|
Runi
| |
| Saturday, August 18, 2007 - 3:58 pm: |
| 
|
सर्व मायबोलीकर मजा करा आजच्या ए. वे.ए. ठि ला. धावते समालोचन टाका रे कुणी तरी. पुढच्यावेळी मात्र मी नक्की असणार आहे.
|
Maanus
| |
| Sunday, August 19, 2007 - 1:09 pm: |
| 
|
मी झक्की बोलतोय. हा माझा duplicate_id आहे. बा. रा. (बाग राज्य) ए. वे. ए. ठी ठरवल्याप्रमाणे सिध्दीस गेले. मी पत्ता चुकीचा दिलेला. त्यामुळे हे असे झाले.
|
Maanus
| |
| Sunday, August 19, 2007 - 1:13 pm: |
| 
|
...पन काही वेळाने मला डोक्याला हात लावयची वेळ आली, कारण. admin चिडले हो. माझ्याकडुन झालेल्या ह्या भयंकर चुकीबद्दल त्यांनी माझा id बन्द केला आणि मला आता duplicate_id वापरावा लागतोय. 
|
Maanus
| |
| Sunday, August 19, 2007 - 1:20 pm: |
| 
|
परंतु माझ्या बद्दल घनघोर आदर असणार्या ह्या व्यक्तीस पत्ता कसकाय सापडला हे कळत नाही बुवा.

|
Maanus
| |
| Sunday, August 19, 2007 - 1:24 pm: |
| 
|
येवु ईच्छीत असलेल्या परंतु चुकीच्या directions मुळे न आलेल्या सभासदांना मी बाकीचे रिकाम्या खुर्य्च्यांचे फोटो लवकरच पाठवतो. आपल्याला झालेल्या तसदीबद्दल मी क्षमस्व आहे.
|
Amruta
| |
| Sunday, August 19, 2007 - 2:59 pm: |
| 
|
वा राॅबिनहुडाचा फोटो छान आलाय
|
Maanus
| |
| Sunday, August 19, 2007 - 3:06 pm: |
| 
|
अरे अरे मी दिवस्भरत पाचच पत्र पाठवु शकत असल्या कारणाने सगळ्यांना पत्र नाही पाठवु शकत आज... अनिल भाईंना पाठवले आहे. तुमच्या कडे सर्वांचे पत्ते अस्तेल तर क्रुपय पोच करा.
|
Maanus
| |
| Sunday, August 19, 2007 - 3:12 pm: |
| 
|
चुकीची link पाठवली गेलीय.. मला तुम्ही मेल करा, मी रिप्लाय करतो लगेच.
|
काल पासून पत्ता शोधतोय.. आज कसाबसा घरी पोहोचलो... (चांगलीच शेंडी लाऊन घेतली मी..) तिथे फक्त हुड पोहोचला की काय? 
|
Supermom
| |
| Sunday, August 19, 2007 - 3:37 pm: |
| 
|
माणूस, तुला मेल पाठवलीय.
|
Supermom
| |
| Sunday, August 19, 2007 - 4:07 pm: |
| 
|
धन्यवाद सागर. छान आलेत फोटो.
|
बाग राज्य 'एका वेळी एका ठिकाणी' श्रावण २००७ तारीख अठरा. वेळ सकाळची. मी आणि अनिलभाई गाडीत बसून निघालो. आत्तपर्यंतच्या ए. वे. ए. ठि. चा अनुभव बघता वाटेत काय काय अडचणी येतील याची एक यादी करून घेतली होती. त्यात हुडाने संशयाचे बी पेरून ठेवले होतेच. झक्कींनी सर्वाना मनापासून आंअन्त्रण दिलं होतं. तिकडे हुडाने भयंकर आत्मविश्वासाने छातीठोक विधाने करून खुंट्या बळकट करून ठेवल्या होत्या. आता झक्की खरे की हुडाचा विश्वास एवढाच प्रश्न. आतापर्यंत प्रत्येक ए. वे. ए. ठि. ला येतो म्हणून सांगून अगदी वेळेवर पोहोचले होते झक्की. तिकडे हुडाने रात्रीचा दिवस करून (डोळ्यात खोबर्याचे तेल घालून) किल्ला लढवत ठेवला होताच. तेव्हा आता एकदाचा सोक्षमोक्ष होणं जरूर होतं. बर्फाची वादळे (ए. वि. ए. ठि. पूलपाणी (ज्याला मराठीत ब्रीजवॉटर असे म्हणतात)), ऐनवेळी रद्द झालेल्या इतर ए. वे. ए. ठि. च्या आठवणी, बा. रा. कर नसलेल्या पण जखमेवर संत्रे मीठ चोळू पहाणारे इतर मायबोलीकर अश्या कितीतरी अडचणी यापूर्वी आलेल्या होत्याच, तेव्हा वेळे अगोदरच पोहोचावे असा बेत होता. म्हणजे पोपट झाला तरी पळ काढून आम्ही तिथे आलोच नव्हतो असं सांगता आलं असतं. पोहोचलो तर घरी जरा सामसूमच वाटली. खरंच भुयारी मार्गाने पलायन केलं की काय अशी शंका (ही सगळी हुडाची कृपा) स्वतः श्री. झक्की बाहेर आले, आणि सौ. म्हसकर पण घरात दिसल्या. भुयार असलं तरी त्याच्या दोर्या कापून टाकलेल्या आहेत हे लगेच लक्षात आलं. (मी पाठजमिन (मराठी ब्याकग्राऊंड) संगीत म्हणून शिवकल्याण राजा ऐकतोय) त्यानी सगळी तयारी करून ठेवली होती. म्हणजे मासे, फळे, बटाट्याचे काप (मराठी वेफर्स), खरे बटाटे मसाले, चटण्या, कच्च्या भाज्या, अश्या अनेक गोष्टी त्यांच्या स्वतःच्या पाककृतीने तयार करून ठेवल्या होत्या (या पाककृती फार सोप्या असतात, फक्त या कृतींनी काही तयार करायचं झाल्यास गृहस्वामिनीची पूर्ण परवानगी लागते, आणि ती मिळेल अशी खात्री बहुतेक घरात नसते ) पोहोचल्या बरोबर भाईंनी झक्कींच्या एकविसाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना भाजणी चूल (मराठीत ग्रील) भेट केली. खरं तर ते 'कशाला कशाला' असं म्हणत होते, तेव्हाच मला संशय आला की छुप्पा पाहुणा (मराठी सिक्रेट मेम्बर) म्हणून हूड तिथे लपून हे सगळं पहात असावा. तसं त्यांच्या घरामागे भुयारासारखं काहीतरी दिसतही होतं पण झक्कींच्या म्हणण्याप्रमाणे ते घुशीचं बीळ होतं. आता भाजणी चूल नवीन म्हटल्यावर ती जोडून उभी करायची जबाबदारी घ्यावी लागली. लगेच 'जिसका जुता' ची आठवण झालीच. आता त्यात सर घालून का किल्ला सर करणं आलंच. 'लवकर येतील त्या मायबोलीकरांना कामाला लावण्यात येईल' या वाक्याला जागून आम्ही जोडणी करायला सुरूवात केली. सव्यसाची आणि लक्ष्मीकांत यांनी पण वेळेवर पोहोचून (म्हणजे पंधरा मिनिटे उशीरा) या कामी हात लावला. मग भाईंनी आणलेली वांगी, घरचे बटाटे, ढब्बू मिरच्या, मासे अश्या अनेक प्रकारांना मसाले, चटण्या हळद, तिखट फासून ते भाजायचे काम मी, भाई, सव्यसाची अश्या सगळ्यांनीच आळीपाळीने केली. कोळसे पेटवायला महिलावर्ग अर्थातच गायब होता. हा सगळा खटाटोप कुणीतरी फ्लोरिडामध्ये आपल्या घरी बसून 'आगाऊ सल्ला' दिल्यामुळे करावा लागला होता, हे मला सांगावे वाटते. भाजाभाजीच्या या वेळेत (म्हणजे भाजी भाजण्याच्या), अम्रुता, किरण आणि कन्या जुई, मैत्रेयी (तीच जी बा. रा . सोडून इतर बातमीफलकांवर दिसते ती) आणि मेंदी फेम दीपांजली (हिला मराठीत डीजे पण म्हणतात) आले. आल्या आल्या वांगी कशी करपली आहेत, तेव्हा त्याचे कोळसे करा. त्यावर भाजलेले बटाटे आम्ही खाऊ असा सूर त्यांनी लावला. खरं तर भाजता भाजता दहा बारा वांग्याचा कापातली आठ दहा कापं निसटून कोळश्यावर पडली होतीच, पण म्हणून काय असं...... एवढ्या वेळात श्री व सौ झक्कींनी बाकी पाहुण्यांची खाण्याची आणि महत्वाचं म्हणजे पिण्याची सोय केली होतीच (त्यामुळेच काही वांगी खाली पडली मृण, नाहीतर पडली नसती). एवढ्यात अजय आणि आभा पण आले आणि कोरम पूर्ण झाला. मधुरिमा येणार पण ती उशीरा येणार हे माहीत होतं, पण तिच्यापेक्षा लाडू येणं फार महत्वाचं होतं. बा. रा. च्या ए. वे. ए. ठि. ला लाडूची मोठी परंपरा आहे (स्वाती), तेव्हा लाडू नाही तर ए. वे. ए. ठि. अधिकृत नाही अशी तिला समज देण्यात आली होतीच. मधूरिमा येणार येणार अशी हाकाटी पिटत सगळ्यांनी जे हाती आलं ते खाऊन घेतलं होतंच. अनेकतर्हेचं रंगीत पाणी बरोबर असल्याने 'करपलेली वांगीही' अमृताप्रमाणे (म्हणजे ती कनेटिकट हून आली ती नव्हे) वाटली. तेवढ्या एक मृण तिकडे आलीच. पण ती खरी मृण नसून झक्कींकडे आलेली तोतया होती असा खुलासा लवकरच झाला. या सगळ्यात माणूस अमृता बरोबर आला होताच, पण एक माणूस आला, हे लिहिलं तर तुम्हाला 'त्यात काय विशेष' असं वाटेल म्हणून लिहिलं नाही. तेवढ्यात फोन वाजला आणि 'बे' विभागातून सावध चौकशी करत सुप्रिया आणि समीर यानी खात्री करून घेतली. 'हूड की झक्की' अशा संभ्रमात बर्याच मायबोलीकरांचे छुपे फोन येऊन गेल्याची बातमी पण कानावर आली. ए. वे. ए. ठि. आहे, झक्कींच्या घरी आहे, ते स्वतः त्याठिकाणी आहेत, आणि स्वतः आग्रहाने आलेल्या पाहुण्यांना स्वखर्चाने खाऊ घालता आहेत हे फोनवरच्या लोकांना (का कोण जाणे) पण धक्कादायक वाटत असावे (माझा तर्क) मग पावभाजी, इडल्या (आणि भरपूर चटणी बरोबर), द्राक्षं, संत्री (नागपुरी नसावीत, पण फ्लोरिडाची नक्कीच नाहीत), बर्फसाय (मराठीत आईस्क्रीम), केक अश्या अनेक पदार्थांवर ताव मारून झाला. मधूरिमा आणि परिवार लाडूंसकट येऊन दाखिल झाला होता, तेव्हा सर्वांनी तिला 'अगं गम्मत म्हणून लाडू लाडू करत होते लोक, उगीच मनावर घ्यायचं नाही' असं म्हणत लाडवांच्या डब्यात हात घातला. थोडा वेळ खाली उन्हात डबा राहिल्यामुळे ते लाडू गरम झाले होतेच, तेव्हा ते भाजणीचुलीवर परत भाजु नयेत असं पण एकमत झालं. अत्यंत भयंकर मस्त झालेल्या या लाडवात काजू, बदाम वगैरे सापडल्यामुळे 'यापुढे मधुरिमा यांना लाडूची विशिष अधिकार बहाल करण्यात येत असून', यापेक्षा चांगले लाडू करून आणल्यासच स्वाती यांना बा. रा. बा. फ. वर लाडू हा शब्द वापरण्याची परवानगी देण्यात येईल. अन्यथा त्यानी या विषयातून सपशेल माघार घ्यावी अशी त्यांना समज देण्यात आली असं समजावे. खाऊन पिऊन सगळे दमल्यावर खेळ खेळावेत अशी एक सूचना आली. लक्ष्मीकांत यानी आपली हातचलाखी दाखवत 'चार घड्याळे घेऊन' पॅटर्न्स चा खेळ करून दाखवला. लाडवांवर खुष होऊन त्याने मधुरिमा याना तीन सेकंदात त्या खेळाची दिक्षा देऊन त्यांच्या गटात सामिल करून घेतलं, आणि उरलेल्यांच्या रंपामध्ये तरंगणार्या डोक्याला कल्हई करून टाकली. Badminton चा खेळ हा फक्त त्याची जाळी उभारण्याचा खेळ ठरला, कारण त्या नंतर मारलेले प्रत्येक फूल नुसतेच पाकळी होऊन राहिलं. बेसबॉलचा खेळ 'घराच्या काचा फुटतील' म्हणून रद्द करण्यात आला. मग गाणि म्हणावीत अशी टूम निघाली. त्यात 'नुकतीच गेली माझी मामी' हे अजयने म्हटलेलं गाणं सुपरहिट ठरलं. मधुरिमा यांच्या श्रीयुतांनी मधुरिमा यांना मागणी घालताना त्यांनी स्वतः लिहिलेली कविता गाऊन दाखवली, त्यातून 'माणूस' ला बर्याच टीप्स (म्हणजे मुद्दे) मिळाल्या म्हणे. तो तातडीने त्या कवितेच्या कॉपिराईट्सची चौकशी करताना दिसला. गाणं म्हणताना श्रीयुत मधुरिमा यांनी थांबून आपल्या सौ. कडून काही शब्द विचरून घेत होते, त्यावरून 'माणूस' यांना 'गाणे अपुले असलेतरी, शब्द तिचे विसरू नको, सुखी संसार गीताची चाल सांगे बायको' अशी नवीन कविता सुचली अशीही एक बातमी आहे. मग परंपरेप्रमाणे (ही सगळ्याच ठिकाणी पाळली जाते) भेण्ड्या खेळायच्या ठरल्या. मराठी गाण्यांच्या भेण्ड्या या सौ. म्हसकर यानाही भावल्या आणि त्यांनी स्वतः काही गाणी म्हणून भाग घेतला. मराठी भेण्ड्या मध्ये 'ल, न,' ही अक्षरं इतक्या वेळी येतात की मायबोलीवर एक वेगळा बातमी फलक फक्त या दोन अक्षरांच्या भेण्ड्या खेळण्यासाठी असावा अशी सूचना करावी वाटली. त्या 'कुटं कुटं जायाचं हनीमुनला' चालू झालं आणि लालूचा फोन. लगेच स्पिकरवर टाकून आम्ही तिलाही ते गाणं ऐकवलं. या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट राहिली. आपण जी टमाट्यांची बाग टमाट्यांची बाग अशी कथा गेली कित्येक वर्षं ऐकत आलोय (आठवा हिरवे टमाटे.. कापले), ती बाग म्हणजे टमाट्याची दोन छोटी झाडं निघाली. तेव्हा ते टमाटे का कापले या प्रश्नाचे उत्तर आतातरी कुणाला सुचतंय काय? ...समाप्त... 
|
Maanus
| |
| Sunday, August 19, 2007 - 4:38 pm: |
| 
|
open for public.... NJ GTG 07 Book for original copies, send me mail
|
Maanus
| |
| Sunday, August 19, 2007 - 8:47 pm: |
| 
|
in case if u want to slow down the slideshow, there is pause button at left bottom. .. .. ..
|
वृत्तांत एकदम फर्मास हो विनय!!! भरपूर खादाडी आणि पिदाडी झालेली दिसतेय. (तरिही) हा वृत्तांत टाकु शकलात!!! श्री आणि सौ झक्कींचं आदरातिथ्य खरंच जबरजस्त आहे हे जाणवलं! आम्ही नागपुरातून निघालो तरी नागपुरी पाहुणचार आमच्यातून निघत नाही बघा!! चुलीत पडलेल्या न पडलेल्या अश्या सगळ्या प्रकारच्या भाज्यांवर यथेच्छ ताव मारून मग मला शीव्या घातल्या असतील तरी काही हरकत नाही. मायबोलीकरांच्या रसनातृप्तीसाठी मी हे बलीदान.... फोटोत लाडु खाल्ल्यानंतरची तरतरी अगदी स्पष्ट दिसतेय सगळ्यांच्या चेहेर्यांवर! सु. मॉ. लाडवाचं पेटंट फाईल करून टाक! (मागणी घालण्याआधी श्रियुत सुपरडॅड यांनी आधी लाडवाची चव बघीतली असणार नक्की! ) तर असं हे गेल्या २ आठवड्यांपासून गाजत असलेलं GTG खरंच आणि मस्त पार पडलं हे पाहून आनंद झाला. फ्लोरिडाला एक ए. वे. ए. ठी. करण्याचा प्लॅन आहे. कधी येताय मंडळी?
|
Supermom
| |
| Monday, August 20, 2007 - 1:53 am: |
| 
|
विनय, वृत्तांत लिहिलात हे छानच, पण लगेच लिहिलात हे त्याहून छान.
मृ, कधी करतेस? लवकर सांग ग बाई. (या निमित्ताने disney land ट्रिप सुद्धा उरकून घेईन म्हणते.)
|
Dhumketu
| |
| Monday, August 20, 2007 - 4:24 am: |
| 
|
झक्कींचे घर बरेच मोठे दिसते आहे.. तिकडे आल्यावर रहायची सोय होईल का? फ़ोटो टाकलेत हे बाकी बरे केलेत.....
|
Psg
| |
| Monday, August 20, 2007 - 5:49 am: |
| 
|
वा वा. मस्त वृत्तांत. लगेच लिहिल्याबद्दल आणि फोटोही लगेच उपलब्ध केल्याबद्दल विनय आणि माणूसचे आभार. इतके सगळे जमले की मजा येतेच झक्की, तुमच्या घराचे backyard खूपच प्रशस्त आहे हो!
|
Supermom
| |
| Monday, August 20, 2007 - 12:05 pm: |
| 
|
पूनम, झक्कींचे घर तर छान आहेच, पण श्री व सौ. झक्कींनी केलेले आदरातिथ्य खरेच लाजवाब. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची त्या दोघांनी अगदी उत्तम बडदास्त ठेवली. माझा मुलगा तर इतका खूश होता की अजूनही, 'आई, पुन्हा कधी जायचं त्या काकांकडे?' असं विचारतोय.
|
त्यांना काका म्हणाला? (मग मला तर दादाच म्हणेल तो.... )..... मृण्मयी, पिदाडी झाल्याशिवाय लेखन जमत नाही ना? आणि सर्वांना (जरी ते कचरत असले तरी) थँक्स, हा पंचनामा रिपोर्ट वाचल्याबद्दल... 
|
|
|