Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 25, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » Hitguj T-shirts » Archive through July 25, 2007 « Previous Next »

Jayavi
Friday, April 13, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओहो....ठिक आहे.......जुलैमधे आम्ही आहोत भारतात :-)

Vinaydesai
Friday, April 13, 2007 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण आहे ना... जुलै मध्ये...


Psg
Saturday, April 14, 2007 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, तुम्ही या वर्षी पण असाल का वविला? dumb charades ची तयारी करून या जोरदार मग :-)

जया, पूर्ण जुलै असशील का गं? पवसाच्या दृष्टीने शक्यतो जुलै एंड ठेवतो ना ववि..


Jayavi
Saturday, April 14, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम.....हो.....मी चक्क ऑगस्ट २१ पर्यंत भारतात आहे. आता पुण्यात असेन की नाही माहीत नाही. पण जरा आधी कळलं तर तसाच प्रोग्रॅम बनवता येईल.

विनय....अरे वा.....म्हणजे आता याची देहि याची डोळा बघता येईल :-)

Badbadi
Saturday, April 14, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, बघा...तुम्हाला बघायची किती उत्सुकता आहे आखातवासीयांना... नि तुम्ही जाता आपले राणीच्या देशात

Vinaydesai
Saturday, April 14, 2007 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राणीच्या देशात कुणी भेटणार नाहीत मला.. त्यापेक्षा आखाती देशात जातो... :-(

पुनम, मी घरी बसल्या बसल्या तयारी करतच असतो खेळण्याची..


Svsameer
Saturday, June 02, 2007 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व.वि.संयोजक तुम्हाल हितगुजवरुन मेल केली आहे ती मिळाली का?

Psg
Saturday, June 02, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

svsameer , तुम्हाला हितगुजवरून उत्तर दिले आहे

Vavi_sanyojak
Monday, June 18, 2007 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!!

यंदाच्या वर्षी पुन:श्च मायबोलीकरांसाठी मायबोलीचा लोगो असलेले टी शर्टस् विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
टी शर्टस् हाफ स्लीव्हस् ( Half Sleeves ) असुन दोन प्रकारात उपलब्ध आहेत :
-- व्ही नेक कॉलर
-- राऊंड नेक

तसेच टी शर्टस् दोन रंगात उपलब्ध आहेत
-- ग्रे
-- बेज

(रंग तसेच प्रकारासाठी टी शर्टची image दिलेली आहे)

टी शर्ट खालील साईझेस मध्ये उपलब्ध आहेत:
-- Extra Small (XS) 13 36"
-- Small (S) - 38"
-- Medium (M) - 40"
-- Large (L) - 42"
-- Extra Large (XL) - 44"
-- Extra Extra Large (XXL) - More than 44"


कृपया मायबोलीकरांनी त्यांची ऑर्डर
mb_tshirts@yahoo.co.in ह्या mail id वर दिनांक १ जुलै २००७ पर्यंत कळवावी. मेलच्या subject मध्ये Hitguj T-shirt order असे लिहावे.

ऑर्डर खालील format मध्ये द्यावी:
१. नाव
२. मायबोली id
३. पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक
४. टी- शर्ट चा प्रकार
५. टी- शर्ट चा साईझ
६. टी- शर्टची संख्या
७. टी- शर्टचा रंग

(एकापेक्षा जास्त आणि वेगवेगळ्या साईझ मध्ये हवे असल्यास तसे स्पष्ट लिहावे.)

आपापली order दिनांक १ जुलै २००७ पर्यंत कळवावी. त्या नंतर कुठलीही order स्विकारली जाणार नाही.

Order निश्चित करणे व रहीत करणे या दोन्ही साठी १ जुलै २००७ ही तारीख बंधनकारक असेल.

तसेच admin आणि इतरांच्या सुचनेनुसार, T-Shirt च्या किंमतीच्या काही टक्के रक्कम कुठल्याही एखाद्या charity trust ला द्यावी असा एक विचार आहे. त्यानुसार किंमती खालील प्रमाणे.
V-Neck Collar - 250+50(charity) = Rs. 300/-
Round Neck - 150+50(charity) = Rs. 200/-

ह्या वर्षी Charity चे पैसे "मानव्य गोकुळ" ह्या संस्थेला देण्याचे ठरले आहे. ही संस्था AIDS झालेल्या लहान मुलांसाठी काम करते.
मानव्य गोकुळ
पौड रोड, माताळवाडी फाटा, भूगाव,
मुळशी, पुणे ४११ ०२१
फो. नं. ३२३०२६९५

टी-शर्टचे पैसे ८ जुलै २००७ रोजी खालील ठिकाणी व.वि. च्या वर्गणी बरोबर संयोजकांकडे जमा करावी. तसेच व.वि. ला न येणार्‍या परंतु टी-शर्ट हवे असणार्‍यांनीही पैसे व.वि. संयोजकांकडेच ८ जुलै २००७ रोजीच भरावेत.

पुणेकर मायबोलीकरांसाठी:
तारीख: ८ जुलै,२००७
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली वेळ: सं. ५.३० ते ८.००
मुंबईकर मायबोलीकरांसाठी:
तारीख: ८ जुलै,२००७
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ८.००


ज्यांना On-line पैसे भरायचे असतील त्यांनी तसा मेल मध्ये उल्लेख करावा म्हणजे त्यांआ त्यानुसार बँक अकाऊन्ट नंबर कळविण्यात येईल.

order निश्चित करण्यासाठी पुर्ण पैसे भरणे आवश्यक अहे.

व.वि.ला उपस्थित मायबोलीकरांना व.वि. च्या वेळेस टी-शर्टस् देण्यात येतील. जे व.वि.ला येणार नाही आहेत त्यांनी टी-शर्ट नेण्याची सोय नंतर स्वत: करावी.

तेव्हा त्वरा करा आणि आपली टी शर्ट ची ऑर्डर आजच द्या!

धन्यवाद. !!




Vavi_sanyojak
Tuesday, June 19, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी,वरील t-shirt संदर्भात एक सूचना आहे.. round neck t-shirt चा shape पुरूष आणि महिला दोन्हींसाठी सारखाच आहे.. तेव्हा confused होऊ नका:-)

Vavi_sanyojak
Tuesday, June 19, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, टी-शर्ट संदर्भात अजुन एक माहिती.
टी-शर्टवर असलेला मायबोलीचा लोगो Embroidary केलेला असणार आहे. तसेच उजव्या हाताच्या बाहीवर
www.maayboli.com अशी Embroidary असणार आहे

Prady
Tuesday, June 19, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व वि संयोजक उसगावात T-shirt पाठवायची काही सोय आहे का? किती खर्च होईल उसगावात पाठवण्याचा.

Vavi_sanyojak
Thursday, June 28, 2007 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी.. त्वरा करा... टी-शर्ट बुकींगसठी शेवटचे ४ दिवसच राहीले आहेत.... लवकरात लवकर बुकींग करा

Vavi_sanyojak
Monday, July 02, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी एक आनंदाची बातमी..
अजुनही ज्यांना टी-शर्ट्स हवे असतील ते ऑर्डर बुक करु शकतात..
कारण ऑर्डर बुक करायची शेवटची तारिख ४ जुलै करण्यात आली आहे... तेव्हा त्वरा कारा आणि पटापट मेल करा


Raviupadhye
Monday, July 09, 2007 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनख़ी योक धा दीस वहाडवा ना राव

Runi
Monday, July 16, 2007 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ववि संयोजक,
मी मध्ये बरेच दिवस माय्बोलि वर नसल्याने मला ही बातमी कळली नाही. आता order केले तर चालेल का?
प्लिज प्लिज हो म्हणा.
मी गेली १-२ वर्ष T-shirts ची वाट बघत होते, म्हणजे अजुनही आहे.


Vavi_sanyojak
Wednesday, July 25, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या वर्षीच्या टी-शर्ट संदर्भातील हिशेब...

एकूण टी-शर्टस् ६४
Round Neck १३
Collared ५१

जमा झालेले पैसे
(१३ x २०० २६००) + (५१ x ३०० १५३००) = १७९००

चॅरिटीची रक्कम
६४ x ५० = ३२००

ही रक्कम लवकरच चेक द्वारे "मानव्य गोकुळ" ह्या संस्थेस देणगी म्हणून देणार आहोत.


Psg
Wednesday, July 25, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! या वेळी अगदी वेळेत झाले पूर्ण सगळे काम. अभिनंदन टीशर्ट संयोजक! :-)

Vinaydesai
Wednesday, July 25, 2007 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फक्त 64? .... त्यातले सहा तर मीच आणले US ला.. मला वाटलं निदान 100 तरी लागतील म्हणून...

देणगी निमित्त ववी संयोजकांचे अभिनंदन


Vavi_sanyojak
Thursday, July 26, 2007 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे विनय,मागच्या वर्षीपेक्षा जास्तच आहे रे संख्या..:-) आणि मागच्या वेळेस ज्यांनी T-shirts घेतले होते त्यातल्या बर्‍याच लोकांनी यावर्षी घेतले नाहीत त्यामुळे दोन वर्षांची गोळाबेरीज केली तर संख्या शंभरच्यावरच जाईल:-).




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators