|
Sampadak
| |
| Friday, September 21, 2007 - 1:32 am: |
| 
|
हितगुज दिवाळी अंक २००७ नमस्कार मंडळी, यंदा आपल्या हितगुज दिवाळी अंकाचं सातवं वर्षं. या सातव्या अंकासाठीची प्रस्तावना लिहिताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. मायबोलीला यावर्षी उत्तर अमेरिकेच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाने मराठी समाजात दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल मानचिन्ह देऊन गौरवले आहे. दिवसेंदिवस हरवत जाणार्या आपल्या संस्कृतीच्या आणि भाषेच्या खुणा प्राणपणाने जपणारी 'आपली' मायबोली आता जगप्रसिद्ध होत आहे. अश्या या मायबोलीचा आणि म्हणूनच आपला दिवाळी अंकही प्रत्येक वर्षी अधिकाधिक देखणा आणि दर्जेदार बनतो आहे. यावर्षीच्या अंकासाठी तुमच्या साहित्याच्या प्रवेशिका मागवत आहोत. उदंड प्रतिसादाने तुम्ही सहभागी व्हाल अशी खात्री आहे. सातव्या वर्षाचं निमित्त म्हणून यावर्षी एक खास "सात" या विषयावर विभाग असणार आहे. दिवाळी अंकाचा सातवा वाढदिवस तर आहेच, पण शिवाय या साताचं अनन्यसाधारण महत्त्व सर्वमान्य आहे म्हणूनच - (१) साताविषयी काहीही - सात आश्चर्य, सात खंड, सात सूर, सप्तरंग, सात बुटके, सात समुद्र, अगदी काहीही विषय घेऊन अगदी कुठलीही कलाकृती पाठवायची आहे. ना विषयाच बंधन, ना माध्यमाचं! तुमच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव! चित्र काढायला, कविता लिहायला, गाणी म्हणायला, लेखणी सरसावायला, किंवा नुसतं दिलखुलास बोलायला घ्या! संदर्भ मात्र साताचा हवा. (२) याशिवाय नेहमीप्रमाणेच कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख वगैरे बरोबरच बाल साहित्याचंही स्वागत असणार आहे. आणि बालसाहित्य मायबोलीकरांच्या मुलांच्या लेखणीतून उतरलेले असेल तर उत्तमच! (३) तुमच्या छायाचित्रांचे, कलाकुसरीचे, रेखाटनांचे, इतर कुठल्याही गुणप्रदर्शनाचे देखील स्वागत आहे! दिवाळी अंकासाठी तुमचे साहित्य कुठे पाठवायचे आणि पाठवण्याची शेवटची तारिख या संदर्भातली पुढील माहिती लवकरच जाहीर करत आहोत. त्याचबरोबर नियम व सूचनाही प्रकाशित करत आहोत. तरी तुमच्या शंका वा प्रश्न sampadak_hda AT yahoo DOT com या पत्त्यावर जरूर पाठवा! मग करताय ना सुरुवात? आपल्या दिवाळी अंकात प्रत्येक मायबोलीकराचा सहभाग हवाच! आपले स्नेहांकित, संपादक मंडळ
|
Sampadak
| |
| Monday, September 24, 2007 - 9:12 pm: |
| 
|
हितगुज दिवाळी अंक २००७ दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्यासंबंधी काही सूचना आणि नियम - गणेशोत्सवाची सांगता होता-होता आपल्या दिवाळी अंकाची तयारी सुरू झालेलीच आहे. तुम्हीही अंकासाठी साहित्य पाठवायच्या तयारीला नक्कीच लागला असाल. तेव्हा ते कसे, कधी, कोठे पाठवायचे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. त्यासाठी या काही सूचना आणि नियम. १. दिवाळी अंकासाठी पाठवायचे साहित्य २४ ऑक्टोबर २००७ पर्यंत संपादक मंडळाकडे पोहोचले पाहिजे. २. साहित्य सॉफ्ट कॉपीमध्ये आणि देवनागरी लिपीमध्येच पाठवावे. जर काही कारणाने ते देवनागरी लिपीमध्ये पाठवणे शक्य झाले नाही तर ते रोमन लिपीमध्ये असले तरी त्याभोवती dev tag टाकून त्याचे देवनागरीमध्ये सहजगत्या लिप्यंतर होऊ शकेल असे पहावे. नुसते Minglish मध्ये पाठवलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही. तसेच मायबोलीकर नसलेल्या कोणाकडून विशेष साहित्य आणले असल्यास ते दिवाळी अंकासाठी पाठवणार्या मायबोलीकराने त्याचे देवनागरीकरण करून सॉफ्ट कॉपीमध्ये पाठवावे. ३. साहित्य पाठवताना शक्यतो व्याकरणाचें आणि शुद्धलेखनाचें नियमांत बसेल असे पहावे. ४. साहित्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार संपादक मंडळ राखून ठेवत आहे. साहित्य नाकारण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण देण्यास संपादक मंडळ बांधिल नाही. याबाबत संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. ५. आपल्या दिवाळी अंकात याही वर्षी काही साहित्यकृतींसोबत रेखाटने असतीलच. रेखाटन समिती आणि संपादक मंडळ रेखाटनासाठी साहित्य निवडण्याबाबतचा निर्णय घेतील आणि तो अंतिम असेल. ६. अंकासाठी कोणत्या प्रकारचे आणि किती साहित्य पाठवायचे यावर अर्थातच बंधन नाही. परंतु पाठवलेले सर्व साहित्य स्वीकारले जाईलच असे नाही. कृपया पूर्ण लेख / कथा / कादंबरी / कविता एकाच पोस्टमध्ये पाठवावे. ७. आपण जे साहित्य पाठवू इच्छिता त्याचा आकार जर मोठा असेल आणि ते मायबोलीवरुन पाठवणे शक्य होत नसेल तर कृपया संपादक मंडळाशी संपर्क साधा. ८. दिवाळी अंकात आपली मायबोलीवरची ओळख प्रसिद्ध व्हावी की आपले नाव हे तुम्हीच ठरवायचे आहे. साहित्य पाठवताना ते कृपया नमूद करावे. तसेच आपले नाव प्रसिद्ध करायचे असेल तर ते आपल्याला जसे प्रसिद्ध व्हावे असे वाटत असेल तसे कळवावे. उदाहरणार्थ पूर्ण नाव की फक्त नाव की नाव आणि आडनाव. ९. साहित्य मिळाल्याची पोच शक्य होईल तशी पाठवली जाईलच. आणि हो, मंडळी, यावर्षीचे विशेष आकर्षण - 'सात'व्या अंकानिमित्ताने विशेष विभाग आहे. त्यासाठी साहित्य पाठविताना तसे कृपया न विसरता नमूद करा. अंकासाठी साहित्य पाठवण्यासाठी नवीन मायबोलीमध्ये प्रवेश करा. तेथे दिवाळी अंक लेखनासाठी दुवा डाव्या रकान्यात दिसेलच. किंवा खालील लिंकवर क्लिक करा, आणि 'येण्याची नोंद' करा. दिवाळी अंक लेखन आपले स्नेहांकित, - संपादक मंडळ.
|
Chioo
| |
| Thursday, September 27, 2007 - 7:26 am: |
| 
|
मीपण तयार आहे लागेल ती मदत करायला.
|
Sampadak
| |
| Thursday, September 27, 2007 - 10:28 pm: |
| 
|
दुरुस्तीपत्रक नमस्कार मंडळी. हितगुज दिवाळी अंकाचे हे सातवे वर्ष नसून आठवे वर्ष आहे हे आमच्या नुकतेच लक्षात आले आहे! अनवधानाने झालेल्या या नजरचुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पण तरीही आधी प्रसिद्ध केलेला "७" विषयावरचा खास विभाग मात्र बदलण्यात येणार नाहीये. कृपया "७" विभागासाठी आपल्या प्रवेशिका जरुर पाठवा! याविषयी अथवा इतर कुठल्याही संदर्भात आपले प्रश्न असतील तर संपादक मंडळाशी ईमेलद्वारे संपर्क साधा. तसेच आपले साहित्य पाठवण्यासाठी आता फक्त २६ दिवस उरले आहेत, हे लक्षात असू द्या! यावर्षीच्या बहारदार दिवाळी अंकासाठी तुम्ही आपल्या प्रवेशिका जरुर पाठवाल अशी आशा आहे! आपले स्नेहांकित, संपादक मंडळ
|
हो मी तोच विचार करत होते की एकाही हुष्षार मायबोलीकराला कसे कळले नाही अजून? वर एवढं डेन्जर लाल मधे आठवे वर्ष लिहीलंय तरी चर्चा सातव्या वर्षावर. ते बहुतेक २१ व्या शतकातले सातवे वर्ष समजले असावेत. असू द्या असू द्या. (टिपी करायला थोडा वेळ मिळाला त्याचा परिणाम. क्रिपया कुनिही मणावर घ्यु नये आनी काय शुद्दलेकन शुद्द करूण हावे असल्यास न्हाईतर शुद्दलेखणाचे देवनगरीत भाषांतर करायचे असल्यास बिन्दास हिकडे यूंद्या.)
|
Shonoo
| |
| Friday, September 28, 2007 - 7:29 pm: |
| 
|
मन सुद्द तुजं गोस्ट हाये प्रिथवी मोलाची तू चाल फुडं तुला रं गड्या भीती कोनाची.........
|
Chaffa
| |
| Saturday, September 29, 2007 - 12:19 pm: |
| 
|
मला सुध्दा काम करायला आवडेल पण आधी मला शुध्दलेखनाच्या वर्गात बसावे लागेल, तेवढे सोडून दुसरे काही माझ्या लायक असल्यास जरुर......!
|
Zakasrao
| |
| Monday, October 01, 2007 - 11:49 am: |
| 
|
मला सुध्दा काम करायला आवडेल पण आधी मला शुध्दलेखनाच्या वर्गात बसावे लागेल, तेवढे सोडून दुसरे काही माझ्या लायक असल्यास जरुर......! >>>>>>>.. चल एक भुतकथा पाड. आणि विनोदी असे दोन चार काढीव वेंधळेपणा आणि इब्लिसपणाचे किस्से सांग
|
Sheshhnag
| |
| Monday, October 01, 2007 - 2:23 pm: |
| 
|
शुद्धलेखनाचे काम करायला मला नक्कीच आनंद वाटेल.
|
Sheshhnag
| |
| Monday, October 01, 2007 - 2:27 pm: |
| 
|
वा संघमित्रा! काय मस्त शुद्धलेखन लिहिलात!! मी प्रयत्न करूनसुद्धा मला असे लिहिता आले नाही. म्हणजे मला शुद्ध लिहिता वाचता येत नाही का? (दु:खी चेहरा)
|
Sampadak
| |
| Monday, October 01, 2007 - 11:17 pm: |
| 
|
मदतीसाठी पुढे आलेल्या सर्व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार. जर काही मदत लागली तर जरुर कळवू. सध्या तरी सगळे मायबोलीकर दिवाळी अंकासाठी आपले साहित्य पाठवण्याच्या तयारीत मग्न असतील अशी आशा आहे.
|
Sampadak
| |
| Thursday, October 04, 2007 - 4:32 am: |
| 
|
"नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली दीप उजळले नयनी माझ्या, ही तर दीपावली" प्रकाश आणि चैतन्याचा उत्सव म्हणजे दिवाळी! आनंद आणि उत्साहाचे उधाण म्हणजे दिवाळी! प्रेमाचा आणि सौहार्दतेचा पुरस्कार म्हणजे दिवाळी! तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीची आणि संपन्नता, सौख्य व संस्कृतीच्या पावलांवर चालत येणारी दिवाळी आता जवळ येऊन ठेपली आहे. दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या मायबोलीचा दिवाळी अंक. गेली सात वर्षं आपला अंक अधिकाधिक बहारदार होत चालला आहे. याचे पूर्ण श्रेय अर्थात मायबोलीकरांच्या प्रतिभाशाली योगदानाला आहे. यावर्षीचा दिवाळी अंकही या परंपरेत एक पुढचे पाऊल ठरेल यात आम्हाला शंका नाही. अंकाची तयारी जोरदार सुरु आहेच. मायबोलीवरचे सर्व साहित्यिक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार, कलाकार, व्यासंगी आणि ज्ञानी सभासद दिवाळी अंकात उत्स्फूर्तपणे भाग घेतील व अंकासाठी आपल्या प्रवेशिका पाठवतील अशी आशा आहे. अशा या सर्वांना म्हणजेच तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून निमंत्रित करण्यासाठी ही एक आठवण. तुमच्या प्रवेशिका २४ ऑक्टोबर पूर्वी आमच्यापर्यत पोचल्या पाहिजेत. म्हणजेच येत्या वीस दिवसात! तेव्हा, 'सावकाश लिहू', किंवा 'मनात आहे पण शब्दात नाही' यासारख्या विचारांना (वाचा सबबींना) थारा न देता लवकरात लवकर आपले साहित्य नवीन मायबोलीवर उपलब्ध असलेला "दिवाळी अंक लेखन" हा दुवा वापरुन पाठवा. आपले प्रश्न किंवा शंका संपादक मंडळाकडे जरुर पाठवा. धन्यवाद!
|
Sampadak
| |
| Saturday, October 06, 2007 - 2:09 am: |
| 
|
मालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा हितगुज दिवाळी अंकाच्या वाढत्या लोकप्रियतेला लक्षात घेता आम्हाला दिवाळी अंकासाठी आपण पाठवत असलेल्या कुठल्याही प्रवेशिकेच्या मालकीहक्काविषयी ( Copyright information ) स्पष्टीकरण आपल्या संरक्षणासाठी देणे महत्त्वाचे वाटते. यासाठीचे नियम खालीलप्रमाणे असतीलः येणार्या प्रत्येक प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क ती प्रवेशिका पाठवणार्या यथायोग्य साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. परंतु पाठवण्यात आलेल्या व स्वीकारल्या गेलेल्या प्रत्येक प्रवेशिकेसाठी, तुम्ही मायबोली प्रशासनाला त्या प्रवेशिकेला maayboli.com वर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.inc ला त्या प्रवेशिकेचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात. याचा अर्थः * प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क तुमचे असतील व तुम्ही त्या प्रवेशिका इतरत्र प्रसिद्ध करु अथवा तुमच्या वैयक्तिक आर्थिक नफ्यासाठी विकू शकता. * परंतु मायबोली प्रशासन ती प्रवेशिका मायबोलीवर अथवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना) * भविष्यात ती प्रवेशिका मायबोलीवरुन अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावी असे तुम्हाला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधिल राहणार नाही. (कायमस्वरुपी परवाना) * तुम्ही तुमची प्रवेशिका इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ती प्रवेशिका मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना) यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया संपादक मंडळाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा. धन्यवाद. Copyright remains with respective author and artists. But by submitting your work, you are giving unlimited, perpetual and irrevocable license to maayboli to publish on maayboli.com or where ever maayboli.inc wants to use it in any media. What it means: * The copyright and ownership remains with author / artist and they can use it however they want such as sell, publish their work etc. * But they have given the right to maayboli to publish on maayboli or any other media such as PDF, CD etc in future. (unlimited) * Maayboli is not obligated to remove the work from maayboli or other media if author wants in future. (perpetual) * If author sells his/her copyright to a new owner, the new owner can not ask maayboli to remove the work from maayboli. (irrevocable) If you have any further questions related to this, please email the Sampadak Mandal. Thank you.
|
Sampadak
| |
| Wednesday, October 10, 2007 - 12:00 pm: |
| 
|
बघता बघता महिनाभरावर दिवाळी येऊन ठेपलीये. घराघरात दिवाळीची तयारी, कोणाकडे रंगकाम कोणाकडे साफसफाई, कोणाच्या खरेदीच्या याद्या तयार झाल्यात, फराळाच्या पदार्थांसाठी स्वयंपाकघरं सज्ज व्हायला लागलीयेत, बच्चे मंडळीची किल्ल्यांची तयारी जोरात, आणि आम्हीही सज्ज आहोत. घराघरातून खमंग वास दरवळतोय आणि इथेही गंध पसरलाय आपल्या दिवाळीअंकाच्या तयारीचा. आपल्या लेखण्या, कॅमेरे, कुंचले,रेकॉर्डर्स आणि कल्पनाशक्ती सरसावली असेलच सगळ्यांनी. तर अजून वेळ आहे पाठवू, बघू सबबी मनात येत असतील तर...हे वागणं बरं नव्हं २४ ऑक्टोबर शेवटची तारीख आहे तेंव्हा घाई करा आणि आपलं साहित्य लवकरात लवकर पोहोचेल यावर लक्ष असू द्या. काही शंका, प्रश्न असतील तर संपादक मंडळाकडे जरुर पाठवा. अंकासाठी साहित्य पाठवण्यासाठी नवीन मायबोलीमध्ये प्रवेश करा. तेथे दिवाळी अंक लेखनासाठी दुवा डाव्या रकान्यात दिसेलच. तेंव्हा मंडळी पाठवा साहित्य लवकर लवकर.
|
Arch
| |
| Friday, October 12, 2007 - 2:06 am: |
| 
|
संपादक, तुम्ही लेखनाची पोच देता का?
|
Sampadak
| |
| Friday, October 12, 2007 - 5:15 am: |
| 
|
हो आर्च, सर्व लेखकांना लेखनाची पोच दिली जाते.
|
Sampadak
| |
| Friday, October 12, 2007 - 10:26 pm: |
| 
|
नमस्कार मंडळी, कृपया मायबोलीवर किंवा इतरत्र आधी प्रसिद्ध न झालेलेच साहित्य दिवाळी अंकासाठी पाठवावे ही विनंती. आधी प्रसिद्ध झालेले साहित्य अंकात समाविष्ट करता येणार नाही याची कृपया नोंद घ्या. असे साहित्य दोन तीन जणांनी पाठवले असल्यामुळे हा खुलासा. धन्यवाद.
|
Sampadak
| |
| Friday, October 19, 2007 - 2:09 pm: |
| 
|
ठळक बातम्या ------------------------------------------------------------------------------------------------- हितगुज दिवाळी अंकाची जय्यत तयारी मायबोलीनगर, ता. १८ - सालाबादप्रमाणे यंदाही प्रकाशित होणार्या सुप्रसिद्ध हितगुज दिवाळी अंकासाठी मायबोलीनगरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. या निमित्ताने अंकाच्या संपादक मंडळातर्फे मायबोलीनगरीच्या रहिवाश्यांकरता पुढील निवेदन देण्यात आले. "मंडळी, नवरात्र सुरू होऊन आठ दिवस झाले, दसरा परवावर येऊन ठेपला. पाठोपाठ आमच्याकडे तुमचे दिवाळी अंकासाठी राखून ठेवलेले खास साहित्य पाठवायचा शेवटचा दिवसही येऊन ठेपेल. तेव्हा शेवटच्या क्षणाची धावपळ, गडबड टाळण्यासाठी आपले साहित्य लवकरात लवकर आमच्याकडे पाठवा. हा हा म्हणता २४ ऑक्टोबर येईल तेव्हा त्यापूर्वीच्या या शेवटच्या सप्ताहांताचा फायदा घ्या आणि आपल्या विशेष कलाकृतीवर शेवटचा हात फिरवून आमच्याकडे पोहोचती करा आणि निर्धास्त व्हा. नरक चतुर्दशी (ता. ८ नोव्हेंबर) या दिवशी प्रकाशित होणार्या अंकामध्ये खास कथा, लेख, कविता, मुलाखती वगैरेंचा समावेश राहणार आहे. इतर दिवाळी अंकांप्रमाणे हा अंक छापील स्वरूपात नसून तो विश्वजालावर प्रकाशित होतो त्यामुळे तुमच्या दृक् - श्राव्य कलाकृतींचेही स्वागतच आहे. तेव्हा विसरू नका - २४ ऑक्टोबर पुर्वी तुमच्या कलाकृती आमच्याकडे पाठवा."
|
Zelam
| |
| Tuesday, October 23, 2007 - 11:34 pm: |
| 
|
संपादक - मी आज दिवाळी अंकासाठी कथा post केलेय पण मला पोच मिळली नाही. इथे पोच मिळू शकेल का?
|
Supermom
| |
| Wednesday, October 24, 2007 - 3:27 am: |
| 
|
मी पण कथा पाठवलीय. पोस्ट मिळेल का?
|
|
|