Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 17, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » New Jersey » New Jersey 18th August 2007 » Archive through August 17, 2007 « Previous Next »

Maanus
Thursday, August 16, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे, किती त्या चुका एका छोट्याश्या flyer मधे... काय झाले रात्रीच्या अंधारात बहुतेक एकडचे खिळे तिकडे लावले गेले असतील. DTP चा कोर्स करायला पाहीजे, खिळ्याचा प्रकार अवघड होत चाललाय दिवसेंदिवस.

** शिवाजी०५ फॉन्ट चा editor कुठे मिळतच नव्हता mac साठी :-(


Zakki
Thursday, August 16, 2007 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, धन्यवाद, यादी केल्याबद्दल. त्या व्याकरणाच्या नि शुद्धलेखनाच्या चुकांकडे दुर्लक्ष कर. मुद्दा महत्वाचा!

तयारी जय्यत सुरु आहे.

** अगदीच राहवत नाही, म्हणून जाता जाता एक शालजोडीतला -

गीक लोकांसारखा Mac आणण्या ऐवजी सर्व लोकांसारखा मायक्रोसॉफ्ट वापरणारा पी सी घेतला असता तर असे नसते झाले!!
**

Kedarjoshi
Thursday, August 16, 2007 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा मस्तच. पण काय रे रॉबीनहुड ला घाबरुन तु त्यांचे पण पोस्टर टाकले का? ओ रॉबीनहुड असे घाबरवने बरे न्हवे हो.

(अन हे झक्कींच्या लक्षात कसे आले नाही).


Zakki
Thursday, August 16, 2007 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लक्षात आले तर. पण काय डरतो काय मी?

मुख्य म्हणजे वरील यादी पूर्ण आहे का?

आश्विनी, रुनि?

इतर कुणि?



Robeenhood
Thursday, August 16, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते रॉबीनहूड आणि बोवाजींचे 'ए. वे.ए. ठि.' आहे:-)

Sashal
Thursday, August 16, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माणुस पण ना. कुठे न्यायची सोय नाही. आणि ते वरती 'श्री हटकेश्वर प्रसन्न' अस लिही रे..
Ldule आणि लक्ष्मीकांत धुळे एकच आहे आणि मधुरीमा आणि सुपरमाॅम एकच. केदार नाही येत. आणि कार्यख्रम???


Supermom

Thursday, August 16, 2007 - 8:39 am:


अहो अनिलभाई ते त्याने इथल्या accent मधे 'कार्यख्रम' लिहिलेय. हिंदी सिनेमात tom alter वगैरे हिंदी बोलतो ना, तसं.

>>>

यावंसं वाटतंय सगळी तयारी बघून ..

झक्की, शालजोडीतली कोपरखळी आवडली आणी पटलीसुध्दा ..


Supermom
Thursday, August 16, 2007 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, मी काल तुम्हाला मेल केलीय.

Zakki
Thursday, August 16, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, मेलबद्दल धन्यवाद.

सशल, मग या की. शुक्रवारी रेड आय घेऊन या. येताना तिकडील जनतेला पण घेऊन या!

चुकीच्या किनार्‍यावर राहिल्याने कदाचित् तुम्हाला इथले रितीरिवाज, भाषा कळणार नाही, पण आम्ही सांभाळून घेऊ.


Robeenhood
Friday, August 17, 2007 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय मग झक्की साहेब,कुठपर्यन्त आलीय तयारी?
नाही म्हणजे भुयार खोदण्याची म्हंटो मी....


Limbutimbu
Friday, August 17, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> नाही म्हणजे भुयार खोदण्याची म्हंटो मी....
काऽऽऽ? भुयाराच्या दुसर्‍या तोन्डाशी तू उभा ठाकणार का हात द्यायला????

Maudee
Friday, August 17, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय्यत तयारी दिसते आहे.... फोटो नक्की टाका.... ख़रच यावस वाटतय:-)



Zakki
Friday, August 17, 2007 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार बा. रा. ए. वे. ए. ठि. कर.
रॉबिनहूड, भुयार नाही हो, खड्डा,खड्डा! तुमच्यासाठी खड्डा खोदून ठेवला आहे. केंव्हाहि आलात की मारा त्यात उडी. हिंमत, ज्ञान नि डोके असेल तर! आम्ही वरून माती टाकू.

maudee , तुम्ही रॉबीनहूडच्या घरी करा की GTG ! चांगला जंगी बेत ठेवा! सगळ्यांना यावेसे वाटले पाहिजे, रॉबिनहूड असले तरी!!


Robeenhood
Friday, August 17, 2007 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय्यत तयारी दिसते आहे.... फोटो नक्की टाका.... ख़रच यावस वाटतय >>>>>
हो जय्यत तयारी पण भुयाराची! हमारे तुरुंगमे सुरंग? हा: हा: !
टाका टाका भुयाराचा फोटो जरूर टाका!




Zakki
Friday, August 17, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए. वे. ए. ठि. ( GTG ) हे, शनिवार दि. १८ ऑगस्ट २००७ रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.


जर शारीरिक कष्टांचे काम करायची इच्छा असेल, नि शक्य असेल तर जरा अर्धा तास आधी येऊन, टेबले, खुर्च्या लावणे, खेळांची तयारी, विशेषत: बॅडमिंग्टन कोर्ट उभे करणे, याला मदत लागेल.

कुणावरचा राग काढायचा असेल, तर कापाकापी (कांदे, बटाटे, टमाटे इ. ची) करायला सामान पुरवले जाईल.

शिवाय आधीपासूनच रं. पा. पिणे सुरु करता येईल, हा फायदा!


Robeenhood
Friday, August 17, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, हो, सगळे योग्य ठिकाणी ठेवले आहे.
मी असेन नसेन


Zakki
Friday, August 17, 2007 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहूड, तुम्ही नसला तर फार बरे होईल चालेल.

Asami
Friday, August 17, 2007 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की तुमचा phone no mail करू शकाल का please ?

Amruta
Friday, August 17, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहे रे माझ्याकडे त्यांचा नंबर. तु directions आणतोयस?कि मी किरणला सांगु?

Savyasachi
Friday, August 17, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, तुमच्याइथे पार्कींगला किती जागा आहे? की आजूबाजूच्या गल्ल्ल्यांमधे शोधाव लागेल?

Robeenhood
Friday, August 17, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर शारीरिक कष्टांचे काम करायची इच्छा असेल, नि शक्य असेल तर जरा अर्धा तास आधी येऊन, टेबले, खुर्च्या लावणे, खेळांची तयारी, विशेषत: बॅडमिंग्टन कोर्ट उभे करणे, याला मदत लागेल.

>>>>
याला म्हणतात 'जिसका जूता उसीका सर' :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators