|
खेड्यातल्या कोंबड्या त्या!! त्यांना का डोहाळे लागुन मग अंडी मिळणार आहेत. त्यांच्या नशिबी तव्याचे चटके... पुण्या मुंबईच्या कोंबड्या कश्या... १५ दिवसात डोहाळे मग चटक्याविना अंडी
|
Neel_ved
| |
| Wednesday, July 18, 2007 - 10:54 am: |
| 
|
१५ दिवसात डोहाळे .... भ्रमा, मला बी पटलं.....
|
pune-mumbai kar milun yach mazya ghari..काय दिवाळंदिवाळी साजरी करायची आहे की काय?
|
Reena
| |
| Wednesday, July 18, 2007 - 11:35 am: |
| 
|
काय दिवाळंदिवाळी साजरी करायची आहे की काय? दिवाळी नाही, पोळा आहे, म्हणुन बैलांना बोलावतेय...
|
Swa_26
| |
| Wednesday, July 18, 2007 - 12:24 pm: |
| 
|
वृत्तांत लिही वृतांत लिही आग्रह आहे सर्वांचा मायबोलीचे नाव घेउन वृत्तांत लिहितेय, आता वाचा!!! ह्या वेळचा व वि हा माझा सगळ्यात पहिला वृत्तांत!! infact या आधी एक GTG सोडले तर व्यक्तिश्: कोणाला भेटलेही नव्हते मी. पण मायबोलीवरील हा कार्य्क्रम मला चुकवायचा नव्हता म्हणुन रजिस्ट्रेशन केलं आणि नंतर मग तिकडे groupism वगैरे चालते असे काहीतरी वाचुन माझा निश्चय डळमळु लागला. पण मग एका क्षणी असे ठरवले, की काहीही झाले तरी या वेळी जायचेच, कारण एकदा तरी गेल्याशिवाय काय ते नक्की कळणार नव्हते. (आणि आता मी त्या क्षणाची आभारी आहे) तर, सालाबादप्रमाणे या सालीही व वि ची नोटिस आली आणि मग ठरलेल्या दिवशी आम्ही (मी, नील आणि आनंदमैत्री) विवक्षित जागी पोचलो तर तिथे, सुषमा (पक्षी: आमची गाडी) आधीच येउन उभी!! आणि तिच्याबरोबरच योगी, भ्रमर, अश्विन, लाडकी, गिरिविहार आणि योगायोग!! थोड्या वेळाने आनंदसुजु आणि नाना हलत डुलत येउन पोचले, पण नानाची तब्येत बिघडल्याने तो निघुन गेला. त्यानंतर आम्ही सगळे घारुअण्णांची वाट पाहु लागलो, पाच मिनिटात येतो असे सांगुन अण्णा आपली पत्नी (शिल्पा) व मुलगी (नुपुर) यांच्यासह बरोब्बर अर्ध्या तासाने हजर झाले आणि आम्ही मार्गस्थ झालो, यानंतर रिना, चेतना आणि नंदिनी यांना pick up करुन प्रवास सुरु झाला. प्रवासाची सुरुवात अश्विनने आणलेले पेढे आणि नंदिनीने आणलेले लाडु खाउन झाली. मग आनंद, भ्रमर, योगी, घारुअण्णा, आनंदमैत्री आणि नील यांनी गाडीचा ताबा घेत गाण्याना सुरुवात केली आणि वातावरण एकदम पिकनिकमय झाले. आनंदच्या गाण्याला हां जी.. हां जी.. करत आमची गाडी एका चहावाल्याच्या टपरीवर थांबली. भ्रमाची कल्पना.. ( i mean ..idea नाहीतर उद्या भ्रमाची पिटाई व्हायची!!!) अशी, की छोटी टपरी असेल तर चहा लवकर मिळेल. पण त्याच्याकडील साहित्याचा साठा बहुधा संपला असावा, म्हणुन त्याने आणायचा तेव्हाच चहा आणुन दिला.. दरम्यान नंदिनीच्या आईने पाठवलेल्या मेथीच्या थेपल्यांचा समाचार घेण्यात आला आणि त्यासोबतच नवीन मेंबर्सची ओळख झाली. गाणी म्हणत म्हणत रस्ता कधी संपला तेच कळले नाही. नाहि म्हणायला आनंद आणि भ्रमाला मधे मधे तिथल्या वसतिगृहाची आठवण झालीच, शिवाय जाता जाता मोदी रिसॉर्टची पण याद आली. सगुणा बागेत पोचलो तर पुणेकर आमच्या आधीच पोचुन उपमा... (कि उप्पिट??) आणि कांदेपोहे (मायबोलीचा ID नाही, खाण्याचा एक पदार्थ) यांचा आस्वाद घेत होते. थोडा श्रमपरिहार करुन आम्हीही त्यांना सामिल झालो. त्याच वेळी पूनमने तिथे येऊन सगळ्यांना अचुक ओळखत तिच्या मायबोलिच्या ज्ञानाची चुणुक दाखवली!!! यापुढील कार्यक्रम सुरु करण्यापुर्वी व वि च्या संयोजकांची ओळख करुन देण्यात आलि. क्रमश्:
|
Swa_26
| |
| Wednesday, July 18, 2007 - 12:36 pm: |
| 
|
यानंतर सां स. चा कार्यक्रम सुरु झाला, "पर्दा है पर्दा".. मुंबई आणि पुने असे २ गट पाडुन मधे एक पडदा धरण्यात आला. (लगेच मागुन मंगलाष्टकांचे सुर येऊ लागले... ) सुरुवातीला जरी पुणेकरांची सरशी होती, तरीही नंतर (काहि पुणेकर सभासदांच्या मदतिने) मुंबई गट विजेता ठरला. (आधी जरी हा खेळ कळला नाही तरी नंतर नंतर त्यातील बारकावे लक्षात येऊ लागले. वाकुन उभे राहणे, खालि पुर्ण झोपणे वगैरे वगैरे) यानंतर सगळ्यांनी तिथल्या तलावाच्या दिशेने प्रस्थान केले. पण तिथले मासे नुसते पाहुनच समाधान मानावे लागल्याने भ्रमर, योगि व आनंदमैत्री हे निराश दिसले पण तिथले यजमान अतिशय व्यवस्थित माहिती देत त्या माशांचे वर्णन करत होते. रोहु, कटला असे मासे त्यांनी दखवले. यापुढिल कार्यक्रम होता बफेलो रयडिंगचा!!! यात सगळ्यात पहिले पुढे आलेले ते राज्या!! त्यानंतर मग घारुअण्णा, त्यांची कन्या, आनंद्मैत्री, नंदिनी आणि रिना या सगळ्यांनी त्या म्हशीची परीक्षा घेतली (बिचारी म्हैस फारच सहनशील हो!!!) तिच्या भावना समजुन मग मी तो रायडिंगचा बेत रद्द केला. (भीती वाटत होती ते सांगयचे नाही ) मग सगळ्यांनी धबधब्याचा रस्ता धरला. पन पाउस नसल्याने वर्षा नसतानाच पाण्यात विहार चालु केला. मुंबईकर आणि पुणेकर दोघांनीही याचा पुरेपुर आनंद घेतला पण वेळ कमी असल्याने जलविहाराचा कार्यक्रम थोडक्यातच आवरता घेतला. पाण्यात खेळल्याने (की चालुन आल्याने??) सगळ्यांनाच भुक लागलेली होती. मग काय ड्रेस बदलुन, फ्रेश होउन सगळे भोजनाकडे वळले. छोले, फ्लॉवरचि भाजि, वरण, भात, चपाति, कोशिंबिर, पापड आणि गुलाब्जाम यांच्यावर सगळ्यांनीच ताव मारला. तेवढ्यात सगुणा बाग यांच्या तर्फे स्थानिक कलाकारांचा लोकनृत्याचा कार्यक्रम पार पडला. मग स्पर्धांना सुरुवात झालि. शब्द्खेळ, डंबशेराड्स, मायबोली क्विझ अशा स्पर्धा होत्या. डंबशेराड्स या स्पर्धेने सगळ्यांची खुप मस्त करमणुक केली. विशेषत्: राकुचा द्रौपदी वस्त्रहरणाचा आणी कुरवाळतो भाऊराया हे अभिनय तर अप्रतिम!!! त्या मानाने घारुअण्णांना मात्र कमी scope मिळाला कारण त्यांचा अभिनय त्यांचे साथीदार लगेच ओळखत. छोट्या धनुने शेवटच्या क्षणी केलेल्या अभिनयाला सगळ्यांची दाद मिळाली. मायबोली क्विझ मधे पूनम आणि भ्रमर ने बाजी मारली (बापुंची करणी अगाध आहे २६ आता तरी भ्रमाचा भ्रमर्मिकी होणार का??? वाल्याचा वाल्मिकी या धर्तीवर!!) शब्द्खेळात तर ते अचाट आणि अतर्क्य शब्द ऐकुन संयोजकांच्या मेहनतीचे कौतुक वाटले आणि स्वत्:ला असलेला मराठी भाषा खुप महिती असल्याचा अभिमान गळुन पडला २६ कोतवालघोडा, झावळ्मावल, महागमोल २६ अरारारा, डोक्याचा चुरा झाला अक्षरे जुळवताना!! म्हणींचा खेळ मात्र खुप मस्त झाला. मधे मधे पेशवे यांच्या फर्माइश सुरु होत्या, मायबोलीवरील सर्वात जुने सभासद, सर्वात उंच सभासद, चित्तवेधक वेशभुषा यात अनुक्रमे मिल्या, यशवर्धन आणी चि. पार्थ यांनी बाजी मारली. सगळ्यात जास्त चित्र असलेली नाणी सौ. क्रिशनाजींकडे असल्याने त्यांना हे बक्षिस मिळाले. क्रमश:
|
Swa_26
| |
| Wednesday, July 18, 2007 - 12:52 pm: |
| 
|
एवढे सगळे होता होता ६.०० कधी वाजले ते कळलेच नाहि, आणि त्यामुळे वैयक्तिक गुणदर्शनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. (आणि योगि जरा जास्तच खुश दिसला, माझे गाणे ऐकायची नामुष्की टळल्याने !!!) आणि मग चहा-भजीचा आस्वाद घेउन सगळ्यांनी आपापले सामान जमा केले व फोटो काढण्याचा एक छोटा कार्यक्रम झाला. आणि एकमेकांचा निरोप घेत सगळ्यांची पावले गाडीकडे वळली. ग़ाडीत पुन्हा एकदा गाण्यांचा आणि उखाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. (मला कुठुन बुद्धि सुचली आणि मी पण "मटणात मटण कोंबडीचे मटण्… मटणात मटण कोंबडीचे मटण आणि फर्नांडीसच्या शर्टाला हाडकाचे बटण" असा उखाणा घेतला आणि तेव्हापासुन त्या फर्नांडिसाच्या नावाने सगळ्यांनी मला पुरेपुर छळून घेतलेय ) योगीने मात्र रिनाची फर्माइश पुर्ण केली आणि स्वत्:च्या नृत्यकौशल्याचे दर्शन घडवले. सगळ्यांना drop करत करत आमची गाडी मुलुंडला पोचली आणि अस्मादिक घरो पोचलो तेव्हा १०.३० होउन गेले होते. कसेबसे ४ घास पोटात टाकले आणि निद्राधीन कधी झाले त्याचा पत्ताच नाही लागला…. पण पुढच्या व वि ची माझी entry book आहे आधीच!!! ईति आमचे व वि पुराण सम्पुर्णम!!!
|
पण पुढच्या व वि ची माझी entry book आहे आधीच!!! एकटीच की हाडकाचे बटण वाल्या.... ????
|
Reena
| |
| Wednesday, July 18, 2007 - 2:00 pm: |
| 
|
स्वा, छान लिहीला आहेस व्रुत्तांत काय म्हणतेस बाकी, फ़र्नांडीस बाई कश्या आहात??? ववी ला अजुन वेळ आहे, पण जीटीजी ला मात्र नक्कीच भेटू सगळे...
|
Pendhya
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:01 pm: |
| 
|
वा! वा! सगळ्यांचे वृत्तांत वाचून, अप्रत्यक्षरित्या का होईना, पण सगुणा बागेतल्या वविची सफ़र झाली. योगी, स्वाती, कृष्णा, जबरी लिहिलेत वृत्तांत.
|
Zakasrao
| |
| Thursday, July 19, 2007 - 4:24 am: |
| 
|
स्वाती मस्तच लिहिलस. मग पुढच्या वेळी नक्की ना: )
|
Krishnag
| |
| Thursday, July 19, 2007 - 4:45 am: |
| 
|
स्वाती, छान लिहलास वृत्तान्त!! अगदी नेटका!!
|
Ravisha
| |
| Thursday, July 19, 2007 - 5:00 am: |
| 
|
सर्वच वृत्तांत लेख उत्तम... अगदी डोळ्यांपुढे चित्र उभे केले हो तुम्ही सगळ्यांनी फक्त धनश्रीने कसला मूक अभिनय केला आणि पार्थला कुठल्या वेशभूषेसाठी बक्षीस मिळाले ते सांगता का please ? "म्हैस सफरी" चा फोटो " wanted "...पाठवा ना कुणीतरी link
|
Arun
| |
| Thursday, July 19, 2007 - 6:00 am: |
| 
|
स्वाती : छान जमलाय वृतांत ........
|
Monakshi
| |
| Thursday, July 19, 2007 - 6:17 am: |
| 
|
सगळ्यांचे व्रुतांत खूपच छान आहेत. keep it up
|
स्वाती छान वृत्तांत. 'चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला' या गाण्याकरता मयूरेशने द्रौपदीचे लुंगीहरण केले. राकूने नाही. राक्यानी 'कुरवाळू का सखे मी हे केस रेशमाचे' (रेशमियाचे नाही) चे रिमिक्स ऐकले असल्याने 'कुरवाळू का भाऊराया' असे गाणे ओळखले. धनश्रीने 'एक वार पंखावरूनी' चा मुकाभिनय केला होता.
|
Krishnag
| |
| Thursday, July 19, 2007 - 7:28 am: |
| 
|
केपी, तू खरेतर मुकाभिनयात भाग घ्यावयास हवा होता!! आम्ही तुझा मुकाभिनय पहाण्याच्या मोठ्या आनंदाला मुकलो!!!
|
Psg
| |
| Thursday, July 19, 2007 - 7:55 am: |
| 
|
छे हो कृ, तो कुंपणावर असतो नेहेमी, म्हणजे 'हे असे करायला हवे होते, हे तसे का नाही केले?' अश्या comments चा हक्क शाबूत रहातो! होकिनाई केप्या? स्वाती, छान लिहिला आहेस! रविशा, पार्थ (वय ४ वर्ष) मुळातच फ़ार गोड दिसतो. त्यामुळे तो स्पर्धेत उतरल्यावर त्यालच सगळी मतं मिळाली
|
Reena
| |
| Thursday, July 19, 2007 - 9:46 am: |
| 
|
हाय मायबोलीकर्स सगळ्या मिसलेल्यांनी मायबोलीचे फोटो पाहुन घ्यावेत... केपी, छान वर्णन केलेस, आता व्रुत्तांत ही लिहुन टाक पाहु..
|
Monakshi
| |
| Thursday, July 19, 2007 - 9:48 am: |
| 
|
पण फोटो पहायचे कुठे???
|
|
|