Supermom
| |
| Wednesday, January 18, 2006 - 9:55 pm: |
| 
|
मधे मी कोणाशीतरी बोलताना मुलगी झाली तर मी तुझे नाव ठेवीन असा कुलस्वामिनीला नवस केला होता असे सांगितले. यावर मुलीसाठी नवस केला होता? असे अत्यन्त आश्चर्याने विचारले गेले. शिकल्या सवरलेल्या व्यक्तींकडून असा प्रश्न मी दोन तीन वेळा ऐकला आहे. अशा वेळी भयंकर राग येतो. असे कोणाहीकडून ऐकले की झणझणीत उत्तर द्यावेसे वाटते. आपल्या शिक्षणाने विचारात काहीच बदल होत नाही का?यापेक्षा माझी अशिक्षित आजी पुढारलेली होती.
|
Zelam
| |
| Wednesday, January 18, 2006 - 10:08 pm: |
| 
|
सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असतेच असे नाही सुपरमॉम
|
Storvi
| |
| Wednesday, January 18, 2006 - 10:30 pm: |
| 
|
नुसत्या शिक्षणाने काहीच फ़रक पडत नाही . Education is like a huge datamart, that is of no use unless there are good scoring/analysis tools for it
|
Supermom
| |
| Wednesday, January 18, 2006 - 11:03 pm: |
| 
|
अगदी खरे आहे स्टो, झेलम. पण अशा लोकांशी मनात असूनही कडकडून भांडता येत नाही हा आपल्या सुसंस्कृत पणाचा तोटाच वाटतो कधीकधी. स्वत माझ्या आईने सगळ्या मुलीच झाल्या म्हणून खूप खूप ऐकले आहे. इथे मला नुसते शिक्षणाबद्दलच नाही तर अजूनही मुलगी झाली की वाईट वाटण्याच्या प्रवृत्तीवरही खूप खूप आक्षेप आहे.
|
Sayonara
| |
| Thursday, January 19, 2006 - 2:21 am: |
| 
|
AgadI KrM. malaahI saMtap yaotÜ laÜkaMcaa jao maulaIMnaI AsaM kravaM ikMvaa tsaM kravaM mhNatat. maaJaI [qalaI ek maO~INa tr savaa-MsamaÜr maÜz\yaa fuXaarkInao mhNato kI barMya malaa maulagaa Aaho to.
]Va %yaanao baahor kahI idvao jarI laavalao trI Aamhalaa inastrayalaa laagaNaar naahIt. Aata kaya mhNaayacaM
(a ivacaar krNyaalaaÆbauwIcaI kIva krayacaI dusarM kaya²²²²
|
Champak
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:22 am: |
| 
|
सायो, dev2 वापर! माझ्या मोठ्या भावाला दोन मुले च झाली, तर आई ने मुलगी हवीच म्हणुन हट्ट केला, अन तिसर्या वेळी मुलगी च झाली छ्कुली! माझी आई शैक्षणिक दृष्ट्या अडाणी हे! घरात मुलगी नसेल त लक्ष्मी टिकत नाही असे तिचे मत हे, अन मला वाट ते कि ते खरे हे.
|
Supermom
| |
| Thursday, January 19, 2006 - 12:27 pm: |
| 
|
अगदी बरोबर आहे चम्पक. माझ्या सासरी पण मुलीचे फ़ार कौतुक आहे. पण काही लोक इतके जुनाट भेटतात कधीकधी. बरेचदा हे पण लोक ऐकवतात त्याच शिक्षण,तिच लग्न याची आता तुम्हाला जबाबदारी आहे. शेवटी मी एकदा बोलून टाकल की तिच शिक्षणही तितकच महत्वाच आहे.मुलगी म्हणून तिला कुठलीही सन्धी आम्ही नाकारणार नाही.
|
Zelam
| |
| Thursday, January 19, 2006 - 1:01 pm: |
| 
|
सुपरमॉम हे वाच. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1366307.cms आणि या प्रकारात सुशिक्षित आघाडीवर आहेत. केवळ लज्जास्पद.
|
Shyamli
| |
| Thursday, January 19, 2006 - 1:17 pm: |
| 
|
खरय असा निसर्गाचा समतोल बिघडवण्याचा कोणालाच काहि अधिकार नाहि. हाच विशय घेउन एका चित्रपटाच परिक्षण वाचल होत त्याच नाव A NATION WITHOUT WOMAN अस होत. असच जर चालु रहिल तर अशि वेळ लवकरच येईल..........?
|
कदाचित येइल महाराष्ट्रात तरी स्थिती ठिक आहे but things in north india have worsened
|
Supermom, there is a saying Send a fool to the college and what do you get? An educated fool.... साक्षर आणि सुसंस्कृत यात बराच फरक आहे 
|
Supermom
| |
| Thursday, January 19, 2006 - 2:38 pm: |
| 
|
मला जुळे झाले तेव्हाही खूप लोकानी एक मुलगा/एक मुलगी.बरे झाले दोघांपैकी एक वंशाचा दिवा वगैरे म्हटले तेव्हाही इतका राग यायचा.खरे तर आम्हा नवरा बायकोला जुळ्या मुली झाल्या असत्या तरीही तितकाच आनन्द झाला असता. ह्यावर कित्येकांचा विश्वासच बसत नाही. आम्ही चार बहिणीच पण आमच्या आईवडिलानी कधीच आम्हाला कुठल्याच सन्धी नाकारल्या नाहीत.त्यांच्या ऐपतीप्रमाणे जमेल तसे सारे आनन्दाने केले. पण हेही खरेच सांगते की मुलगा मुलगी हा भेद करणार्या लोकांमधे बायकाच जास्त होत्या.
|
Supermom
| |
| Thursday, January 19, 2006 - 2:42 pm: |
| 
|
माझ्या विचारांचे इतके जण या बी बी वर निघाले याचा खूपच आनन्द वाटला.
|
Milindaa
| |
| Thursday, January 19, 2006 - 3:25 pm: |
| 
|
हा समारोप वाटतं
|
Supermom
| |
| Thursday, January 19, 2006 - 3:41 pm: |
| 
|
हा प्रश्न आपल्या देशात इतका ज्वलंत आहे की याचा समारोप येती शंभर वर्षे तरी अशक्य आहे. clipart रडक्या उदास चेहेर्याची कोणीतरी मला स्माईलीज शिकवा प्लीज
|
Storvi
| |
| Thursday, January 19, 2006 - 3:57 pm: |
| 
|
>>माझ्या विचारांचे इतके जण या बी बी वर निघाले याचा खूपच आनन्द वाटला.>>अजुन थोडे दिवस थांब मग आजच्या जगातही असला विचार करणारी माणसं इथे आहेत हे बघुन तुझ्या अत्ताच्या आनंदावर विरजण घालण्याची सोय सुध्धा इथे केलेली आहे 
|
Bee
| |
| Thursday, January 19, 2006 - 4:19 pm: |
| 
|
मुलगा हवा आणि मुलगी नको हा प्रश्न फ़क्त एकट्या भारता पुरता मर्यादीत नाही. इतर देशातही मुलगा झाला की पालकांना जास्त आनंद होतो. ही स्थिती सगळीकडे आता बदलत आहे हे खरे आहे पण ज्यांच्या घरी मुली होतात त्यांना मात्र मुलाची अपेक्षा असते आणि ती नसावी असे मला तरी वाटत नाही. मुलगी आणि मुलगा दोन्ही हवे असते पण काहींना मुलीच होतात मग शिकलेले नवरा बायकोही नवस वगैरे करतात. मला हे नवस करणे परवडले असे वाटते पण abortion ची सोय आवडली नाही. आपल्या एक मुलगा हवा आणि मग एक मुलगी असे म्हणणारे कित्येक स्त्रि पुरुष मी बघितलेले आहेत आणि ते आपले स्वप्न पूर्ण करतातही. gender माहिती पडले की सरळ सरळ गर्भपात. नाही पटत, बुद्धीलाही नाही पटत आणि मनालाही नाही पटत. पण असा निर्णय घेण्याची वेळ स्त्रि पुरुषांवर येते ही वस्तुस्थिती आहे.
|
Moodi
| |
| Thursday, January 19, 2006 - 4:51 pm: |
| 
|
हे घे अन वेगवेगळे हावभाव दाखव, आता वेळ आलीय. /cgi-bin/hitguj/board-image-lister.cgi
|
Supermom
| |
| Thursday, January 19, 2006 - 4:58 pm: |
| 
|
बी तुझ्या पोस्ट मधले बरेच काही पटले नाही. पण discussion is an exchange of knowlege,argument is an exchange of ignorance या उक्तीप्रमाणे मी पुढील मुद्दे मांडते आहे. तू देखील राग न येता विचार कर. इतर देशांच्या बाबतीत तुझे विधान बरोबर नाही असे मला वाटते. तू व्यवसायानिमित्ताने फ़िरला असशीलही खूप, पण म्हणून सरसकट असे विधान बरोबर नाही.मी गेल्या सात वर्षात इथे मुलासाठी बाईचा छळ झाल्याचे एकही उदाहरण पाहिले वा वाचले नाही. मुलाची अपेक्षा असणे चूक असे माझे मुळीच मत नाही. पण मुलाचीच अपेक्षा असणे चूक असे मला वाटते. त्यासाठी भाराभार मुली जन्माला घालून मुली म्हणून त्यांची हेटाळणी करणे किंवा असलेले मुलींचे गर्भ मारून टाकणे या दोन्ही विकृतीच आहेत.जीव मग तो कोणीही का असेना मारण्याचा आपल्याला काय अधिकार? तेव्हा असा निर्णय घेण्याची वेळ येते असे नाही तर या निर्णयात सर्व काही आपली मनोवृत्ती किती संकुचित आहे यावर अवलम्बून आहे. अन सर्वात महत्वाचे म्हणजे मुलगा हवाच असे का? अनेक ठिकाणी मी मुलगा आईवडिलाना वृद्धाश्रमात टाकतो. अन मुली त्यांची काळजी घेतात हे पण पाहिले आहेच. शेवटी अपत्य काहीही असो चांगले निघणे महत्वाचे. मग मुलगी झाल्याचे दुःख का म्हणून?
|
Milindaa
| |
| Thursday, January 19, 2006 - 5:48 pm: |
| 
|
मूडी, आणि दोन्ही मुली देशाबाहेर असल्या तर ?
|
Ninavi
| |
| Thursday, January 19, 2006 - 5:52 pm: |
| 
|
मिलिन्दा, I have nothing to say!! मूडीताई, दिवे प्लीज!
|
Storvi
| |
| Thursday, January 19, 2006 - 6:03 pm: |
| 
|
taking milindaa's point further आम्च्या कडे माझा नवरा आणि त्याची बहीण दोघे देशाबाहेर आहेत आणि आई वडील एकटे भारतात.. सो तुझा प्रॉबलेम फ़क्त मुलींशी related आहे असे वाटत नाही मूडी
|
Moodi
| |
| Thursday, January 19, 2006 - 6:04 pm: |
| 
|
मिलिंदा अन निनावी तुमचे म्हणणे अगदी बरोबर अन वास्तवाला धरुन आहे, पण मनातले विचार जात नाहीत ना.
|
Maanus
| |
| Thursday, January 19, 2006 - 6:25 pm: |
| 
|
एक दोन वेळा मला नविन जर्सीतील तुरळक ईग्रजी लोकांच्या घरी जायचा योग आला.... त्यांच्या घराबाहेर भिंतीवर, दारावर, घरात सगलीकडे "It's a Girl" च्या मस्त रंगीबेरंगी पाट्या लावल्या होत्या... असे चित्र आपल्या भारतात कधीतरी दिसेल का? कदाचीत नाही... हो पन गेल्याच आठवड्यात एका दिल्लीतल्या मानसाच्या घरी गेलो होतो त्याने आपले हॉल मधे "It's a Girl" ची पाटी लावली होती... ते पाहून बरे वाटले.
|
Storvi
| |
| Thursday, January 19, 2006 - 7:08 pm: |
| 
|
मूडी तो विषय वेगळा आहे आणि इथे हाताळला आहे... मूल एक पुरे कि...
|
Moodi
| |
| Thursday, January 19, 2006 - 7:13 pm: |
| 
|
शिल्पा तो विषय म्हणजे ती लिंक बंद दिसतीय. तो बीबी close झालाय का? जर नसेल तर माझे मत मी तिथे हलवेन.
|
Storvi
| |
| Thursday, January 19, 2006 - 7:59 pm: |
| 
|
मूडी आता बघ बरं 
|
Moodi
| |
| Thursday, January 19, 2006 - 8:15 pm: |
| 
|
सापडला ग thank you मी वरची पोस्ट delete करुन तिथे मांडते माझे मत. 
|
Moodi
| |
| Thursday, January 19, 2006 - 8:26 pm: |
| 
|
मी शाळेत असताना आमच्या ओळखीतील एका जोडप्याला १२ वर्षाने अपत्य झाले, एका छान मुलगी. पण त्यांच्या शेजारच्यानी, जेव्हा ते आमच्या इथे आले होते तेव्हा म्हटले की एवढ्या वर्षाने मुल झाले मग मुलीच्या ऐवजी मुलगा झाला असता तर बरे झाले असते ना. माझ्या आईने म्हटले की असा विचार का करावा? त्यांच्या घरात जो आनंद आहे त्यात तुम्ही सहभागी व्हायच्या ऐवजी असे मनात का आणता? तर ते काहीच बोलले नाही. माझ्या आईला अन आमच्या शेजारच्या काकुना पण त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटले. नशीब ते त्या जोडप्या समोर नाही बोलले, नाहीतर त्यांच्या मनात त्या शेजार्या विषयी कायम दुरावा राहिला असता, ज्यांचे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध झाले होते. पण लोक विचार करीत नाहीत तसा.
|
Seema_
| |
| Thursday, January 19, 2006 - 8:55 pm: |
| 
|
supermom तुझे वरचे post अगदी बरोबर आहे. सरसकट " इतर देशातही मुलगा झाला कि च आनंद होतो " हे मुळीच पटत नाही. इथ अमेरिकेत तरी नक्कीच अशी परिस्थिती नाही आणि तुझ्या प्रश्नाच उत्तर खर तर नाहीच आहे. बहुदा जसा काळ जात राहील तशी उत्तर मिळत रहातील. आम्ही ही बहीणीच आहोत . अशा remarks कडे आता दुर्लक्ष करायला मी शिकले आहे.
|
Storvi
| |
| Thursday, January 19, 2006 - 9:34 pm: |
| 
|
अमेरिकेत असे नाही हा गैर समज आहे. इथे ते उघड पणे नाहिये एवढेच. बर्याचदा पुरुषांना especially , मुलगाच हवा असतो. बरेच पुरुष मुलगा झाला तर त्याच्या संगोपनात जास्त लक्ष घालतात की मोठा झाल्यावर त्यांची' लेगसी ( म्हण्जे काय तर स्पोर्ट्स मध्ये interest etc.) पुढे चालवावी म्हणून. आणि मग अशी मुले जर तथाकथीत बायकी interest दाखवायला लागली तर मग ह्यांची अवस्था फ़ार वाईट होते. फ़क्त हे सगळं इतकं subtle असतं की भारताईतक उघड पणे दिसत नाही एवढेच. अर्थात तरीही भारत किंवा इतर काही देशांच्या मानाने इथे हे वेड कमी आहे यात वाद नाही पण जितकी equal अमेरिका वरकर्णी वाटते तितकी ती नाही एवढे मात्र नक्की.
|
storvi mala tujha mudda agdi patla..fakta te ithe rahunach kalta ki khara kasa culture ahe..bhartat astana americet saglech shrimant ani baykanna kevdhi equality asech vatate.majhya infact ase pahanyat alay ki indian bayka career oriented jasta astat..tyat career peksha suddha paise kamavun gharala haat bhar lavava asehi asel..pan ghari aani baher apan donhi thikani capable asto...
|
storvi mala tujha mudda agdi patla..fakta te ithe rahunach kalta ki khara kasa culture ahe..bhartat astana americet saglech shrimant ani baykanna kevdhi equality asech vatate.majhya infact ase pahanyat alay ki indian bayka career oriented jasta astat..tyat career peksha suddha paise kamavun gharala haat bhar lavava asehi asel..pan ghari aani baher apan donhi thikani capable asto...
|
Seema_
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:46 pm: |
| 
|
भारता मध्ये मुलगा हा म्हातारपणाची काठी , वंशाला दिवा या अर्थान बरेच वेळा हवा असतो. gender bias तर जवळ जवळ सगळीकडेच बघायला मिळतो इथे निदान तो वंशाच दिवा वैगरे आहे अस consider करुन तो हवा असे सांगणारे महाभाग अजुन तरी मला दिसले नाहीत. या वरुन एक मागे एकदा tv वर दाखवल कि तुम्हाला आता मुलगी हवा कि मुलगे हे आता अगोदरच ठरवता येईल असा तंत्रज्ञान लवकरच प्रत्य्क्षात येवु शकत. अर्थातच अमेरिcअन स्वयीनुसार किती लोकाना हे करायला आवडेल अस survey घेण्यात आला आणि बहुतांशी लोकानी नाही असच उत्तर दील. abortions चा मुद्दा इथल्या राजकारणात कळीचा मुद्दा आहे. पण ही abortions खरच भारतीय लोकाच्या मानसिकतेनुसार { म्हणजे मुलगी असेल तर abortion करणे ) होत नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही पण ते असो हा मुद्दा नाही आहे न इथे. त्यामुळे परत आपण supermom न विचारलेल्या प्रश्नाल उत्तर कस द्यायच ते ठरवुया
|
Zakki
| |
| Friday, January 20, 2006 - 2:03 am: |
| 
|
आता माझेही तीन विचार १. अमेरिकेत एक मुलगा नि एक मुलगी म्हणजे million dollar family समजतात. २. एक म्हण A son is your son until he takes a wife, but a daughter is your daughter until the end of your life . ३. एक अत्यंत संतापजनक बातमी. म्हणजे खरी असेल, पण म्हणून काय? भारतातली तेव्हढी एकच बातमी? टाइम मासिक, २३ जाने. २००६, मधील बातमी 10 million, estimated no. of fetuses aborted in India over the past 20 years by parents, hoping for sons! . आत्ता, बाकी काही बातम्या नाहीत का भारताबद्दल? हेच लिहायची काय गरज होती? संताप येतो असल्या लोकांचा! मी त्यांना लिहिणार आहे. कुणि मला काहीतरी कळवा, भारतातील गेल्या वीस वर्षातील उल्लेखनीय कामगिरी.
|