Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
दिवाळी अंक २००७ पूर्वतयारी ...

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज दिवाळी अंक » दिवाळी अंक पूर्वतयारी » दिवाळी अंक २००७ पूर्वतयारी « Previous Next »

नमस्कार मायबोलीकर

यंदा हितगुज दिवाळी अंकाचे ८वे वर्ष. गेली ७ वर्षे आपल्या सहकार्यामुळेच दरवर्षी उत्तमोत्तम अंक प्रकाशित होत आहे. तेव्हा यंदा संपादक मंडळात ज्याना काम करायची इच्छा आहे त्यानी तसेच ज्याना layout देवनागरिकरण, शुद्धलेखन तपासणी करायची इच्छा आहे त्यानी support at maayboli dot com ला ईमेल पाठवावी.

तसेच आपल्या काही सुचना असल्यास इथे लिहाव्यात.

  Thread Posts Last Post
Archive through September 06, 200720 09-06-07  10:41 am
Archive through October 23, 200720 10-24-07  3:27 am
Archive through November 08, 200720 11-08-07  12:57 pm

Peacelily2025
Thursday, November 08, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उत्सुकता कमालीची ताणली गेलीय. आज नरकचतुर्दशी, आज दिवाळी अंक प्रकाशित व्हायला हवा. कधी? कुठे? नेहमीप्रमाणेच वाचनीय असेल यात शंकाच नाही. लवकर येऊ द्यात. सर्व मायबोलिकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी व नवे वर्ष सर्वान्ना सुखकारक ठरु दे!

Rimzim
Thursday, November 08, 2007 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपादक
अगदी वाईट्ट्ट्ट्ट आहे तुम्हि. आता असं उस्तुकता वाढवुन गायब होणे बरे नाहि हो SSSSSSSS

मग उद्या प्रकाशीत होणार ना अमचा दिवाळी अंक?


Peacelily2025
Thursday, November 08, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता उद्यापर्यंत वाट पाहायला हवी? हे काही बरे नव्हे, संपादक मंडळी! आता दिवाळीच्या दिवशी तरी प्रकाशन होऊ देत.

Lalu
Thursday, November 08, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'उस्तुकता' :-) दर वर्षी इथे नवनवीन शब्द वाचायला मिळतात.. 'उत्सुक्तता', 'उस्तुकता'. :-) ~D

का? उद्या का? आज का नाही? "उत्तर अमेरिकेतील वेळेनुसार" असं काहीतरी लिहिलंय वरती... अजून आहे की 'आज'.


Swaatee_ambole
Thursday, November 08, 2007 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे आज 23:59:59 EST ( की PST हो संपादक? आता उत्तर अमेरिका म्हटलं तर काय समजायचं?) पर्यंत कधीही ही उस्सुकता ( औत्सुक्यता कसं वाटेल? ) शमू शकते.

Rimzim
Thursday, November 08, 2007 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु
अय्या खरच कि... मला काहि तरी चुकते आहे असे वाटत होते पण काय ते कळाले नाहि.
होता है, होता है.... :-)


Prajaktad
Thursday, November 08, 2007 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता आम्ही उत्तर अमेरिकेच्या टोकावरच आहोत की.. (नाही
पडणार नाही हो खाली..) कुठे झालाय प्रकाशित अंक?नविन मायबोलित ही फ़िरुन आले की मी..


Sampadak
Thursday, November 08, 2007 - 9:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, तुमच्याप्रमाणेच आम्हीही अगदी 'उत्सुक' आहोत अंक प्रकाशित करायला. तेव्हा थोडासा धीर धरा. अंक लवकरच प्रकाशित करण्यात येईल. आणि तो प्रकाशित झाला की इथेही तसे कळवू.

दिवाळीच्या सर्व मायबोलीकरांना असंख्य शुभेच्छा!


Kedarjoshi
Thursday, November 08, 2007 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता अग पडेल इतक्या टोकाला कशाला जातेस? अलिकडे हो बघु आधी.~ड

बर मग नक्की वेळ ठरली का?


Manuswini
Thursday, November 08, 2007 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळी अंक विकत घ्यायचाय आहे मला, कसा घ्यायचा? online मिळेल का?

कीतीतरी छान गोष्टी आहेत.. एक झलक वाचली. संपादक पण काय हुशार हां, जरासे पाणी लावले तोंडाला नी उत्सुक्ता ताणून गायब :-))



Kedarjoshi
Thursday, November 08, 2007 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मनु हा विनामुल्य आहे.

Sashal
Thursday, November 08, 2007 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उत्सुकता / उस्तुकता / औत्स्युकता / उस्सुकता / उत्सुक्ता .. ह्यालाच भाषेचं evolution म्हणत असावेत का?

Vinaydesai
Thursday, November 08, 2007 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फक्त electronic असतो.. स्वतः छापून घायचा....

त्याची PDF असते (ती लवकरच मिळेल)


Shraddhak
Friday, November 09, 2007 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याची PDF असते (ती लवकरच मिळेल) <<<<<<
म्हणजे e- अंकाआधी?????




Sampadak
Friday, November 09, 2007 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्याची सर्वजण अतिशय उत्सुकतेने वाट पाहता आहात, तो दिवाळी अंक आपल्या सर्वांसमोर ठेवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मायबोलीचा 'हितगुज दिवाळी अंक २००७' आपल्या सर्वांना आवडेल अशी आशा आहे.

दीपावलीनिमित्त आपले व आपल्या कुटुंबियांचे दिवाळी अंक चमूतर्फे हार्दिक अभिष्टचिंतन!

हितगुज दिवाळी अंक २००७


Manuswini
Friday, November 09, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, संपादक, हा अंकाची PDF मिळते का हो?
असा computer समोर बसून वाचायला कंटाळा हो.
तो कसा मस्त आरामात,हातात चहा,बाजूला चकली, लाडु खात खात bed वर बसून वाचायला मजा.
टेबलावर बसून काय ते computer वर डोळे फोडा नी वाचायचा...

pls सांगा मला की हा पुर्ण print करता येईल का?


Sampadak
Saturday, November 10, 2007 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळी अंक PDF स्वरुपात यथावकाश उपलब्ध करुन देण्यात येईल. परंतु सध्या अंकातील दृकश्राव्य अनुभवाचा आनंद घेण्यासाठी अंक संगणकावरच वाचावा असा आमचा सल्ला आहे.

Sayuri
Monday, November 19, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळी अंकाची पीडीएफ कधी उपलब्ध होईल?

Sayuri
Tuesday, March 11, 2008 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळीअंकाची PDF आहे का आता उपलब्ध?

Runi
Wednesday, March 12, 2008 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी हे घे,
दिवाळी अंक २००७

Moderator_10
Wednesday, March 12, 2008 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनी

सायुरीला अंकाची pdf हवी आहे. संपादक मंडळाचं pdf बनवण्याचं काम चालु आहे.


Sayuri
Tuesday, March 18, 2008 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी मिळणार पीडीएफ?.... ...

Chafa
Wednesday, March 19, 2008 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, माझ्या माहितीप्रमाणे तांत्रिक अडचणींमुळे PDF बनवण्याचं काम स्थगित आहे. PDF बनवण्यासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य, साधने व वेळ या सगळ्यांचा प्रश्न असल्याने सध्या तरी हे काम होत नाहीये. यासाठी कोणी स्वयंसेवक पुढे आले तरच हे काम होऊ शकेल असे वाटते. गैरसोयीबद्दल क्षमस्व.

Sayuri
Thursday, March 20, 2008 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ohok. Thanks for the reply Chafa.



Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators