|
झक्की उवाच.. आधी लगिन ए. वे. ए. ठि. च्या प्रश्नाचे वाचा आणि विचार करा! ऑगस्ट १८ ही तारीख कशी काय वाटते? दुपारी, आमच्याकडे? मागे भरपूर जागा आहे, बॅडमिंटन, Horseshoe , क्रिकेट किंवा बेसबॉल खेळायला. गाणे बजावण्यासाठी पेटी, तबला, वगैरे नाही. घरातच अगदी दाटीवाटीने बसून ऐकायचे असेल तर जमेल. किंवा हवा बरी असेल तर बाहेरच बसून ऐकता येईल. आमच्या कडे बार्बेक्यू ची ग्रिल नाही. कुणाला उत्साहाने आणायची असल्यास त्यावर भाजायला पदार्थ मिळतील! 'पिण्याची' पण सोय होईल! दुर्दैवाने लाडु करणार्या नसणार, पण त्यांची रेसिपी मला माहित आहे! शाल व श्रीफळ मिळणार नाही, अक्षताहि नाहीत. विचार करा व लवकर कळवा!
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through August 13, 2007 | 20 | 08-13-07 2:40 pm |
  | Archive through August 13, 2007 | 20 | 08-13-07 8:44 pm |
  | Archive through August 14, 2007 | 20 | 08-14-07 2:31 pm |
  | Archive through August 16, 2007 | 20 | 08-16-07 12:39 pm |
  | Archive through August 17, 2007 | 20 | 08-17-07 4:10 pm |
  | Archive through August 18, 2007 | 20 | 08-18-07 2:15 pm |
  | Archive through August 20, 2007 | 20 | 08-20-07 12:50 pm |
  | Archive through August 20, 2007 | 20 | 08-20-07 5:55 pm |
  | Archive through August 22, 2007 | 20 | 08-22-07 5:25 pm |
  | Archive through August 23, 2007 | 20 | 08-23-07 1:23 pm |
  | Archive through August 24, 2007 | 20 | 08-24-07 7:47 pm |
Supermom
| |
| Friday, August 24, 2007 - 7:51 pm: |
| 
|
अन आर्च, तुझे रबडी भरलेले शाही गुलाबजाम खायला नक्कीच येऊ. (या बी बी वर आजचा दिवस काही येत नाही मी. लालूला पुडाच्या वड्या, आर्चला गुलाबजाम.... लोकांना अगदीच 'आयतोबा' वाटणार मी.)
|
आर्च, thanks, deeply touched, really! तुझे आमंत्रणाने. झक्की, खर्च कशाला ऽऽ. छे छे, तुम्ही सरळ एक मोठी गाडी बूक करांना आम्ही येतोच.
|
Maanus
| |
| Friday, August 24, 2007 - 7:59 pm: |
| 
|
अरे बापरे serious discussion सुरु दिसतेय इथे... तुम्ही तर पार तारीख जाग वैगेरे पन ठरवुन टाकलाय...
|
Amruta
| |
| Friday, August 24, 2007 - 8:38 pm: |
| 
|
रबडी भरलेले शाही गु.जा. आयला मी पण येइन कसही जमवुन आणि सु.माॅ तु कसलि ग आयतोबा? आम्ही आयतोबा, अजुन तुझे लाडु खातोय
|
Runi
| |
| Friday, August 24, 2007 - 8:54 pm: |
| 
|
ए अमृता सारखे सारखे काय सांगते गं सुमॉचे लाडु पुरवुन पुरवुन खातोय ते GTG ला न आलेल्या सगळ्यांच्या दुःखात अजुन भर.
|
Runi
| |
| Friday, August 24, 2007 - 8:57 pm: |
| 
|
झक्की खरच गाडी बघणार असाल तर दिवाळीच्या आधी नाही का जाता येणार (म्हणजे नवरात्रात हो). दिवाळीत माझी देश वारी आहे.
|
चालवायला दिले अधिकृतरित्या तर काय इथले ट्रक पण चालवू आर्चच्या घरी जायला उपास, आपण तेंव्हाच निवांत भेटू.
|
Zakasrao
| |
| Saturday, August 25, 2007 - 5:42 am: |
| 
|
बाबा वासी तुमचे GTG छान झाले. त्याबद्दल झक्कि काकानी खुप मेहानत घेतली अस दिसतय. अर्थात त्याना मदत पण करणारे होतेच. विनय वृतांत मस्तच. पुढचय GTG साठी शुभेच्छा! जाता जाता हल्ली रॉबिन कमी दिसतोय ना सगळीकडे
|
त्या जिटीज़ी मधे गडबड करायची म्हणून तो जो बिळात शिरला ते त्याच्या मूळ जागी, म्हणजे जंगलात, पोचला म्हणे. (खात्रिलायक सुत्रांकडून (म्हणजे नंदिनी? )) त्यानंतर त्याची काही वार्ता नाही.
|
हे 'बाबा' वासी कोण? आम्ही बा. रा. वासी आहोत.. बापूवासी, बाबावासी कोणी इथे दिसत नाहीत.... 
|
मला तर अलिबाबा नि चाळीस चोरांचीच आठवण झाली.. आणि मला यातले नेमके अलीबाबा कोण ते डोळ्यासमोर आलं! विनय, ते बहुदा 'बाष्फळ बडबड करणारे बागराज्यवासी' असं असावं.
|
Zakasrao
| |
| Tuesday, August 28, 2007 - 4:36 am: |
| 
|
विनय त्यावेळी तुम्ही भारतात होता की काय? एकदा सगळ्यानी मिळुन बीबी चा बाबा केला होता.त्यात काकांचा सहभाग मोठा होता. त्याचा बहुतेक "बागरज्य बातमीफ़लक"" असा लोंगफ़ॉर्म होता.
|
इथेच होतो, पण म्हटलं खेचावं तुला ही.... काय? MR , ते 'बागराज्याच्या बातमीफलकावर बाष्कळ बडबड' (बाबाबाब) करणारे असे आहे... 
|
Zakki
| |
| Tuesday, August 28, 2007 - 1:12 pm: |
| 
|
इथे कुणिही बाष्कळ किंवा बाष्फळ (हा कुठला शब्द?) लिखाण करत नाहीत. उथळ व पांचट असेल, पण बाष्कळ नाही. उगाच अनुप्रास जमावा म्हणून काय वाट्टेल ते लिहावे का? त्यापेक्षा रं पा. उ. पां वगैरे वापरून दोनोळ्या, चारोळ्या लिहा. पातोळ्या नको. (आता पातोळ्या म्हणजे तरी काय?) असे आपणच काहीतरी लिहायचे नि लोक बाष्कळ लिहीतात म्हणायचे! शो. ना. हो.
|
ह्या इथे पहा.... पातोळ्या... /hitguj/messages/103383/130454.html?1188044128
|
Zakki
| |
| Tuesday, August 28, 2007 - 2:54 pm: |
| 
|
अनेक प्रश्न! या 'पातोळ्यांचा' चारोळी, दोनोळी शी काय संबंध? शिवाय पानांचा वास लागावा म्हणून पानात गुंडाळण्याचा उपद्व्याप करण्यापेक्षा सरळ हळद घालून किंवा न घालता तसेच खाल्ले तरी छाऽन लागते. उगाच निरुद्योगी लोकांचे उपद्व्याप! बकाबका खावे नि टीव्ही बघायला बसावे! नाहीतर झोपावे निवांऽत!
|
झक्की.. तुमच्या भाषेत सांगतो.... द्राक्ष आणि वाईन, (किंवा हटकेश्वर आणि हुड) इतकाच फरक आहे हळदीच्या पानात आणि हळदीत..... तेव्हा, पानात गुंडाळणे आणि 'सरळ हळद घालणे' या काहीही सम्बंध नसलेल्या क्रिया आहेत... आता चारोळी, दोनोळी, पातोळी, पाकोळी, चक्रोळी, पांचोळी अश्या शब्दांचा संबंध कवितेच्या बा. फ. वर सापडेल..
|
Zakki
| |
| Tuesday, August 28, 2007 - 6:03 pm: |
| 
|
निदान काचोळीला तरी तुम्ही हात घातला नाही हे नशीब!

|
यावर उत्तर दिलं असतं, पण Admin/Mods काठी घेऊन मागे लागतील म्हणून आवर घलावा लागला.. * द्राक्षं खायची सोडून दुपारीच वाईन प्यालेले दिसतात झक्की... कुठेतरी तोंड घालत सुटलेत* 
|
Zakki
| |
| Tuesday, August 28, 2007 - 6:48 pm: |
| 
|
हे द्राक्ष नि वाईन, चारोळि नि पातोळी या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्याच सहेतुक केलेल्या तुलना. तुम्हाला हे पुढे कुठपर्यंत न्यायचे होते ते मी ते मी ओळखले नि म्हणून तुम्हाला ते झोंबले! म्हणून मग माझ्यावर ढकलून मोकळे झालात. पण कळतात, कळतात बरे या कारवाया इथल्या सूज्ञ अश्या बा. रा. करांना! त्यातले काही नेमस्तक मैत्रीच्या मिषाने तुमच्यावर नेहेमीच नजर ठेवून असतात. आता मला दिलेल्या ग्रिलमधे असलेल्या छुप्या स्पीकरमुळे मला लगेच तुमच्या बद्दल माहिती मिळते. म्हणून तर मी लगेच खरे काय ते ओळखले! तेंव्हा सावधान!
|
'ज्याच्या हाती ससा तो पारधी' ही म्हण तुम्हाला माहीत असेलच.... ती नाही तर 'चोच्यामचा' माहीत असेल्* चोराच्या मनात चांदणे* तेव्हा आता तुम्हीच ओळखा काय ते... 
|
|
|