधुन प्रतिभा रानडेच पण राणी लक्ष्मी बाई वर पण एक चांगल चरित्र आलय
|
Bee
| |
| Thursday, May 18, 2006 - 2:22 pm: |
| 
|
पाटिलसाहेब पुस्तक नाही हो.. नेटवरच आपले काम करत करत सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी १८५७ चा उठाव वाचत आहे. तुम्हाला लिंका हव्यात का BTW मला इथे एक विचारायचे होते, सामान्य ज्ञान बरोबर की सामान्यज्ञान असा अखंड शब्द बरोबर आहे?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|