Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 06, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Bangalore » GTG: 2 September, 2007 » Archive through September 06, 2007 « Previous Next »

Itgirl
Tuesday, September 04, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंगळुरू ला आल्यावर सगळ्यात बेश्टं गोष्ट काय झाली असेल तर मायबोलीच्या साईटचा शोध लागला हे!! नाहीतर सुरुवातीला इकडे तिकडे चोहीकडे, कुडु कुडु, अंडा गुंडू ऐकून ऐकून माझे कान कुरकुरायला लागले होते अगदी!! मग मायबोलीवर इकडे, तिकडे सगळीकडे बागडता, बागडता पाहिले कि बंगळुरुचा पण बीबी आहे, मग तिथेही खरडायला सुरू केले!! :-) म्हटले पाहू कोणी सापडते का ते, माझ्या मर्‍हाटिचिये कवतुके बोलणारे.. आणि बघता बघता अद्वैत, अमोल आणि साक्षात देवबाप्पा आहेत इथे असे कळले :-)
मग काय, बंगळुरू बीबी वर रोज भेटता भेटता प्रत्यक्ष भेटू असा प्रस्ताव पुढे आला आणि सगळ्यांनाच आवडला!!

मग कुठे भेटायचे, यावर थोडी चर्चा होऊन असे ठरवले की माझ्या घरीच भेटू. तेच सोपे वाटले :-) म्हटले, हरवले तर हरवतील हे तिघे!! मी तरी नाही हरवणार बंगळूरुच्या अफ़ाट गर्दीत!! नसते द्राविडी प्राणायाम हवेत तरी कशाला??....तर वेगवेगळी दोनच खर तर, पन वेगवेगळी म्हटल की कस छान वाटत!! आपापसात सुचवलेली ठिकाण मागे पडली आणि GTG चे ठिकाण ठरले, माझे घर :-) रविवारी, २ सप्टेंबर ला दुपारी जेवायलाच भेटू असे सर्वानुमते ठरले.

क्रमश:



Athak
Tuesday, September 04, 2007 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खादाड अजुन जेवतेच आहे :-) हात तोंड रिकामे झाले असतील तर येवु दे मेनु :-)

Arch
Tuesday, September 04, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खादाड मेनुची वाट पहात बसला आहे कार्यक्रमापेक्षा

Aktta
Tuesday, September 04, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगला फ़्लो आहे......
...किती सहज लिहीते आहेस तु ..
सही जमतेय .....
उत्कंठा वाढतेय.....
I hope ही I Mean हा सत्यव्रुतांत आहे....
भावना पीळवटुन निघाल्या
मस्त मजा येते आहे वाचयला.....

अजुन काय बोलतात बर...... हांSSSSSS
ते जरा शुध्द्लेखनाच बघ की आधी तू :-)
एकटा.....


Devdattag
Wednesday, September 05, 2007 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेठ.. एअरपोर्ट रोड वर ट्रॅफिक जाम असल्याने आम्हाला पोचायला जरा वेळ लागतोय..:-)

Itgirl
Wednesday, September 05, 2007 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...सगळ्यांनी एकमेकांचे सेल नंबर घेतले होतेच….

.... आणि एकदाचा २ सप्टेंबर उजाडला…किती जणांनी हुश्श म्हटले?? :-) अद्वैतने, सक्त ताकीद दिलीच होती धमकीच खर तर.. बघा आता!!, की मर्‍हाटमोळ जेवण असूदेत म्हणून... मग ठरवले की साधेच काही तरी बनवू, त्यात पुन्हा, असलेल्या तुटपुंज्या भांड्यांची सामग्री पुरायला पण पाहिजे होती ना!! :-) पण जमले :-)

मग असा मेनु ठरवला - चपात्या, भात, डाळीची आमटी, मसूरीची उसळ, बटाट्याचा रस्सा, काकडीची कोशिंबीर, आणि तांदळाची खीर, पायस म्हणतात त्याला. मटार पनीर कॅन्सल केले… बाकी, दही, कैरीचे लोणचे, सुकी कारळ्याची चटणी वगैरे होतेच... पुरणपोळ्या सध्ध्याच पुण्याला गेले होते, तेह्वा घरी केलेल्या, त्याच आणलेल्या..जास्ती नव्हत्या… :-(

सगळ्यात आधी दर्शन दिले देवबाप्पाने!! आणि २ पुण्याची माणसे भेटलो, त्यामुळे आम्ही बंगळूरूला मनसोक्त नाव ठेवून घेतली!! दिल की भडास निकाल दी मैंने तो!! 'पुणे तिथे काय उणे' या जगप्रसिद्ध सत्यावर आम्ही परत एकदा शिक्कामोर्तब केले आणि बंगळूरूमधे कसा काहीच दम नाही, यावर पण बिनावाद मतैक्य झाले आमचे!! तेव्हढ्यात अद्वैतचा फ़ोन आला.. तो आणि अमोल रस्ता चुकले होते!! येव्हढा व्यवस्थित पत्ता देवून पण!! शो. ना. हो… पण लवकरच आले!!


Athak
Wednesday, September 05, 2007 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेनु ठरवलाच का नुसता ? बहुतेक ते दोघे पोचल्यावर बनवणे सुरु होईल :-)
रसम सांबार इडली दोसाई ऍड केले नसले तरी शेजारुन वास येत असेलच :-)


Krishnag
Wednesday, September 05, 2007 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटी, छानच लिहितियेस...
पण भाग खुपच छोटे छोटे...



Chetnaa
Wednesday, September 05, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटे, लवकर लवकर येऊ दे... ते ग्रे अक्षरात लिहिलेले पंचेस धमाल आहेत ग...

Itgirl
Wednesday, September 05, 2007 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे जमल्यावर मग आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली, आणि गप्पा चालू झाल्या.. गप्पांचे विषय बंगळुरूची गर्दी, बेशिस्त हा शब्द पण कमीच पडावा अशी वाहनांची रहदारी आणि ती चालवायची पद्धत, घरांची अवाच्या सवा भाडी, मुजोर रिक्षावाले रिक्षावाले तर इतके मुजोर आहेत की पुण्यातले रिक्षावाले पण देवमाणस वाटायला लागतील..! , घडीघडीला बदलणारे हवामान, मराठी खाणे मिळणारी इन मिन २-३ ठिकाणे... अर्थात, बंगळुरूची त्यातल्या त्यात बरी हवा, अतिशय मामुली रकमेची वीज बिले आणि उत्तम बस सेवा याची पण नोंद घेतली आम्ही :-) आणि अर्थात, मायबोली!! मायबोलीवरचे वेगवेगळे BB , तिथे रंगणार्‍या वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा, गुलमोहर विभागातल्या कथा, ललित लेखन, कविता... खूप मजा आली गप्पा करताना :-)

गप्पा करता करताच जेवलो. अमोल, अद्वैत, देवदत्त, तिघांना जेवण आवडले, निदान, असे ते म्हणाले तरी!! खरोखर मनात काय म्हणाले असतील तर.. इथे लिहू नका रे!!! आणि मग, अमोल जाऊन मस्तपैकी पान घेऊन आला खायला सगळ्यांसाठी!! :-) मस्त वाटले!! :-) खरे तर माझ्या घरी खुर्च्या, टेबल असे काहीच नाही, की व्यवस्थित बसून जेवता येईल..पण या तिघांनी खूप सांभाळून घेतले, त्याबद्दल तिघांनाही खूप खूप thank you मनापासून :-)

जेवण आणि पान झाल्यावर, परत थोड्या गप्पा टप्पा झाल्या... मधेच क्रिकेटचा स्कोअर बघून सचिनला चांगले खेळ असे पण बजावले!! :-) जेवतानाच पाऊस कोसळायला सुरुवात झालेली होती...मग अशाच गप्पा टप्पा चालू असताना, मधेच पाऊस थांबल्याची संधी साधून मंडळी पांगली.. ते परत भेटायचे ठरवूनच :-)

असा हा छोटासा पण छानसा GTG मस्तपैकी संपन्न झाला :-)

समाप्त

वाचक हो, पहिल्यांदाच लिहिले आहे, गोड मानून घ्या, ही विनंती :-)


Maanus
Wednesday, September 05, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कनडा बरता?
नमगे स्वल्पः स्वल्पः कनडा बरता.

मजा केलेली दिसतेय लोकांनी. हे २६ काय आहे?

तांदळाची खीर.... घरी आईला किती वेळा बनव म्हटल, पन कधीच बनवत नाही, म्हणे आपल्याकडे एकदाच बनते. पित्रपंधरवड्यात.


Athak
Wednesday, September 05, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटे छान आहे तुझी लिहीण्याची एस्टाईल , वा मजा आया वाचनेकु
ते 'समाप्त' नंतरच वाक्य मी
'खादाड हो , पहिल्यांदाच बनवले आहे , गोड मानुन घ्या , ही विनंती'
असं वाचलं :-)


Itgirl
Wednesday, September 05, 2007 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्नगे कन्नडा गोतिल्ला, माणसा!!
आमच्याकडे पायस हे कुलदेवतेला नेवैद्याला दाखवायचे पक्वान्न आहे, अर्थात नेहमीच बनते :-)
कुठे काय २६? मला नाही कळले... हे " लोकंनी " काय आहे?? लाडू संपले का खाऊन?? :-)


Mrinmayee
Wednesday, September 05, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटे, छान लिहिलं आहेस! नुस्त्याच BB न्वर चर्चा केल्यात? (काय हे, व्यर्थ GTG !!!) मायबोलीकरांच्या नावानी बोटं मोडावीत. चार शीव्या हासडाव्यात. mods must be crazy .. अशी चर्चा करावी! NJ वाल्यांकडून असं काही शीकावं.
लग्न होऊन बंगलोरात गेल्यावर सासर्‍यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला सांगीतली. टिपिकल कानडी हॉटेलात जाऊन खाताना 'बेकु' म्हणजे 'हवंय', 'हाकु' म्हणजे 'घाल किंव वाढ' आणि 'साकु' अर्थात 'पुरे' येव्हडं लक्षात ठेव. फक्त क्रम चुकवु नकोस! :-) )


Ravisha
Wednesday, September 05, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म्म्म,परत एकदा २ सप्टेंबरचा विजय असो (पुढच्या वर्षीपर्यंत असंच चालणार) बंगळूरमधलं पहिलं ए.वे.ए.ठी. आणि पहिल्याच झटक्यात पार पडलं हे वाचून बरं वाटलं...
"मटार पनीर कॅन्सल केले " हे सांगण्याचे प्रयोजन?
पण शैलजा,कौतुक करावे तेवढे थोडेच हो :-) एवढा सगळा घाट घातलास (तुटपुंज्या सामग्रीत) म्हणजे कमालच हो...तू उसगावात राहिलीस का कधी तिकडे असेच असते पण भावना महत्वाची नाही का?
ओहो,पायसम delicious असतं की हो ते :-)
"पुण्यातले रिक्षावाले पण देवमाणसं वाटायला लागतील"- हे बाई काहीतरी निराळंच दिसतंय बरं का
मी तर वृत्तांतावर वृत्तांत लिहिला :-( चूंकी बोलने की तो हमें आदत नहीं है (लिखने की है) तेव्हा जरा थांबते.... हुश्श!!!
अद्वैत,अमोल आणि देवदत्त अब तुम्हारी बारी



Rajasee
Wednesday, September 05, 2007 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow!!! bangalore che GTG??? mala mahitach navte \clipart(sad) (now a days I rarely visit maayboli though) ............. kash ......... anyway aata vel milel tasa bangalore bb pan check karat jaain

Chetnaa
Thursday, September 06, 2007 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटी, अग किती छान लिहिलंस... लिहित रहा.... आणि विनोदाचा सेंस खुपच छान आहे तुझा... मजा आ गया...
तुझ्या लिखाणासारखच तु बनवलेलं जेवण असेल तर मिसलं मग आम्ही... पुढच्या
gtg यायया हवं आम्हालाही :-) कोण म्हणाले ते खादाड कुठले?:-) }

Kmayuresh2002
Thursday, September 06, 2007 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटे,छान बरयला मगो वृत्तांत.:-)

Arun
Thursday, September 06, 2007 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटे : छान लिहिला आहेस वृतांत ..........

पुढचा GTG कधी आहे ते आगावू कळवा म्हणजे आम्हीपण येऊ ............

राजसी : कुठे आहेस सध्या ???? :-)
ओळख आहे का ????? :-)

अम्या, अद्वैत, देवा : तुमचे पण वृतांत येऊ द्यात ........... :-)


Krishnag
Thursday, September 06, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटी, वृत्तान्त अगदी छानच लिहलाय!

गोड मानून घ्या, ही विनंती >

ही विनंती, ती खीर आमच्या वाट्याला आल्यावरच स्वीकारू!!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators