|
Recently, I returned to USA from Mumbai. During the flight, along with all other passengers headed for USA, I was waiting for an hour or so in the waiting area at Frankfurt airport while the airplane was being refueled and cleaned there. I was idly standing in one place when a nice-looking Indian young man --probably around twenty-three years young-- came to me and softly said to me: "Excuse me; is Frankfurt a country?" Without showing my surprise at his question, I nicely explained to him that Frankfurt is a big city in Germany. Then he asked me, "Is Germany near England?" Without expressing in any way my even greater surprise at his second straightforward query, I again nicely told him in a couple of sentences about the location of Germany vis-a-vis England and a few other countries in Europe. During our further casual chat he told me that he works as a software engineer in Mumbai and that he was going to Los Angeles for a short training by his company. I do admire that young man for straightforwardly asking me the above two questions; for the only way to know anything which one does not know and is curious about is to ask or read about the matter. But a bothersome thought has arisen in my mind out of the above incidence: Did that young man just happen to be an EXTREME in the statistical population of young college graduates in India with reference to their general knowledge, or did he represent perhaps a small percentage of them? (The thought also occurred to me that a statistical study by some academician concerning general knowledge of young college graduates in India would be worthwhile for improving the situation by educationists if necessary.)
|
बा एकनाथा, त्वा हा अनुभव फ्रॅंकफर्ट च्या air port वर तरी घेतलास. मी असाच अनुभव गेली अनेक वर्षे शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यात घेतो आहे... मी जेव्हा जेव्हा सांगायचो की मी परभणी चा आहे तेव्हा इथली मंडळी "हे कोणते नवीनच गाव? कधी ऐकले नव्हते नाव..." असा प्रश्नार्थक चेहरा करून माझ्याकडे पाहायची... आणि असा अनुभव मी एकट्यानेच नाही तर माझ्या बरोबर मराठवाड्यातून जेवढी मुले पुण्यात आली आहेत त्यांना सर्वांना आला आहे... मी म्हणतो तुम्हाला महाराष्ट्रातले साधे जिल्हे ठाऊक नसावेत?... लाजिरवाणी गोष्ट आहे तुमच्या सारख्या लोकांसाठी... पुण्यातल्या लोकांना किमान सातारा सांगली इ. माहित आहेत पण मुंबईतल्या लोकांना तर तेही माहित नसते... या उलट परिस्थिती विदर्भ-मराठवाड्या कडची आहे... यवतमाळ, चंद्रपूरला जाऊन मी बीड, उस्मानाबादचा आहे असे सांगितले तर ते लोक मराठवाडा असे समजून घेतात. पण पुण्या-मुंबई कडे तर सगळा इतिहास भूगोल सांगावा लागतो... तो लक्षात आला तर ठीक नाहीतर "आलाय कुठूनतरी" (म्हणजे मागासलेल्या भागातून) अशी भावना असतेच... थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती सगळ्या भारत भर असावी... शहरी लोकांचे हे भौगोलिक ज्ञान अगाध आहे असेच म्हणावे लागते... मला वाटते आजकाल च्या मुलांचे general knowledge हे नट, नट्या, खेळाडू, राजकारणी इथपर्यंतच मर्यादित असते... भूकंप होण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या किती लोकांना लातूर / भूज माहित होते? मुलांचे GK वाढवण्याची गरज आहे असे मला ठामपणे वाटते....
|
Moodi
| |
| Friday, May 12, 2006 - 8:49 am: |
| 
|
महेश एकदम बरोबर. आजकाल मुलामुलींना नट नट्या अन त्यांच्या भानगडी विषयी विचारा एकदम पटापट माहिती देतील. पण बाकी काही भौगोलीक राजकीय विचारा की गप्प होतात. सध्या आश्विनी जोशी आज राज्यात चमकतेय upsc च्या परीक्षेत आल्याने, इतरही मुले आहेतच. पण अशी उदाहरणे कमी आहेत. गेल्यावेळेस महाराष्ट्रातुन साधारण ३० मुले तरी पास होत होती पण आता प्रमाण जरा घसरलेय. तरीही आणखीन आश्विनी अन सुदामा तयार होवोत ही सदिच्छा.
|
Charu_ag
| |
| Friday, May 12, 2006 - 9:36 am: |
| 
|
अज्ञान किंवा एखाद्या गोष्टी बद्दल माहित नसणे हा गुन्हा नाही, पण कधी काही जाणुन घेण्याचा प्रयत्नच न करणे हा मोठ्ठा गुन्हा आहे. मुडी, बरोबर आहे गं तुझ. आजकाल असली लफडी कुलगंडी जास्त चवीने चर्चिली जातात पण चांगल्या एखाद्या विषयावर चर्चा म्हणले की विषय तिथेच बंद होतो. आणि चर्चा करणार्याला 'काय बोअर मारतीयेस' असले शेरे ऐकावे लागतात. मनाची, बुद्धीची किवाड बंद करुन आपल्याच मर्यादीत विश्वाला सर्वस्व माणणारी माणसच आजकाल जास्त आहेत. अशी व्यक्ती जर भारतीय असेल तर जास्तच राग येतो. सगळे भारतीय असेच असतात हाच समज होतो इतरांचा. महेश, एकनाथ तुमची निरीक्षण बरोबर आहेत. मला पण असे अनुभव बरेच आले. शेवटी शेवटी तर मलाच मनस्ताप व्हायला लागला की का बोलतीय या व्यक्तीशी. पण आपण काहीच करू शकत नाही. BTW हा विषय जुनी पिढी, नवी पिढी, आजकालची पोर असाही नाही. हे सगळ व्यक्ती व्यक्ती वर अवलंबुन असत. आजच्याच पिढीचे भरपुर व्यासंग (मग तो इतिहास असो, अर्थशास्त्र असो वा विज्ञान असो) असणारे अनेक लोक पाहिले. मुळातच नवीन जाणुन घेण्याची आवड असावी लागते. ती नसणे हा एक मोठा दोष म्हणता येईल आपल्या शिक्षण पद्धतीचा. असो, पण तो एक स्वतन्त्र विषय आहे, तेंव्हा या विषयावर इथेच थांबते.
|
अज्ञान किंवा एखाद्या गोष्टी बद्दल माहित नसणे हा गुन्हा नाही, पण कधी काही जाणुन घेण्याचा प्रयत्नच न करणे हा मोठ्ठा गुन्हा आहे. >> चारू तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे पण अग जिल्हे गावे यांची माहिती या लोकांना ४ थी, ५ वी च्या भूगोलातच होते शिवाय त्यांची नावे सतत पेपरात येतच असतात की. थोडक्यात काय की अशा गोष्टी ज्यांची माहिती तुम्हाला विनासायास होत असताना त्या माहित नसणे म्हणजे काय म्हणावे याला..? मूडी म्हणतात तसे UPSC मध्ये मराठी मुले कमी आहेत त्याला इतर कारणे असली तरी हे एक कारण आहेच. कुसुमाग्रज कोण आहेत? त्यांचे खरे नाव काय? अलिकडेच कोणा मराठी कवीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? इ. प्रश्न विचारा आज कॉलेज मध्ये आणि पहा काय उत्तरे येतात... मध्यंतरी V चॅनेल ने रस्त्यावर, हॉटेल, मॉल्स मध्ये जाऊन एकच साधा प्रश्न विचारला होता - भारताचे अर्थमंत्री कोण? (तेव्हा नुकताच अर्थसंकल्प सादर झाला होता). तर यशवंत सिन्हा पासून ते मनमोहन सिंग इथपर्यंतची उत्तरे आपल्या " young generation " ने दिली होती... डोळे फिरवत विचार केल्यासारखे दाखवत शेवटी खांदे उडवून No Idea म्हणणारी ती मुले पाहिली की मनस्वी चीड येत होती... काय बोलणार?
|
Puru
| |
| Monday, May 15, 2006 - 2:42 pm: |
| 
|
मला पटतंय महेश! But such ignoramus V channel/Sophia/Xaviers 'आंग्लाळलेली' junta eventually & somehow manage to migrate to the US,thank to their rich uncles/in-laws! Good riddance!! On another note, मला एक आठवलं. मला US मधे असताना कोणी American ने विचारलं की माझं home-town कोणतं की मी सांगायचो मुंबई! कोण्या देसी ने विचारलं की सांगायचो, पुणे!! तो मराठी देसी असला की सांगायचो, सोलापुर!!! अगदी चांगला मित्र झाला तर सांगायचो, तुळजापुर!!!! Speak in listener's language
|
Dineshvs
| |
| Monday, May 15, 2006 - 4:48 pm: |
| 
|
आपली प्रसारमाध्यमे यात काहि करतच नाहीत. अगदी महाराष्ट्राचा नकाशा रोज दाखवला तरी हे माहित होवु शकते. पण नाही, संजय दत्त वा सलमान खानच्या फाल्तु सिनेमातले त्याहुन फालतु गाणेच दाखवले जाते. आमच्या कमर्शियल जीओग्राफीच्या प्राध्यापिका रोज जगाचा नकाशा आमच्या समोर ठेवत असत, त्यामुळे मला बहुतेक देश जगात कुठे आहेत, ते सांगता येते. ईतकेच कशाला, गाण्याचे अजिबात शिक्षण लाभले नसले तरी अनेक राग आणि त्यावर आधारित गाणी, मला केवळ विविध भारतीवरच्या संगीतसरितामुळे माहित झालेत.
|
Zakki
| |
| Monday, May 15, 2006 - 10:58 pm: |
| 
|
माझ्या माहितीचे असे थोडे लोक आहेत की ज्यांना कुठल्याहि गोष्टीची माहिती करून घेण्याची अजिबात इच्छा नसते. त्यांना मुळी प्रश्नच पडत नाही की हे काय आहे, कुठे आहे, इ. उदा. दररोज इराक चे नाव, नकाशा, टी. व्ही. वर, पेपरात, मासिकात बघून सुद्धा कित्येक अमेरिकनांना नकाशात इराक दाखवता येत नाही. vice president चे नाव देखील माहित नसते, मग निरनिराळ्या सेक्रेटरींची नावे तर दूरच. या उलट काही लोक मिळेल तेव्हढी माहिती आधासासारखी गोळा करत असतात. उदा. new orleans ला किती उंचीपर्यंत पाणी चढल्यावर लेव्ही फुटली, किती पंप होते, ते का चालले नाहीत, केंव्हा बंद पडले, किती लोक पहिल्या दिवशी बाहेर पडले, किती लोक डोममधे गेले, इ. व्यक्ति तितक्या प्रकृति!
|
Seema_
| |
| Tuesday, May 16, 2006 - 5:32 am: |
| 
|
dallas morning news मध्ये आलेला हा २ मे च्या article मधला हा काही भाग . link देता येत नाही आहे म्हणुन इथ टाकलाय . WASHINGTON – Nearly two-thirds of young adults cannot find Iraq on a map even after three years of war and more than 2,400 U.S. deaths. And after months of continuing news coverage of Gulf Coast hurricanes, one-third cannot locate Louisiana. Those were among the findings of a Roper poll released Tuesday by the National Geographic Society that detailed an alarming deficiency in geographic literacy. The survey of 510 participants, ages 18 to 24, show that young Americans cannot find many countries prominently featured in the news. And their knowledge gap goes beyond locating nations on a map. Many show little interest in critical geographic knowledge and relationships about global politics, economics and language. The results raised fresh questions about prospects for young Americans to prosper and be secure in a shrinking world, National Geographic officials said. And they underscored the challenges facing the U.S. if its citizens do not understand the forces shaping global activity, such as trade, natural disasters and armed conflict.
|
Charu_ag
| |
| Tuesday, May 16, 2006 - 10:53 am: |
| 
|
चला, आपल्या माहितीत भर पडेल अशी बरीच माहिती या शनिवारी मला मिळाली. सदर व्यक्ती भारतीय नाही. एक अभियंती आहे १) थायलंड ही इंडोनेशिया ची राजधानी आहे २) हिरोशीमा, नागासाकी आणि जपान ही शेजारी राष्ट्रे आहेत. ३) तालीबान अफगाणीस्तान च्या शेजारी आहे. आता बोला?
|
Moodi
| |
| Tuesday, May 16, 2006 - 11:05 am: |
| 
|
चारू हे असे असल्यावर काय व्हायचे ग? 
|
Santu
| |
| Tuesday, May 16, 2006 - 12:01 pm: |
| 
|
चारु अग? अज्ञाना तच खरे सुख असते. एकदा मस्त जंगलात जाउन रहा.जिथे टी.वी. पेपर नाहि. बघ कस शांत वाटते
|
Moodi
| |
| Tuesday, May 16, 2006 - 12:06 pm: |
| 
|
मायबोलीवर आल्यावर तसेच वाटते. ~DDD
|
Maudee
| |
| Tuesday, May 16, 2006 - 12:08 pm: |
| 
|
हे मात्र पटतय हं एखादे दिवस जर paper नाही न वाचला सकाळी की तो दिवस अगदी सुखात जातो..... असे वाटते की सगळे त्रास या जगातून हद्दपार झालेत....
|
Moodi
| |
| Tuesday, May 16, 2006 - 12:16 pm: |
| 
|
माऊडी मी त्या अर्थाने नाही म्हटले. काही मायबोलीकरांचे अगाध सामान्यज्ञान पाहुन स्वतचेच केस उपटावेसे वाटतात. अन त्यांना याबाबतीत काही बोलले की लगेच रडुन मोकळे. का कोण जाणे आजकाल स्वतच्याच देशाविषयी लोक उदासीन झालेत. 
|
या सगळ्याला कारण म्हणजे "मला काय त्याचे?" ही भावना... आणि आजच्या चंगळवादाने तर त्याला खतपाणीच घातले आहे... खाओ, पिओ ऐश करो, दुनिया की चिंता ना करो इ. विचार या अगाध ज्ञानामागे आहेत. माझे आजचे भागले उद्याची चिंता मी का करू? असेच विचार असतील तर कोण कशाला इराक नकाशावर शोधायला जाईल... चंगळीशी संबधित जिज्ञासाच सध्याच्या तरूण पिढीत आढळते... कुठल्या हॉटेलची काय खासियत आहे किंवा कुठल्या साईट वर नट्यांचे HOT फोटो असतात किंवा अमूक नटीचा current boyfriend कोण हे यांना विचारा, लगेच सांगतील... पण आपण ज्या शहरात रहातो त्याचे ऐतिहासिक महत्व सांगा म्हटलं तर किती लोकांना व्यवस्थितपणे सांगता येईल? जिज्ञासा वाढवण्याचा प्रयत्नच न करणे हे या सगळ्याचे मूळ कारण आहे असे मला वाटते...
|
Divya
| |
| Tuesday, May 16, 2006 - 2:58 pm: |
| 
|
मुडी केसबिस नको ग उपटु, इतके जण भेटतील की केस नाही रहायचे. मी असही उत्तर ऐकलय कॉलेजच्या एका मित्राला( north indian ) विचारले कृष्णाच्या बायका कोण तर म्हणे राधा आणि द्रौपदी. 
|
हा हा हा दिव्या सहीच ग पण मला अस वाटतय कि त्याने Spiritual Marriage वगैरे बाबतीत मुद्दा मांडला असावा तश्या त्या दोघीही कृष्णाच्या जिवलगच होत्या.. स्वयंवराच्या वेळी श्रीकृष्ण जागेवरून उठलाही होता मागणी घालायला द्रौपदीला पण अर्जुनाला बघून खाली बसला...
|
मित्रहो अनभिज्ञता सगळ्यांमधेच असते.. फ़क्त प्रमाण वेगवेग़ळे असते.. Search Engine चा वापर न करता ह्या प्रश्नाचे उत्तर, मला नाही वाटत फ़ारसे लोक देऊ शकतील.. बघा बर जमतय का... Australia ची राजधानी कोणती आणि सांगा बरे किती जणांच्या समोर मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन, पर्थ अशी नावे येतात... आणि तुम्ही तुमचेच ठरवा आपल्याला किती माहितीय ते जास्वन्द...
|
ह्यावरून एक मजा आठवली... आपण सगळेच जरा काही माहिती हवी असली की दुसर्या क्षणी " google.com" उघडतो... माझा एका मित्राचा ह्याला सक्त विरोध आहे. कुठलीही information (office सोडून) हवी असेल ज्ञान किंवा औत्सुक्यापोटी तर तो पुस्तकालयात जाऊन त्यावरची पुस्तकं शोधून काढतो आणि त्यातून माहिती काढतो... त्याला तर timesofindia hard paper वर हवा होता cincinnati मधे... पार chicago पासून मुंबई पर्यंत चौकशी करून झाली त्याची. सामान्यज्ञान किंवा current affairs च ज्ञान हवच पण ते मिळवताना google सारख्या easy availability ला सोडून त्या विषयावरच्या पुस्तकातून ते मिळवणे हा एक वेगळाच छंद आहे... google ची सवय असल्यानी हे थोडं अवघड जातं पण एकदा barnes & nobles, borders मधे गेलं की ते जास्त आनंददायी वाटतं आणि नुसती हवी ती माहीतीच नव्हे तर अनेक पुस्तकंही माहीती होतात.
|
Moodi
| |
| Tuesday, May 16, 2006 - 3:27 pm: |
| 
|
सर्च इंजीन नाही वापरले रे, कॅनबेरा का? दिव्या मी कसली केस उपटतीय या येड्यांपायी? नुसते म्हणायला काय जाते? जास्वंद अरे तुझे म्हणणे बरेचसे मान्य आहे रे पण बाकी सोड आपल्याच देशाचे पंतप्रधान कोण याची पण माहिती नसु नये? कायम घोळ पंतप्रधान राष्ट्रपतींच्या मध्ये.
|
जास्वंदा, देश आणि राजधान्यांबद्दल ची माहीती आम्ही ८वी, ९वी मधे NCC मधे असताना पार पाठ करून घेतलेली त्यामुळे ते जोड्या जुळवा सारखं australia म्हणलं की canbe.... येतच तोंडात आणखी एक interesting माहिती म्हणजे US मधल्या प्रत्येक राज्याचा emblem (जो कार च्या नंबर प्लेट वर असतो) चा इतिहास...जसा connecticut साठी constitution state किंवा Ohio चा birth place of aviation . बहुतेक bb तून विषयांतर झालय पण आठवलं ह्यावरून आत्ता.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 16, 2006 - 4:19 pm: |
| 
|
मूडी, नेहरु, ईंदिराजी वैगरे पंतप्रधान पदाची शान होती. त्यांचे अवगुण लक्षात घेतले तरी, त्यांचा करिष्मा औरच होता. पण याच पदावर जगजीवनराम, चरणसिंग आणि चंद्रशेखर पण होते, ते आता प्रयत्न केला तरच आठवावेल
|
Bee
| |
| Tuesday, May 16, 2006 - 3:52 am: |
| 
|
अर्च, नीटनेटक आणि छान लिहिलस पण मला ह्या स्फ़ुटचा शेवट पटला नाही. परदेशात येऊन नोकरी करणारे हे आपल्या कामात हुषार असतात, त्यांची परदेशात नोकरी मिळावी म्हणून एक धडपड, महत्त्वकांक्षा असते, त्यांनी चांगली पदवी संपादन केलेली असते. त्यांचे GK चांगले असेल अशी समजूत नसावी. शाळेत असताना हे सगळे शिकवले जाते आणि म्हणून मुलांना अशा प्रश्नांची उत्तरे त्वरीत देता येतात. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की aptitute test मधे freshers अधिक चांगले गुण मिळवतात आणि अनुभवी मुलेमुली सुत्र, रित विसरतात. तर हे सगळे तुमच्या स्मृतीवर अवलंबुन असते. काही प्रश्न आपण ऐकले असतात. त्यांची उत्तरे ऐन वेळेवर लगेच आठवत नाहीत. ती नंतर कधेतरी आठवतात पण एकदम आठवत नाहीत. तुला जी प्रश्न विचारावी लागली ती खरे तर ह्या असल्या कार्यममात समाविष्ट केलेली नसावीत. काय सबंध आहे अशा प्रशांचा त्या Mr and Mrs विषयी. बडबडी, गड सर करणे ही त्या सोळाव्या शतकाची गरज होती. आज काळ बदलला. आज गड सर करायचा helicopter आहेत. मग गड सर न करता लांबचा पल्ला गाठायचा म्हणजे USA ला जायचे बरे, पहिले पंतप्रधान डाॅक्टर राजेंद्र प्रसाद होते की लाल बहादूर शास्त्री होते ह्यात माझा नेहमी गोंधळ उडतो. पण लाल बहादूर शास्त्री होते हे नक्की
|
Bee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 5:49 am: |
| 
|
मूडी, अर्च, चारू मला उत्तर आले नाही ह्याचे फ़ार शल्य वाटले नाही. तुमचे पोष्ट वाचूनही फ़ार असे काही वाटले नाही. जिथे मी हुषार आहे, तिथे माझ्यापेक्षा अधिक हुषार असतील किंवा माझ्यापेक्षा ढही असतील. हे सारासार तुमच्या आमच्या सर्वांच्या बाबतीत लागू पडणारी गोष्ट आहे. ही चुक नाही की जी कबुल करावी लागते. आणखी १०० वर्षानंतर बरेच पंतप्रधान येतील जातिल, मग उद्याला जर कुणी विचारेल सांगा ३२ वा पंतप्रधान कोण आहे तर कुणाला जर ह्याचे उत्तर आले नाही तर ती बाब लाजिरवाणी होईल का? रचना म्हणते त्याप्रमाणे उद्याला जर एखादी सामान्य ज्ञानावर आधारीत स्पर्धा परिक्षा पास करणे निकडीचे असेल तर मीही मान मोडून अभ्यास करीन. मिळाले यश तर ठिक नाही तर माझी वाट बदलीन. ह्यावेळी मी खांदेशात चुलत भावासाठी स्थळ बघायला गेलो होतो. त्याच्याकडे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांचा ढीग लागला होता. तो बिचारा.. हो बिचाराच.. सहा वेळा MPSC परिक्षा उत्तीर्ण झाला पण मुलाखतीत नेहमी अनुत्तीर्ण होत आहे. अशा सामान्य ज्ञान अधिक असणार्यांना निराशेखेरीज काही मिळत आहे का? कधीतरी त्याला मिळेल यश जोवर तो प्रयत्न करीत आहे तोवर आशा बाळगायलाच हवी. तर सांगायचे तात्पर्य हे की ज्याचे ज्ञान खूप आहे तो नेहमीच सुखी, यशस्वी असतो असे नाही. आपले ज्ञान जे वेळेवर आपल्या कामी पडू शकते ते खरे मानावे. विद्यापिठातून अभियंता म्हणून पदवी घेणारा भले जेमतेम पास झाला असेल पण बाहेरच्या जगात तो आपले पाऊल कसे उचलतो, खस्ता खाऊन, चपला झिजवून, नाकारून किती उमेदीने परिस्थितीच्या पुढे जातो आणि नोकरी मिळवितो हे महत्त्वाचे आहे. असे कितिक विद्यार्थी मी बघितले आहेत ज्यांचा शेक्षणिक दर्जा खूप अफ़लातून असतो मात्र कुठेतरी ते कमी पडतात. तर प्रत्येकाला आपले न्यूनगंड ओळखायचे असतात आणि त्यात भर घालायची असते. मूडी, प्रश्नाचे उत्तर चुकले हे मलाही माहिती आहे. नेहरूजी पहिले पंतप्रधान नव्हते असे मी म्हणणार असे तुला वाटले का आणि पुढल्या वेळी कुणी हाच प्रश्न विचारला तर मी चुकीच उत्तर देईल का? बरे तुझ्या प्रश्नाचे उत्तर कुणाला आले नाही बघ.. कुठल्यातरी विषयात आपण नक्कीच कच्चे पडतो. हा cream of the crop चा वाद उगाच आहे. असे कुठे लिखित आहे का की अमेरिकेत नोकरी मिळालेले भारतीय सर्वगुणसपन्न, अकलेने खूप हुषार, इतर भारतीयांपेक्षा अधिक समर्थ असतात? देशात राबणार्यांमध्येही अगणित हुषार लोकं सापडतील. त्याची काही वाण नाही आणि त्यांच्यामधले कितीतरी जणांचे GK poor असेल. ह्या सगळ्यांचा तुम्ही राग करणार का? त्यांच्याविषयी कणव, खंत बाळगणार का?
|
मुळात ३२ वा आणि पहिला पंतप्रधान ह्या प्रश्नात खूप फ़रक आहे. पहिले पंतप्रधान कोण हे महित असायलाच हवे. त्याला कोणतीही पळवाट असूच शकत नाही. ३२ वा पंतप्रधान कोण हे तेव्हाच विचारले जाईल जेव्हा भारताला ते लाभतील. आणि असे अमूक नंबरचे पंतप्रधान हे केवळ स्पर्धा परिक्षांमध्येच विचारले जाते, तेव्हा त्या स्पर्धकाची तेव्हढी तयारी असणे अपेक्षितच आहे. नसली तर चूक त्याचीच आहे. इथेही पळवाट नाही. देशाबद्दल (साधी एव्हढी सुद्धा) माहिती नसताना केवळ माझा भारत अशा देशप्रेमाच्या गप्पा फ़ोल आहेत.
|
Bee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 10:39 am: |
| 
|
हे काही पटत नाही. १ ला पंतप्रधानच फ़क्त लक्षात ठेवावा इतर नाही हे काही पटत नाही. बाकी पंतप्रधानांनी तुमचे असे काय घोडे मारले हो ताई इथे... इथे तुमचा दांभिकपणा दिसून येतो पहा.. ( तुमचा म्हणजे तुझा नाही संपदा.. लक्षात घे ) हे विश्वची माझे घर.. भारत काय नि अमेरिका काय मज असे सर्व प्रिय अतिप्रिय
|
Maitreyee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 10:42 am: |
| 
|
बी मलाही हे तुझे पटत नाही. स्वतन्त्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण हे माहित नसणे?? याचा निश्चित खेद वाटायला हवा.त्याला तू वर दिलेले कोणतेही कारण / excuse अपवाद नाही
|
Milindaa
| |
| Tuesday, May 16, 2006 - 8:14 am: |
| 
|
Bee, it is time you improve your GK आर्च, भारताचा नेपोलीयन कोणाला म्हणायचे ते सांग पाहू..
|
Moodi
| |
| Tuesday, May 16, 2006 - 8:49 am: |
| 
|
आर्च छानच लिहीलस. कराडकर तुझे निरीक्षण एकदम अचुक आहे. तू हे पुण्याच्या अलीकडे बघितलस अन आम्ही हे नासिकसाईडला बघतोय. याचा एक वेगळा बीबी होऊ शकेल एवढे व्यापक स्वरुप आहे. असो. बी या अपेक्षेत काय चुक आहे की मुलांनी त्यांचे सर्वसामान्य ज्ञान वाढवुच नये? किंवा कुणी या मुलांना हे प्रश्न विचारुच नये? इथे आर्चच्या बीबीवर तो वाद नको. पण तुझीही बरीच वाक्ये मला खटकतात. अरे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहेरु होते. अन डॉ. राजेंद्रप्रसाद हे पहिले राष्ट्रपती. देवा माफ कर या बीला.
|
Bee
| |
| Tuesday, May 16, 2006 - 9:06 am: |
| 
|
मूडी, अर्चनी माफ़ केले म्हणजे झाले मूडी, मी शाळेतील मुलांबद्दल नाही म्हणत. त्यांना सामान्य ज्ञान देण्याची गरजच असते. मला हे म्हणायचे असते की अशा ह्या bollywood मधील स्पर्धांसाठी GK ची गरज काय? जर Bournvita Quiz Contest असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण अशा ह्या सारेगमपा, अंताक्षरी किन्वा Mr. & Mrs hunt मध्ये हे GK चे प्रश्न विचारले जाऊ नये असे मला वाटते.
|
Moodi
| |
| Tuesday, May 16, 2006 - 9:12 am: |
| 
|
ठीक आहे मग आपण नसीमबानो ही दिलीपकुमारची कोण होती असे प्रश्न ठेवुयात. 
|
Bee
| |
| Tuesday, May 16, 2006 - 9:20 am: |
| 
|
चालेल, मज्जा येईल असे प्रश्न ऐकायला अर्च सांग पाहू ह्या प्रश्नाचे उत्तर चीटींग न करता
|
Moodi
| |
| Tuesday, May 16, 2006 - 9:26 am: |
| 
|
आर्चला कशाला विचारतो तुच सांग की.
|
इथे US ची सीटीझनशीप मिळवायची असेल तर civics test द्यावी लागते. त्याचा सगळे मान मोडून अभ्यास करत असतील पण आपल्या देशाबद्दल काही माहिती नसते. ( मला खूप आहे अस मी म्हणत नाही. मला उटीच पुर्ण नाव माहित नव्हत. ) पण गंमत वाटली काही गोष्टी आपण किती for granted धरतो ना.. जस आपण by birth भारताचे नागरीक आहोत. मग who cares त्या देशात काय झाल आणि काय चालू आहे..
|
सगळे लक्षात ठेवायला जमणार असेल तर आनंदच आहे की. ठेवता येणार असतील तर ठेव ना लक्षात, माझ्या आहेत लक्षात सांगू का आत्ता?(हे माझा मोठेपणा म्हणून लिहिलेले नाही, दांभिकपणा ह्या शब्दाला उत्तर आहे. उगाच विषयाला फ़ाटे फ़ोडू नयेत.)
|
Charu_ag
| |
| Wednesday, May 17, 2006 - 11:05 am: |
| 
|
संपदा, आर्च, मैत्रेयी, मुडी अशा लोकाना काय बोलाव तेच कळत नाही. असल्या सबबी ऐकल्या तरी चीड येते. बी, तुझ्याकडुन नमते घेण्याची अपेक्षा कुणीच करत नाहीत. पण आपण जे काही लिहीतोय ते सारासार विवेक बुद्धी वापरुन लिहीतोय का हे तरी बघत जा जरा. तुला राग येईल पण स्पष्ट बोलते, तुझ्यासारख्या लोकांमुळेच परदेशात भारतीयांचे सामाज्ञ ज्ञानात नाव खराब होते आणि त्याच नजरेने इतरांकडे ही पाहिले जाते. . जर माहित नसेल आणि माहित करुन घेण्याची इच्छा नसेल तर गप्प बसावे पण माहित कसे नाही, आणि हेच कसे योग्य याचा राग आळवु नये. BTW आर्च, सॉरी गं. तुझ्या पानावर येऊन आम्ही वाद घालत बसलो. पण तुझ्या लेखा वरुन आठवल, माझ्या एका भारतीय मैत्रीणीला (?) तिच्या आजोबांचे (जे हयात होते) त्यांचे नाव माहित नव्हते. याला काय म्हणाव?
|
Bee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 11:07 am: |
| 
|
संपदा, मला तेच म्हणायचे आहे इथे की हा लक्षात ठेवण्याचा प्रश्न आहे. क्रम लक्षात ठेवणे सगळ्यांनाच जमते असे नाही. आता पहिला क्रमांक सहज लक्षात राहतो म्हणून बर्याच जणांना पहिले हे कोण... ते कोण हे लक्षात राहते. एखाद्याला जर पहिले हे होते की ते दुसरे होते हा गोंधळ होत असेल तर त्याचे सामान्य ज्ञान वाईट आहे असे म्हणने जरा चुकीचे वाटते.
|
Bee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 11:11 am: |
| 
|
चारू, मला तू काही पुरावे दाखव की भारतीयांचे सामान्य ज्ञान कमी आहे असे इतर जगाला वाटते. हे तू नुसते लिहू नकोस पण काही links असतील तर जरूर दे.. काही संदर्भ सांग तरच मला तुझे हे वाक्य पटेल.
|
Charu_ag
| |
| Wednesday, May 17, 2006 - 11:15 am: |
| 
|
बी, तुझ्या बरोबर वाद घालण्यात मला काडीचाही रस नाही. तुला लिंक कशाला हव्यात? ही चर्चा ज्यावरुन सुरु झाली तो लेख आणि तुझी पोस्ट एवढा पुरावा पुरेसा नाही का?
|
Bee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 11:33 am: |
| 
|
चारू, आता तू मागे का हटते आहेस. एकतर विधाने करायची आणि स्पष्टीकरण मागितले तर नाकारून मागे व्हायचे. मला वाद घालण्यात रस नाही, अर्च तुझे पान वाया घालवत आहे असे म्हंटले की मुळ मुद्दा बाजूला राहतो. खरच जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य असेल तर ते मनुष्यानी सिद्ध करून दाखवावे. तू माझ्यासारख्या लोकांमुळे असे होते तसे होते हे जेंव्हा म्हणते आहेस तेंव्हा नक्कीच मला हे खरे का हे जाणून घ्यावेसे वाटू नये का? आता तू जर पुरावे देऊ शकली नाहीस तर मी समजेल जे तू वर लिहिलेस ते व्यर्थ होते. बाकी ह्या पोष्टचा सुर कितीही कडवत असले तरी कृपा करून आपल्या मैत्रीत कटूता आणू नकोस. मी मनापासून तुझा नी सर्वांचा आदर करतो हे इथे मुद्दाम लिहावेसे वाटते.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|