|
Zakki
| |
| Monday, August 20, 2007 - 6:46 pm: |
| 
|
पण मी म्हणतो, Admin हे प्रौढ व गंभीरच का असावेत? तेसुद्धा 'अत्यंत'. चांगले तरुण व मनमोकळे, हसते खेळते, गप्पागोष्टी नि विनोद करणारे असले म्हणून काय बिघडले? काम तर व्यवस्थित करताहेत ना! नाहीतर इतकी वर्षे सातत्याने मायबोली चालली असती का? अहो, गंभीर असते तर लालभाई सोडून इतर कुणालाच मायबोलीवर लिहिता आले नसते. आता उलट लालभाईच येइनासे झाले! हं, अगदीच उथळ व पांचट नसावेत हे खरे!
|
Asami
| |
| Monday, August 20, 2007 - 9:54 pm: |
| 
|
एका मस्त GTG ला मुकल्याची चुटपुट लागून राहिली आहे मला. Next GTG चे plans सुरू करा बघू लगेच
|
Arch
| |
| Tuesday, August 21, 2007 - 6:14 am: |
| 
|
अरे माणसा, नावांशिवाय कस ओळखायच कोण कोण आहे ते. म्हणजे खट्याळ Admin , कामसू माणूस, चावट भाई, मुलाला मांडीवर घेतल्यामुळे दोन लाडू जास्त मिळतील म्हणून वाट बघेत बसलेला सव्या, आम्हाला कळणार कसं? आणि हो Deeps चा फ़ोटो इतका का छोटा टाकला आहेस रे? असो. GTG मस्त झालेल दिसतय. भाई पुढच GTG माझ्याकडे. माझाकडे gas grill नाही. तेंव्हा येताना तेवढ.... 
|
Anilbhai
| |
| Tuesday, August 21, 2007 - 11:31 am: |
| 
|
चावट भाई????. मी काय चावटपणा केला बुवा?. तेव्हढ ते, ग्रिल नाही म्हणुन बोलावता की चावट म्हणुन, एकदा जरा स्पष्ट सांगा बरं. 
|
Maanus
| |
| Tuesday, August 21, 2007 - 2:06 pm: |
| 
|
नाव.... ज्याला आवडेल त्याने सांगावे की हा माझा फोटो आहे. १४५०० users आहेत ग आता मायबोलीवर... कोण कशाचा कसा उपयोग करेल सांगता येत नाही म्हणुन लहानच फोटो टाकलेत. आम्ही तेवढेतरी केले... नाहीतर ते पश्चिम महाराष्ट्रातले लोक. एक पन फोटो नाही दाखवत
|
Maanus
| |
| Tuesday, August 21, 2007 - 2:07 pm: |
| 
|
भाई चावट... ... ...
|
Zakki
| |
| Tuesday, August 21, 2007 - 2:30 pm: |
| 
|
अहो ते पश्चिम महाराष्ट्रातले लोक म्हणजे जास्त करून एका विशिष्ठ गावातले. त्यांच्या डोक्यात नाना तर्हेचे भुंगे! ऑर्कुटसारखे झाले तर? आपण फार सुंदर नि देखणे आहोत, पण फोटो पाहिला तर लोक काय म्हणतील, असल्या अनेक शंका त्यांच्या मनात. आणि आता आपले फोटो बघून म्हणतील, काय पण रंग आहे सौ. झक्कींच्या कपड्यांचा! नि झक्की पण अगदीच काहीतरी दिसतात!! बोलोत बापडे!

|
Anilbhai
| |
| Tuesday, August 21, 2007 - 3:00 pm: |
| 
|
Next GTG चे plans सुरू करा बघू लगेच >> म्हणजे पुढच्या वर्षी पर्यंत होईल एखादा जी टी जी. 
|
Runi
| |
| Tuesday, August 21, 2007 - 5:42 pm: |
| 
|
भाई, अगदी अगदी. आत्ता पासुनच GTG plan करा पुढचे. खरच एका चांगल्या GTG ला मुकले असे वाटतय. सुमॉ लाडवांचा फोटो टाक ग लवकर.
|
Arch
| |
| Tuesday, August 21, 2007 - 6:15 pm: |
| 
|
मग अश्विनी कोणाला म्हणाली चावट? रुनी, लाडवाचा फ़ोटो पाहून तुझ पोट भरणार आहे का? केवढी घाई ती? 
|
Supermom
| |
| Tuesday, August 21, 2007 - 6:27 pm: |
| 
|
रुनी, लाडवांचा फोटो नाही ग बाई माझ्याकडे. त्यापेक्षा पुढच्या एन जे गेट टुगेदरलाच ये ना. म्हणजे खाताच येतील.
|
आमच्यात (बागराज्यात) जी टी जी नसतं.. तेव्हा तुला लाडू मिळण्याची शक्यता नाही.. त्यासाठी ए. वे. ए. ठि. करावं लागतं, आणि त्याचा विषय सर्वप्रथम कोणी काढेल त्यानेच ते करावं असा नियम आहे. तेव्हा पुढचं ए. वे. ए. ठि. असाम्याकडे 
|
Runi
| |
| Tuesday, August 21, 2007 - 9:48 pm: |
| 
|
आर्च, तुला सुमॉकडुन आधीच FedEx आलय वाटते फ़्लोरीडाला. सुमॉ अग मला या ए.वे.ए.ठि ला यायचे होते पण जमले नाही, ही लालु नाही म्हणाली म्हणुन येता आले नाही. मला गाडी आणि ड्रायव्हर असे दोन्ही हवे होते, भाईंनी सांगीतलेला ट्रेनचा पर्याय मी बघीतला होता पण तो तितका सोपा नव्हता*. असामी, विनयचे बोलणे जरा लवकर मनावर घे बर.
|
इसवीसन एकोणीश्शे साठ ते सत्तरच्या दशकात हिन्दी शिनेमात खलनायक (खर तर गुन्ड पक्षी मवाली अस मला म्हणायच होत पण जरा भारदस्त शब्द वापरला... खलनायक) दाखविताना त्याला ज्या चट्टेरी पट्टेरी झेब्रा क्रॉसिन्गसारख्या पट्ट्यापट्ट्यान्चा टी शर्ट चढवीत अन तो छाती फुगवून दोन्ही हात कोपरात किन्चितसे मागे वाकवुन डोळ्यावर गॉगल लावुन मिशीला ताव मारीत जसा फिरताना दिसे, अगदी तस्सेच दिसणारे त्या वरल्या फोटूतले काऊबॉय इस्टाईल व्यक्तिमत्व कोण हे?????? आता फक्त डोक्यावर एक तिरकी हॅट, हातात पिस्तुल अन ओठात शिगार असा जामा निमा केला की बस्स! रॉबिनहूड तय्यार! अरेच्च्या??? तो रॉबिनहुडचाच फोटु तर नव्हे?????? DDD
|
Anilbhai
| |
| Wednesday, August 22, 2007 - 2:10 pm: |
| 
|
पुढच्या जी. टी. जी. चे प्लॅन सुरु केले आहेत. 
|
Asami
| |
| Wednesday, August 22, 2007 - 2:58 pm: |
| 
|
मी बागराज्यात ए. वे. ए. ठी आयोजित करायला एका पायावर तयार आहे. कोणाच्या घरी करावे बरे ते ?
|
Lalu
| |
| Wednesday, August 22, 2007 - 3:06 pm: |
| 
|
सारखं काय बागराज्य, आम्ही नाही जा... आमच्याकडे या. * रुनी ला घेऊन या कोणीतरी!
|
Supermom
| |
| Wednesday, August 22, 2007 - 3:08 pm: |
| 
|
कोणाच्या घरी म्हणजे काय? ते कोण एक बिपिन चौधरी आहेत ते राहणे, खाणे, पिणे,सार्याची व्यवस्था करताहेत म्हणे.
|
बे अरीया मधे या त्या पेक्षा GTG ला . * फ़क्त महागुरुच्या BB वर जाउन या gtg ला येण्या आधी * 
|
डिजे, तुझ आमंत्रण म्हणजे नागपूरात या एकदा संत्री खायला अस आहे बे एरीया पर्यंत यायचा खर्च बघता, इथे आम्ही ४ जिटिजी करू शकू. लालू, तू लाडू करणार का ते आधी सांग. मग तुमच्या राज्याला जिटिजीचा दर्जा द्यायचा का ते ठरेल
|
|
|