Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 13, 2007

Hitguj » Looking for » Religion » श्री गणेशाची प्रतिष्ठापना कशी करायची? » Archive through September 13, 2007 « Previous Next »

Sampada_oke
Monday, September 10, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला या वर्षी घरी गणपती बसवायचा आहे? गणेश चतुर्थीला त्याची पूजा कशी करायची? पूजा सांगणारी एखादी साईट आहे का? म्हणजे एकीकडे ऐकत पूजा करणे सोपे जाते यासाठी.
धन्यवाद.


Maanus
Monday, September 10, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपती एकदा बसवले की दर वर्षी बसवावे लागतात.
आपल्याला दर वर्षी हे जमनार आहे का याचा पहीला विचार कर.


Lalu
Monday, September 10, 2007 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>गणपती एकदा बसवले की दर वर्षी बसवावे लागतात.
असं काही नाही. एखाद्या वर्षी नाही जमलं तर काय होईल?

गणपती कोणी बसवावा यावर पण अशा गोष्टी सांगितल्या जातात. आई वडिलांनन्तर फक्त मोठ्याच मुलाने बसवावा इत्यादी. पण असं काही नाही, आपल्याला करावं वाटलं तर करावं. खास करुन जे परदेशात राहतात ते लोक मुलांसाठी करतात. आता एखादे वर्ष गणपतीला भारतात जायचा योग आला तर इथे बसवायचा रहाणारच की.
आता 'माणूस' रागावेल, पण बाप्पा नाही रागवत. :-)

संपदा, मला साईट वगैरे नाही माहित. मी घरीच मोदक, नैवेद्य आणि गणपतीला आवडणारी फुलं जमल्यास दुर्वा जे शक्य असेल ते आणून पूजा करते.


Sampada_oke
Monday, September 10, 2007 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स लालू.:-) घरी गणपती बसवायचे कारण बरोबर सांगितलेस.:-)

माणसा, नवीन बीबी उघडायच्या आधीच हा विचार केला होता.:-)


Upas
Monday, September 10, 2007 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हौस म्हणून गणपती बसवणे आणि प्राणपतिष्ठा करून उत्सव करून विधिवत विसर्जन करणे ह्या दोन गोष्टींत फरक आहे.. पावित्र वातावरण राखले आणि भक्तीत सच्चेपणा असला की बाप्पा खूषच.. बाकी ज्याचा त्याचा प्रश्न!

Lalu
Monday, September 10, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>हौस म्हणून गणपती बसवणे
म्हणजे काय रे उपास? माझ्या मते 'गणपती बसवणे' म्हणजे ते पुढचं सगळं आलंच..विसर्जनाचा भाग सोडल्यास.

Maanus
Monday, September 10, 2007 - 11:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ मला राग वैगेरे नाही येत :-)

जे ऐकलेले ते सांगीतले फक्त :-)
मी देवापासुन / देवकार्यापासुन दोन हात लांबच रहातो, काय कधी चुक व्हायची माहीत नाही. आपला लांबुनच नमस्कार :-)


Upas
Tuesday, September 11, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू बरेच जणांकडे बघितलं म्हणजे इथेच नाही तर भारतात सुद्धा. साधारणपणे एका घरात एक गणपती बसवण्याची पद्धत अशासाठी की त्या निमित्ताने सगळी जण एकत्र येतील. मुंबईतले चाकरमानी सुद्धा अगदी भरभरून कोकणात जातात ह्या दिवसात ते केवळ ह्यासाठीच.

हौस म्हणून गणपती बसवायचा म्हणजे नेहमीच्या पूजेतल्या गणपतीच्या मूर्तीची यथासांग पूजा करायची.
सजावट नैवैद्य आरत्या सगळं काही.

आता जर तुम्ही शाडूची मूर्ती आणणार असाल तर प्राणप्रतिष्ठेपासून उत्तर पूजा आणि विसर्जनापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणे, पावित्र्य राखणे अपेक्षित असते. मुंबईतल्या मोठ्ठ्या मूर्तींच्या मंडळांच्या येथे आपल्याला लहान गण्पती दिसतो. फक्त त्याच गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हे मी ढोबळ मानाने सांगतोय.

त्यातूनही तुम्ही शाडूची मूर्ती आणलीत पण प्राणप्रतिष्ठा केली नाहीत आणि पूजा केलीत तरी चालेलच. तरीही विसर्जन नीट करायला हवे, पर्यावरण तसेच भावनिक्/ धार्मिक दृष्ट्या. दरम्यान गणपती विसर्जन का करावे ह्यासंबंधी वाचनात आले होते. प्रत्येक गोष्टिस शेवट असून आपण समर्पण आणि पंचतत्वात विलीन व्हायला शिकले पाहीजे हाच उद्देश विसर्जनात आहे असं त्यात म्हटलं होतं..
पुढच्या पिढीवर संस्कार हा उद्देश असेल तर सगळं व्यवस्थित करून त्यांना पटवून द्यायला हवं.. नाहीतर ते पुढच्या पिढीकडे संक्रमित होणं, त्यांनी उत्कटतेने टिकवणं आणि करणं तसं कठीणच.



Shyamli
Tuesday, September 11, 2007 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा,
अगदि बिनधास्त बसव गणपती, माझ्याकडे पुजेची सिडी आहे ती ऐकुनच आम्ही गणपती बसवतो दरवर्शी, आणि त्यामधे दिलेलं सगळ साहित्य असलायच हवं असं काहि नाही दोन्ही वेळेला मनोभावे पूजा आरती केली की बाप्पा आणि आपण सगळेच खुश :-) दुर्वा एकदाच आणून जुड्या करून फ्रीजात राहू शकतात पण फुलं मिळत नाहीत आमच्या जवळ पास. मी अगदी चिनीगुलाब मिळाला तर तोसुद्धा घेते, फूल असल्याशी कारण :-)

आता २ वर्शाखाली मला देशात जावं लागलं मी तिथल्या घरात बसवला होता गणपती :-) आपलच घर असतं कि ते ही

उपासा, शाडू? का साडू?

Savani
Tuesday, September 11, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा,
माझ्याकडे गेल्यावर्षी ई-सकाळ वर सांगितलेली पुजा आहे. तुला हवी असेल तर मेल करते. आणि वरती सगळ्यानी म्हटल्याप्रमाणे मनोभावे आणि जे आहे त्यात पूजा करणेच तर महत्वाचे.
इथे फ़ुले तर कित्ती छान छान मिळतात. तीच फ़ुले आणि त्यान्ची पत्री वाहायची. दुर्वा मी चांदीच्या आणल्यात करून. बाकी पुजेसाठी लागणारं सर्वसाधारण साहित्य असतचं आपल्याकडे.




Lalu
Tuesday, September 11, 2007 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, 'शाडू' रे. :-)
एका गणपतीचा तिथला उद्देश बरोबर, पण इथे ते सुख नाही ना...

उत्तर पूजेपर्यन्त ठीक आहे. पण विसर्जन करता येतेच असे नाही. पर्यावरणाचा विचार करुन हल्ली करतही नाहीत लोक. शेवटी तुम्ही जो मानाल तो शेवट. आणि 'करायचं तर सगळं करा नाहीतर काहीच नाही' यापेक्षा जे जमेल ते करावं असं माझं मत आहे. चुका होतील या भीतीने किंवा सगळे काही यथासांग करता येत नाही म्हणून करायचेच नाही यापेक्षा जेवढे देता येईल तेवढे पुढच्या पिढीला द्यायचे प्रयत्न करावेत.


Upas
Tuesday, September 11, 2007 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं हो चुकून चूक झाली.. सुधारलेय.. :-)
माझ्या आठवणीप्रमाणे कित्येक गावात विहीरीत किंवा अगदी बादलीत देखील करतात विसर्जन.. आणि eco friendly गणेशमूर्त्या मिळतात आता.. अश्विनीनेच कुठेतरी म्हटलय ह्यासंबंधी..
आपण जमेल तसं करायला हवं हे तुझं मत पटतं.. नाही तर पुढच्या पिढीस काहीच देता येणार नाही..


Seema_
Tuesday, September 11, 2007 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाडुची मुर्ती आणायची नसेल तर दुसरी एखादी गणेशाची मुर्ती (रोजच्या पुजेत नसलेली) ची साग्रसंगीत पुजा करायची . विसर्जनाचा वगैरे प्रश्न नाही .

Shyamli
Tuesday, September 11, 2007 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु(जयावि)कडे मूर्ती मिळतच नाही म्हणे, मग ती प्राणप्रतिष्ठा सुपारीची करते आणि मोठा घरातला गणपती नुसता ठेवते पुजेत
बाकी साग्रसंगीत असतंच सगळं तीच्याकडे. असही करता येइल सोप्प पण आहे आणि.

लालु ला भरपूर मोदक>>>>>> काहिच न करण्यापेक्षा जसं जेवढ जमेल तेवढ तरी किमान करावच.
एवढं नाहि जमणार म्हणून हात वर करण्यापेक्षा.

Shonoo
Wednesday, September 12, 2007 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या सासरच्या भागात गोदावरी समुद्राला मिळते त्या भागात सगळ्यांकडे 'गणपती असतो'. गणपतीच्या दिवशि गावातला धोबी नदी काठच्या मातीने गणपती करून आणून देतो त्याची पूजा करायची. जवळ जवळ सगळ्या घरी, दुसया दिवशी उत्तर पूजा करून परत गणपतीची मूर्ती निर्माल्य सगळं धोब्याला देतात. तो ते नदीत विसर्जित करतो. घरच्यांनी गणपती आणायला किंवा विसर्जनाला जाणे वगैरे प्रकार नाहीत. शिवाय दर पिढीमधे फक्त थोरल्या पाती कडे गणपती असा प्रकार ही नाही. माझ्या सासर्‍यांच्या तिन्ही भावांकडे आणि त्यांच्या सगळ्या मुलांकडे गणपती असतो. शहरात रहाणारी मंडळी मूर्ती विकत आणतात आज काल, पण मिरवत मूर्ती घरी आणायची प्रथा नसते. माझ्या सासू बाईँनी सुद्धा सुपारी ठेवून पूजा करायला सांगितलं होतं आणि मग जेंव्हा केंव्हा भारतात जाणं होईले तेंव्हा आठवणीने ती सुपारी आणि थोडं निर्माल्य नेऊन नदीत टाकायचं. बाकी निर्माल्य मी इथे अंगणात झाडांखाली पुरते.

Mankya
Wednesday, September 12, 2007 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा .. एक लिंक देतोय खाली, यावर नक्किच माहिती मिळेल अशी खात्री आहे. त्यावर फोन नंबरही असतील संस्थेचे, अगदि निश्चिंपणे फोन कर या संस्थेला; अगदी शास्त्रशुद्ध माहिती मिळेल तंत्र आणि मंत्राबद्दल, कुठलीही पूजा असेल तरिही.

http://sanatan.org/en/campaigns/Ganesh/main.htm

माणिक !

Karadkar
Wednesday, September 12, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इथे Sunnyvale Temple मधे एक प्रकार पाहीला फारसा आवडला नाही. तिथे ते सगळे गणपती विसर्जनासाठी गोळा करतात आणि बहेर जमिनिवर ठेवलेले असतात. मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते ( Temple मधले पुजारी) एका टाकीत विसर्जन करतत. पण तोपर्यंत ते असेच बाहेर ठेवलेले असतात. :-(

त्यापेक्शा शोनु म्हणाते तसे सुपरी पुजुन भारतात निर्माल्य म्हणुन नेलेले बरे.

किंवा धातुचा वगैरे गणपती बसवुन त्याची उत्तर पुजा करुन बाजुला ठेवणे बरे असे मला तरी वाटते. Environment Friendly होते मग ते.


Sampada_oke
Wednesday, September 12, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना माहितीसाठी धन्यवाद.:-)
सावनी, ई सकाळची पूजा मला मेल कर. तू म्हंटल्याप्रमाणे पूजेच्या साहित्याचा काहीच प्रश्न नाहीये.:-)चांदीच्या दूर्वा पुढच्या भारत भेटीत करून घेईन.:-)
माणिक, साईट छान आहे. मी भारताबाहेर असल्याने जरा प्रश्न पडले होते, त्याचे निरसन झालेय आता.:-)
श्यामली, सीडी कुठून घेतली होतीस? जमल्यास मेल टाक.
मला इथल्याच एका दुकानात गणपतीची मूर्ती अचानक मिळाली. जवळपास एक फ़ूट ऊंचीची ही मूर्ती आहे. अगदी भारतातल्या शाडूच्या मूर्तीप्रमाणेच रंग आणि कोरीवकाम आहे. म्हणून एव्हढा खटाटोप. ही मूर्ती लाकडाची असल्याने विसर्जनाचा प्रश्न नाही.


Kedarjoshi
Wednesday, September 12, 2007 - 10:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली त्या cD चे mp3 मध्ये रुपांतर करुन ती पाठवतेस का?
ईथे पण माहीती आहे.

http://www.panditjiusa.com/Samgri_PreparationLists/GaneshPratishthapana_Preparation_Marathi.pdf

Shyamli
Thursday, September 13, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार पाठवते, संपदा तुला पण पाठवतेय ग

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators