|
हे अगदी खरय की नऊवारी हा एकच असा पोषाख आहे की जो इतका ९ मीटराचा असूनही मध्ये कुठेच शिवण न करात नेसायचा असतो. >>>>अरे बी! पाचवारी साडी धोतर हे सुद्धा कुठेही शिवण न घेता नेसायचे वस्त्र आहे. नवुवारी साडीचा डौल आगळाच असतो.. साडी छान चोपुन बसते. " काश्टा " (निर्या घेवुन झाल्या कि मधला भाग जो मागे नेवुन खोचायचा तो)घेता आल कि झाल साडी सुळसुळित , रेशमी असुन काश्टा सुटेल असेल वाटत असेल तर त्यात बारिक सुपारी घालुन खोचावे. दिनेशदाने चपखल वर्णन केले आहे.
|
Moodi
| |
| Friday, August 18, 2006 - 9:07 pm: |
| 
|
सही दिनेश उत्तम उपयुक्त माहिती.( तुमच्या ज्ञानाचे भांडार बघुन माझ्याच तोंडाचा आ झाला) 
|
Dineshvs
| |
| Saturday, August 19, 2006 - 1:49 am: |
| 
|
आणखी थोडेसे, डोक्यावर पदर घेणे आणि न घेणे हा मराठा आणि ब्राम्हणी पद्धतीतला मुख्य फरक आहे. मराठा लोकात डोक्यावर आवर्जुन पदर घेतला जातो. कदाचित पुर्वी ते शेतात काम करताना उन्हाचा त्रास होवु नये म्हणुन सुरु झाले असेल, पण पुढे अत्यावश्यक बनले. संत जनाबाईचा एक अभंग आहे. डोईचा पदर आला खांद्यावरी जनी म्हणे मी वेसवा झाले. ब्राम्हणी बायका मात्र डोक्यावर पदर घेत नसत कारण केशवपन केलेल्या बायका तसा पदर घेत असत. पण त्या बायका दोन्ही खांद्यावरुन पदर घेत असत. हा पण अगदी ओढुन नव्हे तर अगदी आधारापुरताच ( परत विधवा बायकाना चोळी घालायची परवानगी नसल्याने, त्याना पदर फ़ार घट्ट घेऊन, व्यवस्थित खोचावा लागे ) असा दोन्ही खांद्यावर पदर, केसांचा खोपा, त्यात खोचलेली सोन्याची फुले, असा साज असायचा. अभिनेत्री सुलोचना, कुठल्याहि पद्धतीच्या नऊवारी साडीत छान दिसायच्या. ईंदिरा चिटणीसांचे नेसु शक्यतो ब्राम्हणी पद्धतीचे असायचे. मराठी नाट्यकलाकार कान्होपात्रा किणीकर पण छान नेसत असत. ( त्या स्वतःच नेसत असत. ) या ओच्यात अनेक वस्तुहि बांधता येत. श्यामची आई, सिनेमात शेजारीण ओच्यात बटाटे घालुन चोरुन नेते असा प्रसंग आहे. कुळवाडी, बायका अगदी अघळपघळ नेसतात. रत्नागिरी आणि त्या परिसरातील कातकरी बायका, गुडघ्याच्याहि वर नेसतात, त्यामुळे त्याना ओझे घेऊन चालणे सोपे जाते. ठाकर बायका पदर घेत नाहीत, पण त्यांचे नेसणे नऊवारी पद्धतीचेच असते. ( अर्थात त्यासाठी कमी लांबीचे कापड पुरते ) गरिबीमुळे अनेक बायकाना, दोन साड्या जोडुन साडी करावी लागते. हे दोन भाग वेगवेगळ्या रंगाचेहि असतात. संगीत मंदोदरी नाटकात अश्या भरजरी साड्या वापरल्या होत्या. तश्या तामिळ बायकाहि नऊवारी नेसतात, पण त्यांचे नेसुहि अघळपघळच असते.
|
वा दिनेश तुम्हाला अनेक क्षेत्रातली खरोखरीच फार सखोल माहिती आहे.... you are really genius...खरंच खूप सुंदर माहिती दिलीत.
|
मृण्मयी तू दिलेल्या लिंकवर पण चांगली महिती आहे.
|
वा...शिवलेली आहे ते मुळीच कळत नहीये गं.... अगदी नेसलेल्या साडीसारखीच दिसते आहे आता तू संगते आहेस म्हणून म्हणायचे की शिवलेली आहे... नाही तर आजिबात कळत नाहीये...आणि अगदी पायाच्या घोट्या पर्यंत आहे.... हे बरे झाले... सुटसुटीत (वावरायला आणि नेसायला पण) आहे...आगदी चापून-चोपून नेसल्या प्रमाणे छान दिसते आहे... नेसलेली साडी जर नीट नेसयला जमली नाही तर सगळा बोंगा दिसतो... फोटो पण छान आला आहे.
|
Fulpakhru
| |
| Sunday, September 17, 2006 - 5:40 pm: |
| 
|
मनीशा एकदम मस्त आहे साडीघर मैत्रीणीची साडीघर मधली साडी पाहिली आणि भारतात गेल्यावर वेळ काढून तिथे जाउन आणली तिथे धोतर पण मिळते कल्पना धोतर तेहि आणले नवर्यासाठी आणि मुलासाठी पण फोटो मी मुद्दामच अर्धाच टाकला होता म्हटले साडी दाखवू साडी नेसलेली कशाला दाखवा
|
हो साडीघर छानच आहे,मी या बी. बी. वर साडीघर चा पत्ता आधी दिला आहे. एक सांगु का-- साडी-नेसलेली पण छान असेल तर दाखवावी की नेसलेली पण, नाहीतरी आम्ही कुठे ओळखतो कोण आहे ते फुलपाखरु! आणी फुलपाखरु नेहमीच छानच दिसतं असा एक आपला माझा अनुभव.
|
Ajjuka
| |
| Monday, September 18, 2006 - 5:06 am: |
| 
|
सगळ्या compliments मधे थोडा विसंवादी सूर लावतेय. साडी शिवलेली वा नेसलेली पण फोटो मधे अनेक चुका दिसून येतायत. नव्वार साडीचा पदर ओचा किंवा बिनओच्याचा, पदर हा नेहमी उजव्या गुडघ्याच्या खालून जातो सहावार साडीसारखा मांडीवरून नाही. आणि ओच्याची साडी इतकी पायघोळ कधीच नसते. मुळात ब्राह्मणी साडी ही घोट्याच्या लगत असते पावलावर कधीच येत नाही. मराठमोळी किंवा दुटांगी नव्वार ही थोडी घोट्यापसून पुढे पावलावर रुळते पण तेही नेहमी नाही सणासुदीच्या साड्यांमधेच. काही ९६ कुळी सरदार आणि राजघराणी आहेत त्यांची पद्धत मात्र शालूचा काठ पायघोळ रुळण्याची आहे. असो दुसरे असे की साडीचा पदर दुटांगी असेल तर डोक्यावरून आणि ओच्याची असेल तर दुसर्या खांद्यावर घ्यायचा असतो. आपण सहावार नेसताना पदराच्या आधि निर्या करून त्याची एक level येईल असे बघुन मग खांद्यावर टाकतो नव्वारीत ही level एक करायची नसते. पदर खांद्यावर किंवा डोक्यावर घेतला की मग ती level एक होते. पदर खूप मोठ्ठा काढायचा नसतो hip level लाच ठेवायचा असतो. अतिशहाणपणा नाही माझ्या रोजच्या कामातल्या आणि संशोधनाच्या गोष्टी आहेत ह्या म्हणून सांगतेय. अर्थात हे perfection नाही आले तरी नव्वार नेसलेय्घातलिये म्हणल्यावर कौतुकच होते.
|
Ajjuka
| |
| Monday, September 18, 2006 - 5:29 am: |
| 
|
पूनम आणि दिनेश, सहावारीप्रमाणे निर्या नुसत्या खोचायच्या नाहीतच. एक्तर निर्या सहावारीच्या उलट घ्यायच्या असतात आणि मग शेवटची निरी त्यावरून लपेटून तिचे टोक खोचायचे असते मग त्या खोचायच्या किंवा केळं करायचं. खरतर हे नेसणं खूप सोप्प आहे पण हातामधे सफाई आणि शरीरावर कापड कसं बसतं याचा अंदाज एकदम perfect पाहिजे आणि तो मात्र सवयीनेच येतो. असो.. सध्या मुंबई विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्याबरोबर हाच विषय चालू आहे माझा त्यामुळे एकदम fresh झालंय सगळं. वर कुणीतरी पुस्तकाबद्दल विचारलं.. रिता कपूर नावाच्या बाईची 'सारीज् ऑफ इंडीया' नावाची सिरिज आहे. त्यातले शेवटचे ती आता संपवतेय. त्यात तिने महाराष्ट्र cover केलाय. कोळी, आगरी, कुणबी ते मराठमोळी दुटांगी, ओच्याची ब्राह्मणी या सगळ्या नेसण्याच्या पद्धतींपासून, कापड विणण्याची ठिकाणे, बाजारपेठा आणि त्यांची वैशिष्ठ्ये इत्यादी सगळ्याच गोष्टी. मराठी नेसण पद्धतींच्या संदर्भात मी तिला थोडी मदत केली होती म्हणून मला माहिती. पण खरंच साड्या-धोतरं नेसण्याच्या, पगड्या-फेटे बांधण्याच्या पद्धती आपल्या समाजाच्या विस्मरणात जात चालल्या हे खूप वाईट आहे. रोजचा वापर सोयीचा नाही हे खरं आहे पण नव्वारीची हौस आहे तर नेसायला शिकायला काय हरकत आहे? आमच्या क्षेत्रात शिवलेली साडी कधी कधी परीहार्य होऊन बसते. नाटकत २ मिन मधे दुसरी साडी नेसायची असेल तर पर्याय नसतो किंवा एखाद्या scene मधे १०० बायका नव्वारी साडीत असतील आणि त्यातल्या कुणालाही नेसता येत नसेल तर नेसवणार्यांना बोलावले तरी इतक्या नेसवणार्या बायका मिळायच्या कुठून आणि मिळाल्या तर परवडतीलच unit ला असं नाही त्यामुळे शिवलेल्या नव्वार्या हा पर्याय उरतो. मी माझ्या shoots वर हे होऊ देत नाही. पण त्यासाठी costume designer ला स्वतअला येत असल पाहिजे ना. असो..
|
Dineshvs
| |
| Monday, September 18, 2006 - 5:16 pm: |
| 
|
नीरजा, हा विषय निघाल्यापासुन तुझी आठवण येत होती. तुझ्याकडुनच नेमकी माहिती मिळणार, हे माहितच होते. कर्नाटकातल्या कुर्ग प्रांतात आणखी वेगळी पद्धत आहे. त्या बायका निर्या मागे घेतात. पदर समोरुन पण खांद्याच्या आतुन घेतलेला असतो, व परत मागुन खांद्यावरुन पुढे आणुन पिन अप केलेला असतो.
|
निरजा नऊवार खरच कशी नेसतात त्यची बरीच महिती दिलीस... आता रेडीमेड साडी विकत घेण्यापूर्वी एकदा नेसता तरी येते का ते अवश्य बघेन... एकदा प्रयत्न जरूर करून बघेन... नऊवार नेसल्यावर कशी दिसली पाहिजे हे आता खूप स्पष्ट आणि छान समजले.
|
Ajjuka
| |
| Monday, September 18, 2006 - 6:39 pm: |
| 
|
हो मी पाहिलिये तशी साडी पण ती सहावारच असते काष्ट्याची नव्वार नसते ना.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 19, 2006 - 1:38 pm: |
| 
|
हो ती सहावारच असते. आणि काष्टा नसतो. पण त्या बायका सणावारीच त्या पद्धतीने नेसतात. मी परवा वाचलं कि साडीचा उगम हा धोतरापासुन झालाय. पुर्वी स्त्री पुरुष दोघेहि धोतरसदृष्यच काहितरी नेसायचे. रुंद माग नसल्याने, सगळीच वस्त्रे आखुड पन्न्याची असत. खाली धोतर व खांद्यावर असलेच तर उत्तरीय असा पोशाख असे.
|
Ajjuka
| |
| Tuesday, September 19, 2006 - 3:24 pm: |
| 
|
बरोबर आहे. अंतरीय, कटीवस्त्र, उत्तरीय आणि उष्णीष (डोक्याचे) हे ४ प्रमुख भाग होते वस्त्रांचे मौर्य काळात. इसपू ३२० ते इस २००-३००. स्त्री व पुरूष दोघांच्याही वस्त्रांमधे फरक नव्हता.
|
Ajjuka
| |
| Tuesday, September 19, 2006 - 3:34 pm: |
| 
|
>>1. रत्नागिरी आणि त्या परिसरातील कातकरी बायका, गुडघ्याच्याहि वर नेसतात, त्यामुळे त्याना ओझे घेऊन चालणे सोपे जाते. ठाकर बायका पदर घेत नाहीत, पण त्यांचे नेसणे नऊवारी पद्धतीचेच असते. ( अर्थात त्यासाठी कमी लांबीचे कापड पुरते ) 2. गरिबीमुळे अनेक बायकाना, दोन साड्या जोडुन साडी करावी लागते. हे दोन भाग वेगवेगळ्या रंगाचेहि असतात. << दिनेश, हा वरचा भाग आत्ताच वाचला. १. कोकणातल्या आदिवासी म्हणजे ठाकर, कातकरी, वारली इत्यादी, मुंबईपासच्या कोळी आणि आगरी बायका आणि आदिवासी नसलेल्या काही कुणबिणींचे नेसणे हे मराठमोळ्या दुटांगी पद्धतिचे नसते हो. आणि साडीही लहान नसते. साडी नव्वारच म्हणजे कापडाची लांबी व रूंदी नऊ वारी साडीइतकीच असते पण गाठ मारून, निर्या घेऊन नेसली जात नाही. निर्यांचा ऐवजी बराचसा भाग पुढचा पंखा आणि कमरेभोवतीचे वेढे यात आटवला जातो. तरीही नेसल्यावर cycling shorts पेक्षाही comfortable आणि मोकळे ढाकळे वाटते. २. दोन वेगवेगळ्या साड्या जोडून एक केलेल्या नव्वार साडीला दंडाची साडी म्हणतात.
|
Ajjuka
| |
| Tuesday, September 19, 2006 - 3:39 pm: |
| 
|
साधी, अग अजून खूप काही details आहेत पण इतकं टायपत बसायचा कंटाळा करतेय. पण तुला कुठे अडलं तर सांग नक्की. मी लवकरच माझी माझी प्रत्येक stage ची sketches तयार करणारे. ती झाली की इथे देईन. स्वतःची वेबसाइट आणि lectures bank करण्याच्या दृष्टीने तयारी चालू आहे. त्यातलाच हा एक भाग.
|
वा निरजा...किती छान होईल स्केचेस इथे दिलीस तर... माझ्या सारख्याच अनेक जणींना ज्यांना नऊवारी आवडते पण, आणि नऊवारीची हौस पण आहे त्यांना... प्लिज बघ खरच तुला वेळ झाला की नक्की
|
Ajjuka
| |
| Wednesday, September 20, 2006 - 2:49 am: |
| 
|
हो टाकीन. माझ्या पेज वर टाकीन आणि लिंक देईन. माझे विद्यार्थी काही मायबोली वर येत नाहीत आणि इथे जागाही खूप व्यापली जाईल.
|
लग्नात जेवणाच्या ताटाभोवती महिरप असतो तो कसा तयार करतात ते कुणी सान्गू शकेल का? मला qqplus@yahoo.com या पत्त्यावर ईमेल करावी.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|