|
Bee
| |
| Wednesday, February 15, 2006 - 5:39 am: |
| 
|
ज्ञानपीठ प्राप्त केलेल्या लेखकांपैकी काही लेखक मी वाचलेत. मग विचार केला, पुलंनी किती सरळ साध अतिशय निखलस आणि तर्हेतर्हेच लेखन केल. इतके विपुल लेखन करून असे कधी वाटले की त्यांनी साहित्य पाडले. त्यांचे कुठलेली पुस्तक उचलावे आणि न कंटाळता ते वाचत बसावे, इतके सकस लेखन त्यांनी केल. साहित्य अकादमीने पुलंना ज्ञानपीठ पुरस्कार द्यायला हवा होता खरच. इतके विपुल आणि सकस लेखन करणारा दुसरा एखादा लेखक मला माहिती नाही. ज्याची तुलना मी पुलंशी करू शकेन. पुलंसम फ़क्त पुलच!
|
Gurudasb
| |
| Wednesday, February 15, 2006 - 6:05 am: |
| 
|
बी , आपण व्यक्त केलेल्या भावना खरंच योग्य आहेत . पु . ल . ना जनमानसी अंत : करणात जो पुरस्कार मिळाला आहे तो कितीतरी अत्युच्च आहे. अतुलनीय आहे . टीकाकारानाही तो डावलता येणार नाही .
|
Awards he kahi lokpriyateche ani pratibheche dandmaap hou shakat nahi. Maza jase bhartiy chitrapatana changle ahet he sidhdha karnya sathi oscar chi garaj nahi he mat ahe tasech PL la kuthla tari award milaychi garaj nahi asehi ahe.
|
Ninavi
| |
| Wednesday, February 15, 2006 - 2:42 pm: |
| 
|
आपल्या आशाला अजून पद्मश्री सुद्धा मिळालेलं नाही हे माहीत आहे ना तुम्हाला?
|
Milindaa
| |
| Wednesday, February 15, 2006 - 3:54 pm: |
| 
|
आता पुलंना ज्ञानपीठ मिळणे याच्याशी आशाचा काय संबंध ?
|
Ekanath
| |
| Wednesday, February 15, 2006 - 4:21 pm: |
| 
|
माफ करा मिलिंदराव, माझ्यामते निनावी यांचे म्हणणे असे की, इतक्या मोठ्या व्यक्ती पण त्यांना पुरस्कार मिळत नाही, ह्यात आश्चर्याचीच बाब आहे. माझ्यामते निनावी यांनी कोणताही " विषयबदल " केलेला नाही, तर विषयाची व्याप्ती वाढवली आहे. विषयाची व्याप्ती वाढवणे म्हणजे मोडता घालणे असे होते नाही. जसे पुलंना ज्ञानपीठ न मिळाल्याचे दुःख आहे, तसेच आशाताईंना एकही मोठा सन्मान न मिळाल्याचे दुःख आहेच की! असो. माझ्या वरच्या लिखाणात कुणावरचाही वैयक्तिक चिखलफेक नाही आणि कशातही मोडता घालण्याचा हेतू नाही. शुभरात्री.
|
Hawa_hawai
| |
| Wednesday, February 15, 2006 - 4:57 pm: |
| 
|
पु.लं ना ज्ञानपीठ मिळेल अशी मला आशा आहे पहा आहे ना संबंधं? ;-)
|
Milindaa
| |
| Wednesday, February 15, 2006 - 5:02 pm: |
| 
|
एकनाथजी, तुम्ही प्रत्येक बीबी ची व्याप्ती वाढवण्याचा का प्रयत्न करता आहात ? या बीबी चे शीर्षक " मराठी माणसे, त्यांना न मिळालेले पुरस्कार आणि त्यामुळे आपल्या मनाला होणारे दुःख " असे आहे का ? मी आपल्याला विनंती करेन की कृपया विषयाला संबंधित लिखाण करा. आपल्याला जे काही व्यापक स्वरुपाचे लिखाण करायचे आहे त्यासाठी नवीन व्यापक बीबी उघडा. व्यापक बीबी मध्ये हे सर्व लिहीता येतं पण याच्या उलटे करता येत नाही हो..
|
Milindaa
| |
| Wednesday, February 15, 2006 - 5:31 pm: |
| 
|
अगदी कणेकरांच्या भाषेत म्हणायचं झालं तर काही काही गोष्टी हिंदीतच बोलाव्या लागतात, जसं की.. " आप ये हर बीबी का स्कोप बढाने पे क्यों तुले हो ?"
|
Ekanath
| |
| Wednesday, February 15, 2006 - 5:52 pm: |
| 
|
क्योंकी मेरी मत के अनुसार हर विषय को बाईस्कोप लगाके देखना जरूरी है. हलकेच घ्यावे.
|
Champak
| |
| Wednesday, February 15, 2006 - 7:01 pm: |
| 
|
ye,tumhi doghe, vishayala dharun bola re 
|
Maanus
| |
| Wednesday, February 15, 2006 - 7:38 pm: |
| 
|
का माहीत पन ह्या BB चे शिर्षक वाचुन मला पु.लं. चे एक वाक्या आठवले, पुणेकर, मुंबईकर का नागपुरकर मधले ------ म्हनजे आपन कोन आहोत, आपला शेक्षणिक दर्जा काय याचा कोणताही विचार न करता आपले मत टोकुन द्यायचे. विषय कूठलाहि असो, म्हनजे आता आमेरीकेची आर्थिक घडी निट बसवन्याचा खरा मार्ग कोणता या विषयावरती आपण स्व:ता पुणे महानगर पालीकेत ऊदिर मारायच्या विभागात आहोत नोकरीला हे विसरुन मत ठनकवता आले पाहिजे... आमेरीकेची आर्थिक आघाडी.. ठोका
|
Yog
| |
| Thursday, February 16, 2006 - 12:01 am: |
| 
|
खी खी खी.. शेवटी पु.ल. च्(महान आहेत्) ते
|
मिलिन्द, केवळ पुलच नाहीत तर दिल्लीहुन दिल्या जाणार्या कोणत्याही पुरस्कारात मराठी माणसाला डावललेच जाते! पुल हे देखिल त्याचे एक मोठ्ठे उदाहरण हे!! आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातील तमाम राजकारणी दिल्लीश्वरान्चे पाय चाटण्याखेरीज दुसरे काही करत नाहीत! अन शेवटी मराठी अन महाराष्ट्राचा स्वाभिमान सामान्यजनान्नीच वहायचा हे! मिलिन्दा, मुळात बीबीचा विषय इतका रोखठोक हे की विषयानुरूप फक्त हो किन्वा नाही किन्वा माहीत नाही असेच उत्तर मिळणे अपेक्षित हे का? तुला दिवे देत नाही, ज्जाऽऽ! DDD
|
Aschig
| |
| Thursday, February 16, 2006 - 5:53 am: |
| 
|
लींबु, या वेळी एका मराठी व्यक्तीलाच ज्ञानपीठ दीले गेले असतांना तुमचे वाक्य थोडे खटकते. आत्ता पावेतो तीन मरठि लेखकांना ज्ञानपीथ मिळाले आहे. त्या सगळ्यांचि नावे वी पासुन सुरु होतात. ते कारण अर्थातच नसावे. कोणी जर पुर्ण यादी इथे टाकली तर कशा प्रकारचे नीकष लावल्या जातात ते एखदवेळेस कळु शकेल.
|
पु.ल. नी,जरी विवीध तर्हेचे लेखन केले असले,तरी त्याना सर्वात जास्त प्रसिध्धी मीळाली ती त्यांच्या विनोदी लेखनामुळे... आणी केवळ ज्ञानपीठच न्हवे तर जगातील सर्व पुरस्काराच्या बाबतीत,विनोदी लेखकाना नेहमीच डावलले गेले आहे. (काही अपवाद असतीलही).. लिंबुभाउ या बाबतीत तुमचे मत नाही पटले.. मराठीला ३ पुरस्कार मिळाले आहेत, इतर बाबतीत जरी मराठीची गळचेपी झाली असली तरी या बाबतीत तरी मराठीवर अन्याय झालेला नाही.
|
आशिष आणि रामचन्द्र, अपवादानेच नियम (?) सिद्ध होतो ना? विनोदी लेखकाला डावलल जात हे पटले! ज्ञानपीठ बद्दल अधिक महिती मिळाली तर बरे होईल, शोधतो हे
|
Ekanath
| |
| Thursday, February 16, 2006 - 9:13 am: |
| 
|
या महिन्याच्या अंतर्नादमधे विंदांवरील लेखात ज्ञानपीठाची निवड कशी केली जाते याचा थोडा आढावा घेतला आहे. समितीच्या सदस्यांना आपली बाजू मांडण्यास मुभा असते. आपला साहित्यिकच कसा पात्र आहे यची जाणीव इतर सदस्यांना करून द्यायची असते. ज्याच्या बाजुने मत झुकेल त्याला पुरस्कार दिला जातो. आत्ता पर्यंत मराठी सदस्यांनी हे काम हिरिरीने केले नाही. ( याची कारण काहीही असू शकते ) म्हणून मराठीला ज्ञानपीठ कमी मिळाले. फक्त पुलच नाअहीत, तर माराठीतले अनेक साहित्यिक ज्ञानपीठाच्या लायक होते. असे अंतर्नादही म्हणतो. यावेळचे वैशिष्ठ्य असे की निवडसमितीवर एकही मराठी सदस्य नसूनही मराठीला ज्ञानपीठ मिळाले!
|
Bee
| |
| Thursday, February 16, 2006 - 10:15 am: |
| 
|
दुर्गा भागवतांना ज्ञानपीठ मिळाला होता पण त्यांनी तो नाकारला. G. A. Kulkarni ह्यांना देखील ज्ञानपीठ मिळायची आशा होती पण अजून मिळालेला नाही. मला स्वतःला वि. स. खांडेकरांचे ययाती सोडून इतर कुठलेच पुस्तक फ़ारसे आवडले नाही. ययातीवर समीक्षकांचे लेख वाचले तेंव्हा अजूनच... खरच खांडेकरांना ज्ञानपीठ द्यायला हवा होता का हा आणखी एक V & C होऊ शकेल. मला वाटत एखाद्या लेखकाला ज्ञानपीठ देताना त्याच्या एखाद दोन पुस्तकांचा विचार केला जात नसावा तर त्या लेखकाचे संपूर्ण लेखन विचारात घेतले जात असावे. लिखान किती जिवंत आहे, त्यात किती तथ्य आहे, पुस्तकातील संदर्भ अशा बर्यासच्या गोष्टींचा विचार होत असेल. मराठी भाषेत खांडेकरांव्यतीरिक्त कुसुमाग्रज आणि विंदा ह्या दोन कवींना ज्ञानपीठ मिळाला आहे आणि पुलंचे लिखान गद्य त्यामुळे अशी तुलना देखील करता येत नाही, करूही नये. पण खांडेकरांपेक्षा पुल केंव्हाही सरस आहेत ह्यावर कुणाला आक्षेप नसावा. कदाचित तो काळ खूप जुना होता, साहित्यात फ़ारशी विविधता नव्हती, लेखन करणारेही कमी होते म्हणून कदाचित खांडेकरांना हा पुरस्कार देणे अपरिहार्य ठरले असावे. कुणाला जर ज्ञानपीठाचे निकष कसे लावतात हे माहिती असेल तर अवश्य लिहा. चुक भुक द्यावी घ्यावी.
|
Ninavi
| |
| Thursday, February 16, 2006 - 2:40 pm: |
| 
|
बी, चूक भूक ( ?) द्यावी घ्यावी???????????? 
|
लिंबू... >> आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातील तमाम राजकारणी दिल्लीश्वरान्चे पाय चाटण्याखेरीज दुसरे काही करत नाहीत >>> आपल्याच माणसांचे पाय ओढायचे पण काम करतात की..
|
द्यानपीठ हा पुस्तकासाठी मिळतो का लेखकासाठी?
|
|
Bee
| |
| Tuesday, February 21, 2006 - 4:29 am: |
| 
|
संदीप, द्यानपीठ नावाचा कुठलाच पुरस्कार नाही हो. तुम्हाला ज्ञानपीठ म्हणायचे का? तर ज्ञानपीठ हा पुरस्कार पुस्तकाला दिल्या जाऊ शकतो जसे खांडेकरांच्या ययाती ह्या कादंबरीला आणि विंदा करंदीकरांच्या अष्टदर्शन ह्या काव्यसंग्रहाला देण्यात आला. ह्या खेरीज लेखकाची संपूर्ण लेखन कारकीर्द लक्षात घेऊन, त्यांच्या साहित्याचा दर्जा काय हे ओळखून ज्ञानपीठ पुरस्कार दिल्या जाऊ शकतो. जसे कविवर्य कुसुमाग्रजांना त्यांचे संपूर्ण साहित्य लक्षात घेऊन साहित्य अकादमीने त्यांना हा पुरस्कार दिला. चुक भुल देणे घेणे दुरुस्त करणे!
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, February 22, 2006 - 10:18 am: |
| 
|
पुलंना हा पुरस्कार केव्हाच मिळायला हवा होता. त्यान्च्या सारखा अष्टपैलू लेखक या देशाने अजून पाहिलेला नाही. पुरस्कार देणार्याना आतातरी सुबुद्धी होवो ही देवाकडे प्रार्थना.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|