|
मी काम करण्यास उत्सुक आहे. माझ्यालायक काही काम असल्यास कृपया सांगावे.
|
Supermom
| |
| Tuesday, September 04, 2007 - 12:32 pm: |
| 
|
मलापण खूप आवडेल काम करायला.
|
Shyamli
| |
| Tuesday, September 04, 2007 - 12:38 pm: |
| 
|
मीपण मीपण सुचना नाही, मदत हो फक्त, सुचना अनुभवी लोक देतीलच कि
|
Vaatsaru
| |
| Tuesday, September 04, 2007 - 1:07 pm: |
| 
|
मला पण 'भयंकर' आवडेल काम करायला 
|
Ajjuka
| |
| Tuesday, September 04, 2007 - 4:10 pm: |
| 
|
जमलंच तर यावर्षी लिहिन म्हणते काहीतरी. संपादक मंडळाला बरं वाटलं तर घेतील. त्या मंडळावर असण्याइतकी आपली काही लायकी नाही पण आयत्यावेळेला काही हमाली करून हवी असेल तर खुश्शाल साMगा. मुखपृष्ठामधे मदत करायला आवडेल.
|
Asami
| |
| Tuesday, September 04, 2007 - 4:14 pm: |
| 
|
मलाही अवडेल काम करायला अंकासाठी
|
Vaatsaru
| |
| Tuesday, September 04, 2007 - 6:59 pm: |
| 
|
मला असं वाटतं की ह्या वर्षीचा अंक हा कुठलातरी ’विशेषांक’ म्हणून काढावा. (naahitari 7 is the most powerful magical number) हो की नाही ? 
|
Maitreyee
| |
| Tuesday, September 04, 2007 - 7:12 pm: |
| 
|
छान आहे कल्पना. साहित्यातील 7 wonders अशी काही कल्पना करून मराठी साहित्याच्या इतिहासातील ७ अजरामर कलाकृती म्हणा, किन्वा ७ सर्वश्रेष्ठ लेखक, कवी म्हणा असे निवडून त्यांच्यावर काही लेख मागवले तर?
|
Arun
| |
| Wednesday, September 05, 2007 - 4:02 am: |
| 
|
देवनागरीकरण, शुद्धलेखन तपासणे या व अशा इतर कामांमध्ये मदत करायला मला आवडेल ............. वाटसरू आणि मैत्रेयी च्या सुचनेला अनुमोदन ............ मैत्रेयीच्या कल्पनेवरूनच पुढे : मराठी साहित्यातील ७ अजरामर कलाकृती या मतदानाद्वारे निवडल्या जाव्यात. दिवाळी अंकाच्या संपादक मंडळाने अशा १५ ते २० अजरामर कलाकृती list कराव्यात, आणि मायबोली सदस्यांच्या मतदानाद्वारे ७ सर्वश्रेष्ठ कलाकृती निवडाव्यात. याच पद्धतीने आपल्याला मायबोलीकरांच्या पसंतीचे सर्वश्रेष्ठ लेखक, कवी, पुस्तके निवडता येतील
|
Psg
| |
| Wednesday, September 05, 2007 - 5:35 am: |
| 
|
माझेही नाव घ्या. सर्व प्रकारची मदत करायला मी तयार आहे. विशेषांकाच्या कल्पनेस अनुमोदन. संपादक मंडळ लवकर बसवून कोणता विशेषांक काढता येईल हे ठरवावे. एखाद्या थीमवर पूर्ण अंक होऊ शकेल. आपल्या दिवाळी अंकाला भरपूर वाचक आहेत. देखणा अंक- दिसायला आणि contentwise ही काढूया
|
Amruta
| |
| Wednesday, September 05, 2007 - 2:29 pm: |
| 
|
मी पण आहे काही मदत लागली तर. सध्या जुईची शाळा सुरु झाल्याने मला तरा बराच मोकळा वेळ आहे.
|
Lalu
| |
| Wednesday, September 05, 2007 - 4:24 pm: |
| 
|
>>आणि contentwise ही काढूया मग छान काहीतरी लिहायला लागा. ~d विशेषांकाची कल्पना चांगली आहे, पण त्यामुळे साहित्य पाठवण्यावर मर्यादा येऊ नये. संपूर्ण अंक एका थीम वर काढायचा असेल तर त्याबाहेरचे काहीच घेता येणार नाही, असे नको. विशेषांक म्हणून एक थीम ठेवून त्याचा वेगळा सेक्शन ठेवता येईल आणि बाकी साहित्य नेहमीप्रमाणे घेता येईल. (नाहीतर मग थीम 'व्यापक' हवी. 'सात' ही थीम ठेवली तर त्यात 'साडेसाती, सात आश्चर्ये, सप्तपदी, माझे सातवीतले अनुभव, ७ ingredients चे पदार्थ इ. इ. लिहिता येईल. ~d ~d ) देवनागरीकरण... खरं तर हे करावेच लागू नये आणि अपरिहार्य झाले तर कमीत कमी असावे. दरवर्षी साहित्य कसे पाठवायचे याच्या सूचना देतात, त्या पाळल्या तर हे काम कमी होईल.
|
Maitreyee
| |
| Wednesday, September 05, 2007 - 4:31 pm: |
| 
|
विशेषांक म्हणून एक थीम ठेवून त्याचा वेगळा सेक्शन ठेवता येईल आणि बाकी साहित्य नेहमीप्रमाणे घेता येईल>>>>बरोबर आहे, मीही हे लिहिणार होते.
|
Ajjuka
| |
| Wednesday, September 05, 2007 - 5:35 pm: |
| 
|
सात साहित्यिक निवडण्यापेक्षा लालु म्हणते तसे 'सात' हीच थीम निवडणे जास्त interesting होईल असं मला वाटतं!
|
Sashal
| |
| Wednesday, September 05, 2007 - 5:43 pm: |
| 
|
माझी पण तयारी आहे काम करायची, कसलंही .. वाटसरू ची कल्पना आवडली आणि लालु ची सूचना पण ..
|
Zakki
| |
| Wednesday, September 05, 2007 - 6:02 pm: |
| 
|
सात मायबोलीकरांनी, प्रत्येकी, सात गोष्टी, सात कविता, सात गझला, नि सात विनोद लिहीले व सात फोटो, सात चित्रे टाकली, की झाला तयार अंक. वाटल्यास 'माणूस' सात रहस्य कथापण लिहील! मग मास्तुरे वगैरे लोकांना भरपूर काम! नि इतर अभिप्राय देणार्यांना सुद्धा! त्याचा दिवाळी अंक तयार होईल.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:46 pm: |
| 
|
'सातासमुद्रा अलीकडल्यांनी आणि सातासमुद्रा पलीकडल्यांनी लिहिलेले काहीही....' असा अंक असु द्यात! मी पण मदतीला तयार आहे! पण ज्यांना माझं कंप्युटरचं अगाध ज्ञान माहिती आहे त्या मायबोलीवरच्या महत्वाच्या व्यक्ती मला काम देतील की नाही ही शंकाच आहे!
|
Psg
| |
| Thursday, September 06, 2007 - 5:56 am: |
| 
|
'सात' ही थीम ठेवली तर त्यात 'साडेसाती, सात आश्चर्ये, सप्तपदी, माझे सातवीतले अनुभव, ७ ingredients चे पदार्थ इ. इ. लिहिता येईल
लालू 'कथाश्री'चा दिवाळी अंक सहसा विशेषांक असतो.. त्यांचे पर्यटन, बालक / बाल्य, आरोग्य आणि प्रेम हे विशेषांक वाचले आहेत. तसंच काहीसं आपल्या दिवाळी अंकासाठी करता आलं तर? अर्थातच संपादक मंडळ अंतिम निर्णय घेईल.. पण अशी कल्पना राबवता आली तर सोनेपे सुहागा
|
Mankya
| |
| Thursday, September 06, 2007 - 9:16 am: |
| 
|
मीही काम करण्यास उत्सुक आहे ! माझा मेल आईडी joshi.mb@gmail.com माणिक !
|
Giriraj
| |
| Thursday, September 06, 2007 - 10:41 am: |
| 
|
दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झाली का? वावा! या वेळेस लवकार कामाला सुरवात झाली म्हणायची! पर्यावरण हा एक विभाग घेता येईल...
|
|
|