Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 08, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज दिवाळी अंक » दिवाळी अंक पूर्वतयारी » दिवाळी अंक २००७ पूर्वतयारी » Archive through November 08, 2007 « Previous Next »

Sampadak
Wednesday, October 24, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम,सुपरमॉम तुमच्या कथा मिळाल्या आहेत,
पोच दिली आहे

Anamik
Wednesday, October 24, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एक लेख पाठवलाय. पोच मिळेल का?

Prasad_shir
Wednesday, October 24, 2007 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार संपादक मंडळी

एक गझल post केली आहे... नीट मिळाली का?

मला एक media file पाठवायची होती, पण कशी पाठवायची कुठे upload करायची हे समजलं नाही... कृपया त्याची सूचना मेल करू शकाल का (अर्थात आता ती घेणं शक्य असेल तर)?


Sampadak
Wednesday, October 24, 2007 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साहित्य पाठवण्याचा शेवटचा दिवस हा हा म्हणता येऊन ठेपला! बरेच साहित्य एकत्र येत असल्याने पोच द्यायला थोडा विलंब होत आहे. तरीही सर्वांना २८ तारखेपर्यंत जरुर पोच देऊ. तोपर्यंतही पोच मिळाली नाही तर संपादक मडळाला ईमेल करावी ही विनंती. तसेच साहित्य पाठवण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तेव्हा कृपया आपले साहित्य आज जरुर पाठवा. या संदर्भात काही प्रश्न वा अडचणी असतील तर ईमेल करायला संकोचू नका. धन्यवाद.
सस्नेह,
संपादक मंडळ


Sampadak
Wednesday, October 24, 2007 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिक, तुमचा लेख मिळाला आहे. धन्यवाद.

प्रसाद, तुम्ही media file 'sampadak_hda AT yahoo DOTcom' वर ईमेल करु शकाल का? इतर काही अडचण असल्यास याच ईमेलवर कृपया संपर्क साधावा ही विनंती.


Nandini2911
Thursday, October 25, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक माझा लेख मिळाला का?
कारण मला सेंट मधे दिसत नाहिये. (ते आज चेक केले आणि लक्षात आले.) परत पाठवु का? थोडेसे शुद्धलेखन पण निस्तरेन :-)
मुलाखतीसंदर्भात मला काहीच उत्तर न मिळाल्याने मी ती पाठवू शकले नाही. बिचारे विलासराव केस बिस विंचरुन तयार होते. रितेश पण शूटिंगमधून मुदाम रजा घेऊन आला होता. पण संपादकाकडून काहीच ग्रीन सिग्नल न आल्याने सगळं मुसळ केरात गेलं, :-) तरी जर अजून वेळ आणि जागा असेल तर सांगा. काम होऊन जाईल


Sampadak
Thursday, October 25, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी, तुमच्याकडून साहित्य आलेले नाही.
आणि मुलाखतीबद्दल कोणतीही ईमेल संपादक मंडळाला मिळालेली नाही. तुम्ही ती ईमेल इथे पूर्वी बर्‍याच वेळा दिलेल्या 'sampadak_hda AT yahoo DOTcom' या पत्त्यावर किन्वा इथे या बीबीवर पोस्ट केली असती तरी उत्तर नक्कीच मिळाले असते. असो.आता उशीर झाला आहे, तरीही प्रतिसादाबद्दल धन्यवाद.


Vinaydesai
Thursday, October 25, 2007 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक, संदीप्_चित्रे या नव्या (जुन्या) मेम्बरने साहित्य पाठवलं होतं, पोच मिळाली नाही म्हणतोय...
मिळालं असल्यास इथेच कळवा...



Sampadak
Friday, October 26, 2007 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, संदीप चित्रे यांचे साहित्य मिळाले आहे. धन्यवाद.

सर्वांना रविवारपर्यंत नक्की पोच दिली जाईल.


Sanghamitra
Friday, October 26, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक,
मी जी गोष्ट पाठवलीय त्यात काही किरकोळ शुद्धलेखनाच्या चुका राहिलेल्या नंतर लक्षात आल्या. जर निवडली गेली असेल आणि अजून कुणी त्यावर काम सुरू केले नसेल तर मीच दुरुस्त करून पाठवू का?


Savyasachi
Friday, October 26, 2007 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मे, तू ते नमुना म्हणून जे शुद्धलेखन लिहीले होतेस ते बघता, तुच दुरुस्त्या कशाला करतेस? दिवा :-)

Sampadak
Monday, November 05, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लवकरच प्रसिद्ध होणार!!! हितगुज दिवाळी अंक २००७!!!


बघता बघता दिवाळी अगदी काही दिवसांवर आली! आणि दिवाळीच्या आगमनाबरोबरच हितगुज दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा दिवसही! अंकासाठी मायबोलीकरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनःपूर्वक आभार! अनेक लक्षवेधी साहित्यप्रकारांनी नटलेला हा विविधरंगी अंक आपल्याला नक्की आवडेल अशी आम्हाला आशा आहे. अंकातल्या काही आकर्षणांची झलक आपल्यापुढे येत्या काही दिवसात सादर करत आहोत.

*******

"चाळीला सुमी म्हणजे चष्मा, चापून चोपून बांधलेल्या दोन वेण्या आणि सदैव हातात एखादं पुस्तक - इतकीच ओळख होती. आणि दहावीला चांगले मार्क मिळाले म्हणून मुंबईच्या कॉलेजमधे घालायला आणल्ये ही तिच्या आईने दिलेली ऍडिशनल माहिती.
तर त्याचं झालं काय, की सुमीचे बाबा घरी यायच्या वेळी घरातलं दूध नासल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं. आता निदान आल्यावर त्यांना चहा तरी करायला हवाच होता.. शेजारच्या काकूंकडचंही दूध नेमकं संपलं होतं, पण कधीही लागलं तर दीनानाथाकडे मिळेल ही माहिती मात्र त्यांनी दिली. त्या कामावर सुमीची रवानगी झाली."

पुढे काय झालं? वाचा, "सुखात्मे" या स्वाती आंबोळे यांच्या कथेत!

*******


"त्या गर्द झाडीकडे आणि मागच्या डोंगराकडे पाहिलं की मन पण गर्द होतं ना? अजून मोकळं, मोठं?"
तिने समोर येऊन बसत विचारले. तो मायेने हसला.
"आज खरं तर मीच तुला म्हणणार होतो कुठे तरी जाऊ या म्हणून. पण तुला कशी आठवण झाली इथे यायची?"
"अरे एक आनंदाची बातमी सांगायची होती तुला. इथे साजरं करावंसं वाटलं."

"एक दिवस" या कथेतून रोमॅटिक मूडमधे हळूवारपणे घेऊन जात आहेत संघमित्रा.

*******


"आता बर्‍याच स्टेबल आहेत मिसेस सोहोनी. आपल्याला कल्पना येत नाही पण सायनस हा कधी कधी फार गंभीर रूप धारण करू शकतो. मेंदूवरही थेट परिणाम होऊ शकतो. पण सुदैवाने त्यांच्या मेंदूला काहीही झालेले नाही. त्यांचा सायनस काबूत आहे. आता, ब्रॉन्कायटीसबद्दल- यामध्ये काय होते, की फुफ्फुसात कफ साठतो, पूर्ण घसा ऍफेक्ट होतो आणि फुफ्फुसात कफ असल्यामुळे तापही बराच येतो. मला वाटते त्यांनी अंगावर बरेच दिवस हा त्रास काढला असावा. कारण कफ सगळीकडेच पसरला होता. आता आपण तो काढला आहे. पण.. "

कधीही ऐकू येऊ नये असा 'पण...' डॉक्टरांकडून ऐकल्यावर काय झाले? ते वाचा "अबोली" या "पूनम ( Psg )" यांनी फुलवलेल्या कथेत.

*******


"शीला आणि सतीश गाडगीळ क्लबमध्ये बसले आहेत. दर शुक्रवार दुपार ही त्यांची पत्ते खेळायची ठरलेली वेळ आहे. कार्डरूममध्ये आपापल्या वेगळ्या ग्रुप्स मध्ये दोघेही वेगवेगळे खेळतायत.

शीलाच्या हातात पत्ते असले तरी आज तिच्या डोक्यात विचार धाकटा मुलगा नीरज आणि सून नेत्राचे आहेत. दोघातील भांडणे विकोपाला गेली आहेत. आठ दिवसांपासून नेत्रा लंडनला एका प्रोजेक्टसाठी गेली आहे. पण तिने अजून एकदाही फोन केला नाहीये. बाजूला बसलेली स्वाती आज न आलेल्या प्रतिभाविषयी काही सांगतेय पण त्यातही शीलाचे लक्ष नाहीये."

शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी "दोन शेवट" ही खास कथा आहे "हवा हवाई" यांची.

*******


या आणि अशा अनेक आकर्षणांसह लवकरच प्रकाशित करत आहोत, "हितगुज दिवाळी अंक २००७"!


Kandapohe
Monday, November 05, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा जोरात आहे की संपादक मंडळ. आणखी येवू दे म्हणत नाही त्यापेक्षा अंक येवू दे म्हणावे.

Akhi
Monday, November 05, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंक केव्हा मिळेल नरकचतुर्दशी ला की लक्ष्मीपुजना ला?

Badbadi
Monday, November 05, 2007 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी येवू दे म्हणत नाही त्यापेक्षा अंक येवू दे म्हणावे >> अगदी अगदी!!

Sampadak
Tuesday, November 06, 2007 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"बाणकोटचा बाल्या सरळ मुंबईत आला तो आमच्या गावात म्हणजे मालाडला(मुंबई). तो इथे आला म्हणण्यापेक्षा आणला गेला. मला काही कळायच्या आधीपासूनच तो आलेला होता म्हणजे माझ्यापेक्षा चांगलाच मोठा होता (तरीही सगळे त्याला एकारांतीच हाक मारायचे). त्याचे लग्न झालेले होते. एकदोन मुलेही होती; पण हे सगळे कुटुंब गावीच असायचे. क्वचित प्रसंगी दोनचार दिवस मुंबईला येत तेवढेच. आम्ही ज्या चाळीत राहात होतो त्या चाळीच्या मालकांकडे हा घरगडी म्हणून होता. पण फावल्या वेळात आणि मालकांच्या परवानगीने वाडीतल्या एकदोन घरांतील धुणी-भांडी करत असे."

प्रत्यक्ष न भेटताही "श्वना"ला डोळ्यासमोर उभा करत आहेत प्रमोद देव!

*******


"कॉलेजमधे गेल्यावर बाकीच्या मुलींपेक्षा आपले सगळेच वेगळे असावे असे एक वेड असते. त्यात ड्रेसेस पण आलेच. आकर्षक दिसणारे ड्रेसेस असावेत आणि ते असले म्हणजे जग जिंकल्याचे लक्षणच. त्यातूनच मला माझ्या प्रत्येक ड्रेसवर काहीतरी भरतकाम कर, कुठे पेंटिंग कर अशी सवय लागली."

आपल्या सुई दोर्‍याच्या आकर्षणाबद्दल "रेशमाच्या रेघांनी" लिहितायत मिनोती.

*******


स्मिता दीक्षित कोल्हापुरात मतिमंद मुलांसाठी "जिज्ञासा" ही संस्था चालवतात. या संस्थेबद्दलचे अनुभव व त्यांच्या यापुढील उपक्रमांविषयी माहीती वाचा त्यांनी पाठवलेल्या विशेष लेखात.

*******


"आता बस रस्त्याला लागली होती... कंडक्टर समोर येताच तिनं तिकीट घेतलं आणि ती निर्धास्त झाल्यासारखी व्यवस्थित बसली. मांडीवरच्या प्लास्टिकच्या पिशवीतलं एक पॅकेट घाईघाईनं काढून आधाशासारखं तिनं दातांनीच फाडलं आणि आतला पदार्थ काढून तोंडात कोंबला... नंतर प्रत्येक पॅकेटमधला एकेक पदार्थ ती असाच तोंडात कोंबून भरत होती... "

अवचित बरसून गेलेल्या पावसासारखा तरल मनाला चिंब करुन सोडणारा अनुभव "बरसात" मधे शब्दांकित करत आहेत, झूलेलाल.

*******


या आणि अशा इतर बहारदार ललित लेखनासह लवकरच आपल्या भेटीस येतो आहे - "हितगुज दिवाळी अंक २००७"!
दिवाळी अंक प्रकाशनाची तारीख: उत्तर अमेरिकेतील वेळेनुसार नरकचतुर्दशी ८ नोव्हेंबर, २००७ रोजी.


Zakasrao
Tuesday, November 06, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी म्हणेन लवकए येवुद्या :-)
उत्सुकता ताणली आहे.


Sampadak
Wednesday, November 07, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"सात" या विषयावरचा खास विभाग हे यावर्षीच्या दिवाळी अंकाचं आणखी एक आकर्षण. या सप्तायनाची ही एक छोटीशी झलक...

*******


"नायक गरीब घरातला असला तर तो नायिकेच्या घरी 'जनमदिनके अवसरपर' येऊन तिच्या घरच्या पियानोवर बोटे उमटवणार. आणि नायिका तर काय, येता-जाता कधीही फुल्ल मेकप आणि भा.अ. गेटप मधे पियानोला छेडत रहाणार. साठच्या दशकापर्यंतच्या सगळ्या नायिका 'बचपन'मधून 'जवानी'त प्रवेश करताना पियानो वाजवणार. प्रेमात पडताना पियानो वाजवणार. 'प्यार का इजहार' करताना पियानोला आधी सांगणार. नायकाबरोबरचे रुसवे-फुगवे.. वाजवला पियानोला."

सप्तसुरात गुंफलेली "पियानोवरची सात गाणी" आपल्यासमोर सुरेलपणे आणतायत, ट्युलिप!

*******


"...तरी हळूहळू सगळ्यांची निरोपाची भाषाच सुरु झाली. … सर्वांनी तो त्यांच्या सहलीचा फोटो मात्र जपून ठेवला. पुन्हा आपण सातही जणी तशा एकत्र येऊ की नाही असं मनात प्रत्येकीलाच वाटलं असणार. आजचं भेटणंही तसं मारून-मुटकून जमवून आणलेलं, तरी राणी नव्हतीच! या ठिपक्यांना एकत्र जोडणारी रेषा हळूहळू पुसट होत चालली होती आणि प्रत्येक ठिपका स्वतःसाठी आखून घेतलेल्या, ठरवलेल्या स्वतंत्र ओळीत चालायच्या तयारीला लागलेला..."

परिस्थितीने दूर गेलेल्या पण मनाने तरीही जवळच्या नात्यांमधला प्रवास जेलो घडवतायत "सात ठिपके, सात ओळी" या कथेत.

*******


"आभाळा" ही प्रसाद शिरगांवकर रचित दीर्घ गझलही या खास विभागातून आपल्यासमोर येत आहे.

*******


या व इतर खास आकर्षणांसह लवकरच प्रकाशित होत आहे, हितगुज दिवाळी अंक २००७!


Zulelal
Thursday, November 08, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळीच्या लखलख शुभेच्छा!!
लवकर येऊ दे दिवाळी अंक!


Chioo
Thursday, November 08, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा. :-)
कधी येणार दिवाळी अंक?? आणि कुठे?





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators