|
Nalini
| |
| Monday, March 06, 2006 - 4:16 pm: |
| 
|
ह्या फोटोत ह्या पिटुकलीचा ड्रेस हा खणापासुनच शिवलेला आहे ( मला अजुन पिटुकली नाहि हे बरं का! ही पिटुकली नेटवरची आहे). गावाकडे अजुनही बायका नऊवारी काठापदराच्या साडिवर चोळीच शिवतात. त्यात खरा आणि खोटा खण असे दोन प्रकार येतात. खर्या खणाची साधारण किम्मत ही १०० ते १२५ रु. आहे. खर्या खणात एक रेशिम काडी असते. माझी आजी नेहमी खर्या खणाचीच चोळी शिवत. खण खरा कि खोटा हे जाणकाराला पहाताक्षणी कळते. चोळी शिवण्यापुर्वी कापली जाते त्याला चोळी बेतणे असे म्हणतात. चोळीचे काठ हे तपकीरी रंगाचेच असतात, फोटोत दिसतायेत तसे. आणि अश्याच प्रकारचे काठ काही साड्यांना असतात म्हणुन आता साड्यांवर खणाचा ब्लाऊज शिवायची नविन फॅशन सुरु आहे. खणाबद्दल बरीचशी माहिती रॉबिनहुडने दिलिच आहे आणि बी म्हणतो तशी खणाची घडी ही त्रिकोणी घातलेली असते. बनगरवाडी हा चित्रपट पाहिला असेल तर त्यात नायिका मास्तरला खण देऊन तालुक्यावरुन चोळी शिऊन आणायला सांगते.
|
काय गोड आहे गं ही पिटुकली.तुझी मुलगी आहे का?हा खरा खण की खोटा?
|
Nalini
| |
| Monday, March 06, 2006 - 5:22 pm: |
| 
|
रेणु, वरच्या पोस्ट मध्ये सुधारणा केलिय.
|
Zakki
| |
| Monday, March 06, 2006 - 9:47 pm: |
| 
|
आता ही गर्भरेशमी साडी नि खणाचे ब्लाऊज कुठे online पहायला नि विकत घ्यायला मिळतील का? रंग कळणे अत्यंत महत्वाचे आहे. बायका त्याबाबतीत जाम किचकट. सप्तरंगात फक्त सात रंग, तर यांना जवळपास सातशे तरी रंग दिसत असावेत असे बोलतात, म्हणून म्हंटले.
|
Prajaktad
| |
| Wednesday, September 20, 2006 - 7:05 pm: |
| 
|
जरिच्या परकर पोलक्यासाठी कापड किंवा तयार परकर पोलके कुठे मिळेल?मला श्रेया साठी मागवायचे आहे. मला वर नलुताईने फोटो दिले आहे तस नकोय तर, south indian छोट्या मुली घालतात तस फ़ुग्यांच्या बाह्या आणी घेरदार परकर अस हवय. मागे,मी एकदा तुळशी बागेतुन आणले होते पण,ते चनिया-चोळी टाईप होते. दिवाळीसाठी हवे आहे तर लवकर उत्तर द्या.
|
Ajjuka
| |
| Thursday, September 21, 2006 - 2:24 am: |
| 
|
खण आळी नाही चोळखण आळी. सिटी पोस्ट चौकातून पुढे गेल कि डाव्या हाताला येणारी पहिली गल्ली जी दुसर्या बाजूला पासोड्या विठोबाच्या देवळाकडून सुरू होते. खण हे खास चोळ्यांसाठीही विणलेलेही असतात. आपण जे नुसते खण म्हणतो ते खरेतर धारवाडी खण. आणि बाकी काठापदराचा ब्लाऊजपीस जो त्रिकोणी घडी केलेला असतो तोही खणच. तू म्हणतेयस ती साडी पुणेरी. वर सांगितल्याप्रमाणे आझाद, विकास इत्यादींमधे मिळेल. तसेच चोळखण आळीतल्या दुकानात ही मिळू शकते. लालूचं बरोबर आहे कोल्हापुरात देवीच्या देवळाजवळ मेन प्रवेशद्वाराच्या बाहेर जी गल्ली आहे तिथे ही दुकानं आहेत. देवळाकडे पाठ केल्यावर गल्लीच्या उजव्या टोकावरचे दुकान. तसंच कोल्हापुरात वालावलकर कडेही कधी बरा स्टॉक असतो.
|
Ajjuka
| |
| Thursday, September 21, 2006 - 3:54 am: |
| 
|
बापरे प्राजक्ता केवढी घाई आणि केवढी स्पेसिफिकेशन्स. पुण्यात पटकन् आणि बर्या किमतीत शिवून देणारे एक दुकान मला माहितिये. खजिना विहिरीवरून येणार्या रस्त्याने मरीआईच्या देवळाशी आलीस की तिथे ज्या भाजीवाल्या वगैरे बसतात ना त्यांच्या मागे बिल्डींग मधे एक डेरी, आयुर्वेदीक औषधांचे दुकान वगैरे आहेत त्याच लायनीत रश्मी एंटरप्रायजेस की तत्सम नावाचे दुकान आहे. तिथे हे शिवून मिळतं. मापं घेऊन आधी त्यांच्याकडेच जा. तिथे ज्योत्स्ना म्हणून एक जण आहेत (मालकीण) त्यांना विचारायचे किती कापड लागेल आणि कुठे मिळेल म्हणून. चोळखण आळीमधेही अशी कापडे मिळतील. किंवा इरकल, पुणेरी अश्या प्रकारचे कापड हवे असल्यास लक्ष्मीरोड व वामाची गल्ली दोन्हीकडे खच्चून ब्लाऊजपिसेस ची दुकाने आहेत त्यांच्याकडे हे काठाचे ब्लाऊजपिस ताग्यातून मिळतात. तसेच लुंकड मधेही ट्राय करायला हरकत नाही. अजून एक म्हणजे हूजूरपागेच्या प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच्या बिल्डींग मधे हस्तकला म्हणून दुकान आहे तिथेही काही छान कापडे मिळतात. अजून एक करता येईल तुला हवा तसा रंग आणि काठाचे कॉम्बिनेशन मनासारखे जुळत नसेल तर रविवार पेठेत मनीष मार्केट मधे उत्तम काठ मिळतात. हवे ते कापड घेऊन त्याला ते लावून घेता येतात. अजून एक.. ( कंटाळलीस वाटतं..) रविवार पेठेतल्या कासट कडे थोड्याश्या डिफेक्टीव साड्या अर्ध्या किमतीत मिळतात. डिफेक्ट शोधायला गेलो तरी पटकन् सापडणार नाही इतका छोटा असतो. तेवढा भाग वगळून उरलेले कापड उत्तमपैकी वापरता येते. आणि दीड्-दोन हजाराची असलेली साडी साताठशे पर्यंत सहज मिळते त्यामुळे सिल्क ची हौसही पुरते. लहान मुली पटपट वाढत असतात त्यामुळे एवढा उंची कपडा घेऊन तो चार महिन्यात लहान होऊन टाकून द्यावा लागतो. वाईट वाटत. त्याला उपाय म्हणून वाढत्या अंगाचे शिवता येतात कपडे पण ते नवीन असताना अजागळ दिसतात. त्यापेक्षा हे बरे. तुमच्यापैकी कोल्हापुरातले जे आहेत त्यांनी महेंद्र ज्वेलर्स ची ऍड पाह्यली असेल. त्यात मृणाल ने जो वसंतसेनेसारखा मोरपिशी रंगाचा कॉश्च्युम घातला आहे तो मी अश्याच डिफेक्टीव साडीतून जमवला होता आणि तो शिवलेला बिल्कुल नाहीये.
|
Bee
| |
| Thursday, September 21, 2006 - 4:07 am: |
| 
|
इथे सिंगापूरमध्ये कितीतरी दुकाणांमध्ये अस्सल खणाचे झाम्पर आणि परकर मिळतात. अगदी बारक्या एक दोन वर्षाच्या मुलीपासून वीस वर्षाच्या मुलीपर्यंतचे परकर आणि झाम्पर! कारण इथे तमिळ वस्ती आहे आणि त्यांनी आपले बस्तान एकदम छान बसविले आहे. कुणाला माहिती नसेल, तमिळ ही इथे one among the four official language आहे. असे वाटते दिवाळी अंकासाठी इथल्या दिवाळीवर एक लेख लिहावा.. पण त्यासाठी फोटो वगैरे काढायला जावे लागणार आहे. इथे सद्या दिवाळीची धूम आहे बाजारात. चनिया चोली पेक्षा हे खणाची परकर पोलके एकदम छान वाटतात. पण मी जेंव्हा माझ्या भाचीसाठी घेऊन गेलो होतो त्यावेळी मला ती हवी तशी गोड वाटत नव्हतं. तिच पोट अगदी समोर निघाला होत आणि ती फ़्रॉकवरतीच मला अधिक गोड वाटली. अजून थोडी उन्च झाली की दिसेल छान. इथे अस्सल जरीचे पोलले परकर पन्नास डॉलरचा आहे. किती महागडे आहे ना.. प्राजक्ता, तुझी लेक झाली का इतकी मोठी.. :-) देऊ का एक पाठवून परकर तिला.
|
निरजा तुला खरच कुठे काय कपडे मिळतील त्याची किती डिटेल्ड माहीती आहे गं तुला माहिती ठेवावीच लागत असणार पण प्रोफ़ेशन म्हणूनच नाही म्हणत मी फ़क्त तर तुझ्या घरच्यांना पण जेव्हा अशी काही खरेदी करायची असेल आणि तू बरोबर असशील तेव्हा त्यांना किती मजा येत आसणार आणि सगळी इत्थंभूत माहिती पण मिळात असेल तुझ्या बरोबार शॉपींगला... बरे आहे बुवा मजा आहे तुझ्या रिलेटीव्हजची
|
Shonoo
| |
| Thursday, September 21, 2006 - 4:38 pm: |
| 
|
प्राजक्ता तसल्या मद्रासी परकर पोलक्यांना ते लोकं पट्टु पोवाड म्हणतात. पट्टु म्हणजे तेलगू मधे रेशीम असा अर्थ होतो. तामिळ मधे पण तोच असावा. उत्तर अमेरिकेत असशील तर १ ते पाच वर्षापर्यंतच्या मापाचे माझ्या लेकीचे आहेत. तुला दिवाळी पुरता लेकीला घालायला हवा असेल तर मला सांग मी पाठवीन. माझ्या लेकीच्या बारश्यापासून, दिवाळी, सन्क्रांत वाढदिवस अशावेळी माझ्या सासरहून असले परकर येत असतात. अनेक वर्षांनी झालेली, तिच्या पिढीतली पहिली मुलगी असल्याने तिकडच्या अनेक आज़्ज्यांकडून असले परकर पोलके मिळाले आहेत.
|
Prajaktad
| |
| Thursday, September 21, 2006 - 6:51 pm: |
| 
|
शोनू , अज्जुका , बी माहितिबद्दल धन्यवाद! अज्जुकाने फ़ारच छान माहिती दिलिय.पुण्यात राहिल्याने सगळी नाव पटापटा डोळ्यासमोरुन गेली.. शोनू! तुझी लेक फ़ारच लकी आहे.. बी ' मामा ' लाही श्रेया कडुन ' थांतु " श्रेया आता सव्वा २ वर्षाची झाली आहे.. नटण्या मुरडण्याचा प्रचंड सोस आहे. तुम्ही सगळ्यानी लिहलेल्या माहितिवरुन आइडिया आली आहे. माझी आई उत्तम शिवणकाम करते.तेव्हा तिला सांगुन पुण्याहुन कापड मागवुन सगळ जमवता येईल अस वाटतय..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|