मला अस्सल खणाचा ब्लाऊज अणी साडी घ्यायची आहे.पुण्यात कुठे मिळेल काही कल्पना आहे का?मी ज्या साड्या पाहिल्या त्यांची काठ वेगळी आहे,खणाची नाहिये.थोडक्यात सांगायचे तर अस्सल मराठी साडी हवीये
|
Moodi
| |
| Thursday, March 02, 2006 - 5:38 pm: |
| 
|
रेणू शनीपाराजवळ पंचेवाले गोरे बंधुंचे दुकान आहे आंबेवाले देसाईंच्या शेजारी तिथे चौकशी करायला सांग तुझ्या घरच्याना. त्यांच्याकडे कदाचीत मिळु शकेल.
|
मूडी,तुला साडी चं नाव महिती आहे का गं,तोंडावर आहे मझ्या,पण जाम लक्षात येत नाहीये.
|
Lalu
| |
| Thursday, March 02, 2006 - 6:49 pm: |
| 
|
इरकली पाहिजे आहे का? कोल्हापूरला जा. महालक्ष्मीच्या मन्दिरा जवळ बरीच दुकाने आहेत.
|
Moodi
| |
| Thursday, March 02, 2006 - 6:49 pm: |
| 
|
मी चुकत असेल तर सॉरी ग, पण तुला नारायणपेठी वगैरे टाईपच्या साड्या हव्यात का? नारायण पेठी तशातली नाही पण मराठीच आहे.खणाचे काठ असलेले ब्लाऊजपीस वगैरे बघितल्यासारखे वाटतय. बघते अजुन महिती मिळाली तर.
|
हां! इरकली! अगदी बरोबर,त्याची काठ खणची असते ना? मूडी,नारायण पेठी नाही,ती सुद्धा आहे मनात चेक्स ची पण आत्ता ती नही बघत आहे
|
Lalu
| |
| Thursday, March 02, 2006 - 7:04 pm: |
| 
|
रेणू, ' खणाची काठ' म्हणजे काय मला कळले नाही. पण ही चेक्स ची असते. शक्यतो हिरवीच. मी आमसुली पण बघितली आहे. साडी सारखाच ब्लाऊज असतो. छान दिसते ती. पुण्यात कुठे मिळेल मला माहित नाही.
|
नाही मग ही वेग्ळी साडी आहे.मी म्हणतीये त्याला खणाचा ब्लाऊज वेगळा असतो.मला वाटतय त्याला रेशीम साडी किंवा पुणेरी म्हणतात btw lalu मी कोल्हपुरात ४ वर्षं राहीलीये
|
Lalu
| |
| Thursday, March 02, 2006 - 7:20 pm: |
| 
|
'खणाचा' म्हणजे काय ते सान्ग गं. मी खण म्हणजे हिरवा ब्लाऊजपीस समजते आहे. इरकली वर तो बारीक चेक्स च्या साडी सारखाच असतो, प्लेन नसतो. मदिराच्या मेन दरवाज्याबहेर ओळीने बरीच दुकाने आहेत तिथे मिळतात या साड्या.
|
Savani
| |
| Thursday, March 02, 2006 - 7:23 pm: |
| 
|
रेणु, लक्ष्मी रोड वर विकास नावाचे एक दुकान आहे. त्यान्च्याकडे अशा साड्या असतात. आणि दुसरे म्हन्जे आझाद नावाचे पण एक दुकान आहे. बाजीराव रोड वरुन लक्ष्मी रोड ला वळाले की लगेच दिसेल. आणि बुधवार पेठेत खण आळी म्हणुन एक भाग आहे तिथे सुद्धा मिळेल.
|
Savani
| |
| Thursday, March 02, 2006 - 7:25 pm: |
| 
|
रेणू तुला पुणेरी साडी हवी असेल तर विकास मधे अगदी नक्की मिळेल कारण त्यान्चा स्व : ताचा कारखाना आहे.
|
Bavlat
| |
| Thursday, March 02, 2006 - 7:37 pm: |
| 
|
'खणाचा' म्हणजे काय ते सान्ग गं.>> मला पण कळल नाही. खण कशासाठी असतात. साडीला पण खण असतात का?
|
खणाचं म्हणजे कसं असतं नाही सांगता येणार.गावकडच्या बायका चोळी घालतात ना तसं
|
सावनी,ही महिती छान दिलीस.आई ला सांगेन'खण आळी' मध्ये बघायला.विकास आणी आज़ाद दोन्ही कडे मी मागच्या वेळेला बघितले होते.पण हल्ली रेशीम काठ येते म्हणे,खणाची काठ दुर्मीळ आहे असे त्यांचे म्हणने होते
|
क्या बात है, अगदी नारायण वाचतो आहे अस वाटल
|
Bee
| |
| Friday, March 03, 2006 - 3:25 pm: |
| 
|
malaahee tyaacheech aaThawaN jhaalee ithe 
|
खणाची काठ म्हनजे काय मी सांगतो.पूर्वी खेड्यात सरसकट सर्व स्त्रिया हिरव्या रंगाच्या चोळ्या घालत. चोळी म्हणजे ब्लाऊजचा प्रकार. ब्रा नव्हे.या चोळ्याना पुढे फक्त गाठ असे नन्तर त्यात फॅशन म्हनून बटणे आली. या चोळ्यांचे कापड अगदी ठराविक असे म्हनजे हिरवे अथवा मोरपंखी निळे जाड्सर.त्यात सेल्फ डिझाईन असे.याचा काठ फार टिपिकल अस्तो.जरी सारखा जरतारी असतो. चमकदार.त्याची गोल पट्टी दन्डावर येते. हिरवी अगर निळी चोळी व त्याचा नक्शीदार काठ हे काॅम्बिनेशन मोठे विलोभनीय असते. आताशा एक आगळा पॅटर्न म्हणून चोळीच्या कापडाचा ब्लाउज़ शिवायची फॅशन आहे. चोळीच्या कापडाला चोळीचा खण' म्हणतात.खणनारळाने ओटी भरणे म्हणजे त्यात हानारळाबरोबर चोळीचा खण भेटीदाखल द्यायची पद्धत होती. .... हो आता होतीच म्हणायचं... आता बहुधा ओटी आणि ती भरणं म्हनजे काय हे सुद्धा हितगुजच्या या पिढीला सांगावं लागेल असे दिसते.................... या चोळीने मराठी साहित्यात विशेषता शृन्गार साहित्यात लोकगीतात वेगळेच गहिरे स्थान पटकावले आहे
|
Bee
| |
| Saturday, March 04, 2006 - 5:20 am: |
| 
|
राॅबीन खणाची घडी त्रिकोणी असते. ती घडी करणेही एक कला आहे. आम्ही लग्नात जे रुखवंत ठेवायचो त्यात खण असायचाच. पृष्ठाला त्रिकोणी कापायचे, त्यावर उडदाच्या पिठाचे आवरण घालायचे म्हणजे खण रंगरंगोटी करायला बरा जातो. त्या खणावर आधी हिरवा रंग चढवायचा. मग सोनेरी वार्नीश वापरून काठ जरीचे करायचे. मधेमधे लाल पांढर्या पिवळ्या टिकल्या fevicol ने चिकटवायच्या. खण खूप सुरेख दिसतो.. रुखवंताची स्तुती होत असे.
|
Psg
| |
| Saturday, March 04, 2006 - 7:58 am: |
| 
|
exactly!! खण म्हणजे blousepiece . खणाची साडी कशी असेल? खणाचे कापड वेगळे असते, तशी साडी नसते. इरकली साडी, किंवा पुणेरी साडी बघ रेणु. त्यावर हे खणाचे blouse छान दिसत
|
Mrunmayi
| |
| Monday, March 06, 2006 - 10:22 am: |
| 
|
Renu irakali sadi laxmiroadlapan PNGchya shejari pahileli athavtey pan dukanacha nav nahi aathvat. Khavacha blousepiece tar tula jogeshwaripashi pan milel devalachya baher. tithe sadi aahe ki nahi te mahit nahi.
|
गर्भं रेशमी साडी आणी त्यावर खणाचा ब्लाउज असं म्हणायचं होतं मला.आत मी घरच्यांना जरा कामला लावते तुम्ही संगितलेल्या ठिकाणी शोधयायला
|