|
Charu_ag
| |
| Wednesday, May 17, 2006 - 11:42 am: |
| 
|
बी, पुन्हा तेच. माझे या आधीचे पोस्ट नीट वाच. आणि त्यातुनही तुला काही समजले नाही तर माझा नाईलाज आहे. एकतर हे पान आर्च चे आहे, हे गोष्ट तरी तुला मान्य आहे का? दुसरं तुझ्याशी वाद घालणे ही माझ्यासाठी अशक्य कोटीतली गोष्ट आहे. नाही, तू पुरावे मागतोयस म्हणुन नव्हे तर नक्की कशावर वाद घालायचा?
|
Maitreyee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 11:47 am: |
| 
|
बी चूक करून त्यालाच बरोबर म्हणण्याचा तुझा दुराग्रह हेच कारण आहे तुझ्याशी वाद न घालण्याचे. एखादा माणूस 'मला तुमचे योग्य वाटत नाही माझेच बरोबर आहे' असे म्हणून गाडीच्या accelerator ला 'हा ब्रेक च आहे' असे म्हणत राहिला तर एकदा माणसे सांगाय्चा प्रयत्न करतील, दोनदा करतील पण नन्तर सोडून च देणार ना! म्हणतील बरं ब्रेक तर ब्रेक! किन्वा शेखचिल्ली म्हणाला की 'नाही माझेच बरोबर! झाडाच्या फ़ांदीवर बसूनच ती फ़ान्दी तोडायची असते' तर लोक किती काळ वाद घालतील? असो आता यावर काही बोलण्यात अर्थ आही हे च खरे
|
Bee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 11:48 am: |
| 
|
नाही तो लेख पुरेसा नाही, अर्चचे ते पोष्ट पुरेसे नाही. तुझ्याकडे जर मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर असते तर तू नक्कीच लिहिले असतेस. आणि ही एक healthy चर्चा चालली आहे, वाद नाही.
|
रचना म्हणते त्याप्रमाणे उद्याला जर एखादी सामान्य ज्ञानावर आधारीत स्पर्धा परिक्षा पास करणे निकडीचे असेल तर मीही मान मोडून अभ्यास करीन. मिळाले यश तर ठिक नाही तर माझी वाट बदलीन. >> बी मी उपरोधाने म्हंटले होते रे ते
|
Storvi
| |
| Wednesday, May 17, 2006 - 5:09 pm: |
| 
|
बी rethink your answers. अरे काय comparison करतोयस कशाशी करतोयस, तुला तरी कळतय का? हा प्रश्न सामन्य ज्ञानाचाही नाहिये. भारताचे पहिले पंतप्रधान, पहिले राष्ट्रपती माहित नसणे हे स्मरणशक्ती वर अवलंबून नाहीये, Priority वर अवलंबून आहे आणि म्हणुन इथल्या लोकांना त्याचा एवढा मनःस्ताप होतोय. खेद अश्यासाठी, की भारताने पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात पाऊल टाकले ते पहिले पाऊल कोणाबरोबर टाकले हे जर तुमच्या ध्यानीही नसेल तर तो विशय तुमच्या लेखी किती महत्वाचा आहे हे कळुन येतं. समृद्धी आणि ऐश्वर्य हे एकच आपल्या पिढीचे श्रद्धास्थान आहे असे आपले आई - वडील म्हणाले तर त्यांचं कुठे रे चुकलं? ज्या देशाने आपल्याला लहानाचं मोठं केलं त्याबद्दल एवढी जुजबी माहितीही करून घेण्याची आपली तयारी नसेल, तर भारतीय म्हणवून घेण्याचा काय अधिकार आहे? केवळ जन्म झाला म्हणून भारतीय? अरे असली माहिती आपल्याला नाही याचे सल मनाला टोचत कसे रे नाही?
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 16, 2006 - 1:08 am: |
| 
|
आर्च मला वाटतं आता GK आणि स्मार्टपणाचे निकष बदलले आहेत. आपल्यासाठी ज्या गोष्टी अस्मितेच्या होत्या, त्या त्याना महत्वाच्या वाटत नाहीत. आणि लेटेश्ट मोबाईलच्या मॉडेलबद्दल आपल्याला माहित नसते.
|
Chafa
| |
| Wednesday, May 17, 2006 - 5:21 pm: |
| 
|
हं, आणि एक मुद्दा राहतोय जो चारुने अगदी योग्य आणि स्पष्ट शब्दात मांडला आहे. तो म्हणजे की ठीक आहे एवढे घोर आणि अक्षम्य अज्ञान एखाद्याला असेलही पण परत फिरून त्याचे समर्थन करायचे आणि हे आवश्यक कसे नाही हे पटवून द्यायचा प्रयत्न करायचा? हे 'भारतासाठी' हास्यास्पद आणि अपमानास्पद नाही का? (या वाक्याचं पेटंट मी घ्यायला हरकत नसावी आता. )
|
Rar
| |
| Wednesday, May 17, 2006 - 6:06 pm: |
| 
|
निदान माझ्यासाठी तरी १. तुमच्या राष्ट्राला स्वातंत्र्य कधी मिळाले? २. राष्ट्राचे पहिले पंतप्रधान कोण? हे प्रश्णच मुळात 'general' knowledge' या category मधे येतच नाहीत. जितके तुमचे नाव, तुमचे आडनाव ही तुमची identity असते, तितकीच तुमची nationality ही सुद्धा! (मग भले तुम्ही कोणत्याची देशाचे नागरीक असा? by birth (जिथे तुम्हाला choice नसतो) किंवा by choice !) कितीही नाकारलत, किंवा रोजच्या जीवनात जाणवलं नाही तरी आपण कोणत्यातरी देशाचे नागरिक असतो, म्हणून अनेक गोष्टींच्या बाबतीत ' सुरक्षित ' असतो, आपल्याला एक ' पहचान ' असते. निदान या भावनेतून तरी वरच्या प्रष्णांची उत्तर माहीती असायला हवीत, आणि नसतील तर at some point ती माहीत करून घ्यायला हवीत. जे प्रश्ण मला आजपर्यंत कोणीही विचारले नाहीत, कदाचित पुढे कधीही विचारले जाणार नाहीत, ह्या प्रश्नांचा माझ्या कामाशी, माझ्या नोकरीशी काहीही संबंध नाही... पण तरीही 'ज्या काही प्रश्नांची उत्तर माहीत असंणं आवश्यक असतं' असे हे वरचे प्रश्ण आहेत असं मला वाटतं. भारताबद्दल बोलताना, १. भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? २. त्यातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात recently निर्माण झालेला कोणता? etc etc... 'general' knowledge ही concept ह्या प्रश्नांपासून चालू होईल, की ज्यांची उत्तरं माहीत असणंनसणं तुमच्या वाचनावर, आवडीवर आणि माहीत करून घेण्याच्या इच्छेवर अवलंबून आहे.
|
Peshawa
| |
| Wednesday, May 17, 2006 - 6:17 pm: |
| 
|
बी सामान्य द्यान म्हणजे माझ्या मते जे मिळवायला सामान्य माण्साला फ़ारसे कष्ट करावे लागत नाहित असे ते किंबहुना जे त्याला त्याच्या नकळत सतत मिळतच असते आजुबाजुच्या दैनंदीन गोष्टीतुन. त्यामुळे कशाला सामान्य म्हणायचे हे त्या मनुश्याच्या सभोवतालच्या परिस्थितिवर (आणि त्याच्या चौकसतेवर सुद्धा) अवलंबून असते. ह्या मधे अमुक एक गोष्ट जि सहज माहितिची असणे अपेक्षित असते अशि माहिति नाही असे म्हटल्यास ते म्हणणार्याला अद्यानी चुकलो अक्षम्य अद्द्यानी म्हणण्याची प्रथा आहे! आणि त्यामुळे तु महान अज्ञानी आहेस! बाकि अद्यानाचे समर्थन करायला देखिल भर्पुर ज्ञान लागते... तेव्हडे तुझ्या प्शी नक्किच आहे :-)
|
Rar
| |
| Wednesday, May 17, 2006 - 6:21 pm: |
| 
|
आता GK बद्दल बोलायचं झालं तर सिनेमा, sports , गाणी ह्याबद्दल माहीती असेल आणि नसलेली माहीती मिळवायची passion असेल तर त्यात वाईट काय आहे? ज्याला जे आवडतय, त्याबद्दल तो माहीती ठेवतो...इतक साधं नाहीये का हे? 'अगदी सलमान आणि संजय दत्तच्या फ़ालतू सिनेमातल्या फ़ालतू गाण्याची' माहीती मिळवणारे आमच्यासारखे लोक पण असतातच की! अशा लोकांचं knowledge कदाचित काही विधायक करणारं, काही विचारमंथंन घडवून आणणारं किंवा कोणत्या स्पर्धा जिंकून देणारं नसेलही कदाचित, पण शेवटी तेही एक प्रकारचं knowledge च आहे. फ़क्त ते कुठं आणि कसं वापरायचं / वापरायचं नाही हे प्रत्येकानं ठरवायला हवं!
|
Asami
| |
| Wednesday, May 17, 2006 - 6:24 pm: |
| 
|
नक्की general knowledge ची व्याप्ती काय धरावी एखाद्याच्या सामाजिक पातळी, शैक्षणीक पात्रता, आवडीनिवडी, नागरीकत्व, IQ अशा बर्याच वेगवेगळ्या घटकांवर ती बदलेल. ती एक व्यक्ती सापेक्ष गोष्ट आहे. इथे एक common मापदंड लावणे फारच कठीण आहे. e.g. 1. Who wrote first computer program ? २. बारा ज्योतीर्लिंगांची नावे सांगा. ३. शिवाजी महाराजांच्या (कुठल्याही) तीन बायकांची नावे सांगा ४. सुखकर्ता दुखःहर्ता कोणी लिहिली ? (ह्याचे उत्तर शांता शेळके नाही) ५. अंटार्टिकेचे क्षेत्रफळ काय आहे ? आपल्यापैकी किती जणांना ह्याची उत्तरे net शिवाय येतील ? पण तरीही काही गोष्टी ज्या अस्मितेचा नी अभिमानाच्या द्द्योतक धरल्या जातात त्या घटकनिरपेक्ष असाव्या का हा मूळ प्रश्न. माझ्या मते (किमान माझ्यासाठी तरी) त्याचे उत्तर होकारार्थीच असायला हवे. तुमचा देष कधी स्वतंत्र झाला नि देशाचे पहिले पंतप्रधान नी राष्ट्रपती कोण होते हे माहिती असणे हा त्याचाच भाग आहे. (मी पहिले अर्थमंत्री नी संपूर्ण cabinet लक्षात ठेवा असे म्हटलेले नाही)
|
Peshawa
| |
| Wednesday, May 17, 2006 - 6:53 pm: |
| 
|
GK हे चुकिच नाव आहे असे मला वाटते. खरेतर ते GI :General Information असे असायला हवे... बकि ज्ञान ह्या विशयावर चर्चेचा भला मोठ BB आहे तो सुद्यानि वाचावा!
|
Upas
| |
| Wednesday, May 17, 2006 - 7:13 pm: |
| 
|
अगदी बरोब्बर.. ज्ञान (knowledge) आणि माहिती (Information) ह्याची गल्लत घालतो आपण बरेचदा.. सामन्य ज्ञान हवेच, सामन्य माहिती साठी दर्शक (Pointers) म्हणजे विश्वकोश, search engines वापरले की झाले..
|
Moodi
| |
| Wednesday, May 17, 2006 - 9:16 pm: |
| 
|
सिनेमा, खेळ अशा अनेक आवडीच्या विषयाबद्दल भरपूर माहिती असायला काहीच हरकत नाही. कला कोणतीही असेल पण तिची आवड जर असेल तर निदान तिच्याविषयी माहिती तरी असावी. भारताची सद्य राजकीय परिस्थिती बघता बराचश्या प्रश्नांची उत्तरे सगळ्यांना जमतीलच असे नाही. पण जेव्हा सिनेमावर का प्रश्न विचारत नाही असे बी ने जेव्हा विचारले तेव्हा मी त्याला विचारले की सांग दिलीपकुमारची नसीमबानो कोण होती, तर हा म्हणतो एकुलती एक भार्या. आता सासुलाच बायको बनवली म्हटल्यावर काय कप्पाळ बोलणार? बर जर माहीत नसेल तर निदान नंतर कबुल करा की हो मला माहीत नव्हते. यात कसली लाज वाटावी? मग सायराबानो कोण? मुलगी? की सुन? वाईट वाटते ते याचे की तिथे ज्या बीबीवर हा वाद सुरु झाला तिथे अन्य सर्व मायबोलीकर मुली ज्या सुशिक्षीत, चांगल्या करीअरच्या आहेत त्यांना सुद्धा तुम्ही मला लिंक द्या, संदर्भ द्या, पुरावे द्या अन ढमुक द्या असे सांगीतल्यावर राग नाही येणार तर काय? खरा प्रॉब्लेम आहे तो attitude चा की चुक झाली ती मान्य न करता उलट दुसरी व्यक्ती कशी अज्ञानी आहे हे ठसवुन सांगण्याचा प्रयत्न केला जातो. अन हे इथे नाही तर अन्य बीबीवर सुद्धा पाहिलेय. आम्ही कुठे म्हणतो की अर्थखात्यापासुन सहकार चळवळीपर्यंत काय घडते त्याची इत्यंभूत माहिती ठेवा. पण अरे निदान ज्या व्यक्तीने आपली कारकीर्द स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणुन सुरु केली त्याचे नाव माहीत नसावे? उद्या तर मग आम्हाला काय घेणे भगतसिंग सावरकरांशी? आमच्या वेळी कुठे होते ते? असे प्रश्न विचारले तर मग मला काय बाकी कुणालाच आश्चर्य वाटणार नाही. कारण काल अन आजच कळले की झोपी गेलेल्याला जागा करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तीला कधीच जागे करता येत नाही.
|
Bee
| |
| Thursday, May 18, 2006 - 8:12 am: |
| 
|
भारताचे पहिले पंतप्रधान कोण, पहिले राष्ट्रपती कोण हे इतके माहिती झाले की तो सच्चा देशभक्त, तोच खरा भारतीय, त्यांच्याचमुळे भारताची अस्मिता टिकून आहे. बाकी ज्या भारतीयांना हे माहिती नाही त्यांची ओंजळीत पाणी घेऊन आत्महत्या करावी असे सुर इथे निनादत आहे. भारतीय राजकारणात खुर्ची मिळविणारे खरे भारतीय मानायला हवेत मग त्यांच्यामुळे देश बुडायला जरी निघाला तरी त्यांच्याकडून केली जाणारी किमान सामान्य ज्ञानाची अपेक्षा पुर्ण होते आहे ना मग आणखी काय हवे? इथे शेवटी सर्वांचे मत वाचून, Majority is the result नुसार, पहिले पंतप्रधाण कोण हे माहिती असायलाच पाहिजे हे सगळ्यांचे मत ठरले. आता मला ह्या प्रश्नाचे उत्तर ऐन वेळेवर आठवले नाही त्याकरिता इतरांनी जे काही तोंडसुख घेऊन आपली खरी आतली आतली ओळख करुन दिली ती माझ्या कायम लक्षात राहील. माझ्यावर केले गेलेले आरोप हे मी मुकाटपणे का ऐकुन घेऊ? १) चारू म्हणाली, माझ्यासारख्यांमुळे इतर देशातील लोकांनी भारतीयांचे सा. ज्ञा. खूप कच्चे असते असे म्हंटले आहे. आता चारू कितीही शिकली सवरलेली असेल, उत्तम नोकरी करत असेल, सुसंस्कृत असेल. तर मी तिला ती जे म्हणते आहे त्यात जर काही तथ्य असेल तर पुरावे दे ही विनंती करत आहे. ह्यात काही माझे चुकले आहे का? माझ्या ऐवजी इतर कुणीही असतं तर त्यानीही तिला हेच विचारल असतं. नंदीबैलाप्रमाणे मान डोलावून ती म्हणते ते खरच आहे असे करणार्यातला मी नव्हे. २)मूडी, मैत्रेयी नुसार, मी चुकले तरी ऐकत नाही, आपलेच लावतो, मी म्हणेल ती पूर्व दिशा अशी माझी वृत्ती आहे. हे असे मागेही घडल्याचे मूडीच्या स्मरणात आहे. मूडी, मैत्रेयी, ह्यानंतर तुम्ही मला उदाहरणासोबतच असे वाक्य लिहा. मी क्वचित वेळी V & C वर आलेलो आहे. इतर बीबींवर माझी तू तू मै मै कधी झालेली नाही. आणि इथे जर कुणाचे काही चुकलेच तर ती व्यक्ती कधी हात पाय जोडून शब्दात असे कधी लिहित नाही की बाई ग.. बाबा रे माझे चुकले तू मला क्षमा कर. मूडी, तू नसिमबानो दिलिप कुमारचा किस्सा फ़ारच छान रंगवून सांगितला. तोंडसुख दुसरे आणखी काय!!!!! ३) शिल्पाच्या मतानुसार, ज्या भारताने आम्हाला मोठे केले त्या भारताबद्दल इतकी जुजबी माहिती तरी असायला हवी नाहीतर केवळ भारतात जन्मलो म्हणून भारतीय म्हणून घेण्याचा मला काय अधिकार. ही जुजबी माहिती नाही म्हणून सल वाटायला हवा. - शिल्पा, ज्या भारताने आम्हाला लहानाचे मोठे केले त्या देशात आम्ही अनेक खस्ता खावून मोठे झालो, स्वप्रयत्नांनी शिकलो, अनेक प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करुन स्वताला सावरून घेतले. मग एक उत्तम नागरीक बनन्यास केले गेलेले आमचे प्रयत्नांना कवडीमोलाचे झाले का? तू मांडलेल्या विचारांमुळे सल निर्माण होतो आहे तू जुजबी माहिती नसल्याचा नसून तुम्ही देत आहात त्या शिक्षेचा. माझ्या मतानुसार, शिकलेले, पाठ केलेले सगळेच काही आपल्या लक्षात राहत नाही. ज्यांच्या लक्षात राहते ते अधिक हुषार, ज्ञानी असतील, पण ज्यांच्या नसेल ती गोष्ट लक्षात तर त्यांना तुम्ही असे धारेवर धरू शकत नाही की तुला भारताचे १ले पंतप्रधान माहिती नाही... चल तुला काहीच अधिकार नाही इथे राहण्याचा. इथला सुर हा असाच भडकलेला आणि violent आहे. इथे धीराने, नम्रतेने, मानपान राखून बोलणार्यांची उणिव आहे.
|
Rahul16
| |
| Thursday, May 18, 2006 - 8:36 am: |
| 
|
Moodi aani Rar ne baobar lihile aahe. mansala, aapan chukalo aahe he mahit asunhi manya na karane mhanaje tyala 'sensibility' aani 'attitude' chi khup garaj aahe. Bee, tula jar char sadhya gostihi mahit nasatil aani jar tula koni udya mhatale ki "are tula yewadhe pan mahit nahi?". tar tula changale watel ki kharab he tu tuze tharawayache aahe. yethil wad tya gostipeksha khup naganya aahe.
|
Moodi
| |
| Thursday, May 18, 2006 - 8:42 am: |
| 
|
बरोबर आहे बी तुझे. तू महान आहेस, आमचेच चुकले की तुझ्यासारख्या बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असा वाद घालणार्या माणसाला आम्ही असे फालतू, चुकीचे, निरर्थक प्रश्न विचारुन स्वतच्या पायावर धोंडा पाडुन घेतला. आम्हीच वेडे आहोत. यापुढे आम्ही तुला काही सांगणार नाही अन तू आम्हाला काही विचारु नकोस. तू तुझ्या मार्गाने जा आम्ही आमच्या. आमचे अंतःकरण दिसले ना तुला? बरे झाले. आम्ही धन्य झालो. आमचेच चुकले. तू मोठा रे बाबा. अन तुला उत्तर नाही आठवले त्याबद्दल कुणी काही म्हणत नाही पण नंतर उत्तर काय आहे ते कळल्यावरही तुला त्याची काहीच खेद खंत वाटली नाही याचे आश्चर्य आम्हाला वाटले. पण आम्हालाही समजायला हवे होते की आम्ही कुठल्या माणसाशी वाद घालत आहोत. नाही का?
|
Bee
| |
| Thursday, May 18, 2006 - 8:45 am: |
| 
|
राहुल, कोण कसे सांगत आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही जर त्या व्यक्तीचा अपमान करुन त्याला चुक दाखवत असाल तर तो नक्कीच अरेकारेवर येईल. इथे मला ज्या कुणी जणींनी सुरवातीला सांगितले की हे चुक आहे त्यांचा सुर मला खूप अपमानित आणि चिडका वाटला. मग त्या लोकांची शिष्ट वृत्ती खपली नाही. मूडी तुझ्याकडून खूपच समर्पक उत्तर मला मिळाले. तुला माझी खरी ओळख आता झाली. धन्यवाद ह्या पोष्टबद्दल!
|
Moodi
| |
| Thursday, May 18, 2006 - 8:47 am: |
| 
|
बी तोंडसुख म्हणजे काय याची तरी तुला जाणिव आहे का? आता तुला तेवढी देखील अक्कल देवाने दिली नाही त्याला काय करणार? इकडे लोकांना म्हणतो सिनेमाच्या स्पर्धेत तेच प्रश्न विचारा अन दुसरीकडे असा गोंधळ घालतोस मग काय करणार? तु दुसर्याना शिकवतोस ना स्पर्धा कुठल्या असाव्यात? मग दे की त्याचे तरी धड उत्तर? तेवढे पण तुला येत नाही.
|
Bee
| |
| Thursday, May 18, 2006 - 8:53 am: |
| 
|
मूडी, तू मला उद्देशून जे पोष्ट लिहिले, माझी इथे जी वाच्यता केलीस त्यालाच तोंडसुख म्हणायचे आहे मला. मी तुला एक चांगली मैत्रीण म्हणून समजलो होतो पण तू त्याला जागलि नाहीस. तुझे एक एक पोष्ट वाचून माझे अंतकरण आतून कळवळले. वर तुमचा ग्रुप. मी असे संधी साधून कुणाला घेरत नाही. पण काहीही असो कुणाचा स्वभाव ह्यातून प्रतित झाला हा माझ्यासाठी एक फ़ार मोठा लाभ आहे. माझ्या स्पष्टोक्तपणाचा मला नेहमीच असा फ़ायदा होतो.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|