Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 18, 2006

Hitguj » Looking for » General » Nauvaari sadi kashi nesatat? » Archive through August 18, 2006 « Previous Next »

Sadhi_manas
Tuesday, August 15, 2006 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नऊवारी साडी कशी नेसतात ते कोणाला माहिती असेल तर इथे स्टेप्स दिल्यास बरे होईल.

धन्यवाद्-


Robeenhood
Wednesday, August 16, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नऊवारी साडी नेसून दाखवावी लागते. ती इथे कशी दाखविणार?

Fulpakhru
Thursday, August 17, 2006 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली ready to wear i mean kalpana नौवारि सड्या मिळतात. पुण्यात आणि मुम्बै थी मिळतात.

Manishalimaye
Thursday, August 17, 2006 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी. बी दादर[दादर वेस्ट ]येथे साडीघर नावाचे दुकान आहे.पुर्वीच्या कोहीनुर सिनेमाजवळ [आता तिथे नक्ष्त्र मॉल झाला आहे ] असणार्या या दुकानात शिवलेल्यानऊवारी साड्या मिळतात. आपणही त्यांना साड्या दिल्या [दोन पाचवारी द्याव्या लागतात ] तरीही ते शिवुन देतात

Rahul16
Thursday, August 17, 2006 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are re....kay paristhiti aali aahe.....

readymade nauwari........chya....

Manishalimaye
Thursday, August 17, 2006 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायका अजुनही साड्या नेसतात,
पण,
पुरुषांनी धोतर फक्त पुजेपुरतच [तेही फक्त भटजीच नेसतात-एरवी भटजीही पेंट[हा शब्द चुकला आहे विचार करुन वाचा] मर्यादित ठेवलंय.


Moodi
Thursday, August 17, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मनिषा पॅंट असे लिही( बरी सापडली नवी विद्यार्थिनी) pa.c.nT

Prady
Thursday, August 17, 2006 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं झालं मनिषा तु माहिती दिलीस त्या दुकानाची. पुर्वी अल्फा मराठी वर मानसी मधे अशा साड्या शिवणार्‍या एका बाईंची मुलाखत झाली होती पण त्या लोकांनी पत्ता नव्हता दिला. बरं झालं तु सांगितलस

Sadhi_manas
Thursday, August 17, 2006 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण त्या सड्यांना पुढे ओचा आसतो का?(मला करेक्ट वर्ड माहिती नाहीये) की सलवार सारख्या दिसतात...म्हंजे शिवलेल्या ओळाखू येतात का?... अर्थात काहिच न मिळण्या पेक्षा नक्किच चांगले...खरच थँक्स मनिषा...बरे झाले मला पण ते दुकान समजले ते...

Sadhi_manas
Thursday, August 17, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरुषांनी धोतर नेसणे बंद केले आहे हे बाकी खरे(पण गुरुजी तरी थोडा वेळ का होईना अजून धोतर नेसतात त्यामुळे लवकरच धोतर कसे नेसतात ते आगदी कोणालाच माहिती नाही असे बहुधा होणार नाही असे वाटते)...पण मला आता असे वाटायला लागले आहे की आजून १५-१७ वर्षानी पारंपारीक पद्धतीने नऊवारी कशी नेसतात ते बहुतेक कोणालाच माहिती नसेल की काय?.. आणि असे झाले तर जरी आजकाल कोणी नऊवारी नेसत नसले तरी आपली पारंपारीक साडी कशी नेसतात ते कोणालाच माहिती नाही म्हणून काही दिवसांनी महाराष्ट्र्रीयन बायकंना हळहळ नक्कीच वाटेल...म्हणूनच जर कोणाला माहिती आसेल तर इथे माहिती दिल्यास बरे होईल.

_धन्यवाद


Naatyaa
Thursday, August 17, 2006 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरुषांनी धोतर नेसणे बंद केले आहे हे बाकी खरे>>> पुण्या मुंबईत नेसत नसतील.. पण New Jersey मध्ये अजुनही नेसतात.. :-)

Dineshvs
Thursday, August 17, 2006 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नऊवारी साडीच्या भरपुर निर्‍या काढुन घ्याव्या लागतात. ती नेसण्याच्या अनेक पद्धति आहेत. मराठा पद्धत, ब्राम्हणी पद्धत वैगरे.

पहिल्यांदा कमरेला डावीकडुन उजवीकडे नेत एक गाठ मारावी लागते. मग आवश्यक तेवढा पदर घेऊन. उरलेल्या सर्व मधल्या भागाच्या भरपुर निर्‍या काढायच्या असतात. ( ईथपर्यंत पाचवारीप्रमाणेच. ) मग या निर्‍यांचा वरचा भाग आत खोचायचा. मग खाली वाकुन या निर्‍यांचा मध्य भाग घेऊन तो दोन पायामधुन पाठीमागे न्यायचा. त्यावर काठ समोर येतील अशी घडी घालुन तो परत मागे खोचायचा.
काहि वेळा सर्व निर्‍या एकाच पायावर घेतल्या जातात.
मागे काश्टा न घेता, नऊवारी साडी पाचवारीप्रमाणे नेसली कि त्याला म्हणायचे केळ. सखाराम बाईंडरमधे चंपा अशी साडी नेसते.
वास्तुपुरुषमधे उत्तरा बावकर मराठा पद्धतिने नऊवारी नेसलीय. CBDG

ब्राम्हणी पद्धतीत, निर्‍यांचा पुढचा भाग वर ओढुन परत पोटाजवळ खोचला जातो.
एवढे मोठे कापड न शिवता ईतक्या सुंदर रितीने परिधान करणे, हा जगातला एकमेव प्रकार असावा.
महाराष्ट्र आणि गुजराथ यांच्या सीमेवरच्या भागात, नऊवारी साडीचा पदर देखील उलटा घेतला जातो.


Vnidhi
Thursday, August 17, 2006 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, सर्वच विषयामध्ये आपले knowledge वाख़ाणण्या जोगे आहे.. आपण महान आहात!

Paragkan
Thursday, August 17, 2006 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोनेक वर्षांपुर्वी एक इंग्रजी पुस्तक पाहिलं होतं. त्यात नऊवारी साडी कशी नेसायची हे रेखाकॄतींचा उपयोग करून दाखवलेलं होतं. पुस्तकाचं नाव गाव वगैरे आता आठवत नाही. पण google search करुन बघा.

Mrinmayee
Friday, August 18, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.ammas.com/topics/Fashion/a112829.html ही लिंक बघा.

Bee
Friday, August 18, 2006 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे अगदी खरय की नऊवारी हा एकच असा पोषाख आहे की जो इतका ९ मीटराचा असूनही मध्ये कुठेच शिवण न करात नेसायचा असतो. एकदा मला एक ८० वर्षाची पणजी भेटली ती मला काकूच वाटत होती. मग कळले तिने साडी नेसली होती म्हणून ती काकू वाटत होती. मला आजी म्हंटल की नऊवार नेसलेली वृद्ध स्त्रिच डोळ्यासमोर येते. अर्थ चित्रपटात रोहीणी हंट्टगडी मोलकरीण असते. तिलाही नऊवारीच दाखवली आहे. कशी मस्त केली त्यांनी ती भुमिका.

Dineshvs
Friday, August 18, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee जुन्या नाटकात सिनेमात अभिनेत्री, घरंदाज पद्धतीने नऊवारी साड्या नेसत असत. बालगंधर्वांचा पण भरपुर प्रभाव होता, या नेसण्यावर.
बावरे नैन या सिनेमात, गीता बालि पण नऊवारी नेसलीय. गाईड मधे, फागुन मधे वहिदा रेहमान नऊवारी नेसलीय.
महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी, या दोघी, आशा पारेख, शर्मिला टॅगोर या सगळ्यानी नऊवारी साड्यातले फोटो काढुन घेतले होते.
लावणी नर्तिका पण साड्या तंग नेसत असल्या तरी, त्यांचे नेसु अंगभर असते.
नऊवारी साडी नेसुन, वावरणे, चालणे खुप सोपे असते. पाचवारी प्रमाणे चालताना अडथळा येत नाही. लांब पावले टाकता येतात. ( थांब लक्ष्मी कुंकु लावते या सिनेमात, जयश्री गडकर विहिरीत ऊडी मारतानाचा शॉट बघा. ) नऊवारी साडी नेसताना, पोटर्‍या पण अगदी थोड्याच ऊघड्या पडतात.
पुढे जयश्री टी ने फ़रार सिनेमात अगदी खाली साडी नेसण्याचा वाईट प्रघात पाडला. पुढे तीच पद्धत माधुरी दिक्षित ( सैलाब, अंजाम ) शबाना, परवीन, झीनत ( अशांति ) ते अगदी अलिकडच्या दिया मिर्झा ( फ़िर हेरा फ़ेरी ) पर्यंत चालत आलीय.
तु म्हणतोस त्या अर्थ सिनेमात, महेश भटने रोहिणीचा लादी पुसताना अगदी हिडिस शॉट घेतलाय.


Bee
Friday, August 18, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या लादी पुसण्याच्या सीनमध्ये महेश भट्ट ह्यांनी तसे मुद्दाम केले नसावे ती एक नकळत घडलेली चूक असेल. खास करुन नऊवारी निवडण्याची चूक.

नेसु अंगभर म्हणजे काय??? ... अजून लिहा दिनेश, धोतर नेसणेही कठिण आहे, तेही लिहा. मी एका नाटकात धोतर नेसले होते तेंव्हा त्याचा कासोटा की काय आवरेनासा झाला माझ्याकडून. माझी आई स्नानाला जाण्यापुर्वीच नेसायच्या नऊवारीच्या निर्‍या तयार करुन ठेवते.


Psg
Friday, August 18, 2006 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही कोणीही तुमच्या आज्जीला नऊवारी साडी नेसताना पाहिले नाही का कधी? अगदी सोपी असते नेसायला. दिनेशनी सविस्तर सांगीतले आहे. निर्‍या मात्र छान करता यायला हव्या, कारण भरपूर निर्‍या होतात. दिनेश, पुढच्या निर्‍या नुस्त्याच खोचायच्या नाहीत पाचवारीसारख्या, त्याचही केळं करता येत. माझ्या दोन्ही आज्ज्या करतात तसं केळं! :-)
लावणी म्हणणार्‍या बायका पाचवारी साडी नऊवारी पध्दतिने नेसतात त्यामुळे ती तंग, अंगाबरोबर बसते.


Bee
Friday, August 18, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला केळं म्हणतात का मला वाटल ओचा.. हीहीही.. ह्या केळात पैसे पण ठेवतात ना काही आज्ज्या. माझी आजी ह्या केळात पैसे नोटी गुंडाळून ठेवायची :-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators