|
Maanus
| |
| Monday, August 20, 2007 - 1:11 pm: |
| 
|
विनयराव मला वाटल, मला विसरले की काय तुम्ही... पन आहे. मग thanks म्हणायला हरकत नाही फोटो मोठे करायचेय... hummm http://www.flickr.com/photos/sagari/sets/72157601552130147/ इथे टिचकी मारा व एक एक फोटो बघावा लागेल.... फोटो च्या वर all sizes नावाचे एक button आहे ते दाबले तर वेगळ्या वेगळ्या size मधले फोटो दिसु शकतात.
|
Zakki
| |
| Monday, August 20, 2007 - 1:33 pm: |
| 
|
अरे बाबा विनय, तो मला नाही काका म्हणाला, सव्यसाचीला! त्याचा एक फोटो काढायला हवा होता. झक्कपैकी सव्यसाचींच्या मांडीवर झोपून एका हातात चिप्स ची पिशवी घेऊन दुसर्या हाताने मजेत खात होता!

|
यालाच वाण नाही पण गुण लागला म्हणतात बहुतेक बाकी, झक्कींच्या खर्चाने वाईन आणि सुमॉचे लाडू असतील तर सुमॉच्या मुलाला कितीही वेळ मांडीवर राहूदे, आपल्याला काय बी तकलीफ़ नाय
|
माणसा, फोटो टाकलेस (हो, आता तर फोटो दाखवायचेच नाहीत अशी फ़ॅशन आहे इथे ) आणि छान काढलेसही, हे चांगल काम केलस.
|
Maanus
| |
| Monday, August 20, 2007 - 2:03 pm: |
| 
|
थांकु थांकु थांकु... अजुन थोडी प्रशंसा येवुंदेत
|
सागर, तुझ्यासाठी कविता करावी लागली मला, म्हणून जरा उशीरा नाव आले तुझे. पण तुला विसरणार नाही मी... प्रशंसा, प्रशंसा, प्रशंसा... 
|
Maanus
| |
| Monday, August 20, 2007 - 2:12 pm: |
| 
|
अरे हो विसरलोच की, थांकु तिच्याबद्दल, मस्त आहे... आणि ती कवीता... कुणाला आठवतेय का ती?
|
Itgirl
| |
| Monday, August 20, 2007 - 2:17 pm: |
| 
|
नमस्कार मंडळी GTG चा वृत्तांत खूप छान लिहिलाय, आणि फ़ोटो पण खूप छान आले आहेत सु. मॉ.: आता GTG धडाक्यात पार पडल, आलेल्यांना लाडू पण मिळाले, आम्हाला तेवढी - 'अनुभूती' कथा पूर्ण करून मिळेल का प्लीज?
|
Zakki
| |
| Monday, August 20, 2007 - 2:20 pm: |
| 
|
कुठली? नुकतीच गेली माझी मामी, ही का?

|
माणूस आणि विनय, good job शेवट पर्यन्त आम्हाला हे GTG म्हणजे झक्कींची काहितरी फ़िरकी आहे असे वाटत होते. जाताना अनेक वेळा GPS ला सिग्नल मिळेनासे झाले आणि आजू बाजूला दूर दूर पर्यन्त जंगल दिसू लागले तेव्हा ती शंका जास्तच बळावली होती. पण शेवटी आम्ही चिकाटीने पोहोचलोच! आणि अहो आश्चर्यम! झक्कींनी खरोखरच उत्तम व्यवस्था केली होती. ही 'व्यवस्था' म्हणजे सौ झक्की, विनय, भाई, माणूस इ. कामसू लोकांच्या गळ्यात सर्व कामे यशस्वीरित्या टाकणे हे चाणाक्ष लोकांच्या लक्षात आलेच असेल मधेच झक्कींच्या कन्येच्या लग्नाचे आल्बम बघण्याचा कार्यक्रम झाला, आम्हाला झक्कींचा अमेरिकन जावई बघायचा होता पण झक्कींना त्याची identity लपवायची होती बहुधा!(का काय माहित! ) म्हनून त्यांनी त्या आल्बम मधील एक झब्बा सलवार मधील गोरा कोकणस्थ तरुण दाखवून हाच तो अशी बतावणी केली. असो. पण कन्या आणि जावई जो कुणी आहे तो दोघेही अगदी छान आहेत हो! मधे मधे काही मायबोलिकरांचे फ़ोन येत होते, खरच हे GTG होतेय की काय असे विचारायला. माणूस इतकी भराभर कामे करत होता, (म्हण्जे पाट पाणी करणे, सर्व्ह करणे, मागचे आवरून झाक पाक वगैरे..) की त्याला सर्वांनी Most Wanted ही पदवी दिली. (*म्हनजे मोस्ट एलिजिबल बॅचलर बर का*) खर सव्यालाही ती पदवी द्यायला हरकत नाही. कारण तो पण (दोन्ही हातांनी) वांग्या बटाट्याचे काप करणे, (दोन्ही हातांनी) त्यात मीठ तिखट टाकणे इ काम करत होता. शिवाय सुमॉ च्या मुला मांडीवर पण घेऊन बसला होता बराच वेळ. बाकी ऍडमिन ना बघून माझा बराच अपेक्षाभंग झाला! म्हणजे असे की डोक्यात एक कल्पना फ़िक्स होती की ऍडमिन म्हणजे अत्यन्त गंभीर प्रौढ मनुष्य असणार! पण तसे ते अज्जिबात नाहीत तर अशा रितिने GTG खरोखर झाले आणि चक्क सर्व बा रा करांनी झक्कींच्या घरी पाहुनचार झोडला! झक्की आणि सौ झक्कींना धन्यवाद!
|
Maanus
| |
| Monday, August 20, 2007 - 2:29 pm: |
| 
|
पण तुला विसरणार नाही मी... असे काय केले मी????
|
Dineshvs
| |
| Monday, August 20, 2007 - 3:29 pm: |
| 
|
विनय, छान वृतांत आहे. झक्की ना कुणी सिरियसली का घेत नाही ?
|
दिनेश... झक्कींची तशी प्रतिमा, त्यांनी स्वतःच्या प्रतिभेने निर्माण केलेली आहे... (आठवा 'प्रतिभा आणि प्रतिमा').. आवडतं काही लोकांना तसं..... त्यासाठी त्यांनी कसून मेहनत केलीय.. त्यात हुडायण हे त्यांच्या समांतर चालले असते.. त्यामुळे असेल... माणसा, तुला विसरण्यासारखा तू नाहीस म्हणून (मी विसरणार नाही).. सोप्पं आहे.... 
|
Amruta
| |
| Monday, August 20, 2007 - 3:46 pm: |
| 
|
आम्ही seriously घेतलेल ह झक्किंना म्हणुन तर एवढ्या लांबुन गेलो. खरच खुप धम्माल आली झक्किंकडे. पाहुणचार तर मस्तच. विनय मस्त वृतांत लिहिलाय. आता पुढच्यावेळि झक्किंकडे त्यांच्या मस्त घरात रहायचा प्लान करु ;)
|
झक्की काका - काकुंच्या आगत्या बद्दल आणि ऍडमिन ने खास बोस्टन हून भेट दिल्या बद्दल धन्यवाद ! माणसाचा कामाचा उरका , सव्याचे grilled बटाटे आणि त्या साठी पुरवलेले भाईंचे इंधन , श्री झक्कींच्या recipes वापरून केलेली सौ झक्कींची पाव भाजी - इडली सांबार , सुमॉ चे लाडू , झक्कींचा loaded फ़्रीज या सर्वांनी gtg यशस्वी करण्यात विशेष हातभार लागला . ऍड्मिन ची superhit ' मामी ', विनय देसाई आणि भाईंचे गायन वादन , सौ झक्कींनी चढवलेल्या अनेक भेंड्या याचाही उल्लेख करावाच लागेल . झक्कींच्या मुलीच्या लग्नाचा album पण झक्कास .. * त्यात त्यांच्या जावयाचे डोळे घारे कि निळे या निमित्ताने अनेक जणींनी त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले म्हणे !
|
Amruta
| |
| Monday, August 20, 2007 - 4:01 pm: |
| 
|
आणि धुळेंच शेंडी लावण विसरलीस कशी ग
|
Admin
| |
| Monday, August 20, 2007 - 4:29 pm: |
| 
|
GTG खूपच छान झाल्याचे कळाले. झक्कींचे आतिथ्य आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह याला तोड नाही असे ऐकले. एका चांगल्या अनुभवाला मुकल्याची चुटपुट "लागून राहिली" आहे. (झक्किंच्या नागपूरी भाषेबद्दलही काही चर्चा झाली असे म्हणतात). ऍडमिन म्हणजे अत्यन्त गंभीर प्रौढ मनुष्य असणार! पण तसे ते अज्जिबात नाहीत मी एक प्रौढ आणि अत्यंत गंभीर मनुष्यच आहे. GTG ला आला तो माझा Duplicate ID असावा! अगदी हद्द झाली बुवा या id ची
|
इथले ऍडमिन पण Duplicate Id घेतात.. मग इतरांनी असे केले तर त्यांना कोण अडवणार...? 
|
अगदी हेच म्हणणार होते मी.
|
Ashwini
| |
| Monday, August 20, 2007 - 5:55 pm: |
| 
|
>>GTG ला आला तो माझा Duplicate ID होता हो, बरोबर तसेच असणार. कारण खरे, अत्यन्त गंभीर आणि प्रौढ असणारे admin, Boston पासून आमच्याबरोबर होते आणि झक्कींनी दिलेल्या चुकीच्या directions शोधत आमच्याबरोबर संध्याकाळपर्यंत वणवण करत होते. हा सगळा झक्कींचाच चावटपणा. नाहीतर आम्हीही पोहोचलो असतो GTG ला 
|
|
|